सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी जंगलातून एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.
उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले नाही , पण जाणे भाग होते म्हणून त्याला टाळताही आले नाही.त्याची एकुलती एक मुलगी सुंदरा हिला पहीले मुल झाले होते व त्यातल्यात्यात रामनवमीची जत्रा भरणार होती .लग्न झाल्यापासून लेक माहेरला आली नव्हती . तसे बापाशीवाय तिला आपलेसे माहेरी कुनीही नव्हते . तिला बाळंत झाल्यामुळे माहेरीही येता येत नव्हते म्हणून तिने आपल्या बापाला निरोप धाडला होता.सखाराम चालला होता. त्याला अजून कित्येक मैल पायी तुडवायचे होते . त्याने सदुला घोडगाडीही विचारली होती , पण रात्र होनार हे ठाऊक असल्याने त्याने नकारले. सखारामने आपल्या चालण्याचा वेग वाढवला . आता झाडी विरळ होत चालली होती . सखाराम चालून चालून पुर्ण थकला होता.समोरच त्याला थोडा अंधूकसा पिवळा प्रकाश दिसला. वाटेवरुन काही अंतरावर एक घर होते व त्याच घराच्या खिडकीतून दिव्याचा पिवळा प्रकाश बाहेर पडत होता.सखारामला थोडे बरे वाटले की वाटेत एखादे घर मिळाले व त्या घरातून लख्ख प्रकाश येत आहे म्हणजे घरातील माणसे झोपलेली नशतील.न कळत सखारामचे पाऊल त्या दिशेने उचलले गेले , कारण तो फार थकला होता आणि त्याचा अगदी कोरडा पडला होता . असी त्हान त्याने कधी अनूभवलेली नव्हती.
सखाराम घराजवळ पोहचला. त्या घराचे दार उघडे होते व त्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता . काही अंतर गेल्यावर सखारामला आनखी काही घरे दिसू लागली . तब्बल शंभरहून अधिक होती , म्हणजे ते एक गाव आहे तर ! सखारामचे लक्ष त्या घराकडे खिळले , ते घर संपूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेले होते , त्या घराचे दार लोखंडी दिसत होते व त्याला लोखंडी कड्या ही होत्या. त्या गावातील घरे ही अस्याच प्रकारची दगडी बांधकाम केलेली होती व काही घरे नुसती गवताने बांधलेली झोपडीसारखी होती .सखारामच्या नजरेने हे सर्व निरीक्षण हेरले व तो चकीत झाल , इतक्या जुन्या पद्धतीने बांधलेली घरे आताच्या काळी तरी कसी टिकून असतील ती सुद्धा एक नाही गावातील अर्धी अधीक घरे असीच होती ; पण हे घर मात्र इतर घरांपेक्षा अधीक प्रसस्त आणि मोठे होते .सखाराम विचाराच्या काहोराने गोंधळून गेला , इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे , आपण परत माघारी फिरले पाहिजे . म्हणून तो लगबगीने वळला तोच त्याला एक हाक ऐकू आली , "ओ SSS पाव्हन् कुठे चाललात ?तो आवाज एकून सखाराम दचकला, तो परत मागे वळला . एक धोतर नेसलेली , पिकलेल्या मिसांची व डोकीला एक लांब शेंडी असलेली व्यक्ती मघाशी पाहीलेल्या घरातून बाहेर आली होती . ती व्यक्ती शरीरानेही धिप्पाड होती.ती व्यक्ती परत अवाक झालेल्या सखारामलाम्हणाली ," पाव्हण ! असे माघरी का वळलात ? , जरा घटका विश्रांती घ्या , बरेच थकलेले दिसतात आपण!"एकदाची सखारामला खात्री पटली की हा आपल्या सारखाच मणूष्य आहे , उगीचच घाबरलो आपण असा विचार करत सखाराम मणोमन हसला .
सखारामला अधीकच थकवा जाणवू लागला व अधीकच तिव्र त्हाण. सखाराम म्हणाला ," होय बराच थकवा आलेला आहे आणि गळा सुध्दा कोरडा पडला आहे , मला थोडे पाणी भेटेल का ? ती व्यक्ती ," का नाही , आपण आत या !"चार-पाच दगडी पायऱ्या चढून सखाराम घरात आला.लांबून लहान भाषनारे घर आतून फारच भव्य होते. मोकळा परिसर व खेळती हवा , दगडी खांबावर केलेले नक्षीकाम फारच सुंदर दिसत होते.एक बाई पाण्याचा तांब्या घेऊन आली . तांब्या पितळाचा होता व त्याच्या आकाराची ढब सुध्दा वेगळी होती , पिवळ्या प्रकाशात तो आनखीनच चमकला . सखारामने त्या तांब्यातील पाणी संपवले ." अच्छा ! पाव्हण आपण कोण व एवढ्या रात्री कुठे चाललात ?", त्या व्यक्तीने सखारामला विचारले .सखाराम म्हणाला ," मी सखाराम , रामपूरला माझ्या लेकीकडे चाललो आहे ; तसे आपण कोण ? आपली ओळख पटली नाही ? "" मी श्वेतकमल व ही माझी बायको कमळा", श्वेतकमल म्हणाला . दोघांनी ओळख करून घेतली आणि त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या.................."आपल्या गप्पा संपल्या असतील तर, जेवणाला या ! जेवण तयार आहे .", कमळा त्या दोघांना ऊद्देसून म्हणाली.दोघांनी हात धुतले व ते पाटावर बसले. जेवणाचा छान सुगंध येत होता . सखारामने थाट पाहीले त्यात पंचपक्वान सजवलेले होते व त्यांचा अमृततुल्य सुगंध वातावरणात दरवळत होता . सखारामची भुक उफाळून उठली , तो अधासासारखा जेवू लागला . तो खाण्यात गर्क होता , त्याचे लक्ष श्वेतनाथ व कमळा कडे नव्हते . त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच हास्य पसरलेले होते.जेवण केव्हा संपले सखारामला समजलेच नाही, त्या गरीबाला समजनार तरी कसे ? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच पंचपक्वानांचा स्वाद त्याने घेतला होता .
सखारामचे डोळे जड पडू लागले , त्याचे शरीरही खूप थकल्यासारखे त्याला वाटू लागले . सखाराम श्वेतकमलला म्हणाला ," मला थोडी विश्रांती घेता येईल का?"श्वेतकमल थोडे हसत म्हणाला ," का नाही ? आपण आज रात्री इथेच झोपा व सकाळी पुढच्या प्रवासाला जा!"" मी आपला खुप , खुप आभारी आहे .", सखाराम म्हणाला .सखारामला अंथरूणावर पडल्या क्षणी गाढ झोप लागली.
अचानक सखारामला जाग आली . तो डोळे चोळत उठून बसला . समोरचे दृश्य पाहून तो हादरलाच . समोर कित्येक काळ्या सावल्या उभ्या होत्या . त्यांच्याच प्रभावाने सखारामला जाग आली होती . तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता , तरी आवाज काही केल्या त्याच्या तोंडातून निघत नव्हता......... ... त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागचे हलताही येत नव्हते . तो फक्त आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी समोरचे दृश्य पाहत होता. बघता बघता त्या काळ्या आकृत्या आपला मानवी आकार धारण करू लागल्या . त्यातील एकाच्याही धडावर डोके नव्हते , नुसत्या रक्ताने माखलेले तुटलेल्या डोक्यांची मानवी शरीरे उभी होती . त्यात कित्येक स्त्रिया , पुरुष व लहान मुलांचा समावेश होता .आता सखाराम चांगलाच घाबरला , त्याचे संपूर्ण शरीर भितीने थरथरत होते , शरीर घामाने चिंब भिजलेले होते वरून घाम पाण्यासारखा ओंघळत होता. सखाराम एखाद्या मुर्ती सारखा बसून समोर घडत असलेल्या घटना बघत होता . भितीने त्याची स्थिती पुरती खराब झाली होती .आता वाचनेच शक्य नव्हते , कारण समोरच अंशी - नव्वद च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रते उभी होती .
कथा वाचल्या बद्दल ,........... 🌹 धन्यवाद - आभार 💐 and Tanks👍
टिपः पुढचा भाग लवकरच येईल.......