Description
निळ्याभोर आकाशाखाली अथांग पसरलेला समुद्र त्यात येणारा लाटांचा आवाज , तो मंद वारा, पक्षांचा किलबिलाट, त्यात येणाऱ्या वाळूचा एक एक थर चढणारे सगळ कस मोहून टाकणारे होत ,पण त्यात एक भयाण शांतता ती कधी पण जीव घेणी असू शकते अशी, आणि त्यातच किनार्यावर एक मुलगी झोपलेल्या स्थितीत असते, हळू हळू ती स्वतचे डोळे उघडते, तेव्हा तीच डोक खूप जड झालेले असत , स्वताला सावरत ती उठ्ते आणि बघते तेव्हा ती एका अज्ञात ठिकाणी आहे अस तिला जाणवत , ती सावकाश उठते ,मनात धडधडत असते तेव्हा समोर बघते तर तिला अस वाटत हां तिच्या समोरचा समुद्र आता तिला गिळून टाकेल , तिला खूप अस्वथ वाटत हि भयाण शांताता तिला नकोशी वाटते, ति बघते तर तिच्या शेजारी एक शंख पडलेला असतो आणि तो ती शंख वाजवते पण तिला प्रतिसाद मिळत नाही मग, ती उठते , इकडे तिकडे बघते काय झालाय आपल्याला बघते , तिला आपण कुठे आलोय आणि का आलोय कळत नसत मग तिला आठवत अरे आपल अतिस्त्व पण तिला आठवत नसत काय कराव सुचत नाही, तिला पळून इतका दम लागतो कि, ती धापा टाकत असते , तेवढ्यात एक मुलगी तिच्या समोर येते , तिला बघून विचारते ,” तू कोण आहेस आणि काय करतेस..??” त्या दोघी एकमेकांसमोर येतात त्यांना त्यांची ओळख कळत नसते , कारण ती दुसरी मुलगीची अवस्था पहिल्या मुलीसारखी झालेली असते तिला हि तिची ओळख माहिती नसते, तिला काय कराव काही सुचत नाही , म्हणून दुसरी मुलगी तिच्या वर चाकू धरून असते , त्या मुलीला चाकू धरता येत नाही हे बघता पहिली मुलगी तो चाकू निट सावरायचा पर्यंत करते आणि बोलते,” मला हि नाही माहिती मी इथे कशी आले , आणि मला हि माझ नाव नाही आठवत आहे मी पण तुझ्या सारखी गोंधळलेली आहे ”