भाग ४....
" कुठे गेली ही जोगतीन !"
नमिताबाई स्वत:शीच म्हंटल्या.
मग जास्तवेळ विचार करण्यात न घालवता , त्यांनी बाजुचा सूप उचल्ला आणि घरात निघुन गेल्या..
त्याचदिवशी दुपारी एक बाई
नमिताबाईंच्या घरी बसायला आली होती,
ही बाई म्हंणजे विकासरावांसोबत काम करणा-या एका मित्राची बायको होती ..
आणी विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोने नमिताबाईंना विकासरावांबद्दल काही काही सांगितल होत.
" की विकास भाऊजींच , बाहेर एका बाईसोबत अनैतिक संबंध आहे , ती बाई भैय्यीन असून विधवा आहे , नवरा मेला आहे ,आणी विकासराव गेल्या तीन महिन्यापासून तिला भेटत आहेत."
त्या बाईच्या वाक्यावर नमिताबाईंना विश्वासच बसला नाही. कारण त्यांचा विकासरावांवर खुपच विश्वास होता ना !
शेवटी ती बाई निघुन गेली, आणी जातांना हे सुद्धा सांगून गेली , की तुझ माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल , तर तू स्वत:हाच विकासभाऊजींना ह्या बद्दल विचार .!"
नमिताबाईंच्या डोक्यात दुपारपासून
हाच विचार घोळावत होता , राहून , राहून तेच शब्द कानांवर पडत होते.
जेवणावरची वासनासुद्धा उडाली होती, दुपार संध्याकाळ दोन्ही टाईमच जेवण करायचं त्यांना भानच राहील नव्हत !.
शेवटी सुर्य अस्थाला निघुन गेला , आणी वातावरणा कालाकुट्ट अंधार पसरला -
नेहमीप्रमाणे संध्याकाळी विकासराव दारु पिऊनच घरी आले..
नमिताबाई त्यांची वाटच पाहत होत्या..
ते येताच त्यांनी ड़ायरेक्ट विषयालाच हात घातला.
दोघांचही कडाक्याच भांडण सुरु झाल, अवतीभवतीची लोक हा भांडणाचा फुकटचा तमाशा बघायला आली होती. बाजुला राहणा-या मंदा काकू, त्यांचे पती, दोघांच भांडण सोडवायला मध्ये आले -
तेव्हाच विकासराव म्हंटले ..
" मला तुझी काही गरज नाही, आणी नाही हा पोरगा माझा आहे , चल निघ ईथून चालती हो!"
नमिताबाईंनी ईतके दिवस मुकाट्याने
सर्वकाही सहन केल होत - पण आज मात्र , त्यांचा धीर निघुन गेला होता .. !
नव-याच्या एका वाक्याने त्यांच्या काळजात
दु:खाची कळ आणली होती!
शेवटी कसतरी भांडण मिटवल गेल,आणी बघ्यांची गर्दी कमी झाली-
दारुच्या नशेत विकासराव तशेच भुवईवर अस्तव्यव्स्थपणे झोपले होते - बाजुलाच नमिताबाई भिंतीला पाठ टेकून सताड उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहत होत्या..
ईतके दिवस , महिने त्यांनी विकासरावांच वागण सहन केल होत , का कुणासाठी? फक्त होणा-या आपल्या मुलासाठी, पण त्याचा पिताच जर हा अपत्य आपला नाही असा म्हंणतोय , तर मग त्याचा फायदा काय? ईतकी वर्ष आपण ज्या मांणसासोबत संसार केला तो हाच का ?
नमिताबाईंनी स्वत:च्याच मनाला प्रश्ना केला आणी जागेवरुन उठल्या, बाजूचा दरवाजा उघडला ..
बाहेर मध्यरात्रीची स्मशान शांतता दरवळत होती, रातकीडे किरकिरत होते , धुक्याचे पुंजके -
वाहत होते ..
रात्रीच्या ह्या भयावह वातावरणाची नमिताबाईंना आता बिल्कुलच भीती वाटत नव्हती , कारण आता सगळ काही संपलच होत.
दरवाजा तसाच सताड उघडा ठेवून नमिताबाई मध्यरात्रीच्या समई घरातून बाहेर पडल्या,
त्यांचे केस विस्कटले होते, दोन्ही हात खाली लोंबत होते , खांद्यावरचा साडीचा पदर चालताना जमिनीवर घासत होता..
पंधरा - वीस मिनिटात नमिताबाई एका रेल्वेलाईनजवळ पोहचल्या, आणी रेल्वेलाईनमधोमध उभ्या राहिल्या..
आता ह्या सर्व संकटातून सुटायच असेल,
तर एकच मार्ग उरला होता - तो म्हंणजे मृत्यू..!
समोरुन पन्नास साठ मीटर अंतरावरुन दोन मोठे प्रकाशीत दिवे भरधाव वेगाने आपल्याच दिशेने येतांना
नमिताबाईंना दिसत होते..
रेल्वेलाईनच्या पट-या हादरत होत्या..
कानांना दुरुन ट्रेनचा कर्णकर्कश्य स्वरातला हॉर्न ऐकू येत होता..
ट्रेनचा आवाज हळू हळू जवल जवल येतांना ऐकू येत होता - तसा छातीतली धडधड वेगान वाढत होती..
नमिताबाईंनी शेवटच्याक्षणाला डोळे मिटले आणी तोच बंद डोळ्यांमधोमध त्यांच्या हाताला कोणाचातरी स्पर्शजाणवला , ते जे कोणी होत त्याने नमिताबाईंना आपल्या दिशेने खेचल होत..
आणी समोरुन येणारी ट्रेन वेगाने पूढे निघुन गेली होती.
नमिताबाईंनी डोळे उघडले समोर पाहिल,
त्यांना आपल्या डोळ्यांसमोर समोर एक स्त्री दिसली , आणी ह्या स्त्रीला, आपण ह्या अगोदर सुद्धा कोठेतरी पाहिल आहे , अस वाटल..आणी लागलीच दहा- वीस सेकंदांनी ते आठवल सुद्धा.
" जोगतीन मावशी!"
नमिताबाई पटकन म्हंटल्या.
" होय पोरी मीच ! पण तू जिव द्यायला का निघालीयेस , तुझ्या पोटात , तर एका निष्पाप जिवाची वाढ होत आहे ना , आणी एकदा जिव देण्या अगोदर त्या निष्पाप जिवाच तरी विचार करायचंस की ज्याने अद्याप जग सुद्धा पाहिल नाही आहे , ! " जोगतीन नमिताबाईंना म्हंणाली.
जोगतीनीच्या वाक्यावर नमिताबाईंचा कंठ दाटुन आला, विकासरावांचे तेच ते बोल पुन्हा आठवले - नमिताबाई पुन्हा ढसा ढसा रडू लागल्या, मग त्यांनी जोगतीनीला चार महिन्यात आपल्या नव-यात झालेला विळक्षण बदल, घरात घडणा-या विचीत्र घटना, ते स्वप्न, सर्वच्या सर्व जोगतिनीला सांगितल.
" अस आहे काय! तू चल माझ्या घरी चल, तुला काहीतरी सांगायचं आहे, अस समज , की तुझा वाईट काल संपला चल..!" अस म्हंणतच ती जोगतीन नमिताबाईंना आपल्या सोबत घेऊन आपल्या घरी घेऊन आली..
घर तरी कसल ते, एक पाल ठोकून बनवलेली झोपडीच होती.
नमिताबाई झोपडीत आल्या , खाली शेणाने सारवलेली भुवई होती, जोगतीनीच सामान असलेला एक चौकोनी पेटारा होता, त्या पेटा-यावरच एक लाल रंगाच कपडा अंथरलेला आणी त्या कपड्यावर अंबाजोगाई आदिशक्ती योगेश्वरी देवीची तसबीर होती, तसबीरीसमोर दिवा तेवत होता.
" बस पोरी !" ती जोगतीन म्हंणाली.
नमिताबाई जागेवर बसल्या ,
त्या जोगतीनीने एका थाळीत पुरणपोळी आणी दुस-या हातात पाण्याच ग्लास आणल.
" घे , सकाळपासून काही खाल्ल नसेल तू ?
दोन घास खाऊन घे , तुझ्यासाठी नाही तर त्या पोटच्या पोरासाठी तरी खा..!" जोगतीनीच्या वाक्यावर नमिताबाईंनी ती पुरणपोळी खाऊन टाकली.
नमिताबाईंनी तशी पुरण पोळी पुर्णत आयुष्यात खाल्ली नव्हती, कारण तीची चव खुपच गोड आणी चविष्ट होती .
" जोगतीण मावशी तूम्ही काहीतरी सांगणार होतात ना?" नमिताबाई म्हंटल्या.
त्यावर ती जोगतीण जरा गंभीर झाली.. व बोलू लागली.
" सांगते ऐक, तू जस सांगितलंस तस पाहता , तुझ्या नव-यावर त्या भैय्यीन बाईने जादू टोणा करुन मोहिनी घातलीये , ज्याने तुझा नवरा तिला पुर्णत वश झालाय - त्या भैय्यीन बाईला तुझ्या नव-यासोबत लग्न करायचं आहे , पण लग्न करायला एक अडथळा आहे , तो म्हंणजे तू , आणी तुला माहीतीये , सकाळी मी तुझ्या घरी आले - तेव्हा तू दक्षिणा म्हंणून तांदूळ
आणायला घरात गेलीस , तेव्हा मला तुझ्या घरात तो काळोख दिसला , ज्या कालोखात ती ब्याद राहते - करणी , जादू टोणा करणा -या मांणसांच्या घरात कैद असणारी ब्याद ,मला वाटल तुम्ही करणी करत असाल , म्हंणून मी दक्षिणा न घेता तशीच निघुन आले..! मला वाटत त्या भैय्यीनीने तुमच्या मागावर काहीतरी पाठवलं आहे , आणी ते तुमच्या घरात दबा धरुन बसल आहे , ज्याला तुझ पोटात वाढणार पोर हवं आहे, तू तो स्वप्न पाहिलंस ना ? तोच तो , रेड्यावर बसून येणारा काळ नामक सैतान , तुमच्या घरात तोच वावरतोय , हा काळ सावजाला घाबरवत नाही , किंवा हानी पोहचावत नाही? पन तो नजरेने भीति दाखवतो , आणि शेवटी त्याची भीति ईतकी वाढत जाते की घाबरणारा झटका येऊन मरतो..! आणि त्या हैवानाला तुला ही तसच मारायच होत ."
एवढ बोलून जोगतीन थांबली.
" बापरे मग ह्यावर काही उपाय आहे का ?
की माझा संसार असाच माझ्या नजरेस मोडला जाईल.!" नमिताबाई म्हंटल्या.
" मार्ग आहे पोरी, मार्ग आहे! तो आहे बघतोय , तोच कर्ता- कर्वता आहे , अस समज त्याने तुझी परिक्षा घेतली आणि आता तुझी परिक्षा आंतिम घटकेला आहे.! मी काय सांगते ते ऐक !"
जोगतीनीने नमिताबाईंना उपाय सांगायला सुरुवात केली..-
सर्वप्रथम त्यांनी आपल्याजवळच
योगेश्वरी देवीचा फोटो नमिताबाईंना दिला
मग आईचा मंत्र,उपासना असलेला एक पुस्तक दिला..अजुन काही काही शुभ विधी सांगितल्या..!
नमिताबाई फोटो, आणी पुस्तक घेऊन मध्यरात्रीच घरी आल्या..!
त्यांनी सर्व सामग्री येतांना एका पिशवीत ठेवली होती, ज्याने त्या अभद्राला दैवी गुणांची चाहुल लागणार नाही.
सकाळ होताच नमिताबाईंनी सर्वप्रथम स्नान केल, घर स्वच्छपणे झाडून काढल, मग देवघर साफ केल, शंकर,पार्वती,श्रीगणेश तसबीरीबाजुला योगेश्वरी आईचीही तसबीर मांडली दिवा पेटवला आरती केली,
आणी मग शुद्ध गोमूत्र पुर्णत घरात शिंपडल..
संध्याकाळी मंत्र उपासना करु लागल्या..-
जेवणघरातल्या खोलीत शुद्ध कापूर जाळू लागल्या..
कापूर जळताच एक घाणेरडा वास येत असे , कोणीतरी गुरकावा तसा आवाज कानांवर यायचा..पन धोका होत नसायचा.
तब्बल दिड महिने नमिताबाईंनी मनापासून ही दैवी विधी केली होती, आणी तिचा योग्य तो परिणामही दिसून येत होता..
घरात शिरलेली अनामिक शक्ति बाहेर पडली होती, सुर्याची किरणे घरात पोहचत होती, जेवणाची खोली सर्वकाही अंधुक का असेना पन उजळून निघायचं, विकासरावांच्यात हळू हळू बदल घडत होता..
दिड- दोन महिन्यात त्यांची दारु पुर्णत सुटली होती, आपण वाईट वागल्याच त्यांना खुपच पश्चाताप झाला होता.
त्यांनी नमिताबाईंची माफी मागीतली आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केल ..
चार महिन्यानंतर नमिताबाईंना एक कन्या रत्नप्राप्त झाल - आणी त्या कन्येच नाव नमिताबाईंनी योगेश्वरी ठेवल..
दिड वर्षानंतर नमिताबाईंना विकासरावांच्या त्याच मित्राच्या बायकोकडून हे कळाल , की त्या भैय्यीन बाईने तिच्या चाळीतल्या खोलीत पंख्याला फास लावून आत्महत्या केली , आणी मृतदेहातून घाणेरडा वास येऊ लागला तेव्हा , दरवाजा तोडून मय्यत बाहेर काढल गेल..
हे ऐकून नमिताबाईंनी हात जोडले..व म्हंणाल्या.
" जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..!"
समाप्त..: