भाग 49
त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला....
"काय झालं...?? बायकोलाच तर बिलगतो...!! संयम बाळगून आहे मी समजलं... सीमारेषा अजूनही पार केलेल्या नाहीत...
ऐकतोय ना तुझं सगळं याबाबतीत... तेवढं तर मी सोडणार नाही... पण आता उठत जाईन ...तू म्हणते ते बरोबर आहे."
त्यावर मायरा म्हणाली....
" हम्म्म...??.....चल.. Sleep......"
आता तिथे राहून त्या एरिया मध्ये सर्व बहुतेक इंग्लिश
बोलत असल्यामुळे दोघांमध्येही आता बोलण्यात
भाषेमध्ये बराच फरक आला होता.. पुष्कळसे इंग्लिश वर्ड त्यांच्या बोलण्यात येऊ लागले.. तसे बोलायचे बरेचसे
मराठीत पण तरीही काही ना काही आता इंग्लिश वर्ड येऊ लागले होते बोलण्यात.
दोघेही स्वतःमध्ये झालेला बदल observe करत होते..
तो तिला घेऊन तसाच लेटून होता... तिला त्याच्या मिठीमध्ये छान ऊब मिळाली तर आणखी सरकून त्याच्याजवळ झोपली. तोही तसाच स्थिर राहून तिला मिठीत घेऊन पडला होता.
अंगावरची चादर थोडी त्याच्या बाजूने मिठीत अडकल्यासारखी वाटत होती म्हणून तिने आता हळूच डोळे किलकिले करून पाहिले तर त्याने थोडे कपडे हटवत जे अडकत होतं ते बाजूला करून मोकळं करून दिलं.
आता ती... तिच्या मनात आता मिश्किलपणा निर्माण झाला. आणि अर्धवट उठून त्याला बघत प्रेमाने त्याच्या माथ्यावर ओठ टेकवून खांद्यावर मान ठेवली.
त्यावर त्याने कड पलटून टर्न घेतला तिच्याकडे आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्याकडे पाहू लागला अंधुक प्रकाशात....
तो....
"हे काय होते....??"
मायरा....
" लाड...."
तो...
"आजपर्यंत असा लाड केला नाहीस कधी...."
मायरा....
"आतापर्यंत हक्क दाखवत होती....पण आता मात्र लाड करेन..."
आता मात्र त्याला कधी नव्हे ती चिढ आली.... त्याने तिच्या पाठीकडून हात घालून केसांना मागे गच्च पकडून चेहरा उंचावला.... आणि रागात म्हणाला....
तो....
" ये.... हे बघ .....मला हे असं आवडणार नाही... मला तुझं हक्क दाखवनंच आवडतं... समजलं..."
तिचं माहित नाही पण त्याला आता अनावर इच्छा झाली.... अगदीच असह्य झालं तर त्याने वाकून तिच्या मानेवर किंचित ओठ टेकून तसाच पडून राहिला.
तिच्या अंगभूत सुगंधाने त्याला कसंतरी होऊ लागले...
मिठीघट्ट होऊ लागली त्याची. तिलाही त्याचा स्पर्श हवाहवासा होऊ लागला.
स्पर्शाने तिच्या हलक्या विलग झालेल्या ओलसर गुलाबी ओठांवर अगदी अर्ध्या सेकंदासाठी ओठ प्रेस करून अलग केले.
त्यावर तिने झटकन त्याला जवळ ओढून घेतलं. दोन्ही हाताने कानाजवळ पकडून तिने त्याच्या खालचा ओठ दातात धरून सोडला आणि तो नखशिखांत हादरला.
आता मात्र तो आपले ओले ओठ....
तिच्याजवळ आणत... घोगऱ्या आवाजात म्हणाला....
" यु आर प्लेइंग विथ मी... मायू... धिस इज नॉट फेअर.."
आता त्याने पुढे होत अलवार ओठ तिच्या मानेवर टेकवले.
नंतर नंतर अनावर होऊन गच्च दाबून ठेवले... सॉफ्ट स्किन तिची जोरात ओठांत ओढून घेतली... तिच्या तोंडून अस्फुट हूंकार निघाला ..... आपसूक तिचा उजवा हात त्याच्या
कंबरेकडून पाठीवर फिरू लागला.... दोघांच्याही चेतना चाळवलेल्या त्या ....आता उद्दीपित व्हायला लागल्या सन्न सन्न करत...... आता तिच्या थरथरत्या ओठांवर... पाठोपाठ ओठ टेकले गेले.
त्याच्या अशा ओल्या ओठांच्या स्पर्शाने तिच्यातल्या स्त्रीचेतना चांगल्या जागृत झाल्या होत्या. त्याने हळूच कुर्त्याच्या आत हात घालत सपाट पोटावर स्पर्श केला... ती त्याच्या मिठीत..
त्याच्या स्पर्शात हरवून जाऊ लागली.
कंबरेवरील त्याचे बोटं बांधा चाचपू लागले... त्या कोमल स्पर्शाने तो मोहून गेला... पुन्हा वेडावून पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला.
त्यावर तिने शहारून घट्ट मिठीत घातली.. वाऱ्यालाही शिरायला जागा नव्हती एवढी....
आता कुठे तो भानावर आला...?? आणि त्याला वाटलं की त्याने आपली लिमिट क्रॉस केली बहुतेक... असं वाटून तो म्हणाला मायराला....
"सॉरी मायू... मला राहावलंच नाही... आय कान्ट कंट्रोल माय सेल्फ...."
त्यावर मायरा म्हणाली...
"इट्स ओके... होतं असं कधी कधी.... पण चांगलंही आहे... रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं..."
असं ती खट्याळपणे म्हणाली आणि त्याच्या केसांत बोटं घालून केस त्याचे विस्कळीत केले.
मोहित (मिश्किलपणे)...
"रिफ्रेशिंग... हं.....मला असं रिफ्रेश व्हायला ....
आणि रिफ्रेश करायला फार फार आवडेल.... करत जाऊ आपण असं रिफ्रेश एकमेकाला..."
मायरा....
"ह्या ssss ट ....लबाड कुठला...!!"
कंबरेत हात घालून तिला पुन्हाजवळ ओढून घट्ट...
आता तो मात्र थोडासा गंभीर सुरात म्हणाला....
" मायु .....थँक यु ....थँक यु सो मच...... मला समजून घेतल्याबद्दल ......मला सगळ्या गोष्टींमधून सावरल्याबद्दल...
तू जर नसतीस तर न जाणे आज मी काय केलं असतं ...???कुठे असतो ...??? काय करत असतो...?? कांट इमॅजिन.."
त्याचा एकूण ती त्याला समजावणीच्या सुरात
हळूच म्हणाली.....
"मोहित ....आता आपण मागचा विचार सोडून देऊ.. जे झालं ते झालं रे आता.... तू ही तर मला किती किती समजून घेतलं...?? खरं तर ....मी तुला थँक्यू म्हणाला पाहिजे."
मोहित.....
"खर सांगू ...मायू... तुला पाहिलं आणि तू मला फार फार आवडली होती पण माझ्यात हिंमत नव्हती...
पण तू मला प्रेम करायला शिकवलं .... आणि तुझ्यामुळे प्रेम निभावनं सुद्धा शिकलो मी...."
मायरा....
"किती समजून घेतोस रे... कधी कधी मला तू... एवढा समजदार आहेस तर मला अपराधीपणाची भावना येते.. कदाचित माझ्यामुळेच तुझं कुटुंब पणाला लागलं असं वाटते..
इतकं प्रेम करतोस तर कधी कधी भीती वाटते की..."
मोहित....
"..शू .... रिलॅक्स मायू... जे प्रारब्धात आहे तेच घडतं...
आता काही विचार करू नकोस... आहोत ना आपण सोबत आता... काही काळजी करू नकोस....
पार्ट टाइम जॉब तुझा व्यवस्थित चाललेला आहे...
मला तर असं वाटतं कधी कधी की माझ्यामुळे तुझा प्रोग्रेस खुंटावलेला आहे... तुझ्यामध्ये आणखी इम्प्रूमेंट होऊ शकते...
पण माझ्यामुळे तू गुंतलेली आहेस आता...
सॉरी गं.... ए मायू... नाहीतर असं करू का आपण...??
मी इथून बाहेर कुठेतरी कोचिंग क्लासेस मध्ये मला शिकविण्याचा चान्स मिळते का बघू काय..??
म्हणजे आपल्या संसाराला थोडासा हातभार लागेल.... "
मायरा....
"मोहित... तुला एक विचारू का ....??
रागवणार तर नाहीस ना....!!"
मोहित......
"हा विचार..."
मायरा.....
" म्हणजे बघ... आपल्याला पार्ट टाइम जॉब मधून पैसे
मिळत आहे पण येथे ते पुरेसे नाही... असं आपण खाली चटईवर झोपलेलो आहे पण हे धोकादायक आहे ना रे...
मग थोडसं अजून आपला अर्निंग सोर्स जर वाढला ....
तर आपल्याला आणखीन थोडसं व्यवस्थित राहता येईल..
तर मी म्हणत आहे की .......माझा लायब्ररीचा टाईम दोन तासाचा आहे... बाकी वेळ माझ्याकडे रिकामा असतो....
.. मग मी बाहेर आहेत जवळ कोचिंग क्लासेस... तेथे ट्राय करून बघते म्हणजे माझं नॉलेज थोडं अपडेट राहील आणि सायंकाळी कम्प्युटर क्लास जॉईन करायचा विचार करते आहे... तुला काय वाटतं ...?? तुझं काय मत आहे...??"
मोहित त्यावर विचार केल्यासारखा काही क्षण ....
थांबला आणि म्हणाला...
"बघ म्हणजे तुझ्याने होत असेल तेवढेच कर... जास्त दगदग करू नको.... तसा तू छान निर्णय घेतलेला आहे.. कम्प्युटर क्लासेसचा विचार मला फार फार आवडला... पण कोचिंग क्लासेस म्हटलं तर तुला दगदग होईल का...??
त्यापेक्षा मी करतो कोचिंग क्लासेस... म्हणजे एक्झामसाठी माझ्या मदतीचे होईल... आणि चार पैसे पण मिळतील..."
मायरा....
"अरे पण... तुझे इथले क्लासेस जे आहे त्यामध्ये काही खाडा नको पाहिजे.... मी करते ना कोचिंग क्लासेस जॉईन...."
ती पुढे काही बोलणार आणखी तर त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला.....
मोहित.....
"शू sss बरं ....ठीक आहे.... आपण दोघेही आपल्याला जसं जमेल तसं करू... दोघांचंही नॉलेज इम्प्रूव होईल... पण तू जास्त दगदग करू नको... मला माझी मायू भरून भरून पाहिजे जिकडून तिकडून ... मला झिरो फिगर वगैरे काही आवडत नाही बरं मी सांगून ठेवतो...तुला शक्य होईल तेवढेच कर... ज्यात तुला आनंद वाटेल ते कर... स्वतःची हेळसांड करायची नाही."
त्यावर तिने आनंदाने हुंकार भरला.... आणि त्याला घट्ट बिलंगली...
काहीतरी आठवल्यागंत बाजूला झाली आणि त्याच्या गालावर हात ठेवून त्याच्याकडे पाहत म्हणाली...
"मोहित... मी आता जे काही करीन... किंवा कोचिंग क्लासेस शोधून तेथे शिकवेन तेव्हा मला जे पैसे मिळतील ना ..
तेव्हा यार .....मला अगोदर आपल्या दोघांसाठी झोपण्यासाठी एक गादी घ्यायची आहे... या चटईवर झोपल्यावर ना...
अंगाला कसल्या सारखं होतं..."
तिने असं म्हणताच... त्याला भरून आल्यागंत झालं...
आणि त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट घेतलं... व तिला तसाच पकडून ऊताणा झाला... स्वतःच्या अंगावर तिला ओढून घेतली...
आता तो तिला म्हणाला....
"ठीक आहे... तोपर्यंत... असं झोपत जा माझ्या अंगावर...."
मायरा....
"अरे.. पण तुझं अंग दुखेल ना...."
मोहित....
"झोप गं... नाही दुखणार... आणि आता मी माझ्या बायकोला असं घेऊन झोपण्यासाठी रोज सकाळी व्यायामसुद्धा करणार आहे."
मायरा....
"मग तर मी रोजंच अशी झोपू शकेल.... गादीची काय गरज मग मला...??"
कितीतरी दिवसांनी आज त्यांच्यात असं भरभरून बोलणं झालं. नाहीतर दोघे आपापल्याच ... कामात गुंतले होते.. हे करायचं आहे ....ते करायचं आहे याच्यात..
खूप दिवसांनी असा वेळ मिळाला दोघांना.
मोहित आता चेष्टावारी म्हणाला..
" बरं... चल आता झोप ...खूप वेळ झालाय.. "
मायरा....
"नाही ना ...थांब नारे थोडा वेळ... किती दिवस झाले ..??आपण असं बोललो नाहीये... प्लीज थांब ना... आत्ताच नाही झोप येत..."
मोहित....
"घड्याळ पाहिली का राणी...??"
मायरा....
"ए ....तू मला आज राणी म्हणाला.... तू म्हणत जा ना मला ....राणी ....किती छान वाटतं....??"
मोहित....
"बरं ....मी म्हणत जाईल तुला राणी.. पण आता झोप गं बाई नाहीतर बघ... मग तुला कठीण जाईल.... मी किती संयमाने वागत आहे....?? तू अशीच माझ्या अंगावर पडून चुळबुळ करत असली ना.... तर मला जास्तंच काहीतरी फील होईल... कठीण होईल हा.... मग मला सगळं आवरणं स्वतःला... फिलिंगच्या लेव्हलने उंची गाठली ना.... तर कहर होईल गं ..
मी आवरू शकणार नाही मग...."
हळूहळू मोहित तिच्याशी संवाद करत होता...
पण हे ऐकताच ती पटकन त्याच्या अंगावरून खाली
उतरली आणि बाजूला लेटली...
तसं तो कडावर होऊन इमॅजिन करू लागला की ती किती बावरली असेल ....?? त्याच्या या बोलण्याने....तो हसू लागला...
पुन्हा मग तिच्या कंबरेत हात घालून......
🌹🌹🌹🌹🌹