पीर बाबाची कृपा 1
भाग १ ..
मित्रहो ह्या पृथ्वीतळावर जो मानव जन्म घेऊन येतो - तो कधी ना कधी मरणारच आहे , कारण ईथे कोणीही कायमचा पाहुणा आलेला नाही - प्रभु श्री कृष्णांच्या म्हंणन्यानुसर मृत्यु हेच आंतिम सत्य आहे !
साक्षात श्रीकृष्ण भगवंताना सुद्धा आपला मृत्यु चुकला नव्हता.
मित्रहो ज्या मानवाला अकाली,अपघाती , खून- हत्या अश्या श्रेणीतून मरण येत , तेव्हा त्याच्या काही इच्छा आकांशा मागे राहिलेल्या असतात !
मग असा अतृप्त इच्छेपोटी, वासनेपोटी, तो मानव ज्या ठिकाणी मृत पावतो - त्या स्थळावर, त्या ठिकाणी - त्या मानवाचा आत्मा अतृप्त भटकंती करत भटकत राहतो,
ज्या दिवशी त्या मानवाचा अपघात , खून, ज्या ठिकाणी झाला आहे - असा त्या मानवाचा आत्मा त्या वक्ताला तिथून जाणा-या वाटसरुंना दिसतो, आणी त्यालाच फेरा म्हंणल जात .
हा फेरा जो कोणी पाहतो , त्याला कोणत्या ना कोणत्या तरी वाईट परिस्थितीतून जाव लागतंच , हे विधिलिखित आहे- फक्त काही अंशी लोक त्या फे-यातून सुखरूप वाचतात , पन जे सापडले , त्यांना
एक भयंकर अश्या द्रुष्टचक्रातून जाव लागत्ं.
आणी अश्याच एका द्रुष्टचक्राची सत्यकथा अज मी तुम्हासर्वाँना सांगणार आहे ! म्हंणूनच कानात हेडफोन घालून , शांत पणे ऐका.. ! थंडीच्या ह्या गुलाबी रात्री ह्या सत्यकथेचा भयत्क्ंठीत आनंद घ्या .
अंगावर सर्रसरून काटा आणणारी, पायाच्या बोटापासून ते मेंदूपर्यंत नखशिखांत हादरवणारी ही सत्यकथा सुरु होत आहे.
सन 2022 9 ऑगस्ट मंगळवार
रात्री साडे आठ वाजता.
आकाशात कालिशार काजळी पसरली होती - मध्येच ढगांच्यात चंदेरी रंगाची भेसूर विज कडाडत होती.
त्या विजेचा चंदेरी लकाकता प्रकाश खाली ह्या पृथ्वीतळावर पडत होता.
कोठेतरी स्मशानात चार लोखंडी गजांवर एक चित्ता आंतिम घटकेवर येऊन जळत होती.
चित्तेतल प्रेत केव्हाचंच जळून गेल होत -आता मसणात फक्त लाकडाचे विस्तव तेवढे उरले होते. जे हवेच्या झोताने निखारे उडवत तांबडसर रंगाने चमकतांना दिसत होते .
चित्ते पुढे एक तरूण उभा दिसत होता.
त्याच नाव दर्शन विश्वनाथ देवकर वय तेवीस वर्ष ,त्याची आई आज आक्समिकरीत्या वारली होती .
डोळयांतुन अश्रु गाळत दर्शन आईच्या चित्तेला पाहत होता - लहानपणापासून ते आतापर्यंत आईसमवेत घालवलेले सुखाचे एकएकक्षण डोळ्यांसमोरून झटकन तरळून जात होते. तस डोळ्यांतून अश्रुचा पाट घळा घळा वाहत होता .
म्हंणतात दुखावर एकच औषध असत ती म्हंणजे, वेळ! दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने झाले..- वेळेवर वेळ जाऊ लागली अशातच दर्शनच्या आईच निधण होऊन वर्ष ऊलटल
होत .दर्शन आईच्या आक्समिक निधणाच्या दुखातून आता ब-यापैकी सावरून बाहेर आला होत.
शेवटी वेळच दुखावर औषध असते, हेच खरं!
2023 5 सप्टेंबर मंगळवार
दर्शनच्या आईच निधण झाल तेव्हापासून
त्याला कोठे फिरायला जाण्याच योग आल नव्हत . आणी घरी बसून बसून त्याला कंटाळा येत होता.
कोठेतरी फिरायला जाव ह्या हेतूने त्याने आपल्या जवळच्या मित्र सुजयला फोन लावल.
" काय दर्शन कसा आहेस मित्रा .!"
सुजयने आपल्या मित्राची विचारपूस केली.
" मी मस्त आहे भावा, पन घरी बसून बसून जाम कंटाळा येतो यार , कोठेतरी फिरायला जाऊयात म्हंणतोय !' दर्शन म्हंणाला.
" अरे मस्त आईडीया आहे ना भावा, कुठे जायचं पन फिरायला !" सुजयने पुन्हा विचारल.
" अरे पप्पांनी नवीन गाडी घेतली आहे तर ते म्हंणाले , की गाडी घेऊन कुठे फिरायला जायचं असेल तर अगोदर देवाधर्माच्या ठिकाणी घेऊन जा..! "
दर्शन सुजयला म्हंणाला.
" असं ! मग एक काम करूयात का ! आपण साईबाबांच्या शिर्डीला जाऊयात का ? "
सुजयच बोलण दर्शनला पटल होत. प्लाननुसार उद्या बुधवार दिनांक 6 तारखेला ते दुपारी घरून
शिर्डीला जाण्यासाठी निघणार होते.
मग बुधवारची रात्र कोणत्यातरी हॉटेलमध्ये काढून पहाटे सहा वाजता दर्शन करून परत येणार होते.
मित्रहो ह्या जगाचा ,ह्या उभ्या ब्रम्हांडाचा मालक तो आहे , सर्वाँची कूंडली त्या भगवंताने लिहीली आहे .
नशीबात कधी केव्हा काय घडेल काहीच सांगता येत नाही, आज आहोत तर उद्या नसू .
दर्शन आणी त्याचा मित्र सुजय दोघांनी फिरायला जायचा प्लान केला होता.
उद्या आपण फिरायला जाणार हा विचार करूनच मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
पन ह्या बिचा-यांना नियतीने त्यांच्या नशीबी तिकडे काय वाढुन ठेवले आहे , त्या धोक्यापासून त्या, अनाहूत संकटापासून दोघे अजाण होते.
मंगळवारची सुखाची रात्र संपली, कारण आता पुढील दिवस सुतकाचे होते ना? ते कसे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच.
बुधवारचा दिवस उजाडला होता . आकाशात पांढरे ढग दिसत होते - ते ढग चेह-यावर फसवा मुखवटा लावून जणु ह्या दोघांना आपल प्रवास सुरु करा अस सांगत होते.
कारण पुढे जे काही घडणार होत ,ते भयाण
ह्दयद्रावक होत.
2023 बुधवार 6
वेळ दुपारी 4 वाजता
दर्शन सुजय दोघांचाही शिर्डीला जाण्यासाठी प्रवास सुरु झाला. त्यांच्या सोबत अजुन तीन मित्र
आले होते.
दर्शनला गाडी चालवण्याचा पुर्णत अनुभव होता..! गाडीची स्टेरिंग त्याच्या हातात परफेक्ट बसली होती. सफेद रंगाची मारूती एक्सल6 वेगाने हाईवेच्या रस्त्यावरून धावत होती.
मित्रांच्या चाललेल्या गप्पागोष्टी- मज्जा मस्तीत ,प्रवासात कोणीही बोर होत नव्हत.
सर्वाँच्या चेह-यावर आनंद झळकत होता.
पन पुढे हाच आनंद दुखात बदलणार होता.
दुपारी चार वाजता सुरु झालेला प्रवास तब्बल आठ तास चालला होता.
आणी रात्री साडे बारा वाजता संपला होता. - सर्व मंडळी, सुखरूप श्री क्षेत्रात दाखल झाली होती .
दर्शनच्या मित्रांमधल्याच कोणीतरी एका मित्राचा शिर्डीमध्ये असलेल्या एक हॉटेलचा मालक ओळखीचा होता.
ज्याकारणाने रूम शोधायची काही गरज पडली नव्हती.
सर्वजन रूम मध्ये आले-
रूम म्हंणायला मोठी होती. चारही बाजुच्या भिंतींना तपकीरी रंगाने रंग दिल होत. दरवाज्याच्या डाव्या बाजुला दोन सिंगल मखमखली मऊशार पांढ-या गादीचे बैड होते. बैडच्या उजव्या बाजुला एक दरवाजा होता - तो दरवाजा म्हंणजे वॉशरूम होय.
बैडच्या पुढे दहा पावळांवर भिंतीवरची टिव्ही होती- वर स्पेशल डिजाईनच सेलिंग होत - आणी त्यात
एल: ईडी:लाईट बसवलेले - रूम मध्ये झगमगहाट पसरला होता.
रूम कशी फाईस्टार होती !
सर्वाँनी आप-आपल्या बैगा एका बाजुला ठेवल्या.
आणी कोणीतरी एसी चालू केली , रूममध्ये हळकासा थंडावा पसरला.
मग थोड्याफार गप्पा झाल्या आणी सर्व झोपी गेले.
दुस-या दिवशी
गुरवार 7 सप्टेंबर 2023
सर्वाँनी लवकर उठून अंघोळ वगेरे धूतली,
आणी साईबाबांची काकड आरती सुरु होण्या अगोदर मंदिरात पोहचले .
साईबाबांचे दर्शन करण्यासाठी सकाळीच भक्तांची लांबच्या लांब रांग लागलेली दिसत होती.
त्या भक्तांची रांग पाहता ,साईबाबांवर असलेल्या भक्तांच्या प्रेमाची प्रचिती दिसून येत होती.
लांब लांबचे देश विदेशातले लोक लाखो मैलाच अंतर पार करून बाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्त श्री क्षेत्रात आले होते.
पाच दहा सेकंदासाठी त्या मुर्तीला पाहताच प्रवासातला थकवा निघुन जात होता..
हिच तर त्या विधात्याची करणी होती.
सर्वांनी साईबाबांच दर्शन घेतल..-
साईबाबांचे स्पेशल शिर्डीचे लाडू घ्यायचे ही मंडळी विसरले नाहीत ! लाडू घेऊन सर्वजण पुन्हा रूमवर आले. सद्या सकाळचे दहा वाजले होते.
मग सर्वाँनी पुन्हा थोडस आराम करायचं ठरवल..
तसंही डोळ्यांवर थोडीफार झोप होतीच.
सर्वजन मस्त पैकी झोपेच्या अधिन झाले..
मग पावणे चार वाजता सर्वाँना जाग आली, फ्रेश वगेरे होऊन सर्वाँनी निघायची तैयारी केली! आप- आपल सामान घेऊन सर्वजण गाडीपाशी पोहचले.
" अरे बापरे दर्शन, अरे हे ढग बघ ! अस वाटतंय जोराच पाऊस पडनार आहे." सुजय वर आकाशात पाहत म्हंणाला.
कारण आकाशात झाकोळून आल होत -
चौही दिशेना काळ्या करपट ढ़गांचा मायाजाळ पसरल होता. घड्याळात दोन चार वाजुन - दहा मिनिटे झाली असतांना संध्याकाळच्या सात वाजल्यासारखा अंधार दाटुन आला होता. त्या आकाशातल्या गढुळ वातावरणाला पाहता जणू अस वाटत होत , की हा निसर्ग ह्या पाचही जणांना पुढे घडणा-या अशुभ , अनाकलीनय संकटाची चाहूल लावून देत होता. पण ते समजण्या इतपत मानव प्रगत थोडी ना होता ?
" अरे काही नाही होत ,बस गाडीत ! बरोबर पोहचू आपण!" दर्शन बिनधास्तपणे उच्चारला.
सर्वजन गाडीत बसले आणि एकदाचा परतीचा प्रवास सुरु झाला.
काल्याभोर कचकड्याच्या आकाशातला तो कालसर विषारी प्रकाश चौहू दिशेना पोतला होता.
काहीवेळातच गाडीने शिर्डी मागे सोडली .
गाडीच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश पेटला
होता...- त्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश डांबरी रस्त्यावर पडत होता .
गाडीने आता जरास जंगली भाग पकडल होत..
जंगलातून मधोमध असलेल्या वाकड्या- तिकड्या रस्त्यावरून गाडी वेगाने धावत होती.
गाडीत दर्शन- सूजय मागे बसलेले त्यांचे तीन मित्र असे मिळून पाचही जणांच्या छानश्या गप्पा गोष्टी सुरु होत्या.
" दर्शन जंगली भाग आहे , गाडी जरा आरामातच चालव, आणी हो , गाडीच्या हेडलाईटच्या ऊजेडात जर रस्त्यावर ससा,किंवा कुत्रा , अस काहीही गाडीसोबत धावतांना दिसल तर गाडी थांबू नको !" सुजय गंभीर स्वरात उच्चारला.
त्यावर दर्शनने गाडी चालवत पुढे पाहतच विचारल .
" का रे, अस का म्हंणतोयस!
" अरे आता रात्र झालीये ना , आणी जंगलात
अश्या सुनसान ठिकाणी - ससा , किंवा कुत्रा दिसणे म्हंणजे चांगल नसत , अस म्हंणतात की आपला काळमृत्यु त्या प्राण्याच्या रूपात आपल जिव घेण्यासाठी आलेल असतो- आणी जर आपण त्या वक्ताला गाडी थांबवली , तर ते भुत,पिशाच्छ, चकवा, चकाट्या, आपला जिव घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाहीत. !" सूजय गंभीर स्वरात म्हंणाला.
पण मागे बसलेल्या एक- दोन जणांनी त्याच बोलण हास्यावर नेहल.
पण सुजय मात्र आपल्या बोलण्यावर ठाम उभा होता.
क्रमशः