कादम्बरी अदभुत
© COPYRIGHTS
This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti.
Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.
Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.
Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.
अनुक्रम
किंकाळी
पुरावा
पोस्टमार्टम
पॉल रॉबर्टस
मांसाचा तूकडा
दहशत
रोनाल्ड पार्कर
गोल्फ
काही दिवसांपूर्वी
आय एम सॉरी
डांबरट
पाठलाग
प्रेमांकुर
गोष्टी आपोआप बदलत नसतात..
पक्का निर्णय
शेवटचा निरोप
गेम
त्या चौघांकडून पाठलाग
मी तुम्हाला सोडणार नाही
मग जॉन कुठे गेला? ...
आता पुढे कोण?
जेफची ट्रीक
योजना
जादूटोणा?
तुरुंगात
बेडरुमची निगराणी
रोनॉल्ड
स्पेशल मिशन
भाडेकरु
जॉन कार्टर
एक नवे वळण
आता तुमची बारी
कोडं उलगडलं?
सापळा
सिग्नलचा उगम
अॉपरेशन पार्ट 2
सिग्नल ब्लॉकर
स्फोट
खुन्याचा शोध ?
एन्थोनीची कहानी
सहानुभूती
ैपहदंस त्मबमपअमत
वार्याचा झोत
अश्रू बोलू लागले
जेन्टलमन्स प्रामीस
ब्ीममते!
ज्तमंज
छमनतवसवहल
टपेपज जव ळमवतहम
ब्वनतज ैजंजमउमदज
प्द जीम चतपेवद बमसस
अश्रूचे दोन टपोरे थेंब
किंकाळी
गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. सारा आसमंतात रातकीडयांच्या किर्र असा आवाज घुमत होता . एका बंगल्याच्या शेजारच्या झाडावर पाण्याने भीजलेले एक घूबड बसले होते . त्याची भिरभीरती भेदक नजर समोरच्या बंगल्याच्या एका आतून प्रकाश येत असलेल्या खिडकीवर खिळून थांबली . घरात त्या खिडकीतून दिसणारा तो एक लाईट सोडून सर्व लाईट्स बंद होते. अचानक तिथे त्या खिडकीजवळ आसर्यासाठी बसलेल्या कबुतरांचा झुंड च्या झुंड तिथून फडफड करीत उडून गेला. कदाचित तिथे एखाद्या अदृष्य शक्तीचं अस्तीत्व त्या कबुतरांना जाणवलं असावं. खिडकीचे काच पांढर्या रंगाचे असल्यामुळे बाहेरुन आतलं काहीच दिसत नव्हतं. खरचं तिथे काही अदृष्य शक्ती पोहोचली होती का? आणि पोहोचली होती तर तिला आत जायचे होते का? पण खिडकीतर आतून बंद होती.
बेडरुम मध्ये बेडवर कुणीतरी झोपलेले होते. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने कड बदलला आणि त्या आकृतीचा चेहरा दुसर्या बाजूला झाला. त्यामुळे कोण होतं ते ओळखनं कठीण होतं. बेडच्या बाजुला एक चष्मा ठेवलेला होता. कदाचीत जे कुणी झोपलेलं होतं त्याने झोपण्याआधी आपला चष्मा काढून बाजुला ठेवला असावा. बेडरुममध्ये सगळीकडे मद्याच्या बाटल्या, मद्याचे ग्लासेस, वर्तमान पत्रे, मासिके इत्यादी सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे पसरलेलं होतं. बेडरुमचे दार आतून बंद होते आणि त्याला आतून लॅच लावलेला होता. बेडरुमची एकुलती एक खिडकी तिही आतून बंद केलेली होती — कारण ती एक एसी रुम होती. जी आकृती बेडवर झोपलेली होती तिने पुन्हा आपला कड बदलला आणि आता त्या आकृतीचा चेहरा दिसायला लागला. स्टीव्हन स्मीथ, वय साधारण पंचविस—सव्वीस, सडपातळ बांधा, चेहर्यावर कुठे कुठे दाढीचे खुंट आलेले, डोळ्याभोवती चश्म्यामुळे तयार झालेली काळी वतृळं. काहीतरी हळू हळू स्टीव्हनपाशी जायला लागलं. अचानक झोपेतही स्टीव्हनला चाहूल लागली आणि तो दचकुन जागा झाला. त्याच्या समोर जे काही होतं ते त्याच्यावर हल्ला करण्याच्या पाविर्त्यात असल्यामुळे त्याच्या चेहर्यावर भीती पसरली, सवार्ंगाला घाम फुटला. तो प्रतिकार करण्याच्या उद्देशाने उठू लागला. पण तो प्रतिकार करण्याच्या आधीच त्याने त्याच्यावर, आपल्या सावजावर झडप घातली होती. सगळ्या आसमंतात स्टीव्हनच्या एका मोठ्या आगतीक, भयावह किंकाळीचा आवाज घुमला. आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली... अगदी पुर्ववत...
पुरावा
सकाळी रस्त्यावर लोकांची आपआपल्या कामावर जाण्याची घाई चाललेली होती. त्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ चालू होती. अश्यातच अचानक एक पोलीसांची गाडी त्या ट्रफिकमधून धावायला लागली. सभोवतालच वातावरण पोलीसाच्या गाडीच्या सायरनमुळे गंभीर झालं होतं. रस्त्यातले लोक पटापट त्या गाडीला रस्ता देत होते. जे पैदल जाणारे होते ते भितीयूक्त उत्सुकतेने त्या गाडीकडे वळून वळून पाहात होते. ती गाडी निघून गेल्यावर थोडावेळ वातावरण तंग राहालं आणि मग पुन्हा पूर्ववत झालं.
एक पोलीसांचा फोरेन्सीक टीम मेंबर उघड्या बेडरुमच्या दरवाज्याजवळ इन्वेस्टीगेशन करीत होता. तो त्याच्या जवळच्या जाड भिंगातुन जमीनीवर काही सापडते का ते शोधत होता. तेवढ्यात एक शीस्तीत चालणार्या बुटांचा श्टाक टाकश् असा आवाज आला. तो इन्व्हेस्टीगेशन करणारा वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला प्रश्न ऐकायला मिळाला कुठे आहे बॉडी ?
सर इकडे आत.. तो टीम मेंबर आदराने उठून उभा राहत म्हणाला.
डिटेक्टीव सॅम व्हाईट, वय साधारण पस्तीस—छत्तीस, कडक शिस्त, उंच पुरा, कसलेलं शरीर, त्या टीममेंबरने दाखविलेल्या दिशेने आत गेला.
डिटेक्टीव सॅम जेव्हा बेडरुममध्ये शिरला त्याला स्टीवनचं शव बेडवर पडलेलं दिसलं. त्याचे डोळे बाहेर आलेले आणि मान एका बाजूला वळलेली होती. बेडवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्याचा गळा लोळा तोडल्यागत कापलेला होता. बेडच्या स्थीतीवरुन असं जाणवत होतं की मरण्याच्या आधी स्टीव्हन बराच तडफडला असावा. डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये आजूबाजूला नजर फिरवली. फोरेन्सीक टीम बेडरुममधेही तपास करीत होती. एक जण कोपर्यात ब्रशने काहीतरी साफ केल्यागत काहीतरी करीत होता तर अजून एकजण खोलीतले फोटो घेण्यात व्यस्त होता.
एका फोरेन्सीक टीमच्या मेंबरने डीटेक्टीव सॅमला माहिती पुरविली —
सर मयताचे नावं स्टीव्हन स्मीथ
फिंगरप्रींटस वैगेरे काही मिळालं का?
नाही आत्तापयर्ंत तरी नाहीश्
डिटेक्टीव सॅमने फोटोग्राफरकडे पाहत म्हटले, काही सुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या
यस सर फोटोग्राफर आदबीने म्हणाला.
अचानक सॅमचं लक्ष एका अनपेक्षीत गोष्टीकडे आकर्षीत झालं.
तो बेडरुमच्या दरवाज्याजवळ गेला. दरवाज्याचं लॅच आणि आजुबाजुची जागा तुटलेली होती.
म्हणजे खुनी हा दरवाजा तोडून आत आला वाटतं सॅम म्हणाला.
जेफ, साधारणतरू पस्तीशीतला, बुटका, जाड, त्यांचा टीम मेंबर पुढे आला, नाही सर, खरं म्हणजे हा दरवाजा मी तोडला... कारण आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता.
तु तोडला? सॅम आश्चर्याने म्हणाला.
यस सर
काय पुन्हा आधीचे कामधंदे सुरु केले की काय? सॅम गंमतीने पण चेहर्यावर तसं न दाखविता म्हणाला.
हो सर ... म्हणजे नाही सर
सॅम ने वळून एकदा खोलीत चहुवार आपली दृष्टी फिरवली, विषेशतरू खिडक्यांवरुन. बेडरुमला एकच खिडकी होती आणि तीही आतून बंद होती. बंद असणं साहजिकच होतं कारण रुम एसी होती.
जर दार आतून बंद होतं... आणि खिडकीही आतून बंद होती ... तर मग खुनी खोलीत आलाच कसा...
सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आत आल्यावर बाहेर कसा गेला? जेफ म्हणाला.
डिटेक्टीव्हने फक्त त्याच्याकडे रोखुन बघितले.
अचानक सगळ्यांचं लक्ष एका इन्वेस्टीगेटींग अॉफिसरने आकर्षीत केलं. त्याला बेडच्या आजुबाजुला काही केसांचे तुकडे सापडले होते.
केस? ... त्यांना व्यवस्थीत सिल करुन पुढच्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवाश् सॅमने आदेश दिला.
पोस्टमार्टम
रिपोर्ट डिटेक्टीव्ह सॅम पोलिस स्टेशनमध्ये आपल्या अॉफीसमध्ये बसला होता. तेवढ्यात एक अॉफीसर तिथे आला. त्याने पोस्टमार्टमचे कागदपत्र सॅमच्या हातात दिले. सॅम ते कागदपत्र चाळीत असता त्याच्या बाजुला बसून तो अॉफिसर सॅमला इन्वेस्टीगेशनची आणि पोस्टमार्टमबद्दल माहिती देवू लागला.
मृत्यू गळा कापल्यामुळे झाला असं यात नमुद केलं आहे आणि गळा जेव्हा कापला तेव्हा स्टीव्हन कदाचित झोपेत असावा किंवा बेसावध असावा असं नमुद केलं आहे पण कोणतं हत्यार वापरण्यात आलं असावं याचा काही पत्ता लागत नाही आहेष् तो अॉफिसर माहिती पुरवू लागला.
अमॅझींग ? डिटेक्टीव सॅम जसा स्वतःशीच बोलला.
आणि तिथे सापडलेल्या केसांचं काय झालं?
सर ते आम्ही तपासले ... पण ते माणसाचे केस नाहीत
काय माणसाचे नाहीत? ...
मग कदाचीत भूताचे असतील... तिथे येत एक अॉफिसर त्यांच्यामध्ये घुसत गंमतीने म्हणाला.
जरी त्याने गमतीने म्हटले असले तरीही ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत दोन तिन क्षण काहीच बोलले नाहीत. खोलीत एक अनैसर्गीक शांतता पसरली होती.
म्हणजे खुन्याच्या कोटाचे वैगेरे असतील सॅमच्या बाजूला बसलेला अॉफिसर सांभाळून घेत म्हणाला.
आणि त्याच्या मोटीव्हबद्दल काही माहिती?
घरातील सगळ्या वस्तू तर जागच्या जागी होत्या... काहीही चोरी गेलेले दिसत नव्हते... आणि घरात कुठेही स्टीव्हनच्या हाताच्या आणि बोटांच्या ठश्यांशिवाय इतर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. अॉफिसरने माहिती पुरवली.
जर खुनी भूत असेल तर त्याला मोटीव्हची काय गरज पुन्हा तो तिथे उभा असलेला अॉफिसर गमतीने म्हणाला.
पुन्हा दोन तिन क्षण शांततेत गेले.
हे बघा अॉफिसर ... इथे हे सिरीयस मॅटर सुरु आहे ... अन कृपा करुन अश्या फालतू गमती करु नका सॅमने त्या अॉफिसरला बजावले.
मी स्टीव्हनची फाईल बघीतली आहे... त्याचा आधीचा रेकॉर्ड काही चांगला नाही ... त्याच्या विरोधात आधी बर्याच गुन्ह्याच्या तक्रारी आहेत... काही सिध्द झालेल्या आणि काहींबाबतीत अजुनही केसेस सुरु होत्या.. यावरुन तरी असं वाटतं की आपण जी केस हाताळत आहोत ती एखादी आपआपसातील वितूष्ट किंवा रिव्हेंजसारखी केस असु शकते. सॅम पुन्हा मुळ मुद्यावर येत म्हणाला.
खुन्याने जर गुन्हेगारालाच मारले असेल तर... बाजूच्या अॉफिसरने पुन्हा गंमत करण्यासाठी आपले तोंड उघडले तर सॅमने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
नाही म्हणजे तसे जर असेल तर ... बरंच आहेना ... तो आपलंच काम करतो आहे ... म्हणजे जे कदाचीत आपणही करु शकत नाही तो ते करतो आहे तो गंमत करणारा अॉफिसर आता जरा सांभाळून बोलला.
हे बघा अॉफिसर ... आपलं काम लोकांची सेवा करणे आणि त्यांचं संरक्षण करणे आहे
गुन्हेगाराचंही? त्या अॉफिसरने कडवटपणे विचारले.
यावर सॅम काहीच बोलला नाही किंबहुना यावर उत्तर देण्यासाठी कदाचित त्याच्याजवळ शब्द नसावेत.
पॉल रॉबर्टस
पॉल रॉबर्टस, काळा रंग, पंचविशीच्या आसपास, उंची पाऊने सहा फुटाच्या आसपास, कुरुळे केस, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. त्याची बेडरुम म्हणजे सगळीकडे अस्तव्यस्त पडलेला पसारा होता. वर्तमान पत्रे, मॅगेझीन्स, व्हिस्कीच्या रिकाम्या बॉटल्स इकडे तिकडे विखुरलेल्या. मॅगेझीन्सच्या कव्हर्सवर बायकांची नग्न चित्रे होती. आणि बेडरुमच्या भिंतीवर सर्वत्र त्याच्या आवडत्या हिरोईन्सचे अर्धनग्न, नग्न चित्रे चिटकविलेली होती. स्टीव्हनच्या आणि याच्या बेडरुममध्ये तसं बरच साम्य होतं. फरक एवढाच होता की याच्या रुमला दोन खिडक्या होत्या पण त्या आतून बंद होत्या. आणि बंद होत्या त्या रुम एसी असल्यामुळे नव्हे तर बहूधा खबरदारी म्हणून असाव्यात. तो आपल्या जाड, मऊ, रेशमी गादीवर तशीच जाड, मऊ, रेशमी उशी छातीशी घेवून वारंवार आपला कड बदलवित होता. कदाचित तो डिस्टर्ब्ड असावा असं जाणवत होतं. बराच वेळ त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. शेवटी कड बदलूनही झोप येत नसल्याने तो उठून बेडच्या खाली उतरला. पायात स्लीपर चढवली.
काय करावं? ...
असा विचार करीत पॉल किचनकडे गेला. किचनमध्ये जावून किचनचा लाईट लावला. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली. एका दमात त्याने मोठमोठे घोट घेत जवळ जवळ सगळी बॉटलच रिकामी केली. आणि मग ती बॉटल तशीच हातात घेवून तो किचनमधून बाहेर सरळ हॉलमध्ये आला. हॉलमध्ये पुर्ण अंधार होता. पॉल अंधारातच एका खुर्चीवर बसला.
चला थोडा वेळ टिव्ही तरी बघुया...
असा विचार करीत त्याने बाजूचं रिमोट घेवून टिव्ही सुरु केला. जसा त्याने टीव्ही सुरु केला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, डोळे विस्फारले गेले, चेहर्यावर घाम फुटला आणि त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याच्या समोर नुकताच सुरु झालेल्या टीव्हीच्या काचावर एक रक्ताचा ओघोळ वरुन खालपयर्ंत आला होता. घाई घाईने तो उठून उभा राहाला, गोंधळला आणि त्याने तश्याच घाबरलेल्या स्थीतीत खोलीतला लाईट लावला.
खोलीत तर कुणीच नव्हते...
त्याने टीव्हीकडे बघीतले. टिव्हीच्यावर एक मासाचा तोडलेला लोळा होता आणि त्यातूनच रक्त खाली ओघळत होतं.
अडत अडखळत तो टेलीफोनजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने एक नंबर डायल केला.
मांसाचा तूकडा
बाहेर कॉलनीतल्या प्लेग्राऊंडवर लहान मुलं खेळत होती. तेवढ्यात सायरन वाजवित एक पोलीसांची गाडी तिथून बाजूच्या रस्त्यावरुन धावू लागली. सायरनचा कर्कश्य आवाज एकताच काही खेळणारी छोटी मुलं कावरीबावरी होवून आपआपल्या पालकांकडे धावू लागली. पोलिसाची गाडी आली तशी वेगात तिथून निघून गेली आणि समोर एका वळणावर उजवीकडे वळली.
पोलिसांची गाडी सायरन वाजवित एका घराजवळ येवून थांबली. गाडी थांबल्याबरोबर डिटेक्टीव्ह सॅमच्या नेतृत्वाखाली एक पोलिसांची तुकडी गाडीतून उतरुन त्या धराकडे धावली.
जरा घराच्या आजुबाजुबाजुलासुध्दा बघा सॅमने त्यातल्या दोघा साथीदारांना बजावले. ते दोघे बाकी साथीदारांना सोडून एकजण घराच्या डाव्या बाजुने आणि दुसरा उजव्या बाजूने पहाणी करीत घराच्या मागच्या बाजूला धावत जावू लागले. बाकीचे पोलिस आणि सॅम धावत येवून घराच्या दरवाजाजवळ जमले. त्यातल्या एकाने, जेफने घराच्या बेलचं बटन दाबलं. बेल तर वाजत होती पण आत काहीच चाहूल दिसत नव्हती. थोडा वेळ वाट पाहून जेफने पुन्हा बेल वाजवली, या वेळेला दारही ठोठावले.
हॅलो ... दार उघडा एका जणाने दार ठोठावत आत आवाज दिला.
पण आत काहीच चाहूल नव्हती. शेवटी चिडून सॅम म्हणाला, दार तोडा
जेफ आणि एकदोन जणं मिळून दार अक्षरशरू बडवित होते.
अरे इथे धक्का मारा नाही आतली कडी इथे असेल..
इथे जोराने धक्का मारा अजून जोराने
सगळेजण नुसते ढकलू नका ... कोणीतरी आम्हाला गार्ड करा
सगळ्या गडबडीत शेवटी एकदाचे दार त्यांनी धक्के मारुन मारुन तोडले.
दार तोडून उघडताच सगळी टीम घरात घूसली. डिटेक्टीव्ह सॅम हातात बंदूक घेवून काळजीपुर्वक आत जावू लागले. त्यांच्या पाठोपाठ हातात बंदूक घेवून बाकीचे एकमेकांना गार्ड करीत आत घुसू लागले. आपआपली बंदूक रोखत ते सगळेजण पटापट घरात सर्वत्र पसरण्यासाठी सरसावले. पण हॉलमध्येच एक विदारक दृष्य त्यांच्यासाठी वाढून ठेवले होते. जसे त्यांनी ते दृष्य बघितले, त्यांच्या चेहर्यावरचा रंग उडाला होता. त्यांच्यासमोर सोफ्यावर पॉल पडलेला होता, गळा कापलेला, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या, डोळे बाहेर आलेले, आणि डोकं एका बाजूला लूढकलेलं. त्याचाही खुन अगदी त्याच पध्दतीने झालेला होता. वस्तू अस्ताव्यस्त विखूरलेल्या होत्या त्यावरुन असे जाणवत होते की त्यानेही मरायच्या आधी बरीच तडफड केली असली पाहिजे.
घरात इतरत्र शोधा सॅमने आदेश दिला.
टीममधले तिनचारजण घरात खुन्याचा शोध घेण्यासाठी इतरत्र विखुरले.
बेडरुमम धेही शोधा सॅमने ते जात असतांना त्यांना बजावले.
डिटेक्टीव्ह सॅमने खोलीत चहोवार एक नजर फिरवली. सॅमला टिव्हीच्या स्क्रिनवर ओघळलेला रक्ताचा ओघोळ आणि वर असलेला मांसाचा तूकडा दिसला. सॅमने इन्व्हेस्टीगेशन टीम मधल्या एकाला खुनावले. तो लागलीच टिव्हीजवळ जावून तेथील पुरावे गोळा करायला लागला. नंतर सॅमने हॉलच्या खिडक्यांकडे बघीतले. यावेळीही सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. अचानक सोफ्यावर पडलेल्या कशाने तरी सॅमचं लक्ष आकर्षीत केलं गेलं. तो तिथे गेला, जे होतं ते उचलून बघितलं. तो एक केसांचा गुच्छ होता, सोफ्यावर बॉडीच्या शेजारी पडलेला. ते सगळेजण कधी आश्चर्याने त्या केसाच्या गुच्छाकडे पाहत तर कधी एकमेकांकडे. इन्व्हेस्टीगेशन टीममधल्या एकजणाने तो केसांचा गुच्छ घेवून प्लास्टीकच्या पिशवित पुढच्या तपासासाठी सिलबंद केला. जेफ कावरा बावरा होवून कधी त्या केसांच्या गुच्छाकडे पाहत होता तर कधी टिव्हीवरच्या मांसाच्या तुकड्याकडे. त्याच्या डोक्यात... त्याच्याच काय बाकीच्यांच्याही डोक्यात एकाच वेळी बरेच प्रश्न घोंगावत होते. पण विचारणार कुणाला ?
दहशत
डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचा एक साथीदार कॅफेमधे बसलेले होते. त्यांच्यात काहीतरी गहन चर्चा चाललेली होती. त्यांच्या हावभावांवरुन तरी वाटत होते की ते एवढ्यात झालेल्या दोन खुनांबद्दलच चर्चा करीत असावेत. मधे मधे ते दोघेही कॉफीचे छोटे छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमध्ये ठेवलेल्या टिव्हीवर सुरु असलेल्या बातम्यांनी त्यांचे लक्ष आकर्षीत केले.
टीव्ही न्यूज रिडर सांगत होता — खुन्याने मारलेल्या अजुन एका ईसमाची बॉडी आज पोलिसांना सापडली. ज्या तर्हने आणि जेवढ्या बर्बरतेने पहिला खुन झाला होता त्याच बर्बरतेने किंबहूना जास्त .. याही इसमाला खुन्याने मारले होते. यावरुन कुणीही याच निष्कर्शाप्रत पोहोचेल की या शहरात एक खुला सिरीयल किलर फिरतो आहे... आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही बॉडीज अशा खोलीत सापडल्या की ज्या आतून बंद केलेल्या होत्या. पोलिसांना याबाबत विचारल्यास त्यांनी या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला आहे. आजुबाजुचे लोक अजुनही धक्यातून सावरलेले नाहीत. आणि शहरात तर सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. काही लोकांच्या माहितीनुसार ज्यांचा खुन झालेला आहे त्या दोघांच्याही नावावर गंभीर क्रिमीनल गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असा एक निश्कर्ष काढला जावू शकतो की तो खुनी अशाच गुन्हेगार लोकांना मारु इच्छीतो.
जर खुन्याला मिडीया अटेंशन पाहिजे होते तर तो त्याच्या उद्देशात सफल झालेला आहे डिटेक्टीव्ह सॅम आपल्या साथीदाराला म्हणाला. पण त्याच्या समोर बसलेला अधिकारी काहीच बोलला नाही कारण अजूनही तो बातम्या एकण्यात गुंग होता.
शहरात सगळीकडे दशहत पसरली होती . एक सिरीयल किलर शहरात मोकळा फिरतो आहे. पुलिस अजूनही त्याला पकडण्यात यशस्वी झाले नव्हते. तो अजून किती जणांना मारणार ? ...त्याचे पुढचे सावज कोण — कोण असणार ? आणि तो लोकांना का मारतो आहे ? काही कारण की विनाकारण ? उत्तरं कुणाजवळच नव्हती .
रोनाल्ड पार्कर
रोनाल्ड पार्कर साधारण पंचविशीतला, स्टायलीस्ट, रुबाबदार, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तो राहून राहून अस्वस्थतेने आपला कड बदलवित होता. त्यावरुन असे दिसत होते की त्याचं डोकं काही ठिकाणावर नसावं. थोडावेळ कड बदलवून झोपण्याचा प्रयत्न करुनही झोप येत नाही असे पाहून तो बेडमधून उठून बाहेर आला, आजूबाजूला एक नजर फिरविली, आणि पुन्हा बेडवर बसला. त्याने बेडच्या बाजूला ठेवलेले एक मासिक उचलले आणि ते उघडून पुन्हा बेडवर आडवा झाला. तो त्या मासीकाची नग्न चित्रं असलेली पानं चाळू लागला.
सेक्स इज द बेस्ट वे टू डायव्हर्ट यूवर माईंन्ड ...
त्याने विचार केला. अचानक श्धप्पश् असा काहीतरी आवाज त्याला दुसर्या खोलीतून ऐकायला आला. त्याने दचकुन उठून बसला, मासिक बाजूला ठेवले आणि आणि तशाच भितीयूक्त गोंधळलेल्या स्थीतीत तो बेडवरुन खाली उतरला.
कशाचा हा आवाज असावा...
पुर्वी कधी तर कधी असा आवाज आला नव्हता..
पण आवाज आल्यावर आपण एवढे का दचकलो...
किंवा होवू शकते की आज आपली मनस्थीती आधीच चांगली नसल्यामुळे तसं झालं असावं ....
हळू हळू चाहूल घेत तो बेडरुमच्या दरवाजाजवळ गेला. दरवाज्याची कडी उघडली आणि हळूच दरवाजा तिरका करुन त्याने बाहेर डोकावून पाहिले.
सर्व घराची चाहूल घेतल्यानंतर रोनाल्डने हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमधे गडद अंधार होता. हॉलमधला लाईट लावून त्याने भितभितच चहूकडे एक नजर फिरवली.
पण कहीच तर नाही ...
सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे...
त्याने पुन्हा लाईट बंद केला आणि किचनकडे निघाला.
किचनमधेही अंधार होता. तिथला लाईट लावून त्याने चहूकडे एक नजर फिरवली. आता बर्यापैकी त्याची भिती नाहिशी झालेली दिसत होती.
कुठे काहीच तर नाही ...
आपण उगीच मुर्खासारखं घाबरलो...
तो परत जाण्यासाठी वळणार तोच किचनच्या सिंकमधे कसल्यातरी गोष्टीने त्याचं लक्ष आकर्षित केलं. त्याचे डोळे आश्चर्याने आणि भितीने विस्फारलेले होते. एका क्षणात एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. हातापायात कंप सूटला होता. त्याच्या समोर सिंकमध्ये रक्ताळलेला एक मांसाचा तुकडा पडला होता. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिथून धूम ठोकली होती. काय करावे त्याला काही कळत नव्हते. गोंधळलेल्या स्थितीत सरळ बेडरुममध्ये जावून त्याने आतून कडी लावून घेतली.
गोल्फ
डिटेक्टीव सॅम गोल्फ खेळत होता. रोजच्या कटकटीतून आणि ताण तणावातून हा त्याला विरंगुळा होता. त्याने एक जोराचा शॉट मारल्यानंतर बॉल छिद्राच्या जेमतेम सहा फुटाच्या अंतरावर घरंगळत थांबला. तो बॉलजवळ गेला. जमीनीच्या चढाचा आणि उताराचा अंदाज घेतला. बॉलवरुन टी फिरवुन किती जोरात मारावी लागेल याचा अंदाज घेतला. आणि काळजीपुर्वक, बरोबर दिशेने, बरोबर जोर लावून त्याने एक हलकेच शॉट मारला आणि बॉल छिद्राकडे घरंगळत जावून बरोबर छिद्रात सामावला. डिटेक्टीवच्या चेहर्यावर एक विजयी आनंद पसरला. एवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. डिटेक्टीव्हने डिस्प्ले बघीतला. पण फोन ओळखीचा वाटत नव्हता. त्याने एक बटन दाबून फोन अटेंड केला, यस
डिटेक्टीव बेकर डीयर तिकडून आवाज आला.
हं बोला सॅम दुसर्या गेमची तयारी करीत म्हणाला.
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आता चालू असलेल्या सिरीयल किलर केसचे इंचार्च आहात... बरोबर? तिकडून बेकरने विचारले. .
हो सॅमने सिरीयल किलरचा उल्लेख होताच पुढच्या गेमचा विचार सोडून बेकर अजून काय बोलतो ते लक्ष देवून ऐकण्याला प्राधान्य दिले.
तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ... म्हणजे तुम्ही फ्री असाल ...तर तुम्ही इकडे येवू शकता का?... माझ्याकडे या केस संदर्भात काही महत्वाची माहिती आहे.... कदाचीत तुमच्या उपयोगी पडेल
हो ... चालेल बाजूने जाणार्या पोराला सामान उचलण्याचा इशारा करीत सॅम म्हणाला.
काही दिवसांपूर्वी
पोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव सॅम डिटेक्टीव बेकरच्या समोर बसला होता. डिटेक्टीव बेकर या पोलिस स्टेशनचा इंचार्ज होता. त्याचा फोन आल्यानंतर गोल्फचा पुढचा गेम खेळण्याची सॅमची इच्छाच नाहीशी झाली होती. सामान गुंडाळून तो ताबडतोब तयारी करुन आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी सरळ इकडे निघून आला होता. त्यांचं हाय हॅलो या सगळ्या फॉरमॅलिटीज पुर्ण झाल्यानंतर आता डिटेक्टीव बेकरकडे त्याच्या केससंदर्भात काय माहिती आहे हे एकण्यासाठी तो त्याच्या समोर बसला होता. डिटेक्टीव बेकरने सॅमला बोलण्याच्या आधी एक मोठा पॉज घेतला. डिटेक्टीव सॅम त्याच्या चेहर्यावर जरी दिसू देत नव्हता तरी त्याची उत्सुकता आधीच शिगेला जावून पोहोचली होती.
डिटेक्टीव्ह बेकरने सांगण्यास सुरवात केली —
काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक केस आली होती........
.... एक सुंदर शांत टाऊन. टाऊनमध्ये हिरवंगार गवत आणि हिरवीगार झाडे चहूकडे पसरलेली होती. आणि त्या हिरवळीत रात्री तारे जसे आकाशांत चमकतात तशी पुंजक्यासारखी तुरळक तुरळक शांत घरं इकडे तिकडे विखुरलेली होती. त्याच हिरवळीत गावाच्या अगदी मधे एक पुंजका म्हणजे एक जुनी कॉलेजची बिल्डींग होती.
कॉलजमध्ये व्हरंड्यात मुलांची गर्दी जमली होती. कदाचित ब्रेक टाईम असावा. काही मुलं घोळक्यात गप्पा मारत होते तर काही जण इकडे तिकडे मिरवत होते. जॉन कार्टर साधारण बाविशीतला, स्मार्ट हॅंन्डसम कॉलेजचा विद्यार्थी आणि त्याचा मित्र एथोनी क्लार्क. दोघे सोबत सोबत बाकीच्या कॉलेच्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून वाट काढीत चालले होते.
एंथोनी चल बरं डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये जावून बसू.. बर्याच दिवसांचा आपण त्याचा क्लास अटेंड केला नाही जॉन म्हणाला.
कुणाच्या? डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये? ...तुला आज बरं बिरं तर आहे ना?.. एन्थोनीने आश्चर्याने विचारले.
अरे नाही ... म्हणजे अजून तो आहे का सोडून गेला ते जावून बघूया जॉन म्हणाला.
दोघंही एकमेकांना टाळी देत कदाचीत आधीचा एखादा किस्सा आठवत जोराने हसले.
मुलांच्या घोळक्यातून चालता चालता अचानक जॉनने एन्थोनीला कोपर मारीत बाजूने जाणार्या एका मुलाकडे त्याचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. एन्थोनीने प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले.
जॉन हळू आवाजात त्याच्या कानाशी पुटपुटला हाच तो पोरगा ... जो आपल्या होस्टेलमध्ये आजकाल चोर्या करतो आहे
तोपयर्ंत तो पोरगा त्यांना क्रॉस होवून गेला होता. एन्थोनीने मागे वळून बघितले. होस्टेलमध्ये ऐन्थोनीच्याही काही वस्तू एवढ्यात चोरी गेल्या होत्या.
तुला कसं काय माहित? एन्थोनीने विचारले.
त्याच्याकडे बघ जरा... कसा भामटा वाटतो तो जॉन म्हणाला.
अरे नुसतं वाटून काय उपयोग ... आपल्याला काही पुरावा तर लागेल ना एन्थोनी म्हणाला.
मला एलेक्सही म्हणत होता ... रात्री बेरात्री उशीरापयर्ंत भूतासारखा तो होस्टेलमध्ये फिरत असतो
असं का ... तर मग चल ... साल्याला धडा शिकवू या
असा की साला कायमचा याद राखेल
नुसतं याद च नाही तर त्याला होस्टेलमधून आणि कॉलेजातूनही बाद करु या.
पुन्हा दोघांनी काही तरी ठरविल्याप्रमाणे एकमेकांची जोरात टाळी घेतली आणि जोरात हसायला लागले.
आय एम सॉरी
रात्री होस्टेलच्या व्हरंड्यात गाढ अंधार होता. व्हरंड्यातले लाईट्स एक तर कुणी चोरले असावे किंवा पोरांनी फोडले असावेत. एक काळी आकृती हळू हळू त्या व्हरंड्यात चालत होती. आणि तिथून थोड्याच अंतरावर जॉन, एन्थोनी आणि त्यांचे दोन मित्र एका खांबाच्या मागे लपून दबा धरुन बसले होते. त्यांनी मनाशी पक्के केले होते की आज कोणत्याही परिस्थीतीत या चोराला पकडून होस्टेलमध्ये होणार्या चोर्या थांबवायच्या. बर्याच वेळापासून ते ताटकळत त्या चोराची वाट पाहत बसले होते. शेवटी ती आकृती त्यांना दिसताच त्यांचे चेहरे आनंदाने एकदम उजळून निघाले.
चला इतका वेळ थांबलो...एवढी मेहनत केली ... शेवटी फळाला आली...
आनंदाच्या भरात त्यांच्यात कुजबुज सुरु झाली.
ए शांत ... हा सगळ्यात चांगला मौका आहे साल्याला रंगे हात पकडायचा जॉनने सगळ्यांना बजावले.
ते तिथुन लपत लपत समोर जावून एका दुसर्या खांबाच्या आडोशाला लपले.
त्यांनी चोराला पकडण्याची पुर्ण प्लॅनींग आणि पुर्वतयारी केली होती. चौघांनी आपापसात आपापलं काम वाटून घेतलं होतं. चौघांपैकी एक मुलागा आपल्या खांद्यावर एक काळं ब्लॅंकेट सांभाळत होता.
ए.. बघा तो तिथं थांबला...साल्याची घोंगड रपेटच करु जॉन हळूच म्हणाला.
ती आकृती व्हरंड्यात चालता चालता एका रुमसमोर थांबली होती.
अरे कोणाची ती रुम ? एकाजणाने विचारले.
मेरीची.. एन्थोनी हळू आवाजात म्हणाला.
ती काळी आकृती मेरीच्या दरवाजासमोर थांबली आणि मेरीच्या दरवाजाच्या कीहोल मध्ये आपल्या जवळील चाबी घालून फिरवू लागली.
ए त्याच्याजवळ चाबीपण आहे कुणीतरी कुजबुजला.
मास्टर की दिसते कुणीतरी म्हणालं.
किंवा डूप्लीकेट करुन घेतली असणार साल्याने
आता तर तो बिलकुल मुकरु शकणार नाही... आपण त्याला आता रेड हॅंन्डेड पकडू शकतो जॉन म्हणाला.
जॉन आणि एन्थोनीने मागे पाहून त्यांच्या दोघा मित्रांना इशारा केला.
चला ... ही एकदम सही वेळ आहे एन्थोनी म्हणाला.
ती आकृती आता कुलूप उघडण्याचा प्रयत्न करु लागली.
सगळ्यांनी एकदम त्या काळ्या आकृतीवर धावा बोलला. एन्थोनीने त्या आकृतीच्या अंगावर त्याच्या मित्राच्या खांद्यावरचे ब्लॅंकेट टाकले आणि जॉनने त्या आकृतीला ब्लॅकेटसहित घट्ट आवळून पकडले.
आधी चांगला झोडा रे साल्याला कुणीतरी ओरडले.
सगळेजण मिळून आता त्या चोराला लाथा बुक्याने चांगले बदडू लागले.
कसा सापडला रे.. चोरा
ए साल्या ... दाखव आता कुठं लपवला आहेस तू होस्टेलचा चोरलेला सगळा माल
ब्लॅंकेटच्या आतून श्आं ऊंश् असा दबलेला आवाज येवू लागला.
अचानक समोरचा दरवाजा उघडला आणि मेरी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिला तिच्या खोलीसमोर चाललेल्या गोंधळाची चाहूल लागली असावी. खोलीतल्या लाईटचा उजेड आता त्या ब्लॅंकेटमध्ये पकडलेल्या चोराच्या अंगावर पडला.
ए काय चाललय इथे मेरी घाबरलेल्या आवस्थेत हिंमतीने बोलण्याचा आव आणीत म्हणाली,.
आम्ही चोराला पकडलं आहे एन्थोनी म्हणाला.
हा तुझं दार डूप्लीकेट चाबीने उघडत होता जॉन म्हणाला.
त्या चोराला ब्लॅंकेटसकट पकडलेलं असतांना जॉनला त्या चोराच्या अंगावर काहीतरी वेगळच जाणवलं. गोंधळलेल्या स्थीतीत त्याने ब्लॅंकेटच्या आतून त्याचे हात घातले. जॉनने हात आत घातल्यामुळे त्याची त्या आकृतीवरची पकड ढीली झाली आणि ती आकृती ब्लॅंकेटमधून बाहेर आली.
ओ माय गॉड नॅन्सी! मेरी ओरडली.
नॅन्सी कोलीन त्यांच्याच क्लासमधली एक सुंदर लाघवी विद्यार्थीनी होती. ती ब्लॅकेटमधून बाहेर आली होती आणि अजूनही गोंधळलेल्या स्थीतीत जॉनने तिचे दोन्ही उरोज आपल्या हातात पक्के पकडलेले होते. तिने स्वतरूला सोडवून घेतले आणि एक जोरात जॉनच्या कानाखाली ठेवून दिली.
जॉनला काय बोलावे काही कळत नव्हते तो म्हणाला, आय एम सॉरी .. आय एम रियली सॉरी
वुई आर सॉरी ... एन्थोनी म्हणाला.
पण इतक्या रात्री तु इथे काय करीत आहेस मेरी नॅन्सीजवळ जात म्हणाली.
इडीयट ... आय वॉज ट्राईंग टू सरप्राईज यू... तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते मी नॅन्सी तिच्यावर चिडून म्हणाली.
ओह ... थॅंक यू ... आय मीन सॉरी ... आय मीन आर यू ओके? मेरी गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाली.
मेरीने नॅन्सीला रुममध्ये नेले. आणि जॉन पुन्हा माफी मागण्यासाठी रुममध्ये जावू लागला तसे दार धाडकन त्याच्या तोंडावर बंद झाले.
डांबरट
क्लास सुरु होता. क्लासमध्ये जॉन आणि त्याचे दोन दोस्त साथीदार जवळ जवळ बसले होते. जॉन सारखी चूळबूळ चालली होती आणि तो बेचौन वाटत होता. त्याचं लक्ष क्लासमध्ये नव्हतं. त्याने एकदा क्लासमध्ये सभोवार नजर फिरवली, आणि विषेशतरू नॅन्सीकडे बघितलं. पण तिचं लक्ष त्याच्याकडे कुठं होतं?. ती आपली नोट्स घेण्यात मग्न होती. काल रात्रीचा प्रसंग आठवून जॉनला पुन्हा अपराध्यासारखं वाटलं.
तिला बिचारीला काय वाटलं असेल...
एवढ्या सगळ्या मित्रांच्या समोर आणि मेरीच्या समोर आपण ...
नाही आपण असं करायला नको होतं...
पण आपण तर चुकीने असं केलं...
आपल्याला काय माहित की तो चोर नसून नॅन्सी आहे...
नाही आपल्याला तिची माफी मागायला हवी...
पण काल तर आपण तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला...
तर तिने धाडकण रागाने दार बंद केलं होतं...
नाही आपल्याला ती जोपयर्ंत माफ करणार नाही तोपयर्ंत माफी मागतच राहावं लागणार...
त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. तेवढ्यात तासाची घंटा झाली. मधला ब्रेक होता.
चला हा चांगला चान्स आहे...
तिला माफी मागण्याचा...
तो उठून तिच्याजवळ जाणार इतक्यात ती मुलींच्या घोळक्यात नाहीशी झाली होती.
ब्रेकमुळे कॉलेजच्या व्हरंड्यात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. छोटे छोटे समूह करुन गप्पा मारत विद्यार्थी सगळीकडे विखूरलेले होते. आणि त्या समुहातून रस्ता काढत जॉन आणि त्याचे दोन मित्र त्या गर्दीत नॅन्सीला शोधत होते.
कुठे गेली?...
आता तर पोरींच्या घोळक्यात वर्गाच्या बाहेर जातांना आपल्याला दिसली होती...
ते तिघे जण इकडे तिकडे पाहत तिला शोधायला लागले. शेवटी त्यांना एकाजागी कोपर्यात एका समुहात आपल्या मित्रांसोबत गप्पा करतांना ती दिसली.
चला रे... जॉन आपल्या मित्रांना म्हणाला.
आम्ही कशाला ... आम्ही इथेच थांबतो... तुच जा त्याच्या मित्रापैकी एकजण म्हणाला.
अबे... सोबत तर चला जॉनने त्यांना जवळ जवळ पकडूनच नॅन्सीजवळ नेले.
जेव्हा जॉन आणि त्याचे मित्र तिच्या जवळ गेले तेव्हा तीचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. ती आपली गप्पांत रंगून गेली होती. नॅन्सीने गप्पा करता करता एक नजर त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जॉनने तिच्या अजून जवळ जावून तिचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला. पण ती वारंवार दुर्लक्ष करीत होती. दुरुन व्हरंड्यातून जाता जात एन्थोनी जॉनकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि अंगठा दाखवून त्याने त्याला बेस्ट लक विश केलं.
नॅन्सी ... आय एम सॉरी जॉनला एवढ्या मुला मुलींच्या गर्दीत लाजही वाटत होती पण तो हिम्मत करुन म्हणाला.
नॅन्सीने एक कॅजूअल नजर त्याच्यावर टाकली.
जॉनचा उडालेला गोंधळ पाहून त्याच्या मित्राने पुढची सुत्र हाती घेतली.
एक्च्यूअली आम्ही एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो तो म्हणाला.
हो ना ... तो रोज होस्टेलमध्ये चोर्या करत होता.. दुसरा मित्र म्हणाला.
जॉन आता कसाबसा सावरला होता. त्याने पुन्हा हिम्मत करुन आपले पालूपद सुरु केले, नॅन्सी ... आय एम सॉरी ... आय रियली डीडन्ट मीन इट... मी तर त्या चोराला पकडण्याचा ...
जॉन वेगवेगळे हावभाव करुन तिला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. तो काय बोलत होता आणि काय हावभाव करीत होता त्याचे त्याला कळत नव्हते. शेवटी एका हावभावाच्या पोजीशनमध्ये तो थांबला. जेव्हा तो थांबला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जरी स्पर्ष करीत नसले तरी त्याचे दोन्ही हात पुन्हा तिच्या उरोजांच्या वर होते. नॅन्सीच्याही ते लक्षात आले. त्याने पटकन आपले हात मागे घेतले. तिने रागाने एक दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला आणि पुन्हा एक जोरात त्याच्या कानाखाली लगावली.
डांबरट ती चिडून म्हणाली.
जॉन पुन्हा सावरुन काही बोलण्याच्या आत ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली होती. जेव्हा तो भानावर आला ती दूर निघून गेली होती आणि जॉन आपला गाल चोळीत उभा होता.
पाठलाग
संध्याकाळची वेळ होती. आपली शॉपींगची भरलेली बॅग सांभाळत नॅन्सी फुटपाथवरुन चालली होती. तसं आता घेण्यासारखं विषेश काही उरलं नव्हतं. फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या होत्या.
त्या घेतल्या की मग घरी परत जायचं ...
त्या राहिलेल्या एकदोन वस्तू घेवून जेव्हा ती परत जाण्यासाठी निघाली तोपयर्ंत जवळ जवळ अंधारायला आलं होतं आणि रस्त्यावरही फारच तुरळक लोक होते. चालता चालता नॅन्सीच्या अचानक लक्षात आले की बर्याच वेळेपासून कुणीतरी तिचा पाठलाग करीत आहे. तिची मागे वळून पाहण्याची हिंम्मत होईना. ती तशीच चालत राहाली. तरीही पाठलाग सुरुच असल्याची तिला जाणीव झाली. आता ती पुरती घाबरली होती. मागे वळून न पाहता ती तशीच जोराने चालायला लागली.
तेवढ्यात तिला मागून आवाज आला, नॅन्सी
ती एक क्षण थबकली आणि पुन्हा चालायला लागली.
मागून पुन्हा आवाज आला, नॅन्सी ....
आवाजावरुन तरी पाठलाग करणार्याचा काही गैर हेतू वाटत नव्हता. नॅन्सीने चालता चालताच मागे वळून बघितले. मागे जॉनला पाहाताच ती थांबली. तिच्या चेहर्यावर त्रासीक भाव उमटले.
हा इथेही....
आता तर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे...
तो एक मोठा फुलाचा गुच्छ घेवून तिच्या जवळ येत होता. ते पाहून तिला एक क्षण वाटलेही की कपाळावर हात मारुन घ्यावा. ती तो जवळ येईपयर्ंत थांबली.
का तु माझा सारखा पाठलाग करतो आहेस? नॅन्सी त्रासीक चेहर्याने आणि रागाने म्हणाली.
कृपा कर आणि माझा पाठलाग करणं थांबव ती रागाने हात जोडून त्याच्याकडून पिच्छा सोडवून घेण्याच्या अविर्भावात म्हणाली.
रागाने ती गर्रकन वळली आणि पुन्हा पुढे तरातरा चालू लागली. जॉनही थोडं अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालू लागला.
पुन्हा जॉन पाठलाग करतो आहे हे लक्षात येताच ती रागाने थांबली.
जॉनने आपली हिम्मत एकवटून तो फुलाचा गुच्छ तिच्या समोर धरला आणि म्हणाला, आय एम सॉरी...
नॅन्सी रागाने नुसती गुरगुरली. तिला काय बोलावे काही कळत नव्हते. त्यालाही पुढे अजुन काय बोलावे काही सुचत नव्हते.
आय स्वीअर, आय मीन इट तो गळ्याला हात लावून म्हणाला.
नॅन्सी रागात तर होतीच, तीने झटक्यात आपल्या चेहर्यावर येणारी केसाची बट मागे सारली. जॉनला वाटले की ती पुन्हा एक जोरदार चपराक आपल्या गालात ठेवून देणार. भीतीने डोळे बंद करुन पटकन त्याने आपला चेहरा मागे घेतला.
तिच्या ते लक्षात आले आणि ती आपलं हसू आवरु शकली नाही. त्याची ती घाबरलेली आणि गोंधळलेली परीस्थीती पाहून ती एकदम खळखळून हसायला लागली. तिचा राग केव्हाच मावळला होता. जॉनने डोळे उघडून बघितले. तोपयर्ंत ती पुन्हा समोर चालू लागली होती. थोडं अंतर चालल्यानंतर एका वळणावर वळण्यापुर्वी नॅन्सी थांबली, तीने मागे वळून जॉनकडे एक दृष्टीक्षेप टाकला. एक खोडकर हास्य तिच्या चेहर्यावर पसरलं होतं. गोंधळलेल्या स्थीतीत उभा असलेला जॉनही तिच्याकडे पाहून मंद मंद हसला. ती पुन्हा पुढे चालत त्या वळणावर वळून नाहीशी झाली. ती नाहीशी झाली होती तरी जॉन उभा राहून तिकडे मंत्रमुग्ध होवून पाहत होता. त्याला राहून राहून तिचं ते हास्य आठवत होतं.
ती खरोखर हसली की आपल्याला नुसता भास झाला...
नाही नाही भास कसा होणार... ती हसली हे तेवढं खरं...
ती हसली म्हणजे तिने आपल्याला माफ केले असं आपण समजायचं का...
हो तसं समजायला काही हरकत नाही...
पण तीचे ते हसणे म्हणजे साधेसुधे हसणे नव्हते...
तिच्या हसण्यात अजुनही काहीतरी गुढ अर्थ दडलेला होता...
काय होता तो अर्थ?...
जॉन तो अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करु लागला. आणि जसजसा त्याला तो अर्थ उलगडायला लागला त्याच्या चेहर्यावरही तेच तसेच हास्य पसरायला लागले होते.
प्रेमांकुर
हळू हळू जॉन आणि नॅन्सी जवळ येत गेले. त्यांच्या ह्रदयात त्यांच्या नकळत प्रेमांकुर फुटायला लागले होते. भांडणातूनही प्रेम निर्माण होवू शकतं हे त्यांना पटतच नव्हतं तर ते प्रत्यक्ष अनुभवत होते. कॉलेजात एखादा रिकामा तास असला की ते भेटायचे. कॉलेज संपल्यावर भेटायचे. लायब्रीत अभ्यास करण्याच्या निमित्ताने भेटायचे. भेटण्याच्या एकही मौका ते दवडू इच्छीत नव्हते. पण सगळं लपून लपून चालायचं. त्यांनी त्यांचं प्रेम आत्ता पयर्ंत कुणाच्याही लक्षात येवू दिलं नव्हतं. पण प्रेमच ते कधी कुणापासून लपतं का? किंवा एक वेळ अशी येते की ते प्रेमीच कुणाला माहित होईल किंवा कुणाची तमा न बाळगता निर्भीडपणे वागू लागतात. लोकांना आपलं प्रेम माहित व्हावं हीही कदाचित त्यामागे त्यांची सुप्त इच्छा असावी.
बरीच रात्र झाली होती. आपली पोरगी अजून कशी घरी परतली नाही म्हणून नॅन्सीचे वडील बेचौन होवून हॉलमध्ये येरझारा मारत होते. तशी त्यांनी तिला पुर्णपणे मोकळीक दिली होती. पण अशी बेजबाबदारपणे ती कधीही वागली नव्हती. कधी उशीर होणारच असला तर ती फोन करुन घरी सांगायची. पण आज तिने फोन करण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती. तिच्या वडिलांना इतक्या वर्षाच्या अनुभवावरुन कळत होते की प्रकरण काहीतरी गंभीर आहे.
नॅन्सीला कुणाची वाईट संगत तर नाही लागली?...
किंवा ती ड्रग्ज वैगेरे अशा प्रकारात तर नाही अडकली ना?...
नाना प्रकारचे विचार तिच्या वडिलांच्या डोक्यात घोंगावत होते. तेवढ्यात बाहेर त्यांना कसली तरी चाहूल लागली.
एक बाईक येवून नॅन्सीच्या घराच्या कंपाऊंडच्या गेट समोर थांबली. बाईकच्या मागच्या सिटवरुन नॅन्सी उतरली. तिने समोर बसलेल्या जॉनच्या गालाचे चूंबन घेतले आणि ती आपल्या घराच्या गेटकडे निघाली.
घराच्या आतून, खिडकीतून हा सगळा प्रकार नॅन्सीचे वडील पाहत होते. त्यांच्या चेहर्यावरुन असे दिसत होते की त्यांचा रागाने तिळपापड होत होता. आपल्या मुलीला कुणी बॉय फ्रेंड असावा हे त्यांना राग येण्याचे कारण नव्हते. तर कारण वेगळेच काहितरी होते.
हॉलमध्ये सोफ्यावर नॅन्सीचे वडील बसलेले होते आणि त्यांच्या समोर खाली मान घालून नॅन्सी उभी होती.
या ब्लडी एशीयन लोकांच्या व्यतिरिक्त तुला दुसरा कुणी नाही सापडला का? त्यांचा रागीट धीरगंभीर आवाज घुमला.
नॅन्सीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ती तिच्या वडिलांना बोलण्यासाठी हिम्मत एकवटण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात नॅन्सीचा भाऊ जॉर्ज कोलीन्स, साधारण तिशीतला, गंभीर व्यक्तीमत्व, नेहमी कुठेतरी विचारात गुरफटलेला, राहाणीमाण गबाळं, घरातून तिथे हॉलमध्ये आला. तो नॅन्सीच्या बाजुला जावून उभा राहाला. नॅन्सीची मान अजूनही खाली होती. तिच्या भाऊ तिच्या शेजारी येवून उभा राहाल्यामुळे तिला हिम्मत आल्यासारखी वाटत होती. ती खालमानेनेच कशीतरी हिम्मत एकवटून एक एक शब्द जुळवित म्हणाली, तो एक चांगला मुलगा आहे, ...तुम्ही एकदा त्याला भेटा तर खरं
चूप बस मुर्ख.. मला त्याला भेटायची बिलकुल इच्छा नाही... तुला या घरात राहायचे असल्यास पुन्हा तू मला त्याच्यासोबत दिसली नाही पाहिजेस... समजलं तिच्या वडिलाने आपला अंतिम निर्णय सुनावला.
नॅन्सीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि ती तिथून आपले अश्रू लपवित धावतच आत निघून गेली. जॉर्ज सहानुभूतीने तिच्या जाणार्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात होता.
घरात कुणाचीच वडीलांशी वाद घालण्याची हिम्मत नव्हती.
जॉर्ज हिम्मत करुनच त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा... तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच कठोरपणे वागता आहात.. तुम्ही कमीत कमी ती काय म्हणते ते ऐकुन घ्यायला पाहिजे.. आणि एकदा वेळ काढून त्या पोराला भेटायला काय हरकत आहे?
मी तीचा वडील आहे.. तिचं भलं बुरं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या तर्हेने कुणाला कळू शकतं?.. आणि तुमचा शहाणपणा तुमच्या जवळच ठेवा... मला तिचे तुझ्यासारखे झालेले हाल पहायचे नाहीत.. तुही एशीयन पोरीशी लग्न केलं होतं ना? .. शेवटी काय झालं?.. तुझी सगळी संपत्ती हडप करुन तुला दिलं तिनं वार्यावर सोडून त्याचे वडील भराभर पावलं टाकीत रागाने खोलीतून बाहेर जायला निघाले.
पप्पा माणसाचा स्वभाव माणसामाणसात वेगळेपणा आणतो... ना की त्याचा रंग, किंवा त्याचं राष्ट्रीयत्व... जॉर्ज त्याच्या वडिलाच्या बाहेर जात असलेल्या पाठमोर्या आकृतीकडे पाहून म्हणाला.
त्याचे वडील जाता जाता अचानक दरवाजात थांबले आणि तिकडेच तोंड ठेवून कठोर आवाजात म्हणाले,
आणि तु तिचं बिलकुल समर्थन करायचं नाहीस.. की तिला सपोर्ट करायचा नाहीस
जॉर्ज काही बोलायच्या आतच त्याचे वडील तिथून निघून गेले होते.
इकडे नॅन्सीच्या घराच्या बाहेर अंधारात खिडकीच्या बाजूला उभं राहून एक काळी आकृती आत चाललेला हा सगळा प्रकार पाहात होती आणि ऐकत होती.
गोष्टी आपोआप बदलत नसतात..
आपल्याला त्या बदलाव्या लागतात क्लासमध्ये एक लेडी टीचर शिकवीत होती. वर्गातले कॉलेजचे विद्यार्थी लक्ष देवून ऐकत होते. त्या विद्यार्थ्यातच जॉन आणि नॅन्सी बसलेले होते.
सो द मॉरल अॉफ द स्टोरी इज... काहीही निर्णय न घेता अंधांतरी लटकण्यापेक्षा काहीतरी एक निर्णय घेणं केव्हाही योग्य.. टीचरने आत्तापथर्ंत शिकविलेल्या धड्यातल्या गोष्टीचं सार थोडक्यात सांगितलं.
नॅन्सीने एक चोरटी नजर जॉनकडे टाकली. दोघांची नजरा नजर झाली. दोघंही गालातल्या गालात मंद हसले. नॅन्सीने एक नोटबुक जॉनला दाखवली. त्या नोटबुकवर मोठ्या अक्षरात लिहिले होते लायब्ररी. जॉनने होकारात आपली मान डोलवली. तेवढ्यात पिरीयड बेल वाजली. आधी टिचर आणि मग मुलं हळू हळू क्लासमधून बाहेर पडू लागली.
जॉन नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही विद्यार्थी दिसत नव्हते. त्याने नॅन्सीला शोधण्यासाठी इकडे तिकडे एक नजर फिरविली. नॅन्सी एका कोपर्यात बसून पुस्तक वाचत होती किंवा किमान पुस्तक वाचत आहे असं भासवित होती. नॅन्सीने चाहूल लागताच पुस्तकातून डोकं वर काढून तिकडे बघितले. दोघांची नजरानजर होताच ती तिच्या जागेवरुन उठून पुस्तकाच्या रॅकच्या मागे जायला लागली. जॉनही तिच्या मागे मागे निघाला. एकमेकांशी काहीही न बोलता किंवा काहीही इशारा न करता सर्व काही घडत होतं. त्यांचा हा जणू रोजचाच परिपाठ असावा. नॅन्सी काही न बोलता रॅकच्या मागे जात होती खरी पण तिच्या डोक्यात विचारांच काहूर माजलं होतं.
आज काय तो शेवटचा निर्णय घ्यायचा...
अस किती दिवस अधांतरी लटकत रहायचं...
टीचरने जे गोष्टीचं सार सांगितलं ते खरंच होतं...
आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार...
आर किंवा पार ...
आता बास झालं...
तिच्या मागे मागे जॉन रॅकच्या पलिकडे काहीही न बोलता जात होता पण त्याच्याही डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं.
नेहमी नॅन्सी पिरियड झाल्यानंतर लायब्रीत भेटण्याबद्दल त्याला इशारा करायची...
पण आज तिने पिरियड सुरु असतांनाच इशारा केला..
तिच्या घरी काही अघटीत तर घडलं नसावं...
तिच्या चेहर्यावरुनही ती दुविधेत असलेली भासत होती...
तिच्या घरच्यांच्या दबावाला बळी पडून ती आपल्याला सोडून तर नाही देणार..
नाना प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते.
रॅकच्या मागे एका कोपर्यात कुणाला दिसणार नाही अशा जागी नॅन्सी पोहोचली आणि भिंतीला एक पाय लावून उभी राहत ती जॉनची वाट बघू लागली.
जॉन तिच्याजवळ जावून पोहोचला आणि तिच्या चेहर्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न करीत तिच्या समोरासमोर उभा राहाला.
तर मग ठरलं... आज रात्री अकरा वाजता तयार रहा.. नॅन्सी म्हणाली.
चला म्हणजे अजुनही नॅन्सी आपल्या घरच्यांच्या प्रभावाखाली आली नव्हती...
जॉनला हायसं वाटलं.
पण तिने सुचविलेला हा दुसरा मार्ग कितपत योग्य होता?...
ही एकदम टोकाची भूमीकातर होत नाही ना? ...
नॅन्सी तुला नाही वाटत की आपण जरा घाईच करीत आहोत... आपण काही दिवस थांबूया ... बघूया काही बदलते का ते... जॉन म्हणाला.
जॉन गोष्टी आपोआप बदलत नसतात.. आपल्याला त्या बदलाव्या लागतात. नॅन्सी दृढतेने म्हणाली.
त्यांच्या बर्याच वेळ गोष्टी चालल्या. जॉनला अजुनही तिची भूमिका टोकाचीच वाटत होती. पण एका दृष्टीने तिचंही बरोबर होतं. कधी कधी तडकाफडकी निर्णय घेणं योग्य असतं. जॉन विचार करीत होता.
पण आपण या निर्णयासाठी अजून पुरते तयार नाही आहोत...
आपल्याला आपल्या घरच्यांचाही विचार करावा लागणार आहे...
पण नाही आपणही किती दिवस असं अधांतरी लटकून रहायचं...
आपल्यालाही काहीतरी दृढ निर्णय घ्यावाच लागणार...
जॉन आपला पक्का निश्चय करण्याचा प्रयत्न करीत होता.
तिकडे रॅकच्या मागे त्या दोघांची चर्चा चालली होती आणि इकडे दोन रॅक सोडून पलीकडेच एक आकृती लपून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होती.
पक्का निर्णय
जॉनच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आता तो जे पाऊल उचलणार होता त्यामुळे होणार्या नंतरच्या सगळ्या परिणामाचा तो विचार करु लागला. नॅन्सीसोबत लायब्ररीत झालेल्या चर्चेत त्याला दोन तिन गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या होत्या —
की नॅन्सी ही वरुन जरी वाटत नसली तरी मनाने फार पक्की आणि खंबीर आहे...
ती कोणत्याही परिस्थीतीत आपल्याला सोडणार नाही...
किंवा तसा विचारही करणार नाही...
पण आता स्वतरूचीच त्याला शाश्वती वाटत नव्हती.
आपणही तिच्याइतकेच मनाने खंबीर आणि पक्के आहोत का?...
बिकट परिस्थीतीत आपलं तिच्याबद्दलचं प्रेम असंच कायम राहिल का?...
का बिकट परिस्थीतीत ते बदलू शकतं?..
तो आता स्वतरूलाच आजमावून पाहत होता. वेळच अशी आली होती की त्याचा त्यालाच विश्वास वाटेनासा झाला होता.
पण नाही...
आपल्याला असं ढीलं राहून चालणार नाही...
आपल्याला काहीतरी एका निर्णयाप्रत पोहचावं लागणार आहे...
आणि एकदा निर्णय घेतला की, त्याचे मग काहीही परिणाम होवोत, आपल्याला त्या निर्णयावर ठाम रहावं लागणार आहे...
जॉनने शेवटी आपल्या मनाचा पक्का निर्णय केला. आपल्या रुमचे दार आतून बंद करुन तो आपल्याला ज्या लागतील त्या सगळ्या वस्तू एका बॅगमध्ये भरु लागला.
सगळ व्यवस्थीत तर होईल ना?...
आपण आपल्या घरच्यांना सगळं कळवावं का?...
विचार करता करता त्याचे सगळे कपडे भरणं झालं.
कपडे वैगेर बदलवून त्याने पुन्हा काही राहलं का याचा आढावा घेतला. शेवटची राहलेली एक वस्तू टाकून त्याने बॅगची चौन लावली. चेनचा विशीष्ट असा एक आवाज झाला. त्याने मग उचलून ती बॅग समोर टेबलवर ठेवली आणि तो टेबलच्या समोर असलेल्या खुर्चीवर विसावला. तो एकदोन क्षणच निवांत बसला असेल तेवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने खिशातून मोबाईल काढून त्याचा डीस्प्ले बघितला. डिस्प्लेवर श्नॅन्सीश् अशी अक्षरं उमटलेली होती. तो घाईने खुर्चीवरुन उठला. मोबाईल बंद केला, बॅग उचलली आणि हळूच खोलीतून बाहेर पडला.
हळूच, इकडे तिकडे बघत जॉन मुख्य दरवाजाच्या बाहेर आला आणि दार ओढून घेतलं. मग जॉगींग केल्यागत तो बॅग खांद्यावर घेवून कंपाऊंडच्या गेटजवळ आला. बाहेर रस्त्यावर त्याला एक टॅक्सी थांबलेली दिसली. समोरच्या कंपाऊंड गेटमधून बाहेर पडून त्याने ते दार लावून घेतलं. टॅक्सीजवळ जाताच त्याची टॅक्सीमध्ये मागच्या सिटवर बसून वाट पाहत असलेल्या नॅन्सीशी नजरा नजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. पटकन जावून तो बॅगसकट नॅन्सीजवळ घूसला आणि त्याने टॅक्सीचे दार मोठा आवाज होणार नाही याची काळजी घेत हळूच ओढून घेतले. दोघंही एकमेकांच्या मिठीत शिरले. त्यांच्या चेहर्यावर एक विजयी हास्य तरळलं होतं.
एव्हाना त्यांची टॅक्सी घरापासून बरीच दूर निघून वेगात धावत होती. ते दोघंही वेगाने जाणार्या टॅक्सीच्या खिडकीतून येणार्या थंड हवेचा आस्वाद घेत होते. पण त्यांना कुठे कल्पना होती की एक काळी आकृती मागे एका टॅक्सीत बसून त्यांचा पाठलाग करीत होती....
.... डिटेक्टीव्ह बेकर सांगता सांगता थांबला. डिटक्टीव सॅमने तो का थांबला हे जाणन्यासाठी त्याच्याकडे बघितले. डिटेक्टीव्ह बेकरने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून पाण्याचा एक घोट घेतला. तोपयर्ंत अॉफिसबॉयने चहा पाणी आणले होते. डिटेक्टीव्हने ते त्याच्या समोर बसलेल्या डिटेक्टीव सॅम आणि त्याच्या सोबत आलेल्या एका अॉफिसरला द्यायला सांगीतले.
शेवटचा निरोप
अॉफिसबॉय चहापाणी घेवून आल्यामुळे बेकर जी हकिकत सांगत होता त्यात खंड पडला. सॅमला आणि त्याच्या साथीदाराला पुढील हकिकत ऐकण्यासाठी उत्सुकता लागुन राहाली होती. सगळ्यांचं चहापाणी आटोपल्यावर डिटेक्टीव्ह बेकर पुन्हा पुढे राहालेली हकीकत सांगू लागला ....
... जॉनची आणि नॅन्सीची टॅक्सी रेल्वे स्टेशनला येवून पोहोचली. दोघंही टॅक्सीतून उतरले. टॅक्सीवाल्याचे पैसे चूकवून ते आपापलं सामान घेवून तिकीट घराजवळ गेले. कुठे जायचं हे अजूनही त्यांनी ठरविलं नव्हतं. बस इथून निघून जायचं एवढंच त्यांनी ठरविलं होतं. एक ट्रेन लागलेलीच होती. जॉनने त्या ट्रेनचंच तिकिट काढलं.
प्लॅटफॉर्मवर ते आपलं तिकिट घेवून आपली बोगी शोधायला लागले. बोगी शोधण्यासाठी त्यांना जास्त त्रास घ्यावा लागला नाही. मुख्य दरवाजापासून त्यांची बोगी जवळच होती. ट्रेन निघण्याची वेळ झाली म्हणून पटकन ते आपल्या बोगीत चढले. बोगीत आल्यानंतर त्यांनी आपल्या सिट्स शोधल्या. आपल्या सिटच्या जवळ आपलं सगळं सामान व्यवस्थीत ठेवलं. तेवढ्यात गाडी हलली. गाडी निघण्याची वेळ झाली होती. जशी गाडी निघाली तशी नॅन्सी जॉनला घेवून बोगीच्या दरवाजाजवळ आली. तिला जाण्याच्या पूर्वी आपल्या शहराला एकदा शेवटचं डोळे भरून बघायचं होतं.
ट्रेनमध्ये नॅन्सी आणि जॉन अगदी जवळ जवळ बसले होते. त्यांना दोघांनाही एकमेकांचा आधार हवा होता. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यानंतर त्यांना एकमेकांचाच आधार होता. आपल्या घराचे सगळे बंध, सगळे पाश तोडून ते दूर निघून चालले होते. नॅन्सीने आपलं डोकं जॉनच्या खांद्यावर ठेवलं.
श् मग ... आता कसं वाटतं जॉनने वातावरण थोडं हलकं करण्याच्या उद्देशाने विचारले.
श् एकदम ग्रेट नॅन्सीही खोटं खोटं हसत म्हणाली.
जॉनला समजत होतं की ती वरुन जरी दाखवित नसली तरी आतून तिला घर सोडून जाण्याचं दुरूख वाटत होत. तिला आधार देण्यासाठी जॉनने तिला घट्ट पकडले.
श् तुला काही आठवतं का? जॉनने तिला अजून घट्ट पकडीत हसत विचारले.
नॅन्सीने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले.
श् नाही म्हणजे एखादा प्रसंग ... जेव्हा मी तुला असे घट्ट पकडले होते
श् मी कसा काय विसरेन तो प्रसंग... नॅन्सी त्याने तिला होस्टेलमधे घोंघडी टाकुन पकडले होते तो प्रसंग आठवून म्हणाली.
श् आणि तु सुध्दा ... नॅन्सी त्याच्या गालावर हात चोळत त्याला मारलेल्या चपराकीची आठवण देत म्हणाली.
दोघंही जोरजोराने हसायला लागले.
दोघांचं हसणं ओसरल्यावर नॅन्सी त्याला लाडावत म्हणाली, आय लव्ह यू
श् आय लव्ह यू टू त्याने अजून तिला जवळ ओढत प्रतिसाद दिला.
दोघही करकचून एकमेकाच्या आलिंगणात बद्ध झाले.
नॅन्सीने ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघीतले. बाहेर सगळा अंधारच अंधार होता. जॉनने नॅन्सीकडे बघितले.
श् तुला माहित आहे की तुझी माफी मागतांना तो फुलाचा गुच्छ मी का आणला होता? जॉन पुन्हा तीला माफी मागण्याचा प्रसंग आठवून देत म्हणाला. तो प्रसंग तो कसा विसरु शकत होता? त्याच प्रसंगात तर त्यांच्या प्रेमाचं बिज रोवल्या गेलं होतं.
श् अर्थातचं माफी जास्त इफेक्टीव व्हावी म्हणून...ष् नॅन्सी म्हणाली.
श् नाही ... मी सांगीतलं तर तुझा विश्वास बसणार नाही.. जॉन म्हणाला.
श् मग ... का आणला होता?
श् अग माझ्या हातांनी हावभाव करतांना पुन्हा पहिल्यासारखी काही गडबड करु नये म्हणून ... नाहीतर पुन्हा एखादी चपराक बसली असती जॉन म्हणाला.
नॅन्सी आणि जॉन पुन्हा खळखळून हसायला लागले.
त्यांचं हास्य हळू हळू निवळलं. मग थोडा वेळ अगदी निरव शांतता पसरली. फक्त रेल्वेचा आवाज येत होता. त्या शांततेत नॅन्सीला वाटलं की कुणीतरी या ट्रेनमध्ये आपला पाठलाग तर करत नसावा. नाही कसं शक्य आहे आपण पळून जाणार आहोत हे फक्त जॉन आणि तिच्या व्यतिरिक्त दुसरं कुणालाच माहित नव्हतं.
गेम
रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकांचा लोंढा च्या लोंढा आपआपलं सामान घेवून जात होता. कदाचीत आत्ताच कोणतीतरी ट्रेन आली असावी. तिथेच प्लॅटफार्मवर एका कोपर्यात स्टीव्हन, पॉल, रेनॉल्ड आणि क्रिस्तोफर एन्डरसन यांचा पत्याचा डाव चांगला रंगला होता. त्या चौघांपैकी क्रिस्तोफर हा, त्याच्या हावभावांवरुन आणि एकूणच त्याचा जो त्या तिघांवर प्रभाव दिसत होता त्यावरुन, त्यांचा म्होरक्या वाटत होता. क्रिस्तोफर म्हणजे एक साधारण पंचविशीतला, कसलेलं शरीर, मजबुत बांधा, उंचपुर्ण तरुण होता.
हे बघ आपली गाडी यायला अजून खुप वेळ आहे अजून कमीत कमी तीन तरी डाव होवू शकतातष् क्रिस्तोफर पत्ते वाटतावाटता म्हणाला.
पॉल तु या कागदावर पॉइंट लिही ष् रोनॉल्डने एका हातानी पत्ते पकडीत आणि दुसर्या हाताने खिशातला एक कागदाचा तूकडा काढून पॉलच्या हातात देत म्हटले .
अन, लालटेन जास्त हुशारी नाही करायचीष् पॉलने ने स्टीव्हनला बजावले. ते स्टीव्हनला त्याच्या चश्म्यामुळे लालटेन म्हणायचे . क्रिस्तोफरचं लक्ष पत्त्ते खेळताखेळता सहजच गर्दीच्या लोंढ्याकडे गेलं .
गर्दीत नॅन्सी आणि जॉन एकमेकांचा हात धरुन एखाद्या नवख्यासारखे चालत होते.
त्याने नॅन्सीकडे नुसतं बघितलं आणि तो आ वासुन बघतच राहाला.
बाप, क्या माल है ष् त्याच्या उघडया तोंडातून अनायास निघाले. पॉल, रेनॉल्ड आणि स्टीव्हनसुध्दा आपले पत्ते सोडून बघायला लागले. त्यांचसुद्धा बघतांना उघडलेलं तोंड बंद व्हायला तयार नव्हतं.
कबूतरी कबूतराबरोबर पळून आलेली दिसतेष् क्रिस्तोफरचे अशा बाबतीत अनुभवी डोळे सांगत होते.
त्या कबुतरापेक्षा मी तिच्यासोबत असायला पाहिजे होतो पॉल म्हणाला.
क्रिस्तोफरने सगळयांजवळचे पत्ते हिसकुन घेत म्हटले, हे बघा, आता हा गेम बंद करा... आपण दुसराच एक गेम खेळूया
सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. त्यांच्या लक्षात क्रिस्तोफरच्या बोलण्यातला गुढ अर्थ आला होता. तसे ते तो गेम पहिल्यांदाच खेळत नव्हते. सगळेजण उत्साहाने एकदम उठून उभे राहाले.
अरे, बघा लक्ष ठेवा ... साले कुठं घुसतील तर मग सापडणार नाहीत रेनॉल्ड उठता उठता म्हणाला.
मग ते त्यांच्या लक्षात येणार नाही एवढं अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे जावू लागले.
ऐ, लालटेन तु जरा समोर जा पहिलेच साल्या तुला चश्म्यातून कमी दिसते. क्रिस्तोफरने स्टीव्हनला ढकलत म्हटले. स्टीव्हन नॅन्सी आणि जॉनच्या लक्षात येणार नाही असा धावतच समोर गेला.
दिवसभर इकडेतिकडे भटकण्यात कसा वेळ निघून गेला हे जॉन आणि नॅन्सीला कळलेच नाही. शेवटी संध्याकाळ झाली. जॉन आणि नॅन्सी हातात हात घालून फुटपाथवर मजेत चालत होते. समोर एकाजागी त्यांना रस्त्यावर हार्ट च्या आकाराचे हायड्रोजन भरलेले फुगे विकणारा फेरीवाला दिसला. ते त्याच्याजवळ गेले. जॉनने फुग्यांचा एक मोठा गुच्छ खरेदी करुन नॅन्सीला दिला. पकडण्याच्या धागाच्या मानाने तो गुच्छ मोठा असल्यामुळे धागा तुटला आणि तो गुच्छ आकाशाकडे झेपावला. जॉनने धावत जावून, उंच उंच उड्या मारुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो धागा त्याच्या हातात सापडला नाही. ते लाल फुगे जसे एकमेकांना ढकलत वर आकाशात जात होते. नॅन्सी ती जॉनची धावपळ आणि धडपड पाहून खळवळून हसत होती.
आणि त्यांच्या बरंच मागे क्रिस्तोफर , रोनॉल्ड, स्टीव्हन आणि पॉल त्यांच्यावर कुणाच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी धेत पाळत ठेवून होते.
नॅन्सी आणि जॉन एकाजागी आईसक्रीम खाण्यासाठी थांबले. त्यांनी एक कोन घेतला आणि त्यातचे ते दोघेही खावू लागले. आईसक्रीम खाता खाता नॅन्सीचं लक्ष जॉनच्या चेहर्याकडे गेलं आणि ती खळखळून हसायला लागली.
काय झालं? जॉनने विचारले.
आरश्यात बघ नॅन्सी जवळच्या एका आरश्याकडे इशारा करुन म्हणाली.
जॉनने आरश्यात बघीतले तर त्याच्या नाकाच्या शेंड्याला आइस्क्रीम लागलं होतं. त्यालाही त्याचं हसू येत होतं. त्याने ते पुसलं आणि एक प्रेमळ दृष्टीक्षेप नॅन्सीकडे टाकला.
खरंच आपल्या दोघांच्याही आवडी निवडी एकदम सारख्या आहेत नॅन्सी म्हणाली.
मग ... राहणारच... कारण... वुई आर द परफेक्ट मॅचष्श् जॉन अभिमानाने म्हणाला.
आईस्क्रीम खाता खाता अचानक नॅन्सीचं लक्ष दुरवर क्रिस्तोफरकडे गेलं. त्यानं पटकन आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं. तिला त्याच्या नजरेत एक विचित्र भाव जाणवला होता. आणि त्याच्या वागण्यातही.
जॉन मला वाटतं आता आपण इथून निघायला पाहिजे नॅन्सी म्हणाली आणि ती पुढे चालायला लागली. जॉन गोंधळलेल्या स्थितीत तिच्या मागे मागे जावू लागला.
तिथून पुढे बराच वेळ चालल्यानंतर ते एका कपड्याच्या दुकानात घुसले. आता चांगली रात्र झाली होती. नन्सीला शंका होतीच की कदाचीत मघाचा तो तरुण त्यांचा पिछा करीत असावा. म्हणून तिने दुकानात गेल्यावर एका फटीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर क्रिस्तोफर त्याच्या अजून दोन मित्रांसोबत इकडे तिकडे पाहत चर्चा करीत असतांना दिसला. जॉन त्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात होता.
जॉन मागे वळून पाहू नको .. मला वाटते ती पोरं आपला पाठलाग करीत आहेत. नॅन्सी दबक्या आवाजात जॉनला म्हणाली.
कोण? .. कुठाय? जॉन गोंधळून म्हणाला.
चल लवकर इथून निघून जावू... आपण त्यांना सापडता कामा नये नॅन्सीने त्याला तिथून बाहेर काढले.
ते दोघंही भराभरा पावले टाकीत फुटपाथवर असलेल्या लोकांच्या गर्दीतून मार्ग काढीत पुढे जावू लागले.
त्या चौघांकडून पाठलाग
आपला पाठलाग होतो आहे याची आता नॅन्सी आणि जॉनला पूरेपर खात्री पटली होती. ते दोघंही घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शहर त्यांना नविन होतं. ते जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत होते. चालता चालता ते एका अश्या ठिकाणी आले की जिथे लोक जवळ जवळ नव्हतेच. तशी रात्रही बरीच झाली असल्यामुळेही कदाचित लोक नसावेत. तिने मागे वळून पाहाले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र अजूनही त्यांचा पाठलाग करीत होते. नॅन्सीचं हृदय धडधडायला लागलं. जॉनही गोंधळून गेला होता. काय करावं काही त्यांना सुचत नव्हतं. नुसते ते भराभर चालत त्यांच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते. पुढे रस्ता अजूनच अंधारलेला आणि निर्मणूष्य होता. ते दोघे आणि त्यांच्यामागे पाठलाग करणारी ती पोरं यांच्याव्यतिरिक्त त्यांना अजून दूसरं कुणीच दिसत नव्हतं.
त्यांच्या लक्षात आलेलं दिसतं की आपण त्यांचा पाठलाग करीत आहोत स्टीव्हन त्याच्या साथीदारांना म्हणाला.
येवू देकी... ते केव्हा ना केव्हा येणारंच होतं क्रिस्तोफर म्हणाला.
ते खुप भ्यायलेलेसुध्दा दिसत आहेत पॉल म्हणाला.
भ्यायलाच तर पाहिजेत... आता भितीमुळेच आपलं काम होणार आहे... कधी कधी भितीच माणसाला अधू बनविते रेनॉल्ड म्हणाला.
जॉननं मागे वळून पहालं तर ते लोक भराभर त्यांच्याजवळ पोहोचत होते.
नॅन्सी ... चल पळ... जॉन तिचा हात पकडत म्हणाला.
एकमेकांचा हात पकडून आता ते जोरात धावायला लागले.
आपण पोलीसात जायला पाहिजे का? नॅन्सीने पळता पळता विचारले.
आता इथे कुठं आहेत पोलीस... आणि जर आपण शोधून गेलोही .. तर तेही आपल्याला शोधत असतील... आतापयर्ंत तुझ्या घरच्यांनी पोलिसात रिपोर्ट दिली असेल... जॉन धावता धावता कसातरी बोलत होता.
धावता धावता मग ते एका अंधार्या अरुंद गल्लीत शिरले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्रसुध्दा त्यांच्या मागेच होते. ते जेव्हा त्या गल्लीत घुसणार एवढ्यात एक मोठा ट्रक रस्त्यावरुन त्यांच्या आणि गल्लीच्या तोंडाच्या मधून गेला. ते ट्रक पास होईपयर्ंत थांबले. आणि जेव्हा ट्रक पास झाला होता तेव्हा त्यांना गल्ली रिकामी दिसत होती. ते गल्लीत घुलले. गल्लीच्या दुसर्या टोकापयर्ंत धावत गेले. गल्लीच्या दुसर्या तोंडावर थांबले. आजूबाजूला बघितलं पण नॅन्सी आणि जॉनचा कुठेच पत्ता नव्हता.
क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र इकडे तिकडे पाहात एका छोट्या चौकाच्या मधे उभे राहाले. त्यांना नॅन्सी आणि जॉन कुठेही दिसत नव्हते.
आपण सगळेजण इकडे तिकडे विखरुन त्यांना शोधू... ते आपल्या तावडीतून सुटता कामा नये क्रिस्तोफर म्हणाला.
चौघं चार बाजूंना, चौकाच्या चार रस्त्याने जावून विखूरले आणि त्यांना शोधू लागले.
नॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. कदाचित ड्रेनेज पाईप्स नवे टाकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तिथे आणून टाकले असावेत. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते काय करु शकणार होते?
अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणार्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता.
तो त्या चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले.
साले कुठं गायब झालेत? तो स्वतरूशीच चिडून म्हणाला.
तेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं.
नक्कीच साले त्या पाईपमध्ये लपले असतील...
त्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात...
स्टीव... लवकर इकडे ये तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला.
स्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला.
जाणार्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला.
आय प्रॉमीस
हॉटेलच्या एका रुममध्ये नॅन्सी आणि जॉन बेडवर एकमेकांच्या समोर बसले होते. जॉनने तिच्या चेहर्यावर येणार्या केसांच्या बटा बाजूला सारल्या.
मला तर भीतीच वाटली होती की आपण त्यांच्या तावडीत सापडू की काय नॅन्सी म्हणाली.
ती अजूनही त्या भयानक मनस्थीतीतून बाहेर आलेली दिसत नव्हती.
अगं मी असतांना तुला काळजी करण्याचं काय कारण?... मी तुला काहीही होवू देणार नाही... आय प्रॉमीस तो तिला दिलासा देत म्हणाला.
तिने मंद हसत त्याच्याकडे पाहाले.
खरंच तिला त्याच्या या शब्दाने किती धीर आला होता...
हळूच जॉन तिच्याजवळ सरकला. तिने त्याच्या डोळ्यात बघितले. तोही तिच्या डोळ्यातून डोळे हटविण्यास तयार नव्हता. हळू हळू त्यांच्या श्वासांची गती वाढायला लागली. हळूच जॉनने तिला आपल्या बाहूपाशात ओढून घेतले. तिलाही जणू त्याच्या उबदार बाहूपाशात सुरक्षीत वाटत होते.
जॉनने हळूच तिला बेडवर झोपवून तिचा चेहरा आपल्या तळहातात घेवून तो तिच्याकडे निरखुन बघू लागला. हळूच, आपसूकच त्याचे गरम ओठ आता तिच्या थरथरत्या ओठांवर विसावले होते. दोघंही आता आवेगाने एकमेकांवर चूंबनाचा वर्षाव करु लागले. इतक्या आवेगाने की त्या आवेगाच्या भरात धाडकन्श् ते दोघंही बेडच्या खाली जमीनीवर पडले. नॅन्सी खाली आणि जॉन तिच्या वर पडला होता. वेदनेने ओरडत नॅन्सीने त्याला दूर ढकललं.
माझे हाडं मोडणार आहेस की काय ती वेदनेने कन्हत म्हणाली.
जॉन पटकन उठला आणि तिला वर उचलण्याचा प्रयत्न करु लागला.
आय एम सॉरी ... आय एम सो सॉरी तो म्हणाला.
नॅन्सीने त्याला एक चपराक मारण्याचा अविर्भाव केला. त्यानेही भीतीने डोळे बंद करुन आपला चेहरा बाजूला सारला. नॅन्सी गालातल्या गालात हसली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप भाव त्याच्या चेहर्यावर पसरले होते. त्याच्या याच तर निष्पाप भावांवरती ती फिदा झाली होती. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याच्या ओठांचे एक करकचून चूंबन घेतले. तोही तिच्या चुंबनाला तेवढ्याच आवेगाने प्रतिसाद देवू लागला. आता तर त्यांना तिथून गालीच्यावरुन उठून बेडवर जाण्याची सुध्दा उसंत नव्हती. किंबहूना ते एक क्षणही वाया जावू देवू इच्छीत नव्हते. ते खाली गालीच्यावरच आडवे पडून एकमेकांच्या शरीरावर चूंबनाचा वर्षाव करु लागले. चुंबनासोबतच त्यांचे हात एकमेकांचे कपडे काढण्यात व्यस्त होते. जॉन आता तिचे आणि आपले संपुर्ण कपडे काढून तिच्यात सामावून जाण्यास आतूर झाला होता. त्याचा देह हळू हळू तिच्या देहावर झूकु लागला. तेवढ्यात... तेवढ्यात त्यांच्या रुमच्या दरवाजावर थाप पडली. ते जसे जिथल्या तिथे थीजून गेले. गोंधळाने ते एकमेकाकडे पाहू लागले.
आपल्याला दरवाजा वाजण्याचा भास तर नाही ना झाला?...
तेवढ्यात अजून एक जोरदार थाप दारावर पडली.
सर्विस बॉय तर नसावा...
कोण आहे? जॉनने आवाज दिला.
पोलिस... बाहेरुन आवाज आला.
दोघंही गालीच्यावरुन उठून कपडे घालू लागले.
पोलिस इथपयर्ंत कसे काय पोहोचले?...
जॉन आणि नॅन्सी विचार करु लागले.
त्यांनी आपले कपडे घातल्यानंतर अवसान गळलेल्या स्थीतीत जॉन दरवाजापयर्ंत गेला. त्याने पुन्हा एकदा नॅन्सीकडे बघीतले. आता या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याची ते मनोमन तयारी करु लागले. जॉन कीहोलमधून बाहेर डोकावून बघू लागला. पण बाहेर अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते.
किंवा त्या कीहोलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा...
हळूच त्याने दरवाजा उघडला आणि दार तिरकं करुन खींडीतून तो बाहेर बघण्याचा प्रयत्न करु लागला तोच.. क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल, आणि स्टीव्हन दरवाजा जोरात ढकलून खोलीत घुसले.
काय होत आहे हे समजण्याच्या आधीच क्रिस्तोफरने दरवाजाला आतून कडी घातली होती. एखाद्या चित्त्याच्या चपळाईने रोनॉल्डने चाकू काढून नॅन्सीच्या मानेवर ठेवला आणि दूसर्या हाताने ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले.
क्रिस्तोफरनेही जणू पुर्वनियोजीत ठरविल्याप्रमाणे त्याचा चाकू काढून जॉनच्या मानेवर ठेवला आणि त्याचं तोंड दाबून धरलं. आता सर्व परिस्थीती त्यांच्या आटोक्यात आल्याप्रमाणे ते एकमेकांकडे पाहून वहशीपणे गालातल्या गालात हसले.
स्टीव्ह याचं तोंड बांध क्रिस्तोफरने स्टीव्हनला आदेश दिला.
जशी नॅन्सी ओरडण्याचा प्रयत्न करु लागली रोनॉल्डची तिच्या तोंडावरची पकड मजबूत झाली.
पॉल हिचंही बांध...
स्टीव्हनने जॉनचं तोंड, हात आणि पाय टेपने बांधले. पॉलने नॅन्सीचं तोंड आणि हात बांधले.
त्यांनी ज्या सफाईने ह्या सगळ्या हालचाली केल्या त्यावरुन ते ह्या अशा कामात रुळलेले आणि निर्ढावलेले गिधाडं वाटत होते.
आता क्रिस्तोफरच्या चेहर्यावर राक्षसी हास्य लपविल्या लपविले जात नव्हते.
ए ... त्याच्या डोळ्यावर काहीतरी बांधारे... पाहावल्या जाणार नाही बिचार्याच्यानं क्रिस्तोफर म्हणाला.
स्टीव्हनने त्यांच्याच सामानातलं एक कापड घेवून जॉनच्या डोळ्यावर बांधलं. आता जॉनला फक्त अंधाराशीवाय काहीच दिसत नव्हतं. आणि ऐकू येत होतं ते त्या गिधाडांचं राक्षसी आणि वहशी हास्य आणि नॅन्सीचा दाबलेला दडपलेला चित्कार.
मी तुम्हाला सोडणार नाही
जॉनला एकदम सर्व शांत आणि स्थब्ध झालेंलं जाणवलं.
ए त्याच्या डोळ्यावरचं कापड काढ रे... क्रिस्तोफरचा चिडलेला आवाज आला.
जॉनला त्याच्या डोळ्यावरचं कापड काढतांनाचं जाणवत होतं. त्याचा आक्रोश अश्रूंच्या द्वारे बाहेर पडून ते कापड ओलं झालं होतं.
जसं त्याच्या डोळ्यावरचं कापड सोडलं, त्याने समोरचं दृष्य बघितलं. त्याचे जबडे आवळल्या गेले, डोळे लाल झाले, सारं अंग रागाने थरथरायला लागलं. तो स्वतरूला सोडवून घेण्यासाठी तडफडू लाग़ला. त्याच्या समोर त्याची नॅन्सी निर्वस्त्र पडलेली होती. तिची मान एका बाजूला लटकत होती. तिचे डोळे उघडे होते आणि पांढरे झाले होते. तिचं शरीर निश्चल झालेलं होतं. तिचे प्राणपाखरु केव्हाच उडून गेलेले होते.
अचानक त्याला जाणीव झाली की त्याच्या डोक्यावर कशाचा तरी प्रहार झाला आणि त्याची शुध्द हळू हळू हरपू लागली.
जेव्हा जॉन शुद्धीवर आला त्याला जाणवले की त्याला आता बांधलेले नव्हते. पण जिथे मघा नॅन्सीची बॉडी पडलेली होती तीथे आता काहीच नव्हते. तो ताबडतोब उठून उभा राहाला, आजूबाजूला त्याने एक नजर फिरवली.
ते आपल्याला पडलेलं भयानक स्वप्न तर नव्हतं...
देवा ते स्वप्नच होवो ...
त्याला मनोमनी वाटायला लागलं.
पण स्वप्न कसं काय असू शकणार...
नॅन्सी त्याने एक आवाज दिला.
त्याला कळत होतं की त्या आवाजाला प्रतिसाद येणार नाही.
पण एक वेडी आशा...
त्याचं डोकं मागच्या बाजूने खुप दुखत होतं. म्हणून त्याने डोक्याला मागे हात लावून पाहाला. त्याच्या हाताला लाल लाल रक्त लागलं होतं.
त्या लोकांनी फटका मारुन आपल्याला बेशुध्द केलेल्याची ती जखम होती. आता त्याला पक्की खात्री झाली होती की ते स्वप्न नव्हतं.
धावतच तो रुमच्या बाहेर गेला. बाहेर इकडे तिकडे शोधतच तो व्हरंड्यातून धावत होता. तो लिफ्टजवळ गेला आणि त्याने लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टमधे जाण्याच्या आधी त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला शेवटचा दृष्टीक्षेप टाकला.
कुठे गेले ते लोक...
आणि नॅन्सीची बॉडी कुठं आहे...
की लावली त्यांनी ठिकाण्यावर..
तो हॉटलच्या बाहेर येवून अंधारात इकडे तिकडे सैरावैरा वेड्यासारखा धावत होता. सगळीकडे अंधार होता. मध्यरात्र उलटून गेली असावी. रस्त्यावरही रहदारी फारच तुरळक दिसत होती. त्याला कोपर्यावर एक टॅक्सीवाला दिसला.
याला कदाचीत माहित असेल...
तो त्या टॅक्सीजवळ गेला, टॅक्सीवाल्याला विचारलं. त्याने काहीतरी डावीकडे हातवारे करुन सांगीतलं. जॉन टॅक्सीत बसला आणि त्याने टॅक्सीवाल्याला टॅक्सी तिकडे घ्यायला सांगीतली.
निराश झालेला जॉन हळू हळू चालत आपल्या रुमजवळ परत आला. रुममध्ये जावून त्याने आतून दरवाजा लावून घेतला.
त्याने बेडकडे बघितलं. बेडशीटवर वळ्या पडलेल्या होत्या. तो बेडवर बसला.
काय कराव?...
बरं पोलिसांकडे जावं तर ते आपल्याला आयतंच पकडतील...
आणि तिच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल...
आणि आपणच तर आहोत तिच्या खुनाला जबाबदार...
नुसता खुनच नाही तर तिच्यावर झालेल्या बलात्कारालासुद्धा...
त्याने गुडघे पोटाजवळ घेवून आपलं तोंड गुडघ्यात लपविलं. आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला.
रडता रडता त्याचं लक्ष तिथेच बाजूला आलमारीच्या खाली पडलेल्या कागदाच्या तुकड्याकडे गेलं. तो उभा राहाला. आपल्या बाह्यांनी आपले अश्रू पुसले.
कशाचा तुकडा असावा?...
त्याने तो कागदाचा तुकडा उचलला.
कागदावर चार अक्षरं लिहिलेली होती — सी, आर, जे, एस. आणि त्या अक्षरांपुढे काहीतरी नंबर्स लिहिलेले होते. कदाचीत एखाद्या पत्याच्या गेमचे पॉईंट असावेत...
त्याने तो कागद उलटा करुन बघितला. कागदाच्या मागे एक नंबर होता. कदाचीत मोबाईल नंबर असावा.
तो निर्धाराने उठला —
एसहोल्स ... मी तुम्हाला सोडणार नाही त्याने गर्जना केली.
मग जॉन कुठे गेला? ...
डिटेक्टीव्ह सॅम डिटेक्टीव बेकर समोर बसून ऐकत होता. त्याची सर्व हकीकत सांगून केव्हाच झाली होती. पण सगळी हकिकत एकून खोलीतले सगळे जण एवढे भारावून गेले होते की बराचवेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. खोलीमध्ये एक अनैसर्गीक शांतता परसली होती.
एका उत्कट प्रेमकहानीचा असा अंत व्हावा?....
कॅबिनमधल्या सगळ्यांनाच ती हकीकत हुर हुर लावून गेली होती.
थोड्यावेळाने डिटेक्टीव सॅमने आपल्या भावनांना आवर घालीत विचारले,
जॉनने पुलिस स्टेशनला रिपोर्ट केला होता?
नाही
मग ... हे सगळ तुला कसं कळलं ?
कारण नॅन्सीचा भाऊ... जॉर्ज कोलीन्सने रिपोर्ट केला होता
पण त्याने रिपोर्ट कसा काय केला? ... म्हणजे त्याला हे सगळं कसं कळलं? ... जॉन त्याला भेटला होता की काय? सॅम एकावर एक प्रश्नांचा भडीमार करीत होता.
नाही जॉन त्याला त्या घटनेनंतर कधीही भेटला नाही.... बेकर म्हणाला.
मग त्याला खुनी कोण आहेत हे कसं कळलं? सॅमला आता त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याची घाई झाली होती.
काही महिन्यांपुर्वी जॉनने नॅन्सीच्या भावाला या घटनेबद्दल पत्र लिहिले होते... त्यात त्याने त्या चार जणांचे नावं पत्ते त्याला कळविले होते ...
मग रिपोर्टचा काय निकाल लागला? सॅमने पुढचा प्रश्न विचारला.
... या केसवर आम्हीच तपास केला होता पण नॅन्सीची डेड बॉडी मिळाली नव्हती की जॉन सापडला नाही ... जो की या घटनेचा एकुलता एक अतिशय महत्वाचा आय विटनेस होता... म्हणून केस तशीच खोळंबून राहाली... आणि अजुनही खोळंबून पडलेली आहे...
बरं जॉनचा काही पत्ता? सॅमने विचारले.
त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नाही ... त्या घटनेनंतर तो कधी त्याच्या स्वतरूच्या घरी सुध्दा गेला नाही... तो जिवंत आहे का मेला आहे याचाही काही पत्ता लागला नाही ... त्याच्या जॉर्जला आलेल्या पत्रावरुन फक्त तो अजुनही जिवंत असावा असं वाटते... पण तो जर जिवंत असेल तर तो का लपतो आहे हेच कळत नाही...
कारण सरळ आहे... इतका वेळ लक्ष देवून ऐकत असलेला सॅमचा साथीदार म्हणाला.
हो ....त्याचे एकच कारण असू शकते की आता एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्यात जॉनचाच हात असू शकतो ... आणि म्हणूनच मी तुला मुद्दाम बोलावून घेवून ही माहिती दिली... बेकर म्हणाला.
बरोबर आहे तुझं ... या खुनांमध्ये जॉनचा हात आहे असं गृहीत धरण्यास पूरेपूर वाव आहे... पण मला एक गोष्ट समजत नाही ... की जेव्हा की ती खोली किंवा घर आतून आणि सर्व बाजूनी बंद असतं तेव्हा तो खुनाच्या जागी पोहोचतोच कसा? ... तो हे सगळे खुन कसे करतो आहे हे एक न उलगडणारं कोडं होवून बसलं आहे
बरं नॅन्सीच्या भावाला जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्याची प्रतिक्रीया काय होती? ... आणि निकालाला उशीर लागतो आहे या बाबतीत त्याची प्रतिक्रिया कशी आहे?
त्या माणसाला तर वेड लागल्यागत झपाटलेला आहे तो... इथे नेहमी पोलिस स्टेशनला त्याची चक्कर असते आणि केसबाबत काय झालं हे नेहमी तो विचारत असतो... बरं तो फोन करुनसुद्धा विचारु शकतो.. पण नाही तो स्वतरू इथे येवून विचारतो... मला तर त्याची खुप किव येते .. पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच आपण करु शकतो
म्हणजे एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्याचा खुनी नॅन्सीचा भाऊ जॉर्जही असू शकतो.. सॅम म्हणाला.
तुम्ही त्याला एकदा बघायला हवं... त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही बेकर म्हणाला.
पण आपल्याला ही शक्यताही नाकारुन चालणार नाही... सॅमने प्रतिवाद केला.
डिटेक्टीव बेकरने थोडा वेळ विचार केला आणि मग होकारार्थी मान हलविली.
आता पुढे कोण?
रात्री रोनॉल्ड आणि क्रिस्तोफर हॉलमध्ये पीत बसले होते. एका मागे एक त्यांच्या दोन साथीदारांचा खुन झाला होता. सुरवातीला जेव्हा स्टिव्हनचा खुन झाला तेव्हाच त्यांना शंका आली होती की हे प्रकरण नक्कीच नॅन्सीच्या खुनाशी सबंधीत आहे. पण नंतर पॉलच्या खुनानंतर तर त्यांची खात्रीच झाली होती के हे सगळं नॅन्सीच्या खुनाचंच प्रकरण आहे. कितीही घाबरणार नाही म्हटलं तरी आता त्यांना पुढचा नंबर त्यांच्या दोघांपैकीच एकाचा दिसत होता. त्यामुळे त्यांच्या चेहर्यावरची भिती आणि चिंता हटायला तयार नव्हती. ते व्हिस्कीचे ग्लासवर ग्लास रिचवित होते आणि आपली भिती मिटविण्याचा प्रयत्न करीत होते.
मी म्हटलं नाही तुला ? किस्तोफर म्हणाला
रोनॉल्डने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले.
त्या साल्याला जिवंत सोडू नको म्हणून... त्याचा काटा आपण तेव्हाच काढायला पाहिजे होता... त्या पोरीबरोबर.. क्रिस्तोफर व्हिस्कीचा घोट घेत कडवट तोंड करीत म्हणाला.
त्यांना शंका ... नाही पक्की खात्री होती की जॉनचाच या दोन खुनांमध्ये हात असावा.
आपल्याला वाटलं नाही साला एवढा डेंजरस असेल म्हणू... रोनॉल्ड म्हणाला.
बदला ... बदला माणसाला डेंजरस बनवितो क्रिस्तोफर म्हणाला.
पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की तो सारे खुन कशा प्रकारे करतो आहे... पोलिस तिथे पोहोचतात तेव्हा घर आतून बंद केलेलं असतं आणि बॉडी आत पडलेली असते... आणि तेच नाही तर पॉलच्या गळ्याचं तोडलेलं मांस माझ्या किचनमधे कसं काय आलं?.. आणि विशेष म्हणजे तेव्हाही माझं घर ...खिडक्या दारे सर्व मी व्यवस्थित बंद केलं होतं रोनॉल्ड आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.
रोनॉल्ड कुठेतरी अधांतरी विचार करीत पाहत म्हणाला,
हे सगळं पाहता मला एकच गोष्ट शक्य वाटते...
कोणती? क्रिस्तोफरने व्हिस्कीचा रिकामा झालेला ग्लास भरीत विचारले.
तूझा भूतावर विश्वास आहे? रोनॉल्डने बोलावं की नाही बोलावं या व्दीधा मनस्थीतीत विचारले.
काहीतरी मुर्खासारखा बडबडू नकोस.... त्याच्याजवळ काहीतरी ट्रीक आहे की तो अशा तर्हेने खुन करीत असावा... क्रिस्तोफर म्हणाला.
मलाही तेच वाटतं... पण कधी कधी भलती सलती शंका येते रोनॉल्ड म्हणाला.
काळजी करु नको ... आपण तो आपल्याला गाठण्याच्या आधीच आपण त्याला गाठून त्याचा काटा काढू क्रिस्तोफर त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
आपण पोलीसांचं प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे रोनॉल्ड विचार करीत म्हणाला.
पोलिस प्रोटेक्शन? ... मुर्ख आहेस की काय?... आपण त्यांना काय सांगणार आहोत... की बाबांनो आम्ही त्या पोरीला मारलं... आमच्याच्याने चूक झाली ... सॉरी ... अशी चूक पुन्हा होणार नाही ... कृपा करुन आमचं रक्षण करा .. क्रिस्तोफर दारुच्या नशेत माफी मांगण्याचे हावभाव करुन बोलत होता.
तो नंतरचा प्रश्न झाला... आधी आपलं प्रोटेक्शन महत्वाचं... सर सलामत तो पगडी पचास रोनॉल्ड म्हणाला.
पण पोलीसांकडे जावून त्यांचं प्रोटेक्शन मागणं म्हणजे...
पोलिस प्रोटेक्शनची कल्पना येताच नाही म्हटलं तरी रोनॉल्डला बरं वाटत होतं. त्याची भिती पुर्णपणे नाही तरी कमी नक्कीच झाली होती.
त्याची तु काळजी करु नकोस... ते सगळं माझ्यावर सोडून दे रोनॉल्ड त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने म्हणाला.
जेफची ट्रीक
डिटेक्टीव्ह सॅम आपल्या अॉफिसमध्ये विचारांच्या तंद्रित बसला होता. जेफ त्याचा ज्यूनिअर टीम मेंबर तिथे आला.
सर माझ्या डोक्यात एक आयडीया आली आहे... की खुनी कसा खुनाच्या जागी घुसत असेल आणि मग बाहेर पडत असेल जेफ उत्साहाने म्हणाला.
सॅमने आपलं डोकं वर करुन त्याच्याकडे पाहालं.
जेफ दरवाजाच्या बाहेर गेला आणि त्याने दरवाजा बाहेरुन ओढून घेतला.
सर बघा आता तो तिकडून जोरात म्हणाला.
डिटेक्टीवने बघीतले की दाराची आतली कडी हळू हळू सरकत बंद झाली होती. सॅम आश्चर्याने बघत होता.
सर तुम्ही बघितलं का? तिकडून जेफचा आवाज आला.
मग हळू हळू दाराची कडी दूसर्या बाजूला सरकु लागली आणि थोड्या वेळातच कडी उघडल्या गेली.
सॅमला आश्चर्य वाटत होतं.
जेफ दरवाजा उघडून आत आला, त्याच्या हातात पाठीमागे काहीतरी लपविलेलं होतं.
तु कसं काय केलं? सॅमने आश्चर्याने त्याला विचारले.
जेफने एक मोठा मॅग्नेट आपल्या पाठीमागून काढला आणि सॅमच्या समोर धरला.
ही सगळी या चूंबकाची करामत आहे कारण ती कडी लोखंडाची बनलेली आहे जेफ म्हणाला.
जेफ फॉर यूवर काइंड इन्फॉर्मेशन... घटनास्थळी असलेल्या सगळ्या दाराच्या कड्या एल्यूमिनियमच्या होत्या सॅम उपरोधाने म्हणाला.
ओह... एल्यूमिनीयमच्या होत्या मग अजून काहीतरी डोक्यात आयडीया आल्यासारखा तो म्हणाला, काही हरकत नाही ... त्याचं पण सोल्यूशन आहे माझ्याजवळ
सॅमने अविश्वासाने त्याच्याकडे बघीतले.
जेफने आपल्या गळ्यातला एक स्टोन्सचा नेकलेस काढून तोडला, सगळे स्टोन्स एका हातात घेवून त्यातला नायलॉन धागा दुसर्या हाताने ओढला. त्याने सगळे स्टोन्स खिशात ठेवले. आता त्याच्या दूसर्या हातात तो नॉयलॉनचा धागा होता.
डिटेक्टीव सॅम त्याच्याकडे तो काय करतो आहे हे गोंधळलेल्या स्थितीत पाहात होता.
आता बघा ही दूसरी आयडीया आहे.. तूम्ही फक्त माझ्यासोबत या जेफ म्हणाला.
सॅम त्याच्या मागे मागे गेला.
जेफ दरवाजाजवळ गेला. दरवाज्याच्या कडीत तो नॉयलॉन धागा त्याने अडकविला. धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडीत सॅमला म्हणाला, तुम्ही आता दरवाजाच्या बाहेर जा
सॅम दरवाजाच्या बाहेर गेला. जेफही आता धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडून दरवाजाच्या बाहेर आला. आणि दार ओढून घेतलं.
दार बंद होतं पण तो धागा जो जेफच्या हातात होता दाराच्या फटीतून अजूनही आतल्या कडीला अडकविलेला होता. जेफने हळू हळू त्या धाग्याचे दोन्ही टोकं ओढले आणि मग धाग्याचं एक टोक सोडून दूसर्या टोकाने धागा ओढून घेतला. सगळा धागा आता जेफच्या हातात होता.
आता दार उघडून बघा जेफ सॅमला म्हणाला.
सॅमने दार ढकलून बघीतलं आणि काय आश्चर्य दार आतून बंद होतं.
सॅम अविश्वासाने जेफकडे पहायला लागला.
आता मला पुर्णपणे खात्री पटायला लागली आहे... सॅम म्हणाला.
कशाची? जेफने विचारले.
की या नोकरीच्या आधी तू कोणते धंधे करीत असला पाहिजेस.. सॅम गमतीने म्हणाला.
दोघही एकमेकांकडे पाहून हसले.
पण मला एक सांग सॅम म्हणाला.
जेफने प्रश्नार्थक मुद्रेने सॅमकडे बघीतले.
की जर दाराला आतून कुलूप लावलेले असेल तर? सॅमने विचारले.
नाही...मग त्या स्थीतीत ...एकच शक्यता आहे जेफ म्हणाला.
कोणती?
की ते दार उघडायला एखादी अघोरी शक्तीच लागेल जेफ म्हणाला
योजना
पोलिस स्टेशनच्या कॉन्फरंन्स रुममध्ये मिटींग चालली होती. समोर भिंतीवर टांगलेल्या पांढर्या पडद्यावर प्रोजेक्टरवरुन एक लेआऊट डायग्राम प्रोजेक्ट केली होती. त्या डायग्राममध्ये दोन घरांचे लेआऊट एका शेजारी एक असे काढलेले दिसत होते. लाल लेजर पॉईंटर वापरुन डिटक्टीव सॅम समोर बसलेल्यांना समजावून सांगत होता...
मि. क्रिस्तोफर एन्डरसन आणि मि. रोनॉल्ड पार्कर ... सॅमने सुरवात केली. समोर इतर पोलिसांसमवेत क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड बसलेले होते. ते सॅम काय सांगतो ते लक्ष देवून एकत होते.
तुमच्या घरात या जागी आपण कॅमेरे बसविणार आहोत. बेडरुमध्ये तिन आणि घरात इतर जागी तिन असे एकूण सहा कॅमेरे एकएकाच्या घरात बसविले जातील. हे कॅमेरे सर्किट टिव्हीला जोडलेले असतील जिथे आमचे टेहळणी पथक सारखे घरातल्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल.
तुला वाटते याने काही होणार आहे? क्रिस्तोफर रोनॉल्डच्या कानात व्यंगपूर्वक कुजबुजला.
रोनॉल्डने क्रिस्तोफरकडे पाहाले आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सॅमला विचारले, जर खुनी कॅमेर्यांपासून दूर राहाला तर?
जन्टलमन आपण घरात मुव्हीग कॅमेरे लावतो आहोत .. ज्यामुळे तुमचं संपूर्ण घर कॅमेर्यांच्या क्षेत्रात राहणार आहे... आणि हो... मी तुम्हाला आश्वासन देतो की हा सगळ्यात चांगला आणि इफेक्टीव्ह उपाय आपण खुन्याला पकडण्यासाठी वापरत आहोत ... खुन्याने जर आत घूसण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थीतीत सुटू शकणार नाही... अक्षरशरू आमच्या तंत्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत घेवून हा ट्रॅप तयार केला आहे...
बरं ते ठिक आहे... आणि समजा एवढं करुन खुनी तुमच्या हाती लागला तर तुम्ही काय करणार आहात? क्रिस्तोफरने विचारले.
अर्थातच त्याला आम्ही कोर्टापुढे हजर करु...आणि कायद्यानुसार कोणती शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरविल सॅम म्हणाला.
आणि जर तो सुटून पळून गेला तर? क्रिस्तोफरने पुढे विचारले.
जसे नॅन्सीचे खुनी तिचा खुन करुन पळून गेले तसे एक पोलीस उपाहासाने म्हणाला.
क्रिस्तोफर आणि रोनॉल्डने त्याच्याकडे रागाने पाहाले.
तुम्हाला आम्ही काय तीचे खुनी वाटतो? रोनॉल्डने त्या पोलिसाला रागाने प्रतिप्रश्न केला.
लक्षात ठेवा अजून आम्हाला कोर्ट खुनी ठरवू शकलेलं नाही क्रिस्तोफर रागाने चिडून म्हणाला.
मि. रोनॉल्ड पार्कर, मि. क्रिस्तोफर एन्डरसन ... इझी ... इझी ... मला वाटते आपण मुळ मुद्यापासून भटकत चाललो आहोत... सद्यरूपरिस्थीतीत मुळ मुद्दा आहे तुम्हाला कसे संरंक्षण देता येईल हा... तुम्ही नॅन्सीच्या खुनात गुन्हेगार आहात की नाही हा नंतरचा मुद्दा झाला.. सॅम ने त्यांना शांत करण्याच्या उद्देशाने म्हटले.
तुम्हीही आधी आमच्या संरक्षणाचं बघा... बाकिच्या गोष्टी नंतरच्या नंतर बघता येतील. क्रिस्तोफर रुबाबात, विषेशतरू त्या पोलिस अधिकार्याकडे, ज्याने त्यांना डिवचलं होतं, त्याच्याकडे पाहत म्हणाला. त्या पोलिस अधिकार्याला या दोन जणांचं सरंक्षण करणार्या तुकडीत त्याचा समावेश केला होतं हे जिवावर आलं होतं. सॅमनेही त्या पोलिस अधिकार्याला शांत राहण्याबद्दल खुनावले. तो पोलिस अधिकारी रागाने उठून तेथून बाहेर निघून गेला. वातावरण तेवढ्यापुरतं निवळलं आणि सॅम पुन्हा आपली योजना सर्वाना विस्तृत स्वरुपात समजावून देवू लागला.
क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड पोलिस आपलं संरक्षण करु शकतील की नाही या बाबतीत अजूनही शाशंक होते. पण त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पुर्णतरू पोलीसांच्या हाती सोपविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
जादूटोणा?
पोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव्ह सॅमच्या रिकाम्या खुर्चीसमोर एक माणूस बसला होता. सॅम घाईघाईने आला आणि आपल्या खुर्चीवर बसला.
हं ... तर तुमच्याकडे या केसच्या संदर्भात माहिती आहे?... सॅमने विचारले.
होय साहेब
सॅमने एकदा त्या माणसाला नखशिखान्त न्याहाळले आणि तो काय सांगतो याची वाट पाहू लागले.
साहेब खरं म्हणजे... आमच्या शेजारी ती पोरगी नॅन्सी, जिचा खुन झाला म्हणतात, तिचा भाऊ राहातो... त्या माणसाने सुरवात केली आणि तो पुढे माहिती सांगु लागला ....
... एका चाळीत एक घर होतं. त्या घराला जिकडे तिकडे काचेच्या खिडक्याच खिडक्या होत्या. ऐवढ्याकी त्या घरात काय चाललं आहे हे शेजारच्याला कळावं. एका खिडकीतून हॉलमध्ये नॅन्सीचा भाऊ जॉर्ज बसलेला दिसत होता. आता आधीपेक्षा अजूनच तो विक्षीप्त आणि गबाळा दिसत होता. दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो फायरप्लेसच्या समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला होता. कदाचित ते बाहुलं त्यानेच तयार केलं असावं. बाजुला ठेवलेल्या प्लेटमधून त्याने हातात काहीतरी उचलले आणि तो काहीतरी मंत्रासारखे शब्द उच्चारु लागला
एबस थी बा रास केतिन स्तता...
त्याने ताटातून जे उचलेले होते ते समोरच्या ज्वालेत जोराने फेकल्यागत टाकले. मोठा भडका उडाला. पुन्हा तो तसाच काहीतरी विचित्र मंत्र उच्चारु लागला
कॅटसी... नतंदी.. वाशंर्पत... रेर्वरात स्तता...
पुन्हा त्याने त्या ताटातले धान्यासारखे काहीतरी हातात मुठभर घेवून समोरच्या ज्वालेच्या स्वाधीन केले. यावेळी ज्वालेचा अजुनच मोठा भडका उडाला.
त्याने हातातलं बाहूलं बाजूला ठेवलं. ज्वालेच्या समोर वाकुन, जमिनीवर कपाळ घासलं.
एक माणूस शेजारुन जॉर्जच्या घरात कुतूहलाने डोकावून बघत होता.
कपाळ घासल्यानंतर जॉर्ज उठून उभा राहाला आणि त्याने एक विचित्र चित्कार केला. जो शेजारुन डोकावत होता तो सुध्दा दचकला. जॉर्जने वाकुन त्याच्या बाजूला ठेवलेलं ते बाहूलं उचललं आणि पुन्हा एक जोरात विचित्र चित्कार केला. सगळीकडे एक अदभूत शांतता पसरली.
आता तू मरायला तयार हो स्टीव्हन.. जॉर्ज त्या बाहूल्याला म्हणाला.
नाही .. नाही मला मरायचं नाही इतक्यात... जॉर्ज मी तुझी माफी मागतो... मला माफ कर.. आय एम सॉरी... मी जे काही केलं ते चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी तुझ्यासाठी तु म्हणशील ते करीन... पण मला माफ कर जॉर्ज जणू ते बाहूलं त्याची माफी मागत आहे असे त्या बाहूल्याचे संवाद बोलत होता.
तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस? ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का? जॉर्जने आता त्याचे स्वतरूचे संवाद बोलत विचारले.
नाही ... मी ते कसे काय करु शकेन?... ते माझ्या हातात असतं तर नक्कीच केलं असतं... ते सोडून काहीही माग... मी तुझ्यासाठी करेन... जॉर्ज बाहूल्याचे संवाद बोलू लागला.
असं.... तर मग आता ... मरण्यासाठी तयार हो... जॉर्ज त्या बाहुल्याला म्हणाला.
तो शेजारचा माणूस अजूनही जॉर्जच्या खिडकीतून लपून डोकावत होता.
मध्यरात्र होवून गेली. बाहेर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. जॉर्ज हळूच त्याच्या घराच्या बाहेर आला. चहुकडे एक नजर फिरवली. त्याच्या हातात एक थैली होती त्यात त्याने ते बाहुलं कोंबलं. आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला. कंपाऊंडच्या बाहेर येतांना पुन्हा त्याने त्याची चौकस नजर चहुवार फिरवली. समोर रस्त्यावर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता. आता तो रस्त्यावर पटापट आपले पावलं टाकीत चालायला लागला. त्या शेजारच्या माणसाने आपल्या खिडकीतून लपून जॉनला बाहेर जातांना बघितले. जसा जॉर्ज रस्त्यावर पुढे चालू लागला तो माणूस आपल्या घराच्या बाहेर आला. तो माणूस त्याला काही चाहूल लागू नये किंवा आपण त्याला दिसू नये याची काळजी घेत होता. जॉर्ज झपाझप आपले पावलं टाकीत पुढे जात होता. जॉर्ज बराच पुढे गेल्यावर तो माणूस त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जावू लागला.
तो माणूस जॉर्जचा पाठलाग करीत स्मशानाजवळ येवून पोहोचला. स्मशानाच्या आजुबाजुला दाट झाडी होती. कदाचित त्या झाडीत लपून घुबडं एखाद्या प्रेताची वाट पाहत बसत असावीत. दूर कुठेतरी कुत्यार्ंचा विचित्र रडण्यासारखा आवाज येत होता. त्या माणसाला या सगळ्या वातावरणाची भिती वाटत होती. पण त्याला जॉर्ज इथे कशासाठी आला आहे हे पहायचे होते. जॉर्ज स्मशानात शिरला आणि तो माणूस बाहेरच कंपाऊंडच्या मागे लपून तो काय करीत आहे ते पाहू लागला. चंद्राच्या उजेडात त्या माणसाला जॉर्जची आकृती दिसत होती. जॉर्जने स्मशानात एक जागा निश्चित केली आणि तिथे तो खणू लागला. एक गड्डा खणल्यानंतर त्याने त्याच्या जवळच्या थैलीतून ते बाहुलं बाहेर काढलं. त्या बाहुल्याला त्याने जसे ते एखादे प्रेत असावे तसे त्या गड्ड्यात ठेवले आणि वरुन माती टाकु लागला. माती टाकतांनाही त्याचं आपलं मंत्रासारखं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. त्या बाहुल्यावर माती टाकुन तो गड्डा जेव्हा भरला तेव्हा जॉर्ज त्या मातीवर उभं राहून पायाने ती माती सारखी करीत दाबु लागला....
... तो माणूस सांगत असलेली सर्व हकिकत डिटेक्टीव सॅम लक्ष देवून एकत होता. तो माणूस पुढे म्हणाला—
दुसर्या दिवशी जेव्हा मला कळले की स्टीव्हनचा खुन झालेला आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता
बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. या प्रकरणाला आता हे नविनच वळण लागलं होतं.
सॅम विचार करु लागला.
तुला काय वाटतं जॉर्ज खुनी असावा? सॅमने आपल्या इन्व्हेस्टीगेशनच्या भूमीकेत शिरत विचारले.
नाही .. मला वाटते तो त्याची काळी जादू हे सगळे खुन करण्यासाठी वापरत असावा ... कारण ज्या दिवशी पॉलचा खुन झाला त्याच्या आधल्या रात्रीही जॉर्जने असेच एक बाहुले तयार करुन स्मशानात पुरले होते. तो माणूस म्हणाला.
तुझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे? सॅमने थोडे उपरोधकच विचारले.
नाही .. माझा विश्वास नाही ... पण जे धडधड डोळ्यांनी दिसत आहे त्या गोष्टींवर शेवटी विश्वास ठेवावाच लागतो तो माणूस म्हणाला.
डिटेक्टीव्ह सॅमचा पार्टनर जो इतका वेळ दूर बसून सगळी हकिकत ऐकत होता, चालत त्यांच्या जवळ येत म्हणाला—
मला आधीपासूनच खात्री होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी अमानुश शक्ती आहे
सगळ्यामध्ये एक अनैसर्गीक शांतता पसरली.
आता त्याने अजुन एक नविन बाहुलं बनविलं आहे तो माणूस म्हणाला
तुरुंगात
जॉर्जच्या घराच्या खिडकीतून आतलं सगळं दिसत होतं. आजही तो फायरप्लेसच्या समोर बसलेला होता. त्याने त्याच्या हातातलं बाहुलं बाजुला जमिनीवर ठेवलं आणि वाकुन त्या ज्वालेसमोर जमिनीवर आपलं डोकं घासायला लागला. हे सगळं करतांना त्याचं आपलं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. थोड्या वेळाने तो उभा राहाला आणि एक विचित्र आवाज करीत किंचाळला. एवढा अचानक आणि जोरदार किंचाळला की बाहेर खिडकीतुन बघत असलेले डिटेक्टीव सॅम, सॅमचा पार्टनर आणि त्यांना सोबत घेवून आलेला तो माणूस सगळेजण दचकले. त्या किंकाळीनंतर वातावरणात एक भयानक शांतता पसरली.
मिस्टर रोनॉल्ड पार्कर आता तुझी पाळी आहे जॉर्ज ते खाली ठेवलेलं बाहुलं आपल्या हातात घेत म्हणाला.
पण तेवढ्यात दाराची बेल वाजली. जॉर्जने वळून दाराकडे बघितलं. बाहुल्याला पुन्हा खाली जमिनीवर ठेवलं आणि तो उठून समोरचं दार उघडायला आला.
दार उघडलं. समोर डिटेक्टीव सॅम आणि त्याचा पार्टनर होते. तो तिसरा माणूस कदाचित तिथून आधीच सटकला होता.
मिस्टर जॉर्ज कोलीन्स आम्ही तुम्हाला स्टीव्हन स्मीथ आणि पॉल रोबर्टस यांच्या खुनाचे संशयीत म्हणून अरेस्ट करायला आलो आहोत...तुम्हाला चूप राहण्याचा पुर्णपणे अधिकार आहे... आणि काही बोलायच्या आधी तुम्ही तुमच्या वकीलाशी संपर्क करु शकता... आणि तुम्ही जेही बोलाल ते कोर्टात तुमच्या विरोधात वापरण्यात येईल डिटेक्टीव सॅमने दार उघडल्याबरोबर जाहिर केले.
जॉर्ज कोलीन्सच्या चेहर्यावर कोणतेही भाव आले नव्हते. तो शांतपणे त्यांना सामोरा गेला.
त्याला अरेस्ट करण्यापूर्वी सॅमने काही प्रश्न विचारण्याचं ठरविलं.
इथे तुम्ही कोण कोण राहता? सॅमने पहिला प्रश्न विचारला.
मी एकटाच राहतो त्याने उत्तर दिलं.
आमच्या माहीती प्रमाणे तुमच्यासोबत तुमचे वडिलही राहत होते
हो राहत होते... पण आता ते हयात नाहीत
ओह ... सॉरी... ते कधी वारले?
नॅन्सीबद्दलची वाईट बातमी कळाल्यानंतर ते काही दिवसातच वारले
बरं तुम्ही स्टिव्हन आणि पॉलला ओळखत होता?
हो त्या राक्षसांना मी चांगल्या तर्हेने ओळखतो
स्टिव्हन आणि पॉलचं नाव काढल्याबरोबर सॅमने एक गोष्ट नोट केली की त्यांच्या बद्दलचा राग आणि द्वेश तो लपवू शकत नव्हता. किंवा त्याने तसा लपविण्याचा प्रयत्नही केलेला त्यांना जाणवला नाही.
आता सॅमने मुळ मुद्द्यालाच हात घालण्याचे ठरविले.
तु स्टिव्हन आणि पॉलचा खुन केला आहेस का?
हो तो निर्विकारपणे म्हणाला.
सॅमला वाटलं तो आढेवेढे घेईल. पण त्याने आढेवेढे न घेता एकदम कबुलीच देवून टाकली होती.
कसा केला तु त्यांचा खुन? सॅमने पुढचा प्रश्न विचारला.
माझ्याजवळ असलेल्या काळ्या जादूने मी त्यांना मारले तो म्हणाला.
या त्याच्या उत्तरावरुन सॅमला तो माणूस विक्षीप्त तर दिसत होताच पण आता खात्री व्हायला लागली होती.
तुझ्या त्या काळ्या जादूने तु कुणालाही मारुन दाखवू शकतोस का? सॅमने उपरोधाने विचारले.
कुणालाही मी का म्हणून मारु?... ज्याचे माझ्याशी वैर आहे त्यालाच मी मारीन
आता पुढे तु तुझ्या काळ्या जादूने कुणाला मारणार आहेस?
आता रोनॉल्डचा नंबर आहे
आत्ता ईथे तु त्याला मारुन दाखवू शकतोस का? सॅमने त्याची काळी जादू आणि तो दोघांचेही खोटेपण उघडे पाडण्याच्या उद्देशाने विचारले.
आत्ता नाही ... त्याची वेळ आली म्हणजे मी त्याला मारेन तो म्हणाला.
त्याची ती उत्तरं ऐकून सॅमला आता एवढ्यात तरी त्याला अजुन प्रश्न विचारण्यात स्वारस्य वाटत नव्हते. ते दोघे जण जॉर्जला अरेस्ट करण्यासाठी हातकडी घेवून पुढे सरसावले. याही वेळी त्याने काहीही आढेवेढे न घेता त्यांचे पुर्णपणे सहकार्य केले.
सॅमला मनोमन वाटत होते की एकतर हा माणूस पागल असावा किंवा अती चालाक....
पण तो जे म्हणतो ते जर खरं असेल तर ?...
क्षणभर का होईना सॅमच्या डोक्यात विचार डोकावून गेला...
नाही ... असं कसं शक्य आहे?...
सॅमने आपल्या डोक्यात आलेला तो विचार झटकून टाकला.
डिटेक्टीव सॅमच्या पार्टनरने जॉर्जला तुरुंगात एका कोठडीमध्ये बंद केले आणि बाहेरुन कुलूप घातले. सॅम बाहेरच उभा होता. जसा सॅम आणि सॅमचा पार्टनर तिथून जावू लागले तसा जॉर्ज आवेशाने जोरात ओरडला—
तुम्ही लोक मुर्ख आहात... जरी तुम्ही मला तुरुंगात बंद केले तरीही माझी जादू इथूनही आपलं काम करेल
सॅम आणि त्याचा पार्टनर थांबले आणि वळून जॉर्जकडे पाहू लागले.
सॅमला जॉर्जची आता किव येवू लागली होती.
बिचारा...
बहिणीचा असा वाईट तर्हेने खुन झाल्यामुळे त्याचं असं विक्षीप्तपणे वागणं साहजीक आहे...
सॅम विचार करीत करीत पुन्हा आपल्या साथीदारासमवेत पुढे चालू लागला. थोडं अंतर चालल्यानंतर पुन्हा त्याने वळून जॉर्जकडे बघितलं. तो आता खाली वाकुन जमिनीवर डोकं घासत होता आणि मंत्रासारखं काहीतरी बडबडत होता.
याच्यावर लक्ष ठेवा आणि याला कुणीही व्हिजीटरला भेटण्याची परवानगी देवू नका सॅमने निर्देश दिला.
यस सर सॅमचा पार्टनर आज्ञाधारकपणे म्हणाला.
बेडरुमची निगराणी
रोनॉल्डचे घर पुर्णपणे रात्रीच्या अंधाराने घेरले गेले होते. बाहेर आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र असा आवाज आणि दूर कुठेतरी कुत्यार्ंच्या रडण्यासारखा आवाज येत होता. अचानक घराच्या बाजुच्या एका झाडावर विसावलेले पक्षी फडफड करीत उडू लागले.
दोन पोलिस टीमचे मेंबर्स रिचर्ड आणि इरीक टीव्हीच्या समोर बसून रोनॉल्डच्या घरातल्या सगळ्या हालचाली टीपत होते. रोनॉल्डच्या घराच्या शेजारीच एका गेस्टरुममध्ये त्यांना जागा देण्यात आली होती. रिचर्ड अंगाने चांगलाच जाड होता तर त्याच्या अगदी विरुध्द इरिक उंच आणि एकदम सडपातळ होता. त्यांच्या टीव्हीवर अस्वस्थतेने कड बदलणारा आणि झोपण्याचा प्रयत्न करणारा रोनॉल्ड दिसत होता.
यापेक्षा एखाद्या सेक्सी जोडप्याच्या बेडरुमची निगराणी करायला मला जास्त आवडलं असतं.. इरीक गमतीने म्हणाला.
रिचर्डला इरीकच्या गमतीत बिलकुलच रस दिसत नव्हता.
नाही म्हणजे तु थोडा मोटा असला तरीही तुझ्या सारख्या लग्न झालेल्या जोडप्याच्या बेडरुमचीही निगराणी करायला मला चाललं असतं इरीक पुढे म्हणाला.
तरीही रिचर्डचा चेहरा मख्ख तो मख्खच होता.
तेवढ्यात अचानक एका मॉनीटरवर काहीतरी हालचाल दिसली. एक काळी मांजर खोलीतून ईकडून तिकडे धावत गेली होती.
ए बघ तिथे खोलीत एक मांजर आहे रिचर्ड म्हणाला.
इथे काय आपण कुर्त्यामांजराच्या हालचाली टिपण्यासाठी बसलो आहोत?.. माझ्या बापाला जर माहित असतं की एक दिवस असा मी कुर्त्या मांजरांच्या हालचाली बघत मॉनिटरसमोर बसणार आहे तर त्याने मला कधीच पोलिसात जावू दिलं नसतं इरीक उपरोधाने म्हणाला.
अचानक त्या मांजरीने कोपर्यात ठेवलेल्या एका चौकोनी डब्यावर उडी मारली ... आणि इकडे रिचर्ड आणि इरिकच्यासमोर ठेवलेले सगळे मॉनिटर्स ब्लॅंक झाले.
ए काय झाल? इरीक खुर्चीवरुन उठून उभं राहात म्हणाला.
रिचर्डही त्याच्या खुर्चीतून उठून उभा राहाला होता.
इरिकचा गमती करण्याचा मुड पुर्णपणे लोप पावला होता. त्याच्या चेहर्यावर आता चिंता, काळजी आणि गोंधळ हे भाव पसरले होते.
चल लवकर .. काय गडबड झाली ते बघून येवू रिचर्ड लगबगीने खोलीतून बाहेर जात म्हणाला.
इरीकही त्याच्या मागे मागे जावू लागला.
एक बेडरुम. बेडरुममध्ये पुर्णपणे अंधार होता आणि बेडवर कुणीतरी झोपलेली फक्त पुसटशी आकृती दिसत होती. अचानक बेडच्या बाजुला ठेवलेला टेलिफोन सारखा वाजायला लाग़ला. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने झोपेतच आपला हात लांबवून टेलिफोन उचलला.
यस... डिटेक्टीव्ह सॅमचा आवाज आला.
पलिकडून इरीकचा आवाज आला, सर रोनॉल्डचाही तशाच प्रकारे खुन झाला आहे
काय? सॅम उठूनच बसला.
त्याने बेडच्या बाजुचं बटण दाबून बेडरुममधला लाईट लावला. त्याची झोप पार पळाली होती.
काय म्हणाला? सॅमला आपण काय ऐकतो त्यावर विश्वास बसत नव्हता.
सर रोनॉल्डचाही खुन झाला आहे तिकडून इरिक म्हणाला.
एवढे कॅमेरे लावून मॉनिटर लावून तुम्ही सारखी निगराणी करीत असतांना?.... तुम्ही तिथे निगराणी करीत होता की माशा मारीत होता? चिडून सॅम म्हणाला.
सर ते काय झालं... एका मांजरीनं ट्रान्समिटरवर उडी मारली आणि मॉनिटरवर काहीच दिसेनासं झालं ... तरी आम्ही रिपेअर करायला तिथे गेलो होतो.. आणि तिथे गेल्यानंतर बघतो तर तोपयर्ंत खुन झालेला होता. इरिक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होता.
रोनॉल्ड
जसा इरिकचा फोन आला, ताबडतोब तयारी करुन डिटेक्टीव सॅम रोनॉल्डच्या घराकडे निघाला.
इतकी फुलप्रुफ व्यवस्था करुनही रोनॉल्डचा खुन होतो म्हणजे काय?...
आधीच पोलिसांची प्रतिमा जनमानसात डागळत चाललेली ...
आणि यावेळी आपल्याला पुर्ण विश्वास होता की खुनी आता या कॅमेराच्या तडाख्यातून सुटणं शक्य नव्हतं...
मग कुठे माशी शिंकली?...
कुणास ठाऊक?...
गाडी भरधाव चालविता चालविता सॅमचे विचारही भरधाव वेगाने धावत होते.
डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये प्रवेश केला. बेडरुममध्ये रोनॉल्डची डेड बॉडी अस्तव्यस्त अवस्थेत बेडवर पडलेली होती. सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं दिसत होतं. सॅमने बॉडीची प्राथमीक पाहणी केली आणि मग खोलीत इकडे तिकडे बघितले. इरिक आणि रिचर्ड तिथे होतेच. अजुनही पोलिसांची इन्हेस्टीगेशन टीम तिथे येवून पोहोचली होती. इन्व्हेस्टीगेशन टीम आपल्या कामात मग्न होती.
मिळतं का काही? सॅमने त्यांना प्रश्न विचारला.
नाही सर .. अजून तरी काही नाही सॅमचा पार्टनर त्या टीमच्या वतीने बोलला.
सॅमने बेडरुममध्ये हळू हळू चालत आणि सर्व व्यवस्थीत काळजीपुर्वक न्याहाळत एक चक्कर मारली. चक्कर मारणं झाल्यावर सॅम पुन्हा बेडजवळ येवून उभा राहाला आणि त्याने बेडखाली वाकुन बघितलं.
बेडखालून दोन चमकणारे डोळे आपल्याकडे रोखुन पाहतांना सॅमला दिसले. एक क्षण का होईना सॅम दचकुन थोडा मागे सरला. ते चमकणारे डोळे मग हळू हळू त्याच्या दिशेने येवू लागले. आणि अचानक हल्ला करावा तसे ते डोळे त्याच्यावर झेपावले. तो चटकन बाजुला झाला. त्याला एक गळ्यात पट्टा बांधलेली काळी मांजर कॉटखालून बाहेर येवून दरवाजातून बेडरुमच्या बाहेर पळतांना दिसली. दरवाजातून बाहेर जाताच ती मांजर एकदम थांबली आणि तिने वळून मागे पाहाले. सगळ्या खोलीत एक अनाहूत शांतता पसरली होती. त्या मांजरीने एक दोन क्षण सॅमकडे बघितले आणि पुन्हा वळून ती तिथून पळून गेली. दोन तिन क्षण काहीही न बोलता निघून गेले.
हीच ती मांजर... सर रिचर्डने खोलीत पसरलेल्या शांततेचा भंग केला.
ट्रान्समिशन बॉक्स कुठ आहे? मांजरीवरुन सॅमला ट्रान्समीशन बॉक्सबद्दल आठवले.
सर इथे इरीकने एका जागी कोपर्यात निर्देश करीत म्हटले.
तो बॉक्स खाली जमिनीवर पडलेला होता. सॅम जवळ गेला आणि त्याने तो बॉक्स उचलला. तो तुटलेला होता. सॅमने तो बॉक्स उलट सुलट करुन न्याहाळला आणि परत जिथून उचलला होता तिथे ठेवून दिला. तेवढ्यात बेडरुमच्या दरवाजाकडे सॅमचं अनायसेच लक्ष गेलं. तो तिथे गेला. नेहमीप्रमाणे दार तोडलेलं होतं. पण यावेळी आतल्या कडीला चेन लावून कुलूप घातलेलं होतं.
जेफ .. जरा इकडे ये सॅमने जेफला बोलावले.
जेफ त्याच्याजवळ गेला.
हे इकडे बघं ... आणि आता सांग तुझी थेअरी काय म्हणते ते... खुन केल्यानंतर दरवाजा बंद करुन आतुन चेन लावून त्याला कुलूप कसे घातले असेल? सॅमने त्या कडीला लावलेल्या चेन आणि कुलपाकडे निर्देश करुन म्हटले.
जेफने त्या चेन आणि कुलूप घातलेल्या कडीकडे लक्ष देवून बघत म्हटले, सर.. आता तर माझी पक्की खात्री होत चालली आहे ..
कशाची?
की खुनी हा कुणी माणूस नसून काहीतरी अमाणूश शक्ती असली पाहिजे जेफ वेड्यासारखा अधांतरी कुठेतरी शुन्यात पाहत म्हणाला.
सगळेजण गुढतेने एकमेकांकडे बघायला लागले.
स्पेशल मिशन
सॅम पोलिस स्टेशनमध्ये एक एका मुद्यावर विचार करीत होता आणि त्याच्या पार्टनर सोबत मधे मधे चर्चा करीत होता.
एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? सॅमने शुन्यात पाहत त्याच्या पार्टनरला विचारले.
कोणती? त्याच्या पार्टनरने विचारले.
आत्ता पयर्ंत तिन खुन झाले...बरोबर
हो... तर
तिन्ही खुनाच्या आधी जॉर्जला हे माहित होते की पुढील खुन कुणाचा होणार आहे सॅम म्हणाला.
हो बरोबर आहे
आणि तिसर्या खुनाच्यावेळी तर जॉर्ज कस्टडीमध्ये बंद होता सॅम म्हणाला.
हो बरोबर आहे पार्टनर म्हणाला.
याचा अर्थ काय? सॅमने जसा स्वतरूलाच प्रश्न केला.
याचा एकच अर्थ होवू शकतो की त्याची काळी जादू जेलमधूनसुध्दा काम करु शकते पार्टनर जणू त्याला उत्तर सापडले अशा आनंदाने म्हणाला.
मुर्खासारखा काही बरळू नको... सॅम त्याच्यावर खेकसला.
तर्कसंगत बुध्दीला पटेल असं बोल... सॅम स्वतरूचा राग काबूत करण्याचा प्रयत्न करीत त्याला पुढे म्हणाला. .
बिचार्या सॅमच्या पार्टनरचा आंनदलेला चेहरा पुन्हा हिरमुसला होता.
बराच वेळ शांततेत गेला.
सॅम पुढे म्हणाला, हे बघ आपण जॉर्जच्या घरी गेलो होतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवली...
कोणती?
की जॉर्जच्या घराला एवढ्या खिडक्या आहेत की त्याच्या शेजारी कुणीही राहात असेल तर त्याला त्याच्या घरात काय चालू आहे हे दिसू आणि ऐकू येवू शकते.. सॅम म्हणाला.
हो बरोबर... त्याचा पार्टनर काही न समजून म्हणाला.
अचानक एक विचार सॅमच्या डोक्यात चमकला. तो एकदम उठून उभा राहाला. त्याच्या चेहर्यावर कोडं सुटल्याचा आनंद जणू ओसंडून वाहायला लागला.
त्याचा पार्टनरही काही न समजून त्याच्या सोबत उभा राहाला.
चल लवकर... सॅम घाई घाई दरवाजाकडे जात म्हणाला.
त्याचा पार्टनर गोंधळून नुसता त्याच्या मागे चालायला लागला.
एकदम ब्रेक लागल्यागत सॅम दरवाजात थांबला.
बरं तु एक काम कर ... आपल्या टीमला स्पेशल मिशनसाठी तयार रहाण्यासाठी सांग सॅमने त्याच्या पार्टनरला आदेश दिला.
त्याचा पार्टनर अगदी गोंधकळून गेला होता. आपल्या बॉसला अचानक काय झाले त्याला काही उमगत नव्हते.
स्पेशल मिशन...
म्हणजे खुनी सापडला की काय?...
पण त्यांनी जी आता चर्चा केली होती त्याचा आणि खुनी सापडण्याचा काहीएक संबंध दिसत नव्हता..
मग स्पशल मिशन कशासाठी...
सॅमचा पार्टनर विचार करु लागला. तो सॅमला काही विचारणार एवढ्यात सॅम दरवाजाच्या बाहेर जाता जाता पुन्हा थांबला आणि मागे वळून म्हणाला,
चल लवकर घाई कर...
त्याचा पार्टनर ताबडतोब हालचाली करायला लागला.
जाऊदे आपल्याला काय करायचे...
स्पेशल मिशन तर स्पेशल मिशन..
सॅमच्या पार्टनरने प्रथम टेबलवरचा फोन उचलला आणि एक नंबर डायल करायला लागला.
भाडेकरु
पोलिसांची गाडी ट्रफिकमधून रस्ता काढीत सायरन वाजवित वेगात चालली होती. आणि त्या गाडीच्या मागे अजुन चारपाच गाड्यांचा ताफा चालला होता. सायरनच्या आवाजामुळे ट्रफिक आपोआपच विचलित होवून त्या गाड्यांना रस्ता देत होती. त्या आवाजामुळे आणि एवढामोठा पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पाहून आजुबाजुच्या वातावरणात एक वेगळीच भितीयुक्त उत्सुकता पसरलेली होती. ट्रफिकमधून रस्ता काढीत आणि रस्त्याने वेडीवाकडी वळने घेत घेत शेवटी त्या गाड्या जॉर्जच्या घराच्या आसपास येवून थांबल्या. गाड्यांतून पोलिसांची फलटनच्या फलटन घाईघाईने पण एका शिस्तीत बाहेर पडली.
चला लवकर ... पुर्ण एरीयाला घेरुन टाका.... क्वीक... खुनी कोणत्याही परिस्थीतीत सटकता कामा नये.... सॅमने फलटनीला आदेश दिला.
पोलिसांची ती फलटन एक एक करीत बरोबर शिस्तीत विखरुन त्यांनी शेवटी पुर्ण एरीयाला घेरले. एवढ्या मोठ्या पोलिसांच्या समुदायाच्या बुटांच्या आवाजामुळे पुर्ण परिसरात वातावरण तंग झाले होते. शेजार पाजारचे लोक कुणी खिडकीतून तर कुणी पडद्याच्या मागून बाहेर काय चालले आहे ते कुतुहलयुक्त भितीने पाहात होते.
दोन तिन पोलिसांना घेवून सॅम एका घराजवळ गेला. ज्या माणसाने पुर्वी जॉर्जची सर्व हकिकत सांगितली होती तो तिथेच गोंधळलेल्या मनरूस्थीतीत उभा होता.
जरा सांगाबर कोणकोणत्या घरातून जॉर्जच्या घरातल्या सगळ्या हालचाली दिसतात आणि ऐकू येतात सॅमने त्या माणसाला विचारले.
त्या माणसाने सॅमला दोनतीन घरांकडे बोट दाखवून सांगितले.
ते दोन ... आणि माझं एक तिसरं
आम्हाला हा एरीया संपुर्णपणे सील करावा लागेल सॅम आपल्या टीमला त्या घरांकडे घेवून जात म्हणाला.
सॅमने त्या तिन घरांच्या व्यतिरीक्त अजून दोन—चार घरं आपल्या कार्यक्षेत्रात घेतली. एकानंतर एक असा तो प्रत्येक घराकडे आपल्या दोन—तिन लोकांना घेवून जात होता. घर बंद असेल तर घर ठोठावत होता. काही लोक घर उघडून जेव्हा बाहेर येत तेव्हा त्यांच्या चेहर्यावर आश्चर्य आणि भितीचे भाव असत. मध्येच सॅम आपल्या साथीदारांना वायरलेसवर दक्ष राहण्याचा इशारा देत होता. अशी एकेका घराची छानबिन करीत ते शेवटी एका घरा जवळ येवून पोहोचले. दरवाजा ठोठावला. बराच वेळ झाला तरी आतून काहीच प्रतिक्रिया दिसत नव्हती. सॅमच्या सोबतचे सगळेजण दक्ष झाले. आपापली पिस्तुल घेवून तयार झाले. पुन्हा त्याने दार ठोठावले, यावेळी जरा जोरानेच. तरीही काही प्रतिक्रिया नव्हती.
आतामात्र सॅमने आदेश दिला,
दार तोडा
जेफ जो अशा कामात पटाईत होता, नेहमीच दार तोडण्याच्या कामात अग्रेसर राहात असे, त्याने आणि अजून दोघं तिघं मिळून धक्के देवून देवून दार तोडलं. दार तूटल्याबरोबर खबरदारी म्हणुन प्रथम सगळेजण मागे परत आले आणि मग हळू हळू सतर्कतेने ते घरात घुसले.
घरात कुणी असण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. किचन, हॉल रिकामेच होते. हळू हळू आता ते बेडरुमकडे वळले. बेडरुमचं दार सताड उघडं होतं. त्यांनी आत डोकावून बघितलं. आत कुणीच नव्हतं, फक्त एक टेबल बेडरुममध्ये एका कोपर्यात ठेवलेला होता.
जसे सॅम आणि त्याच्यासोबत एक दोन पोलीस बेडरुममध्ये गेले सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि सगळ्यांची तोंडं उघडी ती उघडीच राहाली. त्या टेबलवर मांसाचे तूकडे आणि रक्त पसरलेलं होतं.
सगळेजण एकमेकांकडे एका भितीदायक आश्चर्याने पाहू लागले. सगळ्यांच्या मनात हजारो प्रश्न एकाच वेळी डोकावून गेले. पण कुणाची एकमेकालासुध्दा विचारण्याची हिंम्मत होत नव्हती. सॅमने बेडरुमच्या खिडकीकडे पाहाले. ती खिडकी सताड उघडी होती.
इथे कोण राहातं?... ते माहीत करा सॅमने आदेश दिला.
पोलिसांपैकी एकजण बाहेर गेला. आणि थोड्या वेळात माहिती घेवून परत आला.
सर मी या घराच्या मालकाशी आत्ताच संपर्क केला होता... तो आता थोड्या वेळातच इथे पोहोचेल... पण लोकांच्या म्हणण्यानुसार त्याने कुण्या एका इवेन फोस्टरला हे घर भाड्यानं दिलं आहे म्हणे... बाहेरुन माहीती काढून आलेला अॉफिसर म्हणाला.
तो आल्याबरोबर त्याची प्रथम माझ्याशी गाठ घालून द्या... फोरेन्सीकच्या लोकांना बोलवा..आणि या अपार्टमेंटमध्ये जोपयर्ंत सर्व पुरावे गोळा केल्या जात नाहीत तोपयर्ंत अजून कुणीही येणार नाही याची काळजी घ्या.. सॅमने निर्देश दिले.
थोड्या वेळात बाहेर लोकांच्या जमलेल्या गर्दीत घरमालक आला आणि श् घरमालक आला ... घरमालक आलाश् अशी कुजबुज सुरु झाली.
कोण आहे घरमालक? सॅमने त्या गर्दीकडे जात विचारले.
एक वयस्कर माणूस समोर येत दबक्या आवाजात भितभितच म्हणाला, मी आहे
तर तुमच्याजवळ तुमच्या या गुणी भाडेकरुचा पत्ता वैगेरे सगळी माहिती उपलब्ध असेलच सॅमने त्याला विचारले.
हो आहे... घरमालक एक कागद सॅमकडे देत म्हणाला.
सॅमने तो कागद घेतला. त्यावर इवेन फोस्टरची पत्ता, फोन वैगेरे सगळी माहिती घरमालकाने लिहून दिली होती
पण हे सगळं पाहून ती माहिती खोटी असावी असं वाटतं घरमालक भितभीतच सॅमला म्हणाला.
म्हणजे... तुम्ही त्याची सगळी माहिती पडताळून पाहिली नव्हती? सॅमने विचारले.
नाही .. म्हणजे ... ते मी एवढ्यात करणारच होतो पुन्हा घरमालक भितभित म्हणाला.
जॉन कार्टर
डिटेक्टीव्ह सॅमने आपल्या वाजणार्या मोबाईलचा डिस्प्ले बघितला. फोन त्याच्याच पार्टनरचा होता. एक बटन दाबून त्याने तो अटेंड केला,
यस
सर आम्हाला नॅन्सीचा मित्र जॉन कार्टरचा पत्ता लागला आहे तिकडून त्याच्या पार्टनरचा आवाज आला.
गुड व्हेरी गुड सॅम उत्साहाने म्हणाला.
सॅमच्या पार्टनरने त्याला एक पत्ता दिला आणि ताबडतोब तिकडे निघून येण्यास सांगितले.
.... जॉन कार्टर बेडवर पडलेला होता आणि जोर जोरात खोकत होता. त्याची दाढी वाढलेली आणि डोक्याच्या वाढलेल्या जटा विस्कटलेल्या होत्या. कितीतरी दिवसांपासून तो असाच बेडला खिळून पडला असावा. त्याचं घरातून बाहेर जाणं येणंही बंद झालं होतं.
जेव्हा त्याच्या प्रिय नॅन्सीचा बलात्कार आणि खुन झाला होता तेव्हा तो इतका हतबल झाला होता की त्याला पुढे काय करावं काही कळत नव्हतं. त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती पण कशी ते काही कळत नव्हतं. अशा दुरूखी आणि हतबल अवस्थेत तो शहारात रात्री अंधार्या रस्त्यावर नुसता वेड्यासारखा फिरत असायचा. तर कधी संध्याकाळी बिचवर जावून मावळत्या सुर्याकडे नुसता बघत राहायचा. त्याला त्याची स्वतरूची अवस्थाही काहीशी त्या मावळत्या सुर्यासारखीच भासत असावी. दिवस रात्र वेड्यासारखं इकडे तिकडे फिरायचं आणि थकल्यानंतर बारमध्ये दारु पित बसायचं अशी त्याची दिनचर्या असायची. पण ते असं किती दिवस चालणार होतं. पुढे पुढे त्यांचं फिरणं कमी होवून पिणं वाढलं. एवढ वाढलं की आता त्याची तब्येत खराब होवून तो बेडला खिळून खितपत पडला होता. बेडवर खिळून पडलेल्या परिस्थीतीतही त्याचं दारुं घेणं सुरुच होतं. थोडीही दारुची नशा उतरली की त्याला ते भयानक बलात्काराचं आणि खुनाचं दृष्य आठवायचं आणि मग तो पुन्हा प्यायला लागायचा.
अचानक त्याला पुन्हा खोकल्याची उबळ आली. तो उठण्याचा प्रयत्न करु लागला. पण तो एवढा क्षीण आणि अशक्त झाला होता की त्याला उठताही येत नव्हतं. कसातरी आधार घेत तो बेडवरुन उठून उभा राहाला पण त्याचा तोल जावून तो जमिनीवर पडला. त्याचं खोकनं सारखं सुरुच होतं. खोकलता खोकलता अचानक त्याला एक मोठी उबळ आली आणि त्याच्या तोंडातून रक्त यायला लागलं. त्याने तोंडाला लागलेलं रक्त हाताला लावून बघितलं. रक्त दिसताच तो घाबरला.
उठून डॉक्टराकडे जायला हवं...
पण त्याला उठताही येईना.
ओरडून लोकांना जमा करायला हवं...
पण त्याच्यात तेवढी ओरडण्याचीसुध्दा शक्ती शिल्लक राहाली नव्हती.
काय करावं?...
शेवटी त्याने एक निर्णय मनाशी पक्का केला आणि तो त्याच्या हाताला लागलेल्या रक्ताने फरशीवर काहीतरी लिहायला लागला....
एक माणूस फोनवर बोलत होता, हॅलो पुलिस स्टेशन?
तिकडून प्रतिक्रिया येण्यासाठी तो मधे थांबला.
साहेब ... आमच्या शेजारी कुणीतरी एक अज्ञात ईसम राहातो ... म्हणजे राहत होता .. त्याला आम्ही जवळपास सात—आठ दिवसांपासून बघितलं नाही... त्याचा दरवाजाही आतून बंद आहे... आम्ही त्याचा दरवाजा ठोठावूनसुध्दा बघितला पण आतून काहीच प्रतिक्रिया येत नाही... त्याच्या घरातून सारखा सडल्यासारखा खराब वास येतोय... मला वाटते तूमच्यापैकी कुणीतरी येवून बघितलं तर बरं होईल...
पुन्हा तो तिकडच्या प्रतिसादासाठी थांबला आणि थॅंक यू ... म्हणून त्याने फोन खाली ठेवून दिला.
पोलिसांची एक तुकडी डिटेक्टीव्ह टेम्पलटनच्या नेतृत्वात त्या माणसाने फोनवर दिलेल्या माहितीप्रमाणे तिथ पोहोचली. तो माणूस त्यांची वाटच पाहत होता. ते तिथे पोहोचताच त्या माणसाने त्यांना एका प्लॅटच्या बंद दारासमोर नेले. तिथे पोहोचताच एका सडलेल्या वासाचा दर्प त्यांच्या नाकात शिरला. त्यांनी पटापट रुमाल काढून आपापल्या नाकाला लावला. त्यांनी त्या वासाचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर तो सडल्यासारखा घाण वास त्या घरातूनच येत होता. त्यांनी दार ढकलून बघितलं. दार उघडत नव्हतं. कदाचीत दाराला आतून कडी घातलेली असावी. त्यांनी दार वाजविलं. आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती. ज्याने फोनवर पुलिसांना वर्दी दिली होती तो माणूस पुन्हा पुन्हा तीच हकीकत पुलिसांना सांगत होता. शेवटी पुलिसांनी दार तोडलं. दार तोडल्यानंतर तर तो सडलेला वास अजूनच जास्त येवू लागला. तोंडावर आणि नाकावर घट्ट रुमाल पकडून ते हळू हळू आत जावू लागले.
पोलिसांची तुकडी जेव्हा बेडरुममध्ये पोहोचली तेव्हा त्यांना सडण्याची क्रिया सुरु झालेला जॉन कार्टरचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. नाक घट्ट पकडून ते त्या मृतदेहाजवळ गेले. तिथे जमिनीवर मरण्याच्या अगोदर त्याने रक्ताने काहीतरी लिहिले दिसत होते. त्यातल्या एका पुलिसाने ते जवळ जावून वाचले,
नॅन्सी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी करु नको त्या एकएकांचा बदला घेतल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही ...
एक नवे वळण
सॅम आणि त्याचा पार्टनर ज्या पोलीस अधिकार्याने जॉन कार्टरच्या मरणाची केस हाताळली होती त्या पोलीस अधिकार्यासमोर, डिटेक्टीव टेम्पलटन समोर बसले होते.
डिटेक्टीव टेम्पलटनने जॉन कार्टरबद्दल माहिती पुरविली, मद्याच्या अतिसेवनामुळे त्याला ब्रॉंकायटीस होवून तो मेला..
पण तुम्हाला त्याची ओळख कशी पटली? सॅमने विचारले.
ज्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला त्या खोलीत काही त्याचे कागदपत्र सुध्दा आढळले ... त्यावरुन आम्हाला त्याची ओळख पटली... आणि त्याचा एक फोटो मि. बेकरने जसा सगळ्या पोलिस ठाण्यांवर पाठविला होता तसा आमच्याकडेही पाठवला होता...
मि. टेम्पलटनने आपल्या ड्रावरमधून जॉनचा फोटो काढून सॅमसमोर ठेवला.
या फोटोमुळे आणि डिटेक्टीव बेकरने पाठविलेल्या माहितीमुळे आम्हाला त्याचा पत्ता आणि घर वैगेरे सापडण्यास मदत झाली टेम्पलटन म्हणाला.
तुम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क केला होता का? सॅमने विचारले.
हो... त्याच्या घरच्यांनाही इथे बोलावले होते... त्यांनीही बॉडी ताब्यात घेण्याच्या आधी जॉनची ओळख पक्की केली होती आणि पोस्टमार्टमध्येही त्याची ओळख जॉन कार्टर अशीच निश्चीत केली आहे टेम्पलटन म्हणाला.
तो कधी मेला असावा... म्हणजे शव सापडला तेव्हापासून किती दिवस आधी सॅमने विचारले.
पोस्टमार्टमनुसार मार्च महिण्याच्या सुरवातीच्या दोन तिन दिवसात त्याचा मृत्यू झाला असावा तो अधिकारी म्हणाला.
अर्ली मार्च... म्हणजे पहिला खून होण्याच्या कितीतरी आधी... सॅम विचार करीत म्हणाला.
याचा अर्थ आम्ही समजत होतो त्याप्रमाणे तो खुनी नाही आहे ... सॅम पुढे म्हणाला.
हो असं वाटतं तर टेम्पलटन म्हणाला.
बराच वेळ शांततेत निघून गेला.
म्हणजे मला जी शंका होती ती खरी ठरते तर...
सॅमला नॅन्सीचा मित्र जॉन कार्टरचा पत्ता लागल्याची बातमी त्याच्या पार्टनरकडून फोनवर कळताच तो एकदम हूरळून गेला होता....
त्याला वाटले होते चला एकदाची केस सुटली आणि खुनी आता थोड्याच वेळात त्यांच्या तावडीत येणार आहे.
पण इथे येवून पाहतो तर केसला अजुन एक वेगळंच वळण लागलं होतं....
जॉन कार्टरच्या मरणाची वेळ पाहता त्याचा खुनाशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नव्हती...
जॉन कार्टर जर खुनी नाही ... तर मग खुनी कोण असावा? सॅमने जसा स्वतरूलाच प्रश्न विचारला.
खोलीतले तिघेही जण नुसते एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्या तिघांजवळही नव्हतं.
तेवढ्यात टेम्पलटनने त्याच्या ड्रावरच्या खनातून अजून एक फोटो काढून सॅमसमोर ठेवला.
सॅमने तो फोटो उचलला आणि तो त्या फोटोकडे निरखून पाहू लागला. त्या फोटोत जॉन कार्टर जमिनीवर पडलेला दिसत होता आणि त्याच्या शेजारीच फरशीवर मोठ्या लाल अक्षरात लिहिलेले दिसत होते,
नॅन्सी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी करु नको मी त्या एकएकांचा बदला घेईन...
मी ऐकून ऐकून थकलो की या खुनात कुणी माणसाचा हात नसून काहीतरी अमानवी शक्तीचा हात आहे... हा फोटो दाखवून तुलाही तर असेच सुचवायचे नाही ना? सॅमने टेम्पलटनला विचारले.
डिटेक्टीव टेम्पलटनने आलटून पालटून सॅमच्या आणि सॅमच्या पार्टनरच्या चेहर्यांकडे पाहाले.
नाही मला काहीएक सुचवायचे नाही फक्त घडणार्या घटना आणि जॉनने फरशीवर लिहिलेला मेसेज कसे अगदी तंतोतंत जुळतात हे मला तुमच्या निदर्शनात आणून द्यायचे आहे डिटेक्टीव टेम्पलटन शब्दांची व्यवस्थित आणि काळजीपूर्वक निवड करीत म्हणाला.
आता तुमची बारी
तुरुंगात सगळीकडे अंधार पसरलेला होता. जॉर्ज त्याला कोंडलेल्या कोठडीत एका कोपर्यात विचारात गढून गेलेल्या स्थितीत बसला होता. अचानक तो उठून उभा राहाला आणि स्वतरूच्या अंगावरचे कपडे फाडायला लागला. कपडे फाडून त्याने मग कोठडीत इकडे तिकडे पडलेल्या फाटलेल्या कापडाच्या चिंध्या जमा केल्या. त्या चिंध्याचं त्याने पुन्हा एक बाहुलं तयार केलं. बाहुलं तयार झाल्यानंतर त्याच्या चेहर्यावर एक रहस्यमय , भितीदायक हास्य पसरलं.
मि. ख्रिस्तोफर एन्डरसन... आता तुमची बारी आहे...बरं का तो वेड्यासारखा बरळायला लागला.
तिथे ड्यूटीवर असलेला पोलीस बर्याच वेळापासून जॉर्जच्या हालचाली टीपत होता. त्याने जसे जॉर्जचे बरळने ऐकले तो घाईघाईने उठून फोनजवळ गेला — त्याच्या वरिष्ठ अधिकार्याला सुचना देण्यासाठी.
ख्रिस्तोफर त्याच्या घरी हॉलमध्ये पित बसला होता. सोबतच चिंतातूर अवस्थेत तो सिगारेटवर सिगारेट, एक संपलीकी दुसरी लागलीच पेटवून पित होता. थोड्या वेळाने तो उठून उभा राहाला आणि विचार करीत खोलीत हळू हळू येरझारा घालू लागला. त्याच्या हालचालींवरुन तो बराच थकलेला जाणवत होता. किंवा दारुच्या चढलेल्या नशेमुळे तसे जाणवत असावे. थोडावेळ येरझारा घालून मग पुन्हा तो खुर्चीवर बसला आणि आपल्या विचारांच्या तंद्रीत बुडून गेला. अचानक त्याला घरात किचनमध्ये कुणाची तरी उपस्थीती जाणवली. कुणीतरी किचनमध्ये भांडे हाताळीत असावा असा आवाज येत होता.
किचनमध्ये यावेळी कोण असावं?...
सगळी दारं खिडक्या तर बंद आहेत...
का हाही एक भास?...
अचानक एक मोठं भांड जमिनीवर पडल्याचा आवाज झाला. क्रिस्तोफर एकदम उठून उभाच राहाला.
काय झालं असावं.?
त्याला धडकी भरली होती.
उगाच घाबरतो आहे आपण ... मांजर वैगेरे असेल...
त्याने स्वतरूची समजूत घातली आणि हळू हळू चालत चाहूल घेत किचनकडे जावू लागला.
किचनमध्ये आता आवाज थांबला होता. काही चाहूलही येत नव्हती. तो किचनच्या दरवाजाजवळ गेला. हळूच किचनचा दरवाजा तिरका करुन त्याने आत डोकावून बघितले.
किचनमध्ये तर कुणीच दिसत नाही ....
तो किचनमधे शिरला. आत गेल्यानंतर इकडे तिकडे नजर फिरवून बघितले. चांगली किचनमध्ये एक संपूर्ण फेरी मारली.
कुठे काहीच तर नाही ...
का उगीच मला भास होताहेत...
पण जमिनीवर खाली एक भांडे पडलेले होते.
तो किचनमधून परतण्यासाठी वळला तसा त्याला हॉलमध्ये काहीतरी फुटण्याचा आवाज आला. ख्रिस्तोफर जवळ जवळ दचकलाच आणि धावतच हॉलमध्ये आला.
हॉलमध्ये त्याला त्याचा व्हिस्कीचा ग्लास खाली जमिनीवर पडून फुटलेला दिसला. व्हिस्की खाली सांडून सगळीकडे पसरलेली होती. त्याने आजुबाजुला बघितले. कुणीच नव्हते.
ख्रिस्तोफरची दारु पुर्णपणे उतरली होती.
सालं कुणीच तर नाही...
हे काय होत आहे मला? ...
ग्लास कसा काय पडला?...
तो विचार करीत पुन्हा खुर्चीवर बसला. आता त्याने पुर्ण बॉटलच तोंडाला लावली होती.
कोडं उलगडलं?
डिटेक्टीव्ह सॅम सकाळी सकाळी हॉलमध्ये बसून चहा पित टीव्ही बघत होता. एक एक घोट हळू हळू पित जणू तो चहाचा आनंद घेत होता. बघायला गेलं तर तो टीव्हीकडे बघत होता पण त्याच्या डोक्यात वेगळ्याच विचारांचं काहूर माजलेलं दिसत होतं. कदाचित तो त्या खुनाच्या केसबद्दलच विचार करीत असावा. जसे जसे त्याचे विचार धावत होते तसा तो रिमोटने पटापट टीव्हीवरचे चॅनल्स बदलत होता. शेवटी तो कार्टून चॅनल वर येवून थांबला. थोडावेळ कार्टून चॅनल पाहून त्याने कदाचित स्वतरूला सारखे टेन्शंन्स, सारखा दबाव यापासून दूर नेवून पुन्हा ताजे टवटवित केले असावे. पुन्हा त्याने चॅनल बदलला आणि आता तो डिस्कव्हरी चॅनल बघू लागला. कदाचित डिस्कव्हरी चॅनलवर सुरु असलेल्या प्रोग्रॅममध्ये त्याला इंटरेस्ट वाटत असावा. त्याने हातातले रिमोट बाजुला ठेवून दिले आणि तो प्रोग्रॅम तो लक्ष देवून पाहू लागला.
डिस्कव्हरी चॅनलवर सुरु असलेल्या प्रोग्रॅममध्ये एक उंदीर दाखविला होता. त्या उंदराच्या गळ्यात एक छोटा पट्टा दिसत होता आणि डोक्याला अगदी बारीक बारीक वायर्स लावलेले दिसत होते. त्यानंतर टीव्ही एन्कर बोलायला लागला —
जेव्हा एखादा जिवजंतू एखादी क्रिया करतो त्याला ती क्रिया करण्यासाठी त्याच्या मेंदूला एक सिग्नल गेलेला असतो. जर आपण अगदी तसाच सिग्नल त्याच्या मेंदूला बाहेरुन देण्यात यशस्वी झालो तर आपण त्या जिवजंतूला आपल्या कह्यात करुन, त्याला बाहेरुन सगळे सिग्नल्स देवून, त्याच्याकडून जे पाहिजे ती क्रिया करुन घेवू शकतो
मग टिव्हीवर एक कॉम्प्यूटर दिसू लागला. कॉम्पूटरच्या समोर एक शास्त्रज्ञ बसला होता.
डिटेक्टीव्ह सॅम टिव्हीवरचा प्रोग्रॅम अगदी तन्मयतेने पाहू लागला.
तो कॉम्पूटर समोर बसलेला शास्रज्ञ बोलू लागला —
या कॉम्प्यूटर द्वारे आपण वेगवेगळे सिग्नल या चिपवर, जी की या उंदराच्या गळ्यातल्या पट्यात बांधलेली आहे, त्यावर ट्रान्समिट करु शकतो. या चिपद्वारे हे सिग्नल उंदराच्या मेंदूपयर्ंत पोहोचतील. आणि मग जे जे सिग्नल आपण या कॉम्प्यूटरव्दारे देवू त्याप्रमाणे हा उंदीर वेगवेगळी कार्य करायला लागेल.
मग टिव्हीवर तो उंदीर अगदी जवळून दाखविण्यात आला. एक बारीक चिप त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्यात लावलेली होती.
डिटेक्टीव्ह टिव्हीवरचा प्रोग्रॅम पाहत होता. त्याच्या चेहर्यावर आश्चर्यमिश्रीत उत्सुकतेचे भाव दिसत होते.
टिव्हीवरचा शास्त्रज्ञ पुन्हा पुढे बोलू लागला —
अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आदेश या सिग्नल ट्रान्समिशनद्वारे त्या उंदराला देवू शकतो. आता सध्या आम्ही काही तुरळकच आदेश देण्यात पुर्णपणे यशस्वी झालो आहोत.
मग कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर सुरु असलेल्या सॉफ्टवरवर त्या शास्त्रज्ञाने माउसच्या सहाय्याने श्राईटश् हे बटन दाबले. आणि काय आश्चर्य तो उंदीर उजवीकडे वळून पळायला लागला.
कॉम्प्यूटरवर त्या शास्त्रज्ञाने श्स्टॉप श् हे बटण दाबले आणि तो उंदीर एकदम पळायचे थांबला.
मग त्याने श्लेफ्टश् हे बटन दाबले आणि तो उंदीर डावीकडे वळला आणि तिकडे पळायला लागला.
पुढे त्याने श्जम्पश् हे बटण दाबले आणि त्या उंदीराने पळता पळता उडी मारली.
पुन्हा त्याने श्स्टॉपश् बटण दाबले आणि तो उंदीर एका खाण्याच्या पदार्थासमोर पोहोचला होता त्या पदार्थासमोर थांबला.
शास्त्रज्ञाने श्ईटश् बटन दाबले आणि तो उंदीर त्याच्या पुढ्यातला तो पदार्थ खावू लागला.
पुन्हा त्याने श्स्टॉपश् बटन दाबले आणि त्या उंदराने खाण्याचे थांबविले.
आता शास्त्रज्ञाने श्अटॅकश् बटन दाबले आणि तो उंदीर त्याच्या समोर ठेवलेले खान्याचे जिन्नस न खाता तोडून तोडून त्याचे तुकडे करायला लागला.
हे सगळं पाहत असतांना अचानक सॅमच्या डोक्यात एक विचार चमकला.
त्याला एक एक प्रसंग आठवायला लागला...
...दोन पुलिस टीमचे मेंबर रिचर्ड आणि इरीक रोनॉल्डच्या घराची सर्कीट टिव्हीवर निगराणी करीत असतांना एका मांजराने सर्कीट टीव्हीच्या ट्रान्समिटर युनिटवर उडी मारली होती. आणि त्यामुळे रोनॉल्डच्या बेडरुममधल्या हालचाली टिव्हीवर दिसने बंद झाले होते. आणि जोपयर्ंत रिचर्ड आणि इरिक बेडरुममध्ये पोहोचत नाहीत तोवर खुन झालेला होता.
डिटेक्टीव्ह आपल्या विचारांच्या तंद्रीत टिव्हीसमोरुन उठला. त्याला पुढचा प्रसंग आठवला ...
... जेव्हा डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याची टीम इन्व्हेस्टीगेशनसाठी रोनॉल्डच्या बेडरुममध्ये गेले होते आणि तपास करतांना सॅमने बेडखाली वाकून पाहाले होते. तेव्हा त्याला बेडखाली दोन चमकारे डोळे दिसले होते.
जेव्हा ते डोळे हळू हळू त्याच्याकडे येवून नंतर झडप घातल्यासारखे त्याच्या अंगावर झेपावले होते. त्याने स्वतरूला बाजूला सारून स्वतरूचा बचाव केला होता. आणि नंतर बघितले तर ते एक काळं, गळ्यात बेल्ट बांधलेंलं मांजर होतं. जे दरवाजातून बाहेर पळालं होतं.
आता सॅमच्या डोक्यात एक एक कोडं अगदी स्पष्टपणे उलगडायला लागलं होतं.
आता आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाही ...
आपल्याला घाई केली पाहिजे...
विचार करीत डिटेक्टीव पुढच्या कारवाईसाठी घाईघाईने घराच्या बाहेर सुध्दा पडला होता.
सापळा
डिटेक्टीव्ह सॅम कॉन्फरंन्स रुममध्ये पोडीयमवर डेस्कच्या मागे उभा होता. त्याच्या समोर क्रिस्तोफर, दुसरे पोलिस अधिकारी आणि त्याचा पार्टनर बसलेला होता.
आता मला कल्पना आलेली आहे की खुनी सगळे खुन कसा करीत असावा.. डिटेक्टीव सॅमने एक पॉज घेतला आणि चहूवार आपली नजर फिरवीत तो बोलू लागला —
म्हणून मी एक प्लॅन बनविलेला आहे... ज्यानुसार आपल्याला खुन्याला तर पकडायचे आहेच सोबतच आपल्याला खुन्याचे पुढचे सावज, क्रिस्तोफरचे रक्षण करावयाचे आहे.... आता या प्लॅननुसार मला नाही वाटत की यावेळी खुनी आपल्या तावडीतून सुटून जावू शकेल... सॅम आत्मविश्वासाने बोलत होता.
मागच्या वेळीही तुम्ही अशीच शाश्वती दिली होती ... आणि तरीही खुनी रोनॉल्डला मारण्यात यशस्वी झाला क्रिस्तोफर कडवटपणे म्हणाला.
मि. क्रिस्तोफर अंडरसन मला वाटते तुम्ही आधी माझा प्लॅन ऐकून घ्यावा आणि मग त्यावर वाच्य करावे... सॅम क्रिस्तोफरला तसेच सडेतोड उत्तर देत म्हणाला.
सॅमने प्रोजेक्टर अॉन केला. समोर स्क्रिनवर एक आकृती अवतरली.
आत्तापयर्ंत खुनी खुन करण्यासाठी एका मांजरीचा वापर करीत असावा असं वाटतं... म्हणजे मला तशी खात्री आहे सॅम म्हणाला.
सॅमने पुन्हा हातातल्या रिमोटचे एक बटन दाबले. स्क्रिनवर एक मांजरीचं चित्र आणि एक माणूस कॉम्प्यूटर काम करीत आहे असं चित्र अवतरलं.
आधीच्या खुनात आढळलेल्या काही बाबींवरुन मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की आता खुन करण्याची ही एकच पध्दत अस्तित्वात असू शकते... त्यानुसार खुनी हा इथे कॉम्प्यूटरवर बसून मांजरीला सगळे आदेश देतो ... आणि ते सगळे आदेश वायरेलेस टेक्नॉलॉजी द्वारा या इथे मांजरीकडे पाठविले जातात.... हा इथे मांजरीच्या गळ्यात जो पट्टा आहे त्यात एक चिप, रिसीव्हर फिट केलेला आहे ... ते सगळे सिग्नल या रिसीव्हर द्वारा रिसीव्ह केले जातात ... नंतर ते सिग्नल्स या मांजरीच्या गळ्यातल्या पट्यातून मांजरीच्या मेंदूला पूरविले जातात ... आणि त्या सगळ्या सिग्नल्स द्वारा मिळालेल्या आदेशाचे पालन करुन ती मांजर आपल्या सावजावर हल्ला करते... आणि आत्तापयर्ंत झालेले सगळे खुन याच पद्धतीचा वापर करुन केले असावेत याची मला पक्की खात्री आहे...
सॅमने पुन्हा आपल्या हातातल्या रिमोटचे एक बटन दाबले. समोरचा स्क्रिन ब्लॅंक झाला.
ही झाली खुन करण्याची पध्दत आणि आता आपल्या प्लॅनबद्दल... सॅम एक दिर्घ श्वास घेवून थोडा वेळ थांबला. त्याने त्याच्या हातातला रिमोट बाजूला ठेवून दिला.
आपला प्लॅन मी दोन भागात विभागला आहे... समोरच्या लोकांच्या प्रतिक्रियेचं निरिक्षण करीत सॅम पुढे बोलायला लागला, आपल्या प्लॅनचा पहिला भाग म्हणजे त्या मांजरीला डिटेक्ट करुन तिला सिग्नल कुठून देण्यात येतात हे ट्रेस करणे होय... याप्रकारे आपल्याला खुन्याचा अतापता मिळेल... सॅम पुन्हा एक क्षण थांबून पुढे म्हणाला, आणि प्लॅनचा दूसरा भाग म्हणजे त्या मांजरीला मिळणारे सगळे सिग्नलस् रोखने की जेणेकरुन आपण क्रिस्तोफरचं संरक्षण करु शकू
सॅमने पुन्हा बाजुला ठेवलेला रिमोट उचलून त्याचे एक बटन दाबले. समोर स्क्रिनवर एका घराचा नकाशा अवतरला.
हा क्रिस्तोफरच्या घराचा नकाशा... यालाही आपल्याला दोन भागात विभागायचे आहे.... सॅमने नकाशातली दोन, एक लहान आणि एक मोठं अशी समकेंद्री वर्तूळं काढलेली होती ती रिमोटच्या लेजर बिमने निर्देशीत केली.
या आकृतीत दाखविल्याप्रमाणे हे जे पहिलं बाहेरचं वर्तूळ आहे तो आहे पहिला विभाग... आणि जे आतलं लहान वर्तूळ आहे तो आहे दुसरा भाग. सॅम आलटून पालटून दोन्ही वर्तूळांवर लेजर बिम टाकीत म्हणाला.
जेव्हा ती मांजर या बाहेरच्या भागात पोहोचेल, आपल्याला ती मांजर घरात आल्याचं कळेल कारण तिथे आपण सिग्नल ट्रकर्स आणि सिग्नल रिसीव्हर डीटेक्टर्स फिक्स केलेले आहेत.. सॅम आपल्या हातातल्या रिमोटचा लेजर बीम बंद करीत म्हणाला.
सिग्नल ट्रकर्स त्या येणार्या सिग्नल्सचा उगम शोधतील... आणि एकदा का आपल्याला त्या सिग्नल्सचा उगम माहित झाला की आपण त्या खुन्याला लोकेट करुन रेड हॅन्डेड पकडू शकतो... सॅमने लेजर बिम सुरु करुन बाहेरच्या वर्तूळाकडे निर्देश करीत म्हटले,
जेव्हा ती मांजर आतल्या वर्तुळात पोहोचेल, तिथे ठेवलेले सिग्नल ब्लाकर्स तिला खुन्याकडून मिळणारे सगळे सिग्नल्स आणि आदेश ब्लॉक करतील. म्हणजे नंतर त्याचे त्या मांजरीवर काहीही नियंत्रण राहणार नाही सॅम लेजर बिम आतल्या वर्तूळाकडे निर्देशीत करीत म्हणाला.
सॅमने आपली संपूर्ण योजना सगळ्यांना समजावून सांगितली आणि बोर्डरुममध्ये बसलेल्या सगळ्यांवर एक नजर फिरवली. समोर बसलेले सगळे अॉफिसर्स आणि पोलिस स्टाफ सॅमच्या या योजनेबद्दल समाधानी वाटत होते.
कुणाला काही शंका? सॅमने समोर बसलेल्यांना विषेशतरू क्रिस्तोफरकडे पाहून विचारले.
बघूया.. क्रिस्तोफर खांदे उडवित म्हणाला. तो या योजनेबद्दल तेवढा समाधानी भासत नव्हता.
खरं म्हणजे तो आतून एवढा हादरला होता की कोणतीही योजना समजुन घेण्याच्या मनस्थीतीत तो नव्हता. आणि ते वाजवीही होतं कारण त्याला स्पष्टपणे खुन्याच्या यादीत पुढचा नंबर त्याचा दिसत होता.
तर चला आता या योजनेनुसार आपआपल्या कामाला लागा... मी जेफकडे कुणाला काय काय करायचे आहे याची तपशीलवार यादी दिलेली आहे ... कुणाला काही शंका असेल तर मला विचारा
सॅम आपल्या टीमकडे पाहून म्हणाला.
सिग्नलचा उगम
क्रिस्तोफरच्या घराला लागून एक गेस्टरुम होती. त्या खोलीत दोन पोलीस रिचर्ड आणि इरिक त्यांच्या समोर ठेवलेल्या सर्किट टिव्हीवर क्रिस्तोफरच्या बेडरुममधील सर्व हालचाली टिपत होते.
शेवटी आपल्याला कुत्रे आणि मांजराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम भेटलंच इरिक उपाहासाने म्हणाला.
तिन दिवसांपासून हेच काम आपण करीत आहोत ... बास... आता बास झालं... हे असं एका जागी बसून तीच ती बेडरुम बघायची इरिक चिडून म्हणाला.
आणि एक लक्षात ठेव मी पुलिस फोर्स एखाद्या रेपीस्ट आणि खुन्याचं संरक्षण करण्यासाठी नाही जॉईन केली इरिक अजूनही बडबड करीतच होता.
थोडा वेळ इरिक शांत राहाला आणि पुन्हा त्याची बडबड सुरु झाली.
साहेबांची ही कुर्त्यामांजराची थेअरी तर बरोबर वाटते... पण एक गोष्ट कळत नाही? इरिक म्हणाला.
इरिकने रिचर्डकडे तो कोणती? असं विचारेल या आशेने पाहाले. पण तो आपल्या कामात मग्न होता. तो काहीच बोलला नाही.
कोणती गोष्ट? विचार तर इरिकने रिचर्डच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवित विचारले.
त्याने त्याच्याकडे नुसता एक दृष्टीक्षेप टाकला आणि पुन्हा तो आपल्या कामात मग्न झाला.
की खुनी कोण असावा?... जॉन म्हणावं तर तो तर मेला... जॉर्ज म्हणावं तर तो जेलमध्ये बंद आहे... मग खुनी कोण असावा? इरिकची नुसती बडबड सुरु होती.
रिचर्ड काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता नुसती त्याची बडबड ऐकत होता. रिचर्ड त्याच्या बोलण्यावर काहीच बोलत नाही आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही असे पाहून इरिक अजूनच चिडला
कारे तु घरी पण असाच गुमसूम असतो का? तो रिचर्डला म्हणाला.
रिचर्डने नुसते त्याच्याकडे बघितले.
तू जर घरी असाच असतोस ... तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुला पोरं होतातच कशी इरिक आता त्याला चिडविण्याच्या आणि डीवचण्याच्या सुरात म्हणाला. इरिकला वाटत होते की तो अशाने तरी बोलेल. आणि त्याचा अंदाज खरा ठरला.
रिचर्डने त्याच्याकडे वळून प्रतिप्रश्न केला, पोरं होण्यासाठी काय बोलण्याची गरज असते?
हो बरोबर आहे तुझं ... तुझे शेजारी काही न बोलता आपलं काम आटोपून घेत असतील... नाही? इरिक अजुनच त्याला डीवचण्याच्या उद्देशाने त्याची गंमत करीत म्हणाला.
रिचर्डने वायरलेस फोन उचलून रागाने त्याच्यावर उगारला. इरिक उठला आणि मोठ्याने हसत इकडे तिकडे पळायला लागला.
अचानक कन्ट्रोल बोर्डवर श्बीपश् वाजली.
ए बघ बरं...काहीतरी होते आहे रिचर्ड म्हणाला.
एका मॉनिटरवर काहीतरी हालचाल दिसली. एक काळी मांजर चालतांना दिसली.
पुन्हा मांजर इरिक म्हणाला.
बघ तिच्या गळ्यात पट्टा सुद्धा आहे रिचर्ड म्हणाला.
म्हणजे .. आपले साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्या पट्ट्यात रिसीव्हर आहे वाटतं... ईरिक म्हणाला.
आणि तो रिसीव्हर डिटेक्ट झाला आहे बहूतेक ... त्याचीच तर बीप वाजली आहे... रिचर्ड म्हणाला.
इरिकने वायरलेस उचलला आणि तो वायरलेसवर बोलू लागला.
सर ... गळ्यात पट्टा असलेली मांजर घरात आली आहे इरिकने त्याच्या बॉसला, सॅमला कळविले.
गुड .... आता ते सिग्नल्स कुठून येत आहेत ते ट्रेस करण्याचा प्रयत्न करा सॅमने तिकडून बजावले.
तेवढ्यात त्यांनी घरात सिग्नल ट्रेसरची जी यंत्रणा बसवली होती तीनेही कॉम्प्यूटरवर सिग्नल ट्रेस झाल्याचे दर्शविले.
सर सिग्नलचा उगमही ट्रेस झाला आहे ईरिकने कॉम्प्यूटरकडे पाहत ताबडतोब सॅमला कळविले.
ग्रेट जॉब... मी निघालोच आहे... एक पाच मिनिटात पोहोचतो सॅम तिकडून म्हणाला आणि तिकडून फोन कट झाला.
अॉपरेशन पार्ट 2
रिचर्ड, इरिक आणि डिटेक्टीव्ह सॅम समोर ठेवलेल्या सर्कीट टिव्हीवर बघत होते. त्या टिव्हीवर मांजरीच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या.
रिचर्ड काही दाखविण्याच्या आधीच इरिकने मधे घुसून कॉम्प्यूटरचा ताबा घेतला. रिचर्डला त्याच्या या वागण्याचा राग आला होता. पण काय करणार. चेहर्यावर काहीही भाव न येवू देता तो नुसता त्याच्याकडे पाहत राहाला.
कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवर आता शहराचा नकाशा दिसू लागला. त्या नकाशात एका जागी एक लाल ठिपका सारखा चमकतांना दिसत होता.
इरिक त्या ठिपक्याकडे निर्देश करीत म्हणाला, त्या मांजरीला सगळे सिंग्नल्स आणि निर्देश हे इथून येत आहेत ष्ष्
जिथून सिग्नल येत आहेत ती जागा इथून किती दूर असेल. सॅमने विचारले.
इरिकने कॉम्प्यूटरवर इकडे तिकडे क्लिक करुन उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तोपयर्ंत रिचर्डजवळ उत्तर तयार होते.
तो म्हणाला, सर, ती जागा आपल्या जागेपासून पुर्वेकडे साधारणतरू पाच किलोमिटर असेल
हो एखादा मिटर इकडे किंवा एखादा मिटर तिकडे मधेच इरिकने चोमड्यासारखे वाक्य जोडले.
रिचर्डने पुन्हा इरिककडे पाहाले. त्याला त्याच्या चोमडेपणाचा आणि पुढे पुढे करण्याचा अजुनच राग येत होता.
डिटेक्टीव्ह सॅम क्रिस्तोफरच्या घराच्या समोर उभा राहून वायरलेसवर आपल्या संपूर्ण टीमला आदेश आणि निर्देश देत होता,
मला वाटते सगळ्यांना आपापल्या पोजीशन्स समजलेल्या आहेत. आपल्याजवळ आता फक्त हाच एक मौका आहे. आता कोणत्याही परीस्थितीत खुनी आपल्या तावडीतून सुटता कामा नये... तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या जागेवर तैनात केले आहे ते त्या जागा सोडू नका. आणि उगीच आतबाहेर करण्याची गरज नाही. म्हणूनच आतली आणि बाहेरची जबाबदारी वेगवेगळी वाटून दिली आहे... आणि बाकीचे उरलेले ताबडतोब इथे घराच्या समोर जिपजवळ येवून जमा व्हा...
साधारणतरू पंधरा विस टीम मेंबर्स जिपजवळ जमले. गाड्यांमधून निघण्याच्या आधी सॅमने त्यांना थोडक्यात ब्रिफ केले.
जिथून खुनी अॉपरेट करीत आहे ती जागा आपल्याला मिळाली आहे.. म्हणून मी आपल्या टीमला दोन भागात विभागले आहे... सात जण आधीच आपण इथे क्रिस्तोफरचं रक्षण करण्यास तैनात केले आहेत... आणि उरलेले अठरा.. म्हणजे तुम्ही आणि मी .. आपल्याला पुर्ण अॉपरेशनचा दुसरा भाग म्हणजे खुन्याला पकडण्याचे काम करायचे आहे.
सॅम आता घाई घाई आपल्या गाडीकडे जायला लागला. गाडीकडे जाता जाता त्याने सगळ्यांना आदेश दिला, आता चला लवकरात लवकर आपापल्या गाडीत बसा ... आपण पोहोचेपयर्ंत तो खुनी तिथून सटकता कामा नये.
सगळेजण भराभर आपापल्या गाडीत बसले. आणि सगळ्या गाड्या धुळ उडवित वेगात निघाल्या — खुनी ज्या जागेवरुन अॉपरेट करीत होता तिकडे. सगळ्या गाड्या जेव्हा निघून गेल्या तेव्हा कुठे उडालेल्या धुळीचा ढग हळू हळू खाली बसला.
सिग्नल ब्लॉकर
क्रिस्तोफरच्या घराच्या शेजारच्या कॅबिनमध्ये इरिक अजुनही कॉम्प्यूटरसमोर बसला होता. तो कॉम्प्यूटरच्या किबोर्डची बटनं दाबून काहीतरी करीत होता.
रिचर्ड त्याच्याकडे पाहत म्हणाला, आश्चर्याची गोष्ट आहे!
कोणती ? इरिकने विचारले.
की ... साहेब गेले तरी तु कॉम्प्यूटरवर सिरीयसली काम करतो आहेस रिचर्ड उपरोधाने म्हणाला.
अरे नाही ... मी हे सगळं बंद कसं पाडता येईल ते बघतो आहे... की जेणेकरुन इथून माझी सुटका तरी होईल इरिक म्हणाला.
रिचर्डने कीबोर्ड त्याच्याकडून हिसकाटून घेतला.
अरे ... नाही मी गंमत करीत होतो इरिकने स्पष्टीकरण देत म्हणाला.
अचानाक कन्ट्रोल बोर्डवर पुन्हा श्बिपश् श्बिपश् असा आवाज येवू लागला. दोघांनीही सुरवातीला कंट्रोल बोर्डकडे आणि नंतर टिव्ही स्क्रिनवर बघितले. मांजर बेडरुमजवळ पोहोचल्याची टिव्ही स्क्रिनवर दिसत होती.
मला वाटतं मांजर सिग्नल ब्लाकींग एरियाच्या आवाक्यात आलेली आहे रिचर्ड जणू स्वतरूशीच बोलला.
आता बिप बिप आवाज अजुनच जोराने यायला लागला.
बघ ... बघ ... मांजर सिग्नल ब्लाकींग एरियात पोहोचलेलं आहे रिचर्डने पटकन वायरलेस उचलला आणि कन्ट्रोल पॅनलवर एका ब्लींक होणार्या लाईटकडे इशारा करीत म्हटले.
रिचर्ड उत्तेजीत होवून आनंदाने आणि उत्साहाने वायरलेसवर बोलणार एवढ्यात इरिकने चपळाईने वायरलेस रिचर्डच्या हातातून हिसकून घेतला. रिचर्ड रागाने इरिककडे पाहत होता.
सर ... मांजर आता सिग्नल ब्लॉकींगच्या एरियात येवून पोहोचली आहे इरिकने सॅमला इन्फॉर्म केले.
अच्छा... तिच्यावर आता व्यवस्थीत लक्ष ठेवा तिकडून सॅमचा आवाज आला.
यस सर... इरिक म्हणाला.
मी इकडे खुन्याला पकडण्याचं बघतो आणि लक्षात ठेवा तिकडची पुर्ण जबाबदारी तुमची आहे सॅमने त्यांना बजावले.
यस सर.. इरिक म्हणाला.
आणि तिकडून सॅमने फोन कट केला.
सिग्नल ब्लॉकरने सर्व सिग्नल ब्लाक केले आहेत आणि आता त्या खुन्याचा एकही आदेश त्या मांजरीपयर्ंत पोहोचणार नाही रिचर्ड मॉनिटरकडे अणि टिव्ही मॉनिटरकडे बघत पुन्हा उत्तेजीत होत म्हणाला.
टिव्ही मॉनिटरवर आता ते मांजर गोंधळलेली दिसत होती. ती कधी पुढे जात होती तर कधी मागे. तिला कुठे जावं काही समजत नसावं असं वाटत होतं.
अचानक त्यांच्या समोर ठेवलेल्या सर्कीट टिव्हीवर दिसलं की त्या मांजरीचा एखाद्या बॉंबप्रमाणे एक मोठा स्फोट झाला. इतका मोठा की यांचं कॅबिन बरंच दूर असुनही तिथेसुद्धा हादरे बसले.
कॅबिनमधलं कॉम्प्यूटर आणि सर्कीट टिव्ही बंद पडले.
दोघांनाही हा अनपेक्षीत धक्का होता. त्यांना हे कसं काय घडलं काही कळत नव्हतं. ते गोंधळून इकडे तिकडे धावायला लागले.
हे असं काय झालं एकदम? इरिक घाबरुन म्हणाला.
तो एवढा घाबरला होता की त्याला धाप लागली होती.
टेररिस्ट अटॅक तर नाही? इरिक कसातरी आपल्या श्वासांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत पुढे म्हणाला.
मुर्खासारखा काही बरळू नको.. बघितलं नाही का आता... त्या मांजरीचा स्फोट झाला आहे रिचर्ड म्हणाला.
रिचर्ड आता तिथून बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे धावला.
चल लवकर... तिकडे काय झालं ते आपल्याला बघावं लागेल धावता धावता तो इरिकला म्हणाला.
ते दोघे जेव्हा क्रिस्तोफरच्या बेडरुममध्ये पोहोचले. त्यांनी बघितलेकी स्फोटामुळे बेडरुम हे बेडरुम राहालं नव्हतं. तिथे फक्त विटा, सिमेंट, आणी मोडलेलं, तुटलेलं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. त्या ठिगार्यात त्यांना क्रिस्तोफरच्या शरीराचा थोडा भाग दिसला. रिचर्ड आणि इरिक ताबडतोब तिथे पोहोचले. त्यांनी क्रिस्तोफरच्या बॉडीला सामान हटवून ढीगार्यातून बाहेर काढलं. रिचर्डने त्याची नाडी तपासली. पण नाडी बंद होती. त्याचा जिव कदाचित स्फोट झाला तेव्हाच गेला होता.
आता रिचर्ड आणि इरिक बेडरुमकडून घरातल्या इतर भागांकडे वळले. जिथे जिथे त्यांचे साथीदार तैनात होते ते तिथे त्यांचा शोध घेवू लागले. काही जण जखमी अवस्थेत पडलेले होते तिथे ते त्यांच्या मदतीसाठी धावले.
एवढ्या गडबडीत इरिकने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला.
स्फोट
डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याच्या टिमच्या गाड्या भरदार वेगाने रस्त्यावरुन धावत होत्या. खुन्याचं ठिकाण तर त्यांना कळलं होतं पण आता लवकरात लवकर जावून तो तिथून पसार होण्याच्या आत त्याला पकडनं आवश्यक होतं. गाड्यांच्या वेगासोबत सॅमच्या डोक्यातले विचारसुध्दा धावायला लागले. तो मनातल्या मनात सगळ्या शक्यतेचा आणि परिस्थीतीचा आढावा घेत त्या पडताळून पाहत होता. आणि प्रत्येक परिस्थीतीत आपली काय स्ट्रॅटेजी असेल हे ठरवित होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची बेल वाजली. त्याच्या विचारांची श्रुंखला तुटली.
त्याने मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले आणि पटकन फोन अटेंड केला, हं बोल
सर इथे एक सिरियस प्रॉब्लेम झाला आहे तिकडून इरिकचा आवाज आला.
सिरीयस प्रॉब्लेम म्हटल्याबरोबर सॅमला अवसान गळाल्यागत झाले. त्याच्या मनात पाल चूकचूकली.
काय? ... काय झालं? सॅमने उत्तेजित होवून उत्कंठेने विचारले.
सर त्या मांजरीचा इथे एखाद्या बॉंबप्रमाणे स्फोट झाला आहे इरिकने माहिती पुरवली.
काय?... स्फोट झाला? सॅमच्या तोंडातून आश्चर्याने निघाले.
त्याला एक एक आश्चर्याचे धक्के बसत होते.
पण कसा काय? सॅमने पुढे विचारले.
सर त्या मांजरीच्या गळ्यातल्या पट्यात प्लास्टीक एक्प्लोजीव बांधलेले असावे .. मला वाटतं की सिग्नल ब्लॉक होताच त्याच्या स्फोट व्हावा अश्याप्रकारे त्याला प्रोग्रॅम केलं असावं की जेणेकरुन खुन्याचे सावज कोणत्याही परिस्थीतीत त्याच्या तावडीतून सुटू नये इरिकने आपला अंदाज वर्तविला.
क्रिस्तोफर कसा आहे?... त्याला काही झालं तर नाही ना? बॉंब स्फोट आणि सावज म्हटल्याबरोबर पुढचा विचार सॅमच्या डोक्यात क्रिस्तोफरचा आला.
इतकं करुनही आपण त्याला वाचवू शकलोकी नाही हे जाणून घेण्याची त्याला घाई झाली होती.
नाही सर तो त्या स्फोटात जागच्या जागीच ठार झाला तिकडून इरिक म्हणाला.
शिट ... सॅमच्या तोंडून वैतागाने निघाले, आणि आपली लोक?... ती कशी आहेत? सॅमने पुढे विचारले.
तो गेला तर गेला ... आपल्या लोकांनातरी काही होता कामा नये...
त्याला मनोमन वाटत होते. तशीही एक सर्वसाधारण माणूस म्हणून त्याला त्याच्याबद्दल काहीही सहानूभूती नव्हती. एक पुलिस अॉफिसर म्हणून, एक कर्तव्य म्हणून त्याचा त्याला वाचविण्याचा इतका आटापिटा होता.
दोघंजण जखमी झाले आहेत, आम्ही त्यांना हॉस्पीटलमध्ये नेतो आहोत... इरिकने माहिती पुरवली.
कुणी सिरीयस जखमी तर नाही ना सॅमने पुन्हा खात्री करुन घेण्यासाठी विचारले.
नाही सर... जखमा तशा किरकोळच आहेत तिकडून आवाज आला.
हे बघ, तेथील पुर्ण जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो... आम्ही इकडे जिथून सिग्नल येत होते तिथे जवळपासच आहोत... थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू... तिकडचं तु आणि रिचर्ड दोघंजण व्यवस्थीत हॅन्डल करा
यस सर...
आपल्या लोकांची काळजी घ्या सॅम म्हणाला आणि त्याने फोन कट केला.
चला लवकर... आपल्याला घाई केली पाहिजे... तिकडे त्या क्रिस्तोफरला तर आपण वाचवू शकलो नाही... कमीत कमी या खुन्याला तरी पकडू शकलो पाहिजे... सॅम ड्रायव्हरला घाई करीत म्हणाला.
खुन्याचा शोध ?
ज्या जागेवरून सिग्नल येत होते त्या जागेजवळ सॅम आणि त्याची टीम येवून पोहोचली. ते एक वेअर हाऊस होते. आणि वेअर हाऊसच्या समोर आणि आजुबाजुला मोठी मोकळी जागा होती.
श् कॉम्प्यूटर वर तर हीच जागा दाखवली गेली होती... म्हणजे इथे वेअर हाउसमध्येच तो खुनी दडला असावा सॅम आपल्या हातातील नकाशावर आणि त्या वेअर हाऊसच्या आजुबाजुचा परिसर पाहत म्हणाला.
ड्रायव्हरने सॅमकडे त्याच्या पुढच्या आदेशासाठी पाहाले.
गाडी वेअरहाऊसच्या कंपाऊंडमध्ये घे सॅमने ड्रायव्हरला आदेश दिला.
यस सर ड्रायव्हर म्हणाला आणि त्याने गाडी वेअर हाऊसच्या मोकळ्या मैदानात घुसविली.
त्यांच्या मागे येत असलेल्या गाड्याही त्यांच्या मागे मागे त्या वेअरहाऊसच्या मोकळ्या मैदानात घुसल्या.
सॅमच्या गाडीच्या मागे सगळ्या गाड्या वेअर हाऊससमोर थांबल्या. गाडी थांबल्याबरोबर सॅमने आपल्या वायरलेसचा ताबा घेतला.
ट्रूप2, ट्रूप3 ताबडतोब वेअरहाऊसला चारी बाजुने वेढा द्या गाडीतून उतरता उतरता सॅम वायरलेसवर आदेश देवू लागला.
त्याचे साथीदारही ताबडतोब गाड्यांतून उतरु लागले.
ट्रूप2 वेअरहाऊसच्या उजवीकडून जा आणि ट्रूप3 डावीकडून त्यांचा गोंधळ होवू नये म्हणून सॅमने आपला आदेश अगदी स्पष्ट करुन सांगीतला.
गाडीतून उतरल्याबरोबर ट्रूप2 वेअरहाउसच्या उजवीकडून तर ट्रूप3 डावीकडून जावून त्यांनी वेअर हाऊसला संपूर्णपणे घेरले. खुनी जर वेअरहाऊसमध्ये दडला असेल आणि त्याला पळून जायचे असेल तर त्याला हा कडा भेदून जावे लागणार होते. आणि ते जवळजवळ अशक्य होते.
आपल्या दोन तुकड्यांनी व्यवस्थीत पुर्णपणे वेअरहाऊसला घेरल्याची खात्री झाल्यानंतर सॅम आपल्या सोबतच्या तुकडीसोबत, ट्रूप1 सोबत, वेअरहाऊसच्या दरवाजाजवळ जवळ जवळ धावतच गेला.
ट्रूप1 वेअरहाऊसमध्ये घुसणार आहे... सगळेजण तयार रहा... आत कितीजण असावेत याचा आपल्याला अजुनतरी अंदाज नाही आहे सॅमने पुन्हा एकदा सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
वेअरहाऊसमध्ये एकाजागी सुरु असलेल्या कॉम्प्यूटरचा चमकणारा मॉनिटर सोडल्यास सगळीकडे अंधार होता. त्या कॉम्प्यूटरच्या समोर एक पाठमोरी आकृती उभी होती आणि त्याची आपल्या बॅगमध्ये सामान भरण्याची गडबड चाललेली होती. सगळे खुन तर आटोपले होते. आता त्याची पळून जाण्याची तयारी दिसत होती. अचानक सामान भरता भरता तो थांबला. त्याला वेअरहाऊसच्या बाहेर किंवा आत कशाचा तरी आवाज, कशाची तरी चाहूल लागली असावी. तो तसाच पाठमोरा उभा राहून चाहूल घेवू लागला.
सगळं व्यवस्थीत पार पडलं आणि आता आपल्याला उगीच कसले तरी भास होत आहेत...
आता पयर्ंत आपल्याला कुणी पकडू शकलं नाही ते आता काय पकडणार आहेत?...
तशी आपली योजना काही कमी फुलप्रुफ नव्हती...
त्याने आपल्या डोक्यातले विचार झटकले आणि पुन्हा सामान भरण्यात मग्न झाला.
अचानक त्याला मागुन आवाज आला, हॅन्डस अप.. यू आर अंडर अरेस्ट
त्याने चपळाईने आपल्या बॅगमधून काहीतरी कदाचित एखादं हत्यार काढण्याचा प्रयत्न केला.
पण त्याच्यापेक्षा जास्त चपळाईने डिटेक्टीव्ह सॅमने त्याच्या भोवताली बंदूकीच्या गोळ्या झाडून जणू एक कडं तयार केलं.
मुर्खपणा करण्याचा प्रयत्न करु नकोस.. सॅमने त्याला बजावले.
त्याच्या हातातून तो भरत होता ती बॅग गळून पडली आणि त्याने आता आपले दोन्ही हात वर केले. हळू हळू तो सॅमकडे वळू लागला.
तो जसा वळू लागला. सॅम मनातल्या मनात एक एक अंदाज बांधत होता.
तो कोण असावा?...
आणि हे सगळे खुन त्याने का केले असावेत?...
जसा तो पुर्णपणे सॅमकडे वळला, सुरु असलेल्या मॉनिटरच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसायला लागला.
डिटेक्टीव्ह सॅमच्या चेहर्यावर आश्चर्याच्या छटा उमटायला लागल्या.
तो दुसरा तिसरा कुणी नसून एन्थोनी होता, जॉन आणि नॅन्सीचा कॉलेजातला मित्र!
डिटेक्टीव्ह सॅमच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. पण त्याचा दुसरा प्रश्न श्हे सगळे खुन त्याने का केले असावेत?श् अजुनही अनुत्तरीत होता.
डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचे साथीदार आता हळू हळू पुढे सरकु लागले. सॅमने वायरलेसवर खुनी सापडल्याची वार्ता त्याच्या सगळ्या टीमला कळविली. त्यांनी एंन्थोनीला चारही बाजुने घेरले.
एन्थोनीची कहानी
सॅम आणि त्याचे साथीदार अजुनही एन्थोनीच्या अवतीभोवती उभे होते. एन्थोनीचा प्रतिकार आता पुर्णपणे संपला होता. एव्हाना सॅमच्या दोन साथीदारांनी त्याला हातात बेड्या घालून ताब्यात घेतले होते. सॅमने तिथेच त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. शेवटी एक प्रश्न जाणून घेण्यास सगळे जणच उत्सुक होते. सॅमलाही वाटत होते नंतरची चौकशी जेव्हा व्हायची तेव्हा होऊ देत. कमीत कमी आता त्याला बर्याच दिवासापासून सतावणार्या त्या एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. की का? का एन्थोनीने त्या चार झणांना जिवे मारावे?
एन्थोनीच्याही आता पुर्णपणे लक्षात आले होते की आपल्याला बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. तो सगळं काही एखाद्या पोपटासारखं सांगु लागला ....
.... ते जुने जॉन, नॅन्सी आणि एन्थोनीचे कॉलेजचे दिवस होते. वर्गात शिक्षक शिकवित होते आणि विद्याथार्ंमध्ये जॉन, नॅन्सी आणि एंथोनी वर्गात वेगवेगळ्या जागेंवर बसलेले होते. एथोनीने समोर पहाता पहाता जेव्हा शिक्षकाचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून चोरुन एक कटाक्ष नॅन्सीकडे टाकला. पण हे काय? ती त्याच्याकडे न पाहता चोरुन जॉनकडे पाहत होती. त्याचा तिळपापड होत होता.
आपण वर्गातले एक हुशार विद्यार्थी...
एकसे एक पोरी आपल्यावर मरायला तयार ...
पण जिच्यावर आपला जिव जडला ती आपल्याला जुमानत नाही ? ...
त्याचा अहंकार दुखावल्या जात होता.
नाही हे होणं शक्य नाही...
कदाचित तिला आपला जिव तिच्यावर जडला आहे हे माहित नसावे...
तिला हे माहीत होणे आवश्यक आहे...
तिला हे माहित झाल्यावर ती आपोआपच आपल्यावर प्रेम करायला लागेल...
विचार करता करता त्याने मनोमनी एक निर्णय घेतला.
दुपारची वेळ होती. कॉलेज नुकतच सुटलं होतं आणि नॅन्सी आपल्या घरी परतत होती. घाई घाईने एंथोनी तिचा पाठलाग करीत तिला गाठण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिच्या जवळ पोहोचताच त्याने मागून तिला आवाज दिला, नॅन्सी मागून आलेला आवाज ऐकताच ती थांबली आणि वळून मागे पाहू लागली. एन्थोनी जॉगींग केल्यागत पटकन तिच्या जवळ जावून पोहोचला.
काय... एन्थोनी तिने आश्चर्याने त्याला विचारले.
कारण तो सहसा कुणाशी बोलत नसे. आणि आज असा मागे मागे धावून आपल्याशी बोलतोय. तो वर्गात टॉप असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल एक आदर होता. तिलाच काय वर्गातल्या सर्व मुला मुलींना त्याच्या बद्दल आदर होता.
नाही ... म्हणजे... तुझ्यासोबत मला एक महत्वाचं बोलायचं होतं तो म्हणाला.
नॅन्सीने त्याच्या चेहर्याकडे निरखुन बघितले आणि ती त्याला काय बोलायचे असेल हे समजुन घेण्याचा प्रयत्न करु लागली. एव्हाना ते दोघं सोबत सोबत चालायला लागले होते.
नाही ... म्हणजे... एक्चूअली.. तो शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाला, म्हणजे...मला तुला प्रपोज करायचं होतं... विल यू मॅरी मी त्याने भराभर महत्वाचे शब्द निवडले आणि त्याला जे बोलायचे होते ते बोलून तो मोकळा झाला.
अचानक तो असं काही बोलेल अशी नॅन्सीला अपेक्षा नव्हती.
तो गंमत तर करीत नसावा ? ...
तिने त्याच्या चेहर्याकडे निरखुन बघितले आणि त्याच्या चेहर्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या चेहर्यावरुन तरी तो गंमत करीत असावा असं वाटत नव्हतं...
आय एम सिरीयस तो तिचा उडलेला गोंधळ पाहून म्हणाला.
पुन्हा तिने त्याचे भाव ताडण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ते एकाच वर्गात शिकत असल्यामुळे जाणत होती. तिला त्याचा स्वभाव चांगला ठाऊक होता. अश्या प्रकारची गंमत करणे त्याचा स्वभावात नव्हतं. आणि नॅन्सीच्या स्वभावात भिडस्तपणा आणि स्पष्टवक्तेपणा होता. त्यामुळे पटकन ती त्याच्याबद्दल तिच्या ज्या भावना होत्या त्या बोलून मोकळी झाली. शेवटी ती जॉनवर प्रेम करीत होती.
एन्थोनी... आय एम सॉरी बट आय कांन्ट ती म्हणाली.
एन्थोनीला हे अपेक्षीत नव्हतं. तो आश्चर्याने तिच्या चेहर्याकडे पाहू लागला.
ती इतक्या सहजासहजी आपल्याला कशी धुडकावून लावू शकते?...
त्याचा अहंकार दुखावल्या जात होता.
पण का? तो आता पुरता चिडला होता.
ती भराभर पुढे चालत होती आणि तोही भराभर चालत तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करीत होता.
बघ मी वर्गात टॉपर आहे... पुढे कॉलेज संपल्यावर न्यूरॉलाजीमध्ये रिसर्च करण्याचा माझा प्लॅन आहे... माझ्या समोर एक उज्वल भविष्य आहे... आणि मला खात्री आहे की मला जर तुझ्यासारख्या सुंदर मुलीची साथ मिळाल्यास जिवनात मी अजुनही बरचं काही मिळवू शकतो तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता.
एंथोनी.. तु एक चांगला मुलगा आहेस, हूशार आहेस... यात वादच नाही .. पण मी तुझ्यासोबत लग्नाचा विचार करु शकत नाही तीही आता त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागली.
पण का? तो रागाने म्हणाला.
तुला माहित आहे?... मी तुझ्यावर प्रेम करतो... तो आता गिडगीडायला लागला होता.
कारण मी दुसर्याच कुणावर तरी प्रेम करते... ती म्हणाली.
ती पुढे चालतच होती. एंथोनी आता थांबला होता. तो तिच्या जाणार्या पाठमोर्या आकृतीकडे निराशेने पाहत होता.
सहानुभूती
संध्याकाळची वेळ होती. पार्कमध्ये बसलेल्या प्रेमी जोडप्यांसोबत बागेतील फुलंही जणू थंड हवेच्या झुळकेबरोबर मस्तीत डोलत होते. त्या पार्कच्या एका कोपर्यात नॅन्सी खाली गवतावर एका मोठ्या झाडाच्या बुंध्याचा आधार घेवून, टेकून बसली होती. जॉन आपलं डोकं नॅन्सीच्या मांडीवर ठेवून खाली गवतावर पहुडला होता.
तुला माहित नाही मी तुझ्यावर किती प्रेम करते ती त्याच्या केसांतून हात फिरवीत त्याला गोंजारत म्हणाली.
त्याने एक प्रेमळ दृष्टीक्षेप तिच्याकडे टाकला.
काही वेळ दोघंही काहीच बोलले नाहीत. बराच वेळ नुसता शांततेत गेला. काही वेळाने अचानक जॉन उठून उभा राहाला आणि नॅन्सीला उठण्यासाठी हात देत म्हणाला, चल आता निघूया ... बराच वेळ झाला आहे
त्याचा हात पकडून ती उठून उभी राहाली.
हातात हात घालून ते संथपणे चालत तिथून निघून गेले.
इतका वेळ एका झाडाच्या मागे दबा धरुन बसलेला एन्थोनी नॅन्सी आणि जॉन तिथून निघून जाताच बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने लाल लाल झालेला होता....
... एन्थोनी वेअरहाउसमध्ये उभा राहून त्याची सगळी हकिकत सांगत होता. आणि त्याच्या भोवताली जमलेले सॅम आणि त्याची टीम सगळी हकिकत लक्ष देवून ऐकत होते. त्याला घातलेल्या बेड्यांना पकडून अजूनही दोन पुलिस त्याच्याजवळ उभे होते. डिटेक्टीव सॅमही त्याची हकीकत लक्ष देवून ऐकत होता.
मी तिच्यावर खुप... म्हणजे अगदी जिवापाड प्रेम केलं एंन्थोनी एक उसासा टाकत म्हणाला.
पण मला जेव्हा कळलं की ती माझ्यावर नसून जॉनवर प्रेम करते... मी खुप निराश, हताश झालो, मला तिचा रागही आला.. पण हळू हळू मी माझ्या मनाला समजावले की मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून तिनेही माझ्यावर प्रेम करावे हे जरुरी नाही... ती कुणावरही प्रेम करण्यास मुक्त असायला हवी. एन्थोनी म्हणाला.
मग तु त्या चार लोकांना का मारलं? सॅमने मुळ मुद्द्याची गोष्ट विचारली.
कारण दुसरं कुणीही करु शकणार नाही एवढं प्रेम मी तिच्यावर केलं होतं...ष्ष् एंन्थोनी अभिमानाने म्हणाला.
जॉननेही तिच्यावर प्रेम केलं होतं... सॅमने त्याला अजुन डिवचण्याचा प्रयत्न केला.
तो भित्रा होता... नॅन्सीने त्याच्यावर प्रेम करावे अशी त्याची लायकी नव्हती एंन्थोनी तिरस्काराने म्हणाला, तुम्हाला माहित आहे?... जेव्हा तिच्यावर बलात्कार होवून तिचा खुन झाला तेव्हा त्याने मला एक पत्र लिहिले होते एंन्थोनी पुढे म्हणाला.
काय लिहिलं होतं त्यानं? सॅमने विचारले.
लिहिलं होतं की त्याला नॅन्सीवर झालेल्या बलात्काराचा आणि तिच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे... आणि त्याने ते चार गुन्हेगार शोधले आहेत ... पण त्याची त्यांचा बदला घेण्याची हिंम्मत होत नाही आहे.. वैगेरे.. वैगेर .. असं त्यानं बरच काही लिहिलं होतं... मी मित्र या नात्याने त्याला चांगला ओळखत होतो.. पण तो एवढ्या भ्याड असेल अशी मला कल्पना नव्हती... मग अशा परिस्थीतीत तुम्हीच सांगा मी काय करावं असं अपेक्षीत होतं... जर तो बदला घेवू शकत नव्हता तर त्या चौघा दानवांचा बदला घेण्याची जबाबदारी माझी झाली होती... कारण तिने जरी माझ्यावर केलं नसलं तरी मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं... एंन्थोनी भावनावेगाने बोलत होता. तो इतका भराभर आणि उत्तेजीत होवून बोलत होता की त्याचा चेहरा लाल लाल झाला होता आणि त्याच्या श्वासांची गती वाढली होती. जेव्हा एंथोनी बोलायचं थांबला. त्याचं सवार्ंग घामाने भिजून गेलं होतं. त्याला त्याचे हातपाय गळाल्यागत होत होतं. तो मटकन खाली जमिनीवर बसला, त्याने आपला चेहरा आपल्या दोन्ही गुडघ्यात लपविला आणि तो आता ओक्साबोक्शी रडू लागला होता. इतक्या वेळपासून तो रोखण्याचा प्रयत्न करीत होता तो बांध जणू तूटला होता.
त्याच्या भोवती जमा झालेले सगळेजण सहानुभूतीने त्याच्याकडे पाहत होते.
ैपहदंस त्मबमपअमत
बेड्या घातलेला एंथोनी पोलिसांच्या गराड्यात वेअरहाऊसमधून बाहेर पडला. त्याच्यासोबतचे सगळे हत्यारबंद पोलिस होते कारण तो कुणी साधासुधा गुन्हेगार नसून एका पाठोपाठ एक असे चार खुन केलेला सिरियल किलर होता. पोलिसांनी एन्थोनीला त्यांच्या एका गाडीत बसविले. डिटेक्टीव्ह सॅम वेअरहाऊसच्या दरवाजाजवळ मागेच थांबला. सॅमने आत्तापयर्ंन कितीतरी खुनाच्या केसेस हाताळल्या असतील पण तो या घटनेमुळे विचलीत झालेला दिसत होता. खुन्याला पकडण्याचे महत्वाचे काम तर आता पार पडले होते. त्यामुळे आता त्यांच्यासोबत गाडीत बसून जाणे त्याला आवश्यक वाटत नव्हते. तो काही काळ तरी एकट्यात घालू इच्छीत होता. आणि त्याला मागे थांबून एकदा या वेअरहाऊसचीही कसून तपासणी करायची होती. त्याने त्याच्या एका साथीदाराला इशारा केला,
तुम्ही याला घेवून समोर व्हा ... मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो सॅम म्हणाला.
ज्या गाडीत एंन्थोनीला बसविले होते ती गाडी सुरु झाली. तिच्या मागे पोलिसांच्या इतर गाड्याही सुरु झाल्या, आणि एंन्थोनी ज्या गाडीत बसला होता तिच्या मागे वेगात धावू लागल्या. एक मोठा धुळीचा लोट उठला. त्या गाड्या निघून गेल्या तरी तो धूळीचा लोट अजूनही हवेत पसरलेला होता. सॅम गंभीर चेहर्याने त्या धुळीच्या ढगाला हळू हळू विरतांना आणि खाली बसतांना पाहत होता.
जशा सगळ्या गाड्या तिथून निघून गेल्या आणि वातावरण शांत झालं सॅमने वेअरहाऊसच्या भोवती एक चक्कर मारली. चालता चालता त्याने आकाशाकडे बघितले. आकाशात तांबडं फुटलं होतं आणि आता थोड्याच वेळात सुर्य उगवणार होता. तो एक चक्कर मारुन दरवाजाजवळ आला आणि शिथील चालीने वेअरहाऊसच्या आत गेला.
आत वेअरहाऊसमध्ये अजूनही अंधारच होता. त्याने कॉम्प्यूटरच्या चमकणार्या मॉनिटरच्या प्रकाशात वेअरहाऊसमध्ये एक चक्कर मारली आणि मग त्या कॉम्प्यूटरजवळ जावून उभा राहाला. सॅमने बघितलेकी कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर अजूनही ओपन केलेले होते. त्याने सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या अॉपशन्सवर माऊस क्लिक करुन बघितले. एका बटनवर क्लिक करताच कॉम्प्यूटरच्या बाजुला ठेवलेल्या एका उपकरणाचा लाईट ब्लींक होवू लागला. त्याने ते उपकरण हातात घेवून न्याहाळून पाहाले. ते एक सिग्नल रिसिव्हर होते, ज्यावर एक डिस्प्ले होता. त्या डिस्प्लेवर एक मेसेच चमकायला लागला. लिहिलेलं होतं श् इन सिग्नल रेंज ध् इन्स्ट्रक्शन = लेफ्टश्. त्याने ते उपकरण परत ठेवून दिलं. त्याने अजुन एक सॉफ्टवेअरचं बटन दाबलं, ज्यावर श्राईटश् असं लिहिलं होतं.
पुन्हा सिग्नल रिसीव्हर ब्लींक झाला आणि त्यावर मेसेज आला श् इन सिग्नल रेंज ध् इन्स्ट्रक्शन = राईटश्. पुढे त्याने श् अटॅकश् बटन दाबलं. पुन्हा सिग्नल रिसीव्हर ब्लींक झाला आणि त्यावर मेसेज आला होता श् इन सिग्नल रेंज ध् इन्स्ट्रक्शन = अटॅकश्. सॅमने ते उपकरण पुन्हा हातात घेतले आणि आता तो ते काळजीपुर्वक न्याहाळू लागला. तेवढ्यात त्याला वेअरहाऊसच्या बाहेर कशाचा तरी आवाज आला. ते उपकरण तसंच हातात घेवून तो बाहेर गेला.
वेअरहाऊसच्या बाहेर जावून त्याने आजुबाजूला बघितले.
इथे तर कुणीच नाही...
मग कशाचा आवाज झाला होता...
असेल काहीतरी जावूद्या ...
जेव्हा तो पुन्हा परत वेअरहाऊसमध्ये येण्यासाठी वळला तेव्हा अनायसेच त्याचं लक्ष त्याच्या हातातल्या ब्लींक होणार्या उपकरणाकडे गेलं. अचानक त्याचा चेहर्यावर आश्चर्याचे भाव उमटले. त्या सिग्नल रिसीव्हरवर श् आऊट अॉफ रेंज ध् इन्स्ट्रक्शन = निलश् असा मेसेज आला होता. तो आश्चर्याने त्या उपकरणाकडे पाहत होता. त्यांच तोंड उघडं ते उघडंच राहालं होतं. त्याच्या डोक्यांत वेगवेगळ्या प्रश्नांनी गर्दी केली होती.
अचानक आजुबाजुला कुणाच्या तरी उपस्थीतीने तो जवळ जवळ दचकलाच. पाहतो तर ती एक काळी मांजर होती आणि त्याच्या समोरुन पळत वेअरहाऊसमध्ये गेली होती. एकदा त्याने आपल्या हातातल्या उपकरणाकडे पाहाले आणि नंतर त्या वेअर हाऊसच्या उघड्या दाराकडे बघितले. ज्यातून आताच एक काळी मांजर आत गेली होती.
हळू हळू काळजीपूर्वक त्या मांजरीचा पाठलाग करीत तो आता आत वेअर हाऊसमध्ये जावू लागला.
जाता जाता त्यांच्या डोक्यात एक विचार सारखा घोंगावत होता की श्जर वेअरहाऊसच्या बाहेरपयर्ंतसुध्दा सिग्नल जाऊ शकत नसेल तर मग ज्या चार जणांचे खुन झाले त्यांच्या घरापयर्ंत सिग्नल पोहोचलाच कसा ?श्
वार्याचा झोत
गोंधळलेल्या डिटेक्टिव सॅमने हळू हळू वेअरहाऊसमध्ये प्रवेश केला. आत आल्यावर इकडे तिकडे बघत तो त्या मांजरीचा शोध घेवू लागला. आधीच अंधार आणि वर ती मांजर काळ्या रंगाची. सापडणं कठिण होतं. त्याने पुर्ण वेअरहाऊसमध्ये आपली भिरभिरती नजर फिरविली. आता बाहेर उजेडायला आलं होतं त्यामुळे वेअरहाऊसमध्ये थोडा थोडा उजेड आला होता. एका जागी त्याला एक फाईलचा गठ्ठा धूळ खात पडलेला दिसला. तो त्या फाइल्सच्या गठ्ठ्याजवळ गेला. त्या फाईल्स थोड्या उंचावर एका फळीवर ठेवल्या होत्या. त्याची उत्सुकता चाळवली गेली होती.
कशाच्या असतील त्या फाईल्स...
नक्कीच अजून केसच्या संदर्भात महत्वाचं काहीतरी आपल्याला त्या फाईल्समध्ये सापडू शकते..
तो पाय उंच करुन त्या फाईल्सच्या गठ्ठ्यापयर्ंत आपला हात पोहोचविण्याचा प्रयत्न करु लागला. तरीही त्याचा हात पुरत नव्हता. म्हणून आता तो उडी मारून फाईल्स पयर्ंत पोहोचण्याचा प्रयत्न करु लागला. त्या फाईल्सपयर्ंत पोहोचण्याच्या प्रयत्नात त्याचा धक्का लागून फळीवरुन काहीतरी खाली पडले. काच फुटण्यासारखा आवाज झाला. त्याने खाली वाकुन पाहाले तर काचाचे तूकडे सगळीकडे विखूरले होते. आणि खाली फोटोची एक फ्रेम उलटी पडलेली होती. त्याने ती उचलली आणि सरळ करुन बघितली. तो एक ग्रुप फोटो होता पण तिथे उजेड फारच अंधूक असल्यामुळे काही व्यवस्थीत दिसत नव्हते. तो फोटो घेवून तो कॉम्प्यूटरजवळ गेला. काम्प्यूटरचा मानिटर अजूनही सुरु होता आणि चमकत होता. त्यामुळे त्या उजेडात तो फोटो व्यवस्थीत पाहाणं शक्य होतं. मॉनिटरच्या उजेडात त्याने तो ग्रुप फोटो पाहाला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो आ वासून आश्चर्याने त्या फोटोकडे पाहत होता.
तो त्या धक्यातून सावरतो न सावरतो तोच त्याच्या समोर सुरु असलेलं कॉम्प्यूटरचं मॉनिटर बंद सुरु होवू लागलं.
काहीतरी इलेक्ट्रीक प्रॉब्लेम दिसतो...
म्हणून तो कॉम्प्यूटरचा पॉवर स्वीच आणि प्लग चेक करायला गेला.
त्याने पॉवर प्लगकडे बघितले आणि दचकून भ्यालेल्या स्थितीत तो मागेच सरला. त्याला आश्चर्याचा दूसरा धक्का बसला होता.
कॉम्प्यूटरचं पॉवर केबल पॉवर बोर्डला न लावता तिथेच बाजूला काढून ठेवलेलं होतं.
तरीही कॉम्प्यूटर सुरु कसा? ...
ही काहीतरी ट्रीक असावी...
किंवा हे पॉवर केबल दुसरंच कशाचं तरी असावं...
त्याने ते पावर केबल उचलून एका टोकापासून दूसर्या टोकापयर्ंत चाचपडून पाहालं. ते कॉम्प्यूटरचंच पॉवर केबल होतं.
आता मात्र त्याचे हातपाय कापायला लागले होते.
तो जे पाहत होता तसे त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात कधीही पाहाले नव्हते.
अचानक कॉम्प्यूटरचा मॉनिटर बंद चालू होण्याचे थांबले. त्याने मॉनिटरकडे पाहाले. त्याच्या चेहर्यावर अजूनही भितीमिश्रीत आश्चर्य होतं.
अचानक एक मोठा वार्याची झोत झपाटल्यासारखा वेअरहाऊसमध्ये वाहू लागला. एवढा वार्याचा झोत वाहत होता आणि सॅमच्या सवार्ंगाला दरदरुन घाम फुटला होता.
आणि आता अचानक मॉनिटरवर चित्र विचित्र वेगवेगळ्या भयानक आकृत्या अवतरायला लागल्या.
डिटेक्टीवला काही एक समजत नव्हतं की काय होत आहे. जे काही घडत होतं ते त्याच्या अवकलन शक्तीच्या आवाक्या बाहेरचं होतं. शेवटी एक सुंदर स्रिची आकृती मॉनिटरवर अवतरली. ती आकृती जरी सुंदर आणि मोहक होती तरी सॅमच्या शरीरात एक भितीची लहर पसरली. ती सुंदर आकृती आता एका भयानक आकृतीत परिवर्तीत झाली. पुन्हा हवेचा एक मोठा झोत आला. यावेळी त्या हवेची तिव्रता फारच जास्त होती. एवढी की त्या हवेच्या मार्याने अक्षरशरू सॅम खाली पडला. तसे त्याचे हातपाय आधीच गळून गेले होते. त्या हवेच्या मार्याचा प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यात उरली नव्हती. खाली पडल्या पडल्या त्याच्या लक्षात आले की हळू हळू त्याची शुद्ध हरपत आहे. मात्र त्याची शुध्द पुर्णपणे हरविण्याच्या आधी त्याने मॉनिटरवरच्या त्या स्त्रीच्या डोळ्यातून दोन मोठमोठे अश्रु ओघळतांना पाहाले.
अश्रू बोलू लागले
वेअरहाऊसमध्ये मॉनिटरच्या समोर खाली अचेतन अवस्थेत पडलेल्या सॅमच्या समोरुन जणू एक एक प्रसंग फ्लॅशबॅकप्रमाणे जावू लागला....
.... नॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते करु तरी काय शकत होते?
अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणार्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न करता तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता.
तो त्या चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले.
साले कुठं गायब झालेत? तो स्वतरूशीच चिडून म्हणाला.
तेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं.
नक्कीच साले या पाईपमध्ये लपले असतील...
त्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात...
स्टीव... लवकर इकडे ये तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला.
स्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला.
जाणार्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला.
स्टीव्हन जाताच जॉनने आपल्या खिशातून मोबाईल काढला. त्याने कुणी त्याला ट्रेस करु नये म्हणून फोन स्वीच अॉफ करुन ठेवलेला होता. त्याने तो स्वीच अॉन केला आणि एक नंबर डायल केला.
कुणाला फोन करतोस? नॅन्सीने दबक्या आवाजात विचारले.
आपला क्लासमेट एंन्थोनी... तो इथलाच राहणारा आहे
तेवढ्यात फोन लागला, हॅलो
अरे काय जॉन कुठून बोलतोस... सालेहो तुम्ही कुठं गायब झालां... इथं केवढी बोंबाबोंब झाली आहे... तिकडून एंथोनी म्हणाला.
जॉनने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं आणि मग म्हणाला, अरे आम्ही इथे एका जागी अडकलो आहोत...
अडकले? कुठं.? एंन्थोनीने विचारले.
अरे काही गुंड आमचा पाठलाग करीत आहेत... आम्ही आता कुठं आहो हे मला सांगता येणार नाही... जॉन सांगु लागला. तेवढ्यात नॅन्सीने त्याला खुणवून घड्याळ्याच्या टॉवरकडे इशारा केला.
... हं इथून एक घड्याळाचा टॉवर दिसतो आहे...त्याच्याच जवळपास आम्ही आहोत जॉनने त्याला माहिती पुरवलीं.
अच्छा... अच्छा... काळजी करु नका, आधी आपलं डोकं शांत करा... आणि एवढ्या मोठ्या शहरात ते गुंड तुम्हाला काही करु शकतील ही भीती मनातून काढून टाका... हं काढली भितीष्श् तिकडून एंन्थोनी म्हणाला.
हो... जॉन म्हणाला.
हं गुड... आता एखादी टॅक्सी पकडा आणि त्याला हिल्टन हॉटेल असं सांगा... ते तिथेच जवळपास त्याच एरियात आहे...
तेवढ्यात त्यांना इतका वेळपासून एक वाहन दिसलं नव्हतं, सुदैवाने एक टॅक्सी त्यांच्याकडे येतांना दिसली.
टॅक्सी आली आहे... बरं तुला मी नंतर फोन करतो... जॉनने घाईने फोन कट केला.
ते दोघंही घाईघाईने पाईपच्या बाहेर आले आणि जॉनने टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली तशी ते दोघंही टॅक्सीत घुसले.
हॉटेल हिल्टन जॉन म्हणाला तशी टॅक्सी पुन्हा धावू लागली.
टॅक्सी निघाली तसं दोघांनाही हायसं वाटलं. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
जेन्टलमन्स प्रामीस
क्रिस्तोफर आणि त्याचे तिन मित्र अजुनही वेड्यासारखे त्यांना शोधत होते. शेवटी शोधून शोधून थकल्यावर पुन्हा त्यांनी ज्या चौकातून त्यांना शोधण्याची सुरवात केली होती त्या चौकात क्रिस्तोफर आणि स्टिव्हन परत आले. त्यांच्या मागोमाग दम लागल्यामुळे मोठमोठे श्वास घेत रोनॉल्ड आला.
काय मिळाली? स्टीव्हनने विचारले.
रोनॉल्डने फक्त श्नाहीश् असं डोकं हलवलं.
साले कुठं मसनात गायब झाले? क्रिस्तोफर चिडून म्हणाला.
तेवढ्यात त्यांना दुरवर पॉल त्यांच्याकडे येतांना दिसला. त्यांनी आशेने त्याच्याकडे पाहाले. पण त्याने दूरुनच आपला अंगठा खाली करुन ते सापडले नसल्याचा इशारा केला.
लेकहो... वर तोंड करुन परत काय आलास... जा तिला शोधा... आणि जोपयर्ंत ती सापडत नाही तो पयर्ंत परत येवू नका क्रिस्तोफर त्यांच्यावर खेकसला.
तेवढ्यात क्रिस्तोफरच्या फोनची रिंग वाजली.
किस्तोफरने फोन उचलला आणि, हॅलो तो अनिच्छेनेच फोनमध्ये बोलला.
हे... मी एंथोनी बोलतोय... तिकडून नॅन्सी आणि जॉनचा वर्गमित्र एंथोनी बोलत होता.
हं बोल एंथोनी क्रिस्तोफर सपाट आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात त्याचा फोन आल्याचा आनंद तर नक्कीच नव्हता.
एक आनंदाची गोष्ट आहे... मी तुमच्यासाठी एक ट्रीट अरेंज केली आहे तिकडून एंथोनी म्हणाला.
हे बघ एंथोनी ... सध्या आमचा काही मुड ठिक नाही... आणि तुझी ट्रीट अटेंड करण्याइतका तर नक्कीच नाही क्रिस्तोफर म्हणाला.
अरे मग तर ही ट्रीट तुमचा मुड नक्कीच ठिक करेल ... ऐका तर खरं... एक नविन पाखरु आपल्या गावात आलं आहे... सध्याचं मी त्याला खास तुमच्यासाठी हिल्टन हॉटेलला पाठविलं आहे... एंथोनी तिकडून उत्साहाने म्हणाला.
पाखरु?... या गावात नविन... एक मिनीट ... एक मिनीट... ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे का? क्रिस्तोफरने विचारले.
हो तिकडून एंथोनी म्हणाला.
तिच्या गालावर हसली म्हणजे खळी उमटते ? क्रिस्तोफरने विचारले.
हो तिकडून एंथोनी म्हणाला.
तिच्या उजव्या हातावर वाघाचा टॅटूसुद्धा आहे.. बरोबर क्रिस्तोफरच्या चेहर्यावर आनंद पसरायला लागला होता.
हो .. पण हे सगळं तुला कसं काय माहित? तिकडून एंथोनीने आश्चर्याने विचारले.
अरे तिच तर ती पोरगी आहे... रोनॉल्ड, पॉल, स्टीव आणि मी सकाळपासून तिच्या मागावर होतो... अन आत्ताच थोड्यावेळापूर्वी ती आम्हाला गुंगारा देवून सटकली आहे ... पण साली आमच्या नशिबातच दिसते
सगळ्यांचे चेहरे एकदम आनंदाने उजळले होते. स्टीव्ह आणि पॉलच्या चेहर्यावर तर आनंद मावता मावत नव्हता.
खरंच? तिकडून एंथोनीसुध्दा आश्चर्याने म्हणाला.
दोस्ता एंथोनी... तु फार चांगलं काम केलंस लेका.. याला म्हणतात खरा दोस्त क्रिस्तोफरही आनंदाच्या भरात अनावर होवून बोलत होता.
अरे आत्ताच आम्ही तिला शोध शोध शोधत होतो... कुठाय ती?... तुला खरं सांगु आम्ही तुला तिच्या बदल्यात तुला जे पाहिजे ते देवू... क्रिस्तोफरने आनंदाच्या भरात त्याला शब्द दिला.
पहा बरं नंतर तु मुकरशील एंथोनी अविश्वासाने म्हणाला.
अरे नाही ... इट्स जेन्टलमन्स प्रामीस क्रिस्तोफर एखादा राजा जसा खुश होतो तसा खुश होवून म्हणाला.
दोन हजार डॉलर्स ... प्रत्येकाकडून... मंजूर एंथोनीनेही वेळेचा फायदा घ्यायचं ठरविलं.
मंजूर क्रिस्तोफर बेफिकीरपणे म्हणाला.
ब्ीममते!
क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टीव्हन एका जुनाट घरात एका टेबलभोवती बसले होते. त्यांच्या हातात अर्धे अर्धे रिचविलेले व्हिस्कीचे ग्लासेस होते. चौघंही आपआपल्यातच गुंग विचार करीत व्हिस्की पित होते. त्यांच्यात एक तणावपुर्ण शांतता पसरलेली होती.
तिला तु का मारलं? रोनॉल्डने शांततेचा भंग करीत क्रिस्तोफरला प्रश्न विचारला.
तशी चौघांपैकी कुणाचीच क्रिस्तोफरला जाब विचारण्याची छाती नव्हती. पण वेळच तशी आली होती. आणि पिल्यामुळे त्याला तेवढी हिंम्मतही आली होती.
ए मुर्खासारखा बरळू नकोस... मी काही तिला मारलं नाही... ती अपघाताने मेली क्रिस्तोफर बेफिकीरपणे खांदे उडवून म्हणाला.
अपघाताने?
क्रिस्तोफर जरी आपण त्याबाबतीत बेफिकीर आहे असं दाखवित असला तरी तोही आतून अस्वस्थ होता.
आपली अस्वस्थता लपविण्यासाठी त्याने व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला, हे बघा ती जरा जास्तच आवाज करीत होती म्हणून मी तिचं तोंड दाबलं आणि मला माहितच नव्हतं की त्यात तिचं नाक सुध्दा दाबलं गेलं आहे म्हणून
मग आता आपण काय करायचं? स्टिव्हनने विचारले.
त्या चौघांमध्ये स्टिव्हन आणि पॉल सगळ्यात जास्त भ्यालेले दिसत होते.
आणि पोलिसांनी जर आपल्याला पकडलं तर? पॉलने आपली भिती व्यक्त केली.
हे बघा काहीही झालं नाही असं वागा... आणि कुणी काही विचारलंच तर लक्षात ठेवा आपण इथेच काल रात्रीपासून पत्ते खेळत आहोत ... आणि तरीही जर काही भानगड झाली तर आपण त्यातूनही काहीतरी मार्ग काढू... अन ही काय माझी पहिली वेळ नाही ...की मी कुणाला मारलं आहे क्रिस्तोफर आत्मविश्वासाचा आव आणीत म्हणाला.
पण ते तू मारलं आहेस ... आणि तेव्हा तुला त्यांना मारायचं होतं रोनॉल्ड म्हणाला.
त्याने काय फरक पडतो... मारणं आणि अपघाताने मरणं... शेवटी मरण ते मरणच क्रिस्तोफर म्हणाला.
तेवढ्यात दरवाजावर कुणाचीतरी चाहूल लागलीय कुणीतरी हळूच नॉक केलं.
सगळे बोलण्याचं आणि पिण्याचं थांबवून एकदम स्तब्ध झाले.
त्यांनी एकमेकांकडे बघितलं.
कोण असेल?...
पोलिस तर नसावे?...
खोलीत एकदम शांतता पसरली होती.
क्रिस्तोफरने स्टीव्हनला कोण आहे हे बघण्यासाठी खुणावले.
स्टीव्हन हळूच पावलांचा आवाज न होवू देता दरवाजाजवळ गेला. बाहेर कोण आहे याचा अंदाज घेतला आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर डोकावून बघू लागला. समोर एंथोनी होता. स्टिव्हनने त्याला आत येण्यास खुणावून आत घेतले. जसा एंथोनी आत आला त्याने पुन्हा दरवाजा लावून घेतला.
रोनॉल्डने अजुन एक व्हिस्कीचा ग्लास भरीत म्हटले, अरे.. ये बस... जॉइन अवर कंपनी
एंथोनी रोनॉल्डने अॉफर केलेला ग्लास घेत त्यांच्यासोबत टेबलभोवती बसला.
चिअर्स रोनॉल्ड त्याच्या ग्लासला आपला ग्लास अलगद लावित म्हणाला.
चिअर्स, एंन्थोनीने तो ग्लास आपल्या तोंडाला लावला आणि तोही त्यांच्या कंपनीत सामिल झाला.
ज्तमंज
क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल, स्टिव्हन आणि एंथोनी टेबलभोवती बसून व्हिस्कीचे ग्लासवर ग्लास रिचवित होते. क्रिस्तोफर आणि त्याचे तिन दोस्त पिऊन टून्न झाले होते. एंथोनी आपला जपूनच पित होता.
मग एंथोनी ... इतक्या रात्री इकडे कुठे फिरतोय स्टिव्हन एंथोनीच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.
त्याला चांगलीच चढलेली दिसत होती.
खरं म्हणजे मी तुमच्याकडे त्या ट्रीटच्या संदर्भात आलो होतो एंथोनी संधी साधून मुळ मुद्यावर आला.
कोणती ट्रीट? पॉल म्हणाला.
एक तर त्याच्या लक्षात आले नव्हते किंवा तो तसं भासवित असावा.
अबे येड्या... तो त्या पोरीबद्दल बोलतोय एंथोनी स्पष्ट करण्याच्या आधीच रोनॉल्ड मध्ये बोलला.
बाय द वे... ट्रीटची तुम्हाला मजा आली की नाही एंथोनीने विचारले.
सगळेजण एकदम स्तब्ध, शांत आणि सिरीयस झाले. एंथोनी गोंधळून त्यांच्या चेहर्याकडे बघायला लागला.
हे बघ... तुझी ट्रीट सुरवातीला चांगली होती... पण नंतर शेवटी...
ते होतं ना एखाद्या वेळेस की सुप सुरवातीला चांगलं लागतं पण शेवटी बुडात साठलेल्या मिठामुळं त्याच्या चवीचा मजा किरकीरा होतो... रोनॉल्ड क्रिस्तोफरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाला.
तुम्ही लोक काय बोलता आहात मला काही समजत नाही आहे एंथोनी त्यांच्या चेहर्याकडे गोंधळून पाहात म्हणाला.
स्टिव्हनने क्रिस्तोफरकडे पाहत विचारले, सांगायचं का याला?
अरे का नाही... त्याला माहित करुन घ्यायचा हक्क आहे... शेवटी त्या कृत्यात तो आपला पार्टनर होता.. क्रिस्तोफर म्हणाला.
कृत्य ? ... कसलं कृत्य? एंथोनीने न राहवून विचारले.
खुन रोनॉल्ड थंडपणे म्हणाला.
ए त्याला खुन नको म्हणू .. तो एक एक्सीडेंट होता पॉल मधेच बोलला.
एंथोनीचा चेहरा भितीने पांढरा फटक पडला.
तुम्ही त्या पोरीचा खुन केला की काय? एंथोनी कसाबसा बोलला.
तुम्ही नाही ... आपण ... आपण सगळ्यांनी क्रिस्तोफरने त्याची दूरुस्ती केली.
एक मिनीट... एक मिनीट... तुम्ही त्या पोरीला जर मारले असेल ,,, तर इथे कुठे माझा संबंध येतोय एंथोनी आपला बचाव करीत म्हणाला.
हे बघ.. जर पोलिसांनी आम्हाला पकडले... तर ते आम्हाला विचारतील ... की तुम्हाला पोरीचा पत्ता कुणी दिला?.. रोनॉल्ड म्हणाला.
... तर आम्ही काहीही न सांगण्याचं जरी ठरवलं तरी आम्हाला सांगावच लागणार... पॉलने उरलेलं वाक्य पुर्ण केलं.
... की आम्हाला आमचा जिगरी मित्र एंथोनीने मदत केली पॉल दारुच्या नशेत बरळला.
हे बघा... तुम्ही मला विनाकारण अडकवित आहात एंथोनीने आता बचावाचा पावित्रा घेतला होता.
पण दोस्तहो... एक गंमत मात्र होणार आहे क्रिस्तोफर गालातल्या गालात हसत म्हणाला.
कोणती? रोनॉल्डने विचारले.
की पोलिसांनी आपल्याला पकडले आणि नंतर आपल्याला फाशी झाली... क्रिस्तोफरने मधे थांबून त्याच्या दोस्ताकडे पाहाले. ते एकदम सिरीयस झाले होते.
अबे ... लेकहो ... समजा आपल्याला फाशी झाली... क्रिस्तोफर स्टिव्हनच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.
पॉलने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला आणि उठून उभा राहत एक गिरकी घेतली. पुन्हा एक गिरकी घेत हसत तो म्हणाला, हं ... हं समजा
सगळेजण, फक्त एंन्थोनीला सोडून त्याच्यासोबत हसायला लागले.
पुन्हा खोलीतलं वातावरण पुर्ववत खेळीमेळीचं झालं.
हं तर समजा आपल्याला फाशी झाली ... तर आपल्याला त्याबद्दल काही खंत राहणार नाही... शेवटी आपण मिठाई खाल्लेली आहे... पण या बिचार्या एंथोनीला मिठाईची साधी चवसुध्दा मिळाली नाही ... अन फुकटचच फासावर लटकावं लागणार... क्रिस्तोफर म्हणाला.
खोलीतले सगळेजण, फक्त एक एंन्थोनी सोडून जोर जोराने हसायला लागले.
खरं म्हणजे मी इथे तुमच्या प्रत्येकाकडून दोन दोन हजार डॉलर्स घ्यायला आलो होतो एंथोनी म्हणाला.
दोन दोन हजार डॉलर्स ? ... मित्रा आता ते सगळं विसर... रोनॉल्ड म्हणाला.
एंथोनी त्याच्याकडे रागाने बघायला लागला.
हे बघ जर सगळं काही व्यवस्थीत झालं असतं तर आम्ही तुला स्वखुशीने पैसे दिले असते.. पण आता परिस्थीती वेगळी आहे... ती पोरगी मारल्या गेली आहे.. रोनॉल्ड त्याला समजावल्यागत म्हणाला.
.. म्हणजे अपघातात.. स्टिव्हनने मधेच जोडले.
तर आता ते सगळं निपटविण्यासाठी पैसा लागणार... रोनॉल्ड म्हणाला.
खरं म्हणजे... आम्हीच तुझ्याजवळ ते सगळं निपटविण्यासाठी आता पैसे मागणार होतो पॉल म्हणाला.
पुन्हा सगळेजण, एंथोनीला सोडून, जोर जोराने हसायला लागले. आधीच त्यांना चढली होती आणि ते आता त्याची उडवल्यागत हसत होते.
एंथोनीचे जबडे आवळल्या गेले. रागाने तो उठून उभा राहाला आणि तरातरा पाय आपटत तिथून निघून गेला. दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने दार रागाने जोरात आपटत ओढून घेतले होते.
छमनतवसवहल
एंथोनी कॉम्प्यूटरवर बसला होता. आणि एक काळी मांजर जिच्या गळ्यात काळा पट्टा बांधला होता ती त्याच्या आजुबाजुला खेळत होती. ज्या टबलवर कॉम्प्यूटर ठेवला होता त्या टेबलवर वायरचे तूकडे, मांजरीचे पट्टे, आणि काही इलेक्ट्रनिक्सचे छोटे छोटे उपकरणं इकडे तिकडे विखूरलेले होते. एंथोनीचं ज्या भिंतिकडे तोंड होतं त्या भिंतीवर न्यूरॉलॉजीच्या आणि ब्रेनच्या वेगवेगळ्या आकृत्या चिटकविलेल्या होत्या.
एंथोनीने विजेच्या चपळाईने कीबोर्डची आणि माऊसची काही बटनं दाबली आणि त्याच्या कॉम्प्यूटर स्क्रिनवर एक सॉफ्टवेअर ओपन झालं. त्या सॉफ्टवेअरचेही वेगवेगळे मेनु, वेगवेगळे बटन्स आणि टेक्स्ट बॉक्सेस दिसू लागले. त्या सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या बटनांपैकी एका बटनवर एंथोनीने माऊसने क्लीक केलं. त्या बटनावर अटॅक असं लिहिलं होतं. अचानक त्याच्या आजुबाजुला एका टेडीबिअरसोबत खेळणार्या त्या मांजरीने उग्र रुप धारण केले आणि ती त्या टेडी बिअरवर तूटन पडली. इतक्या क्रुरतेने त्या मांजरीने त्या टेडी बिअरवर हल्ला केला की काही क्षणातच तिने त्या टेडी बिअरचे दाताने फाडून तोडून छोटे छोटे तूकडे केले. मांजर त्या टेडी बिअरवर हमला करीत असतांना एंथोनी मोठ्या कुतुहलाने त्या मांजरीकडे पाहत होता. जेव्हा शेवटी त्या मांजरीने त्या टेडी बिअरचा फज्जा पाडला, एक विजयी हास्य एंथोनीच्या चेहर्यावर पसरले.
तेवढ्यात अचानक एंथोनीला समोरच्या दाराजवळ कशाचा तरी आवाज झाल्याची चाहूल लागली. एंथोनी सगळं जसं च्या तसं सोडून समोरच्या दाराकडे गेला. दार उघडलं तर दारात अपेक्षेप्रमाने त्याला वर्तमानपत्र पडलेलं दिसलं. त्याने ते उचललं, ते वर्तमानपत्र चाळत घरात परत आला आणि ते वर्तमान पत्र चाळतच त्याने दार लावून घेतलं. अचानक वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्याचं लक्ष आकर्षीत केलं. तो ती बातमी गंभीरतेने वाचत त्याच्या कॉम्प्यूटर जवळ आला. तो खुर्चीवर बसला आणि ती बातमी काळजीपुर्वक वाचू लागला.
तो जी बातमी वाचत होता तीचं हेडींग होतं नॅन्सीच्या भावाने त्या चौंघावर खटला भरला.
आणि त्या हेडींगच्या खालीच क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हनचे फोटो होते. त्याने तो पेपर समोर टेबलवर कॉम्प्यूटरच्या शेजारी ठेवला आणि तो विचार करु लागला. नॅन्सीला त्या चौघांनी बलात्कार करुन मारल्यानंतर जेव्हा तो त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता तेव्हाचा संवाद त्याला आठवला ....
तुम्ही त्या पोरीचा खुन केला की काय? एंथोनी कसाबसा बोलला.
तुम्ही नाही ... आपण ... आपण सगळ्यांनी क्रिस्तोफरने त्याची दूरुस्ती केली.
एक मिनीट... एक मिनीट... तुम्ही त्या पोरीला जर मारले असेल ,,, तर इथे कुठे माझा संबंध येतोय एंथोनी आपला बचाव करीत म्हणाला.
हे बघ.. जर पोलिसांनी आम्हाला पकडले... तर ते आम्हाला विचारतील ... की तुम्हाला पोरीचा पत्ता कुणी दिला?.. रोनॉल्ड म्हणाला.
... तर आम्ही काहीही न सांगण्याचं जरी ठरवलं तरी आम्हाला सांगावच लागणार... पॉलने उरलेलं वाक्य पुर्ण केलं.
... की आम्हाला आमचा जिगरी मित्र एंथोनीने मदत केली पॉल दारुच्या नशेत बरळला.
हे बघा... तुम्ही मला विनाकारण अडकवित आहात एंथोनीने आता बचावाचा पावित्रा घेतला होता.
पण दोस्तहो... एक गंमत मात्र होणार आहे क्रिस्तोफर गालातल्या गालात हसत म्हणाला.
कोणती? रोनॉल्डने विचारले.
की पोलिसांनी आपल्याला पकडले आणि नंतर आपल्याला फाशी झाली... क्रिस्तोफरने मधे थांबून त्याच्या दोस्ताकडे पाहाले. ते एकदम सिरीयस झाले होते.
अबे ... लेकहो ... समजा आपल्याला फाशी झाली... क्रिस्तोफर स्टिव्हनच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.
पॉलने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला आणि उठून उभा राहत एक गिरकी घेतली. पुन्हा एक गिरकी घेत हसत तो म्हणाला, हं ... हं समजा सगळेजण, फक्त एंन्थोनीला सोडून त्याच्यासोबत हसायला लागले.
पुन्हा खोलीतलं वातावरण पुर्ववत खेळीमेळीचं झालं.
हं तर समजा आपल्याला फाशी झाली ... तर आपल्याला त्याबद्दल काही खंत राहणार नाही... शेवटी आपण मिठाई खाल्लेली आहे... पण या बिचार्या एंथोनीला मिठाईची साधी चवसुध्दा मिळाली नाही ... अन फुकटचच फासावर लटकावं लागणार... क्रिस्तोफर म्हणाला.
खोलीतले सगळेजण, फक्त एक एंन्थोनी सोडून जोर जोराने हसायला लागले.
..... एंथोनी आपल्या विचारांच्या तंद्रीतून भानावर आला.
आता ही केस जर अशीच पुढे चालली तर केव्हा ना केव्हा क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हन आपलं नाव घेतील...
मग आपणही या केसमधे अडकल्या जावू....
नाही असं होता कामा नये....
आपल्याला यातून काही तरी मार्ग काढायलाच पाहिजे...
विचार करता करता एंथोनी त्याच्या आजुबाजुला खेळणार्या मांजरीकडे पाहत होता. अचानक एक विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला आणि त्याच्या चेहर्यावर एक गुढ हास्य दिसायला लागलं.
आपण या चौघांचाही काटा काढला तर?...
ना रहेगा बास न बजेगी बांसुरी...
टपेपज जव ळमवतहम
एंथोनीने या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लावण्याचं आता मनावर घेतलं होतं. शेवटी त्याला त्याची चमडी वाचवणं आवश्यक होतं. काय करायचं हे आता त्याने मनाशी पक्क करुन ठेवलं होतं. पण त्या आधी एकदा नॅन्सीच्या भावाला जावून भेटायचं असं त्याने ठरविलं. तशी नॅन्सीचा वर्गमित्र या नात्याने त्याची जॉर्जशी ओळख होतीच. जॉर्जला पुर्ण प्रकरणाची कितपत माहिती आहे आणि त्याला माहिती कुठून मिळाली हे त्याला बघायचं होतं. आणि महत्वाचं म्हणजे जॉर्जला त्याच्यावर काही संशय तर नाही हे त्याला बघायचं होतं.
एंथोनी जॉर्जच्या दरवाजासमोर येवून उभा राहाला. तो आता बेल दाबणार तेवढ्यात त्याला एका मोठी कर्कश्य विचित्र किंकाळी ऐकू आली. एक क्षण तर तो दचकलाच... की काय झालं. त्याचा बेल दाबणारा हात भितीमुळे मागे खेचल्या गेला.
प्रकरण काहीतरी गंभीर दिसते...
म्हणून तो दाराची बेल न दाबता जॉर्जच्या घराच्या खिडकीजवळ गेला. त्याने आत डोकावून बघितले....
... आत जॉर्जने त्याच्या एका हातात एक बाहुलं पकडलेलं होतं. त्या बाहुल्याकडे द्वेशाने आणि रागाने पाहून पुन्हा त्याने एक विचित्र कर्कश्य किकांळी फोडली. एंथोनीला त्या किंकाळी नंतर झालेली शांतता एक वेगळीच, गुढ आणि भयानक शांतता वाटत होती.
एंथोनी अजूनही खिडकीतून हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. आत चाललेल्या सगळ्या प्रकारावरुन त्याला तो जादूटोण्याचा काहीतरी प्रकार असावा असं वाटत होतं. पण त्याचा जादूटोण्यावर विश्वास नव्हता. तो आतली एक एक गोष्ट निरखून पाहू लागला...
... आत आता जॉर्ज त्या बाहुल्याशी बोलू लागला, स्टिव्हन... आता तू मरण्यास तयार हो
अचानक जॉर्जने आवाज बदलला आणि जणू तो त्या बाहुल्याच्या तोंडची वाक्य, ज्याला की तो स्टिव्हन समजत होता, बोलू लागला, नाही... मला मरायचं नाही आहे... जॉर्ज मी तुझी पाया पडून माफी मागतो... मला माफ कर... तु जे सांगशील ते मी करण्यास तयार आहे.. फक्त मला माफ कर...
जॉर्ज पुन्हा पुर्ववत त्याच्या आवाजात त्याची वाक्य बोलू लागला, तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस? ... तू माझ्या बहिणीला, नॅन्सीला परत आणू शकतोस काय?
नाही ... ते मी कसे काय करु शकेन... ते माझ्या आवाक्याबाहेरचे आहे... ते सोडून तू काहीही सांग... मी तुला वचन देतो मी ते तुझ्यासाठी करीन... पुन्हा जॉर्ज आवाज बदलून त्या बाहुल्याच्या म्हणजे स्टिव्हनच्या तोंडची वाक्य बोलू लागला.
तू माझ्यासाठी काहीही करु शकतोस नं... तर मग तयार हो... मला तुझा जिव हवाय... जॉर्ज पुन्हा आवाज बदलून त्याची स्वतरूची वाक्य बोलू लागला..
खिडकीतून हा सगळा प्रकार एंथोनी बराच वेळ पाहत होता. ते बघता बघता अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याच्या चेहर्यावर आता एक आनंदाची अघोरी चूणूक दिसू लागली. तो खिडकीतून बाजूला झाला. दरवाजाजवळ गेला. त्याने काहीतरी विचार केल्यासारखे केले आणि तो तसाच जॉर्जच्या दरवाजाची बेल न वाजवताच परत फिरला.
ब्वनतज ैजंजमउमदज
डिटेक्टिव्ह सॅम वेअरहाऊसमध्ये अजूनही जमिनीवर पडलेला होता. पण आता तो त्या ट्रान्स स्टेट मधून बाहेर आला होता. त्याने पटकन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितलं. आता कॉम्प्यूटर बंद होता. त्याने वेअरहाउसमध्ये आजुबाजुला बघितलं. आता बाहेर चागलं उजाडून सकाळ झाली होती त्यामुळं वेअर हाऊसमध्ये प्रकाश होता. मघाच्या वादळासारख्या हवेचे झोतही थांबले होते. तो आता उठून उभा राहाला आणि विचार करु लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष खाली पडलेल्या मघा तुटलेल्या फोटो फ्रेमकडे गेलं. त्याने ती फ्रेम उचलली आणि सुलटी करुन बघितली. तो एक ग्रुप फोटो होता. एंथोनी आणि त्या चार खुन्यांचा.
त्याला आता एक एक गोष्ट एकदम स्पष्टपणे उलगडली होती. तो खाली पडलेला असतांना त्याच्या समोरुन जे एक एक दृष्य गेलं होतं ते सगळं कदाचित नॅन्सीच्या अदृष्य अतृप्त आत्माला त्याला सांगायचं होतं. पण तिला ते त्याला सांगायची जरुरत का पडावी? तिने त्याला न सांगताही तिला जे पाहिजे ते ते होत होतं. आणि पुढेही होणार होतं.
मग तिने हे त्याला का सांगाव?...
नक्कीच काहीतरी कारण असावं?...
नक्कीच तिचा काहीतरी उद्देश असावा...
एंथोनीच्या केसची बर्याच दिवसापासून कोर्ट मध्ये सुनावनी सुरु झाली होती. प्रत्येक वेळी सॅम कोर्टमध्ये बसून केसची कारवाई ऐकायचा. इकडे केसची कारवाई सुरु असायची आणि त्याच्या डोक्यात तो एकच प्रश्न घोळत असायचा की नॅन्सीने ते सगळं सांगण्यासाठी त्याची निवड का केली असावी? आणि तिने ते सगळं त्याला सांगण्याचं कारण काय असावं?
की ते सगळं त्याने कोर्टमध्ये सांगावं असं तर तिला वाटत नसावं?...
पण जर ते सगळं कोर्टमध्ये सांगितलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार होता?...
उलट एका जिम्मेदार डिटेक्टीव्हच्या तोंडून अशा अंधश्रध्देच्या गोष्टी ऐकून लोकांनी त्याला खुळ्यात काढलं असतं...
खुळ्यातच नाही तर त्याच्या पुढील संपूर्ण करियरवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं...
तो विचार करीत होता. पण आज त्याला विचारात गुरफटायचं नव्हतं. आज त्याला कोर्टची कारवाई पुर्णपणे लक्ष देवून ऐकायची होती. कारण आज केसचा निकाल लागणार होता.
शेवटी इतक्या दिवसांपासून खोळंबलेल्या केसचे सर्व जाब जबाब झाले. सॅमचाही जाब झाला होता. त्याने जे पुराव्याने सिध्द होवू शकत होतं ते सगळं सांगितलं होतं.
शेवटी ती वेळ आली. ती घटका आली जिची सर्वजण मोठ्या आतूरतेने वाट पाहत होते — केसच्या निर्णयाची. सॅम आपल्या खुर्चीवर बसून जज काय निर्णय देतो हे एकण्यासाठी जजकडे पाहू लागला. तसे त्याच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचे भाव नव्हते. कोर्टरुमधील बाकी सर्व लोक श्वास रोखुन जजचा शेवटचा निर्णय ऐकण्यास उत्सुक होते.
जजने निर्णय सांगण्यास सुरवात केली —
श् सगळे पुरावे , सगळे जाबजवाब, आणि स्वतरू मि. एंथोनी क्लार्कचं दिलेलं स्टेटमेंट लक्षात घेता कोर्ट या निश्कर्षापयर्ंत पोहोचलं आहे की मि. एंथोनी क्लार्क हा मि. स्टिव्हन स्मिथ, मि. पॉल रोबर्टस, मि. रोनाल्ड पार्कर आणि मि. क्रिस्तोफर अंडरसन या चारही खुनांत दोषी आढळला आहे. त्याने हे चारही खुन जाणुन बुजून आणि योजनाबध्द रितीने अंमलात आणले होते.
निर्णयावर शिक्कामोर्तब करण्या आधी जज ने एक मोठा पॉज घेतला. कोर्टमध्ये बसलेल्या लोकांवरुन आपली नजर फिरवली आणि मग पुढे आपला अंतिम निर्णय सुणावला —
श् ...म्हणून कोर्ट आरोपी एंथोनी क्लार्कला देहांताची शिक्षा सुनावीत आहे
जजने निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयावर जे चार खुन झाले होते त्यांचे नातेवाईक उपस्थीत होते त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तर बर्याच जणांना हा निर्णय आवडलेला नव्हता. नॅन्सीचा भाऊ जॉर्ज तर नाराजगी व्यक्त करीत कोर्टातून उठून गेला होता. पण डिटेक्टीव सॅमच्या चेहर्यावर कोणतेही भाव उमटले नव्हते. ना आनंदाचे ना दुरूखाचे. पण निर्णय सुनावल्याबरोबर सॅमला बर्याच दिवसापासून सतावित असलेले कोडे उलगडले होते.
प्द जीम चतपेवद बमसस
डिटेक्टीव सॅम कारागृहात एंथोनीच्या समोर बसला होता. डिटेक्टिव सॅमला कशी सुरवात करावी काही कळत नव्हतं. शेवटी तो म्हणाला, मला इतके दिवसांचा प्रश्न पडला होता की ते सगळं नॅन्सीने मला का सांगावं?
नॅन्सी? ... तुम्ही काय बोलत आहात... ती तर मेली
ही जरा विचित्र आणि अद्भूत गोष्ट आहे ... पण तिचा आत्मा अजुन जिवंत आहे सॅम म्हणाला.
डिटेक्टीव सॅम ... तुम्ही हे काय बोलताय... तुम्ही माझी गंमत करताय?
नाही मी जे काही बोलतो जे काय सांगतो आहे ते मी सगळं अनुभवलेलं आहे... तुझा विश्वास न बसनं साहजीक आहे... माझाही सुरवातीला विश्वास बसला नव्हता सॅम म्हणाला.
सॅम इतक्या गंभीरतेने बोलतो आहे हे पाहून एंथोनीने तो काय बोलतो आहे हे आधी ऐकून घ्यायचं ठरविलं.
तुला जेव्हा कोर्टात जजने शिक्षा सुनावली तेव्हा मला कळलं की नॅन्सीने ते सगळं सांगण्यासाठी माझी निवड का केली? सॅम म्हणाला.
काय सांगण्यासाठी? एंथोनीने विचारले.
की तुच त्या चार जणांना नॅन्सीचा आणि जॉनचा पत्ता दिला होता
नाही मी नाही दिला एंथोनीने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.
खोटं बोलू नकोस सॅम आवाज चढवून म्हणाला.
एंथोनीने मान खाली घातली.
आता लपविण्यात काय अर्थ आहे?...
सजा तर आपल्याला झालीच आहे...
पण हे तुम्हाला कसं कळलं? एंथोनीने विचारले.
मला नॅन्सीनं सांगितलं सॅम म्हणाला.
पण ती तर मेली एंथोनी आश्चर्याने म्हणाला.
तिच्या आत्मानं ... तिच्या भूतानं सांगितलं मला सॅम म्हणाला.
एंथोनी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होता.
तिने मला यासाठी सांगितलं की माझ्यामार्फत तुला हे सगळं कळावं की जेही सगळे खुन झाले होते... ते प्रत्यक्षात तिने केले होते... आणि ते तु केलेले आहेत असा फक्त तिने भास निर्माण केला होता... आणि त्या खुनांबद्दल तुला जी सजा होत आहे ... ही तिचीच इच्छा असून अशा तर्हेने तिने तिचा तुझ्यावरचा बदला घेतला आहे
अहो ... ते सगळे खुन मी माझ्या मांजरीच्या सहाय्याने ... .ते सगळं इलेक्टॉनिक्स, वायरलेस ट्रान्समिशन वैगेरे मी सगळं तयार केलं होतं... एंथोनी पोट तिडकीने म्हणाला.
पण जेव्हा मी तुझं ते इलेक्टॉनिक्स, वायरलेस ट्रॉन्समिशन तपासलं तेव्हा ते वेअरहाऊसच्या दरवाजाच्या बाहेर सुध्दा काम करत नव्हतं... तर मग त्या चौघांच्या घरापयर्ंत ते सिग्नल पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सॅम म्हणाला.
एवढंच नाही तर तिने मला अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या तुझ्या व्यतिरिक्त कुणालाही माहीत माहीत नाहीत ...श् सॅम म्हणाला
जश्या? एंन्थोनीने विचारले.
जसं ... नॅन्सी आणि जॉनने, जेव्हा ते चौघंजण त्यांच्या मागावर होते आणि ते ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते तेव्हा त्यांनी तुला केलेला फोन.... नंतर तु त्यांना एखादी टॅक्सी थांबवून हिल्टन हॉटेलला जाण्याचे सांगितलेले... आणि तु त्यांचा केलेला विश्वासघात... दोन दोन हजार डॉलर्स प्रत्येकाकडून घेण्याच्या बदल्यात तु त्यांना दिलेला त्यांचा पत्ता...आणि तु जेव्हा पैसे घेण्यासाठी गेला होता तेव्हा त्यांनी तुलाही या केसमध्ये अडकविण्याची दिलेली धमकी... सॅम एक एक करुन सगळं सांगत होता.
आता मात्र एंथोनी आ वासून सॅमकडे भितीमिश्रीत आश्चर्याने पाहत होता. एका मागे एक आश्चर्याचे धक्के त्याला बसत होते. तो विचार करायला लागला.
ही जी सगळी माहिती त्याने सांगितली होती ती त्याच्याव्यतिरिक्त अजुन कुणाला माहित होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता...
मग ह्या गोष्टी सॅम ला कशा कळल्या ?..
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोनने त्या चार जणांना नॅन्सी आणि जॉनचा पत्ता कळविण्याची गोष्ट सॅमला कशी कळली ...
आणि आता तो म्हणतो सिग्नल ट्रान्समिशन दरवाजाच्या बाहेर सुध्दा पोहोचत नव्हतं...
एंथोनी आता गहन विचारात पडला होता.
त्याला सॅम म्हणतो त्यात तथ्य वाटायला लागलं होतं...
पण हे कसं शक्य आहे? ...
एंथोनीचा भूतावर आणि आत्म्यावर कधीच विश्वास नव्हता.
त्याला जाणवत होतं की कळत नकळत त्याच्या शरीरात कंप सुटतो आहे.
तुम्ही म्हणता हे जर खरं मानलं... तर तिने डायरेक्ट त्या चार जणांना आणि मग मला असं का मारलं नाही.. हा सगळा खेळ करण्याची काय गरज होती... अजुनही एंथोनीची खुमखुमी शिल्लक होती.
तिनं असं का केलं? हे तिचं तिला माहित... पण तिनेच त्या चार जणांना मारुन तुला त्यांच्या खुनांच्या आरोपात अडकविलं आहे एवढं मात्र खरं... सॅम म्हणाला.
एंथोनी आता अगदी गंभीर झाला होता. खुनाचा एक एक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरुन जात होता. आणि प्रत्येक प्रसंगात आता त्याला नॅन्सीची अदृष्य उपस्थीती जाणवायला लागली होती.
पण मला एक कळत नाही... की तु कोर्टात तिचा बदला घेण्यासाठी त्यांना मारलं असं खोटं का सांगितलं? सॅमने शेवटी त्याच्या मर्मावर हात ठेवला होता.
एंथोनी गंभीर होता तो अजून गंभीर झाला. आता त्याचे डोळे हळू हळू पाणावू लागले होते.
त्याने सॅमचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याचा संयमाचा बांध तुटला. तो त्याच्या हातात आपलं डोकं खुपसून ओक्साबोक्शी रडू लागला.
तिचा खुन व्हावा अशी माही बिलकूल इच्छा नव्हती... पण त्या हरामखोरांनी तिला मारुन टाकलं... मी तिला प्रपोज केले आणि तिने मला नकार दिला होता... म्हणून तिचा गरुर तोडण्याची खुमखुमी माझ्या मनात बर्याच दिवसांची घर करुन होती होती ... आणि त्या दिवशी जॉनचा फोन आला आणि तो चान्स मला मिळाला... तिचा फक्त बलात्कार व्हावा आणि तिचा गर्व तुटावा एवढीच माझी इच्छा होती... पण नंतर वेगळ्याच गोष्टी होत गेल्या... तिचा खुन झाला... त्या चौंघांनी मलाही त्यात गोवण्याची धमकी दिली ... म्हणून मी त्या चौघांचा काटा काढण्याचं ठरविलं... आणि मग मी त्यांचा एक एक करुन खुन केला.... एंथोनी रडता रडता सगळं सांगु लागला होता.
सॅमला काय बोलावं काही कळत नव्हतं.
थोड्या वेळाने एंथोनी शांत झाला.
तेव्हा पुन्हा सॅमने विचारले, पण तु कोर्टात तिचा बदला घेण्यासाठी त्यांना मारलं असं खोटं का सांगितलं?
पुन्हा रडकुंडी येवून एंथोनी म्हणाला, सांगतो ... पण प्लीज ते तुमच्यात आणि माझ्यातच ठेवा.. बाकी कुणाला कळता कामा नये
ठिक आहे मी कुणालाच सांगणार नाही सॅमने आश्वासन दिले.
मी नॅन्सीसोबत जे केलं ते जर माझ्या घरच्यांना आणि सार्या जगाला कळलं तर त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहील... आता मला फाशी होत आहे... ती मी माझ्या प्रेमीकेचा बदला म्हणून केलेल्या खुनांबद्दल होत आहे असं चूकीचं समजून का होईना कमीत कमी त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक आदर आणि इज्जत आहे... ती इज्जत मी मरेपयर्ंत तरी कृपा करुन तशीच राहू द्या ... एंथोनीने आता सॅमचे पाय धरले होते.
सॅमला त्याची ही अशी अगतिक परीस्थिती पाहून त्याची किवही येत होती. त्याला काय करावे काही सुचत नव्हते.
पण नाही ... काहीही झालं तरी एंथोनीने केलेला गुन्हा हा क्षम्य नाही ....
त्याच्या डोक्यावर ठेवण्यासाठी पुढे केलेला हात त्याने तसाच मागे ओढून घेतला. एंथोनीने पकडलेले पायही त्याने मागे खेचून घेतले. तो उठला आणि जड पावलाने बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे गेला. चालता चालता दरवाजापाशी थांबला आणि मागे वळून एंन्थोनीला म्हणाला, ष्ष् नॅन्सीची तुला एक गोष्ट सांगण्याची इच्छा आहे
कोणती? एंन्थोनीने आपले डोळे पुसत जड आवाजात विचारले.
की ती तुला कधीही माफ करु शकणार नाही
सॅम तिथून भराभर मोठमोठे पावलं टाकीत निघून गेला होता आणि एंन्थोनी भितीने काळवंडलेल्या, रडवेल्या चेहर्याने त्याच्या जाणार्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत होता.
अश्रूचे दोन टपोरे थेंब
आता थोड्याच वेळात एंथोनीला डेथ चेंबरमध्ये इलेक्ट्रीकच्या चेअरवर बसवून देहांताची शिक्षा देण्यात येणार होती. डिटेक्टीव सॅम, शिक्षा देणारा अधिकारी, एक डॉक्टर आणि अजून एकदोन अॉफिसर्स डेथ चेंबरच्या समोर उभे होते. तेवढ्यात दोन पोलिस अधिकारी बेड्या घातलेल्या अवस्थेत एंथोनीला तिथे घेवून आले. देहांताची शिक्षा देण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या अधिकार्याने आपल्या घड्याळाकडे बघितले आणि पोलिस अधिकार्यांना खुनावले. पोलिस अधिकार्यांनी एंथोनीला इलेक्ट्रीक चेअरकडे नेले.
अॉपेरटर कुठे आहे त्यातल्या एका अधिकार्याने विचारले.
एक माणूस लगबगीने समोर आला. आणि इलेक्ट्रीक चेअर अॉपरेट करण्याच्या पॅनलजवळ गेला.
ज्या पोलिसांनी एंथोनीला इलेक्ट्रीक चेअरजवळ नेले होते त्यांनी त्याला आता त्या खुर्चीवर बसविले. काळ्या कापडाने त्याचा चेहरा झाकण्यात आला. मग ते पोलिस इलेक्ट्रीक चेअर चेंबरमधून बाहेर आले आणि त्यांनी चेंबर बंद करुन घेतले.
मुख्य अधिकार्याने पॅनलजवळ उभ्या असलेल्या अॉपरेटरकडे बघितले. अॉपरेटर एकदम तयार असल्याच्या पाविर्त्यात त्या पॅनलजवळ उभा होता. पुन्हा तो अधिकारी घड्याळाकडे पाहू लागला. कदाचीत त्याची उलटी गीणती सुरु असावी.
जरी त्या लोकांना हे नेहमीचं असलं तरी वातावरणात नाही म्हटलं तरी थोडा तणाव दिसायला लागला.
अचानक त्या अधिकार्याने अॉपरेटरला इशारा केला.
अॉपरेटरने एका क्षणाचाही विलंब न लावता इलेक्ट्रीक चेअर पॅनलवरचे एक लाल बटन दाबले.
थोड्या वेळाने अॉपरेटरने काम तमाम झालं या पाविर्त्यात त्या अधिकार्याकडे बघितलं.
डॉक्टर त्या अधिकार्याने डॉक्टरच्या नावाचा पुकारा केला.
डॉक्टर लगबगीने इलेक्ट्रीक चेअर चेंबरजवळ गेला, चेंबर उघडलं आणि आत गेला.
सर ही इज डेड आतूनच डॉक्टरचा आवाज आला.
तो अधिकारी गर्रकन वळला आणि ती जागा सोडून चालता झाला. तो अॉपरेटर तिथेच बाजुला असलेल्या एका खोलीत गेला. तिथे बाजुलाच उभा असलेला एक स्टाफ मेंबर त्या चेंबरमध्ये, कदाचित चेंबर साफ करण्यासाठी शिरला. सगळं कसं एखाद्या कवायतीप्रमाणे सुरु होतं. त्या सगळ्यांना जरी ते नेहमीचंच असलं तरी सॅमसाठी काही तो नेहमी पार पडणारा सोहळा नव्हता. तो अजुनही तिथेच उभा राहून एक एक सोपस्कार न्याहाळून पाहत होता.
आता डॉक्टरही तिथून निघून गेला होता.
आता फक्त तिथे सॅम एकटाच उरला होता. तो अजुनही तिथे स्तब्ध उभा होता, त्याच्या डोक्यात कदाचित वेगळेच विचार सुरु असावेत.
अचानक कुणीतरी लगबगीने त्याच्या पाठीमागुन तिथे आला.
अच्छा झालं वाटते मागुन आवाज आला.
सॅमने वळून मागे पाहाले आणि सॅमला आश्चर्याचा धक्काच बसला. अॉपरेटर त्याच्या समोर उभा होता.
हा तर आत्ताच पॅनल अॉपरेट करुन त्या बाजुच्या खोलीत शिरला होता...
मग आत्ताच्या आत्ता हा इकडून कुठून आला...
मला काळजी होती की माझ्या अनुपस्थीतीत सगळं कस काय पार पडेल... तो अॉपरेटर म्हणाला.
बाय द वे कुणी अॉपरेट केलं पॅनल त्या अॉपरेटरने सॅमला विचारले.
सॅमला एकावर एक आश्चर्याचे धक्के बसत होते.
सॅमने बाजुच्या खोलीकडे बघितले.
कुणी अॉपरेट केला म्हणजे?... तुच तर अॉपरेट केला सॅम अविश्वासाने म्हणाला.
काय गोष्टी करता... मी तर हा आता इथे आलो.. त्या अॉपरेटरने म्हटले.
सॅमने पुन्हा गोंधळून त्याच्याकडे आणि मग त्या बाजुच्या रुमकडे बघितले ज्यात तो मघा गेला होता.
ये माझ्या सोबत ये सॅम त्याला त्या बाजुच्या खोलीकडे घेवून गेला.
सॅमने त्या खोलीचं दार ढकललं. दार आतून बंद होतं. त्याने दारावर नॉक केलं. आतून काहीच प्रतिसाद नव्हता. सॅमने आता ते दार जोर जोराने बडविण्यास सुरवात केली. तरीही आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती. सॅम आपल्या पुर्ण ताकदीनिशी त्या दाराला ढकलायला लागला. तो गोंधळलेला अॉपरेटरही आता त्याला ढकलण्यास मदत करु लागला.
जोर जोराने ढकलून आणि धक्के देवून शेवटी सॅमने आणि त्या अॉपरेटरने ते दार तोडले.
दार तुटताच सॅम आणि तो अॉपरेटर लगबगीने खोलीत शिरले. त्यांनी खोलीत चौफेर आपली नजर फिरवली. खोलीत कुणीच नव्हतं. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. त्या अॉपरेटरच्या चेहर्यावर गोंधळलेले भाव होते तर सॅमच्या चेहर्यावर अगम्य असे भितीदायक भाव उमटले होते.
अचानक वरुन काहीतरी खाली पडलं. दोघांनी दचकुन बघितलं. ती एक काळी मांजर होती, जिने वरुन उडी मारली होती. ती मांजर आता सॅमच्या अगदी समोर उभी राहाली आणि एकटक सॅमकडे पहायला लागली. अचानक ते आश्चर्याने तोंड वासून त्या मांजरीकडे पाहू लागले. हळू हळू त्या काळ्या मांजराचं रुपांतर नॅन्सीच्या सडलेल्या मृतदेहात होवू लागलं. त्या अॉपरेटरचे तर हातपाय लट लट कापत होते. सॅमही थीजल्यागत, पुतळ्यासारखा स्थिर जे त्याच्यासमोर घडत होतं ते पाहत होता. हळू हळू त्या सडलेल्या मृतदेहाचं रुपांतर एका सुंदर अशा तरुण स्त्रीमध्ये झालं. हो, ती नॅन्सीच होती. आता तिच्या चेहर्यावर एक समाधान दिसत होतं. बघता बघता तिच्या डोळ्यांतून दोन मोठे टपोरे अश्रू घरंगळून तिच्या गालावर आले आणि हळू हळू ती तिथून अदृष्य होवून नाहीशी झाली.