सकारात्मक दृष्टीकोनाची जादू..
***
सकारात्मकतेनी जगण हे आपल्या आयुष्यात अत्यंत गरजेच असत. सकारात्मकता आयुष्याला आकार देण्यास मदत करते. सकारात्मक वृत्ती ही जादूच्या कांडीसारखी आहे. सकारात्मक दृष्टिकोनच हा आयुष्यात अत्यंत महत्वाचा असतो. आयुष्यातल्या सकारात्मकतेमुळे तुम्हाला जगण्यातला आनंद मिळवता येऊ शकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अस नेहमीच सांगितलं जात. ते अगदी खर आहे. अपयाशातूनच आपण अजून खंबीर होऊन परिस्थितीचा सामना करू शकतो. पण कधी कधी अपयशामुळे आपण खचू शकतो पण अश्यावेळी अपयशाने खचून न जाता नव्या दमाने नवी सुरुवात करायची असते. प्रत्येक क्षेत्रात अपयश असतेच. पण यश काबीज करण्यासाठी पॉझीटीव म्हणजेच सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन फार महत्त्वाचे असतात. आणि अश्या सकारात्मक विचारसरणीच्या माणसाना अपयश कधीच काबीज करु शकत नाही. अपयश किंवा कुणाची बोलण किंवा सभोवतालची नकारात्मक आणि उलटसुलट प्रतिक्रिया यामुळे अजिबात खचून जाऊ नका उलट ती संधी मानली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण नशिबाला किंवा आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत राहतो. पण आयुष्य आपल असत ते सुंदर जगण सुद्धा आपल्याच हातात असत. समस्या हीच संधी असते. त्याचबरोबर आयुष्य जगतांना त्या आयुष्याचा आनंद घेण महत्वाच असत. त्यासाठी गरज असते ती आयुष्यातल्या सकारात्मकतेची!! सकारात्मक विचारांबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असण्याची अत्यंत गरज असते. आयुष्याच्या कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे त्यावर आपल आयुष्य कस असेल हे ठरत असत. आपला कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक किंवा नकारात्मक असतो. यावर ती गोष्ट चांगली किंवा वाईट ठरविली जाते. त्यामुळे आपली व जगातील परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारणे आवश्यक आहे. विचार आपल आयुष्य बदलू शकतात...हि गोष्ट अत्यंत खरी आहे! म्हणजेच सकारात्मक विचारांचा आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टीकोन आणि सकारात्मक वृत्ती ठेवली तर त्याचा परिणाम आयुष्य बदलून टाकण्यास गरजेचा आहे. दैंनदिन आयुष्यात बऱ्याच समस्या आपल्या समोर येत असतात पण त्या समस्यांना घाबरून न जाता त्याचा सामना सकारात्मक पद्धतीनी केला तर ती समस्या सुटण्यास तर मदत होतेच पण त्याचबरोबर आयुष्य सुरळीत चालण्यास देखील मदत होते. सकारात्मक वृत्ती मुळे आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून नकारात्मक विचार आले तर त्या विचारांना टाळून आयुष्य जगता येत. सकारात्मक वृत्तीमुळे चिंता, भीती ह्यांना देखील आळा बसण्यास मदत होते. आयुष्याकडे पाहण्याचा कल जर सकारात्मक असेल तर कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करता येऊ शकतो. नेहमीच सकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्याची ब्राईट साईड दिसते आणि आशावादी बनतो. त्याचबरोबर, जे होईल ते बेस्टच होईल अशी धारणा बनण्यास सुरवात होते. सकारात्मक दृष्टीकोन तर महत्वाचा असतोच पण त्याच बरोबर जिद्द आणि चिकाटी हि सुद्धा अत्यंत महत्वाची असते. सकारात्मक वृत्ती एक दिवसात बनत नाही. पण जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर वाईटातून सुद्धा चांगल दिसण्यास आरंभ होतो. आणि आयुष्य आनंदी होण्यास मदत होते. कोणताही प्रसंग किंवा परिस्थितीत आपल्याला फक्त जास्तीत जास्त सकारात्मक बाजूच दिसली पाहिजे जेणेकरून आपल्याला कसल्याच प्रकारचे प्रसंग, व्यक्ती ध्येय गाठण्यापासून दूर करू शकणार नाहीत. सकारात्मक विचार आपल मन प्रफुल्लित ठेवतात. त्यामुळे कोणत्याही घटनेविषयी, व्यक्तिविषयी, प्रसंगाविषयी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार आले तर जाणीवपूर्वक ते बदलायचा प्रयत्न करा. कारण नकारात्मक विचाराचा परिणामही नकारात्मकच होईल.
* तुमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे हे कश्यावरून कळेल- तुम्ही कश्या प्रकारे परिस्थितीला सामोर जाता त्यावरून तुम्हाला तुमचा दृष्टीकोन कसा आहे ते कळून येईल. कधी कधी आता काहीच होणार नाही असा विचार करून आपण प्रश्नापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. अस केल्यानी प्रश्न किंवा समस्या सुटत तर नाहीतच. उलट आपण त्या समस्येमध्ये अधिकाधिक रुतत जातो! बरेच वेळा आपल्याला सवय असते कोणत्याही परिस्थिती मध्ये किंवा गोष्टीमध्ये काय कमी आहे हे पाहत राहायचं. हि सुद्धा चांगली गोष्ट आहे जर त्या गोष्टी आपण बदलायचा प्रयत्न करणार असू तर.. नाहीतर सतत नकारात्मक विचारांमुळे आपली वृत्ती सुद्धा नकारात्मकच बनू शकते. पण आपली वृत्ती किंवा दृष्टीकोन कसा आहे हे कसा कळेल. आपला दृष्टीकोन कसा आहे हे कळल तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
१. सकारात्मक विचार- आजूबाजूला असलेली परिस्थिती आणि नेहमीच सारखी नसते. जेव्हा समोर प्रश्न आणि समस्या उभ्या ठाकतात तेव्हा आपण ल्या समस्येवर उत्तर शोधतो का त्या समस्येसून दूर पळतो ह्यावरून तुम्हाला तुमचा दृष्टीकोन कसा आहे हे समजण्यास मदत होईल. दृष्टीकोन कसा आहे हे कळल आणि समजा नकारात्मक दृशिकोन असेल तर तो बदलता येऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार केल्यामुल्या प्रश्नातून बाहेर पडण्यास मदत करतात.
२. विधायक विचार- मनात नेहमीच विधायक विचार येत असतील तर तुमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे हे तुम्ही समजू शकता. विधायक विचार अर्थात कनस्ट्रक्टीव्ह विचार प्रगती होण्याकरता महत्वाचे असतात. विधायक विचार नेहमीच सकारात्मक असतात.
३. क्रिएटिव्ह विचार- आपले विचार काय असतात ह्याकडे लक्ष देण गरजेच असत. म्हणजे आपले विचार आपल्याला मागे खेचतात का पुढे जाण्यास प्रवृत्त करतात हे पाहन गरजेच असत. आपले विचार सर्जनशील अर्थात क्रिएटिव्ह असतील तर प्रत्येक बाबतीत वेगवेगळ्या दिशेनी विचार होण्यास मदत होते.
४. आशावाद- "आशेवर जग चालत." अस नेहमीच म्हणल जात! आशाच नसेल तर पुद्धे जायची उर्मी राहणारच नाही. जर तुमचे विचार आशावादी असतील आणि कोणत्याही परिस्थितीतून चांगलच काहीतर होईल असा विचार असेल तर तुम्ही आशावादी आहात आणि कोणताही अपयश तुम्हाला मागे खेचू शकणार नाही.
५. प्रेरणादायी विचार- न थांबता पुढे जायचं असेल तर सतत प्रेरणादायी विचार करण्याची गरज असते. जे केल्यामुळे तुमची ध्येय पूर्णत्वाला जाण्यास मदत होईल. जर तुमच्या विचारांमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नसेल तर आपले विचार बदलण्याची गरज आहे हे तुम्हाला नक्की समजू शकेल. प्रेरणादायी विचारांमुळे नवीन उर्जा जागृत होते आणि काहीतरी नवीन करण्याची ओढ सतत निर्माण होत राहते.
६. आनंदी राहणे- आनंदी माणस नेह्मीच सकारात्मक असतात आणि सकरात्मक लोकं सतत आनंदी असतात. आनंदी राहाण आणि सकारात्मक असण एकमेकांना जोडलं गेल आहे. तुम्ही नेहमीच आंनदी असाल तर तुमची दृष्टीकोन सकारात्मक आहे. पण जर तस नसेल तर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदण्याची गरज आहे हेही तुम्हाला समजू शकेल.
* सकारात्मकता अंगी रुजवण गरजेच-
फक्त चांगले विचार करून उपयोग नसतो तर त्यासाठी सगळ्याच परिस्थितीत नेहमीच होकारार्थी उत्तराची गरज असते. आणि मनस्थिती नेहमीच उत्तम राहणे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन! परिस्थिती समोर नमत घेण्यापेक्षा त्या परिस्थितीवर मार्ग काढण हे अत्यंत गरजेच असत. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक पद्धतीनी सामोर जाऊन नव नवीन शिकून घेऊन आपल आपल आयुष्य अधिक सुंदर करू शकतो. आयुष्याकडे बघण्याचा फक्त चांगले विचार करून उपयोग नसतो तर त्यासाठी नेहमीच होकारार्थी उत्तराची गरज असते. आणि मनस्थिती नेहमीच उत्तम राहणे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन! परिस्थिती समोर नमत घेण्यापेक्षा त्या परिस्थितीवर मार्ग काढण हे अत्यंत गरजेच असत. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक पद्धतीनी सामोर जाऊन नव नवीन शिकून घेऊन आपल आपल आयुष्य अधिक सुंदर करू शकतो. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आयुष्याला योग्य दिशा देण्यास मदत करतो.
* सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी काही-
१. सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे यश मिळण्यास सुरुवात होईल- जर मनाचा कल नकारात्मक असेल तर साहजिकच कोणतीही गोष्ट पूर्ण होतांना त्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्या विरुद्ध सकारात्मक दृष्टीकोनामुळे कोणत्याही समस्येला न घाबरता त्यावर उपाय किंवा उत्त्तर शोधण्याकडे कल असलेला दिसून येतो.. साहजिकच, अपयशाची भीती न राहता यशाकडे मार्ग अवलंबला जातो.
२. सकारात्मक दृष्टीकोनामुळे तुम्हाला सतत प्रेरणा मिळत राहील- आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवल्यामुळे आयुष्य जगायला प्रेरणा मिळत राहणास मदत होते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे आयुष्य सुंदर असल्याची जाणीव हते आणि आयुष्य मनापासून जगण्याकडे कल निर्माण होतो.
३. सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे हार मानण्याची वृत्ती कमी होते- सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे प्रत्येक गोष्टीतलं चांगल पाहण्याची सवय लागते आणि साहजिकच कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याकडे कल निर्माण होतो. आणि खडतर परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होते.
४. सकारात्मक विचार केल्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढण्यास मदत होते- स्वतःवरचा विश्वास जेव्हा उडतो तेव्हा कोणताही लक्ष पूर्ण होण अवघड होऊन बसत. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे स्वतःवरचा विश्वास उडू शकतो. "मला आता काही जमणारच नाही.." अशी भावना मनात आली कि स्वतःबद्दल असलेला विश्वास कमी होऊ शकतो. पण जर सकारात्मक विचार ठेऊन काम केल तर "मी हे नक्की" करू शकते/शकतो" हि भावना जागृत होण्यास मदत होते आणि आत्मविश्वास उंचावतो.
५. सकारात्मक विचारसरणीमुळे विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते- सतत आशावादी राहिल्यामुळे आणि सतत चांगले सकारात्मक विचार केल्यामुळे मनाची कवाड उघडून विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. साहजिकच, कल्पकता वाढते त्याचबरोबर आहे त्याच गुंतून न राहता वेगळ्या पद्धतीनी विचार केला जातो. नेहमीसारखा चौकटीमध्ये राहून विचार करण्याची वृत्ती बदलण्यास मदत होते आणि समस्येतून सुद्धा काहीतरी वेगळ आणि चांगल शोधलं जात.
६. सकारात्मक पद्धतीनी विचार करून कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते- आपल्या कडे असलेली सगळ्यात जास्त महत्वाची शक्ती आहे ती म्हणजे सकारात्मक विचार. परिस्थिती कोणतीही असो, त्यावर उत्तर मिळेलच असा दृष्टीकोन ठेवला तर आयुष्य सुंदर होण्यास मदत होते. आपल्याला परिस्थिती बदलता येत नाही पण सगळ चांगलच आहे असा विचार खराब परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. आणि कठीण परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघून आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.
काही लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन लहानपणापासूनच असतो पण जर तो नसेल तर तसा दृष्टीकोन अंगी रुजवण्याची गरज असते. मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट झाली कि पहिला विचार नकारात्मकच असतो. आणि एकदा का नकारात्मक विचार मनात यायला लागले कि हे बदलण गरजेच असत. आयुष्यात चढ उतार हे असतातच. जेव्हा आयुष्यात चढता लेख असतो तेव्हा सगळाच सकारात्मक असत पण कधी अपयश आल किंवा एखादी गोष मनासारखी झाली नाही कि मनाचा उलट्या दिशेनी प्रवास चालू होतो. अश्यावेळी मदतीला धावून येतात ते सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन. त्यामुळे सुख दुखाःत, चढ उतारात नेहमीच विचार आणि दृष्टीकोन सकारात्मक ठेवण्याची गरज असलेली दिसून येते.
* सकारात्मक दृष्टीकोन अंगी रुजवण्यासाठी काही टिप्स-
१. आंनदी राहायला शिका- आनंदी राहाण आपल्या हातात असत. कोणीही किंवा कोणतीही गोष्ट आपल्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही. नकारात्मक लोकांचा किंवा नकारात्मक परिस्थितीचा परिणाम होऊ न देण आपल्याच हातात असत. अगदी नकारात्मक विचार घालवण सुद्धा आपल्याच हातात असत. एक नकारात्मक विचार जरी आला तरी विचारांची दिशा बदलून सततच्या नकारात्मक विचारांमुळे निराशा येऊ शकते. त्यामुळे एखादा जरी नकारात्मक विचार आला तर तो आपल्यावर हावी होऊन देऊ नका. नैराश्या आल किंवा एखाद्या समस्येच उत्तर मिळेनास झाल कि अश्यावेळी नकारात्मक विचार जाणीवपूर्वक बाजूला सारून त्या जागी सकारात्मक विचार केल्यानी नकारात्मकता हळू हळू कमी होण्यास मदत होते. आणि एकदा का आपण नकारात्मक विचारांना मागे टाकल कि पुन्हा तुम्ही आंनदी बनता.
२. आयुष्याच्या "ब्राईट साईड" कडे पहा- कधी कधी खूप गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकतात. त्यामुळे मनाच खच्चीकरण होऊ शकत. पण आयुष्यात नेहमीच वाईट गोष्टी होत नाहीत. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात संदर क्षण आलेले असतात. त्यामुळे आयुष्याला दोष देण्यापेक्षा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा म्हणजे आपला दृष्टीकोन सुद्धा सकारात्मक होण्यास उपयोग होतो.
३. आशावाद सोडू नका- यश मिळेल किंवा अपयश ते आपल्या हातात नसत. आपल्या हातात असत ते कष्ट करण आणि आशावादी राहाण. त्यामुळे आशावादी राहा. त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता येण्यास मदत होते आणि यश सुद्धा मिळण्यास फायदा होऊ शकतो. कोणत्याही परिस्थिती मध्ये निराशावादी होऊ नका. देवावर किंवा सर्र्वीचा शक्तीवर विश्वास ठेवला कि आयुष्य जगण्याची मजा मिळण्यास मदत होते.
४. सतत हसत राहा- मनापासून हसल कि मनावरचा ताण आपोआप कमी होण्यास मदत होते आणि आयुष्यात सकारात्मकता येण्यास मदत होते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत हसायला विसरू नका. त्यामुळे आयुष्य सकारात्मक होण्यास मदत तर होईलच पण त्याचबरोबर, तुमचच तुम्हाला खूप मस्त वाटेल.
५. स्वतःबरोबर संवाद वाढवा- कधी कधी खूप "लो" वाटू शकत. अश्यावेळी कोणाची तरी मदत घ्यावी , कोणाशीतरी बोलाव अस वाटत राहत. पण बाहेरच कोणी शोधण्यापेक्षा जर स्वताशी असलेला संवाद वाढवला तर त्याचा परिणाम निराशा घालवायला होऊ शकतो. अर्थात, जेव्हा स्वताशी स्नावाद कराल त्यावेळी नकारात्मक बोलत नाही न ह्या लाडे लक्ष द्या. स्वताला सतत प्रेरणा देत राहिलो तर साहजिकच मनातले वाईट विचार जाऊन त्याची जागा सकारात्मक विचार घेतील.
६. आनंदी लोकांबरोबर राहा- तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांबरोबर असता त्याचप्रमाणे तुमचा दृष्टीकोन असण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणारी लोक नकारात्मक नसून सकारात्मक आहेत ह्याची खात्री करूनच त्यांच्याशी मैत्री वाढवा. अर्थात प्रत्येकवेळी हे करण शक्य नसत पण नकारात्मक लोकांबरोबर असाल तर त्यांचा परिणाम तुमच्यावर होणार नाही याची काळजी घ्या. आणि तुमचा मूड नेहमीच सकारात्मक राहील याची काळजी घ्या म्हणजे तुमचा दृष्टीकोन सुद्धा सकारात्मक आणि आशावादी रहायची शक्यता अधिक असते.
७. आयुष्यात जे हवय त्याचा विचार जरा आणि जे नकोय त्याचा विचार टाळा- आपण आयुष्यात काय काय हवाय याची स्वप्न मनात रंगवत असतो आणि त्याचबरोबर, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्याचा सुद्धा विचार मनामध्ये चालू असतो. पण शक्यतो ज्या गोष्टी नको आहेत त्याचा विचार टाळा. तस केल नाही तर लक्ष नको असलेल्या गोष्टींवर केंद्रित होऊ शकत आणि काम पूर्ण करतांना अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ज्या गोष्टी नकोत त्या गोष्टींवरच लाश काढून तुमच लक्ष ज्या गोष्टी हव्या आहेत अश्या गोष्टींकडे वळवा. म्हणजे ज्या गोष्टी हव्या आहेत त्याकडेच लक्ष केंद्रित राहील आणि आयुष्यात सकारात्मकता वाढण्यास मदत होईल.
* म्हणजेच काय मनाच आरोग्य उत्तम ठेऊन सकारात्मक विचार करण गरजेच आहे. म्हणजे नकारात्मक विचार आपल्यावर हावी होऊ शकत नाहीत आणि यश मिळण्या पासून मागे सुद्धा खेचू शकत नाहीत. सकारात्मक विचार हीच यशाची गुरुकिल्ली आहे. चांगले विचार केले कि त्याचे परींम देखील चांगलेच झालेले दिसून येतात. नकारात्मक विचार असलेले लोकं सदा दुःखी असलेले दिसून येत आणि सकारात्मक लोकं नेहमीच आनंदी असलेली दिसून येतात. त्यामुळे आपला दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक राहील याची काळजी घ्या आणि आयुष्याचा आनंद घ्या. कधी नकारात्मकता वाटली तर जाणीवपूर्वक नकारात्मकता घालवा.
आयुष्य मनाप्रमाणे जगायचं असेल तर त्यासाठी दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक ठेवायची गरज असते. त्यासाठी चांगल वाचन, चांगल बोलण हे सुद्धा गरजेच असत. नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन अंगी रूजवा आणि आयुष्य आनंदानी जगण्यासाठी नक्कीच मदत झालेली दिसून येईल. .
***
अनुजा कुलकर्णी.