Katha ek mrugajkachi - 4 in Marathi Fiction Stories by Naeem Shaikh books and stories PDF | कथा एक मृगजळाची - 4

Featured Books
Categories
Share

कथा एक मृगजळाची - 4

“निधी आणि अमन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड होते, पहिल्या वर्षापासून त्यांच्याच हेच नात होतं. शेवटच्या वर्षाला अमनने आमच्या कॉलेजमधल्या एका मुलीला मारलं आणि तिची छेडही काढली म्हणून त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर त्याला कॉलेजमधून काढलं. त्यानंतर तो हे गाव सोडून निघून गेला... मला एवढंच माहित आहे...”

पोलीसांसमोर बसलेला नवीन बोलत होता. तो त्याच गावात राहणारा आणि माझ्याच क्लासमध्ये माझ्यासोबत शिकलेला होता. त्याला खरंतर जास्त काहीही माहित नव्हतं. अजींक्यला जे माहित होतं, तेच त्याने सांगितलं होतं त्यामुळे त्याच्या माहितीचा अमनला काहीही फायदा झाला नाही. अजींक्यने त्याला जायला सांगितले. त्यांच्या सगळ्या प्रयत्ना नंतर ते फिरून त्याच त्याच माहितीवर येत होता.

“पाच वर्षांपुर्वी त्याच्यावर अन्याय झाला. त्याला त्याचा राग असेल तर मग त्याने त्याच वेळी का बदला घेतला नाही. पाच वर्षानंतर त्याचं आणि राकेशचं घर जवळ जवळ असने, राकेशची बायको आधी बेपत्ता झाली, त्यानंतर तिचा खुन केल्याची त्याने तक्रार केली, त्याने दाखवलेल्या जागेवर निधंच नाही तर राकेशचं शव सापडलं... मग ती जिवंत आहे का¿... जर असा विचार केला की अमनला त्याचा जुना प्रेम पाच वर्षांनंतर परत भेटला आणि निधीने नकार दिल्यानंतर त्याने निधीचा अपहरण केला. राकेशला त्याचा पत्ता कळताच त्याने राकेशचा खुन केला.... पण मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार का नोंदवायला सांगितली.... का....”

बराच उशीर झाला होता. अजींक्य रात्री काम आटपून घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याने दुचाकी चालू केली. तेवढ्यात त्याला नेहाचा फोन आला.

“हॅलो नेहा, कुठंपर्यंत आलीस¿”

“मी आता घरी पोहोचली आहे. तू कुठं आहेस¿”

“पोलीस स्टेशनमधून निघतोय...”

“एक काम कर, येताना हॉटेलमधून जेवन घेऊन ये. मी आज खुप दमलीये. जेवन नाही बनवू शकणार...”

“ओके... मी येताना पार्सल आनतो... पोहोचतोच अर्ध्या तासात... चल बाय...”

“बाय.”

अजींक्यने मोबाईल खिशात ठेवला. गाडीला किक मारुन गाडी चालू केली. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला काहीतरी दिसलं. काही अंतरावर एका व्यक्तीची आकृती त्याला दिसली. तो मी होतो, जो त्या अंधारात उभा होतो. तो माझ्याकडे निट लक्षपुर्वक पाहत होता. मी त्याच्या दशेने हळूहळू चालत जात होतो. त्याला अजूनही निट समजले नव्हते की त्याला दिसणारी आकृती माझी आहे ते.

“कोण आहे तिकडे¿”

मी काहीही उत्तर दिले नाही. मी त्याच्या दिशेने चालत राहिलो. ज्यावेळी त्याला माझा चेहेरा दिसताच त्याने गाडी स्टँडवर लावली आणि धावत माझ्याजवळ आला. त्याने माझ्या कॉलरला धरले. कॉलरवर त्याची पकड मजबूत असल्याचे मला जाणवत होते.

“मी पळून जाणार नाही. पळायचंच असतं तर समोर आलो तरी असतो का¿”

त्याने दुसर्-या हाताने माझ्या दंडाला धरले आणि तो म्हणाला -

“तुला आता नाही सोडणार... काहीही शहाणपणा न करता जेलमध्ये चलायचं.”

अजींक्य मला ओढत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला. आत प्रवेश करताच त्याने हवलदार शिंदेला तुरुंगाचे कुलूप काढायला सांगितले. कुलूप उघडताच मला त्याने सरळ तुरुंगात टाकले. बाकी हवलदार मला तुरुंगात टाकताना पाहत होते. जो व्यक्ती शोधूनही सापडत नव्हता, त्या व्यक्तीला तुरुंगाच्या मागे पाहून सर्वांच्या चेहेर्-यावर आनंद दिसू लागले. रात्रीची वेळ, तुरुंगातल्या अंधारात एक पिवळा बल्ब लुकलुकत होता. त्या बल्बाचा प्रकाश फार काही लांब पर्यंत पडत नव्हता. त्या तुरुंगाच्या कोपर्-यात अजूनही अंधार कायम होता. तुरुंगा बाहेर हवलदार आणि सब इंस्पेक्टर अजींक्य एकमेकांना शब्बासकी देत होते. खरंतर त्यांच्यापैकी कोणीही शब्बासकीच्या लायकीचे नव्हते हे त्यांना सुध्दा माहीत होते. पण त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या हसण्यावरुन व्यक्त करत होते. त्याच प्रकारच्या भावणा व्यक्त करनारे हस्य त्या तुरुंगाच्या अंधारमय कोपर्-यातून मी त्यांच्या पर्यंत पोहोचवले. त्या हसण्याचे आवाज जेव्हा अजींक्य आणि इतरांच्या कानावर पडले तेव्हा अचानक वातावरणात शांतता पसरली. त्या शांततेला भंग करत माझा हसण्याचा आवाज त्या परीसरात घुमत होता. अजींक्य दबक्या पावलांनी तुरुंगा जवळ पोहोचला. तो तुरुंगाच्या जवळ आल्याचे कळताच मी त्या अंधारातून बल्बच्या प्रकाशात आलो. माझ्या चेहेर्-यावरचे हसू हे अजींक्यच्या मनात भिती उत्पन्न करणारे होते.

“काय झालं हसायला¿ तुला अजूनही विश्वास होत नाही का... तू तुरुंगात आहेस. तुला मी अटक केलीये.”

अजींक्याच्या शब्दांना ऐकून मला पुन्हा हसू आले.

“तुम्ही मला अटक केलं¿... तुमची स्मरण शक्ती खुपच कमजोर आहे.... जास्त आनंदीत होऊ नका. आता कुठं या कथेला सुरुवात झाली आहे साहेब. माझ्या अटी पुर्ण कराव्या लागणार आहेत...”

“मी या कथेचा अंत कसा करतो, आता तू पाहाच.... नाहीतरी कुठं पळून जाणार आहेस. तुझा मुक्काम आता तुरुंगातच आहे.”

अजींक्य मागे फिरला आणि हवलदारांच्या दिशेने चालू लागला. सर्व हवलदार त्यांच्या संभाषणावर लक्ष ठेऊन होते.

“आजचं माझं काम झालं. आता मी जातो. माझी बायको माझी वाट पाहत असेल.”

अजींक्य चेहेर्-यावर हसू ठेऊन बोलत होता. पण मनातली भिती कमी झाली नव्हती. पण त्याचे मन कदाचित त्याला या स्वप्नात ठेऊन होते की सर्व काही त्याच्या मना प्रमाणे झाले आहे. त्याला स्वप्नांच्या जगातून बाहेर काढावे लागणार होते. त्यामुळे त्याला थांबवत मी म्हणालो -

“वाट पाहण्यासाठी बायको घरी असायला हवी ना.... एकदा फोन करुन विचारा तरी... मला पुर्ण विश्वास आहे की फोन केल्यानंतर तुमच्या बायकोचा फोन स्विच ऑफ सांगेल.”

अजींक्यच्या मनातली भिती आता वाढू लागली होती. हृदयाच्या स्पंदनांमध्ये विलक्षण वाढ झाली होती. त्याने तातडीने मोबाईल बाहेर काढला आणि नेहाला फोन लावला. त्याची भिती खरी ठरली. तिचा फोन स्विच ऑफ सांगत होता.

“साहेब एक काम करा... एका हवलदाराला तुमच्या घरी पाठवा. घरात तुमची बायको नाहीये, पण तरीसुध्दा खात्री करुन घ्या.”

माझ्या शब्दांनी अजींक्य माझ्या अंगावर धाऊन आला. मी तुरुंगाच्या जवळ उभा असल्याने त्याने समोरून माझी कॉलर धरुन मला स्वतःजवळ ओढले.

“अमन....” अजींक्य मोठ्याने ओरडला.

“जर तिला काहीही झालं तर तुला मी जीवंत सोडणार नाही.”

“तिचं नाव नेहा आहे ना...”

मी त्याला हसत विचारले -

“तू मला मारुन टाक... आताच, या क्षणी मारुन टाक. तसही मला जगायचं नाहीये. पण तू मला आताच मारलंस तर तुला नेहा कशी सापडणार¿”

“तुला काय हवंय¿”

माझी कॉलर सोडत अजींक्यने मला विचारले.

“मी सांगितलं होतं तेच... तुम्हाला माझ्या अटी मान्य कराव्या लागतील...”

“कसल्या अटी¿”

“माझ्या तिन अटी आहेत. त्या तिन अटी पुर्ण होतील त्यावेळी मी तुम्हाला नेहा कुठं आहे त्याचा पत्ता सांगेन.¿”

“मान्य आहे.”

एक क्षणही वाया न घालवता अजींक्यने होकार दिला.

“माझ्या अटी ऐकून तरी घ्या.... तुम्ही तर लगेच हो म्हणालात..”

मी पुन्हा तुरुंगाच्या अंधारात बुडालेल्या तुरुंगाच्या कोपर्-यांकडे जाताना बोलत होतो –

“हे खुप साधं आणि सोप्प आणि सरळ आहे. माझ्या तिन अटी आहे. अटी पुर्ण झाल्या आणि तुम्हाला तुमच्या प्रिय नेहाचा पत्ता मिळाला म्हणून समजा. पण जर तुम्ही अटी पुर्ण केल्या नाही किंवा तिन पैकी एकही अट अपुर्ण राहिली तर... तुम्ही नेहाला आयुष्यभर पाहू शकणार नाही. अटी पुर्ण झाल्या नाही तर नेहा मेल्यात जमा होईल आणि ती मेलेली निधी तुम्हाला कधीच सापडणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.”

“अटी सांग...”

त्याचा चेहेरा लाल झाला होता. मी त्याच्या दिशेने वळून तुरुंगातील कट्ट्यावर बसत बोलू लागलो.

“तिन अटी... तुम्हाला एका व्यक्ती कडून विस कोटी रुपये आणून मला द्यायचे आहे, त्या नंतर मला एक नग्न व्यक्तीला पाहायचा आहे. आणि शेवटी एक खुन करायचा आहे...”

“तू मला समजतोस काय... तू काय कोण्या सामान्य मानसाला ब्लॅकमेल करत नाहीये. तू एका सब इंस्पेक्टरला ब्लॅकमेल करतोयस. तुरुंगात बसून एका पोलीसवाल्याच्या बायकोला किडन्यॅप केल्याचं सांगतोय आणि तिला सोडवण्याच्या बदल्यात अटी घालतोय... तू खरंच वेडा आहेस... आणि तुझा हा वेडापणा मी आज रात्रीच काढणार आहे.”

“प्रयत्न करुन पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला परीस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्गच दिसणार नाही आणि तुमचं तुमच्या बायको बद्दलचं प्रेम तुम्हाला रडायला भाग पाडेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या. तुमच्यासाठी माझ्या अटींची स्कीम चालूच राहिल.”

अजींक्य मागे फिरला. झपाझप पावले टाकत टेबलाजवळ आला. तिथल्या फोनवरुन नेहाच्या मोबाईलवर फोन लावला. अजूनही तिचा मोबाईल स्विच्च ऑफ सांगत होता.

“शिंदे, एक काम करा. माझ्या घरी जावा आणि नेहा आहे का ते पाहा आणि मला सांगा.”

“ओके सर.”

हवलदार शिंदे पुढच्याच क्षणाला अजींक्यच्या घराकडे निघाला.

“डोहिफोडे, तुम्ही नेहाचा मोबाईल ट्रॅक करा आणि तिच्या मोबाईलचा लास्ट लोकेशन काय दाखवतं होता ते मला सांगा.”

अजींक्यची आज्ञा मिळताच डोहिफोडे हवलदार कामाला लागले.

अजींक्यने खिशातला वायरलेस वॉकीटोकी काढला.

“हॅलो... हॅलो, मी सब इंस्पेक्टर अजींक्य जाधव बोलत आहे...”

“यस् सर...नंबर ८ पोस्टवरुन मी हवलदार जगदाळे बोलतोय..”

“तीथून जाणार्-या प्रत्येक चार चाकी गाड्यांना थांबवून तपासा. एक किडण्यापींगची केस आहे. २८ वर्षाची महिला आहे. जर कोणावर संशय असेल तर त्याला थांबवून ठेवा आणि मला लगेच इन्फॉर्म करा...”

“ओके सर...”

अजींक्यने वायरलेस टेबलावर टाकला.

“शहरापासूरन बाहेर जाणार्-या सगळ्या रस्त्यांवर नाका बंदी करा आणि त्यांना सांगा प्रत्येक चार चाकी गाड्यांची झडती घ्या आणि...”

अजींक्य त्याच्या समोर उभ्या हवलदाराला सांगत होता. त्या तणावपुर्ण वातावरणात माझ्या हसण्याचा आवाज त्याला आला.

“काहीही केलं तरी तुम्हाला ती नाही सापडणार... शेवटी तुम्हाला माझ्या तिन अटी मान्य कराव्याच लागतील.”

अजींक्य माझ्याकडे रागात पाहत होता. पण अजींक्यने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या कामाकडे वळाला.

मी तुरुंगाच्या कट्ट्यावर बसून बाहेर चाललेला खेळ पाहत होतो. बाहेर पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ चालला होता. शिंदे हवलदारांचा फोन आला. त्यांच्याकडून कळाले की अजींक्यच्या घराला कुलूप होते. अजींक्यची नेहाबद्दलची काळजी वाढली. तेवढ्यात डोहिफोडे हवलदार पोलीस स्टेशनमध्ये आले.

“सर, नेहा मॅडमच्या मोबाईलचा लास्ट लोकेशन तुमच्या घरातचं दाखवतंय... तिथचं मोबाईल स्विच्च ऑफ झाला आहे.”

“याचा अर्थ खरंच नेहा किडण्याप झाली आहे... डोहिफोडे, तुम्ही नाक्यांवरती जाऊन पाहा, तिथल्या तपासण्या कशा चालल्या आहेत. काही अपडेट असतील तर मला लगेच कळवा... नेहा माझ्याशी दहा मिनीटांपुर्वीच फोनवर बोलली होती. तिचा अपहरण करून ते किडन्यॅपर जास्त लांब गेले नसतील.”

डोहिफोडे पोलीस स्टेशनमधून बाहेर गेला. अजींक्यने टेबलावरची काठी उचलली. माझ्या तुरुंगात येऊन त्याने माझ्यावर त्या काठीने वार केला. तो वार माझ्या खांद्यावर बसला. मी कट्ट्यावरुन खाली पडला. मला आणखि दोन फटके मारुन अजींक्यने विचारले.

“नेहा कुठंय... सांग नाहीतर तुला मी जिवंत सोडणार नाही...”

तेवढ्यात पोलीस स्टेशनमध्ये व्हिडीयो कॅमेरा आणि माईक घेतलेली सात ते आठ मानसं आली.

“जसं आपण पाहत आहात एका व्यक्तीला त्याच्या विरुध्द अरेस्ट वॉरेन्ट नसताना किंवा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना त्याला तुरुंगात गेल्या कित्तेक तासा पासून ठेवले आहे आणि आता जसं आपण पाहिलं की त्याला सब इंस्पेक्टरांनी जसं त्याच्यावर काठींनी वार केला. याच्यावरुन पोलीसांची दादागिरी कशी चालली आहे ते दिसून येत आहे.”

त्यांच्यातला एक वार्ताहर कॅमेर्-याकडे पाहून म्हणाला.

“तुम्ही आत कसं आलात...”

अजींक्य तुरुंगातून रागात बाहेर आला. त्यांच्या दिशेने काठी दाखवत तो पुढं बोलू लागला.

“पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल मी तुमच्यावर गुन्हा दाखल करुन तुम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकू शकतो.”

अजींक्यची धमकी ऐकून तो वार्ताहर पुन्हा कॅमेर्-याकडे पाहून बोलू लागला.

“जसं आपण पाहत आहात. पोलीस सरळ सरळ मिडीयाला धमकी देत आहेत. आता पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की....”

अजींक्यने रागाच्या भरात त्या वार्ताहराच्या कॉलरला धरून त्याला मागे ओढला आणि त्याच्या समोरच्या कॅमेर्-याला खाली आपटले. अजींक्यच्या त्या वगण्याने सर्व वार्ताहर रागावले. पण त्याच दरम्याने त्यांच्यापैकी एका वार्ताहराची नजर माझ्यावर गेली. मी तुरुंगाच जमीनीवर पडलेलो, वेदनांनी कन्हंत होतो.

“अरे – अरे, त्याला पाहा. तो खुप सिरीअस आहे वाटतं.”

त्याचं एकल्यानंतर तुरुंगा जवळचा हवलदार धावत तुरुंगात आला. माझे हात, पाय आणि त्याचा चेहेरा सुजला होता. तसंच संपुर्ण अंग लाल पडला होता. त्याचा श्वासोच्छवास मंद होऊ लागला.

“सर, हा खुप सिरीअस झाला आहे. याला श्वास घेता येत नाहीये.”

अजींक्यही तुरुंगात आला. मला पाहून अजींक्यलाही आश्चर्य वाटले.

“याला लवकरात लवकर हॉस्पीटलमध्ये घेऊन चला, नाहीतर हा इथंच मरेल...”

तुरुंगा जवळ उभा वार्ताहर इतरांना म्हणाला. तुरुंगात अजींक्य माझ्या सुजलेल्या आणि लाल पजलेल्या अंगाना पुन्हा पुन्हा तपासत होता. अजींक्यच्या कानाजवळ जाऊन दबक्या आवाजात हवलदार म्हणाला-

“सर, हा जर इथं मेला तर आपल्याला खुप त्रास होईल. आपल्याला वरच्या अधीकार्-यांना उत्तर द्यावी लागतील. याच्या विरोधात खरंच कोणतेही ठोस पुरावे नाहीत, त्याच्या विरोधात कसल्याही प्रकारची तक्रार नोंदवलेली नाही किंवा अरेस्ट वोरंटही नाही... त्यामुळे याला इथं ठेवनं बरोबर राहणार नाही. आता याला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाऊद्या.”

तुरुंगा बाहेर उभ्या असणार्-यांपैकी तिन जण धावत आले. त्यांनी मला उचलले आणि त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. मिडीयावाले सर्वजण त्या गाडीच्या मागे निघून गेले.

“या मिडीया वाल्यांना बोलवले कोणी असेल¿... आणि मी त्या अमनला एवढं मारलंही नाही. मग तो एवढा सिरीअस झाला तरी कसा...”

अजींक्य तुरुंगातंच जमीनीवर बसला होता. काही क्षणातंच काय झालं त्यालाही कळाले नाही. बाहेर उभा हवलदार त्याच्याकडे पाहत होता. आणि अजींक्य विचारात मग्न तुरुंगात बसून राहिला.

***

सकाळचे १०.३० वाजले होते. अजींक्य चहाचा ग्लास टेबलावर ठेवत बोलू लागला.

“तो तिथं हॉस्पीटलमध्ये आरामात झोपलाय आणि आपण या मिडीया वाल्यांच्या प्रश्नाला उत्तर देतोय... म्हणजे खुन त्याने केला, किडण्यापींग त्याने केली आणि या मिडीयावाल्यांच्या नजरेत आपण गुन्हगार झालोत... काय खबर आहे त्याची...”

त्याच्या समोरच्या बाकावर शिंदे हवलदार तंबाखु मळत होता.

“त्याची हालत खुप नाजूक आहे असं डॉक्टरचं म्हणनं आहे...”

“पण मी त्याला एवढं मारलंच नाही... तुम्ही पण होता ना इथं, तुम्ही पण पाहिलं ना... पण कळत नाही असं झालं तरी कसं¿”

“मला पण आश्चर्य वाटतंय त्याचं...”

“रात्री पासून एवढं नाका बंदी केलं, सगळीकडं शोधलं... पण ते सापडले कसं नाही. हे कसं शक्य होऊ शकतं की दहा मिनीटां आधी मी तिच्याशी बोललो आणि दहा मिनीटात तिला किडण्याप करुन ते पळाले... आणि असं पळाले की आपल्याला सापडले नाहीत... जणू नेहाला घेऊन ते अदृश झाले असावे.”

“सर, माझ्याकडे एक मार्ग आहे... त्याच्या विरूध्द तक्रार नाहीये... तर तुमच्या बायकोचा किडण्याप केल्याची तक्रार नोंदवूया. मग त्याच्या विरुध्द आपल्याकडे तक्रारही असेल. आपण पुढची कारवाही करु शकतो.”

“तरी सुध्दा आपल्यावर प्रश्न येणारच... आपण त्याला आधी मारतो आणि नंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्या विरुध्द तक्रार नोंदवली... आपल्याला त्याने चांगलंच अडकवलं आहे.”

“मग सर आपण करायचं काय¿”

“आता एक मार्ग आहे... त्याच्या अटी मान्य करायच्या...”

“पण त्याच्या अटी तुम्ही कशा मान्य करु शकता¿... म्हणजे त्याच्या अटीनुसार तुम्हाला खुनसुध्दा करावा लागणार आहे... मग...”

“त्याच्या अटी मान्य करायच्या म्हणजे त्याला तसं त्याला भासवायचं... त्याला असं वाटायला हवं की आपण त्याच्या अटी पुर्ण करतोय. याच दरम्यान नेहाचा शोध घेत राहायचं... एकदा नेहा आपल्याला मिळाली किंवा अमनचे स्वास्थ्य पुर्ववत झाले तर त्याच्यावर कारवाई करु... पण तो पर्यंत आपल्याला त्याच्या विरोधात एकतरी पुरावा शोधावा लागेल... त्याला असंच आत नाही टाकता येणार...”

आता अजींक्य आणि पुर्ण पोलीस स्टेशन तणावा खाली आले होते.

तेवढ्यात पोलीस स्टेशनचा फोन वाजला.

“शिंदे, फोन उचला... आणि कोणी मिडीयावाला असेल तर सांगा मी बाहेर गेलोय... वैताग आनलाय त्या न्युझवाल्यांनी...”

हवलदार शिंदेने फोन उचलला. रात्री जे काही झालं त्यानंतर खुप वैतागला होता. त्या क्षणापर्यंत ६ वार्ताहरांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये येऊन झालेल्या घटनेवर स्पष्टीकरण मागीतले होते. आणि कमीला भरती म्हणून सारखे फोन करुन त्याला वाटेल ते प्रश्न विचारत होते.

“सर, तुम्हाला फोनवर बोलवतोय...”

शिंदे मागे वळून म्हणाला. “मी इथं नाही असं सांग.” असं अजींक्यने त्याला इशार्-यात सांगितले.

“सर, न्युझवाल्यांपैकी नाही... हा कोणी महत्त्वाचा वाटतोय.”

इच्छा नसताना अजींक्य फोन जवळ गेला आणि त्याने फोन हातात घेतला. कानाला लाऊन शांत उभा राहिला.

“सब इंस्पेक्टर अजींक्य... जास्त वेळ न घेता मी सरळ सरळ सांगतो. तुम्हाला तुमच्या अटी पुर्ण कराव्या लागणार आहेत. पण अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या परीस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मार्ग काढू शकता तर मी तुम्हाला थोड्या वेळा नंतर पुन्हा फोन करतो.”

“तू कोण आहेस... अमन...¿”

“मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही. फक्त एवढं सांगा की तुम्हाला अटी पुर्ण करायच्या आहेत की नाही¿ तसा मी मिडीयामध्ये आणखि बर्-याच गोष्टी सांगाणार आहे...”

“मला त्या अटी पुर्ण करुन या प्रकरणचा लवकरात लवकर अंत करायचा आहे...”

“तर ऐका, पहिल्या अटी प्रमाणे तुम्हाला विस कोटी रुपये अमनला द्यायचे आहे.”

“मी कुठून आणायचं... विस कोटी रुपये... एवढे पैसे कोण मला देईल...”

“आमच्या पर्यंत अशी माहिती आली आहे की तुम्हाला खुप मोठी रक्कम मिळाली आहे. त्या रकमेतून फक्त विस कोटी रुपये तुम्ही अमनला द्या.”

“माझ्याकडे एवढे पैसे नाहीत... तुम्हाला जी माहिती मिळाली आहे ती चुकीची मिळाली आहे. कोटीत काय, मला तर हजारातही पैसे मिळाले नाहीत... माझ्या सारख्यासाठी एक कोटीसुध्दा उभ्या आयुष्यात जमवणे अशक्य आहे आणि...”

“माझ्या पर्यंत जी माहिती आली त्या आधारावर मी तुम्हाला अट सांगितली. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते... विचार करण्यासाठी तुमच्याकडे तिन तास आहे. या तिन तासात ठरवा आणि तुमचा निर्णय हॉस्पीटलमध्ये जाऊन अमनला सांगा... नाहीतर मला मिळालेली ही चुकीची माहिती चुकून मिडीया पर्यंत जाईल.”

“... पण हे कसं शक्य आहे¿.... हॅलो – हॅलो...”

तो पर्यंत समोरच्याने फोन ठेऊन दिला होता. अजींक्यने फोन ठेऊन दिला. शिंदे त्याच्या मागे उभा होता.

“काय झालं सर...¿”

शिंदेने प्रश्न विचारला. पण अजींक्यने त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. त्याच्या मनात वेगळंच काही चाललं होतं. त्याच्या कानात फक्त एक वाक्य घुमत होता –

“...विचार करण्यासाठी तुमच्याकडे तिन तास आहे. या तिन तासात ठरवा आणि तुमचा निर्णय हॉस्पीटलमध्ये जाऊन अमनला सांगा... नाहीतर मला मिळालेली ही चुकीची माहिती चुकून मिडीया पर्यंत जाईल...”

त्याने मनातल्या मनात निर्णय घेतला आणि काही न बोलता अजींक्य पोलीस स्टेशनमधून निघाला. गाडी काढली आणि सरळ घरी पोहोचला. घराला कुलूप लावले होते. त्या कुलूपाची त्याच्याकडे ड्युब्लीकेट चावी होती. त्याने कुलूप उघडला. बेडरुममधल्या कपाटामध्ये असणार्-या दोन बॅग्स त्याने बाहेर काढल्या. त्यात पैसे होते. त्याला खात्री झाल्यावर त्याने त्या बॅग त्याच्या गाडीवर ठेऊन त्याच्या फार्म हाऊस कडे निघाला. त्या बॅग्समध्ये विस कोटी काळा पैसा होता. त्याच्या जवळ विस कोटी रुपये असल्याची माहिती हि त्या अनोळखि व्यक्तीला कशी मिळाली असेल, याचा विचार तो पुर्ण प्रवासात करत राहिला.

त्याचा फार्म हाऊस हा खरासवाडी पासून ५० किलो मिटर लांब होता. कोणत्याही वसाहती पासून लांब आणि कोणालाही संशय येणार नाही, अशा ठिकाणी होता. सुनसान अशा जागेवर असूनही त्याच्यावर कोणाची नजर जाऊ नये यासाठी त्या फार्म हाऊसमध्ये एक तळघर अजींक्यने बनवले होते. फार्म हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने बाहेरच्या खोलीत जमीनीवर गालीच्छा हटवला. गालीच्छ्या खाली तळघराकडे जाणारा दरवाजा होता. त्या दाराने तो तळघरात पोहोचला. तळघरातल्या लोखंडी पेटीमध्ये त्या दोन्ही बॅग ठेऊन त्याने त्या पेटीला कुलूप लावले. वेळ न घालवता तो तिथून सरळ मला ठेवलेल्या हॉस्पीलच्या दिशेने निघाला.

*****

क्रमशः