Helmet mandatory road accidents and discussion in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | हेल्मेट सक्ती रस्ते अपघात व चर्चेला उधाण

Featured Books
Categories
Share

हेल्मेट सक्ती रस्ते अपघात व चर्चेला उधाण

*हेल्मेटसक्ती, रस्ते अपघात व चर्चेला उधाण*

          *सुचना - हेल्मेट सक्ती करण्याऐवजी वाहनांच्या गतीला नियंत्रीत करण्याची सक्ती करावी.*
           महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. मुख्यमंत्री बनविण्याचा पेच कायमच आहे. त्यातच शासनानं एक निर्णय पारीत केला. तो म्हणजे हेल्मेटसक्ती. हेल्मेट हा दुचाकीस्वारांपैकी दोघांनीही म्हणजेच चालकानं व चालकाच्या मागे बसणाऱ्यानंही वापरावा. त्याचं कारण आहे रस्ते अपघात. 
         रस्ते अपघाताच्या बाबतीत नागपूरचा म्हणजेच एका शहराचा विचार केल्यास एका नागपूरात तब्बल एकशे एक्यान्नवच्याही वर अपघात झालेत. ज्यात एकशे तेरा लोकं मरण पावलेत. ज्यात सर्वजण विनाहेल्मेट होते. सर्वात जास्त अपघात अजनी विभागात झाले. त्यामुळं केवळ नागपूर शहरातच नाही तर राज्यातही हेल्मेट सक्ती करण्यात आली आणि त्यावर दोघांनीही हेल्मेट न घातल्यास त्यावर जबर कारवाईचे संकेत मिळाले. साहजिकच त्यात जे हेल्मेट घालून प्रवास करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अर्थातच दंड वसूली. शिवाय असे विनाहेल्मेटधारी सापडावेत. म्हणून त्यांचेवर सिसीटिव्ही कॅमेरेही अधिक लक्ष ठेवणार आहेत. 
         रस्ते अपघात. तो होणारच आहे. मग कितीही सुरक्षीत गाडी चालवली तरी. कारण जिथं जन्म आहे, तिथे मृत्यू येणारच आहे. मृत्यूने कोणालाच सोडलेले नाही. तो मृत्यू रस्ते अपघातानंही येतो वा एखाद्या आजारानंही येतो. मात्र आजारानं मृत्यू झाल्यास त्या मृत्यूचं मोजमाप करता येत नाही. अन् रस्ते अपघातानं मृत्यू आल्यास त्याचं मोजमाप करता येतं. त्यावर कारणं शोधली जातात. कारणांचा शोध घेतांना सरळसरळ आरोप लावला जातो की संबंधीत लोकांनी हेल्मेट वापरला नव्हता. म्हणूनच मृत्यू झाला. परंतु महत्वाचं म्हणजे जे हेल्मेट घालून गाड्या चालवतात, त्यांचे अपघात होत नाहीत काय? असे लोकांचे मत. 
         अपघात हे जे हेल्मेटधारी असतात. त्यांचेही होतातच. मागे एकदा हेल्मेटधारी असलेल्या व्यक्तीचा ट्रक त्याच्या पोटावरुन गेल्यानं अपघात झाला होता. शिवाय बरेचसे अपघात हे दुचाकीस्वार सोडा, चारचाकी गाडीच्या आत बसूनही व सीट बेल्ट लावला असतांनाही होत असतात. त्याला जबाबदार हेल्मेट नसतंच. 
         अपघात होतात. त्याची बरीच कारणं आहेत. पहिलं आणि महत्वपुर्ण कारण आहे, चालकाची गती. तो किती वेगानं वाहन चालवतो, यावर त्या व्यक्तीचा अपघात ठरलेला असतो. आपल्या वाहनाची गती तीव्र असल्यास अपघात हा नक्कीच होतो. कारण जेव्हा आपल्या वाहनांची गती तीव्र असते, तेव्हा समोरुन येणारी गाडी ही अचानक पुढं आल्यानं आपल्याला गाडी नियंत्रीत करता येत नाही. अशावेळेस अपघात हा नक्कीच घडतो. अपघाताला आमंत्रण ही आपल्या वाहनांची गतीच देत असते. 
          आजचा काळ असाच आहे. चोर चोरी करतो व शावावरच चोरीचा आड येतो व शावच पकडला जातो. तीच बाब रस्ते अपघातात हेल्मेटसक्तीबाबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा जर गती नियंत्रीत करण्याची सक्ती केली तर बरेचसे अपघात टाळता येतील. घडणारच नाही. परंतु तसा विचार कोण करणार. त्याबाबत कोणीच विचार करीत नाहीत व वाहनांच्या गतीवर कोणीच लक्ष देणार नाही. 
          अविकडील काळात वाहनांची गती कमी असण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचं कारण आहे अपघात टाळणे. कारण अलिकडील काळात लोकांकडे वाहन चालवितांना पुरेसा वेळ नसल्याचे जाणवते. त्यातच अशी वाहन अगदी मदमस्त होवून अगदी सुसाट वेगानं रस्त्यावरुन धावत असतात. जसा वाहनचालकांच्या बापज्यादांचाच रस्ता लागला. ते कोणत्याही कामाला कधीच पाच दहा मिनीट लवकर निघत नाहीत. मग वेळ होतो व वाहनांची साहजिकच गती वाढवली जाते व आपली गाडी आपल्या मागं जणू कुत्रं लागल्यागत अगदी सुसाट वेगानं चालत असते. त्यानंतर अपघात घडतो. कारण मृत्यू हा कधीच आपल्यावर नाव येवू देत नाही. मृत्यूला टाळताही येत नाही. तो येणारच असतो. त्यासाठी निमित्त असते आपल्या वाहनांची चालविण्याची गती. आता हा अपघात घडतो, तो हेल्मेट घातल्यानं नाही तर आपले वाहन चालविल्यानं. जर हेल्मेट घातले नसते आणि वाहन सुरक्षीत चालवले असते तर अपघात घडला असता का? तर त्याचं कारण नाही असंच येईल. 
         मृत्यूबाबत सखोल विचार केला तर अलिकडे आपण समृद्धी मार्गावर होत असलेले अपघात ऐकले आहेत व कित्येक वेळेस आपण वर्तमानपत्रातही वाचले आहेत. ते तर चारचाकी गाड्यांचे अपघात आहेत. रस्त्यावर अपघात होणारच कारण त्यास जबाबदार केवळ हेल्मेटच नाही तर रस्तेही असतातच. काही ठिकाणी जेव्हा आपली गाडी वेगानं असते, तेव्हा अचानक आपल्याला समोर काहीतरी आल्याचा भास होतो. अशावेळेस आपण त्या पदचिन्हाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हातून गुन्हा घडून नये म्हणून. परंतु आपली गाडी वेगानं असल्यानं आपल्याला आपली गाडी नियंत्रीत करता येत नाही व अपघात होतो. त्यानंतर आपण गाडी थांबवतो. मागे येवून पाहतो, परंतु आपल्याला असं पदचिन्हं वा कोणतीच वस्तू तिथं दिसत नाही व करून चुकतं की आपल्याला भास झाला. असं बरेचदा होतं. कधीकधी रस्त्यानं चालतांना हेल्मेट असल्यानं मागून येणारं वाहन बरोबर दिसत नाही. त्यातच आपण आपली गाडी बाजूला लावू शकत नाही व अपघात घडतो. कधीकधी एखाद्या हेल्मेटधारीला आपण किती गतीनं वाहन चालवत आहो, हे हेल्मेट घातल्यानं कळत नाही व त्याचेकडून दुसर्‍याच हेल्मेट न घालणाऱ्याचा अपघात होतो. कधीकधी एखादा किडा अचानक आपल्या अपघाताला कारणीभूत ठरतो. तो एवढ्या जोरानं चावतो की आपलं लक्ष त्याकडे वेधलं जातं. अशावेळेस आपली गाडी जर वेगानं असेल तर नियंत्रीत होत नाही व अपघात घडतो. 
         अलिकडील काळ हा तरुणाईचा काळ आहे. आता तरुण मंडळींकडून जास्त अपघात होतात. कारण तरुण रक्त असतं. त्यातच वाहन चालवितांना त्यांच्या वाहन चालविण्यात स्टंटबाजी असते. शिवाय गतीनं वाहन चालविल्याशिवाय त्यांना आनंदच मिळत नाही. ते पुढील वाहनाला कट मारुन आपलं वाहन चालवित असतात. यात खासकरुन मुली जास्त पटाईत असल्याचं आढळून येतं. कारण त्यांना माहीत असतं की मुली या स्रिया असल्यानं त्यांच्यावर दया दाखवली जाते. त्यांना भावनेच्या भरात माफ केलं जातं. त्या जास्तच कट मारुन आपल्या गाड्या चालवीत असतात व त्याच अपघाताला कारणीभूत ठरतात. 
        पुर्वी शाळेशाळेत आर एस पी रस्ता सुरक्षा अंतर्गत प्रत्येक शाळेत शिकवलं जायचं. त्यात वाहन कसं चालवायचं याबाबतही धडे गिरवले जायचे. ज्यातून अपघात बव्हंशी होत नसत. मात्र आता शाळेशाळेत रस्ता सुरक्षेचे पाठ करून सप्ताह साजरे केले जातात. परंतु प्रत्यक्षात ती माहिती तोंडानं दिली जाते. प्रात्यक्षिक स्वरुपात नाही व ती माहिती विद्यार्थी ऐकत असतांना ती माहिती प्रत्यक्ष स्वरुपात नसल्यानं तीच माहिती डोक्यावरुन जाते व रस्ता सुरक्षेबाबत कितीही सांगितलं नाही तरी ती माहिती डोक्यात राहात नाही व अपघात घडतोच. 
          हेल्मेट सक्ती...... आता हेल्मेट दुचाकीस्वारांमध्ये दोघांनाही सक्तीचं झालं व वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं. कोणी म्हणत आहे की हेल्मेट सक्ती ही व्हायलाच हवी. परंतु जो स्वार असेल त्याला. त्याच्या मागे बसणाऱ्याला नको. त्याचं कारण म्हणजे कधी कधी एखाद्यावेळेस एखाद्या गरजू माणसालाही अर्थातच वयोवृद्ध माणसालाही बसवावं लागतं गाडीवर. ज्यांना हेल्मेट वापर सहन होत नाही. कारण हेल्मेट वापरण्याची मर्यादा ही विशिष्ट वयापर्यंतच आहे. काही काळानं हेल्मेटचा त्रासच होतो असं काही लोकांचं म्हणणं. शिवाय असं जर झालं तर कोणताच व्यक्ती कोणालाही लिफ्ट देणार नाही. मग तो कितीही गरजू असला तरी. काही लोकांच म्हणणं आहे की एक हेल्मेट बरोबर सांभाळता येत नाही. त्यात आता दोनदोन हेल्मेट सांभाळायचे कसे? काही लोकांचं म्हणणं आहे की हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा वाहनांची गती नियंत्रीत करायला हवी होती. कोणी म्हणतात की हे राजकारण आहे. महायुतीला निवडून दिले ना. आता भोगा, जे जे वाट्याला येईल ते. काही लोकं या हेल्मेट सक्तील अन्यायकारक बाब समजतात. काही रस्ते चांगले करा, अपघात होणार नाहीत असेही म्हणत आहेत तर काही या निर्णयामागे लुटीचं राजकारण आहे असेही म्हणत आहेत. तर काही जण म्हणतात की यातून आरोग्याचे प्रश्न निश्चितच निर्माण होतील. त्याःच्याच म्हणण्यानुसार हेल्मेट घालणे हा ज्यांच्या त्यांच्या इच्छेचा प्रश्न असावा तो वापरणे ऐच्छिक असावे. कारण सक्ती करुन समस्या सुटणार नाहीत तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतील.
           विशेष सांगायचं म्हणजे हेल्मेट सक्ती ही सक्तीची नसावीच. तो विषय ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असावा. कारण त्यातून काहींचं खरंच नुकसान होतंच. शिवाय काही दंड भरतात. परंतु हेल्मेट वापरत नाहीत. काहीजण सुरक्षा म्हणून हेल्मेट घालत नाहीत तर दंड बसते म्हणूनच हेल्मेट घालतात. तसं पाहिल्यास हेल्मेट घालण्याबाबत सक्ती नसावीच. असं काही लोकांचं म्हणणं. त्यांच्याही मतानुसार अशी सक्ती करणं कुठंतरी लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. ज्या संविधानातील एका कलमेनुसार लोकांना व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यानुसार मुक्तपणे जीवन जगण्याचाही अधिकार आहे. ज्यात हेल्मेट सक्ती बसत नाही. त्यातच काहींना म्हणायचं आहे की आता निवडणूक झाली आहे. लाडक्या बहिणीचे मानधन वाढले आहे. ते कसे काढणार? लोकांच्याच खिशातून काढावे लागणार ना. म्हणूनच ही हेल्मेट सक्ती. दंडाच्या रकमेतून निदान लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे वसूल करता येतील. मात्र यात लाडक्या बहिणीचा व सरकार निवडून येण्याचा काहीही संबंध नाही. परंतु लोकांना कोण सांगेल की बाबांनो, ही हेल्मेट सक्ती तुमच्याचसुरक्षेसाठी आहे. हेल्मेट वापरा व दंड टाळा. याचा राजकारणाशी, निवडून येण्याशी व लाडक्या बहिणीशी कोणताही संबंध नाही. तसंच काही लोकांचं यावर आणखी एक म्हणणं की सरकारनं आता पायी चालणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करावी. कारण पायी चालणाऱ्या लोकांचाही रस्ते अपघात होत असतोच. 
          महत्वाचं म्हणजे लोकांच्या म्हणण्यानुसार हेल्मेट सक्ती नसावी. तो इच्छेचा प्रश्न असावा. सुरक्षा हवी तर हेल्मेट वापरा. अपघात टाळा. अशाचा अपघात झाल्यास सरकारनं त्यांची काळजी घ्यावी व त्यांना मदत करावी व ज्यांचा अपघात हेल्मेट न वापरता झाला. त्यांना सुयोग्य लाभ देवू नये. शिवाय लोकांनी हेल्मेट वापरावा म्हणून जनजागृती करावी. सक्ती करु नये म्हणजे झालं. हं, करायचंच आहे तर गती नियंत्रीत करण्यावर जास्त भर द्यावा. ज्यातून अपघाताच्या समस्या सुटतील, सोडवता येतील. ज्यात गाड्यांची गती प्रती वीस किंवा तीसच ठेवावी असे आदेश निघावेत. ज्यातून अपघात निश्चीतच टाळता येवू शकतील. शिवाय गाड्यांची गती जर कमी असली अन् अपघात झालेच तर त्याची झळ कमी पोहोचेल. कारण क्षतीची तीव्रता कमी असेल येत शंका नाही. म्हणूनच गतीच्याच बाबतीत सक्ती असावी. हेल्मेट बाबत नाही.