Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 24 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24

महादेव महिमा भाग 3 

2001अमरची लघुशंका उरकून झाली होती - 
त्याने पैंट वर केली- आणी लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळला 

        आणी जसा पाठमोरा वळला , मागून म्हातारलेला खर्जातल्या आवाजातली हाक आली..
        " अ..म....र...!"  तो खर्जातला घोगरा आवाज ऐकताच.. अमरच्या  मणक्यातून थंडगार बर्फाची लाट पसरली, सर्व शरीर काठीसारख ताठरल..गेल..

        अमरच्या एका खांद्यामागून वीस पावळांवरचा चंद्राच्या निळसर उजेडात बुडालेला आवार, आणी आवारातला तो पेरुचा झाड दिसत होता , ज्या झाडावरच्या एका फांदीवर , काळया लुगड्यातल्या धनूआज्जीच , पिंजारलेल्या पांढ-या केसांच प्रेत बसल होत.. 

        अंधारात धनूआज्जीच्या डोळ्यांतले बुभळांचे कवडसे पिवळ्याजर्द प्रकाशाने चमकत होते आणि त्या पिवळ्याजर्द बुभळांत एक मीरीएवढ़ा  काळसर ठिपका होता.. 

        " माग बघ अमर,  माग बघ..! तुला पेरु आवडतात ना ? ये पेरु घे ..ये..!"   
  अमरच्या गल्याला कोरड पडली होती, पाय रबराचे झाले होते - त्यांत त्राण उरले नव्हते.. 

      मागे पेरुच्या झाडावर बसलेल ते ध्यान अमरच्या मागे वळण्याची वाटच पाहत होत.. 

        आणी भीतिच्या अंमळाखाली गेलेला अमर 
हळुहळु मागे वळत होता.. 

        अमरने मागे वळून पाहिल, अंधारात आवारातल्या पेरुच्या झाडावर एका फांदीवर एक काळसर आकृती बसली होती..तिच्या डोळ्यांजागी दोन पिवळेजर्द काजवासारखा प्रकाश चमकत होता..

        " धप्प!" आवाज करत त्या ध्यानाने पेरुच्या झाडावरुन खाली उडी घेतली..   

      आणी अमरला काही कळायच्या आत वेगाने दुडूदुडू धावत अमरच्या दिशेने येऊ लागल

       हे असल भयाण, भीतिदायक दृष्य पाहून अमर मुळाच्या देठापासून मोठ्याने ओरडला.... 

        त्याचा आवाज ऐकून  समिरराव,माधुरीबाई त्याचे आईवडील झटकन बाहेर आले.. 

        तस त्यांना अमर एकटाच ओरडतांना दिसला..
       अमरचा आवाज ऐकून बाजुच्या दोन- तीन घरांची लाईटही पेटली , मांणसेही बाहेर आली होती..

आपल्या आई- वडीलांना बाहेर आलेल पाहून 
अमरच्या जिवात जिव आला.. आणी तो काही बोलणार तोच अचानक  न जाणे काय झालं , त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली... 

        डोळे गरगर फिरु लागले , तो जागेवरच बेशुद्ध झाला.   

        अमरच्या आई- वडीलांनी त्याला लागलीच घरात आणल... 

        त्याच्या डोळ्यांवर पाण्याचा शिडकाव केला , 
अमरने झटकन डोळे उघड़ले.. 

        अमरला सर्वात प्रथम पाणी पाजण्यात आल, 
    अमरखुपच घाबरलेला होता,ज्याकारणाने  त्याच्या आई- वडीलांनी त्याला काहीएक न विचारता झोपण्यास सांगितल.. 

      व जे काही विचारायचं असेल ते  उद्या  विचारायचं अस ठरवल..! 

        अमरला झोपवू त्याचे आई -वडीलही झोपले..

        पन  त्या माय- बापाला येणा-या पुढील
संकटाची कद्दापी जाणिव नव्हती, नियतीने आपल्या पावळाखाली पुढे काट्यासारख खाली काय संकट मांडुन ठेवले आहे, ह्यापासून अमरचे आईवडील अजाण होते.

  दुस-या दिवशीची  छानशी सकाळ उजाडली होती, 
सकाळचा प्रहार असल्याने अवतीभवती झाडांवर बसणारे पक्षी आणि त्यांची चिवचिवाट मन प्रसन्न करुन जात होती.  

        सकाळच्या प्रहारी एक हळकीशी थंडी हवा वाहत होती, सकाळचा डोंगर द-यातून उगवून आलेला सुर्यनारायण डी जिवनस्त्वे बहाल करत होता.

     आज सोमवार असल्याने  अमरची शाळा होती , 
म्हंणूनच माधवीबाई त्याला उठवण्यासाठी जाऊ लागल्या.. 
      समिरराव सुद्धा धंद्यावर जायला निघाले होते,  
माधुरीबाई अमरपाशी आल्या त्यांना अमरला उठवण्यासाठी त्याच्या अंगावर हात ठेवला , आणी माधुरीबाईंच्या हाताला त्याव सर्वअंग तापाने गरम झाल्यासारख जाणवल..  


        

   माधुरीबाईंनी समिररावांनी ह्याची कल्पना दिली, त्यांनी सुद्धा अमरच अंग तपासल  , दोघांनाही आपल्या लेकाची चिंता वाटण साहजिकच होत..

        समिररावांनी माधुरीबाईंना  आपण अमरला दवाखाण्यात घेऊन जाऊयात अस म्हंटल ,आणी  काहीवेळातच दोघेही अमरला घेऊन समिररावांच्या टैक्सीमार्फत दवाखाण्यात निघुन गेले.. 

काहीवेळातच समिरराव माधुरीबाई दोघेही दवाखान्यात पोहचले ..
        
        डॉक्टरांनी अमरला चेक करायला घेतल, समिररावांनी अमरला काळ चक्कर आली ते सुद्धा सांगितल होत.. 

        डॉक्टरांनी अमरला चेक करुन  घाबरण्याच काहीच कारण नाही अस सांगितल 

     डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या- औषध घेऊन  ती तिघ दवाखान्यातून बाहेर पडले. 

        बाजारातच कोठेतरी एक हारांच्या दूकानातून
माधुरीबाईंनी महादेवासाठी बेलपत्राचा हार घेतल.

     समिरराव माधुरीबाई, अमर दोघाना आपल्या टैक्सीतूब घरी सोडून पुन्हा धंद्यावर निघुन गेले.. .


        
        
   

              माधुरीबाईंनी घरी आल्यावर जेवन बनवल,   अमरला   थोडस जेवण खाऊ घालून , मग गोळ्या औषध दिली.. 
    गोळ्यांच्या प्रभावामुळे  अमर पुन्हा झोपून गेला..

    माधवीबाई महादेवाच्या भक्त होत्या, महादेवाचा सोळा सोमवारचा उपवास  करुनच अमर झाला होता..    अस त्यांच म्हंणन होत.

          माधवीबाईंनी बाजारातून येतान महादेवाच्या तसबीरीसाठी बेलपत्रांच हार घेतल होत.. 
      तेच हार त्यांनी महादेवाच्या तसबीरीला घातला  
आणि अमरला बर  कर अस म्हंटल्या.  
    पन नक्की तस होणार होत का?  या पाहूयात. 

        हळूहळू दिवस सरत होते , अमरच्या तब्येतीत सुधारणा होण्या ऐवजी , ती अजुन खालावतच चालली होती.. 
           हसत ,खिदळत  रोज घरी येणारा मुलगा चौवीस तास अंथरुणालाच खिळून बसला होता..

        त्याच्या डोक्यात एक अशी भीति बसली होती, 
    की तो सतत माधवीबाईंना मलासोडून जाऊ नको ना ,  माझ्या जवळच रहा असं म्हंणायचं.! 

        अमरचे डोळे बोलतांना भीतिने असे काही विस्फारायचे , की ते खोंबणीतून बाहेर आल्यासारखे वाटायचे आणि समोरचा माणुस घाबरुन जायचा.. 

         अमरसाठी समिररावांनी खुपसारे डॉक्टर केले ,पाण्यासारखा पैसा खर्च होत होता..

        पन अमरच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. 

        रात्र झाली की अमर एकटक हॉलच्याबंद  दरवाज्याकडे  पाहत राहायचं, माधुरीबाई - समिरराव कोणीजर दरवाजा उघडायला गेला , तर मोठ्याने ओरडाया , विनवणी करायचा..

      "   नको नको तो दरवाजा नको उघडू, ती येईल , ती आत येईल नाहीतर , दरवाज बंद कर..!" 
    अमरची ही अवस्था खरच एका मानसिक संतूलन बिघडलेल्या रुग्णासारखी होती. 

       समिररावांनी एकवेळ मानसिक तज्ज्ञांना     
सुद्धा अमरला दाखवल होत , पण त्याचाही काही फायदा झाला नव्हता - 

        कारण हे काहीतरी वेगळंच होत , ज्याची प्रचिती माधुरीबाईंना महिन्याभरानंतर आली..
       जेव्हा त्या आठ महिन्याच्या गरोदर झाल्या होत्या..    
    
      अमरच्या तब्येतीत अद्याप सुधारणा झाली नव्हती, रात्री साडे अकरा बारा वाजल्याशिवाय तो झोपतच नसायचा , एकटक वर छताकडे पाहात तोंडातल्या तोंडात काहीबाही पुटपुटायचा .. 

        अश्याच एकेरात्री साडेबारा वाजता  अमरला झोपवून माधुरीबाई सुद्धा झोपायच्या तैयारीत होत्या..

        समिरराव कामावरुन येत ते थकूनच , त्यामुळे ते लवकर झोपून जायचे ... 

        आता फक्त माधुरीबाई एकट्या जाग्या होत्या..
   रात्रीचा गडद अंधार बाहेर पडला होता , 

        बाहेर दुर दुर पर्यंत शांत असा सन्नाटा  पडला होता, कोठुनतरी कुत्र्यांचा रडण्याचा भेसूर आवाज कानांवर ऐकू येत होता.. 

     मध्येच कोठेतरी घुबड  घुत्कारत होती.. 

        माधुरीबाई अंथरुणावर पडल्या आणि हलकेच डोळे बंद केले.. 

        एक मिनिटही ऊलटला नसेल तोच दार ठोठवल गेल..

क्रमशः