वडा पांव ..
नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाई आणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते . 🥲कोल्हापुरात वडा म्हणजे दोन गोष्टी अपरिहार्य .. एक म्हणजे हा वडा नेहेमी पावासोबतच येतो आणि तो सुद्धा पेटी पाव स्लाइस सोबत ..दुसरे म्हणजे त्यासोबत दिल्या जाणाऱ्या तळलेल्या मिरच्या वडे तळणीच्या झाऱ्यात हिरव्या मिरच्या तळून त्यावर मीठ टाकतात .. विशेष म्हणजे ही मिरची अजिबात तिखट लागत नाही माझी पहिली वड्याची आठवण माझ्या शालेय जीवना पासुनचीआहे . माझ्या वडिलांना वडा खूप आवडत असे ...कधीही वडा खायला कुठल्या गाडीवर ते गेले की न चुकता वडा घरी कायम बांधुन आणत असत . .अगदी माझ्या लग्नानंतर माझ्या घरी ते वड्याचे पार्सल पोचवत असत .😀. हा सिलसिला चालुच राहिला होता. !!!माझ्या शालेय जीवनाच्या काळात कोल्हापुरात वाईकर वडा प्रसिद्ध होता त्यांची स्पेशालीटी म्हणजे वड्याचा आकार खूप मोठा म्हणजे हल्लीच्या वड्याच्या दुप्पट असे . 🥱तसेच तो आकाराने चपटा नसून एखाद्या बॉल प्रमाणे असे शाळेत असताना शाळेच्या वर्धापना दिवशी सुटी असे पण त्या दिवशी सर्व विद्यार्थ्याना शाळेत बोलावून प्रार्थना घेतली जात असे . व त्यानंतर खाऊ म्हणून तोच तो फेमस असा वाईकर वडा व सोबत तसाच भल्या मोठ्या साईजचा बुंदीचा लाडू देत असत . आम्ही मुले ताबडतोब तो खाऊ घेऊन घरी येत असू . कारण एकतर इतका मोठा लाडू व वडा आम्ही एकटे खाऊच शकत नसू . शिवाय त्या वेळी कोणताही बाहेर मिळालेला खाऊ घरी एकत्रितपणे वाटुन खाल्ला जात असे . वडिलांना तेव्हा तो वडा बघून आनंद होत असे व सगळेजण मिळून त्याचा आस्वाद घेत असू. दुसरी आठवण आहे कर्जतची .. कर्जतचा रेल्वेचा वडा तर फेमस आहेच कर्जतला वडिलांची मावशी रहात असे . तिथे रेल्वे स्टेशन लगतच एक लहानसे घर होते . त्या घरात खूप छान वडा मिळत असेत्या घराला फक्त एक खिडकी होती त्या लहान खिडकीतून यातील माणूस अथवा बाई दिसत नसे फक्त खिडकितल्या हातातून वडे व पैसे याची देवाण घेवाण होत असे . त्यामुळे हा वडा "खिडकी वडा" म्हणून फेमस होता .बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हा वडा घेऊन जाणे बंधनकारक असे ..😆😆 पाहुणे घरी पोचले की खिडकी वडा आणला का ??असा प्रश्न असेच .आधीच प्रवासाने जीव भुकेलेला असे त्यात या विकत घेतलेल्या वड्याचा वास इतका येत असे की कधी एकदा तो कागद सोडवून खाऊ असे होत असे. ,😃😃कोल्हापुरात वेगवेगळ्या भागात असंख्य वड्याच्या गाड्या आहेत .. अक्षरशः सकाळी सात ते रात्री बारा पर्यन्त वडापाव मिळू शकतो .कोल्हापुरात सर्वच ठिकाणी वडा चांगला मिळतो त्यातील आमच्या आवडत्या वड्यांची ही "निवडक" यात्रा ..!!!तुम्ही कोल्हापुरात येताना वेस ओलांडतानाच पहिले वड्याचे दुकान लागते ते म्हणजे "अनेगा वडा सेंटर "याचीच एक शाखा गावात पण आहे . चांगला चविष्ट असा हा वडा गर्दी खेचून घेतो . यानंतर मार्केट यार्ड च्या कोपऱ्याला भेटतो तो म्हणजे "झाडाखालचा वडा ".. नाव गंमतशीर आहे ना ..खरंच एका गर्द झाडाखाली असलेल्या वड्याच्या गाडीचे लोकप्रियते मुळे एका मोठ्या दुकानात रूपांतर झाले आहे . ताराराणी चौकात येताच एक रस्ता उजवीकडे शिवाजी विद्यापीठाकडे जातो . त्या रस्त्यावर शेतकी महाविद्यालय जवळ तुम्हाला "शामचा वडा "दिसेल हा वडा पण आकाराने भरपूर मोठा असतो . विद्यापीठ परिसर असल्याने भरपूर गर्दी खेचून घेतो .यानंतर ताराराणी चौक ते एस टी स्टँड परिसरात असंख्य वड्याच्या गाड्या आहेत प्रत्येक गाडी वर कोल्हापुरात येणारे जाणारे आणि शिवाय त्या परिसरात राहणारे असंख्य लोक वडा खात असतात . यानंतर पुढे येताच दसरा चौकच्या कोपऱ्यात "दिपक वडा "भेटतो . ह्या चविष्ट वड्या साठी सुद्धा भरपूर लाइन लागलेली असते .त्याच्या अलीकडे लक्ष्मीपुरीत "शंकरचा वडा" आहे .आमच्या बँकेत चहा देणारा शंकर नंतर हळूहळू मेव्हण्याच्या मदतीने वडे बनवू लागला आणि त्यानंतर ही साधी चहाची गाडी सोडून त्याने लक्ष्मीपुरीत एक गाळा खरेदी केला . जवळ बरीच ऑफिसेस आणि बँका असल्याने त्याचा हा चवदार वडा तूफान चालतो . आम्हीही त्या परिसरात गेलो की आवर्जून खातोच हा वडा !!पुढे आलात की कॉर्पोरेशन च्या एका कोपऱ्यात "तुकारामचा वडा" आहे या वड्याचे विशेष म्हणजे यात हिरवी मिरची न वापरता लाल तिखटाचा वापर असतो .इथून पुढे गंगावेशेत शिरला की तेथे "शाहू विजयी गंगावेश'. नावाची जुनी आणि प्रसिद्ध तालिम आहे . इथेच पूर्वी तालुक्याच्या गावी जाणाऱ्या बसेस सुटत . या तालमीच्या आवारात अत्यंत लहान जागेत एक वडेवाला वडे करीत असतो . त्याच्याकडे पातेलीच्या पातेली वडे भराभर संपत असतात . या वड्या सोबत पांव शिवाय भिजवलेल्या डाळीची एक छान पातळ चटणी दिली जाते ही त्याची खासियत आहे . तेथून पुढे दत्त मंदिरा जवळ "गंगावेश टी स्टॉल".. नावाचे अतिशय जुने लहानसे चहाचे हॉटेल आहे . येथे वडा छान मिळतोच पण हे हॉटेल कट वड्या साठी जास्त प्रसिद्ध आहे . आणखी एक विशेष म्हणजे या हॉटेलचे मालक गायनप्रेमी होते "मदनमोहन "हा त्यांचा अत्यंत आवडता संगीतकार . दिवसभर इथे मदनमोहनची सुरेल जुनी गाणी चालू असतात . वडा चहा आणि सोबत अशी सुरेल गाणी ऐकायला मिळणे हे तर एक भाग्यच .. !!!त्यांच्या पुढील पिढीने पण हा वारसा चालू ठेवला आहे . खासबाग कुस्तीचे मैदानाच्या जवळ खाऊ गल्लीत "बाळकृष्ण वडा सेंटर" आहे . वड्या बरोबरच तिथली पालक भजी फार फेमस आहेत .तिथेच "खासबाग मिसळ "आहे यांच्याकडे मिळणाऱ्या वड्याचे एक "युनिक" असे कॉम्बिनेशन आहे ,त्यातली अगदी योग्य आले लसूण मिरची वाटण असलेली बटाटा भाजी भोवतालचे कुरकुरीत चविष्ट आवरण ..शिवाय हा वडा खायचा ठरवले तर सोबत मिसळ पण खायला मिळते .पण तो वडा लिमिटेड एडिशन मध्ये काढत असल्याने . उशीर झाला तर वडा संपून जातोपुढे कोळेकर तिकटी कडे "अनेगा वडा" तर आहेच शिवाय "कुलकर्णी वडा" पण आहे कुलकर्णी कांदा भजी पण काढतात त्यामुळे तिथे सुद्धा खमंग,🥲 वास सुटलेला असतो . जवळच शिंगोशी मार्केट असल्याने खूप गर्दी असते वडा खायला .😊😊अर्धा शिवाजी पुतळा परिसरात "चारुदत्त वड्याची" गाडी आहे . या वड्याच्या आतील बटाट्याचे सारण अतिशय तिखट व मसालेदार असते . माझ्या आईला हा वडा फार आवडत असे त्या काळात बायकांनी गाडीवर वडा खाणे अप्रशस्त असल्याने वडील आवर्जून हा वडा आईसाठी घरी आणत असत .त्यापुढे गेलात की उभ्या मारूती चौकात विठाई हॉटेल आहे इथे कट वडा अफलातून मिळतोभलामोठा चविष्ट थोडा कमी तिखट असलेला हा वडावर चरचरीत लाल कट आणि शेव..मस्त ब्रम्हानंदी टाळी लागते म्हणा नाआणि याचा शेवट गरम आले घातलेल्या चहाने होतो 😋रंकाळा तलावाच्या उजवीकडे रस्ता फुलेवाडीला जातो. इथे तर फक्त वडापाव च्या गाड्यांची लाईनच आहे हा गगन बावडा रोड असल्याने दिवसभर अगदी रात्री सुद्धा या सगळ्या गाड्यांवर तूफान गर्दी असते 😃रंकाळा तलावाच्या डाव्या बाजूला रस्ता राधानगरी रोड कडे जातो . या रस्त्यावर पांडुरंग हॉटेल आहे . तिथला वडा "पांडुरंग वडा" म्हणूनच ओळखला जातो .मात्र आमचा अतिशय आवडता वडा म्हणजे "शीतल वडा" पद्माराजे शाळेसमोरील बागेच्या मागील एका लहान गल्लीत हा वडा आहे . तुम्ही त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर जरी आलात तरी आसमंतात पसरलेला वड्याचा वास तुम्हाला खेचून तिकडे नेतो !!!!!. इथे एकजण फक्त बटाटे वडा सारण व त्याचे गोळे करीत असतो एक जण फक्त तळणाचे काम करतो तर एकजण लोकांच्या मागणीप्रमाणे पांव आणि वडे खाकी पिशवीत भरण्याचे आणि पैसे मोजून घेण्याचे काम करीत असतो . रस्ता अरुंद असल्याने शक्यतो तिथे पार्सल नेणाऱ्यांची संख्या जास्त असते . खूप चविष्ट बटाट्याचे सारण ...🥲त्याला आले लसूण मिरची अगदी योग्य प्रमाणात न कम ....न ज्यादा ..💞..बाहेरचे जाड आवरण आणि तळणात त्याला आलेला खुसखुशीतपणा आणि कुकुरीत पणा💞 ही सगळी भट्टी जमून येणे अतिशय कौशल्याचे काम आहे. 🤗आम्ही जेव्हा ठरवतो आज गावात जायचे आणि येताना शीतल वडा आणायचा तेव्हा मात्र आमचा योग असा काही असतो की आम्ही जेव्हा पोचतो तेव्हा नुकतेच तयार वड्यांचे मोठे ताट संपलेले असते आणि नवा घाणा पडलेला असतो . आमच्या सारखे अनेक जण आता हा घाणा कधी होईल याची डोळ्यात प्राण आणून वाट पहात असतात😆आणि थोड्याच वेळात हा घाणा बाहेर ताटात पडतो .. सगळेजण आता वडा मिळणार म्हणून सरसावतात .. पण हाय ..!!!! त्याने तो घाणा अर्धवट तळलेला बाहेर काढलेला असतो .. मग परत ते सगळे वडे तो निवांतपणे पुन्हा तेलात सोडतो .. त्यांना आणखीन खुसखुशीत करण्यासाठी .. आता मात्र या वड्यांच्या खमंग वासाने परमावधी गाठलेली असते .. 😃घाणा पूर्णपणे व्यवस्थित तळल्याशिवाय तो अजिबात वडे बाहेर काढण्याची गडबड करीत नाही .,😊 थोड्याच वेळात ती प्रोसेस त्याच्या मनाप्रमाणे पूर्ण होते . 😊😊मग तो खमंग घाणा अलगद वरच्या मोठ्या ताटात विराजमान होतो .. लगेच वडे तळणारा एक मोठा मिरच्यांचा जुडगा झाऱ्यात तळून काढून ताटात शेजारी टाकतो . वडे बांधणारा त्यावर मीठ टाकतो . आणि हे वडे बांधून द्यायच्या कामाला लागतो बहुधा नेहेमीचेच गिर्हाइक असल्याने त्याच्या बारीक नजरेला कोण कधी आले आहे कोणाला नुसते वडे हवे आहेत कुणाला त्यासोबत जास्त मिरच्या हव्या आहेत .. वगैरे माहिती असते .. आमची बँकेच्या मॅडम अशी खास ओळख असल्याने आमचा नंबर प्रायोरिटीने लागतो तीन चार वडे ,दहा बारा मिरच्या असा ऐवज बांधून दिला जातो.😊😊 त्यासोबत दिलेल्या एका पाव स्लाइस ने आमचे भागणार नसते😃😃 त्यामुळे वाटेतच आम्ही बेकरीतील एक पावपेटी खरेदी करतो लवकरात लवकर घरी मार्गस्थ होऊन घरी जाऊन त्या गरम गरम वड्यावर मनसोक्त पावासाहीत ताव मारतो या वड्या वर मस्त मसालेदार घरचा चहा घेतला की मन तृप्त होते असे हे चविष्ट खमंग वडा पाव आख्यान🥲🥲🤗सर्व चविष्ट फोटो सौजन्य....माननीय गुगल जी 🙏