चतुर व्हा
© COPYRIGHTS
This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.
MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.
Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.
MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.
चतूर न्यायमुर्ती
एका गृहस्थाने आपली विहिर शेर्जायाला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, श्अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?श्जुना मालक म्हणाला, श्मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.श्या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला.
न्यायमुतीर्ंनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या मालकाला बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, श्तू तुझी विहीर या तुझ्या शेर्जायाला विकलीस हे खरे आहे काय?श्
जुना मालक रू होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झालयं त्यात मी माझी फक्त विहिरच काय ती
याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेर्जायाचा बिलकूल हक्क नाही.
न्यायमुर्ती रू तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
जुना मालक रू (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना? वाटणारच. पण असं असुनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !
न्यायमुर्ती रू ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहिर विकून टाकली असतानाही, ज्या अर्थी तिचा वापर तू आतलं तुझ्या मालकीच पाणी ठेवण्यासाठी करीत आहेस, त्या अर्थी ती विहीर त्याला विकल्यामूळे, ते तू त्या विहिरीचा अशा र्तहेनं वापर करीत राहीपयर्ंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेर्जायाला दिले पाहिजेस.श्
न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेर्जायाला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.
हा श्लोक मात्र नवीन आहे
श्नवा श्लोक कविर्णाया कवीला एक हजार सुवर्ण मोहोरा इनामश् हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राम्हणाच्या कानी गेले. तो माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठया उत्साहाने आला.
परंतू राजधानी आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन, तो कालीदासाकडे गेला व त्याला म्हणाला, श्कवीराज ! मी भोजमहाराजांचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूनं, त्यांना कविण्यासाठी एक श्लोक घेऊन मुद्दाम मणिपूरहून इथे आलो आहे. परंतू इथे आल्यावर मला असं कळल की, भोजराजांच्या राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला, तरी दरबारात असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवितो. त्याच्यानंतर द्विपाठी पंडित त्याचापुनरुच्चार करतो. शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखविल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात, श्ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील तीन पंडितांनी जसाच्या तशा म्हणून दाखविला, त्या अर्थी तो जुना आहे सिध्दच होते, तेव्हा कवीराज ! दरबारात नवा श्लोक घेऊन येर्णायांना असेच जर बनवून परत पाठविले जात असेल, तर मी तरी तिथे कशाला जाऊ?
कालीदासाने त्या ब्राम्हणाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाण त्याने एक नवा श्लोक रचला व भोज राजाच्या दरबारात जाऊन कविला. त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडिल अत्यंत दानशूर. अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला. त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून एक लाख सुवर्ण मोहोरा कर्जाऊ घेतल्या. परंतू कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यु आल्याने, भोज महाराज माझे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागतात.
श्हा श्लोक नविन नाहीश् असं म्हणावं, तर आपले वडिल या ब्राम्हणांच्या वडिलांचे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहोरा याला द्याव्या लागतीलय त्यापेक्षा हा श्लोक एकदम नविन आहे. असे म्हणणे पत्करले, असा विचार करुन भोज राजाने त्या ब्राम्हणाचे नवीन श्लोक कविल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन वाटेला लावले.
कालीमातेला कौल
एक राजा दारुपान, घोडयांच्या शर्यती, जुगार, अशा अनेक दुर्व्यसनात पार बुडुन गेला होता. राज्यकारभाराकडे त्याचं लक्ष नव्हतचं. त्यामुळे राज्याची खरोखरच काळजी वाटणार्या त्याच्या प्रधानाने, त्याची एकदा कान उघडणी केली. प्रधानाने केलेया या अपमानामुळे, राजा रागावला त्याने त्याला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतला.श्प्रजेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या प्रधानाला आपण कारण नसता काढलं,श् असं होऊ नये, म्हणून राजा एकदा भरदरबारात म्हणाला, श्या प्रधानांना ताबडतोब नोकरीवरुन काढून टाक,श् असा कालीमातेनं काल माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला. तरीसुध्दा श्प्रधानांना काढण्यासाठी मी देवीच्या दृष्टांताची खोटीच सबब पुढे करीत आहेश् असं कुणी म्हणू नये, यासाठी श्काढावेश् व श्ठेवावेश् अशा दोन चिठ्ठ्या मी कालीमातेपुढे ठेवीन. नंतर त्या चिठ्ठ्यांपैकी कुणालाही एक चिठ्ठी स्वतरू प्रधानजींनी उचलावी. तिच्यात जे लिहिले असेल ते त्यांनी मान्य करावे.श्राजाचा हा कावा प्रधानाच्या लक्षात आला. राजा दोन्ही चिठ्ठ्यावर असे लिहिणार, आणि त्या दोन चिठ्ठ्यापैकी कुठलीही जरी चिठ्ठी आपण उचलली तरी त्या चिठ्ठीवर श्काढावेश् असेच असल्याने आपल्यावर नोकरी सोडण्याचा प्रसंग येणार, ही गोष्ट प्रधानाने ओळखली. म्हणून जेव्हा राजाने सर्व दरबारी मंडळी व न्यायमुर्ती यांच्या समक्ष मंदिरातील कालीमातेच्या मुर्तीसमोर अगोदरच घडी घातलेल्या दोन चिठ्ठ्या ठेवून, त्यांपैकी एक चिठ्ठी प्रधानाला उचलायला सांगितली, तेव्हा प्रधान मुद्दाम म्हणाला, राजेसाहेब ! कालीमातेसमोर ठेवलेल्या या दोन चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी मी उचलली आणि नेमकी त्याच चिठ्ठीवर जर श्काढावेश् असे लिहिलेले निघाले, तर मीच देवीकडून मला नोकरीतून काढून टाकण्याचा कौल घेतला, अशी माझी नाचक्की होईलय त्यापेक्षा या दोन चिठ्ठ्यांपैकी कुठलीही एक चिठ्ठी देवीच्या कौलाची चिठ्ठी म्हणून देवीजवळ तशीच मिटलेल्या स्थितीत राहू द्यावी, आणि देवीच्या कौलाच्या विरुध्द उरलेली चिठ्ठी न्यायमुतीर्ंनी स्वतरू उचलून व उघडून सवार्ंसमक्ष वाचून दाखवावी. कुठली चिठ्ठी देवीजवळ राहू द्यायची व कुठली चिठ्ठी वाचून दाखवायाचे हे सर्व न्यायमुतीर्ंच्या इच्छेवर सोपवावे. न्यायमुतीर्ंनी देवीला नको असलेल्या निर्णयाची चिठ्ठी उघडून वाचून दाखविली, की तिच्यात असलेल्या निर्णयाच्य विरुध्द निर्णय देवीजवळ ठेवलेल्या चिठ्ठीत असणार हे ठरलेले असल्याने, ती देवीजवळची चिठ्ठी न उघडताही आपल्याला तो निर्णय कळून येईल, आणि मी तो मान्य करीन.श्प्रधानाने सुचविलेला हा बिनतोड पर्याय राजाला नाकारता येईना. नाइलाजाने त्याने न्यायमुतीर्ंना एक चिठ्ठी देवीपुढे ठेवून दुसरी चिठ्ठी उचलून ती उघडायला व वाचायला सांगितले. न्यायमुतीर्ंनी त्याचप्रमाणे करताच त्या चिठ्ठीत श्काढावेश् असे लिहिले असल्याचे आढळले.अर्थात आता कालीमातेच्या मुर्तीसमोर उरलेल्या चिठ्ठीत श्ठेवावेश् हाच कौल असणार, असे राजाला मान्य करावे लागून, प्रधानजींनी नोकरीवरुन काढण्याचा बेत रद्द करावा लागला.
हजरजबाबी कालीदास
भोजराजाच्या पदरी असलेला कालीदास हा जसा अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होता तसाच तो प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नाला पटकन चपलख उत्तर देऊन, त्याला निरुत्तर करण्यात पटाईत होता.
या कालीदासाचा एका कलावंतीणीवर अतिशय लोभ होता. तिचं नृत्य व गायन कण्यासाठी तो बहुतेक दररोज तिच्याकडे जाई.एकदा सकाळी तो तिच्या घरावरुन जात असता तिन त्याला हाक मारली व त्याला बाजारातून चांगलासा मासा घेऊन येण्याची विनंती केली. तिला नाराज करणं जिवावर आल्यामुळं, त्यानं तिच्याकडून पिशवी घेतली आणि बाजाराची वाट धरली.
मासळीबाजारात मासे घेऊन बसलेल्या एका कोळ्याकडून एक ताजा मासा विकत घेऊन त्याने त्याच्याकडून त्या माशाचे सोयिस्कर खंड करुन घेतले. मग ते तुकडे त्या कोळ्याला पिशवीत घालायला सांगून, तो ती पिशवी हाती घेऊन कलावंतिणीच्या घराकडे जाऊ लागला.
कालीदासावर आतून जळर्णाया एका माणसाने त्याच्या हातातली माशाच्या रक्तानं भरलेली ती पिशवी पाहून त्याला मुद्दाम विचारलं, ‘काय हो कवीराज ? थैलीत काय आहे?'
कालीदास रू थैलीत रामायण आहे.
चौकस गृहस्थ रू मग पिशवी ओली का दिसते?
कालीदास रू रामायणासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवलेला असताना, ती त्या रसांमुळे भिजून गेल्याशिवाय कशी राहील?
चौकस गृहस्थ रू पण मग रक्ताचे डाग का पडले आहेत त्या पिशवीला ?
कालीदास रू राम—रावण युध्दात जे राक्षस मारले गेले, त्यांच्या रक्ताचे आहेत ते डाग.
चौकस गृहस्थ रू तेही एक वेळ मान्य करायला हरकत नाहीय पण घाण कसली सुटली आहे ? कालीदास रू राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांची.
कालीदासानं दिलेली उत्तर कून अधिक प्रश्न विचारून, आपली आधिक शोभा करुन घेण्या वजी निघून गेलेलं बरं, असा विचार त्या खवचट गृहस्थानं केला आणि त्याने आपला रस्ता सुधारला.
अख्खी म्हैस पाच रुपयात
एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, श्आपली म्हैस गावातल्याच दोन—तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस—चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.
मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, का हो का ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देर्णायास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन. ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली.
तो मनात म्हणाला, श्आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा श्तुझी म्हैस मला रानात मिळाली,श् असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं. असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले.
यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, श्ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच—सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ? म्हशीचा मालक म्हणाला, छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.श्म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.