Blackmail book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Blackmail is also popular in Crime Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ब्लॅकमेल - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Crime Stories
“सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली.
“ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला.
“ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या
“ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?”
“ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या
“ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला
सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं.
“ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय तुला?”
“ पटवर्धन,मला गायब व्हायचंय कुठेतरी, म्हणजे व्हायलाच लागणार आहे, पण माझ्या आई बाबांना शोधता येता कामा नये मला.”
ब्लॅकमेल प्रकरण १ “सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही ...Read Moreभेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं. “ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय
प्रकरण २ सकाळी नऊ वाजता पाणिनी आपल्या ऑफिसात आला तेव्हा सौंम्या आणि गती एकमेकांकडे पाहून हसत होत्या.पाणिनी ला काहीतरी संशय आला म्हणून त्याने गतीकडे चौकशी केली की काय भानगड आहे.गतीने पाणिनीच्या टेबलावर ठेवलेल्या वर्तमान पत्राकडे पाणिनीचं लक्ष वेधलं.यातील छोट्या ...Read Moreया सदरात आलेल्या एका जाहिराती भोवती लाल वर्तुळ काढून ठेवलं होतं गती ने.पाणिनीने ते वाचलं. ‘ रोख रकमेच्या बदल्यात मी तडजोड करायला तयार आहे.मला डेल्मन हॉटेल मधे संपर्क करा १२३-३२१ ’ “ ही आपल्याच अशिलाने दिलेली जाहिरात आहे?” पाणिनीने विचारलं. “ दिसतंय तरी तसच ” सौंम्या म्हणाली. “ अवघडच आहे.एकंदरित तो माणूस तिला चांगलाच त्रास देणार असं वाटतंय.आणि मग ती