Mich.. in Marathi Adventure Stories by Naeem Shaikh books and stories PDF | मीच....

Featured Books
Categories
Share

मीच....

मीच... (शोधात आहे माझ्या)

अमनला डोळे उघडण्यास त्रास होत होता. पण हळूहळू प्रयत्न करत त्याने डोळे उघडले. त्याच्या समोर त्याला ओळखणारे काही जण, दोन नर्स आणि एक वॉर्डबॉय त्याच्या तोंडाकडं पाहत उभे होते. त्याचे डोळे उघडताच सर्वांना आनंद झाले. नर्स डॉक्टरांना बोलवायला गेली तर वॉर्डबॉय पॉलीसांना. अर्ध्याच तासात पॉलीसं तिथं पोहोचली. त्यांनी आधी डॉक्टरांकडे अमनबद्दल चौकशी केली आणि नंतर ते अमन जवळ आले. अमन शेजारी दोन तरुण मुलं आणि एक मुलगी चिंता ग्रस्त होऊन बसले होते. ते अमनचे मित्र असावेत, असा पॉलीसांनी अंदाज लावला. त्यांना थोड्या वेळासाठी बाहेर जाण्यास सांगीतले. सर्वजण बाहेर गेल्यावर पॉलीसांनी चौकशीलला सुरुवात केली.

“तुम्हाला अपघात होण्या आधीचं काही आठवतं का ?”

“नाही. मला तर मी कोण आहे तेसुध्दा आठवत नाहीये.”

“प्रयत्न करा आठवण्याचा. तुम्ही पॉलीस स्टेशनमध्ये फोन केला होता आणि तुम्ही खुन होताना पाहीलंत, असं सांगितलं होतं... काही आठवलं का.”

“नाही. आठवलं असतं तर आधीच सांगितलं असतं. पण जर आठवतच नसेल तर काय सांगणार.”

“ठिक आहे. जर काही आठवलं तर आम्हाला कळवा.”

एवढं बोलून पोलीसं तिथुन निघून गेली.

रात्र झाली. अमनचे सर्व मित्र आपापल्या घरी निघून गेले. फक्त निधी तिथं थांबली. ती अमनसाठी जेवन घेऊन वॉर्डमध्ये आली. अमन बेडवर बसला होता. तिला आत येताना पाहून तो म्हणाला.

“बघा मॅडम् , मला काहीच आठवत नाहीये की तुम्ही कोण आहात. माझी स्मरण शक्ती खरंच नष्ट झाली आहे. त्यामुळं तुम्ही मला तेच तेच प्रश्न विचारुन त्रास देऊ नका.”

“रिलॅक्स अमन, मला माहित आहे कि तुला काहीच आठवत नाहीये. मी तुझी फ्रेंड् निधी. मी तुझ्यासाठी जेवन घेऊन आले आहे...”

निधी त्याच्या शेजारी जाऊन बसली. डबा उघडला आणि ताटात पोळी भाजी काढून अमनला ती ताट देत म्हणाली.

“डोकं शात ठेऊन जेवन कर. तुला जे काही आठवत नसेल ते मी तुला सांगते.”

इतक्यात अमनच्या मोबाईलची रींग वाजली. त्याने कॉल घेतला.

“हॅलो, कोण.”

“अं... अ... राजू आहे का.”

“नाही. रॉन्ग नंबर.”

मोबाईल टेबलावर ठेवत अमन निधीला म्हणाला.

“तर मला सांग हा काय प्रकार आहे. हा हॉस्पीटल, ती पोलीसं, अपघात...”

“सांगते, पण आधी जेऊन तर घे.”

“एक काम कर, मी जेवायला सुरुवात करतो तू सांगायला सुरु कर.”

“चालेल...”

अट मान्य करुन निधीने ताट अमनच्या हातात दिले आणि घडलेली घटना सांगू लागली.

“मी निधी आणि तू अमन, हे तर आतापर्यंत कळालंच असेल. आपण दोघं एका कंपनीत गेल्या दोन वर्षापासून सोबत काम करत आहोत. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. परवा रात्री तू पोलीसांना फोन करुन सांगितलंस की तू एका व्यक्तीचा खुन होताना पाहिलं. तू पोलीसांना पत्ता सांगीतला. तुझ्या सांगितलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचले तेव्हा तू रस्त्यावर बेशुध्दावस्थेत पडलेला होतास. डोक्यातून रक्त वाहत होते. लवकरात लवकर तुला इथं आणलं. पण अजुनही कळालं नाहीये की तू एवढ्या रात्रीचा शहरापासून १५ किलोमिटर लांब काय करायला गेला होतास आणि कोणाचा खुन होताना तू पाहिलंस.”

“मग मी ज्या ठिकाणी पोलीसांना बोलावलं होतं, त्या ठीकाणी पोलीसांना कोणाचेच शव सापडले नाही का...?”

“नाही. त्यांनी तिथं खुप शोधलं, पण काणाचं मृतदेह तर सापडलं नाही, पण तुझा कॅमेरा सापडला. त्यात एक फोटो आहे ज्यात तो खुनी खुन करताना दिसतोय. पण संध्याकाळची वेळ असल्याने खुनी आणि ज्याचा खुन झाला तो, दोघंही ओळखुन येत नाहीये. फक्त त्यांची सावलीच दिसतेय.”

तिन दिवसानंतर...

पोलीसांनी निधीला पोलीस चौकीत बोलावून घेतले होते. बोलवलेल्या वेळेवर निधी तिथं हजर झाली.

“हॅलो, मी इंस्पेक्टर जाधव. पाच दिवसा आधी मीस्टर अमनने आम्हाला कॉल करुन एका व्यक्तीचा खुन झाला आहे असं सांगून त्या ठिकाणी बोलवले आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा काय पाहिलं आणि त्यानंतर काय झालं ते तर तुम्हाला माहीतंच आहे.”

“मला का बोलवलंत...”

“आज सकाळी एका मानसाला मासे पकडताना त्याच्या जाळीत एक मृतदेह अडकलं. त्याने लगेच आम्हाला फोन लावला आणि ते मृतदेह आम्ही आमच्या ताब्यात घेतले...”

“पण हे मला का सांगताय...?”

“ऐकूण तर घ्या. त्याला ज्या नदीत ते मृतदेह सापडले, ती नदी तिथंच आहे ज्या ठिकाणाहून मिस्टर अमनने आम्हाला फोन केला होता. सापडलेलं मृतदेह तुमच्याच ऑफिसमध्ये काम करणारा आणि तुमचाच मित्र ‘राकेश’ याचे आहे. आधी त्याला चाकू मारला आणि नंतर त्याच्या पोटाला दगड बांधून त्याला नदीत फेकून दिले. ”

राकेशचं नाव ऐकून निधीला आश्चर्याचा धक्का बसला. तिला सुरुवातीला राकेशच्या खुनाच्या बातमीवर विश्वासच बसला नाही. पोलीसाने मृतदेहाचा फोटो दाखवल्या नंतर तिला विश्वास बसला. फोटो पाहून ती रडू लागली.

“हे पाहा मॅडम्, तुम्ही रडू नका. मी समजू शकतो तुमचं दुःख. पण आता स्वतःला आवरा आणि त्याच्या खुन्याला पकडण्यात आमची मदत करा.”

तिने गालावरचे आश्रृ पुसले आणि होकारर्थी मान हलवली.

“तर मला मिस्टर अमन आणि राकेश यांच्याबद्दल काही सांगू शकाल...”

“अमन आणि मी गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करतोय. राकेश तर सहा महिण्यापुर्वीच आमच्या कंपनीत आला होता. आमचा खुप चांगला मित्र होता तो. अमन आणि राकेशतर जिवलग मित्र होते....”

“आणखीन काही आहे... जे सांगण्या सारखं आहे आणि ज्याने आम्हाला मदत होईल असं....म्हणजे राकेशचा कोणी वैरी किंवा त्याचं कोणासोबत भांडणं वगैरे...”

“असं तर काही नव्हतं.”

“ऑके. आम्हाला गरज वाटली तर तुम्हाला परत यावं लागेल.”

काही न बोलता ती निघून गेली.

राकेशच्या मृत्युनंतर निधी दुःखी राहू लागली. अमन हळूहळू त्याचं आयुष्य पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत होता. तो पुन्हा कामावर जाऊ लागला. जुन्या गोष्टींबद्दल त्याच्या सोबत काम करणारे त्याचे मित्र त्याला सांगत असे. यासाठी निधीने त्याला खुप मदत केली. ती अमनसोबत राहून त्याला सर्वकाही सांगत असे. दिवसांमागून दिवस जात होते. दुसरीकडे पोलीस खुन्याला शोधण्यासाठी पुरावे जमवत होती.

“शिंदे, काय झालं त्या केसचं ?”

“कोणत्या केसचं...ते नदीत सापडलेल्या डेड् बॉडीवाल्या केसचंना.”

“हो त्याच केसचं... काय झालं ?”

“तपास चालू आहे.”

“आता पर्यंत आपल्याला काय काय माहिती मिळाली आहे, ते सांगा जरा.”

“सर, अमनच्या मोबाईलवरुन हे कळालं की त्या संध्याकाळी राकेशने अमनला शहरापासून लांब त्या जागी बोलावले. त्याने अमनला ५ वाजता बोलावले होते आणि अमन त्याच्या रुम वरुन ४ वाजता निघाला. त्याने आपल्याला ८ वाजता फोन केला आणि सांगीतलं की त्याने खुन होताना पाहिला आहे. त्याने पत्ता सांगीतला. आपण पोहोचे पर्यंत त्याचा अपघात झाला होता. तिथुन मिळालेल्या अमनच्या कॅमे-यामध्ये खुन्याचा फोटो आहे पण त्यात त्यांची फक्त सावलीच दिसत आहे. ते ओळखूच येत नहीये. तिस-या दिवशी राकेशचे शव नदीत सापडले आणि ती नदी अमनच्या अपघात स्थानापासून जवळच आहे.”

“या दोघांच्या हिस्टरी काढल्या का.”

“काढल्या, पण काही खास नाही. एवढंच की तिन आठवड्यांपुर्वी अमन आणि निधीमध्ये भांडन झालं होतं. भांडनाचं कारण कळालं नाही. भांडणानंतर राकेशने, म्हणजे दोन आठवड्या आधी निधीला लग्नासाठी विचारले होते आणि निधीने होकार दिला. निधीच्या म्हणन्यानुसार या गोष्टीला घेऊन सगळेच खुश होते.”

“मग असं काय झालं असेल की ज्याने त्याला त्याचा प्राण गमवावा लागला.... राकेशच्या रुमची झडती घेतली ?”

“झडती घेतली, पण काही कामाचे पेपर्स नाही मिळाले.”

“ फक्त पेपर्स नाही, सर्वकाही तपासा. त्याचे फोटो, वही, पुस्तक सगळं तपासा.”

“ओके सर”

“घटना स्थळी ते टायरचे ठसे... त्या ठशांना पाहून असं वाटत होतं की ती गाडी शहराकडं येत असावी... त्या रस्यावरच्या टोल नाक्याच्या सि.सि.टि.व्ही.चे फुटेज तपासले का ?”

“नाही.”

“त्या टोलनाक्यावरुन, रात्री ८ ते ८.३० पर्यंत तिथून पास् झालेल्या सर्व फोरव्हिलर्स गाडींचे फोटो घेऊन या.”

हवलदार शिंदेंना दिलेली काम पुर्ण करण्यासाठी ते निघाले आणि इंस्पेक्टर त्या केसची फाईल पुन्हा एकदा पाहू लागले.

निधी कॅफेमधे अमनची वाट पाहत होती. अमनला तिथे पोहोचण्यास उशीर झाला. त्याच्या चेहे-यावरुन उदासीनता दिसून येत होती. ते पाहून निधीने त्याला विचारले.

“काय झालं अमन, टेंशनमध्ये आहेस वाटतोय.”

“तू सांगितलं तसं मी केलं. मी गावाकडं माझ्या घरच्यांना झालेल्या घटने बद्दल काहीच सांगीतले नाही. पण ही गोष्ट मला आता त्रासदायक वाटू लागली आहे.”

“प्रॉब्लम काय आहे.”

“माझं लग्न फिक्स झालं होतं, तेही दोन महिण्याआधी आणि काही दिवसात मला गावाला जावं लागेल, लग्नासाठी. तू ही गोष्ट मला सांगीतली का नाहीस.”

“काय ! तुझं आणि लग्न...? तू मला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतंस.”

अमन डोक्याला हात लाऊन बसला. त्याला टेंशनमध्ये पाहून निधी म्हणाली.

“अरे अमन टेंशन घेऊ नकोस. जरी तू मला आधी सांगितलं असतंस आणि मी तुला त्याची आठवन करुन दिली असती तरी वेगळं काय होणार होतं... आणि आता काय झालंय.”

“तुला नाही कळणार की काय झालंय ते.”

“असं काय झालंय जे मला कळणार नाही.... आणि अमन कधीतरी लग्न करावंच लागणार आहे, मग... करुन टाक.”

“काय करुन टाक. तुला समजत नाहीये काय प्रोब्लेम झालाय ते.”

“कसला प्रोब्लम...”

“मी लग्न कसं करु..”

“कसं करु म्हणजे. तसंच जसं सगळे करतात.”

“पण मी कसं लग्न करु शकतो. मला तर तू आवडतेस. मग...”

तो बोलता बोलता थांबला. अमनच्या शब्दाने निधी दचकली आणि तिच्या मनात अमनच्या शब्दांची पुनरावृत्ती झाली.

“म्हणजे... निधी.... मला असं म्हणायंच...”

“अमन, तुला एक गोष्ट सांगते. तू या प्रेमाच्या भावनांमध्ये नको अडकूस. किमान माझ्यासाठी तरी नको.”

“पण का. माझ्याकडून काही चुक झाली का...”

“चुक झाली नाही पण तू .... समजून घे, राकेश माझ्यावर प्रेम करत होता. लग्न करणार होतो आम्ही. त्याचा खुन झाला आहे आणि त्याच्या खुन्याचा अजून तपास लागला नाही. अशा परीस्थितीत तू असा कसा विचार करु शकतोस.”

“तू आता काय म्हणालीस... राकेश तुझ्यावर प्रेम करत होता...”

“हो तो माझ्यावर प्रेम करत होता. खुप प्रेम करत होता.”

“पण तू असं का म्हणालीस की तो प्रेम करत होता... तू असं का म्हणाली नाहीस की तू त्याच्यावर प्रेम करत नाहीस.”

“अमन, प्लिझ्.... मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये.”

क्षणार्धात तिचे डोळे भरुन आले.

“आतापर्यंत ज्या व्यक्तीने आपली एवढी मदत केली. त्याच व्यक्तीला आज आपण त्रास देतोय.’

मनातल्या मनात अमन स्वतःला समजवंत होता. त्याने विषय बदलायचे ठरवले.

“निधी ते सोड, तू इथंला पिझ्झा खाल्लाय का कधी... खुप छान लागतो.”

निधी रुमालाच्या कोप-याने डोळ्याच्या कोप-यांतून अश्रृ टिपत म्हणाली.

“आपण ज्या कॅफेत बसलोय, त्यात पिझ्झा नाही मिळत.”

निधीचं वाक्य ऐकून अमन शांत बसला. त्याच्या चेह-याकडे पाहून निधी गालातल्या गालात हसली.

पोलीस चौकीत....

हवलदार एका मध्यम वयीन मानसाला चौकीत घेऊन आला आणि इंस्पेक्टर जाधव समोर बसवले.

“कोण आहे हा..”

“त्या दिवशी याची एकट्याचीच गाडी त्या टोल नाक्यावरुन पास् झाली होती. आणि याने कबुल केलं आहे की तो अपघात याच्याच गाडीने झाला होता.”

“शाब्बास शिंदे.”

हवलदार शिंदेंच्या पाठीवर थाप मारत इंस्पेक्टर म्हणाले. तो मानसाला खुर्चीवर बसवले आणि त्याची चौकशी सुरु झाली.

“नाव काय आणि कुठला आहेस तू ?”

“माझं नाव शाम आहे. मी सोलापूरचा....”

“...तू आधी राकेशला मारलंस. ते अमनने पाहिल्यामुळं त्यालासुध्दा मारण्याचा प्रयत्न केलास. आता तू मला फक्त एवढंच सांग की राकेशला का मारलं.”

“साहेब, मी कोणाचाच खुन नाही केला. त्या दिवशी मी शहराकडं येत असताना, टोल नाक्यापासून १० – १२ किलोमीटर दूर रस्त्यावर अचानक एक मुलगा झुडपांमधून बाहेर आला. मला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मी त्याला उडवलं. तो मेला या भितीने मी तिथुन पळून गेलो.”

इंस्पेक्टरने त्याला जेलमध्ये टाकण्याचा शिंदेला ईशारा केला. ईशारा मिळताच हवलदार शिंदे त्याला घेऊन गेले. इंस्पेक्टर जाधवांचा गुंता आता वाढतच चालला होता.

सकाळीची वेळ, निधीच्या दाराची बेल वाजली. दार उघडले तर समोर अमन होता.

“अमन तू ¡...या वेळी.. काही प्रोब्लम तर.....”

“नाही, काही प्रोब्लम नाही.”

“ओह्.... आत येना.”

“नाही, मला जायचंय... थोडा घाईत आहे मी. हे देण्यासाठी आलोय...”

बोलता बोलता त्याने हातातल्या पिशवीतून पत्रिकांचा गठ्ठा बाहेर काढला आणि त्यातली एक पत्रिका तिला देत तो म्हणाला.

“माझ्या लग्नाला ये... पुढच्या महिण्यात ५ तारखेला..”

“लग्न...?”

काही क्षणासाठी दोघांमध्ये वेगळीच शांतता निर्माण झाली. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात आपापल्या प्रश्नांची उत्तर शोधत होते. अमन स्वतःच्या मनाला आवरण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याची नजर होती की निधीच्या नजरेत अडकलेली. तेवढ्यात अमनचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या आवाजाने दोघंही भानावर आले. अमनने कॉल उचलला.

“हॅलो ..... तुम्हाला किती वेळा सांगीतलं आहे.... नाही, रॉन्ग नंबर आहे.”

मोबाईल ठेवत तो म्हणाला.

“मला उशीर होतोय.”

“तू गावाला चाललास...”

होकार देऊन तो तिथुन निघून गेला. निधीने पत्रिका उघडून पाहिली. पत्रिकेच्या पाकिटात पत्रिके सोबत एक पेन ड्राईव्ह ठेवला होता. तिने तो पेन ड्राईव्ह तिच्या कंप्युटरला लावला. त्यात अमनने त्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. तिने ती फाईल उघडली आणि ती रेकॉर्डींग चालू केली.

“निधी, झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागतो. पण काय करु मला जी गोष्ट कळाली, ती गोष्ट माझ्या मनाला कळाली नाही. तुझ्यासोबत राहून मी कधी तुझ्या प्रेमात पडलो, मला कळालंच नाही. तुझ्या नकाराने मला त्रास तर झाला पण मी सगळ्या गोष्टी विसरुन पुढं जाण्याची ईच्छा करतोय. आता पर्यंत तू मला एवढी मदत केलीस. या वेळीसुध्दा मदत करशील. पुढंच्या महिन्यात माझ्या लग्नाला तू आलीस तर मला वाटेल तू मला माफ केलंस. प्लिझ्... दोन वर्षांच्या आपल्या मैत्रीसाठी ये. हे सर्व मी तुझ्या समोर उभा राहून बोलू शकलो नसतो म्हणून मी रेकॉर्ड करुन पेन ड्राईव्ह तुला देतोय...”

रेकॉर्डींग संपली. ऐकताना निधीचे डोळे भरुन आले होते.

पोलीस चौकीत...

हवलदार शिंदे इंस्पेक्टरच्या केबीनमध्ये धावत आले. त्यांना असं धावत येताना पाहून इंस्पेक्टरांनी त्यांना विचारले.

“काय झालं, असं धावत का आला.”

“सर, त्या राकेश मर्डर केस मधला महत्त्वाचा पुरावा सापडला.”

“कोणता पुरावा.”

“राकेशची डायरी. त्यात त्याने सर्वकाही लिहून ठेवल आहे.”

“महत्त्वाचं काय सापडलं त्यात.”

“खुप काही सापडलं. त्यात त्याने लिहिलं आहे की त्याने निधीला लग्नासाठी विचारले आणि निधीने होकार पण दिला. सर्व काही व्यवस्थीत चालू आहे असं त्याला वाटलं पण त्याला गेल्याच आठवड्यात कळाले की तीला राकेश बिलकुल आवडत नव्हता. आवडत नसताना तिने होकार का दिला, या एका विषयावरुन त्यांच्यात भांडन झालं. निधीने राकेशला सोडून जाण्याची धमकी दिली होती पण ती तसं करु शकली नाही कारण राकेशनने तिला ब्लॅकमेल केले होते. कशाने ब्लॅकमेल केले, ते कळालं नाही. पण त्यामुळे निधी राकेशवर खुप चिढली होती. तिने राकेशला मारुन टाकण्याची धमकीसुध्दा दिली होती. या बद्दल तो अमनशीसुध्दा बोलला होता.”

“हे सर्व त्याने डायरी लिहिले होते...”

“हो, हि पाहा डायरी.”

शिंदेंनी डायरी त्यांच्या समोर ठेवली. इंस्पेक्टरने डायरी पाहिली आणि शिंदेंना म्हणाले.

“पण त्या फोटोमध्ये तर एका पुरुषाची सावली दिसत होती.”

“तिने कोणाला तरी सुपारी दिली असेल.”

“काहीही असो पण लवकरच खुनी आपल्या हाती लागणार आहे.”

“सर, आणखीन एक गोष्ट. त्याने डायरीत लिहिलं आहे की त्याने योगेश नावाच्या त्याच्या मित्राकडून पंचेचाळीस हजार रुपये उधार घेतले होते. आणि त्याचा तो मित्र राकेशला सारखा त्या पैशाबद्दल विचारत होता.”

इंस्पेक्टर जाधवने काही क्षण विचार करण्यात घालवले आणि मनाशी काहीतरी ठरवून हसत म्हणाले.

“एक प्लॅन आहे....”

अमन खुर्चीवर बसुन विचार करत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईल स्क्रिनवर तोच नंबर होता, ज्याने फोन करुन अमनला हैरान केले होते. अमनने ब-याच वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण तरीसुध्दा त्या नंबरवरुन कॉल येतच राहिले. या वेळी त्याने कॉल उचलला आणि म्हणाला.

“तुम्हाला काय हवंय...का सारखं फोन करताय.”

“राजू आहे का..”

“इथं कोणी राजू नाही राहत, किती वेळा सांगायचं तुम्हाला.”

“तुम्ही अमन आहात ना..?”

“तुम्ही मला ओळखता ?”

“तू मला नाही ओळखत ?”

“नाही... कोण आहात तुम्ही ?”

“मीच... मीच तर आहे तो, ज्याने राकेशला मारुन नदीत फेकले होते....”

क्रमश...