भाग २५
सावलीने मग थेट तीचा बेडरूममध्ये जाऊन त्या कॅमेराची रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणून कोमलला दाखवले
आणि म्हणाली, " मी या खिडकी आणि या व्यक्तीबद्दल विचारत आहे. " हे बघून कोमल मात्र आता थोडी घाबरली आणि मग चतुरपणे उत्तरली, "हे कसले व्हिडीओ मला दाखवत आहेस तू आणि कुणाचा घरचे व्हिडिओ आहेत हे. मग सावली म्हणाली, "वाह कोमल फारच छान अभिनय करतेस तू. चिकित्सा माझ्या डोक्याची सुरु होती आणि विसर तुला पडतो आहे. हे आपल्याच घराचे आणि तुझ्या या खिडकीचा बाहेरचे व्हिडीओ आहेत.' मग कोमल उत्तरली, " आपल्या घराचा बाहेर आणि आतमध्ये कॅमेरा तर मी कधीच नाही पहिले तू माझ्याशी खोट बोलते आहेस.” तेव्हा सावली म्हणाली, "मी मागचा पंधरवाड्यात हे कॅमेरा बसवून घेतले कारण कि मला त्या पंधरवाड्यात हि व्यक्ती आपल्या घराचा भिंतीवरून उडी मारून पडताना दिसली होती. त्यामुळे आपल्या घराचा सुरक्षेसाठी मी ते बसवून घेतले.' मग कोमल बोलली, "अच्छा ते घराचा सुरक्षेचा नावावर तू माझ्यावर पाळत ठेवत आहेस. तुला माझ्यावर केव्हापासून आणि कसला संशय आहे. तेव्हा मात्र तेथील वातावरण फारच तापले होते. तेवढ्यात तेथे सावलीची आई आली आणि तीने कोमलला म्हटले, "बेटा कोमल मागे आपल्यावर अनेको जीवघेणे प्रसंग संकट आले होते. त्याचाच दुष्परिणाम कि सावलीवर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याला सावलीचा एवजी तू बळी पडलीस. देवाची आपल्यावर कृपा होती आणि आहे म्हणून तुझ्या प्राणाचे काही बरे वाईट न होता फक्त आणि फक्त तुझ्या पायांचे नुकसान त्या वेळेस झाले होते. आता देवाने तो अडथळा हि आता संपूर्ण नाहीसा केलेला आहे त्याचमुळे तुझ्या पायांचे ऑपरेशन झाले आणि तू हि आता चालायला लागशील. तर बेटा त्या सगळ्या संकटांत आपण तीघीही एकट्याच सापडलेलो होतो. शिवाय आपण तीघीही स्त्रिया आहोत त्यातल्या त्यात तू अपंग, मी म्हातारी म्हणून सावलीने आपल्या सगळ्यांचा सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. ते कुणाचे अहित करण्यासाठी नव्हे तर सगळ्याचे हित साध्य व्हावे यासाठी.”
तेव्हा मात्र कोमलला तीची चूक कळून चुकली आणि तीने सावलीची माफी मागीतली. परंतु प्रश्न तेथेच होता. अखेर ती व्यक्ती कोण होती आणि कशासाठी आपल्या घरात विशेषतः कोमलचा रुममध्ये आलेली होती. सावलीने मग पुन्हा प्रश्न केला, "आता तरी खर सांग कोमल ती व्यक्ती कोण होती.' आता कोमलला हि वाटू लागले कि तीने सत्य बोलावे म्हणून ती सांगू लागली, "ताई तो माझ्या कॉलेज मध्ये शिकणारा एक मुलगा असून त्याचे नाव शशांक आहे." मग सावली म्हणाली, " तर मग हे तू आधीच का नाही सांगितले, शिवाय तो असा लपूनछपून खिडकीचा द्वारे का बर येतो. सरळ सरळ आमचा सगळ्यांचा समोर का बर येत नाही. " तेव्हा कोमल म्हणाली, "ताई आम्ही दोघे एकमेकांशी प्रेम करतो." तेवढ्यात सावली जोरात बोलली, "काय? काय म्हटलेस तू." तेव्हा कोमल म्हणाली, “होय तू जे ऐकलेस तेच मी बोलत आहे." सावली मग बोलली, " तू कॉलेजमध्ये शिकायला जाते कि हे सगळे धंदे करायला जातेस. तुला समोर चांगले शिक्षण घेऊन आपल्या स्वतःचे कॅरीअर बनवायचे आहे. अशा व्यर्थचा गोष्टीत लक्ष घालशील तर आपला आणि आपल्या आयुष्याचा सत्यानाश करून घेशील. तेव्हा कोमल म्हणाली, "ताई आता या तुझ्या तथ्यासाठी काहीच जागा उरली नाही. शिवाय आता खूपच उशीर होऊन गेलेला आहे. आम्ही एक दुसऱ्याचे कधीचेच झालेलो आहोत. म्हणून आम्ही पुढे संपूर्ण जीवनासाठी एक होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग सावली आणखी ओरडून म्हणाली, "बघ कोमल मला हे सगळ काही चालणार नाही. तू फक्त आधी तूझे शिक्षण पूर्ण कर आपल्या स्वतःचा पायावर उभी हो मग काय तुला करायचे आहे ते कर. त्यानंतर मला तुझ्या आयुष्यात कसलीही दखल द्यायची नाही." कोमल आणि सावलीत फारच वाद होत असलेला बघून आई म्हणाली, " शांत व्हा दोघीही आणि सावली तू तुझ्या रुममध्ये जा." असे म्हणून सावलीला तीने बाहेर पाठवले. थोड्या वेळाने आई सावलीचा रुममध्ये आली आणि म्हणाली, “बेटा ती लहान आहे, तीला बर आणि वाईट यातील फरक कसा करायचा याबद्दल ज्ञान नाही आहे. तर तू आणि मी आपल्या परीने त्या मुलाचा बाबतीत माहिती काढू आणि नंतर कोमलला कशा प्रकारे समजवायचे आहे त्याबद्दल विचार करू' आईचे ते बोलने सावलीला एकदम उचित वाटले आणि ती स्वतःला शांत करून आपल्या ऑफिसचा कामाला लागली होती. मग काम करता करता सावलीचा डोक्यात विचार आला, "माझी गाडी पंचर करणारा कोण आहे, मला घरी येण्यास उशीर झाला पाहिजे म्हणून माझी गाडी पंचर केलेली होती कि आणखी काय? जर याच कारणासाठी तसे केलेले होते तर तो पंचर करणारा हाच शशांक तर नाही आहे." आता सावलीला शशांकवर संशय होऊ लागला. तीला वाटू लागले कि शशांकचे धागे दोरे त्या फोन करणाऱ्या संगे तर जुळले नाही ना. सावली असा विचार करते तोच तीला काही अनिष्ट घडण्याचे संकेत मिळू लागले.
शेष पुढील भागात.....