Anuja Kulkarni
anuakulk@gmail.com
खुलली प्रेमाची कळी....
निशा ला तिचा भूतकाळ अजिबात आठवायचा न्हवता. त्यामुळे तिनी स्वताला एकदम व्यस्त करून घेतलं होत. निवांत वेळ मिळाला की भूतकाळ तिच्या समोर नाचायला लागायचा. आणि भूतकाळ आठवून तिला दुःखी व्हायचं न्हवत. म्हणूनच ती सतत कामात व्यग्र रहायची! पण एके दिवशी निशा ला खूप एकट वाटत होत. तेव्हा नकळत तिनी तिची डायरी उघडली आणि ती वाचायला लागली. खर तर, निशा तिची डायरी वाचायचं टाळायचीच.. कारण डायरी वाचून तिचा भूतकाळ परत तिच्या डोळ्यासमोर येऊन ती दुःखी होईल अशी तिला भीती वाटायची. तिची डायरी फक्त लिहिण्यापुर्ती होती... एकदा का लिहून झाल की ते अजिबात परत परत वाचायचं नाही अस तिनी मनोमन ठरवलं होत... कॉलेज मधले सुंदर दिवसाची नोंद तिने तिच्या डायरीत करून ठेवली होती...कॉलेज मध्ये काही दिवस तिने डायरी न चुकता लिहिली. पण जॉब चालू झाला आणि काही वर्षांपासून तीचं डायरी लिहीण बंद झालेलं. एक दिवशी अचानक तिला अचानक खूप एकट असल्याची तिला जाणीव झाली.. तिनी ठरवलं होता, डायरी वाचून भूतकाळा मध्ये अजिबात रमायचं नाही कारण तस करून काहीही फायदा न्हवता. ती वर्तमान बदलू शकत न्हवती. त्यामुळे शक्यतो ती डायरी वाचायचं टाळायची पण त्या दिवशी तिला डायरी वाचायची प्रकर्ष्यानी इच्छा होत होती. हो नाही करत तिनी डायरी उघडली आणि ती डायरी वाचायला उघडली आणि त्या क्षणी आपण एकटे आहोत ह्या विचारांनी ती सैरभैर झाली. एकटी नी राहायचा निर्णय सर्वस्वी तिचा होता पण त्यामुळे तिच आयुष्य बदललं होत. तिला एकटेपणाची जाणीव सुद्धा सहन व्हायची नाही. तिनी वाचायला डायरी उघडली आणि डायरी उघडताच डायरीतल्या गुलाबाच्या पाकळ्या खाली पडल्या. कॉलेज मध्ये तिला बऱ्याच वेळा गौतम कडून गुलाब मिळायचे, आणि तिला डायरीत गुलाबाच्या पाकळ्या ठेऊन द्यायची सवयच लागली होती..डायरी उघडताच गुलाबाच्या पाकळ्या खाली पडल्या आणि तिच्या कॉलेज मधल्या आठवणी ताज्या झाल्या.
गुलाबाच्या पाकळ्या पहिल्या आणि निशाला तिचा भूतकाळ नजरेसमोर आला... आणि नकळत ती गौतम च्या आठवणीत रममाण झाली. गौतम ज्याच्या वर तीच जीवापाड प्रेम होत तो तिला एकट सोडून दूर निघून गेला होता... तो कुठे गेला याची कोणालाही काहीही कल्पना न्हवती. न राहवून निशाच्या मनात गौतम चे विचार यायला लागले आणि ती स्वतःशीच बोलायला लागली,
“गौतम असा न सांगता कुठे निघून गेला? किती वर्ष झाली पण त्यानी एकदाही माझ्याशी संपर्क केला नाही! मला एकटीला सोडून जातांना त्याला काहीच वाटल नसेल? मला गौतम ची फार आठवण येते! त्याला माहिती होत कि माझ त्याच्यावर किती प्रेम आहे तरी तो मला एकटी ला सोडून कसा जाऊ शकतो? आणि प्रेम नंतर झाल पण आधी बेस्ट फ्रेंड्स होतो..” निशा स्वतःशीच बोलत होती. स्वतःशी बोलता बोलता तिचे डोळे पाणावले... आणि स्वताच्या भावनांवर कंट्रोल न राहिल्यामुळे ती रडायला लागली..
निशा आणि गौतम एका शाळेतले. एका कॉलेज मधले! त्यांच शिक्षण एकत्र झाल. आणि दोघ एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांचे कॉलेज चे दिवस खूप सुंदर होते. खूप सारे मित्र...मैत्रिणी..त्यांचा मोठ्ठा ग्रुप होता सगळ्यांचा. त्या ग्रुप मधला गौतम तिच्या जास्तीच जवळचा आणि खास मित्र होता. खूप मित्र मैत्रिणी असले तरी तिची खरी मैत्री गौतम पासून सुरु होऊन त्याच्यावरच संपायची. दोघांच्या आवडी निवडी खूप समान होत्या आणि दोघांचे विचारहि अगदी जुळायचे. ग्रुप मध्ये भांडण कधी कधी व्हायची आणि निशाच्या विरुद्ध कुणी भांडल तर निशाची साथ अजून कोणी देऊ अगर न देवो,गौतम मात्र नेहमी तिच्या बाजूने बोलायचा. कॉलेज संपता संपता गौतम नी मनातल निशा ला सांगितलं होत. निशाच सुद्धा गौतम वर प्रेम होत. कॉलेज संपल,सगळा ग्रुप विखुरला.. गौतम आणि निशा त्यांच आयुष्य एकमेकांबरोबर जगायची स्वप्न पाहत होते. पण एक दिवशी गौतम अचानकच गायब झाला. ह्या गोष्टीचा निशा ला जबर धक्का बसला! तो कुठे जातोय हे त्यानी निशाला पण सांगितलं नाही. नवी स्वप्न तयार होण्या आधीच दोघ एकमेकांपासून दुरावले होते. त्या दिवशी निशा चा मनावर ताबा राहिला नाही आणि तिला गौतम ची प्रकार्ष्यानी आठवण येत होती. त्या दिवशी निशा च्या मनात गौतम चे विचार यायला लागले आणि ते विचार ती थांबवू सुद्धा शकत न्हवती. गौतम च्या आठवणी निशा च्या मनात ताज्या झाल्या होत्या. दोघ एकमेकांपासून दुरावून ५ वर्ष झाली होती. पण गौतमशी तिच साध बोलण पण होत न्हवत. तो आता तिच्या आयुष्यात परतेल अशी थोडी सुद्धा आशा निशाला राहिली न्हवती. तिनी गौतम च्या शिवाय आणि अजून कोणाशिवाय एकटीनी आयुष्य जगायचं अस मनोमन ठरवलं होत आणि त्या प्रमाणे ती तिच आयुष्य एकटी जगत होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवस भराभर पुढे जात होते! निशा च काम दिवसेंदिवस वाढत होत. एक दिवशी निशा तिच काम करत बसली होती. तितक्यात तिचा फोन वाजला.. कामामध्ये कोणी फोन केला असेल ह्या विचारांनी ती थोडी वैतागली. पण तिनी फोन पहिला. त्यावर कोणाचाच नाव दिसत न्हवत. ऑफिस मधला फोन असेल म्हणून तिनी फोन उचलला... आणि ती बोलायला लागली.
"हेलो..."
"निशा..." समोरून आवाज आला,
निशा तो आवाज ऐकून जरा गोंधळली.. तिला तो आवाज ओळखीचा वाटत होता. पण कोणाचा आवाज आहे हे तिच्या लक्षात येत न्हवत.
"हो.. मी निशा बोलतीये... आपण कोण बोलताय?" निशा बोलली..
"मी कोण बोलतोय? काय निशा? इतक्यात विसरलीस मला?" समोरून आवाज आला..
"खरच आठवत नाहीये. आवाज ओळखीचा वाटतो आहे पण कोणाचा आहे हे लक्षात येत नाहीये! आणि आत्ता काम करती आहे सो त्या मूड मध्ये आहे! तुम्ही प्लीज सांगा कोण बोलताय..."
"काय निशा... फक्त ५ वर्ष १ महिना आणि २ दिवस दूर राहिलो आणि तू मला विसरलीस?"
ती लक्षपूर्वक समोरच्या माणसाच बोलण ऐकत होती. आणि तिला एकदम जाणीव झाली की गौतम बोलतो आहे... इतके दिवसांनी त्याचा आवाज ऐकून ती एकदम सेंटी झाली. तिला काय बोलाव कळेना! तिचा आवाज फुटत न्हवता. पण तिला एकदा कन्फर्म करायचं होत की गौतमच बोलतो आहे सो ती बोलयाला लागली,
"गौतम?"
"हाहा... आता आठवलं का.. गुड! तू मला कशी विसरू शकतेस निशा? एकमेकांवर प्रेम करतो आपण.."
गौतम च बोलण ऐकून निशा ला एकदाम रडूच फुटलं.. पण तिनी स्वतःला सावरल आणि ती बोलायला लागली,
"तुला इतके वर्षात एकदाही आठवण नाही आली माझी? आणि मी तुला कशी विसरू शकते हे मला विचारतो आहेस?? मी सुद्धा तुला विसरू शकतेच! आणि आता मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये आहे! मला माझी काम आहेत सो प्लीज आता डिस्टर्ब करू नकोस! बाय द वे, प्रेम कसल? प्रेम अस असत का? सोडून जातात प्रेम करणारे? जाऊदे रे आता... मला काम आहे!" निशा गौतम च्या वागण्यामुळे खूप दुखावली गेली होती त्यामुळे ती गौतम ला दुखवत बोलली...
"मला माहितीये तू माझ्यावर फार चिडली आहेस पण ए निशा प्लीज चिडू नकोस! आपण किती वर्षांनी बोलतो आहोत आणि तू अशी चिडतेस काय? तू भेट आणि मी तुला सगळ निवांत सांगतो! माझ बोलण पटत आहे का ते बघ.. तुला पटल नाही तर मी तुला ह्यापुढे कधीही डिस्टर्ब करणार नाही! तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो पण अश्या काही घटना झाल्या की मला तुला न सांगता जाव लागल.. इथे सांगता येणार नाही! तू प्लीज भेट!"
"हाहा.." उपहासानी निशा फक्त हसली.. पण तिनी काही बोलायचं टाळाल.. तिला भीती होती कि इतके दिवस साठून राहिलेल प्रेम, राग सगळ बाहेर पडल असत..
"उपहासानी हसती आहेस ना? मी तुला चांगल ओळखतो निशा! तुला काही बोलून दुखवायचं नसल की तू फक्त हसतेस ते सुद्धा उपहासानी...बाय द वे, तुझा जास्ती वेळ नाही घेत! पण सांग! तू लग्न केल आहेस?"
"वा वा... चांगलाच ओळखतोस मला... आणि मी लग्न केल आहे का? आता का विचारतो आहेस हे असले प्रश्न? माझ तुझ्यावर प्रेम आहे.. आपल प्रेम फुलतांना मला पाहायचं होत पण तू गायब झालास आणि असा गायब झालास की तुझ्याशी काही संपर्क सुद्धा करू शकले नाही मी! पण मी तुझी किती वाट पाहत होते तुझी.. नेहमीच! पण मला तुझ्याशी कसा संपर्क करू हे कळत न्हवत... फार चुकीच वागलास तू गौतम! आणि लग्न ना? नाही केलय मी लग्न.... तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करायचा विचारही मी करू शकेन का?"
"ओह ग्रेट! तू लग्न नाही केलस! मी पण नाही केलय लग्न.. म्हणजे मी लग्न करेन ते तुझ्याशीच अस ठरवूनच मी भारता बाहेर गेलो होतो! आणि मला माहितीये निशा.. तू माझ्यावर खूप चिडली आहेस.. पण फक्त एकदा भेट.. मी तुला सांगतो सगळ!"
"ठीके... आणि तू भारता बाहेर गेला होतास? मला काही न सांगता? एनिवेज... आपण भेटू आज संध्याकाळी आपल्या कॉलेज च्या नेहमीच्या जागी... तू मला फार दुखावलं आहेस गौतम! तुला माणसांची किंमत कधी कळली नाहीच!"
"नाही ग.. मला मी नेहमीच माणसांची किंमत करतो पण त्यावेळी माझ्याकडे काही पर्याय न्हवता..."
"ओह.. तुला माणसांची किंमत आहे! गुड टू नो! भेटू आपण आज आणि मग बोलू निवांत! आता काम करायचं आहे सो.."
"ओके.. भेटू आज! बाय! आय मिस्ड यु..."
"बाय.." आणि हळू आवाजात बोलली, "आणि आय मिस्ड यु टू.." इतक बोलून निशा आणि गौतम नी फोन ठेवला..
निशा विचार करायला लागली गौतम तिला काय सांगणार आहे. तिला काही सुचेना म्हणून तिनी सगळे विचार बाजूला ठेवले आणि ती काम करायला लागली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गौतम ला भेटायची वेळ झाली. निशा इतक्या वर्षांनी गौतम ला भेटण्यासाठी उत्सुक होती. पण निशा ला गौतम चा भयंकर राग सुद्धा आला होता आणि तो राग त्यांच्या भेटीच्या वेळी बाहेर पडणार हे निश्चित होत.
शेवटी बऱ्याच काळानी दोघ भेटले... निशा नी गौतम कडे एक नजर पाहिलं आणि तिचे डोळे पाणावले. पण पुढच्या क्षणी तिचा राग बाहेर पडला. इतक्या दिवसांचा राग बाहेर पडणार होता. गौतम ला सुद्धा त्याची जाणीव होती. त्यानी सुद्धा ठरवलं होत निशा चा राग जाईपर्यंत काहीही बोलायचं नाही. निशा नी सगळा राग बाहेर काढला आणि मग ती शांत झाली. आणि मग गौतम बोलायला लागला,
"निशा.. शांत झालीस का? की मला अजून राग आहे? तू प्लीज सगळा राग बाहेर काढ.. आणि मग मी बोलतो ते शांतपणे ऐक.."
"हो झाले मी आता शांत.. किती वाट पाहायला लावलीस रे.. तुझ्या शिवाय आयुष्याचा एक एक क्षण सुधा पुढे सरकत न्हवता. मी आयुष्य नुसत जगत होते. त्या आयुष्याला काही अर्थ न्हवताच!"
"मला पण तुझ्या शिवाय आयुष्य जगतांना खूप त्रास होत होता पण माझ्याकडे दुसरा पर्याय न्हवता ग.. आता ऐक.. मी एकदम गायब का झालो! आणि ते ही कोणालाही काहीही न सांगता."
"सांग.. मी ऐकती आहे!" निशा बोलली आणि गौतम काय बोलतो आहे ते ऐकायला लागली..
"सगळ्यात आधी आय लव यु सो मच! आणि आय अॅम व्हेरी सॉरी!!!"
"आय लव यु टू गौतम.. तुझ्याशिवाय मी माझ आयुष्य कस जगले ह्याचा तुला अंदाज येणार नाही.. तुझी आठवण येऊ नये म्हणून मी स्वतःला कामात इतक बिझी करून घेतलं. काम एके काम.. फक्त काम.. मी फक्त आयुष्य जगत होते.. निर्जीवा सारख... माझा प्राण तर माझ्यापासून खूप दूर गेला होता.. कधी कधी मला वाटायचं तुझ्या जीवाच काही बर वाईट तर झाल नाहीये ना.. पण ते सुद्धा कळायला काही मार्ग न्हवता. आणि असे विचार आले की मी इतकी अस्वस्थ व्हायचे!"
"सेम हिअर! मला फक्त पैसे कमवायचे होते... आणि ते ही तू मला माझ्या आयुष्यात हवी म्हणून..."
"काय? नीट सांग! मी तुला कधी म्हणाले होते की तू पैसे मिळवलेस कीच मी तुझ्यावर प्रेम करेन? आणि लग्न करेन? म्हणजे तू खूप श्रीमंत नाहीयेस म्हणून मी तुला नकार दिला असता अस वाटतंय? तू मला इतकच ओळखलस का गौतम?"
"नाही नाही.. तू अस कधीही जाणवू दिल नाहीस मला की मी तुझ्या लेवल इतका श्रीमंत नाहीये पण.." इतक बोलून गौतम बोलायचं थांबला..
"पण काय? सांग की..." निशा चिडून बोलली..
"तू कधी काही बोलली नाहीस पण कस काय माहिती नाही... तुझ्या बाबांना कळल की आपल प्रेम आहे! आणि त्यांना तुझ्यासाठी मी योग्य नाही वाटलो बहुदा! त्यांनी मला भेटायला बोलावलेल त्यांच्या ऑफिस मध्ये! त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ते तुझ्यासाठी एक श्रीमंत स्थळ शोधतायत आणि त्यांना मी तुझ्यासाठी योग्य वाटत नाही... त्यांनी तुला भेटायचं नाही अशी सक्त ताकीद सुद्धा दिली होती."
"काय... बाबा अस म्हणाले? माझा नाही विश्वास... ते तर एकदम मोकळे आहेत! त्यांनी मला सुद्धा विचारलं होत की मला कोणी आवडतंय का? त्यांची अट काहीच न्हवती.."
"खोट वागले ते तुझ्याशी.. त्यांनी मला तुझ्याशी काही संपर्क ठेवायचा नाही अशी ताकीद केली आणि त्याच वेळी तुला सांगितलं की कोणी असेल तर सांग! म्हणजे ते दोन्हीकडून सेफ राहिले! तुझ्या नजरेत ते चांगले राहिले आणि त्यांना हव ते त्यांनी साध्य सुद्धा करून घेतलं.." गौतम म्हणाला... निशा ऐकत होती.. गौतम च बोलण ऐकून ती उडलीच..
"हो मे बी.. तू अचानक गायब झालास आणि त्याचवेळी बाबा म्हणाले तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर सांग! तुझा काही पत्ता न्हवता.. आणि आपल्या मित्रांपैकी सुद्धा कोणालाच तुझ्याबद्दल काहीही माहित न्हवती की अचानक तू कुठे गेलास.. त्यामुळे मी सुद्धा तुझ नाव सांगू शकत न्हवते. आता मला कळतंय... बाबा सारखे मला का विचारत होते कोणी आवडत आहे का मला... त्यांनी हे सुद्धा कन्फर्म केल होत की आपण संपर्कात नाहीयोत! ओह माय गॉड.. आणि माझ्या लेखी तू बरोबर वागला न्हवतास... " निशा बोलली..
"तुझ्या बाबांनी मला ललकारल होत.. मी सुद्धा मनाशी निश्चय केला आता जोपर्यंत काही बनत नाही आणि तुमच्या इतका श्रीमंत होत नाही तोपर्यंत तुझ्यासमोर सुद्धा येणार नाही.. आणि आता ठरवल्या प्रमाणे मी केलय! मी अमेरिकेत जाऊन खूप काम केल.. खूप पैसे कमवले. दिवसाची रात्र केली. आणि भारतात आलो! इथे एक कंपनी उघडली आहे! तिच काम सुद्धा जोरात चालू आहे! ए, तुला "निशागौ इन्फोटेक" कंपनी माहिती आहे?"
"ओह..मला बाबा तुझ्याशी बोलले होते त्या बद्दल काहीच माहिती न्हवत! आणि येस... "निशागौ इन्फोटेक" माहिती आहे की! सध्या ती कंपनी एकदम जोरात चालू आहे! पण आत्ता त्याच काय? विषयांतर करू नकोस! मुद्द्याच बोल... " गौतम बोलला..
"मला मधे तुझ्याशी बोलायचं होत पण तुझ्या बाबांची सक्त ताकीद होती की तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही.. सो तुझ्याशी अजिबातच संपर्क करता आला नाही. आणि तू त्या कंपनी बद्दल काय वाचलस? कंपनी कोणी चालू केलीये ते नाही वाचलस?"
"नाही म्हणजे इतक कोण लक्षपूर्वक वाचत? म्हणजे मी नाही वाचल.. पण त्याच काय आत्ता? इथे काय संबंध?"
"ओह हो निशा.. नाव नीट बघ... काही कळतंय नावावरून?"
"काय कळणार नावावरून? निशागौ इन्फोटेक त्यात काय खास आहे?" निशा नी थोडा विचार केला आणि तिची ट्यूब पेटली..."ओह.. निशा आणि गौतम मिळून निशागौ?"
"आर वा.. फायनली कळल.. मी चालू केलेली कंपनी आहे ती! आपल्या दोघांच्या नावावरून कंपनीच नाव ठेवलय!"
"ओह माय... तू आता इतका मोठा झाला आहेस? पण तू कधी मिडिया समोर नाही आलास..."
"मला लोकांसमोर येण्यात काही रस नाहीये! ही कंपनी मी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच चालू केली! ह्या कंपनीमुळे आपण एक होऊ!"
"तू माझ्यावर इतक प्रेम करतोस? पण मला हे कळल नसत आणि मी दुसऱ्या कोणाशी लग्न केल असत तर?"
"हो ना.. तशी भीती होती! पण मी रिस्क घेतली होती! आणि मला समहाऊ खात्री होती की तू दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाहीस! खर सांगू, काहीतरी खूप मोठ मिळवायचं होत मला... मोठ म्हणजे माझ नाव नाही.. मला माझ्या आयुष्यात तुला आणायचं होत! त्यासाठी मला काहीतरी करून दाखवण गरजेच होत! म्हणून मी इतके कष्ट घेतले... आता तुझे बाबा काय अजून कोणीही आपल लग्न होण्यापासून अडवू शकत नाहीत... बरोबर ना?"
"येस येस मिस्टर गौतम! तू इतका भारी आहेस! तुला माझ्याशी लग्न करायचच होत आणि बाबंची अट पूर्ण करण्यासाठी तू इतके कष्ट घेतलेस आणि त्या कष्टांच चीज सुद्धा केलस! आणि बरोबर... आता बाबा काय कोणीच आपला लग्न होण्यापासून अडवू शकत नाही.. लव यु सो मच!!!"
"लव यु टू.. माझ्या डोळ्यासमोर फक्त एकाच ध्येय होत की मला तुझ्या बरोबर संसार करायचा आहे! त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी होती माझी! मी ते केल सुद्धा! तू माझी प्रेरणा होतीस प्रत्येकवेळी... थॅंक्यू सो मच!!!!" गौतम बोलला
"आता काय करणारेस?"
"आता काय करणार? हा काय प्रश्न आहे? तडक तुझ्या बाबांना भेटणार आणि मागणी घालणार! कसे नाही म्हणतात तेच बघू.."
"ओह हो.. पण जर मी नाही म्हणाले तर?"
"काय? तू नाही म्हणणार?" गौतम एकदम सिरिअस झाला..
"ए गम्मत करतीये.. आय लव यु आणि आयुष्य संपेपर्यंत तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करत राहीन मी!"
"गम्मत? असली गम्मत काय करतेस निशा? मला आत्ता हार्ट अॅटॅक आला असता बघ.. तुझ्यासाठी इतक सगळ केल आणि आयत्यावेळी तूच नाही म्हणालीस तर काय उपयोग ह्या सगळ्याचा?" गौतम सेंटी होऊन बोलला
"मग तू माझ्यापासून इतके दिवस लांब राहिलास.. मग आता इतक्या वर्षात राहिलेलं सगळ जगून घेणारे आता... म्हणजे तुला भरपूर त्रास देणार!!!"
"हाहा... ओके ओके! तू हवा तसा त्रास दे मला! मी तसाच वागलो आहे! माझही चुकलंच होत! मी आयुष्यात कधी सिरिअस झालोच न्हवतो...पण तुझ्या बाबांनी तुला भेटण्यासाठी आणि तुझ्याशी लग्न करण्यासाठी ते अट घातली आणि माझ्यातला मी जागा झालो.." गौतम बोलला..
"आता जे झाल ते अजिबात बोलायचं नाही रे.. कोणाही बद्दल! आता फक्त स्वप्न बघुयात आपण दोघ आपल्या सुखी संसाराची!!"
"येस येस.. लव यु निशा!" गौतम जोरात ओरडला... आणि त्याच्या तोंडावर हात ठेवत निशा नी गौतम ला घट्ट मिठी मारली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुजा कुलकर्णी.
Email id- anuakulk@gmail.com