Murder Weapon book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Murder Weapon is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मर्डर वेपन - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Thriller
“आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.” “ कोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं “ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. “ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बा
मर्डर वेपन प्रकरण १ “आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.” ...Read Moreकोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं “ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. “ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बाहेर पडले आणि पाच दहा मिनिटात ही बया आली म्हणे.खूप चिडून आली होती.गतीला म्हणाली कि कोणत्याही स्थितीत तिला पाणिनी
प्रकरण २ ऑफिसची वेळ संपत आली तेव्हा सौम्याने पाणिनीला विचारलं, “ बंद करायचं ऑफिस?” “आणखी काही करण्यासारखं हातात नाही आपल्या.” पाणिनी म्हणाला. “सर तुम्ही त्या मुलीचा रात्रभर विचार करत बसणार आहात का?” “तिला विसरता येत नाही. मला वाटतं आपण ...Read Moreभेटायला विलासपूर ला जाऊया” “पण ती तिथे नाहीये अत्ता.” “पण तिचा फ्लॅट तिथे आहे आणि आपल्याकडे त्या फ्लॅटची किल्ली आहे.” “तिच्या घरात आपल्याला काय सापडणारे?” “काहीतरी क्लू मिळेल किंवा कदाचित काही मिळणारही नाही.” पाणिनी म्हणाला. “सर, तुम्ही तिच्या फ्लॅटमध्ये शिरणार आहात?” “मलाच माहीत नाही. आता तरी काही सांगता येणार नाही. पूल आला की तो कसा ओलांडायचा याचा मी विचार करीन.
मर्डर वेपन प्रकरण ३ “ एक मिनिट, तुला नक्की पोलिसांना बोलवायचं आहे?” पाणिनीनं विचारलं “ का नाही बोलवायचं? तुम्ही....” ती ओरडली. “ तू माझ्या ऑफिसात तुझी हँड बॅग विसरून आलीस त्यात अशा काही वस्तू होत्या की पोलिसांनी त्या पहिल्या ...Read Moreतू अडचणीत येऊ शकतेस. त्या तुझ्या असोत किंवा नसोत, तुला त्याचा खुलासा पोलिसांना द्यावाच लागेल.” तिने फोन खाली ठेवला. पाणिनी पटवर्धन ने तो उचलून पुन्हा तिच्या हातात दिला. “ कर फोन.” तो म्हणाला. ती अडखळली. “ तुम्ही सर्व काही संग मला.” ती म्हणाली. “ सुरुवात तुम्ही करायला हवी,मिसेस रायबागी.तुम्ही माझ्या ऑफिसातून मला न भेटता निघून जाणे, किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि
मर्डर वेपन प्रकरण ४ दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर सौंम्या पाणिनीला म्हणाली, “तुमच्या कालच्या लाडक्या अशिलाचा फोन आलाय सर.” तिने पाणिनी कडे फोन दिला. “ मिस्टर पटवर्धन, मला तुम्हाला तातडीने भेटायलाच हवंय” रती म्हणाली. “ तू इथे चैत्रापूर मधे आहेस?” ...Read Moreविचारलं “ हो.” “ इथे कशी आलीस तू?” “ मी काल रात्रभर झोपू शकले नाही.मी जसजसा विचार करत होते तसतस मला तुमचं म्हणणं पटत गेलं.म्हणजे आपण एकत्र घरी जाऊन काही ...” “ काही काय?” पाणिनीनं विचारलं “ काही घडलं नाही ना ते पाहू.” “ म्हणजे?” पाणिनीनं विचारलं “ म्हणजे पद्मराग ने आजची त्याची सकाळी दहा ची अपॉइंटमेंट पाळली नसेल तर
प्रकरण ५ त्याच वेळी रिसेप्शानिस्ट गती ने इंटरकॉम वरून इन्स्पे.तारकर आत येत असल्याची बातमी दिली.“ मला वाटत तुम्ही मिसेस रायबागी आहात.” आत घुसल्या घुसल्या रती कडे पहात तारकर म्हणाला.“ ओह! तारकर, ये,ये. तिच्यावर दबाव टाकून तू जी माहिती तू ...Read Moreघेऊ इच्छित आहेस ती मीच तुला देतो.” पाणिनी थेट विषयाला हात घालत म्हणाला. “ तिला थोड्याच वेळापूर्वी तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर कडून फोन आला की तिच्या नवऱ्याचा खून झालाय. आणि या गोष्टीला काही का होऊन गेलाय. तो म्हणाला की या घटनेची माहिती तो पोलिसांना देणार आहे.रती ने त्याला सांगितलं की ती इथे माझ्या ऑफिसात असल्याचं त्याने पोलिसांना सांगावं.”“ अरे वा !