Problem Solving Technic - 2 in Marathi Short Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट २

Featured Books
Categories
Share

प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट २

प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट २

नेहा नी कॉफी केली आणि ती गरमा गरम कॉफी घेऊन बाहेर आली! कॉफीचा सुगंध सगळीकडे पसरला होता. रोहित सोफ्यावर बसूनच काहीतरी विचार करत होता. पण कॉफी चा सुवास आला आणि त्याची तंद्री गेली..

"कॉफी.." नेहा म्हणाली

"वाह वाह.. कसला सुवास सुटलाय कॉफी चा!" इतक बोलून त्यानी नेहाकडून कॉफी चा कप हातात घेतला आणि एक घोट घेतला.. "तुझ्या हाताची कॉफी प्रत्येकवेळी अजूनच टेस्टी होते! भारी.. मस्त वाटल एका घोटातच..." रोहित उत्सुर्तपणे म्हणाला...

"खर?.. मला तर वाटत होत कॉफी जमेल का नाही पहिल्यासारखी.."

"जमेल का? मगाशी पिलेल्या कॉफीपेक्षा चविष्ट झालीये कॉफी!"

"थॅंक्यू... आता सांग, काय विचार केलास? काही उत्तर मिळाल माझ्या प्रश्नावर?"

"म्हणजे काय? रोहित द मॅजिक मॅन म्हणतात मला.. विसरलीस?"

"हो? तुला कधी कोण म्हणायचं रोहित द मॅजिक मॅन? मला तर काही आठवत नाही..." नेहा च्या चेहऱ्यावर थोड हसू आल.. पण पुढच्या क्षणी ती परत उदास झाली.

"नाही का म्हणायचे मला रोहित द मॅजिक मॅन? पण तुला मात्र नेहा द मॅजिक गल म्हणायचेच! विसरलीस का? आणि का दाबलस हसू नेहा? मनमोकळी हास.. "

"असेल पण आता नो मॅजिक इन माय लाईफ! आणि नाही जमत रे मनमोकळ हसण.. थोड हसू आल कि परत नकारात्मक विचार येतात आणि मी परत दुःखी होते!"

"इतकच ना? नकारात्मक विचार येतात म्हणून तू स्वतःला परत आत ओढून घेतेस! नाऊ आय नो युअर प्रॉब्लेम! डोंट वरी! फक्त प्रचंड थकवा आलाय तुला... तो घालवतो बरोबर! रोहित द मॅजिक मॅन ला भेटली आहेस ना? आधी कधीच न्हवता रोहित द मॅजिक मॅन पण आज झालाय तुझ्यासाठी! आता तुला मी करतो परत फ्रेश! आणि आता ह्यावेळी मी घेणार तुझी जागा... आधी तू बोलायचीस आणि मी ऐकायचो... तू मला बऱ्याच वेळा माझ्या प्रोब्लेम्स मधून बाहेर यायला मदत केली होतीस! मला गरज होती तेव्हा तू मला आधार दिलेलास आणि आता मी तुला मदत करणार! तुला गरज असतांना मी तुला मदत केली नाही तर मी स्वार्थी होईन... आणि मी स्वार्थी नाहीये! मला खरच आधी कधी वाटलाच नाही कि तुला माझी गरज आहे! मी स्वतःच्याच कामात बिझी राहिलो होतो. पण ठीके.. लकीली मी आज आलो तुझ्याकडे आणि मला कळल तू थोडी दमली आहेस! आता फक्त काही वेळानी बघ... कशी करतो तुला पहिल्यासारखी फ्रेश! आता तू माझ ऐक लक्षपूर्वक..... आज मी बोलणार आणि तुला पटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये... मी माझ काम खूप चोख करतो आणि ते होत नाही तोपर्यंत त्याचा पिच्च्छा सोडत नाही! बाय द वे, आत्ता तू झोपेच्या गोळ्या घेतल्या नाहीयस ना?"

"ओके ओके...तू बोल, आणि आज मी ऐकते! रोहित द मॅजिक मॅन काय सांगतोय बघू कि ते ऐकून मी फ्रेश होईल! आणि गोळ्या नाही घेतल्या आहेत! गोळ्या घेऊन झोपणार तितक्यात तू आलास ना.... म्हणून नाही घेतल्या गोळ्या.... तू थांब किती वेळ थाबायच तितक्या वेळ थांब! पण तू सांग किती वेळ थांबशील रे? मी इतकी डिस्टर्ब झालीये ते एका दिवसात नॉर्मल होईन?"

"होशील कि.. काही अवघड नाही त्यात! तू फक्त मनानी खचली आहेस... आणि मला माहिती आहे,तू इतकी वीक नाहीयेस.. यु आर अ व्हेरी स्ट्रॉन्ग गल!!! आय नो माय फ्रेंड! जरा वेळानी बघ कसा फ्रेश होतो तुझा मूड! आणि गुड गुड. ..झोपेची गोळी घेतली नाहीस! मी वेळेत आलो म्हणजे! थोडा उशीर झाला असता तर.. हाहा! चलो जोक्स अपार्ट, आधी महत्वाच ऐक, आयुष्यात संकट येणारच...संकटांना अस घाबरून जायाच का अस? 1 आयुष्य मिळत ते किती उदास होऊन घालवायच? आणि आयुष्य संपवायची भाषा केलीस ना तर बघच... मी माझा मुक्काम तुझ्या घरी हलवेन... तुझ्या घरी कोणी नसत आणि मी घरी गेलो नाही गेलो माझ्या घरच्यांना फरक पडत नाही! एकदम सोप्पा आहे मला! सो माझा मुक्काम तुझ्या घरी हलवतो! अस केलेलं चालेल का? हि धमकी आहे असच समज! तुझ घर मोठ आहे.. मला पण मजा करता येईल! आणि लक्षात ठेव १० वेळा कॉफी घेईन तुझ्याकडून! आणि मी ते करू शकतो हे तू विसरू नकोस! आणि तुझा कंटाळा लवकरच जाईल. .. कंटाळा घालवायची जबाबदारी माझी... ओके?"

रोहित त्याच बोलण पटवून द्यायला लागला आणि नेहालाही त्याच म्हणण पूर्ण नाही पण पटायला लागल..

"१० वेळा कॉफी? रिस्की आहे! आणि मस्त पटवून देतोयस रोहित पण मला खूप पटलेल नाहीये! १ प्रोब्लेम सुटेल रे..पण उरलेले इतके प्रोब्लेम्स आले आहेत त्याच काय? अस नाहीये कि माझ्या आयुष्यात आई बाबा हा एकाच प्रश्न होता. अजून बरेचसे प्रश्न आहेत जे अनुत्तरीत आहेत. त्यातून कस येऊ बाहेर? " नेहा म्हणाली..

"तुला खूप प्रॉब्लेम्स आहेस? आर यु शुअर?"

"हो हो.. जो विचार करते त्याच उत्तर नकारात्मक असत.. म्हणजे किती सारे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयष्यात त्याचा विचार कर."

"ओके.. तुला खूप प्रॉब्लेम्स आहेत तर.. ठीके! आपण सिस्टीमॅटिक जाऊ... हाहा.."

"रोहित.. इथे पण चेष्टा कशी सुचती आहे तुला?

"ओके.. सॉरी... आता मुद्द्याच बोलतो! तू 1 काम कर... तुला काय संकट आणि प्रॉब्लम्स वाटतायत त्याची लिस्ट बनव.... महत्वाचे प्रॉब्लेम.. सुटणारे प्रश्न नको घेऊ! आपण प्रत्येक गोष्टीच प्लॅनिंग करू.. आणि सगळे प्रोब्लेम्स संपवून टाकू.. एकही प्रश्न उत्तराशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे! आणि डोंट टेक डाऊट ऑन मी!" रोहित म्हणाला...."यु सी,मी एम बी ए केलय....सो आधी प्रॉब्लेम च्या मुळशी जातो.... मग सगळे प्रश्न सुटतातच! नुसता उपाय करण्यापेक्षा प्रॉब्लेम कसा संपवायचा ते मी पाहतो.. आणि हे शिकलोय ते तुझ्याकडूनच! आणि आज गुरूची शिक्षा गुरूलाच देतोय याचा मला आनंद आहे!"

नेहा ला हसू यायला लागल......ती खूप दिवसांनी इतकी मनमोकळी हसायला लागली.... इतके दिवस दाबून राहिलेल्या तिच्या भावना बाहेर पडत होत्या. रोहित ला तिच्या चेहऱ्यावरच हसू परत आणायचं होत! त्याला माहिती होत, एकदा नेहा हसायला लागली कि पुढे गड सर करण अवघड नाहीये! आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आल तेव्हा रोहित नि पहिली पायरी सहजरीत्या पार केली..

"ओके! एक एक प्रॉब्लेम सोडवू! वा...प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक...मी पण शिकलेके एम बी ए ला.. पण प्रॉब्लेम्स आले तेव्हा वापरायच विसरूनच गेले....थॅंक्स अलॉट रोहित फॉर हेल्पिंग मी इन कमिंग आउट ऑफ द बॅड फेज..."

"थॅंक्स नंतर म्हण... तुला फ्रेश झालीस की तुझ्यकडून मोठी ट्रीट घेईन... डोण्ट वरी अबॉट दॅट... हाहा...तू कर यादी... मी वाट पाहतो आहे!"

"ओके.." नेहा इतक बोलून तिच्या समोर च्या प्रॉब्लेम्स ची यादी करायला लागली..जार वेळ गेल्यावर रोहित नी नेहा ला प्रश्न केला,

"सांग किती प्रॉब्लेम्स निघाले? ब्रेक अप आणि आई बाबांचा डीवोर्स ह्यापेक्षा तुला अजुन काहीतरी तुझ्या मनाला खातय का?"

नेहानी जरा वेळ विचार केला...आणि ती बोलायला लागली,

“मी आठवतीये पण २ सोडून बाकी मोठे प्रॉब्लेम्स काय आहेत! पण असे खूप मोठे प्रॉब्लेम्स नाहीयेत! तुझ बरोबर आहे...फार प्रॉब्लेम्स नाहीयेत! मी उगाच बाऊ केला! आणि सगळ्यांशी संपर्क तोडला.. माझ आयुष्य खराब करून घेतलं! आणि येस... मी आयुष्याकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या.... भरपूर यश नंतर प्रत्येक ठिकाणी अपयश आलं मला... आई बाबांचा डीवोर्स मी थांबवू शकले नाही...माझ स्वताच रिलेशन जपू शकले नाही मी दोन्ही गोष्टीत हरले! म्हणजे आयुष्यातल्या २ महत्वाच्या टप्प्यांवर हरले! आयुष्यात पहिल्यांदी अपयश पदरी पडल आणि ते अपयश मला सहन करता आलच नाही.... ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास झाला! त्यानंतर मी खचले आणि उरलेले प्रश्न निर्माण झाले! त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर आघात झाला! इतके आघात नाही सहन करू शकले! हे महत्वाच कारण आहे माझ्या डिस्टर्ब होण्याच...”

"आय टोल्ड यु.. आयुष्य इतकाही अवघड नाहीये! अर्थात जितका बाऊ करू तितका त्रास जास्ती... आणि प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक इज वर्किंग.. हाहा! अपेक्षा? कोणत्या? आणि नाती टिकू शकाली नाहीत म्हणून तू हरलीस का ग? नो नो.... नात्यात अपयश आल की तू हरलीस अस थोडी असत? नाती टिकली नाहीत म्हणून काय झाल... आणि आई बाबांचं म्हणशील तर त्यांना त्याचं आयुष्य त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे! त्यांना जे बरोबर वाटल ते त्यांनी केल...प्रत्येकजण आपापल आयुष्य जगायला मोकळा असतो! आता तू नाही एकट राहायचा निर्णय घेतलास? त्यात तुला कुणाची लुडबुड चालेल? नाही ना? मग तू तरी अश्या अपेक्षा ठेवतेसच का? नाती टिकली नाहीत त्यात तुझा दोष काहीच न्हवता...तरी त्या नात्यांमधल्या अपयशामुळे तू स्वत:ला दोषी समजत तुझ आयुष्य खराब करणार? आठव पूर्वीचे दिवस.. तेव्हा तू कशी होतीस आणि आता कशी झाली आहेस..."

"यु आर राईट रोहित... मी आधी प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचे.. ए रोहित, बराच वेळ झाला! तुला फक्त कॉफी वर बसवलंय! तुला काही खायला देऊ का? जेवायला काहीच नाहीये पण मी बनवून देऊ शकते... एकट राहायला लागल्यापासून स्वयपाकात एक्सपर्ट झालीये.. म्हणजे लेट्स अझ्युम डॅट.. हाहा!"

"आय नो यु आर अ गुड कुक! कॉफी पीतोय ना... ती बास! तू जेवलीस ना?"

"सध्या एक वेळच जेवतीये.... म्हणूनच घरी काहीच नाहीये आत्ता... "

"तू खरच वेडी आहेस.... कोणीतरी तुला सोडून गेल म्हणून तू तुझ आयुष्य खराब करणारेस का?? सगळे मजेत खात असतील आणि तू न खाता बसणार? आयुष्य काही झाल तरी थांबत नसत..ते आपल्या गतीनी चालूच असत मग आपण का मागे राहायचं? इतक सुंदर आणि हेल्दी आयुष्य मिळालाय तुला.. तरी तू झालेल्या गोष्टींचा विचार करून आयुष्य खराब का करतेस?..." रोहित चिडून बोलला

"पॉइण्ट आहे रोहित... खरच मी माझ आयुष्य कोणामुळे खराब का करू? ज्या लोकांना माझी परवा हि नाहीये त्यांच्यासाठी तर नाहीच नाही!! मी माझ आयुष्य माझ्या पद्धतीनी जगती आहे आणि आनंदात जगण माझ्या हातात आहे! मी नाती जपायचा खूप प्रयत्न केला होता पण त्यात अपयशी झाले तर झाले... पण म्हणून माझ आयुष्य खराब का करायचं! बरोबर....वेळ कुणासाठी थांबत नसत.. मी तरी जुन्या आठवणीत का राहू? एकदम बरोबर!!! १००% पटतंय रोहित!"

"तुला पटताय ना. .. मग आता सांग काय ठरवलायस? " रोहित एकदम खुश झाला...

"थांब जरा...मला भूक लागली! बरेच दिवसांनी मोकळ वाटतंय.... खायची इच्छा व्हायला लागलीये! आणि तुला पण भूक लागली असेल ना? मी मस्त मुगाची खिचडी टाकते आणि मग बोलू.... तुला आवडते ना मुगाची खिचडी?" नेहा चा मूड बदलायला लागला...ती आधी सारखी उत्साही ह्यायला लागली...

"मुगाची खिचडी. .. ग्रेट! मला खूप आवडते मुगाची खिचडी! बरेच दिवस झाले खाऊन....पापड असेल तर दे मे भाजून ठेवतो" रोहित म्हणाला!

"तू बस रे निवांत मी आणते गरमागरम खिचडी आणि पापड अगदी 10 मिनटात.. आणि संग खर गुड कुक आहे कि नाही!"

नेहा नि मस्त खिचडी केली... तिला कोपऱ्यात पाडलेल कैरीच लोणच दिसलं... कैरीच लोणच तिनी बाहेर काढाल.... गरम गरम खिचडी खाता खाता दोघांच बोलण परत चालू झाला

"वा..कैरीच लोणच,मुगाची खिचडी आणि पापड!! मस्त बेत ठरवलास!!" त्यानी पहिला घास तोंडात घातला... आणि लगेच बोलला, "वा..मस्त झालीय खिचडी... बर्‍याच दिवसांनी खातोय... आणि खूप भूक पण लागलीये! आता सांग काय ठरवल आहेस?" रोहित म्हणाला

"मला आठवल खिचडी च म्हणून बर नाहीतर तू काही बोलला नसतास.... तसाच बसला असतास उपाशी! आता काही नाही... परत जॉब ला अप्लाय करते... आणि माझी स्वप्न पूर्ण करते!! ठरवलेलं सगळ करायचं... लीस्टच बनवते काय काय करायचं आयुष्यात त्याची! मी खूप वेड्यासारखी वागले ना ... नाती टिकली नाहीत म्हणून मी स्वत:ला दोष देत राहिले आणि माझ पूर्ण आयुष्य खराब करायला निघाले होते... तू देवासारखा आलास तेही वेळेत! आणि मला वेळीच सावरलस! थॅंक यु रोहित!!"

"मैत्री केलीये... मदत तर करणारच ना? आणि नेहा तू परत पहिल्यासारखी व्हयला लागलीस... वा! पहिल्यासारखी नेहा पाहून मला मस्त वाटतंय...."

"हो... मला पण मस्त वाटताय... मी सत्य मान्य करत न्हवते आणि त्याच दुख करत बसले होते... तू इतक ऐकवलास म्हणून माझे डोळे उघडले.. आहे ते आहे मान्य केल आणि सगळे प्रश्ना आपोआप सुटायला लागले.."

"तू खरच मनापासून बोलतीयेस ना ग?"

"हो हो...खूप मनापासून आणि डोण्ट वरी आता परत निराशेच्या गर्तेत नाही अडकणार! तुझ्या प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक नी काम केल.. इट वर्कड फॉर मी! प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक शिकले ते अस उपयोगी पडेल ह्याची मला कल्पनी न्हवती..." खुश होऊन नेहा म्हणाली..

"नेहा, नाऊ आय अॅम हैप्पी! आणि प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक आल्वेज वर्क्स... मला स्वताला अनुभव आहे! फक्त ऑफिस च्या कामासाठी नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळत प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक नी... चलो,आता माझ काम झाल.. मी पळतो! घड्याळ बघ! 1 वाजून गेलाय.. आता निघायला हव..उद्यापासून परत बिझी विक चालू होईल! तू पण झोप मस्त!.. आणि थॅक्स ,खिचडी एकदम मस्त झालेली"

"ओके... थोड्या वेळ थांब म्हण्याला खूप रात्र झालीये! परत ये कधीतरी निवांत! तुझ्याशी बोलून फ्रेश झाले.. सगळे नकारात्मक विचार बाजूला गेले... आता एकदम पॉझीटीव वाटतंय! मला न्हवत माहीत रोहित, तू इतक सुंदर समाजावतोस... ग्रेट टू नो युवर हिडन टॅलेण्ट... हाहा"

"थांकू.... नक्की टाकतो निवांत चक्कर! माझी मदत झाली तुला,आय अॅम हॅपी! आता अशीच राहा मस्त.. काही वाटल तर फोन करत जा.. मेल लिहिलस तरी नो प्रॉब्लेम!”

"नक्की... आता जा..उशीर झालाय खूप! नीट जा आणि टेक केर! गुड नाईट! "

"येस... स्लीप वेल आणि आज झोपेच्या गोळ्या घेऊ नकोस.... ह्यापुढेही हात लाऊ नकोस त्या गोळ्यांना! ओके? आणि उद्या तुझा मेल चेक कर... यु टू टेक केर... आणि गुड नाईट!"

“मेल? कोणाच मेल येणारे? आणि उद्या कशाला आत्ताच पहाते कि...!!”

“ओके..वेळ झाला कि उत्तर दे...मी आता पळतो! गुड नाईट अॅड सिया!!”

इतक सांगून रोहील निघून गेला... आणि नेहा नी बऱ्याच दिवसांनी तिच जीमेल उघडल..... बऱ्याच दिवसांनी ती मेल पाहत होती....मेलबॉक्स मध्ये बरीच मेल्स येऊन पडली होती! आणि त्यात तिला रोहित ची ३३ मेल्स इनबॉक्स मध्ये दिसली..... रोहित ती इतकी मेल्स पाहून ती आश्यर्यचकित झाली...

नेहाच्या मनात विचार चक्र चालू झाल,

“रोहित आला तो ह्या एरिया मधे आला म्हणून नाही तर तो मुद्दाम मला भेटायला आला… मी त्याच्या मेल ला उत्तर दिल नाही म्हणून त्याला कळल कि मी ठीक नाहीये? त्याला कळल असेल कि मी डिस्टर्ब झालीये? त्याला कळल असेल माझ काहीतरी बिनसलंय? आणि म्हणूनच तो मला भेटायला आला होता का? मी त्याला मदत केली होती त्या मदताची अशी परतफेड? असाच असेल... नाहीतर इतक्या वेळ का थांबला असता! मला काही पत्ता लागून न देता तो माझा मूड बदलून गेला सुद्धा! मला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढल आणि मला काही कळल सुद्धा नाही! आणि कश्यासाठी आलोय हे कळून सुद्धा दिल नाही...... प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक अस सांगत मला माझ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढल!!! रोहित खरच ग्रेट आहे!!” रोहितला मनोमन थॅक्स म्हणून नेहा बेड वर आडवी होऊन प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक चा विचार करत बऱ्याच दिवसांनी शांत झोपली....

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com