Om in Marathi Travel stories by Amita a. Salvi books and stories PDF | Om

Featured Books
Categories
Share

Om

अविस्मरणीय फ्लोरिडा--युनिव्हर्सल स्टूडिओ १

----------------------------------------

आपण एका गाडीत बसलो आहोत.प्रथम गाडी एका अंधा-या मार्गात जाऊन थांबते.

अगदी पाव मिनीट असेल- आणि सुसाट धावू लागते.गाडीच्या प्रचंड वेगामुळे आपल्या

छातीचे ठोके वाढू लागतात.तेवढ्यात समोर आगीचा लोळ उठतो.आग चुकवण्यासाठी

आपली गाडी गर्रकन् वळते; आणि परत धावू लागते.तेवढ्यातच समोरून एक अक्राळविक्राळ

राक्षस आ sवासून आपल्याकडे सरसावत असतो.गाडी परत झटक्यात रस्ता बदलते.

आता दोन्ही बाजूना उंच डोंगरांच्या रांगा दिसतात.मधल्या चिंचोळ्या वाटेवरून

आपली गाडी धावत असते.अचानक् डोंगरावरील झाडांमधून अजस्त्र डायनासोर आपल्यावर

आक्रमण करताना बघून आपल्या काळजाचा ठोका चुकतो.गाडी त्याना चुकवण्यासाठी

आणखी वेग वाढवते.एका डोंगराच्या भुयारातून धावू लागते;अगदी मिट्ट काळोखातून!वेग इतका;की आपल्याला वाटते,आपण गाडीत नाही;विमानात बसलो आहोत.मी हाताच्या मुठी

घट्ट धरून ठेवते.समोर उजेड दिसू लागतो.गाडीचा वेगही हळूहळू कमी होऊ लागतो.आणि

समोर आपले स्टेशन दिसू लागते.आपण सुटकेचा श्वास सोडतो.

हे काही मला पडलेले स्वप्न नाही ही 'युनिव्हर्सल स्टूडिओ-फ्लोरिडा' येथील

अनेक 'राइड ' (शो)पॆकी एक राइड आहे.स्वप्नवत् वाटणा-या या राइड्स आधुनिक

तंत्रज्ञानाचा स्तिमित करणारा आश्चर्यकारी अविष्कार आहे.

अटलांटाहून निघून युनिव्हर्सल स्टुडिओला पोहोचेपर्यंत दुपार झाली होती.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन मी म्हणत होते.अमेरिकतला प्रदेश असूनही फ्लोरिडाला

कडक उन्हाळा असतो.केन्टकीला आम्हाला एक वयस्कर गृहस्थ भेटले होते.फ्लोरिडाचे

रहिवाशी ,पण उन्हाळ्यासाठी केंटकीला येऊन राहिले होते- कारण मला आज कळले.

प्रवेशद्वारावर 'सेल'वर चालणारे छोटे पंखे आम्ही विकत घेतले.हे पंखे एका

प्लास्टिक बाटलीवर लावलेले असतात.बाटलीमधील थंड पाण्याचा स्पे चेह-याला थंडावा

देतो;आणि उन्हाच्या स्ट्रोकपासूनही वाचवतो.

मला वाटले होते;की तिथे आम्हाला इंग्लिश चित्रपटांचे चित्रपटांचे चित्रिकरण

पहायला मिळेल ; पण तसे काही दिसले नाही.इमारतींवर सिनेमाप्रमाणे मोठमोठी पोस्टर्स

लावलेली होती.या प्रत्येक इमारतीमध्ये वेगवेगळ्या 'राइड्स' आम्हाला अनुभवायला

मिळणार होत्या.यातील पहिलाच 'शो' म्हणजे वर वर्णन केलेली विलक्षण रोमांचकारी 'राइड'.

दुस-या एका 'राइड'मध्ये ' ई.टी.' एका अंतराळयानातून आपल्याला दुस-या

ग्रहावर घेऊन जातो.ध्वनिक्षेपकावरून सांगितले जाते -"हा ई.टी.अत्यंत हुशार आहे.तुम्हाला

अवकाशात फिरवून अगदी सुखरूप परत आणेल.घाबरू नका "

आपले अंतराळयान थोडे पुढे जाऊन काळोखात थोडे थांबते;आणि वेगाने

धावू लागते.क्षणात आकाशात झेप घेते.आपल्या यानाला अडवण्याचे 'ई.टी."च्या शत्रूकडून

खूप प्रयत्न केले जातात.काही वेळा तर टक्कर होते की काय असे वाटते;पण आपला हीरो

वेळीच यानाची दिशा बदलतो.अनेक संकटाना तोंड देत तो आपल्याला त्याच्या ग्रहावर

घेवून जातो.त्या सुंदर ग्रहाच्या दर्शनाने मात्र आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते .अवकाशातून

चित्राप्रमाणे दिसणारा तेथील भूप्रदेश,दिमाखदार घरे,हिरवागार वनप्रदेश पाहून मन भारावून

जाते.मनात येते-आपली पृथ्वी सुध्दा अंतराळातून अशीच सुंदर दिसत असेल.मग मात्र जराही

वेळ न घालवता आपला नायक आपल्याला मुक्कामावर घेऊन येतो.अंतराळात आपल्यावर

आलेली संकटे आपण विसरून जातो पण त्या अनामिक ग्रहावरील विहंगम दृश्य

मात्र डोळ्यापुढून हलत नाही.

एका राइडमध्ये विमानात बसून आम्ही थेट उत्तर ध्रुवावर गेलो.तेथील बर्फाच्छादित

उत्तुंग गिरिशिखरे,पायथ्याशी असलेल्या काळोखी गुहा,कोसळणारे कडे,अनंत क्षितिजापर्यंत

फक्त बर्फाच्या राशी!कुठे पर्वताच्या माथ्यावर सूर्यकिरणांनी सजवलेले कोटिकोटि

हिरे-माणकांच्या तेजाने लखलखणारे मुकुट-सगळेच दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते. अवघ्या

आसमंतातून जणू ॐकार ऎकू येतोय असे वाटत होते.निसर्गाची दिव्यता पाहून कोण

अंतर्मुख होणार नाही?

या सगळ्या राइड्समध्ये आपल्याला त्या दृश्यांमध्ये सामील करून घेण्याची

जबरदस्त ताकत आहे.उदाहरणार्थ 'टर्मिनेटर' गोळीबार आणि बॉम्बचा मारा सहज चुकवतो;

पण भयभीत आपण जास्त होतो.

एके ठिकाणी मोकळ्या मॆदानावर सिनेमाचा सेट उभा केलेला आहे. 'शो ' सुरू

झाला; की वा-याचा झंझावात,घरांची उडणारी छपरे,उन्मळून पडणारे वृक्ष ,हवेत गिरक्या

घेणा-या गाड्या पाहून मनाचा थरकाप उडतो.नंतर मुसळधार पाऊस सुरू होतो.पावसाचा

जोर इतका असतो; की आपण आडोशाला उभे असूनही अंगावर पाण्याचा शिडकावा होतोच.

इथले बोटिंगही तितकेच चित्तथरारक आहे.शांत पाण्यात चालणारी बोट

धबधब्यामधून १८०° नी कधी खाली येते तेच कळत नाही.आपण किती उंचावरून खाली

आलो हे पाहिले;की पोटात गोळा येतो.बेल्ट एवढे काळजीपूर्वक का बांधले जात होते ते

आता कळते.

सिम्पसन कुटुंबाची आकाशातील सफरही अशीच साहसपूर्ण होती.विमान कधी

उलटे होईल,कधी जमीनीवर आदळेल तर कधी कशाशी टक्कर घेईल- कसलाच भरवसा

वाटत नाही.क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जाते.या 'राइड'ला विनोदाची जोड दिलेली आहे.

अविस्मरणीय फ्लोरिडा--युनिव्हर्सल स्टूडिओ १

----------------------------------------

आपण एका गाडीत बसलो आहोत.प्रथम गाडी एका अंधा-या मार्गात जाऊन थांबते.

अगदी पाव मिनीट असेल- आणि सुसाट धावू लागते.गाडीच्या प्रचंड वेगामुळे आपल्या

छातीचे ठोके वाढू लागतात.तेवढ्यात समोर आगीचा लोळ उठतो.आग चुकवण्यासाठी

आपली गाडी गर्रकन् वळते; आणि परत धावू लागते.तेवढ्यातच समोरून एक अक्राळविक्राळ

राक्षस आ sवासून आपल्याकडे सरसावत असतो.गाडी परत झटक्यात रस्ता बदलते.

आता दोन्ही बाजूना उंच डोंगरांच्या रांगा दिसतात.मधल्या चिंचोळ्या वाटेवरून

आपली गाडी धावत असते.अचानक् डोंगरावरील झाडांमधून अजस्त्र डायनासोर आपल्यावर

आक्रमण करताना बघून आपल्या काळजाचा ठोका चुकतो.गाडी त्याना चुकवण्यासाठी

आणखी वेग वाढवते.एका डोंगराच्या भुयारातून धावू लागते;अगदी मिट्ट काळोखातून!

वेग इतका;की आपल्याला वाटते,आपण गाडीत नाही;विमानात बसलो आहोत.मी हाताच्या मुठी

घट्ट धरून ठेवते.समोर उजेड दिसू लागतो.गाडीचा वेगही हळूहळू कमी होऊ लागतो.आणि

समोर आपले स्टेशन दिसू लागते.आपण सुटकेचा श्वास सोडतो.

हे काही मला पडलेले स्वप्न नाही ही 'युनिव्हर्सल स्टूडिओ-फ्लोरिडा' येथील

अनेक 'राइड ' (शो)पॆकी एक राइड आहे.स्वप्नवत् वाटणा-या या राइड्स आधुनिक

तंत्रज्ञानाचा स्तिमित करणारा आश्चर्यकारी अविष्कार आहे.

अटलांटाहून निघून युनिव्हर्सल स्टुडिओला पोहोचेपर्यंत दुपार झाली होती.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन मी म्हणत होते.अमेरिकतला प्रदेश असूनही फ्लोरिडाला

कडक उन्हाळा असतो.केन्टकीला आम्हाला एक वयस्कर गृहस्थ भेटले होते.फ्लोरिडाचे

रहिवाशी ,पण उन्हाळ्यासाठी केंटकीला येऊन राहिले होते- कारण मला आज कळले.

प्रवेशद्वारावर 'सेल'वर चालणारे छोटे पंखे आम्ही विकत घेतले.हे पंखे एका

प्लास्टिक बाटलीवर लावलेले असतात.बाटलीमधील थंड पाण्याचा स्पे चेह-याला थंडावा

देतो;आणि उन्हाच्या स्ट्रोकपासूनही वाचवतो.

मला वाटले होते;की तिथे आम्हाला इंग्लिश चित्रपटांचे चित्रपटांचे चित्रिकरण

पहायला मिळेल ; पण तसे काही दिसले नाही.इमारतींवर सिनेमाप्रमाणे मोठमोठी पोस्टर्स

लावलेली होती.या प्रत्येक इमारतीमध्ये वेगवेगळ्या 'राइड्स' आम्हाला अनुभवायला

मिळणार होत्या.यातील पहिलाच 'शो' म्हणजे वर वर्णन केलेली विलक्षण रोमांचकारी

'राइड'.

दुस-या एका 'राइड'मध्ये ' ई.टी.' एका अंतराळयानातून आपल्याला दुस-या

ग्रहावर घेऊन जातो.ध्वनिक्षेपकावरून सांगितले जाते -"हा ई.टी.अत्यंत हुशार आहे.तुम्हाला

अवकाशात फिरवून अगदी सुखरूप परत आणेल.घाबरू नका "

आपले अंतराळयान थोडे पुढे जाऊन काळोखात थोडे थांबते;आणि वेगाने

धावू लागते.क्षणात आकाशात झेप घेते.आपल्या यानाला अडवण्याचे 'ई.टी."च्या शत्रूकडून

खूप प्रयत्न केले जातात.काही वेळा तर टक्कर होते की काय असे वाटते;पण आपला हीरो

वेळीच यानाची दिशा बदलतो.अनेक संकटाना तोंड देत तो आपल्याला त्याच्या ग्रहावर

घेवून जातो.त्या सुंदर ग्रहाच्या दर्शनाने मात्र आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते .अवकाशातून

चित्राप्रमाणे दिसणारा तेथील भूप्रदेश,दिमाखदार घरे,हिरवागार वनप्रदेश पाहून मन भारावून

जाते.मनात येते-आपली पृथ्वी सुध्दा अंतराळातून अशीच सुंदर दिसत असेल.मग मात्र जराही

वेळ न घालवता आपला नायक आपल्याला मुक्कामावर घेऊन येतो.अंतराळात आपल्यावर

आलेली संकटे आपण विसरून जातो पण त्या अनामिक ग्रहावरील विहंगम दृश्य

मात्र डोळ्यापुढून हलत नाही.

एका राइडमध्ये विमानात बसून आम्ही थेट उत्तर ध्रुवावर गेलो.तेथील बर्फाच्छादित

उत्तुंग गिरिशिखरे,पायथ्याशी असलेल्या काळोखी गुहा,कोसळणारे कडे,अनंत क्षितिजापर्यंत

फक्त बर्फाच्या राशी!कुठे पर्वताच्या माथ्यावर सूर्यकिरणांनी सजवलेले कोटिकोटि

हिरे-माणकांच्या तेजाने लखलखणारे मुकुट-सगळेच दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते. अवघ्या

आसमंतातून जणू ॐकार ऎकू येतोय असे वाटत होते.निसर्गाची दिव्यता पाहून कोण

अंतर्मुख होणार नाही?

या सगळ्या राइड्समध्ये आपल्याला त्या दृश्यांमध्ये सामील करून घेण्याची

जबरदस्त ताकत आहे.उदाहरणार्थ 'टर्मिनेटर' गोळीबार आणि बॉम्बचा मारा सहज चुकवतो;

पण भयभीत आपण जास्त होतो.

एके ठिकाणी मोकळ्या मॆदानावर सिनेमाचा सेट उभा केलेला आहे. 'शो ' सुरू

झाला; की वा-याचा झंझावात,घरांची उडणारी छपरे,उन्मळून पडणारे वृक्ष ,हवेत गिरक्या

घेणा-या गाड्या पाहून मनाचा थरकाप उडतो.नंतर मुसळधार पाऊस सुरू होतो.पावसाचा

जोर इतका असतो; की आपण आडोशाला उभे असूनही अंगावर पाण्याचा शिडकावा होतोच.

इथले बोटिंगही तितकेच चित्तथरारक आहे.शांत पाण्यात चालणारी बोट

धबधब्यामधून १८०° नी कधी खाली येते तेच कळत नाही.आपण किती उंचावरून खाली

आलो हे पाहिले;की पोटात गोळा येतो.बेल्ट एवढे काळजीपूर्वक का बांधले जात होते ते

आता कळते.

सिम्पसन कुटुंबाची आकाशातील सफरही अशीच साहसपूर्ण होती.विमान कधी

उलटे होईल,कधी जमीनीवर आदळेल तर कधी कशाशी टक्कर घेईल- कसलाच भरवसा

वाटत नाही.क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जाते.या 'राइड'ला विनोदाची जोड दिलेली आहे.

येथील प्रत्येक खेळ पाच मिनिटाच्या आसपास चालतो ;पण आपण त्यात मनाने

इतके गुंतून जातो ;की मिनिट तासांप्रमाणे वाटते.खरे तर आपली गाडी किंवा विमान

एकाच मोठ्या अंधा-या जागेत असते.फक्त सभोवतालची दृश्ये बदलतात.गाडीला वेगात

पळवण्याचे,वळवण्याचे,विमान उडवण्याचे आभास निर्माण केले जातात.मात्र आपण

ते प्रसंग पूर्णपणे जगतो;कधीही न विसरण्यासाठी!

  • अविस्मरणीय फ्लोरिडा--युनिव्हर्सल स्टूडिओ १
  • ----------------------------------------

    आपण एका गाडीत बसलो आहोत.प्रथम गाडी एका अंधा-या मार्गात जाऊन थांबते.

    अगदी पाव मिनीट असेल- आणि सुसाट धावू लागते.गाडीच्या प्रचंड वेगामुळे आपल्या

    छातीचे ठोके वाढू लागतात.तेवढ्यात समोर आगीचा लोळ उठतो.आग चुकवण्यासाठी

    आपली गाडी गर्रकन् वळते; आणि परत धावू लागते.तेवढ्यातच समोरून एक अक्राळविक्राळ

    राक्षस आ sवासून आपल्याकडे सरसावत असतो.गाडी परत झटक्यात रस्ता बदलते.आता

    दोन्ही बाजूना उंच डोंगरांच्या रांगा दिसतात.मधल्या चिंचोळ्या वाटेवरून आपली गाडी

    धावत असते.अचानक् डोंगरावरील झाडांमधून अजस्त्र डायनासोर आपल्यावर आक्रमण

    करताना बघून आपल्या काळजाचा ठोका चुकतो.गाडी त्याना चुकवण्यासाठी

    आणखी वेग वाढवते.एका डोंगराच्या भुयारातून धावू लागते;अगदी मिट्ट काळोखातून!

    वेग इतका;की आपल्याला वाटते,आपण गाडीत नाही;विमानात बसलो आहोत.मी हाताच्या

    मुठी घट्ट धरून ठेवते.समोर उजेड दिसू लागतो.गाडीचा वेगही हळूहळू कमी होऊ लागतो.आणि समोर आपले स्टेशन दिसू लागते.आपण सुटकेचा श्वास सोडतो.

    हे काही मला पडलेले स्वप्न नाही ही 'युनिव्हर्सल स्टूडिओ-फ्लोरिडा' येथील

    अनेक 'राइड ' (शो)पॆकी एक राइड आहे.स्वप्नवत् वाटणा-या या राइड्स आधुनिक

    तंत्रज्ञानाचा स्तिमित करणारा आश्चर्यकारी अविष्कार आहे.

    अटलांटाहून निघून युनिव्हर्सल स्टुडिओला पोहोचेपर्यंत दुपार झाली होती.

    उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन मी म्हणत होते.अमेरिकतला प्रदेश असूनही फ्लोरिडाला

    कडक उन्हाळा असतो.केन्टकीला आम्हाला एक वयस्कर गृहस्थ भेटले होते.फ्लोरिडाचे

    रहिवाशी ,पण उन्हाळ्यासाठी केंटकीला येऊन राहिले होते- कारण मला आज कळले.

    प्रवेशद्वारावर 'सेल'वर चालणारे छोटे पंखे आम्ही विकत घेतले.हे पंखे एका

    प्लास्टिक बाटलीवर लावलेले असतात.बाटलीमधील थंड पाण्याचा स्पे चेह-याला थंडावा

    देतो;आणि उन्हाच्या स्ट्रोकपासूनही वाचवतो.

    मला वाटले होते;की तिथे आम्हाला इंग्लिश चित्रपटांचे चित्रपटांचे चित्रिकरण

    पहायला मिळेल ; पण तसे काही दिसले नाही.इमारतींवर सिनेमाप्रमाणे मोठमोठी पोस्टर्स

    लावलेली होती.या प्रत्येक इमारतीमध्ये वेगवेगळ्या 'राइड्स' आम्हाला अनुभवायला

    मिळणार होत्या.यातील पहिलाच 'शो' म्हणजे वर वर्णन केलेली विलक्षण रोमांचकारी

    'राइड'.

    दुस-या एका 'राइड'मध्ये ' ई.टी.' एका अंतराळयानातून आपल्याला दुस-या

    ग्रहावर घेऊन जातो.ध्वनिक्षेपकावरून सांगितले जाते -"हा ई.टी.अत्यंत हुशार आहे.तुम्हाला

    अवकाशात फिरवून अगदी सुखरूप परत आणेल.घाबरू नका "

    आपले अंतराळयान थोडे पुढे जाऊन काळोखात थोडे थांबते;आणि वेगाने धावू लागते.क्षणात आकाशात झेप घेते.आपल्या यानाला अडवण्याचे 'ई.टी."च्या शत्रूकडून

    खूप प्रयत्न केले जातात.काही वेळा तर टक्कर होते की काय असे वाटते;पण आपला हीरो

    वेळीच यानाची दिशा बदलतो.अनेक संकटाना तोंड देत तो आपल्याला त्याच्या ग्रहावर

    घेवून जातो.त्या सुंदर ग्रहाच्या दर्शनाने मात्र आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते .अवकाशातून

    चित्राप्रमाणे दिसणारा तेथील भूप्रदेश,दिमाखदार घरे,हिरवागार वनप्रदेश पाहून मन भारावून

    जाते.मनात येते-आपली पृथ्वी सुध्दा अंतराळातून अशीच सुंदर दिसत असेल.मग मात्र जराही

    वेळ न घालवता आपला नायक आपल्याला मुक्कामावर घेऊन येतो.अंतराळात आपल्यावर

    आलेली संकटे आपण विसरून जातो पण त्या अनामिक ग्रहावरील विहंगम दृश्य

    मात्र डोळ्यापुढून हलत नाही.

    एका राइडमध्ये विमानात बसून आम्ही थेट उत्तर ध्रुवावर गेलो.तेथील बर्फाच्छादित उत्तुंग गिरिशिखरे,पायथ्याशी असलेल्या काळोखी गुहा,कोसळणारे कडे,अनंत क्षितिजापर्यंत फक्त बर्फाच्या राशी!कुठे पर्वताच्या माथ्यावर सूर्यकिरणांनी सजवलेले कोटिकोटि

    हिरे-माणकांच्या तेजाने लखलखणारे मुकुट-सगळेच दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते. अवघ्या

    आसमंतातून जणू ॐकार ऎकू येतोय असे वाटत होते.निसर्गाची दिव्यता पाहून कोण

    अंतर्मुख होणार नाही?

    या सगळ्या राइड्समध्ये आपल्याला त्या दृश्यांमध्ये सामील करून घेण्याची जबरदस्त ताकत आहे.उदाहरणार्थ 'टर्मिनेटर' गोळीबार आणि बॉम्बचा मारा सहज चुकवतो; पण भयभीत आपण जास्त होतो.

    एके ठिकाणी मोकळ्या मॆदानावर सिनेमाचा सेट उभा केलेला आहे. 'शो' सुरू झाला; की वा-याचा झंझावात,घरांची उडणारी छपरे,उन्मळून पडणारे वृक्ष ,हवेत गिरक्या घेणा-या गाड्या पाहून मनाचा थरकाप उडतो.नंतर मुसळधार पाऊस सुरू होतो.पावसाचा जोर इतका असतो; की आपण आडोशाला उभे असूनही अंगावर पाण्याचा शिडकावा होतोच.

    इथले बोटिंगही तितकेच चित्तथरारक आहे.शांत पाण्यात चालणारी बोट

    धबधब्यामधून १८०° नी कधी खाली येते तेच कळत नाही.आपण किती उंचावरून खाली

    आलो हे पाहिले;की पोटात गोळा येतो.बेल्ट एवढे काळजीपूर्वक का बांधले जात होते ते

    आता कळते.

    सिम्पसन कुटुंबाची आकाशातील सफरही अशीच साहसपूर्ण होती.विमान कधी

    उलटे होईल,कधी जमीनीवर आदळेल आणि कधी कशाशी टक्कर घेईल- कसलाच भरवसा