Anubandh Bandhanache - 23 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 23

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 23

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २३ )

प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. अंजली पण थोड्या वेळाने तिथे येते. दोघे बोलत असतात...

अंजली : मग... कसं झालेलं जेवण...😊

प्रेम : खुपच छान आणि टेस्टी झालेला रस्सा...😋👌🏻

अंजली : पण तु खुप कमी जेवलास...🤔

प्रेम : अरे... सकाळी पण खुप जास्त खाल्ले ना... मग जागा नको का पोटात...जिरणार कसं... एका जागी बसुन....😊

अंजली : अच्छा... असं आहे का, मग जरा फिरून यायचं ना गावातून...😊

प्रेम : मी... एकटा जाऊ... मला कोण ओळखत पण नाही ना इथे...मग 🤔

अंजली : अच्छा... मग आपण दोघे जाऊ... चालेल...?😊

प्रेम : नको... आता... संध्याकाळी जावू हवं तर... 😊

अंजली : बरं ओके... मग आत्ता काय करायचं...😊

प्रेम : आत्ता... आराम कर... झोप थोडा वेळ, बरं वाटत नव्हते म्हणुन थांबली आहेस ना घरी. 😊

अंजली : प्रेम... खरं सांगायचं तर... मला जायचं नव्हतं तिकडे लग्नाला... म्हणुन मी झोपुन राहिले सकाळी...😋

प्रेम : काय...? 🤔 

अंजली : हो... म्हणजे... रात्री त्रास झाला... पण सकाळी ओके होती. असच पडुन होती बिछान्यात....😊

प्रेम : म्हणजे नाटक करत होती...🤔 थांब मॉमना सांगतो आता आल्यावर...😊

अंजली : ओय... मी तुझ्यासाठी थांबले. समजलं ना...😊

प्रेम : म्हणजे...🤔

अंजली : अरे... म्हणजे... तिकडे गेलो असतो तर एवढ्या लोकांत आपल्याला वेळ मिळाला नसता, बोलायला वगैरे.... म्हणुन...😊

प्रेम : काय मुलगी आहे...🤦😊

अंजली : हो...ना... मिळाला असता का सांग वेळ...😊

प्रेम : आणि मी गेलो असतो तर मॉम सोबत, विचारत होत्या त्या सकाळी मला, येतोय का म्हणुन....😊

अंजली : हो... माहित आहे मला, मी जागीच होते तेव्हा...😊 आणि तु निघाला असता तर मी थोडीच इथे थांबणार होते, 😊 मी पण येणार होती. 😊 पण तसं काही झालं नाही. 😊

प्रेम : तु... ना... खरच ग्रेट आहेस....🙏🏻😊

अंजली : मग आहेच, नाहीतर आपल्याला कसा वेळ मिळाला असता. 😊

प्रेम : छान...😊👌🏻

अंजली : पुन्हा पुन्हा थोडीच असा चान्स मिळणार आहे...😋

प्रेम : हो...का... म्हणुन खोटं बोलायाचं का 🤔

अंजली : तेवढं चालतं... तसंही बोलतात ना, प्रेमात सर्व माफ असतं...😊

प्रेम : छान...😊🙏🏻

* ते दोघे तिथेच बसुन खुप वेळ गप्पा मारतात. आई पण किचन मधलं सर्व आवरून त्यांच्यासोबत येऊन बोलत बसतात. 
गप्पा एवढ्या रंगतात की संध्याकाळ होते. मधेच मॉम चा कॉल येतो. ते लोक रात्री उशिरा येणार म्हणुन....
संध्याकाळी दोघेही फ्रेश होऊन, चहा घेऊन आईसोबत गावात फिरायला जातात. आई त्या दोघांना पण गावातील देवीच्या मंदिरात घेऊन जातात. जिथे त्यांनी अंजली साठी नवस बोलले होते. 
देवीचे दर्शन घेऊन ते परत घरी येतात, आई येताना थोडेसे चिकन घेतात. कारण आज रात्री पण हे तिघेच जेवायला असतात. मॉम आणि ते लोक जेऊनच रात्री उशिरा येणार होते. 

रात्रीचे जेवण पण लवकरच होते. आई पण किचन मधील सर्व आवरून त्यांच्यासोबत टीव्ही बघत बसतात. टीव्हीवर पिक्चर लागलेला असतो. "कहो ना प्यार है"

आई थोडा वेळ थांबतात आणि मग झोपायला जातात. जाताना अंजूला बोलतात...

आई : सोनू... पिक्चर संपला की झोपायला ये माझ्याजवळ... बाय कधी येईल माहीत नाही... उशीर होईल त्यांना...

अंजली : नको...मी आमच्या रूम मधेच झोपते, मॉम आल्यावर परत उठवशील तु, 

आई : बरं बाई... झोप तु नाही उठवत तुला, काय माहीत आता हे लोक किती वाजता येतायत... 

अंजली : आई.... तु झोप गोळ्या घेऊन... येतील ते....😊

आई : प्रेम तु पण झोप रे लवकर...😊

प्रेम : हो... आई... पिक्चर संपला की जाईन मी पण झोपायला. 😊

* आई झोपायला निघुन जातात, अंजलीचे लक्ष टीव्ही पेक्षा जास्त प्रेम कडे जात होते. मधेच त्यांची नजरानजर होत होती. 
थोड्या वेळाने अंजली प्रेम च्या बाजुला जावून बसते. आणि त्याचा हात हातात घेत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्याकडे पाहते.

प्रेम : ओय... काय चाललंय हे...? 🤔

अंजली : कुठे काय....पिक्चर बघतेय ना...😊

प्रेम : अच्छा... पण टीव्ही समोर आहे...😊

अंजली : पण मला या हिरोला बघायचं आहे ना...😍

प्रेम : हो...का... जास्त होतंय ना जरा...😊

अंजली : अरे...बिलकुल नाही...😊

प्रेम : आईंनी पाहिलं ना... मग कळेल ते...😊

अंजली : झोपली असेल ती, नको टेन्शन घेऊ.

प्रेम : अच्छा... किती बिनधास्तपणे बोलतेय ना. 😊

अंजली : अरे... त्यात काय, प्रेम करते तुझ्यावर, मग....😍

प्रेम : मग... काय...?🤔

* अंजली पटकन त्याच्या गालाला किस करते. 😘

अंजली : मग हे...😊

प्रेम : अंजु... काय हे... नको ना रिस्क घेऊ, घरी आहोत आपण, आई कधीपण बाहेर येऊ शकतात. 

अंजली : अच्छा... मग तुझ्यावर प्रेम केलं, यापेक्षा मोठी रिस्क काय असू शकते, सांग बरं...😋

प्रेम : काय बोलू तुला आता...😊

अंजली : काय बोलशील... जानु 🥰

प्रेम : खरच पागल आहेस तु...😊

अंजली : हो... आणि ते तुला पण माहीत आहे ना...मग...😊

प्रेम : हे भगवान... 🙏🏻

अंजली : अरे..... काय झालं आता...😊

प्रेम : काही नाही... चल मी जातो झोपायला. तु पण जाऊन झोप आता. 😊

अंजली : अरे... बस ना थोडा वेळ, अजुन पिक्चर पण नाही संपला. 😊

प्रेम : नको... मला झोप आलीय...😊

अंजली : नक्की झोप आलीय का तुला...🤨

प्रेम : हो... खरच... जाऊया आता ? 😊

अंजली : तुला झोप नाही आलीय, टेन्शन आलं आहे... हो...ना...? बरं मी तिकडे बसते हवं तर... ओके. 😊

प्रेम : अरे... असं काही नाही. पण झोपुया आता खुप वेळ झालाय, मॉम पण येतील कधीही...😊

अंजली : तुला झोप आलीय तर जा झोप तु...😏

प्रेम : ओय... आणि तु काय करणार आहेस...?🤔

अंजली : मी पिक्चर बघते...😏

प्रेम : एकटीच...🤔

अंजली : हो... मग काय करणार आता...😔

प्रेम : अरे यार... ऐकत जा ना जरा...झोप जा तू पण...कळलं.

अंजली : तु झोप ना... मला नाही आलीय झोप. मग मी काय करू...😏

प्रेम : बरं ठिक आहे... तु बघ टीव्ही. मी जातो झोपायला... गुड नाईट. 😊

* असं बोलुन तो त्याच्या रूम मधे जात असतो. जाताना दोन वेळा मागे फिरून तिच्याकडे बघतो. पण अंजली रागात असल्यामुळे त्याच्याकडे बघतही नाही.
प्रेम आत जाऊन बेडवर पडून राहतो.
खरं तर त्याला झोप आलेली नसते. बाहेरचा टिव्ही चा आवाज त्याला ऐकु येत असतो. थोड्या वेळाने तो आवाज बंद होतो. त्याला वाटतं अंजली झोपायला गेली. मग तो पण झोपण्याचा प्रयत्न करतो. पण डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा सकाळचा प्रसंग येत असतो. त्याला त्या गोष्टीवर अजुनही विश्वास बसत नव्हता. डोळे मिटुन तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो.

तेवढ्यात त्याला दरवाजा बंद केल्याचा आवाज येतो. तो डोळे उघडुन पाहतो तर... झिरो बल्बच्या निळ्या प्रकाशात अंजली समोर दिसते. तिला तिथे पाहून तो खडबडून जागा होतो आणि ऊठुन बसतो. 
तो तिला काही बोलणार इतक्यात ती जवळ येऊन त्याच्या ओठांवर बोट ठेवते. आणि त्याच्या बाजुला बसत त्याला मिठी मारत बोलते. 

अंजली : सॉरी... पण आय लव्ह यू...😔

* प्रेम पण काही न बोलता तिला मिठीत घेतो. तिच्या कानाजवळ किस करतो आणि बोलतो.....

प्रेम : अंजु...... लव्ह यू टू...😘

अंजली : सॉरी...पण नाही कंट्रोल झालं. 😔

प्रेम : बरं ओके... पण आता नको ना हे सर्व, किती रिस्की आहे ना हे... म्हणून बोलतोय. 

अंजली : हो... कळतंय मलाही... पण...😔

प्रेम : अरे... उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला. मॉम एवढ्या विश्वासाने मला सोबत घेऊन आलेत. म्हणून भीती वाटते ग...

अंजली : बरं ठिक आहे ना... मग थोडा वेळ पण एकत्र नाही येऊ शकत का...?😔

प्रेम : हो...रे...सोन्या... पण टेन्शन येतं ना, अचानक आई आल्या तर सकाळी झालं तसं, दिवसा ठिक आहे, पण रात्री असं एकत्र पाहिलं तर काय होईल कळतंय का तुला...🤨

अंजली : आई लगेच नाही उठणार आणि मी डोअर बंद केलाय. 😊

प्रेम : आणि तुमच्या रूम मधे जाऊन पाहिलं तर... 🤔

अंजली : किती विचार करतो रे... थोडा वेळ बोलला ना तु... मग यातच वेळ घालवणार आहेस का...? 🤔

प्रेम : मग... काय करायचं....🤨

अंजली : ओह गॉड.... सकाळी मी सांगितलं होतं का....😋

* असं बोलुन ती त्याला बेडवर खाली ढकलते आणि त्याच्या अंगावर झोपत त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवते. 😘 नकळत प्रेमचे हात तिच्या पाठी जातात. तो तिला घट्ट मिठी मारत तिला प्रतिसाद देत असतो. दोघेही पुन्हा एकदा प्रेमसागरात बुडून जातात. 💞
रात्रीच्या त्या मंद निळ्या प्रकाशात दोघेही एकमेकांवर प्रेमरंग उधळत असतात. खुप वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत असतात.
 एका क्षणी प्रेमला असं वाटतं की आपण आपली सीमा ओलांडत आहोत.... त्या क्षणी तो तिच्यापासून बाजुला होत उठुन बसतो. अंजलीला काहीच कळत नाही, ती पण ऊठुन त्याला पाठीमागून मिठी मारते आणि बोलते....

अंजली : प्रेम...... काय. झालं... असं अचानक....😔

प्रेम : काही नाही... तु आता जा झोपायला. 

अंजली : अरे... पण काय झालं... चुकलं का काही माझं....😔

प्रेम : अगं... असं काही नाही. पण नको आता बस् झालं... तु जा खरच....😔

अंजली : प्रेम.... असं का बोलतोय मग... आपण काही चुकीचं करतोय का... ?😔

प्रेम : माहीत नाही... काय चुक काय बरोबर. पण आत्ता इथेच थांबणं योग्य वाटतं मला.

अंजली : प्रेम..... प्लिज असं वेगळं काही बोलू नको ना, मला गील्ट फील होतंय मग. 😔

प्रेम : अंजु.... सॉरी पण, मी नाही कंट्रोल करू शकत अशा वेळी... मग अजुन काही होण्यापेक्षा इथेच थांबलेलं बरं...😔

अंजली : काय बोलतोय तु हे... माझं अगदी मनापासून प्रेम आहे तुझ्यावर, मी सर्वस्व दिलंय तुला. मग मला नाही वाटत की, आपण काही चुकीचं करतोय. 

प्रेम : हो... पण आत्ता तरी नको, खुप घाई होतेय असं वाटतं. सॉरी माफ कर मला...🙏🏻

अंजली : प्रेम... नको ना असं बोलू... रडवणार आहेस का मला आता...😢

प्रेम : सॉरी....😔

* असं बोलुन ती बेडवरून खाली येते. त्याचा चेहरा हातामध्ये पकडुन वरती घेते. आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलते.

अंजली : हे बघ प्रेम... तुला जर हे सर्व चुकीचं वाटत असेल तर ठिक आहे. आपण थांबु इथेच. पण तु सॉरी नको बोलू प्लिज. हवं तर मी आत्ता जाते माझ्या रूम मधे. पण तु रिलॅक्स हो... ओके. 😢

प्रेम : हा... ठिक आहे... तु... जा. 😔

अंजली : बरं ओके... पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि मी सर्वस्वी तुझीच आहे आणि तुझीच असणार आहे. त्यामुळे नको त्या गोष्टींचे विचार डोक्यात आणु नको प्लिज....🙏🏻😔

प्रेम : हा.... 😔

अंजली : हे...काय... असं...? अशीच जाऊ का मी...😢 एकदा मिठीत तरी घेशील ? 😢

* ती असं बोलल्यावर प्रेम उठतो आणि तिचे डोळे पुसतो आणि तिला मिठीत घेतो. अंजली पण त्याला घट्ट मिठी मारते.

प्रेम : सॉरी... जानु... आय लव्ह यू सो मच. 💗

अंजली : लव्ह यू टू... माय जान...😘 आणि आता रिलॅक्स होऊन झोप. मी जाते झोपायला ओके. 😊

* त्याच्या मिठीतुन बाहेर येत ती त्याच्याकडे पहात राहत.... प्रेम अलगद तिच्या कपाळावर किस करत बोलतो....

प्रेम : थॅन्क्स...😘 मी खरच खुप लकी आहे, ज्याला तुझ्यासारखी गोड परी मिळालीय. 😊

अंजली : अच्छा... मग... तसं पाहिलं तर मी तुझ्यापेक्षा खुपच लकी आहे.... कारण माझ्याजवळ तुझ्यासारखा एक अनमोल हिरा आहे. 🥰

प्रेम : अच्छा.....😊 बरं ओके... आता जाऊन झोप तु....😊

अंजली : हो...हो... जातेय... 😊

* असं बोलुन ती पटकन त्याला गालावर किस करते 😘 आणि त्याच्या रूम मधून बाहेर पडत असते तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज येतो. ती धावतच तिच्या रूम मधे जाते, आणि झोपल्याचं नाटक करते. ती मनात हाच विचार करते, बरं झालं लवकर तिथून निघाले, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता. प्रेमने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, याची जाणीव तिला होत होती. आणि प्रेमच्या अशा वागण्याने त्याच्याबद्दल तिच्या मनात अजुनच आदर वाढला होता.
बाहेर मॉम आणि ते सर्व लोक आलेले असतात. दार वाजवताच आई बाहेर येऊन दार उघडतात. सर्वजण आत येऊन आवरून झोपी जातात. 

दुसऱ्या दिवशी पहाटेच शुभम आणि त्याची बायको गाडी घेऊन त्यांच्या घरी निघुन जातात. बाकीचे सर्व तसे उशिराच उठतात.
अंजली मात्र लवकर उठून अंघोळ वगैरे करून किचन मधे आईला घावने आणि खोबऱ्याची चटणी बनवायला मदत करत असते.
थोड्या वेळाने मॉम पण तिथे येतात. अंजुला असं किचन मधे काम करताना पाहून त्यांना पण छान वाटतं. 😊

मॉम : अरे व्वा... आज सकाळीच कामाला सुरुवात केलीय मॅडम नी... क्या बात है...😊 आई..... आज दिवस कुठे उगवलाय ग...😊

अंजली : मॉम....काय ग...😔

आई : करतेय ना ती एवढ्या आवडीने... मग तु कशाला चिडवते आता तिला...😊

मॉम : बरं बाई...सॉरी...मी जाते बाहेर, चालु द्या तुमचं... आज आयते घावने खायला मिळणार...😋


* प्रेम अजुन उठलेला नसतो. अंजली तिचं काम आवरून त्याला उठवायला येते. त्याला असं गाढ झोपलेलं पाहून स्वतःला कंट्रोल करत ती त्याचे नाक पकडुन हलवते. 😊
प्रेमला जाग येते, तो तसाच तिचा हात पकडत तिला आपल्या अंगावर खेचतो....

अंजली : ओय... काय करतोय....😊

* तिच्या ओठांवर अलगद किस करत बोलतो.

प्रेम : कुठे काय.... गुड मॉर्निंग. 😘

* ती स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवत बोलते.

अंजली : अच्छा... वेरी गुड मॉर्निंग...😘 पण उठा आता... घरी सर्व आहेत. 😊

प्रेम : हो...का... मला वाटलं आपण दोघेच आहोत...😊

अंजली : अच्छा... असु कधी ना कधीतरी... फक्त दोघेच...आपल्या घरी... जिथे फक्त तु आणि मी....💑 मग तुला हवं तसं आणि हवं तेवढा वेळ गुड मॉर्निंग कर....पण त्याला अजुन खुप वेळ आहे...कळलं...😋

प्रेम : बरं.... मी नक्कीच त्या दिवसाची वाट पाहीन...😊

* अंजली तिथून निघून जाते. प्रेम पण ऊठुन अंघोळ वगैरे करून फ्रेश होतो. आज घावणे आणि खोबऱ्याच्या चटणीचा नाष्टा असतो. प्रेम भरपुर खाऊन घेतो. तो दिवस घरीच सर्व गप्पा वगैरे मारण्यात निघुन जातो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मॉम च्या मावशीकडे म्हणजे आईच्या बहिणीकडे मडगावला जायचा प्लान असतो. त्याप्रमाणे ते आईंना सोबत घेऊन शुभंकरच्या गाडीतुन मडगावला पोचतात. त्यांचा खुप मोठा असा बंगला असतो. खुप मोठी फॅमिली असुनही मावशी व काका दोघेच तिथे रहात असतात. दोन्ही मुले त्यांच्या फॅमिली सोबत मुंबईला राहत होती.
 
दोन तीन दिवस त्यांचा तिथेच मुक्काम होतो. तिथून एक दिवस कोळवा बीच वर जाऊन पुन्हा धमाल, मजा मस्ती करून येतात. 
गोव्यातील काही चर्च, मंदिर, मार्केट, अशा ठिकाणी फिरून येतात. 
या तीन दिवसात प्रेम आणि अंजली यांना खुप वेळ असा एकांत मिळालेला असतो. त्यामुळे ते अजुनच जवळ आलेले असतात. 

तिथुनच मग शनिवारी परत मुंबईला यायला निघतात. दुपारी तीन वाजता फ्लाईट असते. सर्वांचा निरोप घेऊन. एक तास आधीच ते लोक एअरपोर्ट ला पोचतात.
 फ्लाईट पकडुन ते सव्वा दीड तासातच मुंबईला पोचतात. एअरपोर्ट मधून बाहेर पडल्यावर टॅक्सी करून ते घरी यायला निघतात. वाटेत प्रेम मॉम सोबत बोलत असतो...

प्रेम : मॉम.... खरच खुप खुप थँकस्...🙏🏻 मी कधी स्वप्नात पण हा विचार केला नव्हता की, अशाही छान मोमेंट माझ्या आयुष्यात कधी येतील. खुप खुप मज्जा आली. आणि खुप छान वाटलं. सर्वांना भेटून... 😊

मॉम : अच्छा.... मग नेक्स्ट टाईम पण येशील ना....😊

प्रेम : हो... जमलं तर नक्की येईन. 😊

* बोलता बोलता ते लोक प्रेम उतरणार होता तिथे पोचतात. तो त्याची बॅग घेऊन गाडीतुन उतरुन त्यांना बाय करतो. अंजली त्याच्याकडे फक्त पहात असते. तिला पण बाय करून तो घरी येतो. 

घरी आल्यावर फ्रेश होऊन बॅग मधील कपडे वगैरे काढून ठेवतो. एक आठवड्यानंतर आज क्रिकेट खेळायला मिळणार होते. त्या खुशीने तो मैदानात जातो. सर्व मित्रांना भेटतो. पण खेळताना त्याचं लक्ष लागत नव्हते. गेल्या आठवडाभरापासून जे काही त्याच्या बाबतीत घडलं होतं, ते सर्व पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोरून जात होते. 

त्या क्षणापुरते तो विसरण्याचा प्रयत्न करतो. रात्री अंधार पडेपर्यंत क्रिकेट खेळून तो घरी येतो. फ्रेश होऊन थोडा वेळ टीव्ही बघत बसतो. आज उपवास असल्यामुळे लवकरच जेवून तो बाहेर एक राऊंड मारून येतो. 

रात्री झोपायची वेळ होते, खुप वेळ डोळे बंद करून तो झोपण्याचा प्रयत्न करतो. पण पुन्हा तेच... एकामागून एक एक सुंदर असे क्षण त्याच्या नजरेसमोरून जात असतात. अजुनही त्याला या सर्व गोष्टींचा विश्वास बसत नसतो, की.... आपण गेल्या काही दिवसात एक स्वप्नातील आयुष्य जगलो होतो. 😍
त्याच आठवणी मधे तो रमुन जातो. मग रात्री उशिरा त्याचा डोळा लागतो....😴

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️