भाग 55
तेवढ्यात पुन्हा आवाज आला...."प्लीज बसा... चेअरवर... दोन मिनिटे... मी येत आहे."
आताही आवाज येत होते पण दिसत नव्हते कूणी..दोघी शांतपणे तेथे ठेवलेल्या चेअरवर बसल्या...
आणि मग.....
सावित्री काकू आणि मायरा दोघीही चेअरवर बसल्या वेट करत.
तेवढ्यात सावित्रीबाईंचे लक्ष गेले तेथील एका एलईडी बोर्डावर..तेथे लिहिलेल्या सूचना.... ह्या सुद्धा एकदम विशिष्ट अलग होत्या..
१. भांडण ही एक कला आहे... ही कला ज्याला अवगत होईल तो जगात कुठेही आरामशीर राहू शकतो.
२. आमचा कोर्स सक्रिय आहे... म्हणून येथे ट्रेनिंग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कासाठी भांडता येते.
३. जीवनात भांडण आवश्यक आहे.... आपले म्हणणे दुसऱ्याच्या गळी कसे उतरवाल... भांडण्याशिवाय....!!!
४. कधी कधी जीवनात साधे-सुधे भांडण चालत नाही त्याचा विकास करणे आवश्यक आहे... मध्ये मध्ये भांडणामध्ये उठाव येण्यासाठी अपशब्द कोणते वापरावे...?? शिव्या कोणत्या घालायच्या...?? सर्व ट्रेनिंग आमच्याकडे मिळेल.
५. सहज भांडण बरेच वेळा अनुपयोगी ठरते.... तर भांडण प्रभावी होण्यासाठी ऐनवेळी एखादी गुप्त गोष्ट उघड करून भांडणं जोरकसपणा कसा आणायचा ..??...सर्व व्यवस्थित येथे शिकायला मिळेल....
६. भांडण ही एक 65 वी कला आहे.... ही कला कशी सादर करावी...??? भांडणांमध्ये स्वतःचा महत्त्वाचा मुद्दा कसा विशद करावा.... ?? याचीसुद्धा ट्रेनिंग मिळेल... सक्रिय सहभाग घेण्यात येईल.."
७. माणसाला स्वतःच्या हक्कासाठी भांडता आले पाहिजे.प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करायची इथेच सक्रिय शिकता येईल.
सूचना वाचून झाल्यानंतर सावित्रीबाई आणि मायरा एकमेकीकडे पाहत होत्या...
तेवढ्यात बाजूच्या काचेच्या भिंतीत असलेला डोअर उघडल्या गेला.... अगदी जाणवत सुद्धा नव्हते तेथे डोअर आहे म्हणून...तेथून एक लेडी आत मध्ये आल्या.....
आणि चेअरवर बसल्या.व त्यांच्याकडे पाहत मंद हसत बोलू लागल्या....
"गुड आफ्टरनून लेडीज..... चक्रावल्या असाल ना तुम्ही बोर्ड वाचून...."
सावित्रीबाई....".... हां .....हे मात्र अगदी खरं आहे...... चक्रावले म्हणता नाही येईल..... इतकं कसं काय वेगळं सुचलं बाई.........म्हणून कमाल वाटली मात्र..... कदाचित जगातलं हे पहिलं क्कोचिंग क्लासेस असंल भांडणाचे..... तुझं काय म्हणणं आहे मायरा...??"
त्यावर मायरानेही त्यांच्या बोलण्याच्या समर्थनार्थ अर्धवर्तुळाकार मान हलवली मंद मंद हसत.
त्यावर तिखट मॅडम गडगडाटी हसल्या आणित्या म्हणाल्या,..."...चला .....मी तुम्हाला क्लासेस कसे चालतात .....??ते दाखवते .....म्हणजे तुम्हाला पूर्ण आयडिया येईल...."
एका रूम मध्ये सासू आणि सुनेचं भांडणाचे ट्रेनिंग सुरू होतं...
क्लास वर बोर्ड लिहिलेला होता....सासुबाई-सुनबाई प्राचीन काळापासून वैर असलेली...तर... सासूला कसे पळवाल...?? सासुबाईची बोलती कशी बंद करायची...??
आत मधली प्रॅक्टिस सुरू असलेली...
सुनबाई..."हे मात्र बरोबर नाही तुमचे सासुबाई.. मुलीसाठी साडी घ्यायची असेल तर महागडी घ्यायची....!! आणि मला साडी घ्यायची असेल तर खूप खर्च करते... कशाला लागते हिला महागडी साडी..... माझ्याजवळ किती का असेना साड्या...??? माझ्या नवऱ्याने घेऊन दिलेल्या आहेत ना.... माझा नवरा खंबीर आहे....मी रोज कामावर जाते ..संध्याकाळी थकून भागून येते....तरी घरी येऊन मी काम करायचं सगळं..आणि तुमची मुलगी ....ती कामावर गेली म्हणजे खूप काम करून दमून आली .... कशा म्हणता ती आल्याबरोबर..."बाई पिंकी ....खूप दमून आलीस का गं!! "आणि मी काय कंचे खेळायला जाते...का ऑफिसमध्ये....??? त्या करतील ते सर्व चांगलं असतं आणि मी... मी तेवढी वाईट... असं का..??? आणि हो..... काय म्हणता ते सारखे सारखे...???हा... नऊ महिने माझ्या पोटात वाढवलं माझ्या मुलाला.... हाल हाल करून जन्म दिला.... हे ऐकून तर मला खूप खूप कंटाळा आला आहे. लग्न झालं की मुलं होणंच आहे.. त्यात काय कर्तुत्व आलं...??"
सासुबाई.... "अगं ...अगं काय बोलते ..!!जिभेला हाड आहे की नाही..??"
सुनबाई...."कुणाच्याच जिभेला हाड नसते सासूबाई.... मलाही नाही तसंच.. तुमचं कसं आहे... दुसऱ्यांनी केलं ते चांगलं आणि मी केलं तेव्हा वांगलं..."
तेथे ज्या प्रोफेशनल ट्रेनिंग देणारे प्रशिक्षक म्हणून महिला होत्या त्या म्हणाल्या...."सासुबाई जर बिन बुडाचे बोलणे आपल्याला देत असेल नेहमी नेहमी तर सुनेने ते कधीच ऐकू नये.... जी खरी गोष्ट आहे....जी पटणारी नाही ....जे त्यांच्याकडून अयोग्य होत आहे .. ही जेव्हा जाणीव होते तेव्हाच स्पष्टपणे बोलून त्यांना त्यांची चूक दाखवून द्यावी म्हणजे पुढे त्या त्याप्रकारचे बोलण्यासाठी त्या विचार करतील... त्यासाठी सुनबाईमध्ये तोंडाळपणाचा गुण असलाच पाहिजे... कळलं का मुलींनो....!!"
मग पुढच्या वर्गावर जाण्यासाठी... लांब अशा व्हरांड्यातून पुढे जावे लागत होते....व्हरांड्यातल्या भिंतीवर डाव्या बाजूनेफलक लावलेले होते.....👉 कुठल्याही विषयावरून भांडता आले पाहिजे...👉 भांडणाला कोणताही विषय व्यर्ज्य नाही ...
तिघीही आता एका नवीन क्लास वर आल्या....
तेथील प्रशिक्षित टीचर सांगत होत्या..."डियर स्टूडेंट्स... कुठलाही विषय घेऊन भांडण करणे सहज सोप्प आहे...समजा आपण एखाद्या बीचवर गेलो.... आणि तिथे तुम्हाला एखादा कोणी ओळखीचा भेटला.... आणि त्याने तुम्हाला म्हटले... काय....?? ईकडे कुणीकडे...??तर आपण त्याला ताडकन जोऱ्याने उत्तर द्यायचे....का...?? इकडे काय फक्त तुम्हीच यायचे....?? आम्ही येऊ नये का...?? बीचवर कुणीही येऊ शकतो....
जोऱ्याने बोलल्यामुळे थोडीशी गर्दी जमते... एखादा हळूच म्हणतो....काय भांडकुदळ व्यक्ती आहे...??आपण लगेच उत्तर द्यायचे त्या शेऱ्यावर.... शांत बसायचे नाही.मी भांडकुदळ...का ??.... तुम्ही कोण मध्ये बोलणारे....??असे तोंड खूपसणारे जे असतात त्याला चोंबडा म्हणतात...
तर मित्रांनो भांडायचं असं की चार चौघे तर नक्कीच जमा झाले पाहिजे आजूबाजूला....."
बोलणे सुरूच होते पुढे...
पण आता सायंकाळची वेळ होते बघता.... सावित्रीबाई आणि मायरा.... पुढील क्लासकडे वळल्या....
त्यासाठी व्हरांडयातून पुढे पुढे चालू लागल्या...जाताना तिखट मॅडम माहिती सांगत होत्या...." असे आमचे अनेक वर्ग आहेत.... मुलांवरून कसे भांडायचे...??एकमेकांच्या लफड्यांवरून कसे भांडायचे...??दुकानदारासोबत त्याने केलेल्या भेसळीसंबंधी पॉईंट टू पॉईंट कसे भांडावे ...?? .... सब्जीमंडीत गेल्यानंतर भाजी विकणाऱ्या बायका असतात त्यांच्याशी कसा वाद घालून व्यवस्थित भावात भाजी घ्यायची...?? ...."
त्या सांगत होत्या सर्व डिटेल मध्ये... आणि ते ऐकून सावित्रीबाई आणि मायरा दोघींचेही डोके खरेच चक्रावून गेले होते...
भांडण तर दोघीही करणाऱ्या होत्या... पण तरीही पचनी पडायला जडंच जात होते दोघींनाही इतके सारे विषय पाहून...साधंसुधं आयुष्य जगण्याच्या अपेक्षा होत्या दोघींच्याही ...खरंच भांडणासाठी एवढं कौशल्य... आयुष्यामध्ये उपयोगी असतं...
तिखट मॅडम बोलत होत्या आणि मायरा विचार करत होती...सावित्रीबाई पण विचार करत होत्या... सर्व विषयासंबंधी इथे सुरू असणाऱ्या....
विचार करून करून सावित्रीबाईंचं डोकं भणभणंत होतं...त्यांचं आता अजिबात लक्ष नव्हतं....मायरा आणि तिखट मॅडम यांच्याकडे....त्या दोघीही आपसात चर्चा करत होत्या...
सावित्रीबाई यांचे लक्ष नाही आपल्या बोलण्याकडे हे बघून तिखट मॅडम म्हणाल्या...."कसला विचार करत आहात ...सावित्रीबाई...???"
तिखट मॅडमनी बस्स एवढे विचारलं आणि सावित्रीबाईंच्या डोक्यात सणक केली...बहुतेक इतका वेळ ऐकलेल्या भांडणांच्या क्लासचा परिणाम असावा....त्या एकदम जोरात बोलल्या तिखट मॅडम यांना...."काऊन बाप्पा...??? विचार काय फक्त तुम्हीच करायचा??आम्हाले काय देवानं बुद्धी दिली नाही अजिबात...?? तुम्ही शिकले सवरले जास्त म्हणून तुम्हालाच बुद्धी आहे..??? आमच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत?? काय समजता तुम्ही लोक स्वतःला?? भांडणाची शिकवणी काढली म्हणजे काय हातात आकाश गवसलं काय...??"
तिखट मॅडम या सावित्रीबाई यांच्या पवित्र्याने भांबावून गेल्या.पण लगेच सावरल्या....आणि कौतुकाने सावित्रीबाई यांना म्हणाल्या....
"वाहवा सावित्रीबाई.... अभिनंदन तुमचे.... किती थोड्या वेळात तुम्हाला भांडण करण्याची कला आकलन झाली हो...!!मी तर म्हणते... तुम्ही आमच्या कोचिंग क्लासला शिकवायलाच या.... बघा म्हणजे कसं आहे... आमच्याकडे स्टुडंट्स भरपूर आहेत कोचिंग साठी.... शिकविणारे फार कमी आहेत... कारण ही कला अवगत करणे... फारसं लोकांना जमत नाही... भांडण करणारे तर भरपूर असतात.... पण आम्हाला विषय कोणताही असताना सुद्धा मुद्देसूद भांडणारा शिक्षक पाहिजे....आणि मला तो तुमच्यात दिसत आहे... कॉन्ट्रीब्युटरी बेसवर याल का शिकवायला आमच्याकडे...??"
हे ऐकून मायराला फार फार आनंद झाला... पण आता मात्र भांबवण्याची पाळी सावित्रीबाई यांच्यावर आली...त्यांना आपण स्वप्नात तर नाही आहोत असे वाटत होते...आपल्याला कोणी असं नोकरीसाठी विचारेल अशी कल्पनाच केली नव्हती त्यांनी.....
सावित्रीबाई थक्क होऊन म्हणाल्या..."अहो... मी कसं कोणाला काय शिकवेल...?? मी तर निव्वळ दहावी पास आहे..... नाही बाप्पा...मला कसं कोणाला शिकवता येईल....."
तिखट मॅडम त्यावर म्हणाल्या...."अहो ...यासाठी शिक्षण खूप पाहिजे असं नाही....चालतंय की तुमचं पण शिक्षण..... मी म्हणते याच वेळेला येत जा तुम्ही उद्यापासून... एका क्लास वर माझ्या शिक्षक नाही आहे.... तिथे मला जावे लागते शिकवायला... रोज क्लास घेतल्यावर... तीनशे रुपये तासिका देत जाईल... चालेल का तुम्हाला...?? याच्यापेक्षा जास्त माझ्याने जमत नाही हो..."
सावित्रीबाई....."अहो.... मी घरी राहून काम करणारी बाई.... घराच्या बाहेर गेली की स्वयंपाक करते दोन घरी.... हे कसं जमन मला...??"
आता मायरा त्यावर म्हणाली...."काकू.... आता जसं जमलं ना तसंच..... जमेल हो...मी काय म्हणते तिखट मॅडम..... आम्ही येतो उद्या पुन्हा...तेव्हा तुम्हाला कळलं तर चालेल काय....??"
तिखट मॅडम...."ओके चालेल ... "
आता अंधार पडायला आला होता... दोघेही तेथून निघाल्या.... घरी आल्या.... आता अंधार गडद होऊ लागला... आल्या आल्या दोघीही सायंकाळच्या स्वयंपाकाला लागल्या....
मोहित आज जरा उशिराच घरी आला....तर... तिथे...
🌹🌹🌹🌹🌹