“परीचा बर्थडे ..”
होय परीच्या बर्थडे चे सांगते आहे तुम्हाला
कोण परी विचारता का ..अहो आपली सानिका….
कोण सानिका ?..अहो आपल्या पेपर वाल्या भाऊंची लाडकी लेक..
आणी या “सानिका “ पुरवणीची मालकीण बर का !!!
सगळी “सानु “म्हणतात तीला ..पण घरच्या सगळ्यांची “परी “आहे ती ....
इंग्रजी शाळेत शिकते सानु .. त्यामुळे वाढदिवस हा “बर्थडे “असतो ना !!!
तशी सानु च्या बर्थडे ची तयारी खुप आधीपासून
अगदी मागल्या बर्थडे पासून सुरु असते म्हणा ना ..
आता आपल्या पुढील वर्षीच्या बर्थडे.ला काय काय करायचे हे सारे प्लान सानुचे आधीच तयार असतात बर का
सानु घरी एकुलती एक ..
हुशार गुणी आणी गोड अशी ही मुलगी साऱ्या घरातल्या लोकाच्या गळ्यातला “ताईत “च म्हणा ना .!!!
आणी सानु ला ही हे माहिती असते की आपल्या भोवती सारे घर नाचते आहे
त्यामुळे सानु घरभर एखाद्या “परी ..”सारखी कायम वावरत असते
तीचे स्कूल, तिची ट्युशन,तिचा डान्स क्लास, तीचे कराटे यांचे वेळापत्रका अख्ख्या
घराला अगदी तोंड पाठ असते .
अशा या सानुचा बर्थडे पण तसाच विशेष असतो !!
त्याची वेळ, त्यासाठी कापला जाणारा केक, त्या दिवशी बोलवायची माणसे,
त्या दिवशी पप्पा कडून घ्यायचे गिफ्ट हे सारे सारे सानु स्वता ठरवते
त्यात कुणी हस्तक्षेप केलेला तीला चालत नाही
आणी अखेर ती संध्याकाळ उजाडते .दुपारीच भाऊंचा बर्थडे ला येण्या विषयी फोन येवून गेलेला असतो आम्हाला
.मग आम्ही मळ्यातल्या घराकडे येवून पोचतो
भाऊंचे मळ्यांतले घर तसे बरेच दुर .असते
इतर वेळी प्राणी आणी घरातली दोन तीन माणसे सोडता इथे सामसूम असते
पण आज मात्र या संध्याकाळी हे घर गजबजलेले असते .
सानुच्या बर्थडे चा “अनौपचारिक “कार्यक्रम तिथे घडणार असतो ना !!
आम्ही गेल्या गेल्या सानु ला हाक मारतो
बाईसाहेब आपल्या मैत्रिणीच्या “ श्रावणी “च्या गळ्यात गळां घालून हिंडत असतात
सुंदर असा पोपटी रंगाचा अनारकली ड्रेस ..
गळ्यात त्या दिवशी साठी खास ..अशी सोन्याची चेन
बांधलेल्या केसावर चांगला हात भर मोठा मोगर्याचा गजरा
अगदी खुशीत असते स्वारी ...!!
घरात कोणी जवळच्या लोकांनी तिच्या साठी आणलेले फ्रॉक,,गिफ्ट पाहत असते
मग आम्ही आपले तिच्या साठी आणलेले मोठ्ठे चोकलेट तीला देऊन टाकतो
आणी एक गोड पापी घेऊन
तिच्या बरोबर एक मस्त फोटो काढुन घेतो ..
सानु पप्पांनी काय दिले ग गिफ्ट ..?
असे विचारता मम्मी कौतुकाने सांगते ल्यापटोप दिला ..
खरे तर ते गिफ्ट सानुनेच फोडलेले असते ..
पण उगाच च ती मम्मी वर आपले गिफ्ट फोडले म्हणुन ओरडते
आम्ही पण तिचा आवेश पाहुन कौतुकाने हसतो ..
झाले बाईसाहेब परत श्रावणी बरोबर घरात गायब होतात
आत्ये बहिणी मामेबहिणी मैत्रिणी यांच्याशी खेळायला जातात
घरात थोडा गोतावळा जमलेला असतो .बायका एकमेकात गप्पा मारीत असतात
पुरुष लोक एकीकडे काकांशी गप्पात दंग असतात
सानुच्या मम्मीचे सगळीकडे लक्ष असते ..
सानुची आई म्हणजे ..आज्जी घरच्या एका बाईला मदतीला घेऊन पोह्याच्या तयारीला स्वयपाकघरात लागलेली असते
आता कार्यक्रमाची तयारी सुरु होते ..
सानुच्या चुलत, मावस बहीणी टेबला भोवती रांगोळी काढतात
मम्मी ओवाळणी चे तबक तयार करू लागते
करण दादा फुगे फुगवणे .. बर्थडे स्टीकर लावणे या तयारीत लागतो
आता थोड्याच वेळात ऑफिस मधील मुलांच्या मोटारसायकली येऊ लागतात
मग त्यातलाच कोणी एक केक घेऊन येतो
केक आणला हे समजल्या वर सानु लगबगीने धावत येते ..
पाहू पाहू कसला आहे ..असे उगाच च म्हणते ..आणी खोके फोडू पहाते
मग हलकेच तो फुलपाखराचा केक खोक्यातून काढून टेबल वर ठेवला जातो .
आता मुख्य काम म्हणजे सानुच्या पप्पांना फोन करणे
पप्पा पेपर च्या ऑफिसमध्ये बिझी असतात पण पप्पा आल्याशिवाय केक कापला जाणार नसतो .
इतर लोकांचे फोन सानुच्या पप्पाना गेलेले असतात ..पण अजून ते आलेले नसतात .
मग सानु फोन हातात घेते आणी लाडीक आवाजात पप्पांना लगेच येण्या विषयी बजावते,,..
या फोन नंतर मात्र दहा मिनिटात सानुचे पप्पा घरी येवून पोचतात “
सोबत आणखी ऑफिस मधला कर्मचारी वर्ग पण असतो
आणखी एक दोन गाड्या भरून आणखी नातेवाईक मंडळी येतात
आता मात्र घर चांगलेच गजबजून जाते .
मग सानुला साऱ्या बायका तिच्या बहिणी, तिची आई,मम्मी ओवाळतात
गोड गोड पेढा साखर .खावू घालतात
खरे म्हणजे सानु ला गोड बिलकुल आवडत नाही
पण आजच्या दिवशी ती काहीच तक्रार करीत नाही
औक्षण होताना प्रत्येक जण सानुच्या हातात काहीतरी गिफ्ट ठेवतो,
ते हातात घेऊन बाजूला ठेवताना सानुला आनंद होत असतो
आणी मग सानु बाई अगदी खुष होवून केक कापतात ..
हेप्पी बर्थडे च्या आणी टाळ्याच्या गजरात सोहळा संपन्न होतो
स्वता भरपूर केक खाऊन झाल्यावर मग ..
सानुला हा केक काकांना ..म्हणजे तिच्या आजोबांना भरवायचा असतो
मग काका लगबगीने तंबाखू थुंकून चूळ भरून येतात आणी नाती कडून केक भरवून घेतात
मग नंबर लागतो आज्जीचा ..आज्जीच्या डोळ्यात कौतुक मावत नसते !!!
केक खाऊन ती पण नातीच्या तोंडावरून हात फिरवते
आता पप्पा आणी मम्मीला केक खायला घालते ..
या साऱ्या प्रसंगात फोटो काढायची तिच्या दादाचू ची एकच धांदल उडते ..
मग शेवटी ऑफिस मधले सानुचे सारे मित्रमंडळ तिच्या गालाला पण केक भरवतात. यानंतर थोडा थोडा केक घरचे भूभू ..आणी बैलाला पण दिला जातो
ती सानुची जवळची माणसे असतात ना .!!!
रोज तर बैलाला बिस्कीट भरवल्या शिवाय ती बिस्कीट खात नसते
हा सारा कार्यक्रम पार पडल्या वर सानु आणी श्रावणी आलेल्या मैत्रिणी बरोबर दंगा करायला रिकाम्या होतात
मग आज्जी लगबगीने सानुच्या मम्मीची मदत घेऊन सर्वाना पोह्याच्या डिश देतात
सोबत सर्वाना केक द्यायला सानुची मम्मी विसरत नाही
यानंतर मस्त गप्पा गोष्टी करून खाणे झाल्यावर मग एक एक जण
परतू लागतो दाराच्या आवारात लागलेल्या सगळ्या गाड्या एक एक करून बाहेर पडतात .ऑफिस चा सगळा स्टाफ आपापल्या मोटर सायकल वरून पुन्हा कामाला परत जातो
आता परत फक्त घरचीच मंडळी घरी राहतात
आम्ही पण सानुचा निरोप घेऊन सानुला चांगल्या आयुष्याचा आशीर्वाद देतो
आणी एका साध्या पण आनंदी कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मनात घेऊन बाहेर पडतो ..
आता पुढील वर्षी तिच्या वाढदिवसाला आम्ही येथे असु की नाही हे माहीत नाही
पण आठवण मात्र मनात कायम राहील ..
***