राजकारण कादंबरी
अंकुश शिंगाडे
आपल्या भारत देशात पाहुण्यांना विशेष महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात. त्यांच्यासाठी विशेष असा पाहुणचारही केला जातो. कारण आपल्याला ते जर आले तर अतिशय आनंद होत असतो. त्याचं कारण आहे, हे जीवन. म्हणूनच पाहुण्यांची आपण इज्जत करतो. हे जीवन तसं पाहिल्यास बरंच कंटाळवाणं आहे. या कंटाळवाण्या जीवनात पाहुण्यांना विशेष स्थान आहे. कारण पाहूणे हे आपल्या कंटाळवाण्या जीवनात रंग भरत असतात.
पाहूणे....... अलिकडील काळात भारतात पाहूण्यांना मोठा सन्मान मिळत असतो. त्यांची मोठी आरास असते आपल्या घरी. प्रसंगी एखाद्यावेळेस काही पाहूणे आपल्या घरच्या सदस्याला काही बोलत असतील, तरीही पाहूण्यांना आपण काहीच म्हणत नाही आणि आपला घरचा सदस्य जर पाहुणे काही बोलल्यास पाहुण्यांना एखाद्यावेळेस काही म्हणत असतील तर आपण आपल्या घरच्या सदस्यावर रागावतोच.
आज शहरात व देशातही नवीनच फॅड आलं आहे. आपण प्रत्येक वेळेस कार्यक्रम प्रसंगी पाहुणे बोलावतो. त्यांचाच उदोउदो करीत असतो. जरी त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पटीनं गुणवंत आपल्याच देशात असतील तरीही. आपल्याला कार्यक्रम प्रसंगी आपल्या देशातील गुणवंत वा शहरातील गुणवंत दिसत नाहीत. इतर शहरातीलच गुणवंत दिसतात व त्यांचाच उदोउदो चाललेला असतो. हे वास्तविक चित्र आहे.
आपण पाहुण्यांची इज्जत करतो. कारण आपला देश हा संस्कारक्षम आहे व या देशात अतिथी हा अगदी देवासमान मानला जातो. अतिथींची इज्जत हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असतो.
अतिथी हा देव असतो. ही परंपरा आपल्या देशात पुर्वीपासूनच आहे. त्यातच अतिथींनी काही सांगितलेले बदल स्विकारण्याची परंपराही पुर्वीपासूनच आहे. जेव्हा माणूस झाडावरुन खाली आला होता. झाडावरुन खाली आलेला हा माणूस जेव्हा जमिनीवर वावरायला लागला. तेव्हा या जमिनीवर आर्याचं आगमण झालं. याचाच अर्थ असा की आर्य हे आपले पहिले पाहुणे होय. त्यानंतर अतिथींचं ऐकण्याची आपली परंपरा असल्यानं आपण आर्यांचं वेळोवेळी ऐकत गेलो. त्यातच ज्यात त्यांनी आपल्याला सांगीतलेल्या देवादिकांच्या कल्पनाही आपण ऐकत गेलो. त्यांनी सांगीतलं पाषाणात देव असतो. ते ऐकत गेलो. मग काय, ज्यातून अंधश्रद्धा प्रसवल्या गेल्यात व आपण आर्याचे नकळत गुलाम झालो. ते आपले पाहूणे म्हणून आले असले तरी त्याच पाहुण्यांनी आपल्याला तत्कालीन काळात गुलाम केलं होतं, आपल्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर पाहूणे म्हणून आलेल्या अरबांनी व मुघलांनीही आपल्याला गुलाम केलं. त्यांनीही आपल्यावर अनन्वीत अत्याचारच केले होते. पुढं आपल्याच देशात पाहुण्या म्हणून आलेल्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं व त्यांनीही आपल्यावर वारंवार अत्याचार केलेत. हे विसरता येत नाही.
पाहूणे येतात. आपल्या घरात वावरतात. कधी मालकासारखं हुकूम गाजवतात. ते पाहूणे असले तरी ते आपल्यावरच अत्याचार करतात. पुढं आपल्याला त्यांना बोलायची हिंमत होत नाही. कारण आपल्यात माणुसकी असते. आपल्याला असं वाटत असते की जर आपण पाहुण्यांना काही बोललोच तर त्या पाहुण्यांना राग येईल. त्या पाहुण्यांना काहीच राग येवू नये असं सारखं वाटत असतं आपल्याला. म्हणून आपण बोलू शकत नाही. आपण त्यांना बोलायचं टाळतो. परंतु पाहूणे तसा विचार करीत नाहीत. ते आपल्याच घरी येतात व आपल्याला हिनवत असतात.
अतिथी देवो भव. पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा. अतिथींसाठी आपला सर्व सहन करणारा स्वभाव. कारण आपण सहनशील आहो व आपल्यात संस्कार आहे. त्याच संस्काराच्या भरवशावर आपण सर्वांचं सगळंच सहन करीत आलो. म्हणूनच आर्य लोकं आले व ते इथं स्थिरावलेही. त्यानंतर अरब आले व तेही स्थिरावले. त्यानंतर मुघल आले. तेही स्थिरावले व त्यांनी राज्य केलं. इंग्रज लोकं आले व त्यांनीही राज्य केलं. याचाच अर्थ असा की जे जे कोणी पाहुणे म्हणून भारतात आले. त्यांनी त्यांनी आपल्यावर अत्याचार केला अन् अन्यायही. तसंच आपल्या कुटूंबातही घडत असते.
आजही पाहुण्यांची आरास असते प्रत्येकांच्या घरात. ज्यात पाहुण्यांमुळे कधी आपल्या घरच्या एखाद्या सदस्यास बोलावं लागतं. त्यात आपल्याच घरचे सदस्य निराश होवू शकतात. कारण पाहूणे कधीकधी आपल्याच घरच्या सदस्यांचा अपमान करीत असतात. मात्र आपल्याला त्यांचं काही घेणं देणं नसतं. आपल्यासाठी महत्वाचा असतो पाहुणा. पाहुण्यांचा सन्मान करणं. त्यांचं हित जोपासणं हे आपण आपलं कर्तव्य समजत असतो. म्हणूनच आपण पाहुण्यांमुळे आपला अपमान जरी झाला वा त्यांनी आपल्यावर आपल्या वागण्यातून अत्याचार जरी केले, तरी तो अत्याचार वा अपमान आपण मानून घेत नाही व आपण आपल्याच घरच्या व्यक्तीवर रागावत असतो. आपल्याच घरच्या व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देत असतो. जो आपल्या घरचा सदस्य असतो. अन् पाहुणा हा आपल्यासाठी अतिथी देवो भव असतो. जो आपल्याच घरचा सदस्य नसतो. विशेष सांगायचं म्हणजे पाहूणे यावेत. न यावेत असे नाही. परंतु पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच राहावं. स्वतःची अक्कल पाजळवू नये. अन् आपणही विनाकारण पाहुण्यांचा उदोउदो करु नये. कारण पाहूणे हे काही आपलं घर पुरं करीत नाहीत. ते आपलं आपल्यालाच पुर्ण करावं लागतं. हे तेवढंच खरं आहे. जरी ते आपल्या जीवनात आनंद भरत असले तरी. तसंच पाहुण्यांसाठी आपण आपल्याच घरातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक देवू नये हेही तेवढंच खरं. अतिथींबरोबर आपल्या सदस्यांचेही हीत जोपासणं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांचंही हित जोपासावं. तेही नाराज होवू नयेत. म्हणजे झालं. कारण त्यांच्यावरच आपल्या घराची भिस्त अवलंबून असते. म्हणूनच केवळ अतिथी देवो भवं करत बसू नये. जर पाहुणे आपल्या घरच्या लोकांचा पाणउतारा करीत असतील तर आपणही त्यांना जागा दाखवावी. तेच आपण आपल्या शहरासाठी, राज्यासाठी वा देशासाठी करावं म्हणजे झालं.
आपल्या देशात निवडणूक लढविण्याची प्रथा ही आपल्या देशातच पाहुणे म्हणून आलेल्या व इथंच वसलेल्या इंग्रजांनी लादली. तेव्हापासून तर आजतागायत निवडणूक प्रथा सुरु आहे. त्यानुसार निवडणूक आयोग निवडणूक घेतो व निवडणूकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीतून देश चालविण्यासाठी नेता निवडतो. ज्याला राज्यस्तरावर मुख्यमंत्री म्हटलं जातं तर देशस्तरावर पंतप्रधान. तशीच राज्यस्तरावर जी निवडणूक लढवली जाते. तिला विधानसभा निवडणूक व देशस्तरावर जी निवडणूक लढवली जाते. तिला लोकसभा निवडणूक असं म्हणतात. यावेळेसही राज्यस्तरावर निवडणूक झाली होती व त्यात वसीमची पार्टी बहुमतानं निवडून आली होती. त्याचं कारण होतं लाडली बहिण योजना.
लाडली बहिण योजना. निवडणुकीपुर्वी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ज्यात ही योजना देतांना निकष ठरवले होते. ती योजना सरकारनं दिलीही. कारण सरकारला निवडणुकीत प्रचंड बहुमतानं निवडून यायचं होतं. अन् हेच दाखवायचं होतं की आम्ही बहुसंख्य मतानं निवडणुकीत निवडून आलोय. तसं घडलंही.
लाडल्या बहिण योजनेचे काही निकष होते. त्यात पहिला निकष होता, माझे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नाही. कारण जास्त कमविणारी मंडळी ही त्या योजनेत बसत नव्हती. परंतु यामध्ये ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते, त्यांनी आपले उत्पन्न कमी दाखवून लाडल्या बहिण योजनेचे पैसे उचलले हे नाकारता येत नाही.
लाडल्या बहिण योजनेचा दुसरा निकष होता, पिवळे केशरी रेशनकार्ड हे उत्पन्न अटीत ग्राह्य पकडणं. यातही असे पिवळे व केशरी रेशनकार्ड हे बऱ्याच घरी होते आणि ते रेशनचे धान्यही उचलत व घरी न खाता विकत. शिवाय ते गरीब नव्हतेच.
लाडल्या बहिण योजनेचा तिसरा निकष होता, तो व्यक्ती आयकर दाता नसावा वा कुटूंबात कोणीही आयकर दाता नसावा. परंतु असे जरी असले तरी बऱ्याचशा आयकर दात्यांनी लाडली बहिण योजनेचे पैसे उचलले.
चवथा निकष होता, कुटूंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार नसणे. परंतु हाही नियम बाजूला ठेवून बऱ्याच सरकारी नोकरदारांच्या पत्नींनी लाडल्या बहिण योजनेचा लाभ घेतला. ते वेगळे राहात नसले तरी म्हणत की आम्ही वेगळे राहतो असं सांगू.
पाचवा निकष होता, मी स्वयंसेवी कामगार आहे व माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही. हाच एक मुद्दा लोकांचा कदाचीत बरोबर होता. कारण बहुतेक स्वयंसेवी कामगार गटात अडीच लाखापेक्षा कमीच वेतन असायचं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी कुटूंबातील एकुण उत्पन्न मोजलं तर ते अडीच लाखापेक्षा जास्तच येत होतं.
सहावा निकष होता, मी सरकारच्या इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी बऱ्याच कुटूंबातील लोकांनी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतलेला आढळून येत होता. ज्यात एकाच व्यक्तीला संजय गांधी योजनेचेही पैसे मिळाले व त्याच व्यक्तीला लाडक्या बहिण योजनेचेही पैसे मिळाले होते. हे असे का झाले? याचं उत्तर होतं, राजकारणात आपली पकड निर्माण करुन निवडून येणं. जर या गोष्टीला आधीच विरोध झाला असता तर ही गोष्ट कदाचीत शक्यच झाली नसती.
सातवा निकष होता, तो म्हणजे कुटूंबातील एकच महिला अविवाहीत असल्यास तीच लाभार्थी ठरु शकेल. ज्यात वयोमर्यादा होती एकवीस वर्ष पुर्ण झालेली महिला. परंतु यामध्येही भ्रष्टाचार घडला. एकाच कुटूंबातील अनेक अविवाहीत महिलांनी लाडल्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेतला.
आठवा निकष होता, ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहने नसणे. परंतु यामध्येही भ्रष्टाचार घडला. बऱ्याच चारचाकी वाहन धारकांनी याचा लाभ घेतला. होईल चौकशी तेव्हा पाहून घेवू असं मनात ठरवून. खरं तर चारचाकी वाहन हे निकष असण्यापेक्षा दोनचाकी वाहन धारकांनाच लाडकी बहिण योजना मिळायला नको होती. कारण अलिकडील काळात ज्यांच्याजवळ दोनचाकी वाहनं होती, ते आजच्या घडीला गर्भश्रीमंत होते. शिवाय अडीच लाख किंवा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर दोनचाकी गाडीवाल्यांचं घर चालूच शकत नव्हतं. एवढा दोन चाकी वाहन वापरतांना खर्च येत होता.
नववा निकष होता, वॉशिंग मशीन, फ्रीज, टिव्ही असू नये. परंतु ही देखील अट लोकांनी पाळली नाही व लोकांच्या घरी वरील सर्व गोष्टी असूनही योजनेचा लाभ त्यांना मिळाला होता.
दहावा निकष होता, की लाडक्या बहिण योजनेचा फॉम भरणाऱ्या व्यक्तीच्या कुटूंबात गतकाळात वा विद्यमान काळात कुणीही खासदार, आमदार नसावा. तसेच कोणताही जिल्हापरिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी नसावा. हा निकष सर्वांनीच पाळला होता.
वरील सर्व निकष हे लाडल्या बहिण योजनेत होते व जेव्हाचं तेव्हा पाहू, या शिर्षकाअंतर्गत जे निकषात बसत नव्हते, त्यांनीही फॉम भरला होता व दाखवलं होतं की लाडक्या बहिण योजनेची जणू गरज त्यांनाच आहे. अन् सरकारनंही निवडून येता यावं. म्हणून सरसकट योजना दिली होती, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच. परंतु यात महत्वपुर्ण भाग असा घडला होता की यामध्ये केवळ वीस प्रतिशत लोकंच असे असतील की जे खरे लाभार्थी होते व त्यापैकी बऱ्याच जणांना लाभही मिळाला नसेल. बाकी सगळ्यांनीच या योजनेचा अपहार केलेला असेल हे प्रत्यक्ष पडताळणीवरुन दिसून येणार होतं. परंतु पडताळणी झालीच नाही. कारण ती योजना सरकारनं सपशेल निवडणुकीत निवडून येण्यासाठीच वापरली होती. असे जनता म्हणत होती.
ही शुद्ध फसवणूक आहे, सरकारनं नाही तर जनतेनं सरकारच्या माध्यमातून जनतेचीच केलेली. जनतेपैकी काहींनीच आपलं काय जातं असा विचार करीत देशाच्या विकासासाठी कामात येणारा व त्यासाठीच कर भरणाऱ्या बऱ्याच लोकांचा पैसा हा प्रत्यक्षात लाडक्या बहिण योजनेतून आपल्या घशात टाकला असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. विशेष सांगायचं म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहिण योजना आली होती. त्या योजनेत वरील दहा निकषाव्यतिरीक्त आणखी दोनतीन निकष असायला हवे होते. पहिला निकष म्हणजे घरात मुलं किती आहेत. एक असेल तर लाभ आणि दोन असेल तर सरकारवर ओझं म्हणून लाभच द्यायला नको होता. दुसरा निकष इमारत, ती कशी आहे? विटांनी बांधलेली असेल तर लाभ द्यायला नको होता. तिसरा भाग म्हणजे वाहन. सायकल असेल तर लाभ आणि दोनचाकी वाहन असेल तर लाभच द्यायला नको होता. चवथा निकष म्हणजे अडीच लक्ष उत्पन्नाची अट घालण्याऐवजी फक्त एक लक्ष वीस हजार रुपयाची अट टाकायला हवी होती. पाचवा निकष म्हणजे तो व्यक्ती रेशननुसार लाभ घेणारा जरी असला तरी त्याच्या घरच्या वस्तूस्थितीची प्रत्यक्ष पडताळणी ही त्याच्या घरी जावूनच करायला हवी होती. शिवाय तसं आढळून आल्यास ताबडतोब रेशनकार्ड रद्द करुन वसूली करायला हवी होती. परंतु तसं काहीच घडलं नाही. उलट या योजनेचे फॉम माजी नगर नेत्यांच्या घरी एकाच ठिकाणी बसून भरण्यात आले. ज्यात बरेचसे कार्यकर्ते जे लाभार्थी जरी नसले तरी लाभार्थी ठरले.
वसीमला वाटत होतं. लाडक्या बहिण योजनेचा लाभ सर्वांनाच मिळावा. ज्यांना खरंच त्या योजनेची गरज आहे. परंतु त्यात हवस्या, नवस्या व गवस्यांनी हात धुतला होता हे नाकारता येत नाही. जर या प्रकरणाची चौकशी केलीच तर जनमत खवळेल व विचार करेल की आम्ही बेकारच या सरकारला निवडून दिलं की जे सरकार आमचीच पोथी उकरुन काढत आहे. म्हणून तेरी भी चूप आणि मेरी भी चूप म्हणत हे प्रकरण थंड बस्त्यात टाकावं. जेणेकरुन सरकारचा यात दोष नसला तरी सरकार विनाकारण बदनाम होवू शकेल. जर ते प्रकरण उकरुन काढलं तर पितळ नक्कीच उघडंही पडू शकते आणि कदाचीत तसा अपहार झालाच नसेल तर सरकारवरचा विश्वास अधिक दृढ होवू शकतो. परिणाम पाहिल्यास दोन्ही स्वरुपाचे परिणाम निघू शकतात व वादंग निर्माण होवू शकतात. त्यापेक्षा ते प्रकरण तूर्तास बंद करुन त्यात नवीन बदलाव करुन वरील स्वरुपाचे नवीन पाच निकष घालून द्यावे. शिवाय चौकशी करुनच अतिशय इमानदारीनं पारदर्शक पद्धतीनं या योजनेचा लाभ द्यावा. जेणेकरुन सर्वांना लाभ मिळेल व जनतेच्या पैशाचाही अपहार होणार नाही. तो पैसा कुठंतरी सार्थक लागेल.
************************************************
विनोद...... विनोदाबद्दल बऱ्याचशा लेखकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तसे विनोदाचे अनेक प्रकारही सांगीतले आहेत. तसं पाहिल्यास आचार्य अत्रेंनी विनोदाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे.
विनोद हा सर्वश्रुत आहे व विनोद हा सर्वश्रेष्ठही आहे. विनोद आहे म्हणून माणसाला आनंदमयी जगता येतं. जीवन हे कंटाळवाणं वाटत नाही. एक प्रकारचा विरंगुळा विनोदामुळं निर्माण होतो.
विनोदाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास ज्याला विनोद आवडतो, त्याच्याशीच विनोद करायला हवा. ज्याला विनोद आवडत नाही. त्याच्याशी चुकूनही विनोद करु नये.
विनोदाबद्दल सांगायचं झाल्यास काही लोकं हे विनोदाला प्राधान्य देत असतात. ते विनोद करतात. कारण विनोदात आपल्याला आनंद मिळवून देण्याची तेवढी बरीच शक्ती असते. परंतु हे जरी खरं असलं तरी विनोदाच्या या प्रवासात काही काही लोकं हे विचित्र वागत असतात. ते विनोद करतात. परंतु इतरांनी त्याच्यासोबत केलेला विनोद त्यांना आवडत नाही. याबाबतीत एक प्रसंग आहे. एका महिलेनं दुसर्या महिलेची मस्करी करीत तिला चिडवलं, अर्थात विनोद केला, स्वतःला आनंद मिळावा म्हणून. त्यानंतर ज्या महिलेशी तिनं विनोद केला. ती महिलाही तिच्याशी विनोदाच्याच भाषेत बोलली. परंतु त्याचं तिला फार वाईट वाटलं व ती म्हणाली की मी तुमच्याशी गंमत केली होती. त्यावर उत्तर देत ती महिला म्हणाली की मिही तुमच्याशी गंमतच केली. परंतु त्यात संभ्रम निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर वादात झालं. प्रसंग होता, एका महिलेचं घर की तिचं दुसर्या ठिकाणी आणखी एक घर असल्यानं ती महिला त्या घरात राहात नव्हती. ती सायंकाळी आपल्या घरी आली. ते पाहून एक महिला मस्करी करीत म्हणाली,
"तुम्हाला वेळ काळ काही राहात नाही काय? केव्हाही इकडे येता आणि केव्हाही जाता."
ते त्या महिलेचं बोलणं. त्यावर दुसरी महिला उत्तर देत म्हणाली,
"मी काही तुमच्या घरी आले नाही."
त्यावर पहिली महिला म्हणाली,
"मी तुमच्याशी हुज्जत करीत नाही. तुम्ही उलट बोलत आहात. अशानं तुमच्याशी कोण बोलेल."
त्यावर दुसरी म्हणाली,
"मी काही निमंत्रण दिलं नाही बोलायचं."
ते त्यांचे शब्द. शब्दानं शब्द वाढत गेले व वाद निर्माण होवू लागला.
विनोद अवश्य करावा. परंतु जो विनोद करीत असेल, त्यानं ज्यांच्याबाबतीत बोलतांना तो विनोद करीत आहे. त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाच्या प्रतिक्रिया आल्यास त्या पचविण्याची ताकद असावी. तरच विनोद करावा. अन्यथा विनोदच करु नये. कारण ज्यांचा आपण विनोद करीत असतो. त्या व्यक्तीचा प्रत्येकवेळेस मुड काय असतो. हे आपण जाणत नाही. अन् अशानं मग अकल्पीत आंतरक्रिया घडून येतात ज्याची परियंती वादात होते. मग विनोदावरुनच चक्कं भांडणं होतात.
विनोद हा स्वाभाविक विनोद असतो. तो अगदी सहज होवून जातो कधीकधी. कधी विनोदात काही डावपेचही असतात. जसे एखाद्या व्यक्तीची कुरापत काढायची असेल तर विनोदाचा आधार घेतला जातो. ज्याला हाशा हाशा दात पाडणे म्हणतात. यात शब्द तर लागणार नाहीत. परंतु बोलले जाईल व अपमान करता येईल. असा बेबनाव असतो. आजकाल असे प्रकार जास्त चालतातच. ज्यातून कधीकधी महाभयंकर राग जन्म घेत असतो. विशेष म्हणजे विनोद हा स्वाभाविक असतो व तो अगदी सहज घडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी विनोद हा वेळ काळ पाहून करावा. तसाच विनोद हा प्रसंग पाहून करावा. जर एखादा व्यक्ती मरण पावला असेल आणि त्या ठिकाणी आपण विनोद करीत म्हटले की बरं झाला तो व्यक्ती मरण पावला तर...... तर त्यावेळेस कुटूंबियांना राग येणे स्वाभाविक आहे. त्या ठिकाणी विनोदाचं रुपांतरण मारपीटीतही होवू शकते. मग मयत राहिली जागच्या जाग्यावर. कधीकधी एखाद्याच्या मनाची अवस्था जर बरोबर नसेल तर विनोद हा त्याच्या मनातून तिरस्कार बाहेर पाडणारा ठरु शकतो. जरी विनोद हा आनंद निर्माण करणारा, जीवनाला कंटाळवाणं न करणारा असेल तरीही.
विनोद करावा. कारण विनोदाशिवाय जगणं कठीणच आहे म्हणून. विनोद खरंच मनाला शांती प्रदान करीत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की विनोदानं कोणाचं मन दुखावेल. जर आपण केलेल्या त्या विनोदातून कुणाचं मन जर दुखत असेल तर असा विनोद करु नये. कारण विनोद जसा आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. तसाच तो दुःखात लोटवणाराही क्षण आहे. यात शंका नाही.
राजकारणही विनोदानंच भरलेले आहे. राजकारणातही लोकं विनोदानं कोणाला काहीही म्हणत असतात. ते काळ, वेळ व कोणाचा राग पाहात नाहीत. ना ते कायद्याला घाबरत असतात. राजकीय नेते काहीही बोलतात. ज्यातून राजकीय वाद निर्माण होत असतात. वसीम राजकारणात होता व तो कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. त्याचं प्रेम होतं एका मुलीवर. जी शाळेत शिकत होती. लहानपणापासून वसीम राजकारणात होता तर रक्षा ही राजकारणात नव्हती. मात्र वसीम शाळेत करीत असलेले भाषण रक्षाला आवडत होतं. त्यामुळंच ती वसीमच्या प्रेमात पडली होती.
ती एक शाळा व त्या शाळेची ती एक मुलगी. तिचंच नाव रक्षा. शाळेत फारच हुशार होती ती. कुणाशीही बोलायची. जास्त मस्ती करायची. तशी ती शिक्षकांचं ऐकतच नव्हती मस्ती करतांना.
मुकेश नावाचा एक शिक्षक. त्या शाळेत नुकताच लागला होता. ते त्याचं त्या शाळेतील पहिलंच वर्ष होतं. मुकेश शाळेत आला व त्याला त्या शाळेत दोनचार महिने झाले होते. तसं पाहिल्यास वर्ग फारच दंगामस्ती करीत होता. त्यातच ती मुलगीही. ती मुलगी जास्तच दंगामस्ती करतेय हे मुकेशनं जाणून घेतलं होतं. तशी दिवाळी उलटली.
दिवाळी झाली व दिवाळीच्या सुट्ट्यानंतर पुन्हा शाळा भरली. शाळेत सर्वजण आले होते व तिही एक मुलगी आली होती. मुकेशनं दिवाळीच्या सुट्ट्यानंतर सर्वांना प्रश्न विचारले. त्याचबरोबर रक्षालाही प्रश्न विचारले. परंतु दिवाळीनंतरच्या कालखंडानंतर जास्त मस्ती करणाऱ्या रक्षानं मुकेशच्या प्रश्नाला दाद दिली नाही. त्यातच त्याला वाटलं की कदाचीत रक्षा आजारी असेल की ती बोलत नसावी. तशी ती दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजारीच वाटत होती.
मुकेशनं ती जास्तच दंगामस्ती करतेय, म्हणून तिच्याशी बोलणं टाळलं होतं आणि इतर गोष्टी वर्गात तो शिकवायला लागला होता.
मुकेश जो वर्ग शिकवायचा, तो पाचवीचा वर्ग होता व त्या वर्गात तासिकेनुसार वर्गात शिकविण्याची पद्धत होती. तसा जास्त वेळ मुकेशला मिळायचाच नाही. त्यातच मिळालेल्या फावल्या वेळेत तो कधीकधी विद्यार्थ्यांचं मनोरंजनही करायचा. त्यातच त्याला वाटायचं की मुलं ही आपल्याच स्वलेकरासारखी आहेत. जसं आपल्याला आपली मुलं शिकली पाहिजेत. ती डॉक्टर, इंजीनियर बनली पाहिजेत, असं वाटतं. तसेच डॉक्टर, इंजीनियर शाळेतील मुलांनाही बनवता आलं तर आपल्या जीवनाचं अगदी सार्थक झालं. त्याच दृष्टीनं व हेतूनं तो शाळेत शिकवू लागला होता.
दिवाळी झाली होती, त्या गोष्टीला दोन तीन महिने उलटून गेले होते. जास्त अभ्यास करणारी व तेवढीच दंगामस्ती करणारी रक्षा आज अभ्यासातही थोडीशी मागेच पडली होती. त्यातच ती आता जास्त दंगामस्ती करीत नव्हती. त्याचं निरीक्षण मुकेश करु लागला होता.
तो वर्ग. त्या वर्गात तासिकेनुसार शिकविण्याची पद्धत असल्यानं बाकीचे शिक्षक येत व ते त्या वर्गाला शिकवीत. शिकवण्यापेक्षा फक्त बडबड करीत व निघून जात. ते जास्त विद्यार्थ्यांशी जवळीक साधत नसत. त्यांचं सुखदुःख कधीच विचारत नसत. तसं पाहिल्यास त्यांना विद्यार्थ्यांच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना वाटत होतं की वेतन मिळतं ना. मग कसंही का असेना. शिकवायचं कर्तव्य असल्यानं फक्त शिकवायचं. तसाच विचार करुन ते शिकवीत होते. त्यातच त्या सर्व शिक्षकांच्या वर्गातील मुलं हे अतिशय शांत राहात असत आणि मुकेशच्या वर्गातील मुलं सारखा गोंधळ करीत असायचे. तसं मुकेशचं शिकवणं वेगळंच होतं. तो विद्यार्थ्यांशी जवळीक तर साधायचाच. व्यतिरीक्त तो त्याच्या भावनाही समजून घ्यायचा.
मुकेश तसं पाहता सर्वच विद्यार्थ्यांची गंमत करायचा. त्यातच तो रक्षाचीही गंमत करायचा. तशी रक्षा दिवाळी होईपर्यंत बोलत होती व मुकेशच्या गंमतीदार प्रश्नांची उत्तरंही देत होती. मात्र आज दिवाळीनंतर ती काही बोलत नाही व आपल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही याचं निरीक्षण मुकेश करीत होता. तसा त्याला विचार आला. विचार होता की जी मुलगी दिवाळीनंतर बोलायची. ती का बोलत नसावी.
तोच तो त्याचा विचार. मग कारणाचा शोध घेणे सुरु झाले. त्यानं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना विचारलं. परंतु कोणीच काही सांगत नव्हतं. अन् कारणही माहित होतं नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. हं, तिचं वय जर जास्त असतं तर वेगळंच कारण काढता आलं असतं. परंतु ते बालवयच होतं. त्यामुळंच या ठिकाणी तरुणपणाचं कारण नव्हतंच. अन् जे काही घडत असतं विद्यार्थ्यांच्या जीवनात. त्या सर्वच गोष्टी मित्रांना किंवा शाळेत माहित असतातच. परंतु रक्षाच्या गोष्टी शाळेतही माहित नसणं म्हणजे तालेवरची कसरतच होती. परंतु तोही मुकेश होता.
मुकेशनं ती नसतांना वर्गात सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसंच सामुहिक विचारुन पाहिलं. परंतु कारण काहीच मिळालं नाही. तेव्हा त्यानं ठरवलं की तो तिला वैयक्तिक विचारेल. तशी संधी येत नव्हतीच. कारण अलिकडील बदलत्या काळानुसार मुलींशी एकटं बोलणं तो टाळायचाच. परंतु त्याला कारण जाणून घेणं भाग होतं. त्यामुळंच एक दिवस संधी मिळताच त्यानं तिला वैयक्तिक विचारलं,
"रक्षा, मी बरेच दिवसापासून पाहतोय की तू आता मस्ती करीत नाही. शिवाय अभ्यासातही तू मागे पडलेली आहेस. काय कारण आहे. जरा सांगशील काय? मला कारण कळू शकेल काय?"
रक्षासमोर त्या शिक्षकांनी फेकलेला प्रश्न. परंतु ती त्यावर वैयक्तीक पातळीवरही काहीच प्रतिसाद देवू शकत नव्हती. अन् कारणही समजलं नाही. तसं पाहता मला त्रास होतोय सर. असं म्हणत ती तेथूनही उत्तर न देता निघून गेली. तसं त्यानं तिला वैयक्तीकपणे समजून घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु तिच्या टाळाटाळीनं ते शक्य झालं नाही.
एक दिवस मुकेशनं ठरवलं की तिच्या घरी तो जाणार. कशासाठी तर कारणच शोधण्यासाठी. तसं त्यानं तिला सांगीतलं देखील. त्यावर ती म्हणाली,
"सर, आपण आलात तर स्वागतच आहे. परंतु माझ्या घरी माझ्याबद्धल काहीच विचारु नका. नाही तर मी माझ्याच जीवाला काहीही बरंवाईट करुन टाकेल."
ते तिचं वय. ते बालवयच. परंतु त्याच वयात तिच्या तोंडून ते शहाण्यासारखे शब्द. तिचं मी माझ्या जीवाला काही करुन टाकेल म्हणणं. तिला तसं बोलणं कसं सुचलं असेल. मुकेश विचार करु लागला. कारण त्या गोष्टी त्याला आश्चर्यात टाकणाऱ्या होत्या. तसं पाहिल्यास मुकेशच्या जागी दुसरा शिक्षक असता तर त्यानं ते कारण जाणून घेण्याचा नादच सोडला असता. विचार केला असता की ज्या मुलीनं स्वतःच्या जीवाला काहीही करुन टाकेल ही धमकी दिली. ती मुलगी आपल्यासाठी धोकादायक बाब आहे. त्यानं तिचा नादच सोडला असता. तिच्या मागे लागून कारण शोधणे म्हणजे आपल्यावर संकटच ओढवून घेणारी गोष्ट होती.
मुकेशला काय करावं सुचत नव्हतं. अशातच जे काही होईल ते पाहून घेवू असा विचार करुन तो तिच्या घरी गेला. तशी ती आज दोनतीन दिवस झाले होते. शाळेत आली नव्हती. तेच शोधण्यासाठी तो तिच्या घरी गेला. त्या दिवशी ती घरी नव्हतीच. ती गावाला गेली होती. शिवाय तिच्या घरी तिचे काका काकू होते. ते चौकशीअंती त्याला समजलेलं होतं व भिंतीवर दोन फोटो लटकल्या होत्या. ज्याला हार घातलेला होता.
मुकेशनं त्या फोटोकडे पाहिलं व विचार केला. विचार केला की हे गृहस्थ कोण असावेत की जे फोटोत लटकले आहेत. परंतु आपल्याला काय वायफळ चौकश्या. असा विचार करुन त्यानं ती गोष्ट तिथंच सोडून दिली. त्यानंतर तो परत आला. ती गावाला गेल्याचं माहीत झालं होतं.
आज पंधरा दिवस झाले होते. रक्षा अद्यापही शाळेत आली नव्हती. मुकेश तसं पाहिल्यास तिचा वर्गशिक्षक होता. त्याला तिच्याबद्दल चिंता पडली होती. कारण पुर्वी ती कधीच शाळेत बुट्टी मारत नव्हती. अन् आज ती चक्कं पंधरा दिवस सुट्टीवर. अन् आज ती पंधरा दिवसानंतर शाळेत आली होती. शाळेत आल्यावर तिचा हात मोडला असल्याचं कळलं व ती त्याच कारणानं कदाचीत गावाला गेली असेल असंही मुकेशला वाटलं. तसा आज त्यानं तिच्या गप्प राहण्याच्या कारणाचा शोध घेणं बंदच केलं होतं.
तसा तो दिवस. आज रक्षा शाळेत आली होती. अन् दुपारच्याला तिचे काका शाळेत येवून गेले. त्याला तिच्या हात मोडण्याचं कारण सांगायचं होतं कदाचीत. म्हणूनच ते शाळेत आले होते. तो दिवस आज उजळला होता व आज ते व्यक्तीशः सरांकडे येवून गेले. ते तिचेच सख्खा काका होते. त्यांनी मुकेशला म्हटलं की त्यांना त्याचेशी वैयक्तिक बोलायचं आहे. त्यांना रक्षाबद्दल काहीतरी सांगायचं आहे.
मुकेशनं होकार दिला व तो रक्षाच्या काकाशी बोलता झाला. त्यानंतर संवाद सुरु झाले व संवादानुसार कळलं की रक्षाचे आईवडील दिवाळीत देवाघरी निघून गेले आहेत व ती बाब त्यांनी लपवून ठेवलेली आहे. परंतु आता लपवणं शक्य नाही. कारण त्यांची पत्नी. ती तिला फारच मारत असते. तिला सारखे काम सांगत असते. तिला अभ्यासही नीट करु देत नाही. मात्र तिच्या काकाला तिला फार शिकवायचे आहे. परंतु त्याचं त्याच्या पत्नीसमोर काहीही चालत नाही. काय करावे? विचार आहे. कदाचीत वसतीगृहाचा मार्ग बरा राहिला असता. परंतु तिथं ती तिचं नाव टाकूच देणार नाही. कारण तिला निःशुल्क मोलकरीण मिळालेली आहे. मात्र रक्षा ही त्याच्याच भावाची मुलगी असल्यानं त्यांना तसं बघणं बघवत नाही. काय करावं यावर शिक्षकानंच उपाय सुचवावा. ते सांगत होते की ते जेव्हापर्यंत घरी असतात. तेव्हापर्यंत ती बरी असते आणि ते जेव्हा कामानिमित्त घराच्या बाहेर पडतात. तेव्हा ती बदलते. मात्र रक्षा एक मुलगी असल्यानं ते तिचे वळही पाहू शकत नाहीत व तिचा हातही कदाचीत तिनंच मोडलेला असेल हे नाकारता येत नाही. त्यांना मात्र त्याचं दुःख होतंय व त्यांना रक्षाची सुरक्षा हवी आहे. कधीकधी हीच बाब त्यांना शेजाऱ्यांकडून कळते. परंतु ती त्यांची पत्नी असल्यानं ते बोलू शकत नाहीत.
ती रक्षा व तिचा तो विचित्र प्रश्न. ती हुशारच होती. ती शिकूही पाहात होती. अन् तिच्या हुशारीत तिची काकू बाधा बनली होती. मात्र तिचे काका तिला शिकवू पाहात होते. मुकेशसमोर प्रश्न होता. काय करावं सुचत नव्हतं. कदाचीत वसतीगृहाचा मार्ग होता. परंतु तिथंही ती शिकणार नाही. तिचं मन रमणार नाही. जे तिच्या काकाच्या मनात आहे. ते तिच्या काकाचं स्वप्न त्यांना साकार करता येणार नाही.
मुकेश विचार करु लागला. तोच त्याला एक मार्ग सापडला. जर ही मुलगी आपणच दत्तक घेतली तर...... विचारांचा अवकाश. मुकेशनं तसा प्रश्न तिच्या काकाला केला. सुरुवातीला काकानं आढेवेढे घेतले व त्यानंतर ते तयार झाले. पुढं त्यांनी त्यांच्या पत्नीलाही रितसर समजावलं व त्यांची पत्नीही तिला दत्तक देण्याविषयी मानली. ज्यात तिच्या काकानं पत्नीला समजावत सांगीतलं की तिची जबाबदारी फार मोठी आहे. दिवसेंदिवस ती जसजशी मोठी होईल. तसतसा तिच्या खर्चातही वाढच होईल. त्यानंतर तिचं लग्न, हातपाय, वैगेरेचा खर्च होईल.
रक्षाचे काका आपल्या पत्नीशी बोलत होते. परंतु त्यात त्यांची चाल होती. चाल हीच की आपली पुतणी शिकायला हवी. ती आपल्या भावाची एकमेव निशाणी आहे.
ठरल्याप्रमाणे मुकेशनं कायद्यानुसार रितसर लिहून घेवून कायद्याची प्रक्रिया पुर्ण केली. त्यातच त्यानं रक्षाला दत्तक घेतलं. तिला चांगलं शिकवलं. त्यासाठी त्यानं स्वतःची मुलं होवू दिली नाही. अन् रक्षानंही तीच इभ्रत राखली. आज रक्षा कलेक्टर झाली होती. आज तिचं कलेक्टर होणं कुठंतरी तिच्या काकाचाच परिपाक होता. जर तिच्या काकानं तिला दत्तक दिलं नसतं. तर त्याचं स्वप्न साकारही झालं नसतं.
आज रक्षा कलेक्टर होती व ती मुकेशलाच आपले वडील मानत होती. ती आता काकाच्याही घरी जात असे. ज्या काकानं तिचं भविष्य बनवलं आहे. ती आताही तिचं लहानपण व लहानपणात घडलेल्या गोष्टी विसरलेली नव्हती.
************************************************
ते गाव अगदी शांत होतं. त्या गावात कुणाची कोणतीच भांडणं नव्हती. ना कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव गावात होता. गावातील सर्व लोकं गावात अगदी गुण्यागोविंदानं राहात होते. अशातच गावाला कोणाची दृष्ट लागली की गावाचा ताल बिघडला व गाव अख्खं बदलून गेलं होतं.
वसीम एक कार्यकर्ता होता गावात सतत राबणारा. त्याला राजकारणात अति उत्साह होता. तसंच राजकारण त्याला आवडत होतं. त्यालाही कधीकधी निवडणुकीत उभं राहण्याची इच्छा होत असे. परंतु ना त्याला तिकीट मिळत होती, ना त्याचेजवळ निवडणुकीत उभे राहायला पैसा होता. कारण तो जरी राजकारणात असला तरी दारिद्रयानं त्याला अगदी पिंजून टाकलं होतं.
वसीमला आठवत होतं त्याचं बालपण. बालपणातील ते त्याच्या जीवनातील मनोरम्य दिवस. तो लहानच होता, तेव्हा इतर मुलांसारखा तोही खेळ खेळायचा. परंतु इतर मुलं बाहुल्याबाहुल्यांचा विवाहसोहळा खेळायचे. त्यातच ते खेळायचे गावच्या मातीत रुळलेल्या गोष्टी. ज्यात असायचा शेतीचा गंध. तसं पाहिल्यास शेती हा त्या गावच्या शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीची मशागत करणे व त्याचबरोबर शेतीची कामं करणे यात ते धन्यता मानत असत. त्याच गोष्टी त्यांच्या मुलांच्या वागण्यात आल्या होत्या आणि त्याच गोष्टीचे खेळही त्यांची मुलं खेळायची बालपणातच.
ती मुलं लहानपणी एक टिनाची बैलगाडी बनवायचे. त्यासाठी त्या काळातील पॉंन्डस पावडरच्या टिनाच्या डब्यापासून बैलगाडी बनवायचे. त्या बैलगाडीला चाकं लावायचे. त्यानंतर त्या बैलगाडीला लाकडी काड्या जसे बैल बैलगाडीला जुंपतात, तसे लावायचे. त्यानंतर त्या बैलगाडीत शेतातील निघालेला माल भरायचे व ती बैलगाडी समोरुन ओढत आम्हीही शेतकऱ्यांची मुलं आहोत. असा जणू भाष लोकांना दाखवायचे. मात्र वसीम हा त्यातील नव्हता. तो गरीब होता. परंतु तो असले शेतीचे खेळ खेळत नव्हता. तर तो नेतेगिरीचे खेळ खेळत असायचा लहानपणी.
वसीम लहान असतांना काही मित्र गोळा करायचा. त्यांना खाली बसवायचा व त्यांना स्वतः त्यांच्या पुढ्यात उभे राहून दोन चार गोष्टी सांगायचा. ज्या गोष्टीवरुन वाटत होतं की हा मुलगा पुढे काहीतरी नक्कीच बनेल व मायबापाचं नाव उज्ज्वल करेल.
ते श्रीरामपूर गाव व त्या गावात वसीमचं वास्तव्य. तो लहानाचा मोठा होत असतांना गावात मिळत असलेले अनुभव. ते अनुभव वाखाणण्याजोगेच होते.
गाव तसं चांगलंच होतं व त्या गावात कोणतंच राजकारण नव्हतं. त्या गावात हिंदू मुस्लीम दोन्ही समुदायाचे लोकं राहात होते व त्या दोन्ही समुदायाचं आपापसात पटतही होतं. कारण त्या दोन्ही समुदायाचे आपापसात ऋणानुबंध होते. मात्र हिंदूचे कट्टर शत्रू मुस्लीम आहेत. असा अपप्रचार वरच्या स्तरावरुन देशात चालत असायचा. तोच प्रचार निवडणुकीतही अगदी दिसून यायचा. मात्र गाव त्या अपप्रचाराला भीक घालत नसे.
गावात हिंदू मुस्लीम असा धर्मावरुन भेदभाव नव्हता. ना ही कोणी स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करीत असत. ना ही कोणी गरीब श्रीमंत असा भेदभाव करत होते. ना आतापर्यंत गावात कधी कोणाचं किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं. गावात एकोपा होता व गावचे सगळे लोकं एकमेकांना मदत करीत. ते एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होत. त्यातच ते एकमेकांच्या विवाहातही आवर्जून हजर राहात असत. शिवाय त्यांची घरे एकमेकांना लागून असायची आणि शेतीही एकमेकांना लागूनच असायची.
एकमेकांचं खानपान व एकमेकांची मैत्री घनदाट होती. गावात ना कोणी एखादा गावातील मुस्लीम गृहस्थ हिंदूंचा वैरी होता. ना कोणी हिंदू गृहस्थ मुस्लिमांचा वैरी होता. ते एकमेकांना अगदी संकटातही मदत करीत असत.
गावात एक हनुमानाचंही मंदीर होतं. त्या मंदीरात दरवर्षी काल्याचा कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमात मुस्लीम बांधव आवर्जून येत असत व हनुमानाला कपडेही अगदी आनंदानं शिवून आणत असत. तेच कपडे हनुमानाला चढवून त्याच्या प्रतिमेची गावात मिरवणूक काढली जाई. तो कार्यक्रम दहा दिवस चालायचा व दहाही दिवस मुस्लीम बांधव त्या उत्सवात सहभागी व्हायचे. ते अगदी हिंदूच असल्यासारखे हिंदूंच्या उत्सवात सहभागी होतांना वर्तन करायचे.
गावात एक मशिदही होती. त्या मशिदीतही रमजानच्या काळात वेगवेगळे रंगारंग कार्यक्रम चालायचे. ज्यात हिंदू लोकंही सहभागी होत. त्यातच ज्याप्रमाणे हिंदूच्या हनुमानाची मुस्लीम लोकं स्वहस्ते पुजाअर्चना करीत. तसेच हिंदूही त्यांच्या मशिदीत जात असत व नमाज पठन करीत असत. तसं पाहिल्यास हे सर्व करतांना त्या गावातील हिंदू मुस्लीम सर्वांनाच अगदी आनंद वाटायचा. कधीकधी तर श्रावणातील सव्वा महिन्याचे उपवासही मुस्लीम समुदाय हिंदूंसोबत ठेवत असत आणि रमजानचे रोजेही कधीकधी हिंदू समुदाय ठेवत असत. मात्र याला कुणाची दृष्ट लागली तेच कळलं नाही.
गावात विवाहसोहळे साजरे व्हायचे. हिंदूंच्या विवाहसोहळ्यात मुस्लीम समुदाय जातीनं हजर राहात असे आणि मुस्लिमांच्या विवाहसोहळ्यात हिंदू लोकं जातीनं हजर राहात असत. गाव हिंदू मुस्लीम भेदभावात अंतरानं विभागलं गेलं नव्हतं. अशातच एक ठिणगी पडली. बटेंगे तो कटेंगे.
बटेंगे तो कटेंगे. हा हिंदू समुदायानं हिंदूंसाठी नारा लावला होता. वरच्या स्तरावरुन हेच सांगण्यात येत होतं की मुस्लीम हे आपले नाहीत व ते कधीही आपले होवू शकणार नाहीत. सध्या त्यांची संख्या कमी आहे व ज्यावेळेस त्यांची संख्या वाढेल, ते आपल्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय सोडणार नाहीत. त्यातच मुस्लीम लोकंही काही कमजोर नव्हते. तेही वरच्या स्तरावरुन बटेंगे तो कटेंगे याच धोरणाला अनुसरुन आपल्याच मुस्लीम बांधवांच्या सुरक्षेचे पैलू सांगत होते. तेही हिंदूंपासून सावध राहायला सांगत होते. परंतु ह्या घडामोडी जरी वरच्या स्तरावर होत असल्या तरी त्याचा गावावर पाहिजे त्या प्रमाणात परिणाम झाला नव्हता. तरीही काही काही लोकांनी गावात आलेल्या त्याच वणव्याचा धसका घेतला होता व तीच मंडळी त्या गोष्टीपासून अगदी फटकून वागू लागली होती.
************************************************
देशात निवडणूक आली होती. तशी निवडणूक गावातही राबवली जात होती आणि त्याच निवडणूकीतून लोकांना मतदानात विभागण्यासाठी राजकीय पार्ट्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देवून हिंदू मुस्लीम एकतेला छेद दिला होता.
निवडणूक....... निवडणूक म्हटली तर मतदारांना आकर्षित करणं आलंच. त्यासाठी जनतेला प्रलोभन देणं आलंच. काल जनतेला असं प्रलोभन दारु आणि पैशाच्या स्वरुपात दिलं जायचं. काही ठिकाणी साड्यांचंही वाटप चालायचं. जेवनावळ चालायची. ज्यात कोंबड्या बकऱ्यांचं जेवन असायचं. आज असं प्रलोभन मुख्यमंत्री सहायता योजना म्हणून देणं वा लाडली बहिण योजना म्हणून देणं. लोकांना बटेंगे तो कटेंगे म्हणत हिंदू मुस्लीममध्ये विभागणी करणं, या गोष्टी आता निवडणुकीत आल्या होत्या. याला काही लोकं गैर तर काही लोकं रास्त योजना समजत. काही लोकं त्या योजनेला प्रलोभन समजत तर काही लोकं त्या योजनेला मदत समजत. वसीम याबाबतीत विचार करीत होता. 'आज प्रलोभनाच्या दृष्टीनं या योजनेचा विचार केल्यास जर आजच्या काळात जनतेला प्रलोभन दिलं नाही तर जनता मतदान तरी करेल काय? हा विचार आहे एकप्रकारचा. तसं पाहिल्यास आजच्या काळात जनता हुशार झाली आहे. काही लोकं नक्कीच जो पक्ष विकास करु शकतो. त्यांनाच मतदान करतात. त्यावेळेस लोकं अमूक व्यक्ती याचा वा अमूक व्यक्ती त्याचा असा विचारच करीत नाहीत. ते फक्त मतदान करतात. त्यामुळं सरकारनं कितीही लाडकी बहिण योजना राबवली, तरी त्याचा परिणाम निवडणूकीत मतदान करण्यावर होणार नाही. तेच मागील बऱ्याच निवडणूकीतून अनुभवायला मिळालंय. गत सरकारनं बरेचदा निवडणूकीच्या ऐन तोंडावर कर्जमाफी दिल्या होत्या. परंतु त्यानं जनतेवर वा मतदानावर काहीच फरक पडला नव्हता. सरकारबद्धल सांगायचं झाल्यास सरकारनं जर चांगली कामं केली असतील तर जनता त्यांना मतदान करेल व निवडणूकीत निवडूनही आणेल आणि जर सरकारनं चांगली कामं केली नसतील तर ही जनताच त्यांना धडा शिकवेल. कारण ही जनता आहे. कधीकधी ती जनता प्रलोभनाला बळी पडत नाही व इतरांनाही मतदान करुन निवडून आणत असते. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही काही लोकं प्रलोभनाला बळी पडतात व मतदान करीत असतात. हेही तेवढंच खरं. हेच दिसेल आपल्याला आगामी निवडणुकीत. परंतु त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं मतदान करावं म्हणजे झालं.
ते गाव व त्या गावात विधानसभेची निवडणूक होवू घातलेली होती. तसं पाहिल्यास ही निवडणूक मागील एका दिवाळीसारखीच याहीवेळी दिवाळीतच आलेली होती. ती निवडणूक कोणाचा दिवाळा काढणार आहे, हे काही सांगता येत नव्हतं. तसंच कोणाला नारळ मिळेल हेही काही सांगता येत नव्हतं. जर विद्यमान सरकारनं चांगली कामं केली असतील तर सरकार निवडून येईल आणि जर सरकारनं चांगली कामं केली नसतील तर विपक्ष निवडून येईल. असं वाटत होतं. हेही निवडणूक झाल्यावरच कळणार होतं. अन् जो उमेदवार निवडणूकीत निवडून आला. त्याच्यासाठी यावेळची निवडणूक दिवाळीच ठरणार होती. आज स्वातंत्र्य आहे व स्वातंत्र्यात प्रत्येकाला निवडणूकीत उभं राहण्याची संधी आहे. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपले उमेदवार निवडणूकीत उभे केलेले आहेत. त्यातच विद्यमान सरकारनं आहेर म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात काही पैसे टाकलेले आहेत. ती दिवाळीची भेट म्हणून एक चांगली योजना राबवली सरकारनं. कारण जे कुटुंब गरीब होतं. त्यांच्या घरी खायला दाणा नसायचा. त्यांना दिवाळी निमित्य का असेना, पैसा मिळाल्यानं त्यांना दिवाळी तर साजरी करता आली. त्यावर बऱ्याच राजकीय पक्षानं वादळ निर्माण केलं.
लाडकी बहिण योजना सरकारनं निवडणूकीच्या पुर्वी आणली होती. निवडणुकीत सरकार वा सत्ताधारी पक्ष निवडून यावा म्हणून. कोणी म्हणत होते की अशा योजना देण्याऐवजी देशात सिलेंडर वाढवले. त्याचे दर कमी करावे. देशातील बेरोजगार लोकांना नोकऱ्या द्याव्यात. देशातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्यावा. वैगेरे साऱ्याच गोष्टी. तर कोणी म्हणत होते की आगामी काळात निवडणूक आहे. त्यासाठी ही लाडकी बहिण योजना आहे.'
वसीम ज्यांनी लाडली बहिण योजना दिली होती. त्याच पार्टीचं प्रतिनिधित्व करीत होता. तसं पाहिल्यास गावातील सर्वजण म्हणत होते वसीमला की त्यानं लाडली बहिण योजना देणाऱ्या पार्टीचं काम करु नये. त्यानं दुसर्या पार्टीचं काम करावं. कारण ती पार्टी देशाचा विकास करीत नाही. उद्योग निर्माण करीत नाही. लोकांना लाडली बहिण योजना देवून ऐतखाऊ बनवते नव्हे तर बटेंगे तो कटेंगे असा नारा देवून हिंदूंना सक्षम करते व मुस्लिमांना दुर्बल समजते. मात्र वसीम तसा विचार करीत नव्हता. त्याला वाटत होतं की त्याची पार्टी तसा विचार करीत नाही. ते राजकारण आहे व तो निवडणुकीतून निवडून येण्याचा एक उपाय आहे. त्यावर तो आणखी विचार करीत होता की आपल्याला काय करायचं आहे. कोणतंही सरकार आलंच तर ते सरकार मतदारांनी मतदान करावं, म्हणून अशा प्रकारच्या निवडणूकीच्या तोंडावर योजना राबवत असतातच. अन् जेही सरकार आलं, तेही सरकार पाच वर्षातील चार वर्षे सतत जनतेवर अत्याचार करणारच. जनता जरी सरकारची मालक असली तरी जनतेला निवडून आलेले सर्व नेते निवडून आल्यानंतर गुलामच समजतात हे सर्वश्रुत आहे. काल हेच चित्र दिसत होतं.
लाडकी बहिण योजना. त्यामागं सरकारचा कोणता उद्देश होता. ते काही सांगता येणं कठीण आहे. सरकारचे त्या योजनेसाठी दोन उद्देश दिसत होते. एक आगामी निवडणुकीत निवडून येणे व दुसरा उद्देश दिसला होता, तो म्हणजे जी मंडळी गरीब आहेत. अशा घरच्या माता भगीनींना आर्थिक मदत देणे. ज्यांना दिवाळी भेट म्हणता येईल. त्यातच निवडणूकीचा मुद्दा थोडा बाजूला ठेवून त्या पैशाचा वापर कसा होत आहे, याचा विचार केल्यास असं दिसत होतं की जनतेला फुकटचा पैसा पचला नाही. काही लोकांनी आपल्या पत्नीला मारहाण करुन ते पंधराशे रुपये हिसकावून घेत त्याची दारु ढोसली. काहींच्या घरी त्या पैशानं व्याध्या आणल्या व राज्यात चिकनगुणीयाचं सत्र सुरु झालं. त्यातच त्या आजारात पंधराशे रुपयेच नाही तर कितीतरी पैसा खर्च झाला. काही लोकं म्हणायला लागले होते,
"आमी पुर्वी आजार पायला नोयता असा. आमी पंधराशे रुपये फुकटात मिळवले ना. म्हणूनच आजार आला. ते पैसे आमाले पचलेले नाईत."
ते लोकांचे बोलणे. त्यावर उत्तर देतांना वसीम म्हणत होता, "लोकच ते. काहीबाही बोलणारच. अन् आजारही. ती तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो येणारच. जसा पुर्वी कोरोना आला होता तसा. आजाराचा व पंधराशे रुपयाचा काही संबंध तरी आहे काय? परंतु या योजनेवर महागाई, शेतकरी हमीभाव, बेरोजगारी आणि आता दोषारोपन याही माध्यमातून झालं."
निवडणूक...... कोणी आगामी निवडणूक आहे, म्हणून सरकारनं ही योजना राबवली असंही म्हटलं. तर कोणी सरकारला चांगलं म्हटलं. मात्र या योजनेतून नेमकं काय झालं? फायदा झाला की नुकसान झालं. हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीतून दिसेलच. असं वसीमचं मानणं होतं. परंतु त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि तेही शंभर प्रतिशत मतदान करणं गरजेचं आहे. आपण तेवढं करावं म्हणजे झालं. कारण मतदान करणं हे रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, अन्नदान या सर्व दानापेक्षा श्रेष्ठ आहे. जसा इतर प्रकारच्या दानानं आपल्या स्वतःचा जीव वाचवता येतो. तसाच जीव मतदान करुन आपल्या देशाचाही वाचवता येवू शकतो हे तेवढंच खरं.
अलिकडे निवडणुकीच्या रणधुमाळीत हौसे, नवशे व गवशे सहभागी होत असतात. ते पाहातही नसतात की आपण निवडणुकीत निवडून येणार की पराभूत होणार. तसं पाहिल्यास पक्षातील सर्व उमेदवारांना तोच जणू बाजी मारणार असंच वाटत असतं. असे हौसे, गवशे व नवशे निवडणुकीत निवडून येत नसले तरी निवडणुकीत उमेदवार म्हणून का उभे राहात असतात? याचा एक किस्सा वसीमला आठवत होता.
असाच एक व्यक्ती निवडणुकीत उभा झाला होता. तो निवडणुकीत निवडून येणार नाही हे निश्चीतच माहीत होते. तसं त्याला एक दिवस वसीमनं म्हटलं,
"मित्रा, एक प्रश्न विचारु?"
"विचार."
"बरेच दिवसापासून पाहतो की तुझ्या पाठीमागं कोणीच नाही. फक्त दोन चार महिला दिसतात अन् दोनचार मित्र. तुलाही माहीत आहे की तू निवडणुकीत निवडून येणार नाही, हे माहीत असतांनाही तू का उभा झाला आहेस?"
ते त्याच्या त्याचं बोलणं. त्यावर उत्तर देत तो म्हणाला,
"त्याचं काय आहे, माझा विवाह व्हायचा आहे. माझ्याकडं पैसा भरपूर आहे. परंतु चांगलं स्थळ नाही. कदाचीत मी या निवडणुकीत उभं राहिल्यानं एखादं चांगलं स्थळ तर चालून येईल. म्हणतील वा विचार करतील की जावई श्रीमंतच नाही तर राजकारणीही आहेत. निवडणुकीत उभे राहिलेले आहेत."
वसीमही आपल्या विवाहाचा विचार करु लागला होता. क्षणातच त्याला त्याचं प्रेम आठवलं. त्यासोबतच आठवली ती भिंत. हिंदू मुस्लीम भेदभावाची भिंत. त्याला आठवत होतं की दोन हिंदू धर्मातीलच भिन्न जाती. ज्यांचा विवाह होवू शकत नाही. आपला कसा काय होणार. आपला धर्म वेगळा आणि रक्षाचा धर्म वेगळा. लव्ह जिहाद म्हणतील कोणी याला. परंतु हा माझा लव्ह जिहाद नाहीच. हे आपलं प्रेम आहे.
निवडणूक आली होती व बटेंगे तो कटेंगे या अंतर्गत हिंदू मुस्लीम हा वाद चिघळत चालला होता. त्यातच वसीमला चिंता पडली होती. त्याच्या त्या प्रेमाची. जे प्रेम रक्षावर होतं. रक्षा हिंदू आणि वसीम मुस्लीम होता. त्याला वाटत होतं की आपलं प्रेम जरी रक्षावर असलं तरी बटेंगे कटेंगे या अंतर्गत होणाऱ्या हिंदू मुस्लीम वादातून आपला विवाह होईल काय? ती चिंता व त्याच चिंतेत तो जगत होता. अशातच उमेदवारीची चर्चा वसीमच्या कानावर आली.
उमेदवारी....... कोणी घ्यावी वा ती कोणाला द्यावी? हा प्रश्नच असतो. बरेचसे उमेदवार हे निवडणुकीत उभे राहतांना बक्कळ पैसा कमविण्याचीच स्वप्न पाहात असतात. त्यांनाही माहीत असतं की एकदा का निवडणुकीत उभे झाले की बस, काही पाहायचेच नाही. कारण एकदा का निवडून आला एखादा उमेदवार की त्याची चांदीच चांदी होत असते. तो व्यक्ती वर्षभरात एवढी कमाई करतो की त्यानं दहा वर्ष निवडून न येता कमवले असते तरी तेवढी कमाई आली नसती. म्हणूनच निवडणुकीत बरेचसे हौसे, गवशे नवशे उमेदवार म्हणून उभे राहात असतात.
निवडणुकीत उभं राहतांना उमेदवारी जाहीरही केली जाते. कोणाला? ते तीन चार प्रकारच्या लोकांना. पहिला प्रकार म्हणजे ज्याला पक्षातील दिर्घ काळ वास्तव्याचा अनुभव आहे. अर्थात ज्याचे दादा, पडदादा त्या पक्षात होते. त्याला उमेदवारी मिळणे. दुसरा प्रकार म्हणजे जो गुन्हेगारी विश्वातील बादशाहा आहे व ज्याचा धाक समाजात आहे. त्यालाही उमेदवारी मिळणे, तिसरा प्रकार म्हणजे ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे, अशांना उमेदवारी मिळणे. तसाच चवथा प्रकार म्हणजे ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे व त्याच्या प्रतिष्ठेचा फायदा पक्षाला होईल. अशांना उमेदवारी मिळणे.
अलिकडे त्याच आधारावर उमेदवारी मिळत असते. जो बदमाश असतो. त्याचेवर शेकडो गुन्ह्यांची नोंद असते. ज्याचेजवळ भरपूर पैसा असतो. ज्यातून देशाला कोणत्या उमेदवारांची गरज आहे? हा प्रश्न गौण असतो. शिवाय जो व्यक्ती पाहिजे त्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात लोकांना आवडत जरी असला तरी तो देशाच्या कामाचा नाही. तरीही त्याला उमेदवारी मिळत असते. कारण त्याला काही समजत जरी नसले तरी जनता निवडून देते ना. मग जनतेनं स्विकार केल्यामुळं तो राजा ठरत असतो. परंतु वर संसदेत जावून त्याला जर आलू आणि कांदे समजत नसतील तर त्याच्या निवडणुकीत निवडून येण्याचा फायदाच कोणता? राजकारणातील बरेचसे असे बदल असतात की जे शिक्षणाशिवाय समजून येत नाहीत. इथं तर निवडणुकीत निवडून आलेले आणि फक्त बारावी उत्तीर्ण असलेले लोकं शिक्षणमंत्री बनतात आणि पुर्णतः शिक्षणाचंच वाटोळं करुन सोडतात. काही वरचा स्तर असा असतो की त्या ठिकाणी शिक्षणाची अतीव गरज पडते. अशावेळेस तिथं उच्च शिक्षण असलेलेच लोकं चालतात. तसं पाहिल्यास अनुभव हा जरी मोठा गुरु असेल तरी पदवीही तेवढीच मोठी असते. शिक्षण शिकलेला युवक हा चौकस दृष्टीनं सर्वतोपरी एखाद्या बाबींवर विचार करु शकतो. तो विचार अनुभव असलेला करु शकत नाही. अनुभव असणारा व्यक्ती हा त्या अनुभवाच्याच बाबीतून एकाच अंगानं विचार करीत असतात. त्यामुळंच निदान निवडणुकीत उभे राहण्याची अट ही उच्च शिक्षणाची असावी असे बरेच म्हणतात. परंतु ती अट असूच शकत नाही. कारण तशी जर अट असेल तर तो व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमान असेल. लोकांच्या निवडणुकीत उभे राहण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा प्रकार असेल. म्हणूनच ती अट शिथील केलेली आहे. अन् विना शिक्षणाचे उमेदवार आजपर्यंत निवडणुकीत उभे राहिलेले आपल्याला दिसले आहेत. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणात एका शहरातून सत्तर उमेदवारापैकी फक्त पाचच पदवीधर असल्याचं वर्तमानपत्र वाल्यांनी छापलं होतं. बाकी सगळे दहावी बारावी होते. याबाबतीत विचार केल्यास असं दिसत होतं आणि आढळून येत होतं की खरंच हे दहावी, बारावी शिकलेले उमेदवार राज्य चालवू शकतील काय?
वसीम त्यावर विचार करीत होता. तसा निवडणुकीच्या बाबतीत विचार करीत असतांना त्याला आणखी एक गोष्ट मनात खटकली, ती म्हणजे ब्लकमेल करणं. तो विचार करीत होता.
मतदार हा आजच्या निवडणुकीचा एक महत्वपूर्ण घटक. परंतु असे जरी असले तरी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना ब्लकमेल करीत असतात. ते त्यांचं आश्वासन असतं की मतदारांना लुभावणं असतं, ते काही माहीत नाही. परंतु म्हणलं जातं की आम्ही महिलांना एसटी प्रवास मोफत देवू. तीन हजार रुपये महिना देवू. अमूक करु, तमूक करु. सारीच आश्वासनं. निवडून आले तर देतीलही एकदोघांना. सर्वांना तर देणार नाहीतच. मात्र गाजावाजा जगावेगळा. सध्या यु ट्यूबवरही गाजत आहेत जाहिराती की आपल्या सरकारनं अमूक केलं, तमूक केलं. उद्या जर आपलं सरकार नाही आलं तर हे मिळणारच नाही. काही ठिकाणी कटेंगे, बटेंगे वाद. हा सर्व खेळ मतदारांना लुभावण्यासाठी असतो. अन् तसे प्रकार सर्वच राजकीय पक्ष करीत असतात.
वसीम विचार करीत असतांना त्याला आणखी एक प्रकार आठवला. याबाबतीत एक अडाणी महिला म्हणत होती, "साहेब, हे ब्लकमेलींग नाही का?" त्यामुळंच वसीमला वाटत होतं व तो विचार करीत होता.
तिला कोण सांगेल की हे सर्व राजकारणात चालतं. मतदारांना आकर्षित करण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचे फंडे वापरावेच लागतात. त्यातीलच हा एक फंडा. परंतु अडाणी मत, तिला कोण सांगणार. निवडणूक लढवणं हा सर्व ब्लकमेलचा खेळच असतो. आपलं राजकीय अस्तित्व स्थापन करण्यासाठी. वाद करणं वा आश्वासन देणं वा ब्लकमेल करणं. हे मतदारांना लुभावण्याचे प्रकार असतात. साम, दाम, दंड व भेद वापरुन सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षीत करीत असतात. अन् निवडणुकीत निवडून आल्यास सर्वच आश्वासनं राजकीय पक्ष काही पुर्ण करीत नाहीत. त्यातील दोन चार आश्वासनं पुर्ण होतात. जनताही काही दिवसानं नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाला विसरते. कारण विधात्यानं विसरणे ही एक चांगली देणगी मानवाला प्रदान केलेली आहे. त्यातच तीच आश्वासनं सरकारनं जरी पुर्ण केली नसलीत तरी जनता ती आश्वासनं विसरुन मतदान करते व वाईट लोकांना निवडून देते. चांगला निघेल असा विचार करुन. परंतु जो निवडणुकीत निवडून येतो. तो व्यक्ती त्याच भोळ्याभाबड्या जनतेचा विश्वासघात करीत असतो. तो आपलेच घर भरतो. त्याचीच तिजोरी मोठी होत असते आणि जनता निकामी होत असते. ते एका चतकोरापेक्षा कमी पोळीचा तुकडा देतात जनतेला आणि पुर्ण पोळीच मसकत असतात. लोकंही खुश होत असतात पोळीचा तुकडा मिळाल्यानं. कारण त्यांना पुर्ण पोळी म्हणजे काय, तेच कळत नाही. ती जनता त्या तुकड्यालाच पुर्ण पोळी समजत असते. म्हणते की ती पोळी सरकारनं दिली. परंतु सरकार काहीच देत नाही. त्या पोळी तुकड्यातील अंश भाग किंवा एक कणही सरकार देत नाही, तर तो कण देते हीच जनता. याच जनतेनं कररुपात पैसा भरलाच नाही तर सरकार तरी ती चतकोर पोळी वा त्याचा कण कुठून देणार? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. महत्वपूर्ण बाब ही की जनताच सर्व गरीब लोकांना पैसा पुरवीत असते. माध्यम असतं सरकार. परंतु ते श्रेय सरकार जनतेला देत नाही. जनताही मुर्खच की त्यांनाही ते कळत नाही. मग अशा जाहिराती येतात. अमूक अमूक सरकार देणार.
आगामी काळात निवडणूक होती. वसीम एक कार्यकर्ताच होता. तो प्रचार करीत होता. या गावावरुन त्या गावात जात होता. त्या प्रचारात तो सांगत होता, 'नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच बाजू निवडणुकीलाही आहेत. त्यामुळंच जनतेसमोर उमेदवार आलेच आणि त्यांनी कितीही आश्वासनं दिलीत की मी अमूक देईल, मी तमूक देईल. मी अमूक करणार. मी तमूक करणार. तरी जनतेनं भाळून जावू नये. त्यांनी त्या सर्व गोष्टीवर विचार करावा. विचार करावा आणि ठरवावं की कोणता उमेदवार योग्य आणि कोणता अयोग्य. कोण विश्वासघात करु शकतो आणि कोण विश्वास पात्र ठरु शकतो. यावर सर्वतोपरी विचार करुन जनतेनं मतदान करावं. मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा का असेना. मग तो प्रस्थापीत पक्षाचा नसला तरी चालेल वा तो शिकलेलाच असायला हवा असंही नाही. तो माझ्या पक्षाचा नसला तरी चालेल. मात्र तुम्ही जनता मायबापहो, विचार करुन मतदान करा म्हणजे झालं.
वसीम राजकारणात होता व त्यानं आपल्या पार्टीचा जोरदार प्रचारही केला होता. त्याला माहीत होते की त्याचीच पार्टी आज जिंकेल व सत्तेवर येईल. कारण विजयाचं भाकीत मापतौल देणाऱ्या चॅनेलवाल्यांनी दाखवलं होतं व त्यांनीच त्याच्या पार्टीच्या विजयाचे आकडेही जाहीर करुन टाकले होते. मात्र विरोधी पार्टीचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. तसा प्रत्यक्ष निकालाचा दिवस उजळला.
आज निकालाच्या दिवशीची तारीख होती. कोण निवडून येणार व कोणाला बहुमत मिळणार हा एक गुंतागुंत निर्माण करणारा मुद्दा होता. त्याबद्दल घेतलेला आढावा चॅनलवाल्यांनी आधीच प्रसारीत केला होता. मात्र विरोधी पक्षाची त्याबाबतची भुमिका संदेशात्मक असल्यानं वसीमचं मानणं होतं.
नेते म्हटले की त्या नेत्यांवर विश्वास करणारे आज भरपूर आहेत. काही लोकं त्यांचेवर विश्वास ठेवून ते जसं सांगतात. त्या पद्धतीनं वागतांना दिसतात. लोकं नेत्यांवर विश्वास ठेवून आपले अमुल्य मतही अगदी निःशुल्क त्या नेत्यांना अर्पण करीत असतात. त्यावेळेस असं वाटायला लागतं की हे त्या नेत्यांचे अंधभक्तच असावेत. एवढी अगाढ श्रद्धा मतदारांची नेत्यांप्रती असते. कारण जनता ही कोमात असते. ती विचारच करीत नाही की कोण आपल्या कामाचा व कोण आपल्या कामाचा नाही. मग मतदान व अमुल्य मत वाया जातं. जेव्हा निवडून आलेला प्रतिनिधी काम करीत नाही व भेटायलाही येत नाही. अशी माणसं प्रत्येकच राजकीय पक्षात असतात. जे बुजगावणेच असतात, काम न करणारे.
गत दोन दिवसापुर्वीच मतदान झालं होतं व लोकांनी नेत्यांवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं. यावेळेस मतदानाचा टक्काही वाढला होता. अन् ठरलं होतं, ज्यानं ज्याला मतदान केलं, तोच निवडून येणार. परंतु वसीमला वाटत होतं की मतदार नेत्यांना मतदान देत असतात. नेते निवडूनही येत असतात. मग ते नेते निवडून आलेच की त्या अंधभक्तांचा त्यांना विसर पडत असतो. ते नेते मतदारांशी कामापुरता मामा असेच वागत असतात. त्यानंतर तेच नेते, ज्यांनी त्यांचेवर विश्वास ठेवून त्यांना डोळे लावून मतदान केलं. त्यांचेकडे फिरकतही नाही. त्यांच्या सुखदुःखातही सहभागी होत नाही. एवढंच नाही तर असे नेते वस्तीत फिरकतही नाहीत. हे दृश्य त्यानं अनेकदा अनुभवलं होतं प्रसंगी त्याची पार्टी निवडून येत असली तरी. तसाच त्याबद्दल तो विचार करीत होता.
'नेत्यांनाही आठवण येते. तेही वस्तीत फिरकतात. जेव्हा मोसम येतो तेव्हा. मोसम म्हणजे निवडणूक. मग ती निवडणूक कोणत्याही कालातीत असो. विधानसभा, लोकसभा असो. त्यांना वस्तीत नाईलाजानं फिरकावं लागतं. अशावेळेस ते न लाजता न शरमता वस्तीत येत असतात. मतांचा जोगवा मागत असतात. अन् आजपर्यंत तेच घडत आलं. परंतु आता नेते थोडे बदललेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामं करणं सुरु केलंत. त्यानुसार जागोजागी त्या नेत्यांनी रस्ते बांधकाम सुरु केले. रस्ते तेही सिमेंटचे. त्या रस्त्याच्या बाजूलाच फुटपाथ तोही सिमेंटचाच. जागाच ठेवली नाही वस्तीवस्तीत पाणी मुरायला. ज्यातून पाण्याची पातळी नव्हे तर जलस्तर साठा काही दिवसानं हद्दपार होणार याची पक्की शाश्वती. आता फुटपाथही सजलेले असून त्या फुटपाथवर लाईट लागलेले आहेत. उजालाच उजाला. योजना तर भरपूर उघडकीस येत आहेत की ज्याचं मोजमाप करता येत नाही. परंतु हे कोणत्या कामाचं? असं काही लोकांवर कधी म्हणायची वेळ येते. तसे काही लोकं म्हणतातही. तसंच त्यावर लोकं आज म्हणायला लागले आहेत की आम्हाला असला विकासच नको. जो आमच्या उरावर बसेल. आम्हाला दोन वेळची रोटी मिळू द्या म्हणजे झालं. तसं पाहिल्यास रेशनमधून तांदूळ, गहू निःशुल्क मिळत असल्यानं काही लोकांना दिलासा आहे. मात्र रोजगार नाही. अन् काही ठिकाणी रोजगार जरी असला तरी लोकं खाली राहतात. परंतु कामाला जात नाहीत. अशी आज वास्तविकता निर्माण झाली आहे. खासकरुन ग्रामीण भाग. पुर्वीसारखे लोकं शेतीत कामाला जात नसल्यानं शेतात धान करपते आहे. सोयाबीनला अंकूर फुटले आहेत. अन् त्यावरही मात करुन सोयाबीन निपजलीच तर त्या सोयाबीनच्या एका क्विंटलचा भाव सोयाबीन तेलाच्या एका पिंपाएवढाच आहे. असं काही गटाचं म्हणणं व त्याच म्हणण्यानुसार त्या गटानं सत्तेत नसलेल्या लोकांना मतदान केलं. परंतु महागाई वाढलेली आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचं कारण आहे. देशाचा विकास. रस्ते, लाईट आणि सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना पुरवणे. सुविधा पाहिजेत ना. मग आम्ही महागाई वाढविणारच. आज निःशुल्क रेशन, लाडकी बहिण, मोफत प्रवास, सिमेंटचे रस्ते इत्यादी सुविधा करण्यासाठी पैसा लागतोच. आम्ही सर्व सुविधा देवू. परंतु पैसा कुठून आणायचा? हा सरकारचा प्रश्न. मग महागाई वाढणारच. ती कळ शोसावीही लागणार. यात सरकारचं कुठं चुकतं. मग हे सरकार असो वा दुसरं कोणतंही. त्यांनीही तेच केलं असतं. आम्ही सुविधा देवू. परंतु पैशानं. तसं पाहता सर्वच याचा विचार करीत नाहीत. अपवाद काही राजकीय पक्ष महागाई देखील वाढवत नाहीत आणि सुविधा देखील करीत नाहीत. हे दुसऱ्या गटाचं म्हणणं. त्यांनी असाच विचार करुन त्यांना मतदान केलं.'
वसीमला ते दृश्य दिसत होतं. तसं त्याचं मानणं होतं, एक काळ असाच होता. त्या काळानुसार कामाच्या बाबतीत एक पक्ष असा होता की त्या पक्षानं गल्लोगल्लीत विकासच केलेला नव्हता. लोकांना सिमेंटचे रस्ते तर सोडा, साधे डांबराचेही रस्ते मिळत नव्हते. दगडा गोट्याच्या रस्त्याने बरेच दिवस चालावं लागायचं. त्या काळात महागाई तेवढी नव्हती व विकासही तेवढा नव्हताच. कारण ते सरकार देशातील लोकांच्या पोटाचा विचार करीत असे. देशावर कर्ज नको याचा विचार करीत असे. देशातील इतर सगळ्याच लोकांच्या खिशातून जास्त पैसा जायला नको याचा विचार करीत असे. आज मात्र सुविधा उपलब्ध आहेत व विकासही तेवढाच आहे. सरकारनं विकासासाठी पैसा आणला. मात्र तो स्वतःच्या खिशातून नाही तर जनतेच्याच खिशाला कात्री लावून आणि आणणारही कुठून होतं? त्यांनी जनतेच्या खिशाला कात्री लावली. कारण विकासासाठी जनतेच्या खिशातून एकदाच पैसा जाईल. वारंवार पैसा जाणार नाही हे सरकारचं मत. परंतु खऱ्या अर्थानं विचार केल्यास देशाचा विकास कितीही केला वा करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो पुर्ण होत नाही.
वसीमचं ते मानणं बरोबर होतं. परंतु जनतेनं मत यावर वेगवेगळं होतं. त्यांचा तो विचारही वेगवेगळाच होता. कारण एकीकडे होती आम्हाला विकास पाहिजे, असे म्हणणारी जनता तर दुसरीकडे होती महागाईच्या नावावर बोंब मारणारी जनता. सरकार मात्र नेहमी पेचात फसत होतं. काय करावे व काय नको असे सरकारला होवून जात होतं. त्यानुसार त्यानंतर योजना काढल्या जात होत्या. रस्ते विकास केल्या जात होता. त्यानंतर काही लोकं सरकारला चांगले म्हणत असत तर काही लोकं सरकारला वाईट म्हणत असत.
वसीमही त्याच ध्येयधोरणावर विचार करायचा. त्याला वाटायचं की यात सरकारचं काहीच चुकत नाही. मात्र याचा उहापोह होतो. ज्या लोकांना मोफत रेशनचं धान्य मिळते. त्यातील काही महाभाग त्यांना गरज नसल्यानं ते धान्य काळ्या स्वरुपात व्यापाऱ्यांना विकतात. ही वास्तविकता व शोकांतिकाच आहे. काही लोकं लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यानं कामाला जात नाहीत. घरी बसून बायकोच्या भरवशावर खातात. आज मजूर न मिळाल्यानं शेतातील धान करपते. सोयाबीनला अंकुर फुटतो. असं वाटतं की योजनांचा उहापोह झाला. तो दोष जनतेचाच असतो. परंतु जनता तो दोष सरकारवर लावत असते. त्याचाच फायदा विरोधक घेतात. जे नेहमी द्वेषात असतात. आता गत दोन दिवसापुर्वी निवडणूक झाली व आज दोन दिवसानंतर झालेल्या निवडणूकीतील मतदान कळणार होतं. सर्वच राजकीय पक्ष आमोरासमोर उभे होते. काही पक्ष मोठमोठे आश्वासन देत होते. मात्र आता कळणार होतं. त्यांच्या आश्वासनाला लोकांनी भीक घातली काय? शिवाय हेही कळणार होतं की मोफत रेशन, बसप्रवास, लाडकी बहिण योजना यांच्यावर लोकं भाळून गेले काय? अन् जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार. तेव्हा कळेल की आज जनतेला विकास हवा. मोफत धान्यही हवं. महागाई हवी की महागाई कमी व्हायला हवी. त्यासाठी जास्तीचा विकास नको. मोफत धान्य नको.
निवडणुकीचा निकाल हा येणारच होता. जो काही असेल तो. मात्र वसीम त्या बुचकळ्यात नव्हताच. त्याला वाटत होते की निवडणुकीच्या निकालाचा विचार करतांना निकाल काहीही लागो, परंतु महत्वपुर्ण बाब ही की दोन्ही गट विजयी होणार नाहीत. असं होवूच शकणार नाही. कारण एकाच पारड्यात विकास व अविकास, या दोन्ही गोष्टीला बसवता येत नाही. हे जनतेनं आजतरी स्विकारायला हवं. तसं पाहिल्यास आज सर्वच राजकीय पक्ष विकास करु पाहात आहेत व ते त्यांनी विविध स्वरुपाचं आश्वासनंही दिलं आहे. परंतु प्रत्येक पक्षात काही खडे आहेत. जे पक्षाच्या नावावर निवडून येतात. हवं तर ते बुजगावणेच आहेत. काम न करणारे. अशांना जनतेनं ओळखायला हवं होतं. त्यानंतरच मतदान करायला हवं होतं. तसाच बाहेरचा रस्ताही दाखवायला हवा होता. शिवाय या महाविकासाच्या चक्रव्यूहात जनतेनं न फसता मतदान करायला हवं होतं. अन् सांगायला हवं होतं की जो व्यक्ती आमच्यासाठी काम करीत नसेल, त्यांची आम्हाला काहीच गरज नाही. जनतेलाही आज हुशार व्हायला वेळ मिळालेला होता. ती कोमात नाही तर होशात आलेली होती. ती सदैव जबाब द्यायला तयार होती व ती तसा जबाब निवडणुकीच्या माध्यमातून देवू शकत होती. हे जनतेनंच नेत्यांना दाखवायला हवं होतं, तेही मतदान करीत असतांना. आम्हाला आश्वासन, लाचलुचपत नको. तर काम हवं आहे काम. काम म्हणजे विकास, विश्वास आणि एखाद्यावेळेस मुलाखतही. हाही मतदान करतांना विचार करायला हवा होता. आता ती वेळ निघून गेलेली आहे व आता निकाल येणार आहे. जोही येईल, तो निकाल स्विकार करायचा आहे.
आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता. वाद हा होणारच होता. शंका कुशंका निर्माण होणारच होत्या. कारण जे दिसणार होतं, ते शंकाच निर्माण करणार होतं. कारण प्रत्येकच नेत्याला मीच निवडून येणार असंच वाटत होतं. त्यामुळंच वसीम सर्वांना सांगत होता की वाद करायचा नाही. शांतता राखायची आहे. कारण आपण जनता भोळ्या विचारांची आहोत. आपण कधीच समजून घेत नाही. वेळप्रसंगी राजकीय पक्ष कट्टर विरोधक असतांना, एकमेकांना जनतेसमोर शिव्या हासडत असतांना सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येत असतात. त्यांची युती होत असते आणि आपली सामान्य जनता एकमेकांना पक्षासाठी विरोधक समजून एकमेकांचेच जीव घेत असतो. ते राजकीय पक्ष आपली पोळी शेकून लाभ घेत असतात आणि आपण विनाकारण आपापसातच भांडण करुन उगाचच वाद करीत असतो. मात्र ते निकालानंतर दिसायला नको. कारण आपल्या वादानं देशातील स्थावर संपत्तीचं नुकसान होत असते. जी आपलीच संपत्ती असते. नेत्यांचं काहीच जात नाही. जातं आपलंच. आपल्याच कररुपातील भरलेल्या पैशातून निर्माण झालेल्या संपत्तीचं नुकसान आपल्याच हातून होत असतं. याबद्दलचा विचार आपल्यालाही निकालाच्या दिवशी करायला हवा व तसं वागायला हवं. एवढंच निकालाच्या निमित्यानं सांगणं आहे. आज निकालाच्या दिवशी शांतता, संयम या गोष्टी पाळाव्यात म्हणजे झालं.
************************************************
वसीमवर असलेलं रक्षाचं प्रेम. आज रक्षा वसीमला भेटली होती. तिनं आपल्या प्रेमाचा इजहार केला होता. त्यातच वसीमनंही होकार दर्शवला होता. परंतु ते सगळं जरी बरोबर असलं तरी तिला आपल्या पालकपित्याची जाणीव होती. कारण तिचे आईवडील बालपणातच पाचवीमध्ये असतांना मरण पावले होते आणि काकानं आपली जबाबदारी झटकली होती. एक शिक्षक होते की ज्या शिक्षकानं तिला दत्तक घेतलं व तिला लहानाचं मोठं केलं. शिकविलं व कलेक्टरही केलं होतं.
तिचं प्रेम वसीमवर निर्माण झालं असलं तरी त्या दोघांत धर्माची भिंत आड होती. रक्षा हिंदू होती तर वसीम एक मुसलमान होता. त्यातच त्यांच्यात निर्माण झालेलं प्रेम. त्या प्रेमाचा स्विकार आपले पाल्यपिता करतील काय? याचा विचार रक्षाच्या मनात होता. अशातच एक दिवस संधी साधून रक्षानं आपल्या विवाहाचा प्रश्न सोडवला. ती आपल्या पाल्य पित्याला म्हणजेच आपल्या शिक्षकाला म्हणाली,
"बाबा, आता मी तरुण झालीय व आता मला विवाह करायचा आहे."
विवाहासारखा प्रश्न. मुकेश आपल्या विद्यार्थीनीच्या तोंडून म्हणजेच मुलीच्या तोंडून आल्याचं समजताच मुकेशलाही आनंद झाला. त्याला ती तरुण झाल्याची जाणीव झाली. आजपर्यंत तरी त्याचं त्याकडे लक्ष गेलंच नव्हतं. अशातच तिला त्यानं विचारलं,
"कोणी राजबिंडा शोधलाय की मलाच शोधावा लागेल तुझ्यासाठी एखादा तरुण?"
तिनं आपल्या पाल्य पित्याकडून तो प्रश्न ऐकला व ती चूप झाली. तोच त्यानं तिला पुन्हा प्रश्न विचारला.
"कोण आहे तो? मलाही कळू दे."
ती क्षणातच चूप झाली. तोच मुकेश म्हणाला,
"कोण आहे तो? मला तर सांग. मी रागावणार नाही."
ती तरीही चूप होती. तोच तो तिच्यावर ओरडत म्हणाला,
"आता बऱ्या बोलानं सांगते की......."
मुकेशचं तिच्यावर ओरडणं. ते पाहून ती म्हणाली,
"तो तरुण आहे, वसीम. माझा वर्गमित्र. माझ्या सोबत शिकायला माझ्या वर्गात होता तो. तो अतिशय चांगला आहे."
"वसीम. मुस्लीम आहे तर तो."
"होय, मुस्लीम. का?"
मुकेश चूप बसला. तसा काही वेळानं तो म्हणाला,
"रक्षा, तुला हिंदू सापडत नव्हता काय?"
तिनं वडीलांचं बोलणं ऐकलं. त्यांचा आवाज चढला होता. मात्र त्यावर तो चूप बसला नव्हता. तोच ती म्हणाली,
"बाबा, मुसलमान काय माणसं नसतात काय?"
"काय बोलली? पुन्हा बोल."
"मी त्याचेशीच विवाह करणार."
रक्षा बोलून गेली. तोच मुकेशही बोलता झाला. मुकेशला तिचा फार राग आला होता. तोच रागाच्या भरात त्यानं तिला म्हटलं,
"जर तुला त्याचेशीच विवाह करायचा असेल तर माझ्या या घरातून चालती हो."
मुकेशनं तिला म्हटलेले ते शब्द. ते शब्द शस्राप्रमाणे तिच्या मनावरुन चालते झाले. त्या शब्दानं तिच्या मनाला छेद दिला होता. तोच ती म्हणाली,
"बघितलं बाबा तुमचं मी असली रुप. कालपर्यंत तुम्ही मला शाळेत शिकवितांना हिंदू मुस्लीम एकतेचे पाठ शिकवीत होते. अन् आज विवाह करतांना हिंदू मुस्लीम भेद करता आहात. नकोय मला आता तुमचा आसरा. मी आता कमावती झालीच आहे. मला नकोय तुमचा आधार अन् हे तुमचं घरही. आता मिही सक्षम आहे आपलं जीवन जगायला. मी विवाह करणार तर आता मुस्लीम युवकाशीच करणार. बरं मी येतेय."
रक्षा बोलून गेली व ती ताड्कन घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती वसीमच्या घरी गेली. त्याला सगळी घडलेली कहाणी सांगीतली. तसा तो चांगलाच होता. त्यानं तिचं ऐकलं व तिचा त्यानं स्विकार केला.
ते बहरणारं प्रेम. आज विवाहानंतर ते त्यांचं प्रेम बहरत गेलं होतं. आज त्यांना एक मुल झालं होतं. आज बरेच वर्ष झाले होते त्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या विवाहालाही. तिला आता मुकेशची फार आठवण येवू लागली होती. कदाचीत तो जीवंत आहे की नाही याची शहानिशाही आजपर्यंत केली नव्हती तिनं.
************************************************
निवडणुकीचा निकाल लागला होता व सरकारही भरघोस मतानं निवडून आली होतं. त्यानंतर दोन तीन दिवसच झाले होते व नव्या सरकारनं एक पाऊल टाकलं. त्यांनी हेल्मेट सक्तीचं केलं. ज्यात पुढे बसणाऱ्यासोबत मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं करुन टाकलं होतं. त्यानंतर हेल्मेटसक्ती, रस्ते अपघात व चर्चेला उधाण आले. लोकं त्याबाबत सरकारलाच दोष देवू लागले होते. त्यांना वाटत होतं की हेल्मेट सक्ती करण्याऐवजी वाहनांच्या गतीला नियंत्रीत करण्याची सक्ती करावी.
राज्याच्या विधानसभेची निवडणूक संपली होती. मुख्यमंत्री बनविण्याचा पेच कायमच होता. त्यातच शासनानं एक निर्णय पारीत केला होता. तो म्हणजे हेल्मेटसक्ती. हेल्मेट हा दुचाकीस्वारांपैकी दोघांनीही म्हणजेच चालकानं व चालकाच्या मागे बसणाऱ्यानंही वापरावा. त्याचं कारण होतं रस्ते अपघात.
रस्ते अपघाताच्या बाबतीत एका शहराचा विचार केल्यास एका शहरात तब्बल एका वर्षात एकशे एक्यान्नवच्याही वर अपघात झाले होते. ज्यात एकशे तेरा लोकं मरण पावले होते. ज्यात सर्वजण विनाहेल्मेट होते. सर्वात जास्त अपघात त्या शहराच्या एकाच नगरात झाले होते. जे विनाहेल्मेट होते. त्यामुळं केवळ त्या शहरातच नाही तर राज्यातही हेल्मेट सक्ती करण्यात आली आणि त्यावर दोघांनीही हेल्मेट न घातल्यास त्यावर जबर कारवाईचे संकेत मिळाले. साहजिकच त्यात जे हेल्मेट घालून प्रवास करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अर्थातच दंड वसूली करण्यात येईल. असे सरकारचे निर्देश होते. शिवाय असे विनाहेल्मेटधारी सापडावेत. म्हणून त्यांचेवर सिसीटिव्ही कॅमेरेही अधिक लक्ष ठेवणार होते.
राजकारणी लोकांना पोलिसांच्या माध्यमातून समजवीत होते. ते जनजागृतीही करीत होते. रस्ते अपघात. तो होणारच होता. मग कितीही सुरक्षीत गाडी चालवली तरी. कारण जिथं जन्म आहे, तिथे मृत्यू येणारच होता. मृत्यूने कोणालाच सोडलेले नव्हते. परंतु लोकांना राजकारण्यांनी पोलिसांच्या माध्यमातून कितीही समजावलं तरी लोकं समजत नव्हते. कारण लोकांना वाटत होतं की मृत्यू रस्ते अपघातानंही येतो वा एखाद्या आजारानंही येतो. मात्र आजारानं मृत्यू झाल्यास त्या मृत्यूचं मोजमाप करता येत नाही. अन् रस्ते अपघातानं मृत्यू आल्यास त्याचं मोजमाप करता येतं. त्यावर कारणं शोधली जातात. कारणांचा शोध घेतांना सरळसरळ आरोप लावला जातो की संबंधीत लोकांनी हेल्मेट वापरला नव्हता. म्हणूनच मृत्यू झाला. परंतु महत्वाचं म्हणजे जे हेल्मेट घालून गाड्या चालवतात, त्यांचे अपघात होत नाहीत काय? असं लोकांचं मत.
अपघात हे जे हेल्मेटधारी असतात. त्यांचेही होतातच. मागे एकदा हेल्मेटधारी असलेल्या व्यक्तीचा ट्रक त्याच्या पोटावरुन गेल्यानं अपघात झाला होता. शिवाय बरेचसे अपघात हे दुचाकीस्वार सोडा, चारचाकी गाडीच्या आत बसूनही व सीट बेल्ट लावला असतांनाही होत असतात. त्याला जबाबदार हेल्मेट नसतंच. शिवाय याबाबत एक व्हिडीओही मिडीयावर व्हायरल झाला होता. एका हेल्मेटधारी व्यक्तीचा गाडी चालवीत असतांना अपघात झाला होता. त्याचं कारण होतं सापाचा दंश. साप हा त्याच्या हेल्मेटच्या आत शिरला होता व त्यानं त्याला दंश केला होता. ज्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जर त्यानं हेल्मेट घातलाच नसता तर...... तर कदाचीत तो व्यक्ती वाचला असता. असंही लोकांना वाटत होतं.
वसीमचं सरकार बहुमतानं निवडून आलं होतं. तोही हेल्मेटबाबत जनजागृती करीतच होता. तो सांगत होता लोकांना की अपघात होतात. त्याची बरीच कारणं आहेत. त्यातील महत्वपुर्ण कारण आहे हेल्मेट वापरुन गाडी न चालवणे वा हेल्मेट घालून मागील व्यक्ती न बसणे. हेल्मेट वापरणं हि आपली सुरक्षितता होय. परंतु लोकं त्यावर विश्वास करीत नव्हते. ते त्यात राजकारण आहे असे समजत होते. त्यांना वाटत होते की आता राज्य चालविण्यासाठी सरकारला पैसा हवा आहे. शिवाय लोकांना लाडक्या बहिण योजनेचे पैसेही द्यायचे आहेत. रेशन आणि इतर बऱ्याच गोष्टी लोकांना अगदी अल्प दरात पोहोचावयाच्या आहेत. त्यातच सिमेंटचे रस्ते बांधून देश सुशोभितही करायचा आहे. उडाणपुल बांधायचे आहेत. त्याला पैसे कुठून आणणार. म्हणूनच ही हेल्मेट सक्ती आणलेली आहे.
वसीमसारखीच रक्षा. ती एक मुलगी होती. आज ती तरुणी झाली होती. ती राजकारणात नव्हती. मात्र ती विचारवंतच होती व ती जास्त शिकलेली होती. ती कलेक्टर होती. तिचे विचार मात्र वसीमच्या अगदी उलट होते.
तिला वाटत होतं की अपघात हे हेल्मेटनं होत नाहीत. त्याला कारणीभूत अनेक कारणं आहेत. त्यातील पहिलं आणि महत्वपुर्ण कारण आहे, चालकाची गती. तो किती वेगानं वाहन चालवतो, यावर त्या व्यक्तीचा अपघात ठरलेला असतो. आपल्या वाहनाची गती तीव्र असल्यास अपघात हा नक्कीच होतो. कारण जेव्हा आपल्या वाहनांची गती तीव्र असते, तेव्हा समोरुन येणारी गाडी ही अचानक पुढं आल्यानं आपल्याला गाडी नियंत्रीत करता येत नाही. अशावेळेस अपघात हा नक्कीच घडतो. अपघाताला आमंत्रण ही आपल्या वाहनांची गतीच देत असते. आजचा काळ असाच आहे. चोर चोरी करतो व शावावरच चोरीचा आड येतो व शावच पकडला जातो. तीच बाब रस्ते अपघातात हेल्मेटसक्तीबाबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा जर गती नियंत्रीत करण्याची सक्ती केली तर बरेचसे अपघात टाळता येतील. अपघात घडणारच नाहीत. परंतु तसा विचार कोण करणार. त्याबाबत कोणीच विचार करीत नाहीत व वाहनांच्या गतीवर कोणीच लक्ष देणार नाही. शिवाय आजची वाहनच कंपनीनं अति वेगाची बनवलेली असून ती वाहनं जाग्यावरुनच गती पकडत असतात. अलिकडील काळात वाहनांची गती कमी असण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचं कारण आहे अपघात टाळणे. कारण अलिकडील काळात लोकांकडे वाहन चालवितांना पुरेसा वेळ नसल्याचे जाणवते. त्यातच अशी वाहन अगदी मदमस्त होवून अगदी सुसाट वेगानं रस्त्यावरुन धावत असतात. जसा वाहनचालकांच्या बापज्यादांचाच रस्ता लागला. ते कोणत्याही कामाला कधीच पाच दहा मिनीट लवकर निघत नाहीत. मग वेळ होतो व वाहनांची साहजिकच गती वाढवली जाते व आपली गाडी आपल्या मागं जणू कुत्रं लागल्यागत अगदी सुसाट वेगानं चालत असते. त्यानंतर अपघात घडतो. कारण मृत्यू हा कधीच आपल्यावर नाव येवू देत नाही. मृत्यूला टाळताही येत नाही. तो येणारच असतो. त्यासाठी निमित्त असते आपल्या वाहनांची चालविण्याची गती. आता हा अपघात घडतो, तो हेल्मेट घातल्यानं नाही तर आपले वाहन चालविल्यानं. जर हेल्मेट घातले नसते आणि वाहन सुरक्षीत चालवले असते तर अपघात घडला असता का? तर त्याचं कारण नाही असंच येईल.
मृत्यूबाबत सखोल विचार केला तर अलिकडे आपण समृद्धी मार्गावर होत असलेले अपघात ऐकले आहेत व कित्येक वेळेस आपण वर्तमानपत्रातही वाचले आहेत. ते तर चारचाकी गाड्यांचे अपघात आहेत. रस्त्यावर अपघात होणारच. कारण त्यास जबाबदार केवळ हेल्मेटच नाही तर रस्तेही असतातच. काही ठिकाणी जेव्हा आपली गाडी वेगानं असते, तेव्हा अचानक आपल्याला समोर काहीतरी आल्याचा भास होतो. अशावेळेस आपण त्या पदचिन्हाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हातून गुन्हा घडून नये म्हणून. परंतु आपली गाडी वेगानं असल्यानं आपल्याला आपली गाडी नियंत्रीत करता येत नाही व अपघात होतो. त्यानंतर आपण गाडी थांबवतो. मागे येवून पाहतो, परंतु आपल्याला असं पदचिन्हं वा कोणतीच वस्तू तिथं दिसत नाही व कळून चुकतं की आपल्याला भास झाला. असं बरेचदा होतं. कधीकधी रस्त्यानं चालतांना हेल्मेट असल्यानं मागून येणारं वाहन बरोबर दिसत नाही. त्यातच आपण आपली गाडी बाजूला लावू शकत नाही व अपघात घडतो. कधीकधी एखाद्या हेल्मेटधारीला आपण किती गतीनं वाहन चालवत आहो, हे हेल्मेट घातल्यानं कळत नाही व त्याचेकडून दुसर्याच हेल्मेट न घालणाऱ्याचा अपघात होतो. कधीकधी एखादा किडा अचानक आपल्या अपघाताला कारणीभूत ठरतो. तो एवढ्या जोरानं चावतो की आपलं लक्ष त्याकडे वेधलं जातं. अशावेळेस आपली गाडी जर वेगानं असेल तर नियंत्रीत होत नाही व अपघात घडतो.
अलिकडील काळ हा तरुणाईचा काळ आहे. आता तरुण मंडळींकडून जास्त अपघात होतात. कारण तरुण रक्त असतं. त्यातच वाहन चालवितांना त्यांच्या वाहन चालविण्यात स्टंटबाजी असते. शिवाय गतीनं वाहन चालविल्याशिवाय त्यांना आनंदच मिळत नाही. ते पुढील वाहनाला कट मारुन आपलं वाहन चालवीत असतात. यात खासकरुन मुली जास्त पटाईत असल्याचं आढळून येतं. कारण त्यांना माहीत असतं की मुली या स्रिया असल्यानं त्यांच्यावर दया दाखवली जाते. त्यांना भावनेच्या भरात माफ केलं जातं. त्या जास्तच कट मारुन आपल्या गाड्या चालवीत असतात व त्याच अपघाताला कारणीभूत ठरतात.
पुर्वी शाळेशाळेत आर एस पी रस्ता सुरक्षा अंतर्गत प्रत्येक शाळेत शिकवलं जायचं. त्यात वाहन कसं चालवायचं याबाबतही धडे गिरवले जायचे. ज्यातून अपघात बव्हंशी होत नसत. मात्र आता शाळेशाळेत रस्ता सुरक्षेचे पाठ करून सप्ताह साजरे केले जातात. परंतु प्रत्यक्षात ती माहिती तोंडानं दिली जाते. प्रात्यक्षिक स्वरुपात नाही व ती माहिती विद्यार्थी ऐकत असतांना ती माहिती प्रत्यक्ष स्वरुपात नसल्यानं तीच माहिती डोक्यावरुन जाते व रस्ता सुरक्षेबाबत कितीही सांगितलं नाही तरी ती माहिती डोक्यात राहात नाही व अपघात घडतोच.
रक्षाचं बरोबर होतं. कारण वाहन चालविण्याचं व त्यातून होणाऱ्या अपघाताची अनेक कारणं होती. जी नोंदता येत होती. परंतु सरकारनं त्यातील एकमेव कारण शोधलं. ते म्हणजे हेल्मेट. बाकीची कारणं सोडून दिली. जी त्या रस्ते अपघातास कारणीभूत होती.
हेल्मेट सक्ती...... आता हेल्मेट दुचाकीस्वारांमध्ये दोघांनाही सक्तीचं झालं होतं व वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं होतं. कोणी म्हणत होतं की हेल्मेट सक्ती ही व्हायलाच हवी. परंतु जो स्वार असेल त्याला. त्याच्या मागे बसणाऱ्याला नको. त्याचं कारण म्हणजे कधी कधी एखाद्यावेळेस एखाद्या गरजू माणसालाही अर्थातच वयोवृद्ध माणसालाही बसवावं लागतं गाडीवर. ज्यांना हेल्मेट वापर सहन होत नाही. कारण हेल्मेट वापरण्याची मर्यादा ही विशिष्ट वयापर्यंतच आहे. काही काळानं हेल्मेटचा त्रासच होतो असं काही लोकांचं म्हणणं. शिवाय असं जर झालं तर कोणताच व्यक्ती कोणालाही लिफ्ट देणार नाही. मग तो कितीही गरजू असला तरी. काही लोकांच म्हणणं होतं की एक हेल्मेट बरोबर सांभाळता येत नाही. त्यात आता दोनदोन हेल्मेट सांभाळायचे कसे? काही लोकांचं म्हणणं होतं की हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा वाहनांची गती नियंत्रीत करायला हवी होती. कोणी म्हणत होते की हे राजकारण आहे. सरकारला निवडून दिले ना. आता भोगा, जे जे वाट्याला येईल ते. काही लोकं या हेल्मेट सक्तीला अन्यायकारक बाब समजत. काही रस्ते चांगले करा, अपघात होणार नाहीत असेही म्हणत होते तर काही या निर्णयामागे लुटीचं राजकारण आहे असेही म्हणत होते. तर काही जण म्हणत होते की यातून आरोग्याचे प्रश्न निश्चितच निर्माण होतील. त्यांच्याच म्हणण्यानुसार हेल्मेट घालणे हा ज्यांच्या त्यांच्या इच्छेचा प्रश्न असावा. तो वापरणे ऐच्छिक असावे. कारण सक्ती करुन समस्या सुटणार नाहीत तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतील.
हेल्मेट सक्ती ही सक्तीची नसावीच. तो विषय ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असावा. कारण त्यातून काहींचं खरंच नुकसान होतंच. शिवाय काही दंड भरतात. परंतु हेल्मेट वापरत नाहीत. काहीजण सुरक्षा म्हणून हेल्मेट घालत नाहीत तर दंड बसते म्हणूनच हेल्मेट घालतात. तसं पाहिल्यास हेल्मेट घालण्याबाबत सक्ती नसावीच. असं काही लोकांचं म्हणणं. त्यांच्याही मतानुसार अशी सक्ती करणं कुठंतरी लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. ज्या संविधानातील एका कलमेनुसार लोकांना व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यानुसार मुक्तपणे जीवन जगण्याचाही अधिकार आहे. ज्यात हेल्मेट सक्ती बसत नाही. त्यातच काहींना म्हणायचं आहे की आता निवडणूक झाली आहे. लाडक्या बहिणीचे मानधन वाढले आहे. ते कसे काढणार? लोकांच्याच खिशातून काढावे लागणार ना. म्हणूनच ही हेल्मेट सक्ती. दंडाच्या रकमेतून निदान लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे वसूल करता येतील. मात्र यात लाडक्या बहिणीचा व सरकार निवडून येण्याचा काहीही संबंध नव्हता. परंतु लोकांना कोण सांगेल की बाबांनो, ही हेल्मेट सक्ती तुमच्याच सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट वापरा व दंड टाळा. याचा राजकारणाशी, निवडून येण्याशी व लाडक्या बहिणीशी कोणताही संबंध नाही. तसंच काही लोकांचं यावर आणखी एक म्हणणं होतं की सरकारनं आता पायी चालणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करावी. कारण पायी चालणाऱ्या लोकांचाही रस्ते अपघात होत असतातच. मात्र रक्षाचं म्हणणं होतं की सरकारच्या म्हणण्यानुसार हेल्मेट सक्ती नसावी. तो इच्छेचा प्रश्न असावा. सुरक्षा हवी तर हेल्मेट वापरा. अपघात टाळा. अशाचा अपघात झाल्यास सरकारनं त्यांची काळजी घ्यावी व त्यांना मदत करावी व ज्यांचा अपघात हेल्मेट न वापरता झाला. त्यांना सुयोग्य लाभ देवू नये. शिवाय लोकांनी हेल्मेट वापरावा म्हणून जनजागृती करावी. सक्ती करु नये म्हणजे झालं. हं, करायचंच आहे तर गती नियंत्रीत करण्यावर जास्त भर द्यावा. ज्यातून अपघाताच्या समस्या सुटतील, सोडवता येतील. ज्यात गाड्यांची गती प्रती वीस किंवा तीसच ठेवावी. असे आदेश निघावेत. ज्यातून अपघात निश्चीतच टाळता येवू शकतील. शिवाय गाड्यांची गती जर कमी असली अन् अपघात झालेच तर त्याची झळ कमी पोहोचेल. कारण क्षतीची तीव्रता कमी असेल यात शंका नाही. म्हणूनच गतीच्याच बाबतीत सक्ती असावी. हेल्मेट बाबत नाही.
लोकांच्या समोर असलेली हेल्मेट सक्ती. हा लोकांच्या विचारांचा प्रश्न होता. मृत्यू हा येणारच. मग हेल्मेट वापरा की आणखी काही वापरा असं लोकांचं म्हणणं. जर सरकारला पैसाच कमवायचा आहे तर तो हेल्मेट मधून न कमवता व हेल्मेट सक्ती न करता सरकारनं मंडप व मिळवणुकीवरही दंड लावला तर त्यातूनही बराचसा पैसा कमवता येईल. असं लोकांचं मत होतं.
नुकतीच शहरात एक प्रकारची जनजागृती होत होती आणि केली जात होती. ती जनजागृती होती, हेल्मेट वापराविषयीची. हेल्मेट हा लोकांच्या सुरक्षेचा विषय असून शासनानं गतकाळातच हेल्मेट वापरासंबंधी नियम बनवले. ज्यात दुचाकी चालकाला आणि चालकाच्या पाठीमागं बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरणं शासनानं सक्तीचं केलं होतं. आता जर या दोहोंपैकी एकानं जरी हेल्मेट वापरला नाही तर दंड होणार आहे. ज्यातून दंड म्हणून आलेल्या रकमेतून देशाचा विकास करता येईल. तेच धोरण राबवून नवीन कायदा असाही बनावा की मंडप टाकणाऱ्याला व नवरदेवाची मिळवणूक काढणाऱ्यालाही दंड व्हावा. जेणेकरुन त्यातून पैसा मिळेल व तोही पैसा देशाच्या विकासाच्या कामी येईल.
अलिकडील काळ म्हटलं तर दिखाव्याचा काळ आहे. या काळात गरीब कोणी आहे, असा दिसत नाही. लोकं श्रीमंत आहेत व त्यातच ही श्रीमंती एखाद्यावेळेस विवाह सोहळ्यात दिसून येते.
लोकं आजच्या विवाहसोहळ्यात एवढा पैसा खर्च करतात की ज्याची गणतीच करता येत नाही. प्रसंगी त्या विवाहसोहळ्याला रंगीत बनविण्यासाठी लोकं कर्जही काढत असतात.
पुर्वीही विवाहसोहळे व्हायचेच व विवाह सोहळ्यात लोकं आज जेवढा खर्च करतात. तेवढा खर्च करीत नसत तर त्यांची जेवढी चादर असायची. तेवढीच ते पसरायचे. ज्यातून त्या परीवारावर कर्जाचं डोंगर उभं राहात नसे. मात्र आज तसं नाही. आज शान वाढली आहे, ज्याला आपण दिखावा म्हणतो. लोकांजवळ आज पैसाच पैसा असेल असं वाटतं. त्यांचा तो भरजरी पोशाख, ती त्यांची लाली, ती त्यांच्या चेहर्यावरची सजावट. ते पाहून असं वाटतं की यांच्याजवळ पैसा किती असेल? परंतु प्रत्यक्षात शहानिशा झाल्यावर कळतं की त्यांच्याजवळ अजिबात पैसा नाही. ते फक्त दाखवणं असतं. विवाह सोहळ्याच्या बाबतीतही असंच आहे. जवळपास जरी पैसा नसला तरी लोकं विवाह सोहळ्यात एवढा पैसा खर्च करतात की वाटतं संबंधीत गृहस्थ किती श्रीमंत असेल. ती रोशनाई, ती सजावट, ते जेवन सगळं काही एखाद्या अतिश्रीमंत माणसालाही लाजवेल असंच असतं.
अलिकडील काळात कर्जामुळे आत्महत्या होत असल्याच्या घटना वारंवार घडत असलेल्या दिसून येत आहेत. कधी शेतीतून निर्माण झालेल्या आत्महत्याही दिसतात. त्यातील काही आत्महत्या या विवाह करण्यासाठी कर्ज उचलल्यानं व त्या कर्जाचा भरणा करता न आल्यानं, त्यातच त्याचं व्याज वाढल्यानं आणि त्यातच हफ्तेवसुलीवाले आपलं घर, आपली मालमत्ता जप्त करत असल्यानं निराशा येत असते व आत्महत्या घडते. हे सगळं जरी बरोबर असलं आणि आपल्यासमोर ते जीवंत उदाहरण असलं तरी आपण विवाह करतांना कर्ज हे उचलतोच. शिवाय त्या कर्जाची परतफेडही आपल्यानं होत जरी नसेल तरी आपण कर्ज उचलतो. त्याचं कारण आहे, शेजारील व्यक्ती घोड्यावर नाचतो ना. मग आपणही घोड्यावरच नाचायला हवं. परंतु त्यावेळेस आपण असा विचार करीत नाही की तो व्यक्ती त्याच्या नशिबानुसार श्रीमंत आहे, आपण त्याची बरोबरी करु शकत नाही. आपण लहानतोंडी मोठा घास घ्यायला नको. आपण लहानतोंडी लहानच घास घ्यावा. परंतु आपण तसे करु तेव्हा ना. आपण तसं करीत नाही व त्याच्यासारखंच वागायला पाहतो. ज्यातून आपण समस्येत फसतो. कारण शेजारील व्यक्ती आपण उपाशी असतांना आपल्याला जेवन आणून देत नाही. उलट त्याला मजाच वाटते.
विवाहसोहळ्यात चमकधमक असते. त्यातून असं दिसतं की विवाहसोहळ्यात किती खर्च करतात हे लोकं. ज्यात रोशनाई तिही गाण्याच्या तालावर थिरकणारी, ते त्या वधू वरांचं नृत्य. जणू स्वर्गातील इंद्र अप्सरेसोबत नृत्य करीत आहे आणि तो स्वर्गच आहे, असं धुशार वातावरण. या सर्व गोष्टी आज विवाहसोहळ्यात असतात. ज्याला अतोनात पैसा लागणार नाही तर काय? शिवाय असे करीत असतांना जो पैसा लागतो. तो पैसा आज काही लोकांजवळ असतो. सर्वांजवळ नसतोच. अन् ज्यांचेजवळ असतो, ती मंडळी खर्च करीत असतात. त्यांना तो पैसा खर्चही करायला किंतू परंतु वाटत नाही. कारण तो त्यांचा स्वकष्टानं कमविलेला पैसा नसतो. परंतु ज्यांचा पैसा स्वकष्टानं कमविलेल असतो. तो व्यक्ती जर असा खर्च करीत असेल तर ही बाब विचारात घेण्यालायक असते. कारण स्वकष्टाचा पैसा हा अशा विवाहसोहळ्यातील एवढा अवाढव्य थाट करायला पुरत नाही. त्यातच कर्जच काढावं लागतं. महत्वपुर्ण बाब ही की आपल्याजवळ जेवढं आहे, तेवढीच चार पसरावी. कारण दुसरा आपल्याला थंडी वाटत असल्यास चादर देत नाही. तसं पाहिल्यास कोरोनाच्या साथीपासून बरीचशी मंडळी सुधरली आहेत व ती मंडळी आता जास्त अतोनात पैसा खर्च करीत नाहीत. ते आता विवाह सोहळ्यासाठी एखादा सभामंडप न ठरवता आपल्याच घरासमोर मंडप टाकतात. तो त्यांचा खर्च वाचतोच. परंतु यात काही महाभाग एवढे चालू असतात की ते अख्ख्या रस्त्यावर मंडप टाकत असतात. ज्यात मंडप टाकतांना साधे पादचारी चालायलाही जागा सोडत नाहीत. मग गाडीवाल्यांचं ठीक असतं की त्यांना तो मंडप पाहता गल्ली फिरुन जातांना त्राण लागत नाही. थोडंसं पेट्रोल लागतं.
ते रहदारीचा रस्ता बंद करीत असतात. ज्यात त्या रस्त्यावर रहदारी करणाऱ्यांची गैरसोय होत असते. ते शासनाची परवानगीही घेत नाहीत. तशी परवानगी घेण्याला महत्व देत नाही. कारण शासनानं सध्यातरी त्यावर कंबर कसलेली नाही.
रस्त्यावर मंडप टाकणारी मंडळी ही जास्त श्रीमंत नसतात. ती गरीबच असतात. परंतु संपुर्ण रस्ता बंद करुन ते विवाह सोहळे साजरे करीत असतात. ज्यातून नागरिकांना त्रास होत असतो. ठीक आहे की जिथे सोयच नाही, त्याठिकाणी रस्ता बंद करायलाच हवा. परंतु जिथे सोय असते, तिथेही रस्ता बंद केला जातो. जणू तो रस्ता त्याच व्यक्तीच्या मालकीचा असतो.
शासनानं खरं तर असे मंडप जे गल्लोगल्लीत टाकले जातात. जे रहदारीचा रस्ता अडवतात. त्या रस्ता अडविण्यावर कारवाईच करायला हवी. चांगला दंडच लावायला हवा. कारण रहदारी करणाऱ्यांची अशा गोष्टीनं गैरसोय होत असते. कारण काही ठिकाणी मोठी जागाही असते. परंतु अशी जागा जरी असली तरी काही लोकं रहदारी करायला गल्ली सोडत नाहीत अन् त्यांना काही म्हणायला गेल्यास ते अरेरावी करतात.
अलिकडे लोकं घरासमोरच मंडप टाकू लागले आहेत. काही विवाह सोहळे करु लागले आहेत तर काही बारसे, अक्करमासे, जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवसं करु लागले आहेत. काही लोकं रस्त्यानं नवरदेवाच्याही मिळवणुका काढू लागले आहेत. ज्या मिळवणुकीतून रहदारी करायला मोठ्या अडचणीही निर्माण होत असतात. शिवाय अशी मिळवणूक काढणारी माणसं त्यांच्याच मालकीचा जणू रस्ता असल्यागत बादशाही थाटात चालत असतात. ते चालणाऱ्यांना रस्ताही देत नाहीत. ज्यात कधीकधी कोणाला अर्जंट जायचं असतं. कधी कोणाला अटॅक आलेला असतो व त्यातच त्या व्यक्तीचा जीव वाचवणं अगदी महत्वाचं असते. परंतु अशा उत्सवप्रसंगी वा मिळवणूक प्रसंगी जायला पुरेशी जागा न मिळाल्यानं शेवटी मरण पत्करावं लागतं. इथे जाणाऱ्याचा जीव जातो मंडप आणि मिरवणुकीच्या माध्यमातून. अन् त्यांना आनंद होतो. कारण सुग्रास जेवन मिळत असते म्हणून. म्हणूनच याबाबत विशेष सांगायचं झाल्यास शासनानं अशा मिळवणूक व रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या मंडपावर आवर घालावा व असा आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंड ठोकावा. शिवाय परवानगी घ्यायचं बंधन घालावं. अशी परवानगी देतांना ते किती आणि कुठून मंडप घालणार आहेत ते पाहावे. शिवाय विशेष करुन त्यांनी रहदारी करण्यासाठी पुरेशी गल्ली सोडली का याचा विचार परवानगी देतांना करावा. ज्यातून मंडप टाकणारे रहदारी करणाऱ्यांशी अरेरावी करणार नाहीत. तसेच दंड म्हणून मिळालेली रक्कम त्या त्या परीसराचा विकास करण्याच्या कामी येतील. या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरुन त्यातून राज्याचा महसुलही वाढू शकतो व त्या परीसराचाच नाही तर देशाचाही विकास साधू शकतो हे तेवढंच खरं.
सरकार त्यावर कर लावत नव्हतं, ना मिळवणुकीवर कर लावून पैसा कमवीत होतं. मात्र ते पैसा कमविण्यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्या लोकांना धारेवर धरत होते. कारण त्यांना त्या पैशातून लाडक्या बहिणीची दिवाळीची हौस पुर्ण करायची होती.