भाग 54
ती सर्व सुखाची आहुती देऊन त्याच्यासोबत आली होती.
आज ती त्याची... खऱ्या अर्थाने धर्मपत्नी झाली होती...
विचारांनी ती सद्गद होत आनंदी झाली.
डोळे अश्रू पूर्ण होऊन समोरचे धूसर दिसत होते...
आता तिला सुखावह मनस्थिती मुळे होणाऱ्या
वेदना जाणवत नव्हत्या...
फ्रेश होऊन ती धुंदीतच घरात आली...
तर समोर तो..
खाली बसून चहा गाळणीने गाळत होता ...
आत मध्ये येताच त्याने तिला टॉवेल दिला... बेडवर बसवले आणि हातात गरम गरम चहाचा कप दिला. आणि हळूच तिच्या माथ्यावर ओठ टेकून तिला म्हणाला...
"चहा पी छान .....गरम गरम आणि आराम कर... मी येतो जॉगिंग करून.."
त्यावर तिने हसत मान डोलावली....
........
आज जॉगिंग वरून आल्यानंतर....
असाच तो बसला... मायरा मन लावून स्वयंपाक करत होती... तर एकटक पहात बसला तिच्याकडे... वेगळंच समाधान दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर....
ते पाहून त्यालाही समाधान वाटले आणि मग आंघोळ करण्यास गेला... एक रविवार सोडला तर दोघेही ब्रेकफास्ट वगैरे काही करत नव्हते... लवकरच जेवण उरकून आपापल्या कामाला लागायचे....
आंघोळ करून आल्यानंतर... त्याने आपली तयारी आटोपली.
त्याचे आटोपलेले बघून....
मायरा म्हणाली....
"मोहित... मी आज छान हरभऱ्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या आहे... भात बनविणार नाही... चालेल ना तुला...."
त्यावर त्याने हुंकार भरला....
मग विचारू लागला....
"हरभऱ्याची भाजी...??"
मायरा...
"अरे ...काल सावित्री काकू आल्या ना...
त्यांनी आणली आहे त्यांच्या भावाच्या गावाहून... तर त्यांनी आपल्याला दिली थोडीशी.... तीच बनवली आहे आता..."
ती पोळ्या बनविण्यासाठी गव्हाची कणिक तिंबत होती...
तिचे सहज लक्ष मोहित कडे गेले... तिला मोहित हसताना
दिसला....
ती...
"का रे हसतोस...??"
मोहित....
"अगं... आज जॉगिंग करताना मी एक वेगळीच गंमत पाहिली.."
मायरा....
"काय पाहिलंस...?? सांग तरी..."
मोहित म्हणाला.....
"इथून उजवीकडे जवळपास दोन एक किलोमीटरवर एक बिल्डिंग आहे .... छान अशी सुंदर आणि भव्य आहे...
तेथे जवळपास दहा ते बारा रूम्स असतील... सेकंड फ्लोअर वर एक मोठा बोर्ड लावलेला होता....
"श्रीमती मिली चि. तिखट यांचे भांडणाचे क्लासेस...."
मायरा.....
"काय म्हणतोस...?? भांडणाचे क्लासेस...?? खरंच..."
मायरा ते ऐकून तीन ताड उडाली...
तेथे खरंच भांडखोरपणाचे प्रशिक्षण मिळत असेल काय...??
मायराला खूप उत्सुकता जागृत झाली जाणून घेण्याची...
पण ...खरंच भांडण शिकावं लागते....??.. त्याचा काही उपयोग होतो का..?? असे नानाविध प्रश्न मायराला पडले....
मायरा मोहितला मिश्किलपणे म्हणाली...
"मोहीत ...तुझ्यासाठी लावायचे का भांडणाचे क्लासेस..??"
तो अचंबित होऊन मायराकडे पाहू लागला.
मायरा त्याला समजदारीने म्हणाली...
"अरे....असं का बघतोस....?? मला तर असं वाटतं ....
भांडणं हे तुझ्या स्वभावातंच नाही...
(आता गंमतीने)....अम्म्..... तुला माहिती आहे का...??
थोडासा तू बावळट आहेस... थोडासा आताही अजागळ आहेस... (पण आता मात्र गंभीर होऊन)....
पूर्वी कधी मान वर करून बोलत नव्हता...
माशी हलत नव्हती चेहऱ्यावरची.....
दुसऱ्यांना त्यामुळे .....आत्मविश्वास कमी दिसून येत होता...
पण खरंच... तूझ्यात आता बरेच इम्प्रूव्हमेंट आहे ...
तूला आता असंच पूढे पूढे जाताना बघायचे आहे...
ए... पण मी लावणार....हं... क्लासेस..."
त्यावर मोहितनेही ..."हम्म्म ...."... म्हणून विषय संपवला.
त्याला काहीतरी वेगळाच विषय कोचिंगसाठी निवडलेला
वाटत होता ....आडनाव तिखट असलेल्या या महिलेने....... तिचं ह्या आगळ्यावेगळ्या विषयाच्या निवडीसाठी कौतुकही वाटत होते.
कारण अभ्यासाच्या विषयांची क्लासेस..... कपडे शिवण्याचे क्लासेस.... ब्युटी पार्लरचे क्लासेस... कराटे क्लासेस....
इत्यादी ....अनेक विषयाचे क्लासेस असतात हे माहीत होतं पण
भांडणाचे क्लासेस असतात ...??
...............हे... जरा नवीनच वाटत होतं...
त्याचं आजपर्यंत कोणाशी भांडण नाही..... तंटा नाही....
उलट मामाकडे राहत होता तेव्हा मामाच्या मुलीने कोणती
वस्तू मागितली तरी उदार मनाने देऊन टाकायची....
पार्वती मध्ये तेथे शहरात भेटायला येत होती तेव्हा....
तिला असे नजरेस पडले तर....
एक दिवस....ती मोहितला म्हणाली होती.....
"तू का देतोस तुझ्या वस्तू ...??.आता तुला परत मिळणार नाही."
त्यावर तो पार्वतीला म्हणायचा ..."जाऊ दे गं...
इथेच राहायचं आहे शिक्षण होईपर्यंत मला तर..."
त्याचं आयुष्य खरंच साधसुधं असं होतं.
असेल त्यात समाधान मानण्याची मोहितची वृत्ती लहानपणापासून मनात तयार झाली होती.
त्याला आठवलं तसं पुन्हा मोहित मायराला हसत सांगू लागला....
"अगं ...आणखीन एक गोष्ट मायू...तेथे त्यात वेल
क्वालीफाईड झालं की सर्टिफाईड डिप्लोमा मिळतो..."
हे ऐकून तर मायरा चक्रावून गेली होती.....
दोघेही जेवण करता करता या गोष्टीवर चर्चा करत होते...
त्याला जाणवले की ती.... आताही थोडी वेदना जाणवते आहे तिला बहुतेक.....तर....
आता तिच्या हनुवटीला हळुवार स्पर्श करत गंभीर स्वरात
मोहित म्हणाला.....
"मायू.... खरंच ....तुला कोणता त्रास नाही ना...!!
असेल तर स्पष्ट सांग..... अकॅडमीमध्ये माझे डॉक्टर्स फ्रेंड्स आहेत...
.... आपण त्यांच्याशी प्रॉब्लेम शेअर करू शकतो असेच आहेत ते....हूं..."
त्यावर ती हळूच हसत म्हणाली...
"होतेय थोडी वेदना.... बघूयात ना दिवसभर.... मी लिव्ह टाकलेली आहे आजची... आराम करते..."
मग विषय बदलवत ती मिश्कीलपणे म्हणाली....
"पण मी ना.... तू सांगितलेले कोचिंग क्लासेस पाहण्यासाठी उत्सुक आहे फार फार.... मी जाऊन बघणार आहे बरं... मला करायचा आहे तो कोर्स.... मग मी तुला भांडण शिकवंत जाईल आणि तुझ्यासोबत भांडणही करेन..."
.....
....
इकडे बाबाराव कुलकर्णी यांच्या बंगल्यात....
लता ह्या बाबाराव आणि राम सोबत अबोला घेऊन होत्या.
तितक्यात त्यांना फार फार आठवण येत होती मायराची...
तीन-चार महिने होत आलेले होते.... ती इथून जाऊन...
पूर्वी सुद्धा मायरा कॉलेजमध्ये होती तेव्हा ती तिकडेच राहायची शहरात... पण तेव्हा त्यावेळी लता यांना असं वाटत नव्हतं जसं आता वाटत होतं....
तेव्हा त्यांच्या मनाला असं वाटत होतं की शिक्षणाला गेली आहे मुलगी..... आणि ती परत येणारच आहे घरी....
पण आता त्यांचं मन खात होतं त्यांना की... तिने स्वतःच्या मताने लग्न केले आणि इथूनच ....बाहेरच्या जगात खरे पाऊल ठेवल्याबरोबर... तिच्यावर एवढे संकट यावे...
आणि तरीही .....आपल्या पोटच्या गोळ्याला आपण...
जवळ घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत.... आयुष्याची लढाई लढण्यासाठी बळ देऊ शकलो नाही....
मनातल्या मनात त्या झुरंत होत्या....
......
इकडे नेहमीचे रुटीन सुरू होते....
दोघे तनाने मनाने जवळ आलेले आता तरी मनं त्यांची भरकटली नव्हती. कर्तव्यदक्ष मायरा... मोहितला आपल्या पदराला कधीच बांधून ठेवत नव्हती.... आणि मोहितही
मायराचा समजूतदारपणा बघून आणि ती जी त्याच्या प्रगतीसाठी तडफड करत होती ती ..वृत्ती पाहून
तो कधी कधी भारावून जायचा स्वतःच्या नशिबावर.....
एक दिवस रात्री जेवता जेवता मोहित म्हणाला....
"पाहून आली का कोचिंग क्लासेस भांडणाचे...???"
मायरा...
"अरे ...मी तर विसरलेच होते ...बरं झालं ...आठवण करून दिलीस असते... ते मी जाते त्या कोचिंग क्लासेसच्या अपोजिट साईडला आहे ना....!!! म्हणून लक्षातही राहिले नाही... आता उद्या सुट्टी आहे... तर पहातेच मी जाऊन... सावित्री काकूंना पण घेऊन जाते सोबत...."
मोहीत त्यावर हसत म्हणाला....
"काकूंना पण शिकवतेस का भांडण...??"
मायरा...
"अरे ...मग काय....??? हे तर कोणीही शिकू शकते ....याच्यासाठी वयोमर्यादा थोडी पाहिजे..."
मायरा आपले लायब्ररीचे काम आटोपून तिच्या नेहमीच्या कोचिंग क्लासेसला जाऊन आली.... तेव्हा साडेतीन-चार वाजत आले होते संध्याकाळचे....
सावित्रीकाकूला तिने अगोदर सांगून ठेवले होते या क्लासेस विषयी.... पण मात्र स्वतःला क्लास लावण्याविषयी सांगून ठेवले होते...
एक तर आता चार वाजून गेलेले आणि विरुद्ध दिशेने ती एकटीच जाणार आहे क्लासेसच्या चौकशीसाठी म्हणून
त्या तिच्यासोबत तिथे गेल्या....
एक ते दीड किलोमीटर गेलेल्या असतील तर एकदम ठळक अक्षरात एका दोन मजली बिल्डिंग वर मोठा बॅनर लावलेला होता...
"श्रीमती मिली चि. तिखट यांचे भांडणाचे क्लासेस...."
दोघीही.... नवलाने त्या बोर्ड कडे पहात होत्या....
सावित्रीबाई या सुद्धा वर्ग दहापर्यंत शिकलेल्या होत्या.
त्यामुळे त्यांनाही वाचता लिहिता येत होते छान पैकी..
बोर्ड कडे पाहत असताना सावित्रीबाई बोलल्या....
"नवलच आहे बाई एकेक.... भांडणाचे क्लासेस???
नाव पण पहावं बाई ते शिकवणारीचे.....
मिलीची तिखट भांडणाचे क्लासेस...."
असं म्हणत त्या खळखळून हसायला लागल्या...
त्यावर स्मित करत....
मायरा....
"काकू ...चला तर आत मध्ये.... बघू तर द्या..... लहानपणापासून भांडण केले मी बरेच वेळा.... पण आता मोहितसोबत राहुन भांडण विसरली... तो मला भांडण करण्याचा चान्संच देत नाही.... इथे क्लास लावण्याचा विचार करत आहे मी.... आता माहित झालं ही एक कला आहे.... या आपल्यातल्या या कलेचाही विकास होईल की... कल्पनाच नव्हती .... ते पाहायला मिळणार आहे आज.."
पायऱ्या चढता चढता मायरासोबत....
सावित्रीबाई म्हणाल्या......
"शिक बाई... शिक.... पण तुला सांगते मोहित वर आजमावू नको ...बाई.... पोरगं इतकं चांगलं शांत समंजस मनमिळाऊ आहे..... त्याला व्यवस्थित जप.... त्याला शिकव मात्र तू भांडण..."
त्या बोलतच होत्या तशा दोघीही रिसेप्शनवर पोहोचल्या....
तिथे एक लेडी बसलेली होती...
तिच्याजवळ मायराने चौकशी केली असता तिने कॉल करून माहिती केले आणि या दोघींना केबिनकडे जाण्याचा इशारा केला....
मायराला फारच उत्सुकता होती जाणून घेण्याची ...
कोण असावं ही महिला...... श्रीमती मिली तिखट....
केबिनचे दार उघडले.... मायराने ... आणि आतमध्ये जाण्यापूर्वी परमिशन मागितली....
"मे आय कम इन मॅम...."
आतून एका स्त्रीच्या आवाजात उत्तर आले....
"येस... कम इन..प्लीज..."
मायरा आतमध्ये आली आणि त्यांच्या पाठोपाठ सावित्रीबाई सुद्धा आल्या.
आल्यावर मात्र दोघी बघत होत्या... तिथे टेबल समोरची बसण्याची खुर्ची असते अधिकाऱ्याची ....तेथे कोणीच नव्हते समोरच्या चेअरवर...... ती रिकामी होती...
दोघीही उभ्या राहिल्या.... आत मध्ये येऊन ....बावरलेल्या अवस्थेत.... दिसत कोणीही नाही पण आवाज तर आला.
तेथेच उभ्या राहून इकडे तिकडे बघू लागल्या.... बसावे की नको बसावे... येथे असणाऱ्या चेअरवर ...हा विचार करू लागल्या..
तेवढ्यात पुन्हा आवाज आला....
"प्लीज बसा... चेअरवर... दोन मिनिटे... मी येत आहे."
आताही आवाज येत होते पण दिसत नव्हते कूणी..
दोघी शांतपणे तेथे ठेवलेल्या चेअरवर बसल्या...
आणि मग.....
🌹🌹🌹🌹🌹