भाग 52
सावित्रीबाई.....
"ऑनलाइन बोलवलं ना तर एक तासात येते इथं...
जास्त वेळ लागत नाही.. मी स्वयंपाक करायला जाते ना त्यांच्या घरचे तसंच करतात...."
दोघींनी चर्चा केली आणि....मग....
.....
ऑनलाइन फोल्डिंगचा बेड आणि त्यावरची गादी अगदी तंतोतंत होणारी कापसाची ... तिही बोलावली....
मायराची हुशारी... मनमिळाऊपणा आणि विनम्र स्वभाव
यामुळे सावित्रीबाई तिच्याशी छान बोलायच्या...
आणि सगळे एका मुलीप्रमाणे तिला समजवून सांगायच्या....
त्यांच्याकडूनच ती काटकसर करणे शिकली होती आणि निभावून... नेणे सुद्धा शिकली होती...
मायरा त्यांना म्हणाली....
"काकू तुम्ही आलात पण आज तर काकांची ड्युटी मागच्या गेटवर आहे... त्यांना सांगितलं की नाही...??"
सावित्रीबाई म्हणाल्या....
"त्यांना माहीतच नाहीये बाई... मी तर उद्या येणार होती... पण म्हटलं काय करायचं भावाच्या घरी राहून... आपला माणूस इकडे एकटाच राहतो... उद्या आलं काय न आज आलं काय... काय फरक पडणार...??"
त्यावर मायरा म्हणाली....
"अहो.... हे तर मग काका साठी सरप्राईज झालं की....!!"
सावित्रीबाई त्यावर सलज्ज हसल्या....
"या बया... आमच्यासाठी कुठे सरप्राईज असतं...??"
मायरा म्हणाली...
"काकू... आता तुम्ही त्यांना सांगू नका आलात ते...!!
ते येण्याच्या वेळेवर... दरवाजा खोलून ठेवा पण आत मध्ये राहा.... त्यांना आपोआप सरप्राईज मिळेल ...
आनंदी होतील ते.... तुम्ही नाही आहात तर कालपासून शांत शांतच आहेत..."
लवकरच एक ते दीड तासाच्या अंतरात फोल्डिंग बेड आणि गादी आलेली.. थोडा विचार करून तिने तसेच... ऑनलाइन बेडशीटही बोलाविली होती.... तीही आली सोबतच लगेच..
मायराला फार फार आवडली... स्वकमाईतून घेतलेली ती वस्तू... तिच्यासाठी फार फार मोठी गोष्ट होती...
संध्याकाळपर्यंत वाट पाहणे तिला फार जड गेले...
घर खर्चाला लागणाऱ्या वस्तूंच्या व्यतिरिक्त उरलेले पैसे होते ते... खाली झोपण्यामुळे तिचे अंग फार दुखत होते..... खर्चात खर्च तिने घेऊन टाकलेली गादी आणि पलंगही....
जवळपास आता तीन महिने होत आले होते तिथे येऊन..
आणि तिच्या कोचिंग क्लासला एक महिना होऊन गेलेला तर तिला तिथून पैसे मिळालेले होते... त्यातूनच तिने हा उद्योग केला होता आजचा...
नवीन जबाबदारी आणि नवीन आव्हान या सगळ्यातून त्यांना वेळ मिळत नव्हता... दोघांनाही...
आज तिने सावित्रीबाई यांना विचारून भरली वांगी बनवली आणि लवकर स्वयंपाक आटोपला....
खोलीत एका साईडने पलंग छान व्यवस्थित टाकला त्यावर गादी अंथरली आणि... त्यावर नवीन बेडशीट....
तिला माहीत होते ...आता थोड्या वेळात मोहित येईल...
नवीन वस्तू घेतली आहे तर काहीतरी गोडधोड बनवावे..
असे मनात येऊन तिने.... गॅस शेगडीवर चहा मांडला...
मोबाईल घेऊन मोहितला तसा मेसेज केला...
कारण आता त्याचे क्लासेस संपलेले होते आणि लायब्ररीही बंद होण्याची वेळ झालेली होती.....
या वेळेला तो आता एक्सरसाइज देण्याच्या हेतूने...
जाणार तर त्या अगोदर त्याला...
मेसेज करावे या हेतूने...
वाट बघू लागली... मोहितने काही मेसेज पाहिला नाही..
शेवटी तिने सावित्रीबाई यांना बोलावले आणि दाखविले
घरात कसा बेड टाकलेला आहे ती जागा...
त्या पण... तिने व्यवस्थित लावलेला बघून आनंदल्या...
चहा पिता पिता मायराला आनंदाने म्हणाल्या...
"हे चांगलं बाकं झालं... आणि आता पाळणा पण हलू द्या की लवकर..."
त्यावर मायरा लाजली आणि...
मायरा...
"काय हो काकू..?? .... आत्ताच तर आमचे लग्न झाले.... अजून मोहित.... त्याचे क्लासेस सुरू आहेत... आधी तो एक्झाम मध्ये पास झाला पाहिजे... मग पाहू..."
सावित्रीबाई......
"ते तर होतंच राहील गं... पण हे ही तर वेळेवर व्हायला पाहिजे ना... याच्यातंही उशीर व्हायला चालत नाही बाई... एकदा का बीज कमी झालं किंवा संपलं आणि अंगात खोड आलं... की मंग प्रयत्न केले तरी... पोरं बाळं होत नाही... आता देशसेवा करणारे सैनिक तिकडे असतात ... पण इकडे त्यांच्या बायका सर्व व्यवस्थित करतातंच ना...."
सावित्रीबाईंनी तिला चार उपदेशाचे शब्द सांगितले. आणि नंतर वॉचमन काका आता येतील म्हणून त्या मायराने सांगितल्यानुसार सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाल्या
.....वॉचमन काकांना.
वॉचमन काका जवळ आले.. तेव्हा मायरा बाहेर उभी होती मोहितची वाट बघत आता येईल मग येईल म्हणून...
वॉचमन काकांना त्यांच्या घराचा दरवाजा खोलून दिसला त्यामुळे ते सरसर आले घराजवळ आणि मायरा दिसताच तिला विचारू लागले...
वॉचमन काका....
"पोरी ...आमच्या घरी कोणी आलय का...??"
मायरा....
"माहिती नाही काका... मला वाटलं तुम्हीच घरी आहात..."
वॉचमन काका....
"पोरी ...गंमत करते होय काकाची... मला आला भाजीचा सुगंध... सावित्रीच आली आहे..."
मायरा....
"काय हो काका.... सरप्राईज देणार होतो... आता ते तर काही राहिलंच नाही...."
त्यावर वाचमन काका हसत...
बाजूला पाणी भरून ठेवलेले.... एका बकेट मध्ये... तेथे पाय धुवत.... चेहऱ्यावरूनही पाणी घेतले.....
त्यांचा चेहरा उजळलेला आता....
आणि घरात गेले....
.....
इकडे मोहित येत नाहीये... म्हणून हिरमुसून मायरा आत जाऊन
उद्याला कोचिंग क्लास मध्ये शिकवण्याच्या टॉपिकचा स्टडी करू लागली...
ती आता तल्लीन होऊन आपला स्टडी करत होती...
गरज असेल तेथे नोट्स पण तयार करत होती...
अंधार झालेला आता... बाहेर....
मोहित आला तरी तिचे लक्षंच नव्हते..... त्याने घरात आल्यावर बेड आणि गादी बघितली तर त्याला समाधान वाटले......
त्यालाही माहीत होते तिच्या अंगाला खाली झोपण्यामुळे त्रास होतो ते...
ती नोट्स काढण्यात गुंग दिसल्यामुळे त्याने टावेल घेतला आणि बाहेरच्या दिशेने पण थोडे आडोशाला बाथरूम सारखा शेड होता ...तेथे जाऊन स्वच्छ हात पाय धुतले आणि आत आला.
तरीही ती गुंग दिसली अभ्यासात... आता त्याला फार भूकही लागली होती तर त्याने आवाज दिला.
मोहित....
"मायू...."
तसे तिचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि ती आनंदली...
हातातले सगळे ठेवून दिले ....उत्साहात उभी झाली आणि म्हणाली....
"मोहित... बघ ...आपला बेड... छान आहे ना...!!"
असे बोलता बोलताच तिने त्याचा हात पकडला आणि त्याला बेड जवळ घेऊन आली...
त्याला तिथे बेडवर बसवले....
"कसा आहे...??"
त्याला तिचा उत्साह बघता... तिचा आनंद बघूनच... छान वाटले होते....
" मस्त... कधी आणलास...??"
मायरा....
"दुपारीच बोलावलंय ऑनलाईन.... कोचिंग क्लासेस च्या पहिल्या पगारातला.... सावित्री काकूंनी सांगितले की ऑनलाईन घेतला की स्वस्तंही पडतो आणि फोल्डिंगचा बेड घेण्याचे ही त्यांनीच सुचवले बर.... तुला माहिती आहे का...
मी वाट बघत होते तुझी दुपारपासून... मला सर्वप्रथम तुला बसवायचं होतं बेडवर.... इतक्या वेळ पाहायला लावली वाट... सायंकाळी मी चहा पण बनवला होता काहीतरी गोडधोड करावे म्हणून... पहिल्यांदा आपण इथे एक मोठी वस्तू घेतली आहे ना...."
असं म्हणत म्हणत तिने साखरेच्या डब्यातून एक चमचा साखर घेतली ती सांडू नये म्हणून खाली झाकण पकडले आणि मोहित कडे घेऊन आली...
इशारानेच तिने त्याला हात पुढे करायला सांगितले आणि त्याच्या हातावर अर्धा चमचा साखर ठेवली...
त्यानेही साखर देण्यामागची तिची मनशा ओळखली आणि खाऊन घेतली शांतपणे...
मोहित....
"काय आहे ...गं...हे.... माझी बसण्याची वाट काय बघायची...?? आराम करायचा ना बेडवर दिवसा... आणि हे असं खाली स्टडी साठी बसण्यापेक्षा याच्यावर बसत जा...!!"
मायरा....
"होय रे .... बसत जाईन आता..."
मोहित.....
"मायू... काय बनवलं गं आज जेवायला.... खूप भूक लागलेली आहे आज... लवकर जेवायचं का आपण प्लीज..."
मायरा..
"होय चल... जेवू ....मी पण वाट बघत आहे तुझी... भरली वांगी ,भात , चपाती. बनवली आहे जेवणात... तुला भरली वांगी आवडते ना म्हणून बनवली.. आज शिकली मी काकूं कडून...."
मायराने जेवण गरम केलं..... दोघेही जेवले लवकर...
पण जेवताना मात्र मायरा मंद मंद हसत आहे असं त्याला जाणवत होते....
मोहितने जेवताना विचारलं ही याबद्दल... पण तिने त्याला त्यावर.... काही नाही.... असे सांगितले पण तिला मात्र
सावित्री काकूंचे बोलणे ऐकून.... आता तिच्याही मनात त्याच दृष्टीने इच्छा जागृत होत होत्या....
तेव्हा तर ......त्यांनी म्हटले तेव्हा तिले ते पटलेले नव्हते......
पण आता जशी जशी त्या विषयावर विचार करत होती तसे तसे तिचे मन आता आनंदून... त्या दिशेने तिला पावले उचलावी वाटत होते....
जेवण झाल्यानंतर.... दोघांनीही मिळून आवर सावर केले...
जेवल्यावर लगेच झोप येत नाही आणि ते चांगले पण नाही.....असे वाटल्यामुळे.... दोघेही शतपावली करण्यासाठी बाहेर कॅम्पस एरियामध्ये फिरू लागले...
कोणीही नसल्यामुळे... शांत आणि थंड वातावरणात.....
आज हळूच अंगावरून थंडीची शिरशिरी जात होती.....
आज त्यांच्यासोबत वॉचमन काका आणि सावित्री आल्या नव्हत्या.... आणि आजच काकू गावाहून आल्यामुळे
दोघांनीही त्यांना आवाज दिला नव्हता....
तसे ते चौघेजणही रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रोज मिळून जायचे तेव्हा जवळपास एक ते दीड तास फिरायचे...
दिवसभर मोहित बसून क्लासेस करणे आणि अभ्यास करत असल्यामुळे... त्याला अशा फिरण्यामुळे बरे वाटायचे...
पण आज कोण जाणे त्याला थकल्यासारखे वाटत होते...
..... त्यामुळे पंधरा मिनिटांतच दोघेही परत आले...
दूरूनच येताना त्यांना दिसले की वॉचमन काकांच्या घरचे सर्व लाईट्स बंद आहेत...
मायरा....
"एवढ्या लवकर काका आणि काकू झोपले का रे...??"
त्यावर मोहित म्हणाला....
"हळू बोल गं..... दोन दिवसांनी काकू आल्या...तर खुशीने सेलिब्रेट करत असतील...."
असे मायराच्या खांद्याला आपल्या खांद्याने धक्का देत खट्याळपणे म्हणाला....
मायरा....
"हम्म्म... तुझ्यासारखे सर्वच बोरिंग थोडी राहणार आहे..!! बघ बघ.... या वयातंही किती उत्साह आहे दोघांमध्ये...."
मोहित....
"ए मायू..... चिडवू नकोस हा ...सांगून ठेवतो.. नंतर मग पश्चाताप करशील...!!"
मायरा....
"....पश्चात्ताप.... कशाला करू मी...."
मोहित....
"ओके.... खरंच.... चल... नवीन बेडचं आज उद्घाटन करूया मग..."
मायरा....
"आवाज नको करू आता... जवळ आलोय आपण.... छान नाही वाटत असं... तुझ्या पायातल्या बुटांचाही आवाज करू नको...."
मायराने म्हटल्यावर त्याने पायातले दोन्ही बूट हातात घेतले..
आणि तिच्या पायातील चप्पल काढण्याचा तर प्रश्नच नव्हता.
कारण फिरताना तसाही मायराच्या पायातल्या चप्पलचा पट्टा तुटलेला आज...... त्यामुळे तिने ती तिकडेच डस्टबिनमध्ये टाकून दिलेली... तशी ती चप्पल ही जुनी झालेली होती ...
आणि ती अनवाणी आली....
घराच्या जवळ येताच मात्र....
🌹🌹🌹🌹🌹