Niyati - 43 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 43

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 43







भाग 43

स्त्रीने वागायची काय ही रीत झाली...?? काहीतरी गडबड आहे... या वेगळ्याच स्त्रिया वाटत आहे... येताना पण इमारतीमध्ये या ज्या पण तरुणी आणि बायका दिसल्या त्या सर्व अंग प्रदर्शन करत होत्या... जे शारीरिक प्रदर्शन त्या करत होत्या त्यावरून हे दिसत होते की त्यांना जे लपवायचे अंग असते ते त्यांना दाखवायचं आहे...





मायरा विचार करीत होती तर....
आता थोडा थोडा तिला अंदाज आला होता की ह्या सर्व कोण आहेत....?? जीव घाबरा घुबरा होऊ लागला तिचा... 


इकडे तिकडे बघु लागली तर आता तर जुली बिन दिक्कत तिच्या समोर निव्वळ एका अंतर्वस्त्रावर उभी होती तरी तिला लाज वाटत नाही म्हणजे ह्या कितीतरी खालच्या स्तरावरच्या आहेत हे तिला चांगलेच समजून आले...




आपण आता यांच्या तडाख्यात फसलेलो आहे... तिकडे मोहितची आपल्याला शोधून शोधून काय हालत झालेली असेल...???




हा विचार तिच्या मनामध्ये सुरूच होता आणि जुली जवळ आली आणि तिला म्हणाली....
"तू कपडे नाही बदलणार का...??? हे काढ अंगातलं आणि साडी नेस."

असे म्हणत जुलीने तिच्या अंगावरची ओढणी खसकन ओढली.





मायराने तिच्याकडे पाहिले तर आता जुलीने अंगावर एक साडी घातली होती बाकीच्या बायांसारखीच...






जुलीने मायराच्या अंगावर एक साडी टाकली....
आणि म्हणाली....
"इथं ही अशी साडी गुंडाळावी लागते... 
चल ....घाल लवकर साडी...."




त्यावर मायराने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही ...ती तशीच खालच्या मानेने बसून राहिली.



अधून मधून खालच्या नजरेने जुलीच्या हालचाली निरखित होती...
मनात म्हणत होती....




"आपण हिच्याकडे बघून फसलो कसे....???
सर्व ह्या एकाच जातीच्या आहेत.... मला यांच्या मधून निघायलाच पाहिजे लवकर आणि मोहित कडे पोहोचायला पाहिजे...."


जुली खोलीमध्ये फेऱ्या मारत होती.
जॅकला यायला वेळ झाला होता. पण तो आला एकदाचा... त्याच्या हातात जेवणाचा एक डब्बा होता... 






आल्या आल्या  घाई घाई ने  मायराजवळ आला.
तिच्याजवळ गेल्याबरोबर तिला दारूचा भपकन वास आला.




तिने पटकन ओढणी जी खाली पडली होती ती नाकावर लावली आणि विरुद्ध दिशेने तोंड फिरवले...





जुली म्हणाली..
"काम हुआ क्या..??"


जॅक....
"नही..... शेठजी आऊट ऑफ इंडिया है!! चार-पाच दिन मे आ जायेंगे......"




उत्तर देताना जॅक वखवखलेल्या नजरेने मायराकडे पाहू लागला.



त्याची ती नजर पाहून मायराला किळसवाणे वाटत होते..... 
कुठे स्वतःला लपवावे असं वाटत होतं सारखं... 
आणि तिने आपली ओढणी अंगावर लपेटून घेतली.






जुली म्हणाली...(मायराकडे पाहून)
"चल ...आजा खाना खा ले...."







जॅक ने हॉटेलमधून आणलेल्या डब्यातील ते अन्न नजरेसमोर येताच मायराची भूक पुन्हा भडकली....





तरीही ती तशीच बसून राहिली...तर जॅक तिच्या जवळ आला आणि काखेत हात पकडून तिला उचलू लागला...

तशी तिला त्याची शिसारी आली...




......






तिकडे मोहित यात्रेमध्ये गर्दी होती तर तेथे एका बाजूला झाला आणि पाहू लागला ....



ज्युली मायराला घेऊन येते म्हणून वाट पाहत उभा राहिला... 


फोटोग्राफर असणारे ते समोर गेलेले तरुण मुलं ते सुद्धा आता कुठेही दिसत नव्हते...  




किती वेळपर्यंत उभा होता तरी जुली ही मायराला घेऊन आली नव्हती.

आता त्याचे हृदय कासावीस होऊ लागले... 






वेगाने धडधड करत होते त्याची हृदय स्पंदने..... 
आता न राहवून शेवटी तो
पुन्हा त्याच दिशेने निघाला गर्दीत ज्या दिशने तो मायरा 
अडकली होती. 




कसातरी तो वाट काढत त्या भागात आला.
पण त्याला मायरा कुठेही दिसत नव्हती .....नाही जुली...




आता त्याची मानसिक अवस्था बिथरली..
त्याला काही सुचेनासे झाले...

काय करावे ...? कुठे जावे ....?? कुठे शोधावे ....???
काहीही समजत नव्हते त्याला.





तो तिथेच एका टपरीवर असाच हताश होऊन बसला आणि तिथल्या त्या टपरीवाल्या तरुण पोराला विचारू लागला....
कोणालाही काहीही माहीत नव्हते....





त्याने स्वतः जवळ जो मोबाईल होता त्यात असलेला तिचा फोटो दाखवला... त्या दुकानदाराने त्याला काही माहीत नसल्याचे सांगितले....
तो हताश होऊन तेथेच बसून राहिला....


............





मुळकाट खाटीकचा काही पता लागत नव्हता 
पोलीसांना आणि बाबाराव यांना सुद्धा .....
अंदाजावरून शोधणे सुरू होते सर्वांचे...







इकडे गावकऱ्यांनी ... अंतिम विधी करण्याची प्रक्रिया... यासाठी तयारी करण्याची जिम्मेदारी बाबाराव यांनी 
स्वतः पुढाकाराने आजूबाजूच्या गावकऱ्यांवर सोपवली.






मोहित आणि मायरा लवकरच परत येणार तोपर्यंत तयारी करून ठेवावी अंत्यविधीची असे सांगितले सर्वांना तर
सगळे तयारीला लागली...






फौजदार साहेबांना कूण कूण लागलेली होती... मुळकाट खाटीका बद्दल... आणि मोहितबद्दल सुद्धा त्या दिशेने त्यांनी आपली सूत्र हलवली...


.‌.......






जॅक ने अंगाला हात लावला तेव्हा मायराला वाटले या दोघांच्याही कानफळीत ठेवून द्याव्यात. 





पोटात भूक भडकली होती पण आता तिने काहीही खायचे नाही हे पक्के ठरवले होते.







मायरा मनात.....
"यांनी दिलेलं एक वेळा काय खाल्लं मी...?? मी फसले यांच्या जाळ्यात... आता मी काहीही खाणार नाही.... खाण्यामध्ये काहीतरी हे मिळवत आहेत... म्हणून मला एवढी भूक लागते आहे..."



मायरा अशीच बसून राहिली आता काहीही 
खाण्यासाठी न घेता.


आणि त्यामुळे आता जुली भडकली...





जूली...
"काय सांगते तुला?? उठ लवकर... इथं तू खात राहशील तर जगत राहशील... खाणं काय तू सोडलं तर तडफडत मरशील..
मारायसाठी तुला आणलं नाही आम्ही..."




जुली आता तिखट स्वरात बोलत होती... 
आवाजात जरब आणि चेहऱ्यावर संताप स्पष्ट स्पष्ट दिसत होता....




इकडे मायराचा जीव मोहितसाठी कासावीस होत होता... संध्याकाळ.... रात्र होत आली... 






आता जर आपण काही खाल्ले नाही तर आपल्यावर वेळ कठीण येऊ शकते.... हिच्या कलाने आता घ्यावे लागेल थोडेसे असा विचार करून मायराने दोन घास पोटात ढकलले 
पण तिचे डोळे भरून येत होते ....
.....पुन्हा पुन्हा.....




दिवसभराच्या सगळ्या गोष्टींनी मायरा थकून गेली होती.. 
तिचे सर्वांग आंबून आंबून गेले होते. पण तिला तेथील पलंगावर झोपायला किळसवाणे वाटत होते...






त्याच्यापेक्षा जमिनीवर अंग टाकून झोपावे असे वाटत होते.


पण ती बिंदास्त डोळे बंद करून झोप येऊ शकत नव्हती. 




तिला बोलण्याच्या आवाजावरून जॅक बाहेरून आल्याचा कानोसा लागला...





जॅक......
"  ए जुली ...तुम्हारा  कस्टमर आया है..."






जुली....
"उसको कह दो आज मेरा धंदा बंद है....
बहुत थक गयी बाबा मै आज....
आज मैं अच्छे से सोना चाहती है...."


आलेला कस्टमर शेजारच्या खोलीकडे वळला....






आता जॅकने दरवाजा बंद केला.... 
आणि एकदम त्याने मायरा जवळ झेप घेतली आणि तिला मिठीत ओढु लागला.
आणि तसाच खोलीकडे नेऊ लागला.... 
मायरा फार संतापली.





त्या क्षणी त्यावेळी तिचा संताप एवढा अनावर झाला 
की तिने आजूबाजूची परिस्थिती याचा विचार न करता 
जॅकच्या दोन मुस्काटात ठेवून दिलेल्या...






त्यावर त्याने तिला एक घाणेरडी शिवी दिली आणि
तिला आत मध्ये घेऊन खोलीचा दरवाजा बंद केला... 





मायराने आरडा ओरड केली.

आणि बंद दाराच्या बाहेर जुली सुद्धा त्याच्या नावाने ओरडत आवाज देत होती त्याला...





जुली....
"जॅक.... सोड तिला आणि बाहेर ये...."





मात्र जुलीने आवाज दिल्यानंतर सुद्धा जॅक मायराला सोडायला तयार नव्हता.

तर मात्र जूली ने बाहेरून दरवाजाला लाथा मारणे सुरू केले.

तेव्हा कुठे तो जॅक खोलीच्या बाहेर आला..






जुली....
" क्या रे...तुम्हे मालूम नही है क्या....??? क्या पागल पण कर रहा है तू....??? अशी गडबड कधी कामाला येत नाही... तिच्या कलाने घ्यावे लागेल ना... दोन दिवस जाऊ दे... मग काय...?? पहिला चान्स तर तुलाच देणार आहे मी....!!!"






जॅक....
"ठीक आहे.... देखुंगा मे भी.... लेकिन मुझे अभी जरूरत है.... तू चल अभी मेरे साथ अंदर...."



जुली....
"नको ...आज मी खूप थकली आहे रे....!!"



पण जॅक  काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. 
त्यानी तिला जवळजवळ ओढत आतमध्ये घेतले 
आणि दार बंद करू लागला त्या रूमचे.....
पण तेवढ्यात काहीतरी लक्षात आले जूलीच्या....

आणि ती जवळ जवळ जॅकला ढकलतंच म्हणाली...
"रुक रे दो मिनिट...."




आणि ती पटकन तिच्या रूमच्या दरवाज्याजवळ गेली आणि दार बंद करून बाहेरून कडी घातली आणि कुलूप लावले..



कुलूप लावल्यावर बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहिले 
तर मायरा खाली जमिनीवर बसून रडत होती..... 






जूली कुत्सित हसत होती तिच्याकडे बघून.

आणि तेवढ्यात जॅकने जूलीला जवळपास ओढतंच 
बाजूच्या रूममध्ये नेले आणि दरवाजा आतून बंद केला....




जवळपास अर्धा तासाने जॅक आणि जुली बाहेर आले.... 


जुली ने तिच्या रूमचा दरवाजा खोलला. तेव्हा दरवाज्याच्या थोड्याशा बाजूलाच असलेली मायरा  जॅकच्या दृष्टिक्षेपात आली... 



आणि तो जुली कडे पाहून म्हणाला...
"सगळी मस्ती जिरवून ठेवणारे मी....मग पाहतो काय करते ही..."

असं म्हणून तो....

🌹🌹🌹🌹🌹