भाग 42
आता टॅक्सी थांबवली एका जुनाट वाटणाऱ्या इमारती समोर ..
तेथे जॅक उतरला पूर्वी..... जूलीच्या पाठोपाठ मायरा उतरली... एका जुन्या चाळवजा इमारती समोर ते उभे होते..
त्या इमारतीत प्रत्येक दारात आणि खिडकीत बायका उभ्या होत्या..... का उभ्या असाव्या...??? प्रश्न पडला.... असता
जर मायरा शुद्धीत असती तर....
मायरा तरीही डोळे तटतटंत पहात होती.... डोक्यावर ताण देण्याचा प्रयत्न करत होती.... भ्रमात होती तरीही...
ती जुलीला अडखडत म्हणाली....
"या सर्व खिडकीत का उभे आहेत...??? ही उभी राहण्याची काय पद्धत आहे....?? काही लाज लज्जा...???"
मायरा वळून वळून त्या बायकांकडे पाहत होती... आश्चर्याने.... रागाने...
पण मनात तिच्या आता भीती निर्माण झाली होती..
जुलीच्या शब्दाने ती तिच्याकडे पाहू लागली....
"चल गं... उभी का आहेस....??"
असे म्हणून जुलीने तिचा हात पकडला....
पण मायराने तो उलटा खेचला.... आणि अडखळत रागाने पहात विचारू लागली....
" मोहित कुठे आहे...??"
मायराच्या विचारण्यावर आता जुली विचित्र हसायला लागली....
सोबत जॅकही हसायला लागला...
त्या दोघांचे हसणे बघून मायरा भेदरल्यागत पाहू लागली दोघांकडे....
जॅकनी तिचा हात पकडला... तसा मायराने त्याचा हात झटकला....
जुलीने डोळे वटारून जॅककडे पहिले आणि मायराचा हात पकडत जवळपास ओढंत तिला नेऊ लागली.
जूलीला आश्चर्य वाटत होते....
"एवढी तीन-चार वेळा ड्रग्स देऊनही दिमाग काम करते हिचा... एवढ्या पोरी पहिल्या आणि इथे घेऊन आलो....
पण हिच्यासारखी सुंदर मुलगी सापडली नाही आजपर्यंत.... दिमाकानेही तेज आहे आजपर्यंत आलेल्या मुलींपेक्षा.... जास्त असर झालेला नाही हिच्यावर औषधीचा....
काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागेल हिच्याकडे....."
आजूबाजूच्या त्या बाया पोरी सर्व आपल्याकडे अशा एकटक का पाहत आहे ?? असा विचार करत मायरा चालत होती ...
त्या दोघी एका अरुंद अशा बोळीसारख्या असलेल्या भागातून जाऊन पुढे लाकडी जिन्याच्या तोंडाशी आल्या आणि
जुली ने तिला तेथे जिन्याच्या खांबाला आपल्या जवळच्या ओढणीने मायराची हातं बांधून ठेवली आणि जॅकला घेऊन बाजूला गेली आणि कुजबुजंत त्याच्याशी काही बोलत तेथे थांबली.
तसाच तो परत बाहेर गेला.... आणि जुली येऊन मायराचे हात सोडवले आणि तिला पुढ्यात घेऊन जिना चढू लागली.....
मायराला विरोध करायचा होता पण तिच्याने विरोध होत नव्हता... हात ...पाय ....मेंदू... सर्व जड आलेले होते...
मायराचे पायं लटपटंत होते....
कशीतरी जीवावर ओढून एक एक पाय ती जिन्यावर चढवून ठेवत होती.... डाव्या हाताने बाजूचा कठळ्याचा आधार घेतला होता.. जेव्हा ती लटकल्यासारखी झाली ...तिच्याने चढणे होणार नाही असे वाटू लागले ...ती तेथेच पायऱ्यांवर बसली...
तसे जुलीने तिच्याकडे तोंडातला विडाचा चघळतंच त्रासिक नजरेने पाहिले...
जुलीला समजले की आता ही काही वर चढणार नाही... तिच्या पायातले त्राण गेलेले आहे ड्रग्स मुळे...
तिने जोरात आवाज देऊन दोघी तिघींना बोलवले.
दोन बाया आल्या..
आणि त्यांनी तिला ...तिचे दोन्ही हात पकडून..
जवळपास ओढतंच वरती नेले...
एकदाची मायरा लोंबत्या पायांनी वरती चढवल्या गेली.
आता खोलीत... खोलीत तिला तेथे..
प्रत्येक खोलीचे दरवाजे खुले असल्यामुळे बायांचे विचित्र रीतीने परिधान केलेल्या कपड्यांच्या अवस्थेत पाहून कसेतरी वाटू लागले...
काही स्त्रिया अपुऱ्या वस्त्रांमध्ये होत्या... काहींनी ऊरोभाग उघडा टाकलेला होता... चेहऱ्यावरती विचित्र हावभाव... त्यांच्या रंगीबेरंगी वेगळेवेगळे लिपस्टिक्स..... आव्हान देणारी उभी राहण्याची स्थिती.... जेथून होईल तेथून अंग प्रदर्शन करण्याची कृती...
तरुण वयातल्या तिच्या एवढ्याच तरुणी आणि काही तीस-पस्तीस वर्षाच्या वयातील असलेल्या बायका... या सर्व प्रकारच्या महिलांनी तो मजला पूर्ण भरलेला होता....
आपल्या समूहामध्ये आणखी एक नवीन पाखरू आलेले आहे हे समजताच एक एक जण येऊन तिला पहात होते...
तिची सुंदरता पाहून तेथील बायका जुलीकडे पाहून हसत हसत डोळे मिचकवत होत्या..
एक तेथे जास्त वयस्कर असलेली बाई होती..... जी त्याही वयात असली तरी लचकंत मुरडंत पुढे आली.
आणि ....
मायराच्या जवळ येऊन दोन्ही हातांनी तिच्या गालांना पकडत भिरभिर चेहऱ्यावर नजर फिरवून मग दोन्ही कानशीलांवरून बोटे मोडत जुली कडे पाहून म्हणाली.....
"हाय!!! कितनी खूबसूरत है...!!! ये अस्सल कोहिनूर कहा से मिला रे तुमको...???"
असं म्हणत त्या मटकणाऱ्या वयस्कर बाईंने 500 -500 चे चार नोटा काढल्या आणि.....
म्हणाली......
" ये...ले... चल ...तू भी क्या याद करेगी...?? इस बार तो तुने मेरा दिल खुश कर दिया....!!!"
मायरा आता थोडी थोडी भानावर येऊ लागली होती ...
पण तिला आपण कुठे आलो आहोत.... तेच काही नीट समजत नव्हतं...
मायराचा हात पकडत जुली तिथेच असलेल्या एका रूम कडे तिला घेऊन गेली....
त्या खोलीला जे दार होतं ते दोन झडपांचं होतं... आणि त्याला संकल वर लटकवलेली होती... त्यावर एक मोठं कुलूप होता.... ते कुलूप स्वतः जवळच्या... कंबरेला असलेल्या खिशातून... चाबी काढून....
ते कुलूप .....जूलीने खोलले आणि मायराला जवळपास ओढतंच आत मध्ये घेतले.
मायरा पूर्वीपेक्षा बरीच शुद्धीत आली होती आता... तिने इकडे तिकडे पाहिले... असं वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी आपण आलो आहोत याची जाणीव होऊन ती अचंबित झाली...
आजूबाजूला पाहत असताना त्याच खोलीला एक लाकडी पार्टिशन टाकून तिच्या दोन खोल्या केलेल्या आहेत ...
याची तिला जाणीव झाली.
दोन्ही बनवलेल्या खोल्यांची पार्टिशन टाकलेला निव्वळ लाकडी प्लायवूडने होते... त्याला दाराची झडप नव्हती...
तेथे सरळ सरळ दिसत होते की दोन्ही खोल्यांमध्ये असेच साधेसे लोखंडी दोन पलंग टाकलेले होते.... आणि भिंतीला उभे आरसे लावलेले होते खिळ्यांनी ठोकून...
आता मायराला चांगले समजायला लागले होते.... तिचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या काही पोस्टर्सकडे गेले... त्या पोस्टर्सकडे बघून तिलाच लाज वाटू लागली पाहण्याची... ती पाहू शकली नाही त्या चित्रांकडे आणि तिने मान वळवली...
थोडं बाजूला तिचं लक्ष गेलं तर तिथे एक छोटासा कोपऱ्याला आडोसा होता.... त्या आडोशामध्ये खालीच एक शेगडी आणि त्याला जोडलेलं सिलेंडर होते...
त्याच्या बाजूला एक लाकडी कप्प्यांची छोटीशी अलमारी होती. तेथे ॲल्युमिनियमची भांडी ठेवलेली दिसत होती... आणि त्याच्या किंचित समोर गेलं तर अशीच एक अर्धवट भिंत उभारली होती... बहुतेक ती वॉशरूम सारखा युज करण्यासाठी जागा असेल. कारण तेथे पाण्याने भरून एक प्लास्टिकची बादली ठेवलेली दिसत होती.
आणि त्याच्यातंच एक ते पाणी घेण्यासाठी प्लास्टिकचा डब्बा..
एका कोपऱ्यात एकावर एक तीन ट्रंका ठेवलेल्या दिसत होत्या.
बहुतेक तेथे जुली कपडे ठेवत असावी.... आणि जे सामान त्यामध्ये ठेवण्यासारखे असेल किमती ....ते ठेवत असेल कदाचित असा मायराने अंदाज काढला....
अजूनही तिची अवस्था व्यवस्थित नव्हती ...मेंदू पूर्णपणे काम करायला सुरुवात झाली नव्हती... पण थोडा थोडा अंदाज यायला लागला होता ....
तिला आता समजायला लागली होती की आपण कुठेतरी वाईट ठिकाणी आलेलो आहे.... अशा विचित्र ठिकाणी जेथे बायका चांगले काम करत नसाव्यात... एकंदर परिस्थिती पाहता तिने आता मेंदू चालवणे सुरू केले....
तिच्या लक्षात आले की आपल्याला आता धीराने काम घ्यावे लागेल येथून सुटण्यासाठी....
मायराने चेहऱ्यावर भाबडेपणा आणून विचारले...
"कोण राहते इथं...???"
जुली विचित्र हसत म्हणाली....
"मी ....आणि आता..... तू सुद्धा...!!!"
मायरा म्हणाली...
"पण आपण तर भक्तनिवासात राहत होतो ना...!!!"
जुली त्यावर मोठ्याने हसली आणि म्हणाली....
" भक्तनिवासात आपण जाणार आहोत ना...!! लवकरंच आपल्याला भक्ती करायची आहे आपल्या मालकाची...
बरं आता वेळ घालवू नको... हात पाय तोंड धुवून... जरा आराम कर... तो पलंग दिसत आहे त्यावर जाऊन झोप थोडीशी... तोपर्यंत जॅक येईल..."
मायरा मनात शहारली आणि घाबरली..... जॅकचे नाव घेताच..
मायराने आपल्या मनातली भीती चेहऱ्यावर न दिसू देता आणि आपल्याला खूप काही समजले हे न दाखवता ....
जुलीला म्हणाली .....
" जॅक सोबत सर्व येणार... आहे...??
मोहित त्या तुझ्या मित्रांबरोबर आहे ना...!!
जॅक सोबत येतील ना सर्वेजन..."
जुली त्यावर तिच्याकडे पहात विचित्र हसत
वर खाली मान करत होती केवळ....
मायराने पुन्हा विचारले...
"तुम्ही सर्व आहे तरी कोण...?? मला वाटलं होतं तुम्ही सर्व चांगल्या घरचे आहात... पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही आहे... परिस्थिती तुमची गरीब आहे बहुतेक.... तेव्हाच एवढ्याशा घरांमध्ये एवढ्या जणी पार्टनर म्हणून राहत आहात मिळून मिसळून... आणि त्यामुळे तुम्हाला घरभाडे कमी द्यावे लागत असेल ना..."
आत्ताही जुली हसत होती केवळ...
मायराला उत्तर न देता तिने अंगावरील वस्त्रे बदलवण्यासाठी काढायला सुरुवात केली.
अंगात घातलेला तिने जीन्स काढला... वर टी-शर्ट घातलेलं लांबसर तेही काढलं.... अंतर्वस्त्रही काढायला लागली....
ते पाहून मायरा मात्र ओशाळली..
आपल्यासमोर उभी राहून निर्लज्जपणाने संपूर्ण कपडे काढत आहे ...हिला लाज कशी वाटत नाही असा विचार करत वळून भिंतीकडे बघत राहिली मायरा...
स्त्रीने वागायची काय ही रीत झाली...?? काहीतरी गडबड आहे... या वेगळ्याच स्त्रिया वाटत आहे... येताना पण इमारतीमध्ये या ज्या पण तरुणी आणि बायका दिसल्या त्या सर्व अंग प्रदर्शन करत होत्या...
जे शारीरिक प्रदर्शन त्या करत होत्या त्यावरून हे दिसत होते की त्यांना जे लपवायचे अंग असते ते त्यांना दाखवायचं आहे...
मायरा विचारच करीत होती तर....
🌹🌹🌹🌹🌹