Niyati - 48 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 48

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 48







भाग 48



त्यावर मोहितने.... पाणावलेल्या डोळ्यांनी.... वरखाली मान हलविली....



ताराआजी पुढे बोलल्या....
"बापू आता जास्त विचार करू नकं... ज्याचं आयुष्य जेव्हळ लिहिलं आहे तेवढंच त्याले भेटतं.
तवा... लवकरात लवकर पुढच्या शिक्षणाले लाग..."


मायराला एक नजर पाहून मोहित स्मशानभूमीकडे गेला.
तिथे गेल्यावर त्याला आपले आई वडील आजूबाजूलाच
आहे असा भास होत होता....

तिथेच थांबून यांची चिता जिथे जाळली होती तिथे एकटक पाहत उभा राहिला.

......


मायरा तीथे आली... आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मनामध्ये चाललेल्या विचारांमधून तो बाहेर आला आणि

मायरा म्हणाली.....
"मोहित.... मला माफ कर ... मी तुझ्या आयुष्यात आले.. आणि तेव्हापासून तुझ्या आयुष्यात उलथा पालथ झालीय ना..... आई बाबा पण...... आपल्यापासून दूर निघून गेले.. "

मोहित.....
" नाही...नाही...मायू...असं काही नाहीये. त्यांना दूर केलं गेलं...गं..."


मायरा....
" त्यालाही कारण मीच आहे ना.....माफ कर मला....
मी जर तुझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित आई-बाबा आता जिवंत असते तुझ्यासोबत."



मायरा असे म्हणाली आणि त्याला कसे तरी झाले...

मोहित.....
"असं काही नसतं.. मायू ...
बघितलं ना...आता तारा आजी..काय म्हणाली ....??
ज्यांचं जेवढं आयुष्य असतं तेवढेच ते जगतात...
प्रारब्धात जसं असतं तसंच होतं..."

मायरा त्याला म्हणाली....
"मोहित.... मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे... ते माझ्या हातून काहीतरी... असं झालेलं आहे की मला फार फार भीती वाटत आहे....रे.."

मोहित....
"काय झालं सांग .....मायू ...मला पूर्ण.... सर्व सांग जेवढं 
तुला आठवतं तेवढेही ... मलाही तुला विचारायचं होतं गं.. 
हे सर्व झाल्यामुळे आपल्याला बोलायलाच नाही भेटले..."

त्याने असं म्हणताच तिला खूपच भडभडून आलं.... 
आणि ती त्याला बिलगून रडू लागली. 


सांगावे की सांगू नये या संभ्रमात तिचे मन हेलकावंत असतानाच मोहितने तिच्या हनुवटीला हळुवार स्पर्श केला 
आणि तिची नजर आपणाकडे वळवून तो म्हणाला....
"सगळं सगळं सांग ....काही लपवू नकोस ...मायू.."
आणि मायराने तोंड उघडले.... सांगू लागली...



त्याने हळूहळू तिच्या पाठीवर प्रेमाने कुरवाळत धीर दिला... तसे तसे ती एक एक गोष्ट तिला ज्याप्रमाणे आठवत होते त्याप्रमाणे सांगत गेली... आणि ती जशी जशी सांगत होती तसे तसे त्याच्या अंगाचा तिळपापड  होत होता... त्याच्या हाताच्या मुठी क्रोधाने आवळल्या गेल्या होत्या.

ईकडे ती सांगत होती आणि त्याच्या हृदयात ज्वाला भडकली होती क्रोधाची... इतकी की त्याच्या शरीराच्या नसा ताणल्यासारख्या त्याला वाटत होत्या......


आता त्याला समजले होते की तिचा कुर्ता तेवढा कसा काय फाटला...??? आणि तिच्या अंगावर इतके सारे कुत्रे झुंडीने का झडप घेत होते....??
त्यांना रक्ताची वास येत असावी बहुतेक.....!!


तिचे बोलून झाले आणि ती पुन्हा मुसमुसू लागली.


तसे तो म्हणाला....
"मायू.... तू जे केलंस ....ते योग्य केलंस.... स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी केलंस.... तुझी काहीच चूक नाही....
आता फौजदार साहेब येत आहेत...तर तेव्हा आपण  त्यांना 
सर्व काही सांगू..... तू स्वसंरक्षणासाठी केलेलं आहेस. तुला काहीच होणार नाही... मी आहे तुझ्यासोबत... अजिबात चिंता करू नकोस.."


तो बोलतच होता ...तिला धीर देत होता... तर तिने मुसमुसत आपले डोळे पुसले आणि सहज वळली तर तिचे डोळेच मोठे झाले.. धडकी भरली तिच्या हृदयात.... तिच्याकडे पाहत मोहित ही त्या दिशेने वळला तर....


दोघेही बोलत होते तेव्हा तेवढ्यात तेथे फौजदार साहेब आलेले.
त्यांच्यासोबत बाबाराव  आलेले.. फौजदार साहेबांच्या आग्रहाखातर....त्यांनी या दोघांचे सर्व काही ऐकलेले आत्ता बोलतानाचे....
तेही मायराची संपूर्ण कहाणी ऐकून सुन्न झाले.



बाबाराव यांची नजर.... नजरेत लाल निखारा... भरलेला.....
आज पर्यंत फुलासारखी नाजूकपणे जपली... मायराला....
आणि एवढंसं तिला काही झालं म्हणजे त्यांचं काळीज 
धडधड करायचं... एकुलती एक लेक....

त्यांच्या मनातंच आलं नाही .... आपल्या मुलीसोबत असं काही होईल.... ती जेव्हा मोहितला हळूहळू एक एक गोष्टी  सांगत होती... तेव्हा तिच्यावर जे जे बितली... ते ते ऐकून त्यांचं हृदय रडत होतं... पण जेव्हा स्वतःचं शील वाचवण्यासाठी तिने जी हिम्मत एकवटून... त्या नराधमाला कंठस्नान घातले आणि आपली अब्रू वाचवली त्यावेळी त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटला.....



फौजदार साहेब तर... त्यांनी मायराची कहाणी ऐकल्यावर तिच्याविषयी त्यांच्या मनात अपार सहानुभूती दाटून आली होती.... मनात आले त्यांच्या....
"प्रारब्धवशात कोसळलेले संकट म्हणावे लागेल..."


फौजदार साहेबांना तिची दया येत होती. पण त्या संकटांशी तिने ज्या कणखरपणे मुकाबला केला ते पाहून त्यांच्या मनात तिच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता.


खरंच... अशा बाहेरच्या उघड्या जगात ज्यावेळी स्त्रीचे चारित्र्य खरोखरंच धोक्यात असते त्यावेळी जर ती एकाकी अवस्थेत असेल तर तिने ह्या मायरासारखा वाघिणीचा अवतार जर धारण केला आणि आपल्या स्वतःचे शील वाचविले तर... 
...असं जर शौर्य प्रत्येक स्त्रीमध्ये आणि मुलीमध्ये असेल
तर तिला अबला म्हणण्याची गरज पडणार नाही.




फौजदार साहेब....
"मोहित.... मायरा..... तुम्ही दोघेही चिंता करू नका.
सगळं व्यवस्थित होईल ...तुला न्याय मिळेल...
आणि मोहित तुलाही थांबावं लागेल तीन-चार दिवस...
तुझ्याही आई-बाबांबद्दल... त्यांच्या खुनाबद्दल ठोस पुरावे
मिळतील लवकरच... मी बाबाराव यांना तुझं तिकीट कॅन्सल करायला सांगितलं आहे.... येथील लवकरात लवकर आटोपून घेण्याचा मी प्रयत्न करीतच आहे मग तू आणि मायरा दोघेही जावं"

मोहित एक नजर बाबाराव यांच्याकडे फिरवत फौजदार साहेबांना म्हणाला ...
"ठीक आहे ...फौजदार साहेब. मायूचा तर... काही दोष नाही आहे ना... तिला तर तुम्ही अटक नाही करणार ना... तिला त्या क्षणी ते करण्याशिवाय पर्याय नव्हता हो... नाहीतर तिच्या अब्रूचे.... मला तर इकडे बोलतानाही  थरकाप होतोय अंगाचा... तिच्यावर कोणता प्रसंग आला असेल तुम्हीच विचार करा ना..."


फौजदार साहेब.....
"हे बघ मोहित... मला माहित आहे... त्यावेळी काय स्थिती असेल मायराची... स्वसंरक्षणासाठी तिने केलेलं हेही समजते मला...?? पण... मला वाटतं तुम्ही याची वाच्यता कुठे करू नका सध्या... पुढचे मी बघून घेईन... फक्त तुम्ही दोन-तीन दिवस थांबा येथेच..."


बाबाराव जरी तेथे काहीही न बोलता दूर उभे असले तरी त्यांना मनातून आपल्या मुलीला काळजाशी घ्यावे असे वाटत होते. पण तरीही ते चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता कठोरपणे उभे होते... कारण हेच की... मायरानेच पुढचे जीवन जगण्याचा खडतर रस्ता निवडलेला होता... स्वमताने... तेव्हा तिला आता अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागेलच... हे तिने स्वीकारावे...
आपण जर आता प्रेमाने कुशीत घेतलं तर ती नेहमीच आपला आधार बघत बसेल... असं त्यांना वाटत होतं...

आणि ते तटस्थपणाचे चेहऱ्यावर भाव घेऊन उभे होते जणू आपण त्यांचे कोणीच नाही याप्रमाणे....



मायरालाही त्यांच्या प्रेमळ कुशीत जाण्याची फार फार इच्छा होत होती पण तीही.... हा विचार करत होती की... आपणच हा रस्ता निवडलेला आहे.... आणि त्यांनी पूर्वीच सांगितलेलं की लग्न झाल्यानंतर त्यांचा आणि तिचा संबंध नसेल... मग आता आपण कसं त्यांच्या जवळ जावं...


दोघेही बापलेक आपापल्या ठिकाणी विचार करत होते...
मायरा केविलवाण्या नजरेने आपल्या वडिलांकडे बघत होती.
आणि बाबाराव तिच्याकडे लक्ष नसल्यासारखे दाखवून नजर चुकवत होते...


पार्वती आणि कवडू यांच्या खुनाविषयी मोहितने फौजदार साहेबांशी चर्चा केली.... त्या चर्चेत मात्र बाबाराव सुद्धा सहभागी झाले होते... पार्वती आणि कवडू यांच्या खुनाविषयी ते जमेल तशी मदत करत होते पण एवढा वेळ तेथे उभे आहेत पण स्वतःच्या मुलीसोबत एक अक्षर सुद्धा बोलत नाहीत हे बघून मोहितला अपराधीपणाची भावना येत होती... त्याच्या मनात आपण या गोष्टीला कारणीभूत आहोत म्हणून...


फौजदार साहेब .. आणि.... बाबाराव बाहेर उभे होते... तर  पथकातील काही पोलिसांनी मोहितच्या घरातील कोपरा आणि कोपरा शोधून काढला पुराव्यासाठी पण त्यांच्या हाती कोणता सुगावा लागला नाही.
ते हताश होऊन बाहेर आले...

फौजदार साहेबांना... काहीच पुरावा मिळाला नाही हे सांगू लागले...
मोहित म्हणाला त्यावर...
"फौजदार साहेब ...मी प्रयत्न करू का काही..."

त्यावर फौजदार साहेबांनी होकारार्थी मान हलवली..
पण ते म्हणाले....
"मदत कर शोधायला पण कुठेही हात लावू नकोस. तुला काही दिसून आले वेगळे तर पोलिसांना आवाज देऊन सांग..."

मोहित...
"ठीक आहे.. साहेब"

तो पोलीस कर्मचाऱ्या बरोबर आत मध्ये गेला आणि इकडे तिकडे शोधू लागला... जवळपास अर्धा तास ते सर्व शोधत होते पण काहीही अधिक गवसले नाही...
हताश होऊन तेथे भिंतीवर असलेल्या.. शंकरजीच्या फोटोकडे पाहून हात जोडून.. उभा राहिला दोन क्षण.
आणि डोळे उघडले...
आणि समोर नजर जाताच त्याची...
त्याच्या नजरेत चमक आली..... 
आणि त्यांनी तेथील पोलिसांना आवाज दिला....
तसे तेथील पोलीस.... त्याच्याकडे वळून पाहू लागले...

तर त्याने बोटाने इशारा केला....
तिकडे तो पोलीस बघू लागला... त्याचा आवाज ऐकून फौजदार साहेबही तेथे आले आणि ते सुद्धा बघू लागले...

जेथे बघत होते ती एक लाकडी उभ्या पाट्यांनी बनवलेली... भिंत होती....बाहेरून तिला... छापलेले होते पण आतून मात्र तिच्या पाट्यापाट्या तशाचं ठेवलेल्या होत्या... तेथे एक काळ्या धाग्यात लॉकेट लटकंत होतं.. म्हणजे धागा लटकत होता आणि सोनेरी लॉकेट ते पाट्यांच्या फटीमध्ये लटकून फसलेलं होतं..

पोलीस कर्मचाऱ्यांनी तो पुरावा आपल्याजवळ घेतला...
आणि सर्व बाहेर आले... घराला सील करून दिले पुन्हा.



बाहेर दुर उभे असणारे बाबाराव... त्यांनी विचारले तेव्हा फौजदार साहेबांनी त्यांना... पॅक केलेले ट्रान्सपरंट पॉकेट मधला पुरावा दाखवला.... तर त्यांनी सांगितले की नानाजी शेलार यांचे ते महाराज आहेत.. हेच लॉकेट नानाजी शेलार यांच्या सुद्धा गळ्यात आहे...



हे ऐकून फौजदार साहेब फार आनंदी झाले कारण... ठोस पुरावा नसल्याकारणाने सुंदर शेलार याला त्याने केलेल्या कृत्याची कडक शिक्षा मिळणार नाही असे त्यांना वाटत होते..
आणि म्हणून ते शोधात होते ठोस पुराव्याच्या...



आता त्याला कडक शिक्षा होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही...

आपल्याकडे आपले बाबा नजर फिरवूनही पाहत नाही ही गोष्ट मायराला फार फार मनाला लागली... आणि ती तशीच रडत रडत ताराआजी यांच्या घरी गेली...

फौजदार साहेब आणि पथक त्यांच्या गाडीमध्ये बसलं.. ते आता
सुंदर शेलार यावर पुराव्यासहित खटला भरवण्यासाठी निघालेले शहराकडे... तर त्यांच्या गाडी शेजारी बाबाराव उभे राहून फौजदार साहेबांसोबत काहीतरी बोलत होते..

फौजदार साहेबांनी बाबाराव यांच्याशी हँडशेक करून निरोप घेतला... आता बाबाराव हे... उभे राहिले आणि कॉल करू लागले.... बहुतेक रामला गाडी घेऊन बोलवंत असावे त्यांच्या बोलण्यावरून मोहितला समजले....

कॉल करून झाल्यानंतर ते इकडे तिकडे पाहत गाडीची वाट पाहत उभे राहिले... तर त्यांच्याजवळ आता मोहित जाऊ लागला...
आणि मग....


🌹🌹🌹🌹🌹