music therapi in Marathi Magazine by Anuja Kulkarni books and stories PDF | म्युझिक थेरपी- एक प्रभावी उपचार पद्धती!!!

Featured Books
Categories
Share

म्युझिक थेरपी- एक प्रभावी उपचार पद्धती!!!

म्युझिक थेरपी- एक प्रभावी उपचार पद्धती!!!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या सगळ्यांचेच ताण इतके वाढले आहेत. घरातली कामं, ऑफिसमधल्या चिंता इत्यादी सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातला ताण वाढत असेल! त्यामुळे उद्भाणारे आजार ह्यालाही तुम्हाला तोंड द्यायला लागत असेल...त्याचबरोबर इतरही आजारांवर म्युझिक थेरपी प्रभावीपणे काम करते. तुम्ही ताण घालवायला किंवा निरोगी राहायला व्यायाम करत असलाच. पण व्यायामाबरोबरच म्युझिक थेरपी चा समावेश तुम्ही तुमच्या आयुष्यात केला कि म्युझिक चा होणारा सकारात्मक प्रभाव दिसून येईल!! तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण संगीताचा आपल्या आयुष्यावर आणि मन:स्थितीवर व्यापक आणि सखोल परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती संगीताला प्रतिसाद देत असते. म्युझिक अर्थात संगीत तुमच्या मनाला भावत त्याचबरोबर म्युझिक चा उपयोग ताण घालवायला होऊ शकतो. म्युझिक हे तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी करण्यात देखील प्रभावी ठरत. त्याचबरोबर म्युझिक थेरपी चा उपयोग फक्त ताण घालावाण्यापर्यंत मर्यादित नाहीये. हल्ली संगीताचा उपयोग फक्त मन रिझवण्यासाठीच नाही तर आधुनिक उपचारपद्धतींना पूरक म्हणून केला जात आहे. त्यामुळे संगीत हे फक्त मनाला सुखावत, भावत आणि रिझवत नसून ते मनाची मरगळ दूर पळवतं. मनाला खूपच ताजंतवानं करतं. शरीराचे आजार दूर पळवतं. तर अशा या संगीताचा उपयोग औषधोपचारासाठी केला जाऊ शकतो, हा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. जसं की, काही ध्वनी हे कफ, पित्त आणि वात अशा विकारांवर उपयुक्त ठरू शकतात. तुमच्या आजारावर डॉक्टरच्या गोळ्यांबरोबरच संगीताचा वापर केला तर दोन्हीचा एकत्र असा प्रभावी परिणाम दिसून येतो. उदा. वाताच्या आजारांवर वरच्या पट्टीतील आवाजाचा उपयोग होतो. पण ही उपचारपद्धती औषधांना पूरक अशी आहे. त्यामुळे औषधोपचार घेताना म्युझिक थेरपीचा उपयोग केल्यास सर्वात जास्त फरक पडतो. म्हणजेच, संगीत ऐकून तुम्ही तुमचे ताण कमी तर करू शकालच पण त्याचबरोबर एक हेल्दी आयुष्य सुद्धा जगू शकाल. त्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला तर आयुष्य आनंदी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यासाठी म्युझिक थेरपीस्ट ची मदत घेऊ शकता.

म्युझिक थेरपी तुम्ही लगेचच चालू करू शकता.. त्याचे अनेक फायदे आहेत-

१. हिलिंग म्युझिक- तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांची प्ले लिस्ट बनवा.

लगेच मोबाईल, आयपॉड किंवा सीडी प्लेयर काढा! तुम्ही बरीच गाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच संगीत ऐकत असाल. त्या बऱ्याच गाण्यांमध्ये काही गाणी किंवा एका विशिष्ट प्रकारच संगीत ऐकल्यावर तुम्हाला शांत वाटत असेल ते शोधा. आणि तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांची प्ले लिस्ट बनवा. त्यात शास्त्रीय संगीताचा समावेश न चुकता करा पण फक्त हे बघा शास्त्रीय संगीत ऐकल्यामुळे तुम्हाला शांत वाटत आहे ना. जे म्युझिक ऐकल्यावर तुम्ही एकदम शांत व्हाल आणि जे म्युझिक तुम्हाला आराम देईल त्याचा समावेश करा. ते संगीत ऐकल्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.

२. हिलिंग म्युझिक- म्युझिक थेरपीस्ट शोधा

तुम्ही बऱ्याच प्रकारच संगीत ऐकल असेल पण त्यातल कोणत्या प्रकारच संगीत तुमच्या साठी प्रभावी आहे हे तुम्हाला कळत नसेल तर मुझिक थेरपीस्ट ची मदत नक्की घ्या. म्युझिक थेरपीस्ट तुमची आवड आणि तुम्हाला प्रभावी असणार संगीत शोधून देण्यात मदत करू शकतो. म्युझिक थेरपीस्ट तुम्हाला कोणत्या प्रकारच संगीत तुम्ही ऐकल पाहिजे ह्याचा योग्य सल्ला देऊ शकतो आणि तेही अगदी एकाच भेटीत.

३. हिलिंग म्युझिक- तुमच्या प्रसुतीच्या वेळी

तुम्ही सिझेरिअन प्रसुतीच्या विरोधात असाल आणि तुम्हाला नैसर्गिक प्रसूती हवी असेल तर तेव्हा तुम्ही म्युझिक थेरपी चा विचार करु शकता. प्रसुतीच्या वेळी वेदना होतात. पण प्रसुतीच्या वेळी संगीत ऐकल्यामुळे तुम्ही रीलॅक्स होऊ होता आणि त्यामुळे प्रसूतीच्यावेळी होणाऱ्या वेदना देखील कमी होण्यास मदत होते.

४. हिलिंग म्युझिक- तुमच्या आरोग्यासाठी

संगीत ऐकल्यामुळे तुम्ही उत्साही राहता त्यामुळे नकारात्मक विचार बाजूला ठेवण्यात संगीताचा प्रभावी उपयोग होतांना दिसतो. हिलिंग म्युझिक तुमच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणजे ते व्यायामाच्या बदल्यात काम करत नाही पण संगीत ऐकल्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि आरोग्य सुधृड राहण्यास मदत होते. हिलिंग म्युझिक ऐकल्यामुळे व्यसनातून मुक्ती मिळण्यास मदत होऊ शकते. म्युझिक थेरपी मुळे तुम्ही फक्त रीलॅक्स होत नाही तर त्याचबरोबर तुमचा एकटेपणा कमी होण्यास मदत होते.

निरोगी आयुष्य मिळण्याबरोबरच म्युझिक थेरपी चे काही फायदे- .

१. मानसिक अस्वस्थता, कर्करोग, निद्रानाश, खचलेपणा आणि व्यक्तिमत्वाशी निगडित असलेल्या अनेक समस्या संगीताच्या माध्यमातून सुटू शकतात. भारतामध्ये प्रदीर्घ काळपासून विविध रागांचा वापर विविध प्रकारच्या विकारांसाठी करण्याची परंपरा आहे. मग ते संगीत म्हणजे बासरी वादन असू शकेल किंवा हार्मोनियम वादन असेल. संगीताने माणसाची मन:स्थिती एकदम बदलून जाते. संगीत ही एक थेरपी आहे, उपचार पद्धती आहे. बऱ्याच विकारांवर संगीत उपयुक्त ठरते.

२. तणावसंशोधनाने असे दाखवून दिलेले आहे की, तणावग्रस्त व्यक्तीला बासरी वादन ऐकवले की, त्याचा ताण कमी होतो. त्याचबरोबर त्याने अनेक प्रकारच्या वेदना सुद्धा कमी होतात. बासरी ऐकल्याने रक्तदाब कमी होतो. आपले कोणतेही आवडीचे संगीत तन्मयतेने आणि एकाग्रतेने डोळे मिटून ऐकले की, रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. रोज अर्धा तास आवडीचे संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके तर नियंत्रणात राहतातच आणि श्‍वास नियंत्रित होतात. या दोन्हींचा परिणाम मेंदूचे विकार झालेल्या रुग्णांवर सकारात्मकपणे जाणवतात. मायग्रेन आणि तीव्र डोकेदुखी यांच्यावर तर संगीताचा चांगलाच वापर होतो. तर त्यामुळे आपल्या मेंदूतील रक्तवाहिन्या शांत होतात. त्यामुळे मेंदू स्थिर होतो.

४. संगीत ऐकण्याने माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. कारण संगीत मेंदूला काही संदेश पोचवते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स पाझरवण्याचा आदेश देते. त्याचबरोबर संगीत ऐकताना डोळे झाकून घेतल्यास मन शांत होते आणि मनाची एकाग्रता वाढून मेंदू तल्लख होतो. काही लोकांना विस्मरणाचा त्रास होत असतो, त्यांना संगीताने स्मरण येऊ शकते.

काही टिप्स- ह्यासाठी तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

१. वाताच्या दोषात दिवसातून दोन वेळा म्हणजे, पहाटे ३ ते ७ आणि दुपारी ३ ते ७ या वेळेत मधुवंतीराग ऐकावा.

२. उच्चरक्तदाबाचा त्रास असणा-यांनी सकाळी ७ ते १० या वेळेत तोडीतर संध्याकाळी ७ ते १० या वेळेत पुरियाऐकणं फायदेशीर ठरतं.

मायग्रेनच्या विकारावर सकाळी ६ ते ९ या वेळेत रामकलीआणि झोपण्यापूर्वी दरबारी कानडाऐकावा.

३. राग बिहागवर आधारित गाणी ऐकल्याने मन:शांतीमिळते.

आता तर टाइम्स म्युझिकने मायग्रेन, संधिवात, उच्चरक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) या आजारांवर उपुयक्त सीडीज तयार केल्या आहेत. रुपक कुलकर्णी (बासरी), संगीता शंकर (व्हायोलीन), जयंती कुमारेश (वीणा), चिराग कट्टी (सितार), जयदीप घोष (सरोद) या कलाकारांनी त्यासाठी वाद्यवादन केलं आहे.

गर्भावर उत्तम संस्कार व्हावेत, त्याचा उत्तम विकास व्हावा यासाठी हल्ली गर्भवती स्त्रिया खूपच जागरूक असतात. गरोदरपणात मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी गर्भाकुरया चार सीडीज चा सेटही प्रकाशित झाला आहे.

एकदम सोप्प्या असलेल्या म्युझिक थेरपी चा उपयोग तुमच्या निरोगी आयुष्यासाठी नक्की करून घ्या. म्युझिक थेरपीस्ट जाइपर्यंत तुम्हाला ज्या संगीतामुळे शांत वाटत आणि ज्यामुळे तुमचा ताण निघून जातो ते ऐकायला चालू करा. तुम्ही म्युझिक थेरपी चालू केली कि म्युझिक थेरपी चा सकारात्मक परिणाम अनुभवायला तयार व्हा आणि निरोगी आयुष्य जगायला चालू करा!!!! हि थोडी फार माहिती आहे पण सविस्तर माहिती हवी असल्यास तुमच्या जवळचा म्युझिक थेरपीस्ट निवडून आयुष्य सुखकर बनवा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.