मनोगत -
रसिक हो
नमस्कार ,
मातृभारतीच्या माध्यमातून एक लेखक –कवी म्हणून मी आता आपला परिचित झालो असेन.
एप्रिल-मे-जून -२०१६ दरम्यान प्रकाशित झालेली माझी इ-बुक्स आपणास आवडलीत असे समजतो .
या वेळी आपल्या साठी एक हलकी –फुलकी मनोरंजक अशी विनोदी कथा सादर करीत आहे.
“सासूबाई येती घरा “ ही कथा कशी वाटली ,अभिप्राय जरूर द्यावेत.
मातृभारती टीम चे आभार .
स्नेहांकित –
–अरुण वि.देशपांडे
मो-९८५०१७७३४२
ईमेल –
विनोदी कथा –
सासूबाई येती घरा ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे
झोपेतून जागा झालेल्या ओंकारने डोळे उघडले .क्षणभर रात्रीचेच स्वप्न .मागील पानावरून पुढे चालू आहे की काय ? असे वाटले .कारण चहाचा कप हातात घेऊन चक्क हसऱ्या चेहऱ्याने साक्षात त्याची बायको- चित्रा , एखाद्या सुंदर चित्रा प्रमाणे उभी होती.हा सीन पाहून त्याच्या आतल्या आवाजाने संदेश दिला ..बाबा रे -सावधान -खतरे की घडी है
सावध होत ओंकार म्हणाला - हे काय .आज सकाळी सकाळी न मागता चहा मिळतोय ..काय विशेष ?
लटक्या रागाने आणि मधाळ आवाजने त्याला अधिक घायाळ करीत चित्रा म्हणाली ..मी तुझी कित्ती काळजी घेते ,,तुझ्यावर भरभरून प्रेम करते .पण,काय करू ओंकार - तुला कधी खरच वाटत नाही माझं प्रेम ! .आणि वाक्याच्या शेवटी .चित्राच्या आवाजातला तो जीवघेणा दर्द ",--
ओंकार खडीसाखरच्या खडयासारखा अलगद विघाळून गेला . हे असे जादूचे प्रयोग चित्राला नेहमी सहजपणे जमायचे .
पहिल्या चहाचा -पहिला घोट -त्यातील मिठास ओठावर रेंगाळत असतांनाच .चित्रा म्हणाली .अहो - एक छान आनंदाची बातमी दायची आहे तुम्हाला ..!
काय-? तू आणि मी लवकरच ....! ओंकारने आनंदाच्या स्वरात विचारले पण त्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली -
असे एक्साईट होऊ नका . अजून तरी ..अशी बातमी नाही काही ...
,अहो - उद्या पासून किनई १५ दिव्सानासाठी -माझी मम्मा - तुमच्या सासूबाई -आपल्याकडे मुक्कामास येत आहेत.. चित्रा आनंदात सांगत होती पण ही बातमी ऐकून ओंकारला जोरदार ठसका लागला.
काय ग चित्रा - सकाळी सकाळी हीच बातमी होती का सांगायला ?, तू पण ना ..!
का बर तुम्हाला माझी ममी येणार याचा आनंद झाला नाहीये का ?,
नाही" असेच उत्तर द्यावे असे क्षणभर ओंकारला वाटून गेले ,पण हे डेअरिंग आता फक्त मनातल्या मनात करावे लागणार हे ओळखून - ओंकार उघडपणे म्हणाला .असे कसे म्हणेल मी चित्रा ?
अग- .,लेकीच्या घरी येण्यापासून त्यांना कसे रोकता येईल ,आता येताच आहेत तर येऊ देत.
स्वागत आहे आदरणीय सासुबाईंचे .
चित्रा आनंदित असण्याचे कारण तसेच होते ,कधी नव्हे तो या वेळी तिची बिझी मम्मा -वेळ असल्यामुळे लेकीकडे काही दिवस रहाण्याचे ठरवूनच येणार होती.
तिची लाडकी मम्मी - सदा न कदा सोशल -कार्यात बिझी असणारी ., कधी ही बोलवा ,कोणत्या न कोणत्या कार्यात बिझी ", चित्रू - या वेळी नाही ग बेटा ,.असे मम्मीचे उत्तर ऐकून चित्रा नाराज होऊन जायची.
या वेळी मात्र मम्मीने होकार दिला - आणि चित्रा मोठ्या आनंदाने मम्माच्या येण्याची वाट पाहू लागली.
ओंकारच्या जीवाला मात्र नसता घोर लागला - आपल्या माननीय सासूबाई इथे आल्यावर स्वस्थ बसणार नाहीत ' हे त्याला पुरेपूर माहिती होते .इथल्या मुक्कामात त्या काही ना काही उपक्रम करणार , त्यांच्या सामाजिक -सेवेचं खूळ त्यांना -स्वस्थ बसू देणार नाही त्यांना, आणि इथल्या मुक्क्मात त्या काही ना काही (उपद्व्याप),नक्कीच करणार.काय करावे गड्या ?अब तो समथिंग करनाच पडेगा . हे करतांना चित्राला संशय येऊन चालणार नव्हते ,त्यमुळे गनिमी काव्याने ही लढाई लढायची आहे .याची जाणीव ठेवावी लागणार "हे ओंकारने मनातल्या मनात काबुल केले .
त्याची ट्यूब-लाईट " गेलेलं लाईट परत आल्यावर लागते तशी लक्ख पेटली आणि त्याला त्याच्या लाडक्या मित्राची -दिपुची आठवण झाली.
अरेच्या - दिपू सारखा हुकमाचा एक्का हाती असतांना आपण उगीच घाबरत आहोत .आपल्या
-महाराणी -सासूबाई कितीही पॉवरबाज -जहांबांज -आयडियाबाज असुद्या .अपना यार दिपू त्यांना चेक-मेट देऊ शकणारा धाडसी -आणि पराक्रमी वीर आहे.त्याने लगेच दिपुला मेसेज केला .मी येतोय नेहमीच्या ठिकाणी.तू ये .जरा महत्वाचे बोलायचे आहे.
दिपुला कॉल करून बोलायचे हुशारीने टाळले "हे लक्षात आल्यावर ओंकारने स्वतःलाच शाबासकी दिली.आणि लगेच नेहमीच्या कॅफे कडे निघाला
कोपर्यातला टेबल पकडून बसलेल्या प्रिय मित्र -दिपुला पाहून त्याचे मन भरून आले ,दिपू सारखा मित्र आपल्या मदतीला आहे ,आपले नशीब वाटते तितके खराब नाहीये , चित्रा सारखी सद्गुण-संपन्न बायको मिळाल्या पासून तो स्वतहाला मुकद्दर का सिकंदर समजू लागला ,त्याच्या नशिबाचा हेवा करणाऱ्या जळकुराम " दोस्तांनी ओंकारला त्याच्या माघारीच "जोरू का गुलाम "ही सन्मानीय पदवी बहाल केली आहे", ही वार्ता त्याच्या कानापर्यंत पोन्चेल अशी व्यवस्था देखील या मित्रांनी अगदी चोखपणे केली होती .." अशा गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचे नसते ",ओंकारला एवढी समज आलेली होती , इतक्या छान छान गोष्टीतला त्याच्या आनंदाचा फुगा फुटेल अशी भीती वाटायची ती केवळ चित्राच्या आदरणीय मॉम- आणि ओंकारच्या माननीय सासूबाईमुळे.
अताचेच पहा ना ..सासूबाई चक्क पंधरा दिवस मुकामास येणार "ही वार्ता प्रसारित झाल्या पासून ओंकार हादरून गेला होता , कारण उपद्व्यापी सासूबाई सगळ्या बरोबर जावयाला वेठीस धरणार होत्या.यातून सुटका करण्याची आयडिया दिपुला सुचेल याची खात्री ओंकारला होती. म्हणून तर ही.."तातडीची बैठक "बोलावली होती.
बाईक पार्क करून ओंकार आत आला , त्याने पाहिले - दिपू भरल्या मनाने कॅफेतील सृष्टी-सौंदर्य नजरेत साठवण्याच्या सुंदर कामात भान हरपून बसला आहे. मित्राला जमिनीवर आणल्याशिवाय "आपली मिटिंग "सुरु होणे शक्य नाही "हे जाणवून ओंकारने दिपुला त्याच्या भाव-समाधीतून जागे केलेच. ओ हिरो..बस करा ना यार,तुझा केमेरा फिरवणे थांबव आता ".एकीची पण नजर या कोपर्यात फिरकणार नाहीये , तरी तू आपला दुर्बीण लावून बसलास.
.उर्वरित नेत्र-सुख पुढच्या फेरीत घेणे.
दिपू मोठ्या नाईलाजाने या नीरस पृथ्वीतलावर येता जाहला . समोर बसलेला ओंकार त्याला दिसला .आणि त्याच्या लक्षात आले .आपला हा जिगरी दोस्त मदतीच्या आशेने आलेला आहे. त्याचे "नेमके दुखणे काय आहे " ? हे अगोदर ऐकून घ्यावे लागेल , त्यासाठी समोर भरलेल्या प्लेटी असल्या शिवाय काही सुचणार पण नाहीये. ओंकार तसा जुना-जाणता फ्रेंड असल्यामुळे ..दिपुला नैवद्य दाखवला लागणार ,त्याशिवाय हे महाराज प्रसन्न होणार नाहीत ,हे माहिती होते . त्याने मेनू-कार्ड दिपूच्या हातात देत म्हटले-- मागव तुला काय हवं आहे ते..पोटभर हादडून घे एकदाच ", तरच तुला कंठ फुटेल ". ओंकारचे वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर दिपुने वेटरला आवडत्या डिशेश ची फटाफट ओडर दिली.यथावकाश दिपुचे पोट भरले , पाकीट रिकामे झाले ते ओंकारचे.
बोल दोस्त -क्या काम है आज का ? दिपू गेल्या काही वेळात पहिल्यांदा पूर्ण वाक्यात बोलला आहे, हे लक्षात आल्यामुळे ओंकारला आनंद झाला .अधिक टाईम वेस्ट न करता तो म्हणाला - यार ..तुझ्या चित्रा वाहिनीच्या मातोश्री ..म्हणजे माझ्या सासूबाई पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी येता आहेत , त्यांच्या सामाजिक -सेवा उपक्रमची आवड आणि हौस तुला माहिती आहे
, त्यांच्या या मुक्क्मात त्यांच्या साठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे , त्यांना प्रमुख
पाहुणे म्हणूनच बोलवा असे महिला मंडळ अध्यक्ष्यांना मस्का लावून सांगायचे ,सिटी मधल्या व्याख्यानमला आयोजकांना सांगायचे --आदरणीय सासूबाईंचे व्याख्यानं ठेवा , राहिलेच तर..आमच्या कॉलनीतील आणि परिसरातील महिलांना सासूबाई मार्गदर्शन करणार ..ती पदयात्रा .म्हणजेच आमची "शोभा -यात्रा " निघणार आहे ती वेगळीच इतकेच नाही तर -.चित्राच्या आईने फर्मान सोडलाय लेकीला - तुझ्या नवर्याला रजा घेण्यास लाव ,आणि माझ्या सेवा-कार्यात सहभागी व्हायला लावण्याची जबाबदारी तुझी . तुझी सगळी हुशारी या साठी वापर ,जावई-बापूंनी होच म्हटले पाहिजे
मनात साठलेले सांगितल्या मुळे ओंकारला दम लागल्या सारखे झाले ,आणि हे सांगितले नसते तर..जास्त त्रास झाला असता त्यापेक्षा हेच ठीक केले .दिपू- आता काय आणि कसे करावे ? म्हणजे यातून सुटका होईल माझी . हे बघ सासुबाईनी त्यांना काय करायचे ते करावे ..त्यात मला सामील करण्याची त्यांची "अघोरी -इच्छा "पूर्ण होऊ नये ,इतकेच म्हणणे आहे माझे.
सगळे ऐकून घेतल्यावर दिपू म्हणाला - ओंकार - चित्रा वहिनींना मी चांगलाच ओळखतो , शांत -सुस्वभावी आहेत त्या ,आणि त्यांच्या उलट तुझ्या सासूबाई ..
.मला तर वाटते त्यांना काम करण्यापेक्षा -त्याचा गाजावाजा "करण्याची सवय आहे. चळवळ्या कार्यकर्त्या नसून –त्या फक्त "वळवल्या कार्यकर्त्या "आहेत ..मिरवण्याची , कौतुक करवून घेण्याची एकदा सवय लागली की..अशी माणसे ..स्वस्थ बसू शकत नाहीत .टिमकी वाजवणे , ढोल बडवणे , प्रदर्शन करणे " अशा उथळ गोष्टींची हौस असते "
.अशा हौशी पुरवून घेण्यासाठी लागणारा -"चतुरपणा -बेरकीपणा - लाळघोटेपणा "यांच्यात ठासून भरलेला असतो .त्यांच्या सुदैवाने "यांच्या आजुबाजू भिडस्त स्वभावाची -गरीब माणसं असतात ",या वेळी त्यांनी स्वतःच्या लेकीची निवड केलीय ", ती नाही असे बोलूच शकत नाही हे वहिनींच्या आईंना माहितीच आहे.
दिप्या -ते सगळा राहुदे बाजूला ..त्या येणार आहेत..त्यावेळी कसे करायचे ? ते सांग
अगोदर..ओंकारचा धीर सुटत चालला होता.
आपण एक काम करू या - सासुबाईंना ज्या कामाची आवड-हौस आहे , नेमक्या त्याच्या उलट ..कार्यक्रम ठेवायचे ..
उदा- श्रम -परिहार ऐवजी -श्रम दान ..जिथे त्यांना टोपली उचलावी लागणार आहेत ,काम करावे लागणार आहे,
वरवर कोणत्याही विषयावर भाषण देण्याची दांडगीहौस आहे ना , अभ्यासपूर्ण माहितीशिवाय व्याख्यान देणाऱ्याची कशी फजिती होते -..असे विषय असणारे व्याख्यान -निमंत्रण द्याचे त्यांना ., गृहिणींना चार शब्द ऐकवले की ..विदुषी "म्हणून मिरवता येते "हा समज खोटा ठरवू या . त्यांच्या प्रकट -मुलाखती ठेवू या ,त्यांच्या जवळ अनुभवच नाही ,त्या काय कप्पाळ सांगणार ? चार-चौघांसमोर सारवा –सार्व करता करता परेशान होतील त्या.आणि तुझ्या सासुबाईंची मुलखात मी घेईन ...मग तर खुश ना तू ?
आणि हे सगळे कार्यक्रम स्वरूप .तारीख आणि वेळा -पत्रकानुसार त्यांना पाठवून दे..आणि लगेच होकार कळवा म्हणावे ..तो पर्यंत मी सगळे कार्यक्रम ठरवून टाकतो. ठीक आहे.आता तू बिंधास हो आणि लाग कामाला ..
भांड्यात जीव पडला "असे झाल्यावर कित्ती छान वाटत असेल याची कल्पना ओंकारला दिप्याची आयडिया ऐकल्यावर आली होती. घरी आल्यावर ..त्याने एक एक दिवसाच्या कार्याक्रमची आखणी केली ..संपर्क साठी त्याने स्वतःचा आणि चित्राचा ,आणि स्थानिक - आयोजक म्हणून दिपुचे नाव व नंबर टाकला .आणि कुरिअरने कार्यक्रम पत्रिका पाठवून दिली
.आपल्या आईसाठी इतके करणाऱ्या नवर्याची व मित्राची ही आपुलकी आणि धावपळ पाहून चित्राला भरून येत होते .आपली आई खूप लकी आहे..ओंकार सारखा कर्तबगार जावाई मिळालाय तिला .ती म्हणाली - आपले दिपू-भावजी "कित्ती चांगले आहेत हो ..बघा ना..माझ्या आईच्या कार्याक्रमासाठी किती धडपड करीत आहेत ते . तुमच्या या मित्राचा मला खूप कौतुक वाटते. चित्राच्या सध्या स्वभावाची ओंकारने मनातून तारीफ केली.
इकेडे काय झाले ते बघा - जावईबापूंचे टपाल आल्यावर खूप आनंद झाला , चला एका नव्या
गावात .पंधरा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमातून मिरवण्याची हौस फिटणार होती , लोकांना आपण सहज आपल्या शब्दावर बनवू शकतो " याचा जबर (?) आत्मविस्वास एव्हाना त्यांना आलेलाच होता.चला. कसे कसे कार्यक्रम आहेत ते तरी बघू या..
हातातल्या पत्रावरून नजर फिरवल्यावर ..शेवटी घोर -निराशा झाली..
कारण.. एकाही कार्यक्रमात त्या अध्यक्ष्य नव्हत्या , प्रमुख पाहुण्या असणार नव्हत्या .कार्यक्रम दिमाखदार नव्हते , सिटी मधल्या व्हीआयपी लोकांच्या सोबत एकपण बर्थ-डे पार्टी नाही, मेजवान्या नाहीत .. अरे हे कसे ? बाकीच्या कार्यक्रमात मी जाऊन काय करू ? विषय किती विचित्र दिलेत ..मी काय विचारवंत वाटले की काय या लोकांना ?
प्रकट -मुलाखतीचे कार्यक्रम ..नको रे बाबा ..अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर काय सांगू ..लोकांसमोर फजिती..
त्यापेक्षा ..इथेच बर..जे चालू त्यात आनंद मानु या.
दुसरे दिवशी ..ओंकारच्या घरी ..दिपू आलेला दोघा मित्रांची चर्चा चालू होती ..चित्रा कौतुकाने ऐकत होती..आपल्या आईला कित्ती कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे.. ग्रेटच आहे आपली आई. चित्रा म्हणाली -दिपुभावजी .जरा निवांत चर्चा चालुद्या ..सोबत मी मस्त कांदाभजी करते ..मजा येईल तुमच्या कामात.
वा-वाहिनी..आई येणार .खूप खुश आहात तुम्ही , बघा ..जावईबापू कित्ती मेहनत घेत आहेत
.
हे असे चालू असतांना ..चित्राचा मोबाईल वाजला ..अरेच्या आईचा कॉल, बघा काय म्हणते ती ?
ओंकारने कानाला फोन लावीत म्हटले ..बोलावे सासूबाई ..कार्यक्रम -रूपरेषा आवडली ना , या आता लवकर..इथल्या श्रोत्यांना खूप उत्सुकता आहे तुम्हाला ऐकण्याची...केव्न्हा निघतंय मग
जावईबापू -खूप खूप थंक्यू . खूप छान अरेंज केलाय तुम्ही , तुमच्या मित्राला पण थांकू सांगा आठवणीने.
सॉरी जावईबापू --अहो माझी तब्येत अचानक बिघडली हो कालपासून ..थ्रोट-इन्फेक्शन "झालाय म्हणतात डॉक्टर,
बोलण्यास मनाई केली आहे मला ..२-३ महिने तरी लागतील ठीक व्हायला . आता तुम्हीच सांगा ..शब्द आणि आवाज " हेच आमचे भांडवल , दोन्ही बंद .त्यामुळे मी माझा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. डॉक्टरचे ऐकावे लागेलच ना . चित्राला सांगा .हे समजावून ..मनाला लावून घेईल हो माझी पोरगी.
ओंकारचा कानावर विस्वास बसत नव्हता ..आणि मनाला झालेला आनंद कसा लपवायचा ?हे कळत नव्हते.
त्याने चित्राला बोलवले ..आणि दिपुकडे अजिबात न बघता सांगितले ..तब्येत बिघडल्यामुळे आई येऊ शकणार नाहीये.काळजीचे कारण नाहीये .साध दुखनं -घसा खराब झालाय..
किचन मध्ये जातांना चित्रा म्हणाली - अहो- माझच नशीब खराब म्हणयच दुअस्र काय ..कधी नाही ते आई येणार, ,सगळ पक्का ठरला ,मध्येच हे दुखण आलं. बिच्चारी आई..सग्गळे कार्यक्रम आता रद्द करावे लागतील या दोघांना
दिपू म्हणाला - अहो वाहिनी ..अशा नाराज होऊ नका , तुम्ही एक दिवस जाऊन या-भेटून या आईला,जावईबापू येतीलच सासूबाई कशा आहेत पहायला ?
का हो -ओंकारराव ..जाणार ना वाहिनी सोबत.
दिप्या लेका - वाटले नव्हते ..खेळ ऐसा जमेगा .
चित्रांने गरमागरम भज्जी आणून ठेवली .
वाहिनी काही म्हणा - ओंकारला भज्जी आज जास्तच टेस्टी लागत असतील ,मनासारखं झालाय ना त्याच्या .
काय हो ..काय झाल मनासारखं ? मला नाही सांगितल ?
सावरत ओंकार म्हणाला -- तू केलेली भज्जी ग –चित्रा ..माझ्या मनासारखी झालीत असे म्हणतोय हा दिप्या.
विनोदी कथा -
सासूबाई येती घरा ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे
Mo- 9850177342