Anubandh Bandhanache - 24 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 24

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 24

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २४ )

आज रविवार असल्यामुळे प्रेम थोडा उशिराच उठतो. अंघोळ वगैरे आवरून तो आरव च्या घरी येतो. त्याला पण आज सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. दोघे त्याच्या रूम मधे गप्पा मारत बसतात.

आरव : काय रे... कुठे गेला होता... एवढे दिवस...?🤔

प्रेम : अरे... ऑफिस मधील एका मित्राच्या गावी गेलो होतो. कोकणात...😊

आरव : अच्छा... मजा आहे तुझी... एवढे दिवस सुट्टी... मस्त एन्जॉय केला ना...😊

प्रेम : हो...रे... छान रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं... 😊

आरव : कोणत्या गावी गेला होता रे...? 🤔

प्रेम : अरे... गोव्याच्या थोडं अलीकडेच... गावाचं नाव आता आठवत नाही. 😊

आरव : अच्छा... मग गोव्याला बीच वर वगैरे जाऊन आला की नाही...😊

प्रेम : हो..तर... गेलो होतो... मस्त एन्जॉय केला. 😊

आरव : तु मस्त फिरून आला रे... आपण कधी जायचं एकत्र ग्रुप ने...?

प्रेम : चल कधीही... मी तयार आहे... बाकीच्यांचे काय...? 😋

आरव : हो... ना... यार, किती वेळा प्लॅनिंग केलं तरी, निघायच्या वेळी यांची काही ना काही नाटकं असतात. 

प्रेम : असं होत राहिलं तर, आपण कधीच गोव्याला जाऊ शकणार नाही...😋

आरव : मला पण तसच काहीसं वाटतं...😊

प्रेम : बघ एकदा बोलुन सर्वांशी... मग करू प्लान...😊

आरव : आपल्या ग्रुप चे नेहमी प्लान बनतात, पण प्रत्यक्षात जाणं काही होत नाही. 😋

प्रेम : हो...ना...यार 😊 बघु... प्रयत्न करू...😊

* बराच वेळ त्याच्याशी गप्पा मारत असताना खुप वेळा प्रेमला असं वाटत होतं की... आरवला सर्व सांगुन टाकू.... पण अखेरपर्यंत तो अंजली बद्दल त्याला काहीच सांगत नाही. 
थोड्या वेळाने तो तिथून घरी निघुन येतो.
दुपारचे जेवण करून पुन्हा मैदानात क्रिकेट खेळायला जातो. 
संध्याकाळ झाल्यावर तो घरी येऊन फ्रेश होतो. चहा वगैरे घेऊन आरवसोवत त्याच्या कामासाठी बाहेर जातो.  

अंजली अजुनही त्या विश्र्वातून बाहेर आलेली नसते. आयुष्यातलं पहिलं प्रेम... त्याच्यासोबत घालवलेले ते सुंदर क्षण... पुन्हा पुन्हा आठवून ती मनातच खुश होत होती. 

आज रविवार असल्यामुळे डॅड दिवसभर घरीच होते. त्यामुळे प्रेमला कॉल पण करता येत नव्हता. संध्याकाळी मैत्रिणीकडे जातेय असं सांगुन ती घरातुन काही कॉइन सोबत घेऊन बाहेर पडते. आणि जवळच असलेल्या एका पिसिओ वरून प्रेमला कॉल लावते. 
प्रेम आरव सोबत बाहेर आलेला असतो... मोबाइलची रिंग होताच तो एका साइड ला जाऊन कॉल रिसिव्ह करतो...

अंजली : हाय... जानु... हाव आर यू...😊

प्रेम : हाय... मेरी जान... मी मस्त मजेत आहे. 😊 तु कशी आहेस...? 😊

अंजली : अच्छा... पण मी मजेत नाही...😔

प्रेम : अरे... का... काय झालं...🤔

अंजली : खुप काही....😔

* प्रेमला थोडं टेन्शन येतं....🙁

प्रेम : अंजु... काय झालं... सांगशील का...🤔

अंजली : तसं काही नाही...पण...😔

प्रेम : पण काय... आता...सांग ना...🤔

अंजली : खरच सांगू....😔

प्रेम : अंजु... प्लिज... बोलशील काय झालंय...🤔

अंजली : प्रेम... खुप वेगळं फील होतंय रे आपण तिकडून आल्यापासून...😔

प्रेम : म्हणजे...🤔

अंजली : म्हणजे... आता कसं सांगु तुला...😔

प्रेम : जमेल तसं सांग...😊

अंजली : प्रेम..... खुप आठवण येतेय तुझी...😔 खुप म्हणजे खुप मिस करतेय तुला... असं वाटतं कधी एकदा तुला भेटून तुझ्या मिठीत यावं...😔

प्रेम : अंजु.... कंट्रोल... काय चाललंय तुझं...🤔

अंजली : प्रेम... खरच बोलतेय रे, तुला नाही का वेगळं वाटत काही... 😔

प्रेम : काय वेगळं वाटायचं त्यात...🤔

अंजली : म्हणजे तुला नाही आठवण आली माझी... आल्यापासून...एकदाही...😔

प्रेम : अरे... असं काय विचारते...🙁

अंजली : सांग ना मग खरं खरं... नाही आली का...? 😔

प्रेम : हो... आली... खुप वेळा...😊

अंजली : मग... मी तेच तर बोलतेय ना राजा, तुला माहितीये... रात्री झोप पण येत नव्हती. असं वाटत होतं... उगाच परत आलो आपण. 😊

प्रेम : अच्छा... मग चल... परत जाऊया...😊

अंजली : हो... चल ना... मी तयार आहे. कधी जायचं बोल...😊

प्रेम : पागल... 😊

अंजली : अरे... तुच तर बोलला ना... चल म्हणुन... मग...😊

प्रेम : राहायचं ना मग तु... का आली ? 😊

अंजली : तु राहिला असता तर नक्की राहिले असते मी...😊

प्रेम : हो...का... 😊

अंजली : मग काय... तुलाच घाई होती इकडे यायची... 😊 कोण वाट बघत होतं का इकडे...🤨

प्रेम : हो... ना... अगदी आतुरतेने...😊

अंजली : ओय... कोण...? 🤔

प्रेम : माझे बॉस...😀

अंजली : अच्छा... मला वाटलं... अजुन कोणी आहे की काय... वाट बघणारी...😊

प्रेम : सध्या तरी एकच आहे... ती म्हणजे तु...😊

अंजली : ओय... सध्या एकच म्हणजे... पुढे जाऊन वाढणार आहेत का...🤨

प्रेम : अरे म्हणजे तसं नाही...😊

अंजली : मग कसं...🤔

प्रेम : पुढे काय होणार आहे ते थोडीच माहीत आहे. 😊

अंजली : तुला माहित नसेल... पण मला माहित आहे... इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीच असु शकत नाही... कळलं. 😊

प्रेम : हो...हो...कळलं...😊

अंजली : बरं... सांग ना आता तु कुठे आहेस ? 

प्रेम : आरव सोबत बाहेर आलोय. 

अंजली : अच्छा... मग ये ना इकडे...😊

प्रेम : कशाला...🤔

अंजली : मला भेटायला...😋

प्रेम : हो...का... आरव पण सोबत आहे. 

अंजली : मग काय झालं... त्याला पण घेऊन ये. 😊

प्रेम : अच्छा... आणि काय सांगु त्याला...🤔

अंजली : जे आहे ते सांग... कधीतरी सांगनारच होतास ना... मग आज सांग...😊

प्रेम : नाही... बघु नंतर...😊

अंजली : प्रेम..... किती वर्ष झाली या गोष्टीला...? तो तुझा एवढा जिवलग मित्र आहे, तरी तु त्याला आपल्याबद्दल अजुन काहीच कसं सांगत नाहीस. 🤔

प्रेम : सांगेन... कधीतरी...😊

अंजली : माहीत नाही...ते कधीतरी कधी येणार आहे...😏

प्रेम : अरे... हो...चिडते कशाला...😊

अंजली : चिडू नको तर मग काय करू...का तु लपवतोय सर्वांपासून मला...🤨

प्रेम : अगं वेडे... असं काहीच नाही. सांगेन बोललो ना मी...😊

अंजली : हो... गेली कित्येक वर्ष मी हेच ऐकत आलीय. 😏

प्रेम : अंजु.... प्लिज, नको आता हा विषय. 🙏🏻

अंजली : नेहमी असच करतो तु... माहितीये मला... 😔

प्रेम : अरे.....😊

अंजली : एक दिवस असा येईल, मलाच स्वताहून सांगावं लागेल त्याला असं वाटतं. 😔

प्रेम : बरं... आता शांत होशील का...?😊

अंजली : मी शांतच आहे...😔

प्रेम : हो...का... 😊

अंजली : हो....😔

प्रेम : बरं...ओके. मी आता निघतोय घरी. कॉल कट कर आणि तु पण जा घरी. 😊

अंजली : हो... जाते...😔

प्रेम : बाय...😊

अंजली : बाय...😔

* आरव प्रेम जवळ येऊन त्याला विचारतो,

आरव : काय रे... कोणाशी बोलतोय एवढं 🤔

प्रेम : अरे मित्र होता...चल निघू आपण...😊

आरव : नक्की ना... काहीतरी गडबड वाटतेय मला...🤨

प्रेम : अरे... काही गडबड नाही... चल तु गाडी काढ. 😊

* दोघेही तिथून घरी येतात......

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे दुपारी अंजलीचा कॉल येतो...

अंजली : हाय.....कसा आहेस... जेवला ? 😊

प्रेम : हो... आत्ताच...तु...😊

अंजली : हो... जेवले मी पण...😊

प्रेम : अच्छा... बोल... राग गेला का...😊

अंजली : प्रेम..... सॉरी...😔

प्रेम : इट्स ओके... रिलॅक्स...😊

अंजली : मला पण वाटतं ना असं कधी कधी... म्हणून बोलले... पण आता नाही बोलणार कधीच...😔

प्रेम : अरे... ओके ना, तो विषय सोडुन दे, दुसरं बोल...😊

अंजली : अच्छा...बोलू...मग...😊

प्रेम : हा... बोल ना...😊

अंजली : आय लव यू.... जानु....😍

प्रेम : लव्ह यू... टू... मेरी जान...😍

अंजली : हाय.... किती छान वाटतं...🥰

प्रेम : खरच का... 🤔😊

अंजली : हा... मग... तुला नाही कळायचं ते...😊

प्रेम : का बरं...🤔

अंजली : बोलली ना... त्यासाठी........

प्रेम : त्यासाठी काय... 🤔

अंजली : काही नाही... जावू दे ना...😊

प्रेम : अरे... असं कसं... जाऊ दे... बोल आधी...😊

अंजली : प्रेम... प्लिज... सोड ना ते...मी काय बोलते...😊

प्रेम : अरे... आधी ते सांग... मग काय ते बोल.

अंजली : अरे... असं काय करतो, बोलली ना काही नाही. 

प्रेम : बरं ओके... नको सांगु... ठेऊ मग फोन. 😊

अंजली : प्रेम... काय हे....😔

प्रेम : कुठे काय... तुला बोलायचं नाही, मग...😊

अंजली : अरे... मी कुठे असं बोलली...🤨

प्रेम : मग... सांग ते आधी काय... 😊

अंजली : अरे... त्या भावना असतात... ज्या आतुन फील होतात. असं सांगता येत नाही.

प्रेम : अच्छा... मग कसं सांगशील...😊

अंजली : हो... का... मग भेट... तेव्हा सांगते.😊 

प्रेम : त्यासाठी भेटावच लागेल का...? 🤔😊

अंजली : हो... कधी भेटतोय मग...😊

प्रेम : भेटू ना लवकरच...😊

अंजली : हा... तेच विचारतेय... ते लवकर म्हणजे कधी, ते कळेल का मला...🤨

प्रेम : आत्ता कन्फर्म नाही सांगु शकत, पण भेटू आपण...😊

अंजली : छान... फक्त वाट बघ...😊 हो ना...😊

प्रेम : अरे...😊

अंजली : बरं ठीक आहे... तुला वेळ मिळेल तेव्हा सांग मला... ओके. 😔

प्रेम : नाराज झालीस...😊 अगं आत्ता ऑफिसमधे खुप पेंडिंग कामं आहेत. एकतर आठवडाभर सुट्टी झालीय. मग ती कंप्लीट करावी लागतील ना...😊

अंजली : इट्स ओके ना... मी कुठे बोलतेय, सुट्टी वगैरे घेऊन भेट म्हणुन... ऑफिस मधुन सुटल्यानंतर थोड्या वेळासाठी तर भेटू शकतो ना... पाच, दहा, मिनिट... खुप आहेत माझ्यासाठी....😊

प्रेम : अरे... लेट पण होतं ना संध्याकाळी... मग... आणि तु घरी काय सांगणार, कुठे जातेय वगैरे...

अंजली : प्रेम... का एवढा विचार करतो रे... मी बघेन ना ते... तु कशाला टेन्शन घेतो त्याचं...🤨

प्रेम : बरं बरं....ओके, रिलॅक्स... कधी भेटूया तु सांग...😊

अंजली : अच्छा.. खरच...😍 मग आजच भेटू... चालेल... 🥰

प्रेम : अंजु... हे जरा जास्त होतंय ना...😊

अंजली : आजिबात नाही...किती वाजता येऊ ऑफिस जवळ स्कुटी घेऊन... तु बोल... 😊

प्रेम : ओय... कंट्रोल...ड्रायव्हिंग लायसन आहे का...😊

अंजली : मला नाही आडवत कोणी... आणि आडवल तर सांगेन... तुला भेटायला चाललीय म्हणुन....😋

प्रेम : अच्छा... मग तर अजुन जास्त फाईन मारतील. 😊

अंजली : चालेल मला... तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी मी कितीही वेळा अडवल तरी फाईन भरायला तयार आहे. 😋

प्रेम : अंजु.... 😊

अंजली : हो... ना... खरच...😊

प्रेम : बरं ओके... आता ऐक... आज आणि उद्या तरी नाही पॉसिबल, आपण बुधवारी भेटू... ओके. 😊

अंजली : ओय... डायरेक्ट दोन दिवसानंतर, इथे मी मनात सर्व प्लॅन करून पण तयार झाली, आणि तु.....😔

प्रेम : अरे... कसले प्लॅन...🤔

अंजली : प्रेम... येते ना संध्याकाळी... प्लिज 🙏🏻😔

प्रेम : अंजु... अगं... असं नको ना करू, मी बोललो ना, दोन दिवस खुप काम आहे. मग थोडा फ्री होईल तेव्हा भेटू...ओके...😊

अंजली : बरं... ओके... पण बुधवार चे गुरुवार, शुक्रवार नको करू. नाहीतर मी तिथेच येईन भेटायला ऑफिस मधेच...😊

प्रेम : ओय... असं काही करु नको... आपण बुधवारी भेटतोय कन्फर्म...ओके. 👍🏻

अंजली : ओके...ओके... नाही येणार... तेवढं कळतं मला...मी असच बोलले... लगेच खरं वाटलं तुला...😊

प्रेम : हो...ना... तुझा काही भरोसा नाही. 😊

अंजली : हो... का... मग ठिक आहे. आता तर येतेच मग...😊

प्रेम : अंजु.... 😊

अंजली : अरे... घाबरलास...😊 गंमत केली रे थोडीशी... तुला खरच वाटलं मी येईन...😋

प्रेम : नाही... मला माहित आहे, माझी अंजु तसं काही करणार नाही. 😊

अंजली : आहे ना तेवढा विश्वास... मग, आणि तो विश्वास मी आयुष्यभर टिकऊन ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेन...तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही... प्रॉमिस...😊

प्रेम : अरे.... बस्,,,, जास्त इमोशनल नको होऊ आता...😊

अंजली : बरं... नाही होत. 😊 पण हे खरं आहे. 😊

प्रेम : हो...हो... माहीत आहे मला. आता ठेऊ फोन, काम पण करायला हवं ना... 😊

अंजली : अरे हो रे ... मी विसरलेच, कर तु काम, दोन दिवसात संपवायचे आहे. 😋

प्रेम : झालं बोलुन...😊

अंजली : हो... झालं...😊

प्रेम : मग आता ठेऊ फोन...😊

अंजली : अच्छा... ठेवतोय का...😊

प्रेम : अंजु.....,😊

अंजली : बरं ओके.... आणि ऐक ना...😊

प्रेम : आता काय...🤔

अंजली : आय लव यू... सो मच...😘

प्रेम : लव यू टू...😊 बाय...

अंजली : ओके... बाय...टेक केअर.😊

प्रेम : बाय...😊

* प्रेम कॉल कट करून आपल्या कामात व्यस्त होतो.

ठरल्याप्रमाणे बुधवारी ते दोघे भेटतात. नेहमीच्या ठिकाणी जाऊन एकमेकांसोबत थोडा वेळ घालवतात. 

गावी जाऊन आल्यापासून त्यांच्या भेटी वाढायला लागल्या होत्या. प्रेम ने खुप टाळण्याचा प्रयत्न करूनही अंजलीच्या हट्टापायी तिला भेटत होता.

अंजली आता एखादा दिवस सोडला तर रोज संध्याकाळी स्कुटी घेऊन प्रेमच्या ऑफिस जवळ येऊन थांबायची. त्यानंतर ते दोघे त्यांच्या आवडत्या स्पॉट वर जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवू लागले होते. दोघेही एकमेकांच्या अजुन जवळ येत चालले होते. 

आता त्या वेळेतही वाढ होत होती. अंधार पडेपर्यंत ते दोघे तिथे एकमेकांसोबत वेळ घालवत असत. तिथून निघाल्यावर अंजली जाताना प्रेमला त्याच्या घरापासुन थोड्या अंतरावर सोडुन पुढे घरी निघुन जायची. 
तिने घरी मॉम ला पण योगा क्लासेस साठी जातेय असं खोटं सांगुन ठेवलं होते. त्यामुळे अंजली उशिरा आली तरी मॉम पण जास्त लक्ष देत नव्हत्या. 

खुप दिवस, महिने... हे असच चालु होते....


अंजलीने आता तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच कॉलेजच्या लाईफ मधे प्रवेश केला होता. शहरातील मोठ्या नामांकित कॉलेज मधे तिचे एडमिशन झाले होते. 
काही दिवसातच कॉलेज चालु होणार होते, पण त्याच्या दोन दिवस आधीच प्रेमचा वाढदिवस होता. आणि या वाढदिवशी त्याच्यासाठी खुप काही प्लॅन केले होते.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️