Arun V. Deshpande
arunvdeshpande@gmail.com
मा .संयोजक
मातृभारती टीम
नमस्कार ,
मातृभारती आयोजित –
राष्ट्रीय निबंध लेखन –स्पर्धेत –माझा निबंध लेखन सहभाग नोंदवतो आहे.
विषय व शीर्षक – लव्ह –मैरेज ऑर अरेन्जड मैरेज
आपल्या लेखन स्पर्धेत माझा सहभाग नोंदवून घ्यावा .
मेल पोंच देणे.
स्नेहांकित –
अरुण वि.देशपांडे
मातृभारती आयोजित -
राष्ट्रीय निबंध लेखन-स्पर्धा
-------------------------------------------------------
निबंध -
लव्ह-मैरेज ऑर अरेंजड मैरेज .
ले- अरुण वि.देशपांडे .
----------------------------------------------------------------------------------
विषय काही असो - love marriage or arranged marraige.."..याबाबतीत विचार मांडायचे झाले तर ,दोन्ही प्रकारच्या विवाह-पद्धतीचे -साधक-बाधक " पैलू विचारार्थ घ्यावेच लागतील .कारण विवाह तो मग "प्रेम-विवाह " असो वा- ठरवून झालेला विवाह असो.. दोन व्यक्तींच्याच नव्हे तर, अनेकांच्या आयुष्यात या विवाहाचे परिणाम होणार असतात .
मी स्वतहाला "मधल्या -पिढीचा प्रतिनिधी मानतो आणि या संदर्भात माझे विवेचन सादर करतो
१. माझ्या वडिलांची पिढी -२-माझी पिढी -आणि -३- माझ्या मुलाची पिढी --आणि आजची आधुनिक पिढी ..
माझ्या वडिलांच्या पिढीत .."प्रेम-विवाह " अगदी दुर्मिळात -दुर्मिळ अशी घटना असेल. त्यावेळच्या मोठ्या शहरात असे घडत असेल, पण सामन्य जनमानसात केवळ वडिलधार्यांनी ठरवलेल्या मुलीशी -/मुलाशी विवाह होत असत .लग्न ठरवलेल्या त्या काळातील मुला-मुलीना एकमेकांना पहाण्याचा योग थेट "बोहोल्यावर चढल्यावर "येत असे.
मोठ्या माणसांचा शब्द अंतिम असे."त्या विरोधात लग्नाळू -मुला-मुलींनी स्वताचे मत मांडण्याचा प्रश्नच नव्हता ",किंवा .आपण आपले मत मांडू शकतो" ,याची जाणीव त्याकाळातील तरुण पिढीला फारशी नव्हती.थोडक्यात "आपल्या भल्याचा विचार करणाऱ्या वडीलधार्या पिढीचा "शब्द कोणी मोडत नसे.. आणि त्याकालातले हे "ठरवलेले -विवाह "..बहुतांशी .सफल -संपूर्ण होत असत ..आणि या जोडप्यांचे वैवाहिक जीवन -सुजलाम -सुफलाम " असे.
२. माझ्या अरेंज -म्यारेज ला " आता चक्क चाळीस वर्ष-पूर्ण झाली आहेत माझ्या वडिलांच्या समकालीन पिढीचे विवाह वर्ष सन -१९४५ -ते १९४८ असे धरले तर ..माझ्या पिढीच्या विवाह वर्षा पर्यंत म्हणजे १९७५- १९७८ -म्हणजे
तीन दशकांच्या कालखंडात पिढीच्या मानसिकतेत आणि सामाजिक मानसिकतेत ..प्रचंड बदल झाला होता असे म्हणावे लागेल ..कारण.. त्यावेळी .लग्नाळू मुला -मुलींच्या वयात चांगलीच म्हणजे --२५ चा मुलगा आणि -२०-२१ ची मुलगी असा वयोगट झाला होता .
..आणि याच काळात नव्याने सुरु झालेली "वर संशोधन - वधू-संशोधन-संस्था " या \\सिस्टीम खूपच लोकप्रिय होऊ लागल्या होत्या ,
तरीपण बहुसंख्य विवाह -परिचित आणि सुचवलेल्या स्थळाशी होत असत . "मुलाची पसंदी "याला अंतिम महत्व आलेले होते .मुलीच्या मताला अजून वजन येणारे दिवस पुढे भविष्यात आहेत"याचा अंदाज त्यावेळी कुणालच नव्हता .,मुलाने मुलगी पसंद केली "म्हणजे पुढचे सगळे व्यवहार -फेर्या , बैठकी .निर्विघ्न पार पडून .हे ठरवलेले विवाह -लग्न,arraneged marriage "-थाटात पार पडत .आणि विवाहित जोडपी ..सुखाने आपला संसार सुरु करीत .
३. या ठरवलेल्या लग्नाचा सर्वात मोठा मानसिक फायदा - परिचित कुटुंबाशी स्नेह असलेल्या मध्य्स्तान मार्फत विवाह ठरवले जायचे .अलि कडच्या काळात ही मंडळी लुप्त झालीत, असो. हे परिचित मध्यस्त दोन्ही कडचे -प्रभावशाली व्यक्ती असत.त्यांनी सुचवलेले स्थळ"आहे म्हटल्यावर .प्रपोजल डोळे मिटून .स्वीकारले जात असे. मध्यस्त व्यक्ती ..जवळची नातेवाईक असायची ,पंचक्रोशीतल्या बहुतेक सगळ्या कुटुंबाशी या व्यक्तींचा स्नेह असायचा .आणि यांच्या मार्फत वर आणि वधु ' संशोधन कार्य प्रोफेशनल नसे तर ते उलट ..आपल्या ओळखीच्या पोरा -पोरींचे कल्याण व्हावे "ही उदात्त भावना असे.आणि हे विवाह फ्लोप -शो झाले "असे आमच्या पहाण्यात कधी येत नसायचे . एकदा अक्षता पडल्या म्हणजे ..पुढील वैवाहिक जीवनाची गाडी सुरु .
४. आमच्या पिढीत लग्नाचे वय तसे २५ च्या पुढचे झालेले असल्यामुळे .आधीच्या पिढीतल्या सारखे .नवरा-बायको ,आम्ही नव्हतो .आणि "लग्न एक जबादारी , नवरा -बायको म्हणजे काय ? स्त्री -पुरुष हे नाते , एकमेकांना समजून घेणे आणि त्याची आवश्यकता .." या अनेक वैचरिक गोष्टींचा विचार ,आणि या अभावी उद्भवणाऱ्या समस्या .या बद्दल विचार करणे " अशी परिपक्वता आणि एक सामाजिक भान या पिढीला नक्कीच आलेले होते ,
५.आपले लग्न मोडण्यासाठी नाही-तर ते टिकवून रहाण्यात आपले हित आहे" हे संस्कार होण्याचे
कारणच "अगोदरच्या पिढ्यांचे ठरवून झालेले विवाह - arranged marriage.आहे अशी प्रांजळपणे म्हणवे वाटते.
५. ठरवून झालेल्या विवाहातील सगळीच जोडपी .किंवा सगळेच नवरा -बायको एकमेकांना अनरूप होते " असे मुळीच नसते , पाहून अचंबा वाटावा अशी विजोड जोडी आपल्याला दिसते ..पण यांचा ही विवाह यशस्वी "असेच म्हणता येईल लौकिक अर्थाने .त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख-समाधान आहे असे पाहणार्याला दिसते
६ नव्वदच्या दशकानंतर ढोबळ मनाने -love or arranged marraige ? असा प्रश्न नव्या जोडप्यांना विचारला जाऊ लागला . आणि प्रेम-विवाहाच्या प्रमाणत लक्षणीय अशी वाढ झाली असे जाणवेल.तरी पण..अजून ही समाज-मानसिकता ठरवलेले विवाह " arranged marraige " या सिस्टीम ला प्राधान्य देण्याची आहे.
arranged marraige or love marraige ? यातील पहिली बाजू आपण आत्ता पर्यंत जाणून घेतली ..आता दुसर्या बाजूचा विचार करू या -
विवाह -लग्न -मैरेज ..ही संज्ञा ..शब्द म्हणजे स्त्री-पुरुष यांना एकत्र आणणारा एक महत्वाचा संस्कार आहे.
स्त्री-पुरुष यांच्या एकत्र राहण्याला आपल्या संस्कृतीत "समाज-मान्यता " लागते . आजच्या जमान्यातील
लिव्ह -इन."या प्रकाराला आपल्याकडे जनसामान्यांची मान्यता मिळणे केवळ अशक्य आहे.असो.
प्रेम-विवाह म्हणजे -love marriage आणि ठरवून केलेला -ठरवलेला विवाह -arranged marriage ,असे दोन विवाह -प्रकार आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहेत ,फक्त यात एक फरक पडलेला दिसून येईल की ,जुन्या काळात प्रेम-विवाह करणे हे मोठ्या धाडसाचे काम समजले जात असे ", बहुतेक प्रेमी-जोड्या लग्नाच्या बोहल्यावर चढण्यात अपयशी ठरत असत.आता मात्र अंतर-जातीय प्रेम-विवाह अगदी सहजतेने होतांना दिसतात ,थोडक्यात आधुनिक काळातील प्रेमी- जोड्या नशीबवान आहेत ..ज्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होते.
अगोदर म्हटल्या प्रमाणे -प्रेम-विवाह हा दोघांच्या"आता लग्न करुया "या अंतिम टप्प्यावर घायच्या निर्णयाने होतो ,आणि मग ..या प्रेम-विवाहाच्या प्रस्तावाला बहुतेक वेळा -विरोधच केला जातो , हसत-खेळत आणि अनुकूल प्रतिसादाने प्रेम विवाह संपन्न झालेच नाहीत असे मात्र नाही..कारण ..प्रेमी-जोडप्यांच्या हट्टा समोर पालकांना झुकावे लागते ,तरी पण, प्रेम-विवाह जर .अंतर-जातीय , आंतरधर्मीय "अशा प्रकारचा असेल तर ..विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ अशा "प्रेम-विवाहित जोडप्यावर येते."
आजकाल प्रेम-विवाह .सुद्धा .सर्व-संमतीने -ठरवून करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे ..याला "love-cum- arranged marriage " असे लेबल लावले जाते ..यामुळे सभोवतालची प्रतिकूलता फारशी तीव्र न राहता ,विरोधाची धार बोथट होत जाते.आणि या प्रेम-विवाहाची स्वीकृती लेव्हल वाढलेली आहे असे जाणवेल.
तरुण-तरुणीत प्रेम असणे-ते कायम टिकणे -त्याचे विवाहात रुपांतर होणे ..यात त्या दोघांच्या वयो-गटाचा मोठा परिणाम करणारा असा घटक असतो.अबोध वळणावर होणारे प्रेम-विवाह ..पुढे टिकून राहतील याबद्दल मोठी शंका सर्वांच्या मनात असते व त्यामुळे अशा प्रेम-विवाह प्रस्तावाला तीव्र-विरोध असणारच .अनेक टप्पे पार पाडतांना ,प्रेम-विवाह करणाऱ्या जोडप्यांचा स्वतःच्या प्रेमावरच विस्वास डळमळीत झाल्याची उदाहरणे सापडतील ,परिणामी मतभेद होणे.ते अधिक तीव्र होणे ..याची परिणीती .."गेलास उडत -मी माझी/मी माझा समर्थ "आहे , असे म्हणून विभक्त होण्या पर्यंत मजल गाठणारे प्रेमी-जोडपी खूप आहेत.
बहुतेक वेळा स्वतच्या हट्टाने प्रेम-विवाह करून .स्वतंत्रपाने रहाणारे जोडपी .प्रेम सक्सेसफुल झाले, लग्न झाले म्हणून भले आनंदात असतील ..पण, लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो .कारण ज्यांच्या प्रेम- विवाहाला विरोध झालाय, , त्यांना आपल्या कुटुंबाला -नात्याला मुकावे लागते , आई-वडील संबंध तोडून टाकतात , समाजिक -आर्थिक संबंध धोक्यात येतात ..काहीजणांना या लग्नाची-प्रेमाची जबरदस्त किंमत चुकवावी लागते .याचा अर्थ असाही नाही की ,प्रेम-विवाह करणारे सुखात आनंदात नाहीत ..असे खूप आहेत.
नव्या पिढीतील प्रेम-विवाह हे- आफिस -कलीग तो/ ती , ,समान आवडीच्या क्षेत्रातला /ली . आणि उच्च -शिक्षण घेतांना जुळल्या प्रेमातून .अशा स्वरूपाचे आहेत असे म्हणू या .आर्थिक स्वतंत्रता , महत्त्वाकांक्षी वृत्ती , बेपर्वाआणि बेप्फिकीर स्वभाव वृत्ती ..यामुळे संवादी पेक्षा विसंवादी वैवाहिक जीवन जगतांना अनेक जोडपी आढळतात .
हे सगळ पाहिलं की वाईट वाटत -! वाटत - प्रेम-विवाह वाईट नाहीये ..प्रेमा -भावना पवित्रच असणार आहे. प्रश्न आहे तो बदलत्या मानसिकतेचा .कारण नव्या पिढीचा ओढा ..जोडण्यात गुंतण्या पेक्षा ..तोडून मोकळे होण्याकडे आहे..हेच चिंताजनक आहे .
आणि ठरवलेले लग्न -यातील पहिलेच महत्वपूर्ण कलम आहे- लग्न म्हणजे तडजोड . कुणी किती त्याग करायचा , मन मारून जगायचे ? किंमत नाहीच कुमाला ? असे बेसूर उमटले तरी ..शेवटी ..तडजोड करण्याची मानसिकता आणि तयारी आहे ..आणि यामुळेच ..ठरवलेले विवाह ..arranged marriage ..सावरून धरणारे आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------निबंध -
लव्ह-मैरेज ऑर अरेंजड मैरेज .
ले- अरुण वि.देशपांडे .
मो- ९८५०१७७३४२
email
arunvdeshpande@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------