Dusht Chakrat Adkalela to - 1 in Marathi Thriller by Pranali Salunke books and stories PDF | दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1

Featured Books
  • قلم بولتا ہے

    زبان خاموش ہے لیکن قلم بولتا ہے۔ دل میں اٹھنے والے الفاظ کو...

  • لامحدود محبت

    کائنات کے دلوں سے نفرتیں مٹاتے رہیں۔ آؤ محبت کے شعلے جلاتے ر...

  • کاغذ

    زندگی کا کورا کاغذ پڑھ سکتے ہو تو پڑھ لو۔ اگر چند لمحوں کی م...

  • خواہشات کا سمندر

    خواہشوں کا سمندر دور دور تک پھیل گیا ہے۔ ایک خواہش نے زمین و...

  • ادا کیا

    آنکھیں بند کر کے پینے کی ممانعت کیوں ہے؟ شراب پینے کی کوئی م...

Categories
Share

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो.

अजित : नाश्ता झाला आहे का ग? आणि अभी उठला का ? 

आरती : हो...उठून नाम जपाला बसला आहे... त्याचं आवरलं की सगळे एकत्रच बसू नाश्ता करायला... 

अजित : बर तोवर मला चहा तर दे...

आरती : हो आणते...

अजित : आज मला यायला उशीर होईल ग....

आरती : का अहो ?

अजित : अगं तो चारुदत्त आहे ना त्याला भेटायला जाणार आहे...त्याला इस्पितळात दाखल केलंय...रात्री मेसेज आला ग्रुपवर...काय झालंय ते बघून येतो...

आरती : बर या भेटून... बर मी आणते नाश्ता... अभीचं झालं असेल...

अभिमन्यू : गुड मॉर्निंग आई-बाबा...

आरती : काय रे तुला किती वेळा सांगितलं? ते गुड मॉर्निंग नको, सुप्रभात बोलत जा...तरी तुझं आपलं तेच... 

अजित : अगं कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग बोलून तशी सवय झाली आहे ग त्याला... आणि असंही दोन्हींचा अर्थ सारखाच होतो..मग काय हरकत आहे...

अभिमन्यू : अगदी बरोबर बाबा... चला नाश्ता करू नाही तर कामावर जायला उशीर होईल... 

अजित : हो... 

अजित एका सरकारी कार्यालयात कर्मचारी असतात तर अभिमन्यू एका कॉलेजमध्ये इतिहासाचा प्राध्यापक असतो. शिवाय तो त्याचे शिक्षक प्रा. शिंदे यांच्या संशोधन कार्यात त्यांना मदतही करतो. अभिमन्यूला कॉलेजमध्ये नोकरीला रुजू होऊन चार वर्षे झाली होती. कॉलेजमध्ये तो त्याच्या दिसण्यासाठी आणि शिकवण्यासाठी लोकप्रिय होता. त्याचं मन लावून शिकवणं पाहून मुख्याध्यापकांनी त्याला एक नवी कामगिरी देण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी आज त्यांनी त्याला भेटायला बोलवलं होतं. अभिमन्यूच्या बुलेटने कॉलेजच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या जातात. मुली तर भान हरपून त्याच्याकडे पाहतात तर मुलांना आपणही त्यांच्यासारखं असावं असं वाटू  लागतं. त्याला शिक्षकांच्या खोलीत आलेला पाहून शिपाई लागलीच त्याला मुख्याध्यापकांचा निरोप देतो. सगळे तास संपवून भेटायला येण्याचे सांगून अभिमन्यू त्याच्या पहिल्या तासिकेला जातो. 

अभिमन्यू वर्गात आल्यावर सर्व विद्यार्थी त्याला उठून अभिवादन करतात. त्याने शिकवायला सुरुवात करताच विनिता नावाची मुलगी वर्गात येते. 

विनिता : सर, मी आत येऊ का? 

अभिमन्यू : नको, बाहेरच थांब.. तुला मी आज वर्गात घेणार नाही...

विनिता : सर, आजच्या दिवस माफ  करा... उद्यापासून मी वेळेत येईन...

अभिमन्यू : हे असं तू नेहमी बोलतेस... आणि अशी उशिरा येतेस...ते काही नाही तुला शिक्षा  मिळाल्याशिवाय तू सुधारणार नाहीस... 

विनिता : सर प्लीज... शेवटची संधी द्या... 

अभिमन्यू : तुला एकदा सांगून कळत नाही का? माझा वेळ वाया घालवू नकोस... वर्गाच्या बाहेर उभी रहा आणि तुम्ही सर्वांनी माझ्याकडे पहा. 

थोड्या वेळाने तास संपल्यावर अभिमन्यू वर्गाबाहेर उभ्या असलेल्या विनिताकडे पाहतो. 

अभिमन्यू : उद्या वेळेत आली नाहीस तर माझ्या तासाला यापुढे बसायचं नाही. मुख्याध्यापकांना काय सांगायचं ते मी बघून घेईन.. 

विनिता : सॉरी सर, उद्यापासून वेळेत येईन... 

अभिमन्यू निघून गेल्यावर विनिता वर्गात येते. 

शलाका : काय ग, मुद्दाम उशिरा येतेस ना? 

विनिता :  हो ग, फक्त त्याचा ओरडा खायला उशिरा येते... पण उद्या पासून लवकर येईन..नाही तर मला वर्गात बसू देणार नाही तो... 

शलाका : तू या  कॉलेजच्या संस्थापकांची मुलगी आहेस... ते त्याला माहिती नाहीयेय वाटतं...म्हणून एवढा तुझ्यावर डाफरतो...ते समजलं ना मग  बघ कसा वागतो तुझ्याशी... 

विनिता : आपली ताकद आपण वेळ आल्यावर वापरू ग... 

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --

सगळ्या तासिका संपवून अभिमन्यू मुख्याध्यापकांना भेटायला जातो. 

अभिमन्यू : सर तुम्ही मला बोलावलं होतं.

मुख्याध्यापक कारंडे सर : हो एक महत्त्वाचं आणि खाजगी काम होतं. 

अभिमन्यू :  बोला ना सर... 

कारंडे सर : एका संशोधनाचं काम आलंय मला... आणि त्यात  मला तुझी  मदत हवी आहे ... 

अभिमन्यू : सर, मी आधीच शिंदे सरांना पण असिस्ट करतो आहे... त्यात तुम्हाला  कशी मदत करू...म्हणजे तुम्हीच सुचवा... 

कारंडे सर : मला तुझं कामाचं वेळापत्रक पाठवून दे...   मी त्यानुसार एक वेळापत्रक बनवतो  आणि तुला पाठवतो. 

अभिमन्यू :  सर पण विषय काय आहे? माझ्या विषयाशी संबधित आहे का? 

कारंडे सर : तसा आहे आणि नाही पण... 

अभिमन्यू : म्हणजे सर? 

कारंडे सर : आज संध्याकाळी घरी येशील का? तुला सगळं नीट समजावून सांगतो. 

अभिमन्यू : हो येतो... पाच वाजता येतो चालेल ना...

कारंडे सर : हो ये... 

अभिमन्यू  : बर... आता निघतो मला शिंदे सरांकडे पण जायचं आहे... 

कारंडे सर : हो ये... 

कारंडे सरांच्या अभ्यासाचा विषय काय असेल आणि ते खाजगी असं का म्हणाले? असो आता विचार करून काही फायदा नाही. वेळ आली की समजेलच असा विचार करून अभिमन्यू शिंदे सरांकडे जायला निघतो. 

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------

प्रा. माधव शिंदे हे आध्यात्मिक साधक असून पुरातत्व विभागात  कार्यरत असतात. महाभारत, रामायण, देव आणि दानव यांच्यावर विश्वास ठेवणारे असतात आणि दत्तात्रेयांवर त्यांची भक्ती आहे. साधं सरळ राहणीमान असलेल्या या व्यक्तिमत्वाला भेटल्यावर लोकांना एक वेगळीच ऊर्जा या माणसाभोवती जाणवते. ते फोनवर बोलत असतानाच अभिमन्यू त्यांच्या घरी येतो. 

शिंदे सर : आज उशीर झाला तुला यायला? 

अभिमन्यू : कारंडे सरांनी भेटायला बोलावलं होत... 

शिंदे सर : आता नवीन काय जबाबदारी दिली त्याने? 

अभिमन्यू : संशोधनात मदत हवी आहे त्यांना... आणि ही खाजगी काम आहे... 

शिंदे सर : कसलं संशोधन? 

अभिमन्यू : ते सांगायला त्यांनी संध्याकाळी बोलावलं आहे... 

शिंदे सर : बर सगळं ऐकून घे आधी काही निर्णय घेऊ नकोस... 

अभिमन्यू : हो सर... आपण कामाला सुरुवात करुया का? 

शिंदे सर : हो... पण आधी जेवून घेऊ... मला माहिती आहे उशीर झाला आहे तर तू जेवून आला नसशील तर आधी पोट पूजा करू... चल... 

अभिमन्यू : हो सर... 

शिंदे सर : उल्का, जेवायला वाढ ग आम्हाला...

ते दोघे जेवायला जाणार एवढ्यात एक मुलगी घरी येते. तिला पाहून अभिमन्यू चकित होतो. हीच सरांची मुलगी असेल पण ही कोणत्याही अँगलने साधक वृत्तीची वाटत नाही. 

शिंदे सर : आलीस तू...मी तुझीच वाट बघतोय...जा हात पाय धुवून ये...जेव आणि आराम कर मग बोलू आपण... उल्के ताईसाठी पण ताट घे.... 

अभिमन्यू : सर ही तुमची मोठी मुलगी? 

शिंदे सर : हो ही मोठी आणि तिच्यानंतर उल्का... 

अभिमन्यू : बर... 

शिंदे सर : तू हो पुढे मी आलोच एक फोन करून... 

अभिमन्यू : हो ठीके... 

------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------

उल्का : काय रे दादा  कसला विचार   करतो आहेस? 

अभिमन्यू :  तुझ्या बहिणीचा... 

उल्का : म्हणजे ?

अभिमन्यू : अग म्हणजे ती साधक वाटली नाही मला....

उल्का : तिच्या दिसण्यावर आणि राहणीमानावर जाऊ नकोस... 

अभिमन्यू : पण सर तिच्याविषयी कधीच जास्त सांगत नाहीत... 

शिंदे सर : वेळ आली की तुला कळेल... आणि तूच एकमेव आहेस ज्याला माझ्या मोठ्या मुलीविषयी माहिती आहे... 

अभिमन्यू : असं का सर?

शिंदे सर : वेळ आली की सांगेन... 

अभिमन्यू : ठीके... 

उल्का : तुम्ही दोघे जेवून घ्या... मी ताईला बोलावून येते..

एक दहा मिनिटांनी आलेल्या उल्काला पाहून शिंदे सर तिला त्याविषयी विचारतात.

शिंदे सर : उल्का, एकटीच आलीस... साधिका जेवणार नाहीये का?

उल्का : बाबा, ताई थोडा वेळ झोपते म्हणाली आहे... थोडा वेळाने उठवेन तिला आणि जेवू घालेन... 

शिंदे सर : बर ठीके... आमचंही जेवून झालं आहे आणि आता आम्ही स्टडीमध्ये बसून काम करतो.... 

उल्का : हो ठीके...

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------

शिंदे सरांकडील काम आटोपून अभिमन्यू ठरल्याप्रमाणे कारंडे सरांकडे जातो. त्यांचे घर पाहून त्याचे डोळे दिपून जातात. मात्र शिंदे सरांच्या घरातील वातावरण आणि कारंडे सरांच्या घरातील वातावरण त्याला वेगळं वाटलं. नेमकी कोणती ऊर्जा त्याला जाणवत होती हे त्याला उमगत नव्हतं. खरं तरं त्याला कारंडे सरांचं काम करायची इच्छा नव्हती पण त्यांचा मान राखायचा म्हणून तो त्यांना भेटायला आला होता. 

कारंडे सर  :  ये बस... अभिमन्यू... शांताराम दोन चहा आणि पाणी स्टडी रूममध्ये घेऊन ये... 

अभिमन्यू : सर चहा नको... मी घेऊनच आलो आहे... 

कारंडे  सर : अरे असं कसं....पहिल्यांदाच आला आहेस तू घरी... चल आपण स्टडी रूममध्ये  जाऊन बोलू... 

कारंडे सरांशी बोलून अभिमन्यू घरी येतो व हात पाय धुवून तो स्वामींच्या नित्य सेवेला बसतो. रात्री जेवून वैगरे झाल्यावर तो कारंडे सरांच्या बोलण्याचा विचार करतो. त्याला अस्वस्थ वाटू लागताच तो स्वामींच्या तसबिरी पुढे उभा राहतो. मन शांत झाल्यावर शिंदे सरांशी बोलून तो निर्णय घेण्याचे ठरवतो.

 

प्रणाली प्रदीप