मोरपिसारा........
उन्हाचा इतका कंटाळा आलेला...कधी पाऊस पडतोय अस झालेलं मला!! मी पण चातकाप्रमाणे पाऊसाची वाट आतुरतेनी पाहत होते .....पहिला पाऊस म्हणल कि आठवण येते मातीच्या सुवासाची आणि त्याचबरोबर पिसारा फुलवलेल्या मोराची!! पहिल्या पाऊसाची चाहूल लागायला लागली त्याचबरोबर पिसारा फुलवलेल्या मोराचा प्रकार्ष्यानी आठवण यायला लागली. वर्षभर टेकडीच्या दरीच्या चकरा होतात पण पहिल्या पाऊसाची चाहुन लागली कि सगळी काम बाजूला ठेऊन तडक जवळच्या टेकडीची दरी गाठायची हा दर वर्षी ठरलेला कार्यक्रम..अगदी न चुकता कित्येक हे चालू आहे,त्याच उत्साहानी!!! मला मोराच खूप आकर्षण आहे...अगदी लहान असल्यापासूनच!!! लहानपणी आजोबांनी टेकडी वर हिंडायची सवय लावली...त्यांच्याबरोबर मोर शोधात हिंडायचो आम्ही...मी जस जशी मोठी झाले तशी तीच सवय अंगवळणी पडली आणि दिवसेंदिवस मोराचा आकर्षण वाढतच गेल. ते कधी कमी झाल नाही...मला मोराचा पिसारा प्रचंड आवडतो...त्याचे मनमोहक रंग भुरळ पाडतात..मोराचा पिसारा पहिला कि त्यात हरवूनच जायला होत... पाऊसाळ्यात मोराचा पूर्ण पिसारा असतो..तो पहायची किती दिवस वाट पाहत असते मी. पूर्ण पिसारा असलेला मोर पहिला कि बाकी काहि पहायची इच्छाच उरत नाही.. त्यादिवशी,४ वाजायला आलेले आणि बघता बघता हवा बदलायला लागली!! आकाश एकदम भरून आलेल...आणि पहिल्या पाऊसाची चाहूल लागायला लागली. तसही पाऊसात उत्साह भरभरून जणू वाहतच असतो. पाऊस कधीही चालू होईल अशी चिन्ह होती.. पाऊसाची नुसती चाहूलच मनावरची सगळी मरगळ बाजूला ढकलत असते..आणि दरवर्षी प्रमाणच्या उत्साहा बरोबरीनी पिसारा फुलवलेल्या मोराच्या फुलवलेल्या पिसाराच्या स्वप्नाची सुद्धा सुरवात ह्यायला लागली होती!! पहिला पाऊस आणि पिसारा फुलवलेला मोर अस जणू माझ समीकरणच....काही लोकांना पहिला पाऊसाची चाहूल भजी ची आठवण करून देते पण मला दिसायला लागतो तो पिसारा फुलवलेला मोर!!! दरवर्षीप्रमाणेच माझ्या डोळ्यांसमोर सारखा पिसारा फुलवलेला मोर येत होता. पाऊसाची चाहूल लागली आणि घरात बसून राहण अश्यक्यच होत...तडक टेकडीची दरी गाठायची होती....मला कधी एकदा दरी गाठते आणि मोर पाहते अस झालेलं.. पिसारा फुलवलेला मोर कितीही वेळा पहिला तरी परत परत पहायची इच्छा काही कमी होत नाही. मागच्या वर्षी पहिल्या पाऊसात पाहिलेला पिसारा फुलवलेला मोर डोळ्यासमोर होताच पण परत एकदा पिसारा फुलवलेला मोर पहायची माझी इच्छा वाढतच होती आणि मी पिसारा फुलवलेला मोर पहायची आतुरतेनी वाट पाहत होते......पाऊसाची चाहूल लागली कि मोर मनसोक्त नाचतात आणि ते पाहायचा संधी मी घालवण निव्वळ अश्यकच होत!!! जोरदार पाऊस कधीही चालू होईल त्याआधीच टेकडीच्या दरीत जाऊन मोराचा शोध घ्यायचा होता मला... एक मिनिटही वाया घालवायचा न्हवता मला....पटापट आवरून जायला निघालो मी आणि आई. दरीत पोचलो तेह्वा पाऊस चालु झाला न्हवता... “अजून मोरानी पिसारा फुलवलेला नसेल” अश्या विचारांनी मला मला हुश झाल. दरीत शिरले. प्रत्येक क्षणी पिसारा फुलवलेल्या मोराची स्वप्न ठळकपणे पाहत होते मी. आत जातांना मोराचे “म्याव म्याव” आवाज येत होते पण मोर दिसण्याची चिन्ह काही दिसत न्हवती...सगळीकडे मोराचा शोध घेत होतो. लहानपणीपासून तिथे जातोय त्यामुळे मोरांच्या नेहमीच्या जागा तोंडपाठ होत्या. अगदी सगळीकडे जाऊन आलो. एकही जागा सोडली नाही आम्ही...पण मोर काही दिसला नाही.... पहिल्या पाऊसात पिसारा फुलवलेला मोर पाहायचं माझ स्वप्न ह्यावर्षी स्वप्नाच राहणार अश्या विचारांनी मी उदास होत होते...तेह्वाच भुरभुर पाऊस चालू झालेला... हवा एकदम बदलली... अंधारून आल..आणि कधीही जोरदार पाऊस चालू होईल अस वाटायला लागलेलं म्हणून आता मोर काही दिसत नाही आणि भिजण्याच्या आधीच “चलो घर” अश्या विचारानी आम्ही परत जायला निघालो. जात जाता समोर २-३ लांडोरी दिसल्या...अगदी अनपेक्षितपणेच...खर तर,जोरात पाऊस चालू होईल त्या आधीच घरी जायचं होत पण लांडोरींना पाहून मोर दिसेल अशी आशा परत एकदा पल्लवित झाली....चहुबाजूला पाहिलं आणि मोर दिसलाच...पूर्ण पिसारा असलेला मोर!!!! माझा चेहऱ्यावरचा आनंद मला लपवण मला शक्यच होत न्हवत... मोर दिसण्याची आशा जवळ जवळ सोडून दिलेली असतांनाच समोर जेह्वा मोर दिसला तेह्वा माझी प्रतिक्रिया काय होती ते शब्दात सांगण खरच कठीण आहे!! मोर पाहिला आणि मी त्याच्यातच हरवून गेले...माझ भान हरपून गेल होत....त्याचा पिसारा झुपकेदार होता...एकदम आकर्षक दिसत होता मोर आणि त्याचा पिसारा... आणि तेह्वा पाऊसाचा जोरही वाढला पण त्याक्षनि पाऊसाची पर्वा होती कुणाला? माझ पूर्ण लक्ष होत त्या सुंदर मोराकडे....माझ पूर्ण लक्ष लागलेलं मोर आता तो पुढे काय करतो ह्याकडे... तेह्वा माझी उत्सुकता शिगेला पोचली होती...पाऊस आला तरी त्याची मर्जी होती,पिसारा फुलवायचं का नाही..काय होणार काहीच माहित न्हवत!!! आम्ही शांतपणे काही आवाज न करता त्याच्या मागे मागे जायला सुरवात केली...तो मोर रिकामी जागा बघून थांबला...प्रत्येक क्षणाला आमची उत्सुकता वाढतच होती!!! आणि त्यानी पाहता पाहता पिसारा फुलवायला सुरवात केली...त्यानी पूर्ण पिसारा फुलवला..आणि शेवटी तो नाचला. आहा....आपल्याला कोणी पाहतंय का ह्याची परवा त्याला होती अस मला वाटत नाही...स्वताच्या धुन्धीतच होता तो......कसल अप्रतिम ददृश्य होत ते... दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही पहिल्या पाऊसात पाहिलेला पिसारा फुलवलेला मोर पाहून मी प्रचंड खुश झालेले...काय करू,काय नको अशी विचित्र अवस्था झालेली माझी... मोर मानसोक्त नाचला आणि एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला..जरा वेळ फांदीवर बसून तो उडून गेला...मग मी भानावर आले!! धावपळ करून आल्याच चीज झाल्याच समाधान झालेलं मला... तितक्यात लहानपणी कुणीतरी सांगितल्याच आठवलं मला,”मोर नाचला कि त्याची पिस खाली पडतात” आणि मी हि त्या गोष्टी वर विश्वास ठेवायचे आणि पिसारा फुलवून मोर मनसोक्त नाचला आणि तो गेला कि धावत पळत जाऊन मी पिसारा फुलवलेला असेल तिथे जाऊन पिसं मिळतायत का त्याच शोध घ्यायचे!!! तशीच त्यादिवशीही पिसं शोधायला गेलेच.. लहानपणीही मोर नाचल्यावर कधी पिस मिळाली नाहीत आणि त्यादिवशीही नाही. पाऊसाच्या सुरवातीला पिसं गळून पडली तर कस काय चालेल हे माहित असूनही मी पिसं शोधायला धावले होते... पिसांसाठी किती धावपळ केलेली मी... कितीही मोठ झाल तर वेड्या गोष्टी करायला खरच किती मजा येते!! छोट बनून जगण्यातली मजा परत एकदा अनुभवत होते मी... पाहता पाहता पाऊसाचा जोर अजूनच वाढायला लागलेला.. पहिल्या पाऊसात पिसारा फुलवलेला मोर पाहून मी चिंब झाले.... पण इच्छा नसतांनाही घरी जाव लागणार होत. मोराला मनात साठवून घरी जायला निघालो...मनात फक्त मोर होता!! दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही पिसारा फुलवलेला आणि मनसोक्त नाचत असणारा मोर पाहून माझ मन तृप्त झालेलं... घरी आले खरी पण डोळ्यांसमोर होता तो फक्त पिसारा फुलवलेला मोर आणि मनातहि फक्त तोच विचार... ते दृश्य कितीही वेळा पाहिलं तरी परत परत माझी इच्छा कमी होईल अस मला तरी वाटत नाही त्यामुळे... आता वाट पुढच्या पाऊसा मध्ये मोरपिसारा पाहून चिंब ह्वायची!!!
अनुजा कुलकर्णी.