भाग 47
धावता धावता त्याच्या लक्षात आले... की कुत्र्यांचे भुंकणे
मागे ऐकायला येत आहेत....
तसा तो पुन्हा परत आला....
आणि त्याला जाणवले की उजव्या बाजूने जो रस्ता दिसतो आहे त्यात दूरवर त्याच्या नजरेस पडले की सहा ते सात कुत्र्यांचा घोळका ....कुणावर तरी हल्ला करतोय आणि ती व्यक्ती प्रतिकार करते आहे.....
तसा तो त्या दिशेने शक्य तेवढ्या जोऱ्याने धावला...
आणि ती प्रतिकार करणारी व्यक्ती त्याच्या दृष्टीपथात
येताच त्याचे हृदय आनंदाने धडधडू लागले तसेच
आणखी जोऱ्यामध्ये......
आणि मग.....
त्याच्या नजरेसमोर त्याला मायरा दिसू लागली होती....
अति आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले होते... आता अश्रूही बाहेर येऊ लागले त्याचे.....
शब्द फुटत नव्हते त्याच्या ओठांमधून त्यामुळे....
हृदय खूप खुशीने उन्मळून आलेलं होतं..... सर्व जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं....
कुत्रे तिच्या अंगावर येऊ पाहत होते. बहुतेक तिच्या अंगाला अजूनही रक्ताचा वास येत असावा त्यामुळे.....
ती प्रतिकार करत होती. तिच्या हातात छोटी काठी होती...
मायरा.....
"हाड....छू...छू.....हाड....."
असं ती करत होती तर तो तिचे शब्द कानात साठवंत होता....
24 तास पण व्हायचेच होते तिला.... ती दूर झाल्यापासून पण कितीतरी दिवसांनी तिचा आवाज ऐकत असावा असं त्याला वाटत होतं......
कुत्र्यांना तिच्यापासून दूर हाकलू दे... हे सुद्धा त्याला सुचले नव्हते... तसाच तो जवळ जवळ येऊ लागला चालत हर्षातिरेकाने..... श्वास चढला होता....
कुत्र्यांना हाकलण्याचा नादात असल्यामुळे तिचे लक्ष नव्हते तो आला तरी....तो जवळपास जाऊ लागला.... तेव्हा....
तिच्याच लक्षात आले की..... आपल्याकडे कोणीतरी आपलं येत आहे...
तिने आजूबाजूला नजर फिरवली तर तो दिसला....
तशी नजरचूक झाली आणि एका कुत्र्याने तिच्या अंगावर झेप घेतली.....
तिचे लक्षंच नव्हते याकडे ....आता तिचे सर्व लक्ष मोहितकडे केंद्रित झाले होते...
पण मात्र आता मोहितचे त्या झेप घेणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष गेले....
तो जोरात ओरडला....
मोहित....
"मायू.... कुत्र्याकडे बघ...."
ती तर त्याच्याकडे पाहून स्तब्ध उभी राहिली होती.
तो काय बोलत आहे... हे तिच्या मेंदूपर्यंत पोहोचंत नव्हते.
ज्या क्षणी त्या एका कुत्र्याने तिच्या अंगावर झडप घातली ....
तिला काही कळायच्या आधीच त्याने झडप घेतली होती.
तिच्या हातातली काठीही ती उचलू शकली नाही.
ती तशीच हातातून निसटून खाली पडली......
इकडे जवळ आलेल्या मोहितने तोपर्यंत खालून मोठा दगड घेतलेला होता... सर्व कुत्रे त्याला आलेलं पाहून त्याच्या हातातला दगड पाहून घाबरून बाजूला निघून गेले...
झडप घेतलेला कुत्रा .... त्याच्या तोंडात मारायची ओढणी समोरून पकडलेली पाहून.... मोहितच्या हृदयात धस्स झाले.
त्याने पटकन बाजूची काठी उचलून घेतली....
पण त्याच्या हातातली काठी बघताच त्या कुत्र्याने ओढणी सोडून दिली आणि पळाला.
मोहित ने मायरा पुढे हात केला.... अवसान गळलेले होते तिचे.......पण पुन्हा त्याला पाहून ती हरखून उभी झाली...
अधिक पुन्हा नव्याने उभारून....
त्याने तिला ओढून आपल्या मिठीत घेतले....
काय नव्हतं त्या मिठीत....
त्या क्षणात त्याच्या मजबूत हातांच्या विळख्यात ती सामावून गेली होती. त्याच्यापासून दूर झाल्यानंतरचे क्षण प्रचंड... भीतीदायक होते... जरी ती चवताळली होती जॅकवर तरी तिलाच माहीत होते ती मनातून किती प्रचंड घाबरली होती.
पण आता त्याच्या मिठीत गेल्यावर... ती सुरक्षित आहे...
......हे तिला गवसले होते... तो तिचं सर्व शरीर आपल्या
मिठीत घेऊन प्रेमाने कुरवाळत आश्वासन देत होता
की .....
....तू आली आहेस माझ्याजवळ सुरक्षित आता ....
तिलाही स्वतःबद्दल सेफ आहोत याची जाणीव झाली
आणि तिने स्वतःचे डोळे मिटवून आपले अंगाची थरथर थांबवण्याचा प्रयत्न केला. तिने एक शब्दही तोंडातून बाहेर काढला नाही.
त्याच्या मिठीत तिला किती किती काळजी जाणवली की
आता तो तिला फुलासारखा जपून ठेवेल.....
याप्रमाणे त्या मिठीमध्ये त्याचे धडधडणारे हृदय जणू ग्वाही
देत आहे .....ही जाणीव तिला त्या क्षणांमध्ये होत होती.
तिच्या अंगाची होणारी थरथर त्याला मिठीत घेताच जाणवली होती आणि आता तिला शांत करण्यासाठी त्याला ते तेवढंच सुचलं होतं.
तेवढ्यात पोलीस सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले. दोघांनाही त्यांच्या आल्याने भान आले आणि एकमेकांपासून वेगळे झाले.
एकमेकांपासून वेगळे होताच...
त्याला तिच्यावर कुत्र्याने झडप घातली होती हे लक्षात आले...
तसा त्याने तिला हळूच प्रश्न केला.
"मायू ....तो कुत्रा चावला का गं...??"
त्यावर ती म्हणाली....
"नाही... त्याच्या तोंडात केवळ ओढणीच आली...."
त्यावर त्याला हायसे वाटले... तिला जवळ घेऊन...
पोलीस लोकांच्या गाडीकडे जावे म्हणून त्याने तिच्या पाठीकडून हात घातला....तर.....
तो प्रश्नार्थक तिच्याकडे बघू लागला....???
कारण त्याच्या हाताला नेमक्या पाठीकडून फाटलेल्या
कुर्त्याच्या आतले उघडे शरीर लागले.....
तसे तिचे डोळे भरून आले आणि ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागलेली......
त्याने पोलिसांना पुढे चालण्यासाठी रिक्वेस्ट केली.
तसे पोलिसांनाही समजले आणि ते थोडे समोर जाऊन उभे राहिले.
मोहितनेही स्वतःच्या अंगातलं टिशर्टवर घातलेलं जॅकेट काढले... आणि तिच्याकडे दिले....
तो म्हणाला....
"मायू.... हा घाल आणि ती ओढणी दे."
मायराने त्याप्रमाणेच केले आणि....
तेथील पोलीस स्टेशनला जाऊन सर्व सोपस्कार उरकून घेतले.
.......
मायरा मिळाल्याची बातमी ....
लगेचच बाबाराव यांना समजली...
त्यांच्या जिवात जीव आला....
त्यांनी रामच्या हाताने... मोहितच्या घराच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांना कळविले.... ते दोघेही येत आहेत अंत्यसंस्कार विधीसाठी....
लवकरच सहा ते सातच्या दरम्यान सकाळी... मायरा आणि मोहित गावात पोहोचले......
मोहितला तर आपले आई-बाबा... दोघेही असे एकाच वेळी... त्यांच्यावर या प्रकारे मृत्यू ओढवेल... त्याची त्याने अजिबात कल्पना केली नव्हती....
लहानपणापासून तो आई-वडिलांच्या प्रेमाला पारखा राहिलेला होता... कारण त्याचे योग्य शिक्षण व्हावे म्हणून कवडू आणि पार्वती दोघांनीही हृदयावर दगड ठेवून त्याला त्याच्या मामाकडे ठेवले होते....
कधी कधी पार्वती त्याला तेथे भेटायला जायची तेवढेच त्याला मायेची ऊब प्राप्त होत होती....
मामाजवळ राहत असला तरी तो केवळ नावाचाच मामा होता. जिव्हाळा असा जुळलाच नव्हता त्याच्याशी... आणि मामाने ही जिव्हाळ्याचे संबंध ठेवले नव्हते त्याच्याशी....
आता शिक्षण पूर्ण करून गावात आला तेव्हाच काय ते त्याला प्रेम मिळाले आई वडिलांचे.... आणि आताही त्यांनीच पुन्हा त्याचे भविष्य सुधारावे म्हणून... या वयातंही कवडू आणि पार्वतीने आपल्या हृदयावर दगड ठेवून त्याला पुढच्या शिक्षणासाठी ... त्याने साहेब व्हावे म्हणून पाठवलेले होते...
कवडू आणि पार्वती..... कधीही कोणाच्या अध्यात किंवा मध्यात येत नव्हते.... आपले काम आणि आपण भले...
असा त्या दोघांचा स्वभाव..... तरीही त्यांना कोणीतरी इतक्या निर्दयीपणे मारून टाकावे...
कोण असावा असा शत्रू त्यांचा...??
एवढ्या निरागस आणि साध्या भोळ्या त्याच्या मायबापांचा .... का गळा घोटला असावा...???
अशा सर्व विचारांत त्याने सर्व सोपस्कार अंत्यविधीचे पूर्ण केले.
त्याची मनस्थिती मायराला समजत होती... त्याला सध्या माहित नव्हते की सुंदर शेलार चे काम आहे हे....
तिला मात्र रामकडून सर्व कळले होते....
त्याचबरोबर तिला याचेही समाधान होते की.....
बाबाराव यांनी खूप वेळ नाही पण..... अंत्यविधीचे सोपस्कार करताना स्मशानभूमी मध्ये ते थोड्यावेळासाठी आले होते.
दूरच उभे राहिले ते थोडावेळ.... दुरूनच त्यांनी मायरा आणि मोहितला डोळे भरून पाहिले....
मायराला पाहताना त्यांचे काळीज भरून आले होते पण त्यांनी तसे दिसू दिले नाही चेहऱ्यावर.
पण आज एक नवीन गोष्ट त्यांच्या सोबत घडली.
ती म्हणजे आज त्यांना मोहितकडेही पाहून भरून आले होते.
त्यांच्या मनाला एक गोष्ट पोखरू लागली होती...
"याच्या आई वडिलांच्या मृत्यूला कुठे ना कुठे आपण कारणीभूत आहोत..... सुंदर शेलार सोबत मायराचे लग्न आपण जोडले. सुपारी फोडली... आणि नंतर त्याचे रंग ढंग समजताच आपण ते लग्न मोडलं... कदाचित त्यामुळेच तो सुंदर ईरेला पेटला असावा आणि त्यातूनच हे असं घडलं कदाचित..."
त्यांचं मन त्यांना खात होतं....
सर्व सोपस्कार संपले आणि ते बंगल्यावर गेले...
स्मशानभूमीतून बाहेर येताना राम त्यांना म्हणाला होता
की मायरा बेबी आणि मोहित दोघांनाही बंगल्यावर घेऊन जाऊया...
त्यावर त्यांनी नजरेत विखार घेऊन रामवर जळजळीत कटाक्ष टाकला .
राम चुपचाप राहिला.
.......
मोहित आणि मायरा घरी आले असले तरी त्यांना
घरी राहता येणार नव्हते.......
कारण पोलिसांनी घर सिल केले होते....
त्यांना तेथे पुरावे आणि त्यासंबंधी माहिती शोधण्याची गरज होती...
मग आता कुठे राहायचे ??...हा प्रश्न होता...
दोघांनाही शेजारच्या अगदी बाजूलाच राहणाऱ्या ताराआजींनी आपल्या घरी थांबवले होते.
मोहित तो... घडलेल्या घटनेमुळे... त्याचे मनोबल खचले होते...
तसे पाहता दोघांनाही ....कवडू आणि पार्वतींचं जाणं ....
आताही....त्यांच्या मनाला एक्सेप्टंच होत नव्हतं......
कुठून तरी दोघे आता येतील .... आणि बोलतील आपल्याशी....असंच त्यांना वाटत होतं...
दोघेही तारा आजीच्या घरी असताना आजूबाजूचे लोक बोलंत होते... आपसांत चर्चा करत होते तेव्हा मोहितला कळले नेमके
काय झाले...??? तर त्याच्याजवळ फौजदार साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर होताच .....तो त्याने मायराला शोधताना घेतला होता त्यांच्याकडून..
अशी कुजबुज ऐकताच तो खवळला आणि फौजदार साहेबांना कॉल करून म्हणाला....
"फौजदार साहेब... आपण कुठे आहात...??
मला आपल्याला भेटायचं आहे..."
फौजदार साहेब....
" मी बाबाराव यांच्याकडे आहे... तसे तर मी थोड्या वेळानंतर तिकडेच येणार आहेत तुझ्या घराकडे... पुरावे शोधायचे आहेत काही...."
मोहित....
"या मग ...मला बोलायचं आहे अत्यंत महत्त्वाचे...."
असे म्हणून त्याने कॉल ठेवला...
त्याचे बोलणे ऐकणाऱ्या दोघीही मायरा आणि ताराआजी...
त्याला आता ताराआजी म्हणाल्या....
"हे पाय बापू.... तुले माझं म्हणणं पटते का नाही माहित नाही... पण मी सांगते तरी बी.... आता तूये मायबाप.. दोघेही देवाघरी गेले... ज्याच्यामुळे ते देवाघरी गेले... त्याले शिक्षा तर होईलंच.. आणं ती झाली पाहिजे.... आता फौजदार येत आहे तर तसं बोलून घे... पण तुया माय बापाची इच्छा होती.... तू एक मोठा सायेब व्हावं....
तेवढं तू ध्यानात ठेव.... पार्वतीनं आणि कवडूनं....
.... त्यांच्यासारखं जीनं तुया जिंदगीले येऊ नये म्हणून... आपली इच्छा मारून तुले शयरात शिकवाले ठेवलं... हे सर्व ध्यानात ठेवून त्यांची इच्छा पूर्ण कर... तरच त्यांच्या आत्म्याले शांती मिळेन..रे...बापू..."
त्यावर मोहितने.... पाणावलेल्या डोळ्यांनी.... वरखाली मान हलविली....
ताराआजी पुढे बोलल्या....
🌹🌹🌹🌹🌹