भाग ३
मंदा काकू नमिताबाईना धीर देण्याशिवाय काय करु शकत होत्या? शेवटी नवरा - बायकोच्या संसारात अशी छोठ मोठी भांडण होत असतात अस सांगून त्या निघुन गेल्या..
पण मंदाकाकूंना हे ठावूक नव्हत , की ही तर फक्त अशुभाच्या संकटाची वाळवी लागण्यापुर्वीची
चाहुल आहे - सुरुवात आहे , पुढे पुढे तर भयंकर घटना घडणार होत्या.
त्या दिवशी सुद्धा विकासराव दारु पिऊन आले ,
दरवाज्यात ठेपाळले - कडीचा खडखड आवाज झाला.. !
तो आवाज ऐकून संध्याकाळच जेवण बनवणा-या नमिता जराश्या घाईतच बाहेर आल्या.
त्या एकटक मळूल नजरेने विकासरावांकडे पाहत होत्या तोच ते खेकसले.
" काय बघते , निघ..! "
नमिताबाई चुपचाप चालत जेवण घरात आल्या.
विकासरावांच आता रोजच नमिताबाईंना
शिव्याशाप देण्याच काम सुरु झाल होत.
छोठ्या छोठ्या गोष्टीवरुन ते रागाने भडकून उठायचे , शिव्याशाप द्यायचे - अंगावर धावून यायचे, एक दोन वेळेस तर त्यांना मर्दपणाची सीमाच ओलांढली होती, त्यांनी नमिताबाईंवर हात उचल्ल होत. नमिताबाईंनी ह्या भयंकर अवस्थेत दिड महिना ढकल्ला.
ह्या अवस्थेत ह्या दिडमहिन्यात त्यांच्या मनावर
कमालीच दुख पसरल होत -
घरातल्या कामांत मन लागत नव्हत , ईतकंच नाही तर देवांची रोजची पुजा अर्चा सुद्धा बंदच पडली होती.
अस म्हंणतात की ज्या वास्तुत देवचार नाही,
देवांची पुजा अर्चा होत नाही , अश्या वास्तुत
एक अनामिक शक्तिवास करु शकते ..
त्या शक्तिच्या असण्याने ती वास्तु भक्कास, मळीन पडते , घरात संध्याकाळीच नाही, तर भरदिवसाच्या उजेडात सुद्धा गडद काळोख
पडलेला असतो, आणी त्या कालोखात ते दबा
धरुन बसलेल असत, त्याच्या आस्तित्वाची चाहूल
सदैव त्या ठिकाणी वावरतांना जाणवत असते .
मनावर सतत भीती, चिंता, असुखाची मळभ चढ़लेली असते.
नमिताबाईंना सुद्धा असंच काहीतरी जाणवत होत.
हॉलची एक खोली सोडली, तर जेवणघर आणि मोरी नेहमीच अंधारात बुडालेली असते..!
रात्री - अपरात्री जेवणघरातली भांडी वाजण्याचा आवाज यायचा , त्या आवाजात हलकिशार हसण्याची खसखस जाणवायची-
मध्येच अपरात्री मांडणीवर ठेवलेले भांडे
अचानक काळजात चर्रर्र व्हावा असा मोठा आवाज करत पडायच , आणी त्याच वेळेस अंगावर गोदरी घेऊन उजव्या कुशीवर जेवनघराच्या दरवाज्या समोर पाठमो-या अवस्थेत झोपलेल्या नमिताबाईंच्या मागे काहीतरी हलकेच पावले वाजवत फे-या मारायच..
त्याच्या तोंडून ह्ळकासा गुरगुरण्याचा आवाज बाहेर पडायचा -
पन रात्री घडणारा हा थरार दुस-या दिवशी नमिताबाईंच्या स्मृतीपटळावरुन स्वप्न असल्याप्रमाणे नाहीसा होत असे.
रात्री काय घडल कोणी विचारल तर त्यांना सांगता येण अशक्य होत.
दिवसा जेवणघरातली खोली नेहमीचंच अंधाराने डबडबलेली असायची, आणी त्या अंधारात हळकासा गारवा जाणवायचा आणि हाच गारवा रात्री गड़द व्हायच, इतका की थंडीने दात वाजले जायचे .
विकासरावांच दारु पिण्याच रोजचदिनक्रम सुरुच होत, रात्री मेंदूवर दारुच्या रसायनांचा परिणाम होत असल्याने त्यांना ह्या अघटित घटनांची चाहुल लागत नव्हती.
ते रात्री झोपायचे ते सकाळीच उठत होते..
अंघोळ केली की लगेच कामावर जात होते.
मग पुन्हा तेच दारु पिऊन घरी येण, नमिताबाईंना शिव्याशाप देण.
नमिताबाईंचा सुखाच संसार अचानक तूटला होता. न जाणे त्यांच्या हस-या गोड कुटूंबाला कोणाची नजर लागली होती?
दिड महिना झाला होता , घरात देवांभोवती दिवा लागायचा आता पुर्णत बंदच झाल होत , देवाच फोटो धुळीने माखल होत, देवाभोवती जळणारी अगरबत्तीची राख जशीच्या तशी पडलेली दिसत होती.
एकंदरीत देवघरात अस्वच्छता दिसत होती,
त्यासहितच दिवसभर घरात वावरतांना विचीत्र भास होत असत .
चौवीस तास आपण कोणाच्यातरी नजरेखाली वावरत आहोत असा सतत भास व्हायचा, जेवनघरात
पाठमो-या अवस्थेत जेवण बनवताना , कोणितरी मागे बसल आहे , आणी एकटक आपल्यालाच पाहत अस वाटायचं , मागे वळून पाहिल्यावर नजरेला काय भयान दिसेल विचार करुनच अंगावर काटा यायचा पन मागे वळून पाहिल्यावर मात्र कोणिही दिसत नसे ,
दिवस ढळताच रात्र व्हायची , आणी रात्र झाली की भीतिचा उच्चांक अजुनच वाढला जायचा .
एकिकडे विकासरावांच अचानक बदललेला स्वभाव आणि त्यांच्या बदललेल्या स्वभावातून होणारा
मनस्ताप.
तर दूसरीकडे गर्भधारणेत होणा-या विविध वेदना !
आणी तिसरीकडे रात्री मनाला वाटणारी ही अनाकलनीय भीति.
नमिताबाई सर्वकाही मुकाट्याने सहन करत होत्या. पण कोणासाठी? तर फक्त आपल्या होणा-या बाळासाठी.
अश्याच एकेदिवशी मध्यरात्री दोन वाजता.
नमिताबाई शांत झोपल्या होत्या. त्यांच्या त्या दोन बंद डोळ्यांआड काळ्या पडद्यांवर , एक चित्रफित दिसत होती.
होय तेच ते स्वप्न..!
नमिताबाई एका उंच कड्याच्या डोंगरमाथ्यावर उभ्या होत्या.
वर आकाश होत - आकाशात आणी खाली सुर्याचा तांबडसर प्रकाश पडला होता , पण आश्चर्यकारक बाब अशी , की आकाशात सुर्याचा मागमुसही नव्हता.
अवतीभवती जिकडे नजर जाईल तिथे हिरवट रंगाच गवत दिसत होत ,ती हिरव्या रंगाची जागा जरी मन प्रसन्न करणारी वाटत असली तरी तिथल वातावरण भक्कास होत , त्या जागेत एक अनाकालणीय असा गारवा, स्मशान शांतता जाणवत होती.
त्या पूर्णत इलक्यात हवेचा मागमुसही नव्हता, जणु निसर्गाची त्या जागेवर यायची हिंम्मत नसावी-
नमिताबाई जागेवर उभ राहून गोल गोल भिंगत
सर्वीकडे पाहत होत्या.
तोच अचानक घुंगरांचा आवाज कानांवर आला ,
नमिताबाईंनी आवाज आलेल्या दिशेने म्हंणजेच मागे वळून पाहिल..
तस त्यांच्या नजरेला वीस - पावळांवर
एक गडद काळाकुट्टा रंगाचा रेडा उभा दिसला -
रेड्याच्या गळ्यात घुंगरांची माळ होती.. त्याचाच आवाज होत होता.
आणी त्याच रेड्यावर एक कालीशार सात फुट उंचीची आकृती बसलेली दिसत होती-
त्या आकृतीचे दोन विस्तवसारखे लालसम चकाकते डोळे सोडले तर सर्व शरीर काळशार काळकुट्ट होत..!
ते ध्यान एकटक त्या लालसर चकाकत्या धगधगत्या नजरेने नमिताबाईंकडेच पाहत होत..
ना काही बोलत होत , नाही हूंकार काढत होत..फक्त त्या लालसर नजरेने दम भरत होत..
नमिताबाईंनी झटकन डोळे उघडले , घामाने पुर्णत अंग डबडबलेल असायचं, घश्याला कोरड पडायची- मन भीतिने वेगाने धडधडल जायच..
नमिताबाईंना पाच सहा वेळा एकच स्वप्न
पडला होता.
पण स्वप्नच ते , सत्यात थोडीना उतरणार होत..
नमिताबाईंनी आपल्या अवतीभवती घडणा-या अकल्पित, अमानवीय घटनांच अद्याप ईतक मनावर घेतल नव्हत .
पण तो दिवसही लवकरच येणार होता ,
नमिताबाईंना सर्वकाही समजणार होत !
आपल्या संसाराला लागलेली द्रुष्ट, घरात जाणवणारा
निरुत्साही बदल सर्वच त्यांना समजणार होत.
नमिताबाईंचा गर्भअवस्थेतला चौथा महिना सुरु होता. पोट जरास वर आलेल दिसत होत.
दूपारचे नुकतेच बारा वाजले होते , आकाशात सुर्य उगवलेला , त्याचा पिवळाधमल प्रकाश वातावरणात चौहूदिशेना पसरला होता .
नमिताबाई दरवाज्यासमोर असलेल्या पायरीवर सुपात तांदूळ घेऊन , तांदूळ निसत बसल्या होत्या.
तेवढ्यात त्यांच्या समोर एक चाळीस- पंचेचाळीस वयाची जोगतीन आली.
अंगावर पिवळीसाडी, लाल रंगाच पोलका, कपाळावर भंडारा , त्यावर गोल रुपयाएवढ़ा कुंकू -नाकात एक नथ होती.
जोगतीण म्हंणजे कोण बर ? तर एवढच सांगेण जोगवा मागणारी , देवीआईची भक्तिन .
तिच्या दोन्ही हातांत तिने एक छोठासा टोपला धरला होता , त्या टोपल्यात योगेश्वरी देवीआईची मुर्ती होती. मुर्तीवर हळद कूंकू, हार वाहिलेल दिसत होत.
बसल्या बसल्याच नमिताबाईंची तंद्री लागली होती, कारण त्यांना समोर आलेली जोगतीन तिची चाहुलही लागली नव्हती-
" पोरी..!" शेवटी त्या जोगतीनीनेच आवाज दिला.
आलेल्या आवाजाने नमिताबाईंची तंद्री भंग पावली.
मग समोर पाहताच त्यांना जोगतीन दिसली.
मग चेह-यावर आपसुकच हास्य आणत नमिताबाईंनी सूप बाजुला ठेवल व हळकेच जागेवरुन उठल्या.
" थांबा हं, मी तांदूल आणते !"
नमिताबाई अस म्हंणतच घरात गेल्या, पुन्हा येताना त्यांनी टोपशीत तांदूळ आणले , पण दरवाज्यात आता कोणीच उभ का नव्हत ?
ती जोगतीन? काहीवेळापुर्वी ईथे उभी होती? ती ईतक्यात कुठे गेली असावी?
क्रमशः