Suman in Marathi Women Focused by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | सुमन

Featured Books
Categories
Share

सुमन

सुमन ..

सुमनला मी प्रथम भेटले माझ्या एका मैत्रिणी कडे

आम्ही एका कॉलेज मध्ये नव्हतो त्यामुळे फारशी ओळख नव्हती ..

“माझ्या मैत्रिणी कडे तिची ओळख झाली

रूप यथा तथाच ..रंग अगदी काळा..उंची बेताची

थोडी जाड शरीर यष्टी .,

खेडे गावातून आल्यामुळे फारसे प्रसाधन नाही

अगदी साधा सुधा जुना वाटावा असा स्कर्ट व ब्लाऊज असा पेहेराव

फार आकर्षक वाटावे असे तिच्यात काहीच न्हवते

एक मात्र नक्की तीचे डोळे खूप “तेजस्वी होते त्यात एक “चमक होती .

प्रथम बोलण्यातच तिच्या” बुद्धी “ची चमक जाणवत होती

हळू हळू ओळख वाढू लागली आणी मग इतर पण माहिती समजली तिची

ती कोल्हापूर जवळील एका खेडे गावातील ..

घरची गरिबी...होती

थोडी शेती वगैरे होती ..पण त्यात घरचे कसेतरी भागत होते

खूप हुशार असल्याने अकरावीला ती बोर्डात आली होती

मग पुढील शिक्षणासाठी तिच्या शाळेतील शिक्षक वर्गाने मदत केली

व तीला शहरात शिकायला ठेवले

ती आणी तिच्या दोन तीन मैत्रिणी एकत्र खोली घेवून रहात होत्या

“भाषा” विषय तिचा हातखंडा होता ..

मराठी निबंध लेखन आणी वक्तृत्व यात तर ती पूर्ण विद्यापीठात पहिली असे !!!

तीचे अक्षर तर” मोत्या “सारखे होते

त्यामुळे हस्ताक्षराची बक्षिसे सुद्धा तीच्याच “खिशात” असत

तीचा स्वभाव मात्र खूप बोलका होता ..अगदी छोट्या ओळखीत सुद्धा ती आपल्या बद्दल सारे सारे सांगून मोकळी होत असे ..

काही वेळा माझी मैत्रीण पण वैतागाने म्हणत असे

काय बिनडोक आहे ग ही सुमन ..कुठे काय बोलावे अजिबात समजत नाही हीला !!

खरेच शहरी मुलींच्या मध्ये असणारा ..एक बेरकी पणा तिच्या कडे अजिबात नव्हता

नंतर जशी आमची शिक्षणे संपली तसा ..एकमेकींचा संपर्क पण कमी झाला

पदवीधर झाल्यावर तीला तिच्या उत्तम मार्कावर एका खाजगी कॉलेज मध्ये नोकरी मिळाली होती

इतके मात्र समजले होते

घरची सारी जबाबदारी तिच्या वर असल्याने जास्त न शिकता मिळेल ती नोकरी तिने घेतली होती

यानंतर मात्र पाच सहा वर्षे मैत्रिणींची चांगलीच “पांगापांग झाली ..

आणी अचानक मला एके दिवशी ती रस्त्यावर दिसली ..

प्रथम मी तीला ओळखले नाही कारण ..तिची तब्येत अवाढव्य झाली होती

डोळ्यातली ती “चमक “पण थोडी मंदावली होती ..

सोबत एक पाच सहा वर्षाचा छोटा मुलगा होता हाताला धरून

जुजबी बोलल्या वर समजले तीने कॉलेज मधली नोकरी सोडून दिली होती

व दुसऱ्या एका मोठ्या कॉलेज मध्ये तीला नोकरी मिळाली होती

अग मिस्टर काय करतात तुझे ?

मी उत्सुकतेने विचारले .(.मला वाटले ते पण असतील प्रोफेसर किंवा शिक्षक )

अग सोमवार पेठेत ग्यारेज आहे आमचे टू व्हीलर दुरुस्तीचे ..

ये ना एकदा.... मी दुसऱ्या मजल्यावर राहते तिथेच

हे ऐकून मला नवल च वाटले . मनात आले ...आता हा कुठला आणी कुठे भेटला हिला ग्यारेज वाला ?

पण हे विचारायची ..ती वेळ आणी संधी पण नव्हती ..

मग मीच तीचे बोट धरून उभ्या असलेल्या “गोड ..गोड मुलाची पापी घेतली

जुजबी इकडचे तिकडचे बोलून आम्ही एकमेकींचा निरोप घेतला

त्यानंतर मी काही कारणाने सोमवार पेठेत गेले तर तीचे ते ग्यारेज दिसत असे

..नेहेमी कोणत्याही ग्यारेज जवळ असे तशीच रिकाम टेकड्या माणसांची गर्दी तिथे दिसत असे!!

..पान तंबाखूचा विडी चा एक उग्र दर्प पण भरून राहिला असे

एक दाढीवाला अचकट ..विचकट बोलणारा मळक्या कपड्यातला एक माणूस तिथे खुर्चीवर

ठाण मांडून बसलेला दिसे ..

बहुधा तिचा नवरा असावा ..तो कारण त्या दिवशी तिच्या तिच्या बरोबर असणारा छोटा मुलगा

त्याच्या जवळच खेळताना दिसत असे ,

ती मात्र कधी कुठे दिसली नाही

पण एकंदर परिस्थिती वरून तिच्या आयुष्याचा “अंदाज “आला मला

मग मध्येच एका मैत्रिणी कडून समजले की

घरच्या लोकांच्या दबावाला बळी पडून तीच्या वर या लग्नाची सक्ती झाली होती

एका खेडेगावात चकाट्या पिटत राहणारा तीच्या नात्यातील हा मुलगा होता

आता लग्न झाल्यावर त्याने बायकोच्या जीवावर इथे ग्यारेज टाकले होते

कारण तो फारसे शिकलेला पण नव्हता ..आणी इतर ही काही करू शकत नव्हता

काही काळ मला खूप अस्वस्थ वाटले

कारण मी तीला खूप जवळून पाहिले होते .इतक्या हुशार मुलीच्या नशिबी असा संसार यावा ...हे बरे नाही वाटले !

मध्यंतरी मात्र .दोन तीन वर्षे अशीच उलटून गेली

तीचा विषय पण मनातून पूर्ण निघून गेला होता

नंतर अचानक माझ्या जुन्या मैत्रिणीची गाठ पडली

आणी सुमन चा विषय निघाला

बेक्कार आहे ग तिचा तो नवरा ..ती म्हणाली

आता पस्तावत,आहे ग बिचारी ..पण काय उपयोग ?

मी म्हणाले अग पण हीने तरी हे ..असे लग्न का केले ?

..ती म्हणाली .. हिची लहान बहीण लग्ना आधीच गरोदर राहिली होती त्याच्या भावाने हीच्या बहिणीशी लग्न करायचे कबुल केले होतेहिच्या कडे दुसरा कोणता मार्ग नव्हता म्हणुन

त्या बदल्यात ही याच्याशी लग्न करायला नाईलाजाने तयार झाली होती

मनात आले.... फारच विचित्र परिस्थिती आली होती ना तिच्यावर !

यानंतर काही दिवस गेले आणी अचानक पेपर मध्ये तिचा फोटो आणी मृत्यूची बातमी !

अकस्मित आजाराने निधन पावली असे लिहिले होते

माझ्या डोळ्यात पाणी आले इतक्या हुशार मुलीच्या नशिबी इतक्या लवकर आणी

असा मृत्यू ..काय आजार झाला असेल नक्की ..?

मग मीच गेले माझ्या मैत्रिणीच्या घरी

ती नुकतीच आली होती सुमन च्या घरी जाऊन

मी विचारले तीला” काय झाले होते ग तीला अशी तडका फडकी गेली ?”

अग अचानक कसली.? आजारी होती खुप दिवस .

एड्स झाला होता तीला..... आता उगाच कुठे गवगवा नको म्हणून अल्पशा आजाराने गेली असे म्हणतात झाले !!

“अग पण तीला एड्स व्हायचे काय ग कारण “?.मी विचारले

अग त्या हलकट नवर्या पासून लागलाय होता हा रोग तीला .

तो जिवंत राह्यलाय आणी ही बिचारी जीव गमावून बसली ..!!

माझ्या डोळ्या समोर तिच्या अश्राप मुलाचा चेहरा ..तरळला

आणी मन “खिन्न ...झाले !!