Power of Attorney book and story is written by Dilip Bhide in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Power of Attorney is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पॉवर ऑफ अटर्नी - Novels
by Dilip Bhide
in
Marathi Fiction Stories
त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान मुंबई एयर पोर्ट वर लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली आणि आत्ता तिसर्या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती.
दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत होता. विभावरी ला वाटलं की आपला बहुधा मजला चुकला म्हणून ती दोन पावलं मागे सरकली आणि दारावर काय नंबर आहे ते बघितलं. नंबर बरोबर होता. मग हा माणूस कोण असावा आणि सानिका कुठे गेली आहे यांचा विचार ती करतच होती, तेवढ्यात त्या माणसानी विचारलं.
पॉवर ऑफ अटर्नी भाग १ त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान मुंबई एयर पोर्ट वर लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली ...Read Moreआत्ता तिसर्या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती. दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत
पॉवर ऑफ अटर्नी भाग 2 भाग १ वरुन पुढे वाचा “विभावरी तू थांब जरा, मला बोलू दे.” काकांनी विभावरीला समजावलं. “किशोर साहेब, असं बघा, तुमच्या जवळ ते अधिकार पत्र आणि घराची सेल डिड असेलच ना ? तर दाखवता ...Read Moreजरा ?” काकांनी विचारलं. “मूळ पेपर बँकेत जमा केले आहेत. झेरॉक्स आहेत. एक मिनीट थांबा दाखवतो.” किशोर म्हणाला काकांनी कागद पत्रे पाहिली आणि मान हलवली. मग किशोरला म्हणाले “तुम्ही पैसे कोणाला दिले ?” “बँकेने सानिका मॅडम च्या नावाने पे ऑर्डर काढला होता. अधिकार पत्रात तसं स्पष्ट लिहिलं आहे की पैसे सानिका ला द्यावेत आणि ते मला मिळाले असे समजावे. Deemed
पॉवर ऑफ अटर्नी भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा आठ दहा दिवस तसेच गेले. पोलीसांकडून काहीच बातमी आली नाही. एक दिवस लंच टाइम मध्ये किशोर ला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी विभावरीला फोन लावला. “हॅलो मी किशोर बोलतोय.” ...Read Moreसेव केला आहे तुमचा. बोला. काही कळलं का ?” – विभावरी. “नाही. कालच गेलो होतो. मला म्हणाले काही प्रगती झाली तर कळवू. सारखे सारखे येऊ नका. आदल्याच दिवशी तुम्ही पण आला होता असं म्हणाले.” – किशोर. “हो मला पण तुमच्या सारखंच उत्तर मिळालं. काय करायचं ?” – विभावरी. “आपण भेटूया का ? अर्थात तुम्हाला जर वेळ असेल तरच.” – किशोर.
पॉवर ऑफ अटर्नी भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा “विभावरी मॅडम लोकं आपल्याकडे बघताहेत, स्वत:ला सावरा.” विभावरीनी त्याच्याकडे पाहीलं. डोळे पाणावलेले आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. तिने पर्स मधून रूमाल काढला आणि चेहरा पुसला. किशोर कडे ...Read Moreहसली. म्हणाली “किशोर सर, तुम्ही नका काळजी करू तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, उलट तुम्हीच फसवल्या गेले आहात. देव इतका निष्ठुर नाहीये. सगळं काही ठीक होईल. मला विश्वास आहे.” किशोर हसला. म्हणाला “जेंव्हा कोणी तुमच्याबद्दल आपलेपणाने बोलतो तेंव्हा इतकं बरं वाटतं. विभावरी मॅडम थॅंक यू.” “किशोर सर, मला जे जाणवलं तेच मी बोलले. माझं तर फक्त आर्थिक नुकसान झालेलं आहे
पॉवर ऑफ अटर्नी भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा किशोर घरी गेल्यावर चहा पिता पिता आईशी बोलत होता. रोज दिवसभराचं अपडेट देण्याची त्याची सवय होती. विभावरीनी सांगीतलेली सानिकांची कथा सांगून झाली. हे सगळं पुराण ऐकल्यावर आई खूपच हळहळली. ...Read More“एवढं सगळं तिने सानिकासाठी केलं म्हणजे एक प्रकारे धाकट्या बहिणीसारखी सांभाळतच होती तिला. पण तिने अशी परतफेड का केली असावी हे काही समजत नाही. कृतघ्न पणाचा कळसच गाठला. काय म्हणावं या पोरीला ? विभावरीला केवढा धक्का बसला असेल यांची कल्पनाच करवत नाही. बिचारी विभावरी!” आईने संवेदना प्रकट केली. “धक्का बसला आहेच. पण आता सावरली आहे. म्हणत होती की, आपण सगळे