भाग 5
थंडीचा महिना असल्याने मध्यरात्रीच पांढ़रट मंद धुक अवतीभवती पसरल होत.
त्याच धुक्यातून चालत जातांना थंडी अंगाला चिटकली जात एक तीव्र सनक हाडा मांसात घुसत होती व थंडीच्या स्पर्शाने सर्व शरीर शहारुन उठत होत..
विलासरावांच्या पायात असलेल्या पैरागॉन चपलीचा चट चट आणी रातकिड्यांचा किरकिर असा मिश्रित आवाज त्यांच्या स्वत:च्या कानांवरच पडत होता.
विलासराव बैटरीच्या पिवळसर उजेडात वाट कापत निघाले होते ..!
तोच अचानक त्यांच्या मागून कोणीतरी वेगाने धावत गेल..
जमिनीवर धावतानाचा धप धप असा पावळांचा
आवाज कानांवर पडला तसे विलासरावानी गर्रकन वळून मागे पाहिल.. हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाश मागे मारला..
पन बैटरीच्या उजेडात मागे धुक्याव्यतिरिक्त कोणिही दिसल नव्हत..
आपल्याकडे जुगारात जिंकलेली रक्कम आहे.. कोणी चोर वगेरे पाठलाग करत असेल, आणी त्याच्या मनात काही कालबेर असल तर ? काही सांगता येत नाही ! विलासरावांच्या मनात विचार आला.
शेवटी सुरक्षाखातर त्यांनी रस्त्याबाजुलाच एका झाडाची जमिनीवर तूटून पडलेली जाडजुड फांदी रक्षणासाठी हातात घेतली..
पुन्हा चालू लागले..
विलासरावांना चालतांना असा भास होत होता ..
की आपल्या शरीरापासून दोन पावळे मागेच कोणीतरी चालत आहे - आणी दबक्या पावळाने आपला पाठलाग करत मागे मागे येत आहे..
विलासरावांच्या कपालावर जरासे घामाचे द्रवबिंदू साचले गेले - नाकपुड्या फुगवून फुगवून ते श्वास आत ओढु लागले..
मनात भलते सलते विचार येतच होते..
कोणी चोर असेल तर? ते किती असतील, एक , दोन, तीन की चार ? आपण एकटे त्यांना मारु रोखू तरी शकू का ? तरी आबा पाटील बोलत होते आजची रात्र ईथेच रहा - पन भलतंच शहाणपन केल..!
विलासरावांना स्वत:वरच राग येत होता ! पन त्यांना हे ठावूक नव्हत -मागे चोर नाही , भलतंच काहीतरी आहे ! एकवेळ चोर पैसे घेऊन सोडेल , पन त्यांच्या मागावर जे काही आहे , ते जिव घेतल्याशिवाय बिल्कुल सोडणार नव्हत..!
हातातली जाडजूड फांदी गच्च पकडून विलासरावांनी पुन्हा गर्रकन मागे वळून पाहिल...
दुस-या हातातल्या बैटरीचा पिवळसर प्रकाश थोड दूर एका झाडाच्या खोडावर पडला होता आणी त्याचक्षणाला त्या खोडाजवळ उभ असलेल ते पिठासारख काटकूळ ध्यान वेगान झाडाच्या मागे लपल होत..
विलासरावांना वाटल झाडा पल्याड लपलेला तो ईसम चोर आहे , तस त्यांनी जोरात हाक दिली..
" ए कोण आहे तिथ, बाहेर ये !'
विलासरावांच्या वाक्यावर एक हलकासा घोगरा हसण्याचा आवाज आला.
तो आवाज ऐकून विलासरावांना जराशी भीतिच वाटली ,
कारण तो सामान्य मानवी आवाज मुळीच वाटत नव्हता. त्यात घोग-या स्वराचा ताळ होता.
" विलाsssस..!" झाडामागून विलासरावांचा नाव घेतल्याच आवाज आला.
विलासरावांच्या हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाश
झाडाच्या खोडावरच मारलेला होता..
आणी त्याच पिवळसर उजेडात झाडाच्या खोडामागून पिठासारखा प्रेताड येड्या बुध्याचा चेहरा
हळुच बाहेर आला..
पुर्णत चेह-यावरच रक्त शोषल गेल होत, डोक्यावर मुंज केलेल टक्कल होत - डोळ्यांची बुभळे
पिवळेजर्द काजव्यासारखी चमकत होती आणी त्या दोन्ही डोळ्यांत दोन मीरीएवढे काळसर टिपके..होते..
काळेशार ओठ फाकवत जबडा विचकून दात दाखवत येड्या बुध्याच प्रेत विलासरावांकडे पाहून हसत होत..
हे असल ध्यान पाहून विलासरावांची बुद्धीच काम करायची ब्ंद झाली , हातातली काठी केव्हाच गळून खाली पडली- शिंदेंच्यामळ्यात चिंचेच्या झाडाखाली ठेवलेला मटनाचा तुकडा तो सर्व घटनाक्रम जसाच्या तसा डोळ्यांसमोर तरळून गेला ..
आणी स्वत:च्या नुसत्याच केलेल्या धाडसीपणाचा पश्चात्ताप झाला.
" विलासssss..! मला तू मटान दिला ना , आणी माझ्या डोक्यावर बस बोल्ला ना ..हिबिहिबिहिहीह..! बघ मी चार दिवस झालो तुझ्या सोबतच आहे हिहिहिहिहां मला तू जाम आवडला आहे विलास आता ह्या आमुश्याला ..मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे ..आणी मग आपण दोघ चिंचेच्या झाडावर बसून मस्त गप्पा मारु .. हिहिहिबिह्हीह..! " अस म्हंणतच ते ध्यान हळु हळु विलासरावांच्या दिशेने येऊ लागल..
विलासराव भीतिपोटी हळू हळू मागे मागे सरकू लागले..- भीतीने त्यांच्या तळपायाखालची जामिन सरकली होती..
समोरच द्रुष्यच ईतक भयंकर होत की मर्दानगी दाखवणा-या विलासरावांच भीतिने कोंबडा कासव सर्व होऊन गेल होत..
" बू..बू..बुध्या म मला सोड वाटलस तर मी तुला अक्खा बोकड खायला देतो !" विलासराव भीत भित बोलले ..
" बोकड नको मला , मला तू पाहिजे - एकटाच चिंचेच्या झाडावर बसून बसून कंटाळा येतो..- कोणितरी सोबत पाहिजे मला, आणी तो तू आहेस खिखिखिखी..!"
येड्या बुध्याच प्रेत पुन्हा विलासरावांच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागल.. व अचानकच विलासरावांपासून पाच पावळ दूर एका जागेवर थांबल..
ते ध्यान नाकापूड्या फुगवून फुगवून कसलतरी वास घेत होत - आणी तोच त्याचे काजवासारखे दोन डोळे विलासरावांच्या खिशावर खिळले ज्या खिश्यात गणपती बाप्पाचा प्रसाद बांधळेली पुडी होती..
" तुझ्या खिशात जे आहे ते बाहेर काढ, आणी दूर फेकून दे ते..फेक ते फ़ेक...!" बुध्याच प्रेत खर्जातल्या आवाजात खेकसल.
विलासराव काही एवढेही मूर्ख नव्हते की त्यांना हे समजणार नाही - की बुध्याच भुत , गणपती बाप्पाच्या प्रसादाला घाबरत आहे..! आणी जर आपण तो प्रसाद दुर फेकला तर नक्कीच हा बुध्याचा भुत आपल्याला झपाटेल , पछाडेल..
विलासरावांना कळून चुकल होत जो पर्यंत आपल्याकडे हा प्रसाद आहे तो पर्यंत हे ध्यान आपलं काहीच वाकड करु शकणार नाही..
शेवटी विलासरावांनी एक हात खिशावर ठेवला आणी थेट पळायलाच सुरुवात केली.. मागून ते ध्यान
विलासरावांपासून दहा पावलांच अंतर ठेवून त्यांच पाठलाग करतच होत...
उर फाटेस्तोवर विलासराव धावत सुटले होते ,मरणाच्या भीतिने पायांना अमानवीय वेग आल होत..दहा - बारा मिनिटातच त्यांनी गावाची वेस ओलांडली.. वेस ओलांडताच मागून तो मोठा आवाज विलासरावांनी ऐकला होता.
" आज वाचलास , पन उद्या पुन्हा येईन..मी! "
विलासराव त्यांच्या घरी पोहचले , धाड धाड करत त्यांनी दार ठोठावल.. त्यांच्या पत्नी मोहिनीबाईंनी दार उघड़ल आणी दार उघड़ताच विलासराव झटकन आत घुसले , त्यांच घामाजलेल शरीर, फुललेले श्वास पाहून मोहिनीबाईंना त्यांची खुपच काळजी वाटली ..
तस त्यांनी काय झाल हे विचारल सुद्धा पण विलासराव बोलण्याच्या मनस्थीत नव्हते..,
दुस-या दिवशी विलासराव अंथरुनाला खिळले होते त्यांना सड़सडून ताप भरला होता.. ! काळचे कपडे सुद्धा अंगावर जसेच्या तसे होते..
विलासरावांचे मित्र म्हंणजेच माझे मामा दिगंबरराव ह्यांना सासूरवाडीतच कोणाकडून तरी विलासरावांची तब्येत बिघडली आहे अस कळल तसे ते मेव्हण्याची गाडीघेऊन लागलीच आपल्या गावी विलासरावांच्या घरी आले..
विलासरावांच्या घरात मईत झालेल्या घराभोवती जमते तशी लोकांची गर्दी जमा झाली होती..
दिगंबररावांना ती गर्दी पाहून भीतीच वाटली की आपला मात्र दगावला तर नाही ना..?
पन दिगंबररावांनी घरात प्रवेश केला तेव्हा
त्यांना विलासराव पलंगावर बसलेले दिसले आणि त्यांच्या विलासरावांच्या बाजुलाच मोहिनीबाई उभ्या होत्या.. व विलासरावांच्या पुढ्यात आबा पाटील बसलेले , आबा पाटलांचा वय जेमतेम सत्तर होत..
अंगात एक सफेद शर्ट आणि खाली सफेद पायजमा होता.. डोक्यावरचे केस विरळ झाले होते.
गळ्यात नेहमीच सोन्याची जाडजुड चैन घातलेली असायची.
विलासरावांची ही अव्स्था पाहून दिगंबररावांना लागलीच कळुन चुकल की काय झाल आहे ते..
तरी सुद्धा त्यांनी विलासरावांना विचारलंच की काय झाल आहे , तुला असअचानक काय झाल , कालरात्री पर्यंत तर एकदम ठिक होतास - शेवटी विलासरावांनी चार पाच दिवसांअगोदर शिंदेंच्या मळ्यापासून , ते रात्री - अपरात्री पडणारी स्व्पन, विचित्र असे होणारे भास , आणी कालरात्री घडलेला तो भयंकर प्रसंग तिथे उपस्थित सर्वाँना सांगितला .
दिगंबरराव,आबापाटील,मोहिनीबाई, बाजुलाच उभे चार - पाच गावकरी सर्वाँना हे ऐकून फारच धक्का बसला होता..
आबा पाटलांनी तर माझे मामा आणि विलासकाकांना चांगलंच झापल होत..
नाही त्या उचापती कश्याला करायच्या असे ते दरडावून म्हंटले होते...आणी हे सुद्धा म्हंणाले की
हे बर झालं की तुझ्याकडे देवाचा प्रसाद होता..आणी देवाच्या शूद्ध प्रसादाला घाबरुन ते ध्यान तुझ्या जवळ आल नाही, नाहीतर काळरात्रीच त्याने तुला झपाटल असत.!
त्याचदिवशी आबा पाटलांनी त्यांच्या एका ओळखीच्या भगत्याला विलासरावांच्या घरी आणल..
भगत्याने विलासरावांच सर्वकाही ऐकून उपाय करायला घेतले..
त्यांनी एक काळा दोरा हातात आणि एक काळ्या रंगाची ताविज विलासरावांना गळ्यात घालायला दिली...विलासरावांच्या अंगावरुन दोन डोळ्यांचा नारळ उतरवला आणि तोच नारळ शिंदेंच्या चिंचेच्या झाडाखाली दूपारी बारा वाजता एक दोन फुट खड्डा खणून त्यात गाडला ,
भगत्याने विलासरावांना महिनाभर घरातच रहायला सांगितला , गावाची वेस ओलांडून महिनाभर कुठेच बाहेर जायच नाही अशी सक्त कडक ताकीद दिली..
विलासरावांनी कठोरतेने भगत्याचे बोलणे मान्य केले , महिनाभर ते घरीच होते गावाची वेस ओलांडूण ते कुठेच गेले नव्हते...आणी अश्या पद्धतीने महिन्याभरानंतर विलासरावांच्या नशीबात आलेल्या द्रुष्टचक्राच अंत झाल होत..
ते सुखरुप सुटले होते...आणी ह्या जगात भुत,पिशाच्छ, आस्तित्वात आहेत ह्यांवर त्यांचा विश्वास बसला होता.
समाप्त..