Her identity in Marathi Short Stories by LOTUS books and stories PDF | तीची ओळखं

The Author
Featured Books
Categories
Share

तीची ओळखं

"प्रत्येकाची काही न काही आवड ही असतेच. कुणाला आपली आवड जोपासण्याची संधी मिळते तर कुणी आपल्या जबाबदऱ्यांमध्ये इतके अडकून जातात की कोणे एकेकाळी आपली काही आवड ही होती हेच त विसरून जातात."

रुद्राणीची कथा ही काहीशी अशीच आहे.

रुद्राणी एक चांगली सुशिक्षित सुस्वभावी सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी होती. तिच्या घरी आई वडील बहीण भाऊ असा मोठा परिवार होता रुद्राणी सगळ्यांची लाडकी होती अगदी लहान भावंडांची सुद्धा घरात त्यांना काहीही लागलं तर आई बाबां ऐवजी ते रुद्राणीलाच सांगत असे. रुद्राणी खेळकर स्वभावाची मुलगी होती तिला गाण्याची खूप आवड होती. म्हणून तिच्या वडिलांनी तिला गाण्याचा क्लास लावला होता. रुद्राणी जितकी दिसायला सुंदर होती तितकीच ती कामातही हुशार होती. रुद्राणी घरातली सगळी काम आटपून ऑफिस करून मग क्लासला जात असे. ती आपल्या जबाबदाऱ्या कधीच झटकत नसे त्यामुळे ऑफिस असो किंवा घर रुद्राणीने आपली एक वेगळीच ओळख बनवली होती. रुद्राणी ज्या ऑफिसमध्ये काम करत होती त्याच ऑफिसमध्ये पारस नावाचा एक सुंदर देखणा मुलगा ही काम होता. त्याच रुद्राणीवर खूप प्रेम होतं. पारस दे+ होता आणि नव्या विचारांचा ही होता पण त्याच्या घरचे
होता. त्याच रुद्राणीवर खूप प्रेम होतं. पारस देखणा होता आणि नव्या विचारांचा ही होता पण त्याच्या घरचे मात्र जुन्या विचारांचे होते त्यांना मुलींनी बाहेर जाऊन शिकलेलं किंवा एखादी कला जोपासलेली आवडत नसे त्यांनी फक्त घरकामात मदत करावी मग ती मुलगी असो किंवा सून असो.

रुद्राणी आणि पारस दोघांच्या घरच्यांच्या विचारात जितकी तफावत होती तितकेच रुद्राणी आणि पारसचे देखील विचार एकमेकांपेक्षा भिन्न होते रुद्राणी मोठे स्वप्न पाहणारी पण सगळ्यांना आनंदात ठेवणारी मुलगी होती त्याच्या उलट पारसला आहे त्या परिस्थितीत जुळवून घ्यायला आवडत असे त्याची काही विशेष अशी स्वप्नच नव्हती.

दोघांची घरे भिन्न आणि दोघांचे विचार देखील भिन्न होते.

पण दोघांच्या स्वभावात एक साम्य देखील होते ते म्हणजे पारस देखील आपल्या माणसांना साथ देणारा होता.

रुद्राणी खूप छान गायची ही गोष्ट पारसला माहीत होती आणि तिचा स्वभाव ही तो चांगलाच ओळखून होता म्हणूनच पारस त्याच्या ही नकळत तिच्या प्रेमात पडला होता.

पण ही गोष्ट तिला सांगायची कशी आणि त्याहू + आपल्याला एक मुलगी आवडते आणि ते ही ते।
आपल्याच ऑफिसमधली मुलगी हे घरच्यांना सांगायचं कस हा प्रश्न पारस समोर उभा होता.

आणि पारसला त्याच उत्तर ही खूप लवकर मिळालं पारसचे सर एक दिवस पारसच्या घरी आले पारसच्या घरच्यांनी त्यांचं खूप छान स्वागत केलं आणि सहज बोलता बोलता त्यांच्यात पारसच्या लग्नाचा विषय निघाला सरांना आठवल रुद्राणीच्या वडिलांनी रुद्राणीच्या लग्नाबद्दल आपल्याला सांगितलं होतं ते ही आपल्या मुली साठी स्थळ पहात आहेत आपण विषय तर काढून बघुत. पारसचे सर पारसच्या घरच्यांना रुद्राणी बद्दल सांगतात आणि तिचा फोटो ही दाखवतात. पारसच्या घरच्यांना रुद्राणी खूप आवडते पण रुद्राणी ऑफिसर असते त्यातून पारसच्या ऑफिसमध्ये काम करत असते जे की पारसच्या घरच्यांना पटत नाही. त्याचे घरचे सरांना सांगतात. "मुलगी जर काम सोडणार असेल तर आम्हाला मुलगी पसंत आहे." सर त्यांना खूप समजावतात पण कुणीही त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसत शेवटी सर निघण्याच्या तयारीत असतानाच पारस घरी येतो सरांना बघून पारस त्यांना बसण्याची विनंती करतो आणि घरी येण्याच कारण विचारतो सर त्याला रुद्राणी चा फोटो दाखवून तीच तुला स्थळ आणल्याच सांगतात. ते ऐकून काही क्षण आपण सरांना काय बोलाव हेच त्याला सुचत नाही. पारस सरांना बाजूला घेऊन फक्त एवढंच सांगतो की, "सर तुम्ही तिच्या वडिलांना माझ्या बद्दल सांगा मला रुद्राणी खूप आवडते इकडे काय बोलायचं आणि तिच्याशी काय बोलायचं ते मी बघतो." काही दिवसांनी...

सर पारसच स्थळ घेऊन रुद्राणीच्या घरी जातात तिच्या घरी सरांचं खूप छान स्वागत होत योग्य वेळ बघून सर तिच्या घरच्यांना सगळं काही सांगतात तसेच पारसचा फोटोही दाखवतात.

रुद्राणीचे वडील त्यांना सांगतात. "आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही कळवतो." अस सरांचं आणि रुद्राणीच्या वडिलांचं बोलणं सुरूच असत तेवढ्यात रुद्राणी घरी येते. तिचे वडील तिला सगळं सांगुन तिच मत विचारतात ती म्हणते. "बाबा मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टी साठी अडवलं आहे का? तुम्हाला मुलगा आवडला आहे न? मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल." हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो

आणि मग ठरल्या वेळी बघण्याचा कार्यक्रम होतो. दोघ एकमेकांना एकट्यात भेटतात तेव्हा पारस तिला विचारतो. "हाय, मला जरा तुझ्याशी बोलायचं बोलू का?" रुद्राणी खाली मान घालून बसलेली + ती हो सांगते. पारस तिला सांगतो. "माझं तुझ्यावर
देखील बघ मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं आज ती

मुळे ती दुखावली जाणार असतील तर ते काम म।

तुला ऑफिसमध्ये बघितल्यापासून प्रेम आहे पण कधी तुला सांगायची हिम्मत नाही झाली. आणि हा संयोग माझ्या समोर आहे. पण आणखी एक गोष्ट म्हणजे आमच्या घराची परिस्थिती तुमच्या घरापेक्षा खूप वेगळी आहे. आमच्या घरातल्या मुलींनी कधीही बाहेर जाऊन काम नाही केलं तस आमच्या कडे चालतच नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जर हे सगळं ऐकून देखील जर तुला आपलं हे नातं मान्य असेल तर मी एक नक्की सांगू शकतो माझी तुला कायम साथ असेल तु लग्नानंतर देखील पुढे आपलं काम आणि छंद चालू ठेऊ शकतेस." हे ऐकून रुद्राणी बोलते. "तुला हे कुणी सांगितलं की ऑफिसची कामच फक्त महत्वाची असतात घरातली काम महत्वाची नसतात का? तु एवढं बोललास हीच खूप मोठी गोष्ट आहे. एक मुलगी जेव्हा माप ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा ती सगळ्या गोष्टी स्वीकारून प्रवेश करते. माझ्यासाठी माझे छंद माझं काम महत्वाच आहे पण कुणाला दुखावून नाही ज्या घरी मी जाणार आहे जर त्यांना ते मान्य नाही तर मी त्यांना कधीच दुखावणार नाही. माझ्यासाठी जितकी महत्वाची नोकरी करण माझे छंद जोपासण आहे तितकीच महत्वाची आहेत नवी जोडली गेलेली माणसे. आणि आज माझ्या 
मुळे ती दुखावली जाणार असतील तर ते काम मी करणार नाही आणि हेच मला माझ्या बाबानी शिकवलंय आणि बाबांनी शिकवलेल्या आईनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. बाबांनी तुझ्यासाठी हो म्हणलय ते कधीच माझ्यासाठी चुकीचा निर्णय घेणार नाहीत मला त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे. आणि तू मला कायम साथ देशील हे सांगून तु तो विश्वास सार्थ केला आहेस त्यामुळे मला तुझं स्थळ मान्य आहे मी तयार आहे लग्नाला." हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद होतो. तर पारसच्या डोळ्यात मात्र पाणी येत तो मनाशीच ठरवतो काहीही झालं तरी आपण कायम रुद्राणीला साथ द्यायची आयुष्यभर...

भावार्थ :- खरच समर्पण ही सुद्धा एक प्रेरणात्मक

भावना असते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळायलाच हवी हे जरुरी नाही. आपण जर लोकांसाठी चांगले काम करत राहिलो तर न मागता आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळतेच. अगदी रुद्राणी सारख.