व्हिक्टोरिया 405
भाग 4 आंतिम..
गाडी सुरु झाली होती.
" बस बस ..!" सुजय पटकन म्हंणाला.
मागून भाविक सीटवर बसला.
" मामा स्टोरीमध्ये ही गाडी अशी तिस-यांदा स्टार्ट होते नाही!" भाविक म्हंणाला.आणी धक्के खात गाडी बंद झाली..
दोघांच्याही छातीत श्वास अडकला-
"मामा आता स्टोरी नुसार तो .."
भाविकच्या चेह-यावर रडकूंडीभाव पसरले.
" ड्रेक्युला परत येइल..! आणी सगळ्यात अगोदर माझा मुडदा बसवशील- नंतर तुझा..!"
सुजय पटकन म्हंणाला.
त्या रक्तपिपासू अंधा-या काळोखी रात्री घोड्याच्या खिंखाळण्याचा आवाज जंगल दुमदूमून गेला - रातकिड्यांची किरकिर सावध झाली..
सुजय भाविक दोघांच्या माना मागे वळल्या.
काळ्या घोड्यांची ती अभद्र घोडागाडी त्यांच्याच दिशेने वेगाने येत होती.
" मेलो मामा आपण मेलो- आता ह्याच्या
बरोबर दिवसरात्र पेटीत झोपायला लागल आपल्याला.ह्या येड्याकडेतर त्याची सेक्सी बायको पन नाहीये- कस दिवस जाईल मामा आपल.."
भाविक म्हंणाला.
" न्हाई..न्हाई....न्हाई..भाव्या..! अस नको बोलू! मला मांणसाच रक्त नाही पिऊशी वाटणार रे ! "
सुजय म्हंणाला.
तेवढ्या वेळेतच गाडीच्या हेंन्ड़ळला -लावलेली कापडी पिशवी खाली पडली..
सुजयची नजर नकळत त्या पिशवीवर पडली..त्या पिशवीतून एक पांढ-या लसणाचा बार बाहेर आला होता..
" लसूण !" सुजयच्या चेह-यावर हसू आल.
"लसून !" भाविकने ते ऐकल.
" लसणाच नाव नको काढु. आपण पिशाच्छाना ते बंधनकारक आहे . "
" भाविक पागल -इथे खाली बघ लसूण आहे लसूण !"
" कुठे?" अस म्हंणतच भाविकने पिशवीबाजुला पाहिल.
लसणाकडे पाहून त्या दोघांच्या डोळ्यांत चमक आली होती.
" दोघेही गाडीवरून खाली उतरले- सुजयने लसूण उचलून हातात घेतल.
दोघेही रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहिले..
त्या छोठ्याश्या लसणाच्या पाकळीने सुद्धा त्या दोघांच्या मनात हिंमत तैयार झाली होती.
भुवया ताणून ते दोघे त्या घोडागाडी कडे पाहत होते .
........
दोघांपासून वीस पावळांवर येऊन ती घोडागाडी थांबली.
गाडीवरच्या ड्राईव्हसीट वरून त्या ड्रेक्युलाने खाली जमिनीवर उडी मारली..
माती उडवत धप आवाज झाला
दोघेही ता सैतानाला डोळ्यांसमोर पाहत होते.
साडे पाच फुट उंची ,अंगात काळा कोट,कोटला जोडून गळ्यामागे काळी ताठ कॉलर- खांद्यावरून मागे काळी शाल सोडली होती.
खप्पड उभट चेहरा- रुंद कपाळ- कपाळावर वाकडी तिकडी फुगीर नस उमटली होती-डोळ्यांचे बुभळ लेझर लाईटसारखे चकाकत होते-
" हिहिहिही..घर्र..घर्र..घर्र..!" जबडा विचकत ते ध्यान हसल.
त्याचे सुळ्यासारखे दात बाहेर आले..
" किती दमछाक केलीत रे तुम्ही माझी मुलांनो,हं? "
त्या शेवटच्या वाक्यावर जरा जास्तच भार दिल होत.
" अरे घाबरू नका रे मुलांनो , या असे माझ्या जवळ या पाहू? अरे मी तुम्हाला जादूई शक्ति देइल..! सूपरहीरोसारखे हवेत उडाल...एका बुक्कीने ..समोरच्याला पाणी पाजाल एवढी शक्ति देईन मी तुम्हा दोघांना ! तुम्हाला कसलीच म्हंणजे कसलीच कमी पडणार नाही- पैसा , ऐश्वर्य, शारीरीक सुख- गो-या गोमट्या बाई- पोरींची तुमच्या समोर लाईन लागेल.
हवी ती भोगा- आयुष्यात दुख हे तुमच्या वाटेला कधीक्ष येणारच न्हाई..! फक्त आणि फक्त सुखाचे क्षण अनुभवाल.
अरे ते मानवाच तुच्छ आयुष्य काय जगता? सकाळी लवकर उठायचं- बैलासारख राबून कामधंदा करायचा, एकाच बाईला आयुष्यभर भोगायच. अरे हे आयुष्य नाही , नरक आहे नरक. अरे माझ्यात या - माझ अंश व्हा! ..मग बघा तुम्हाला सकाळी उठायची गरज नाही .
ना पैशासाठी काम धंदा करायची गरज आहे.! फक्त दिवसभर आरामात झोपायचं आणी ह्या अश्या अंधा-या थंडगार रात्री शिकारीसाठी बाहेर पडायचं बस!"
तो ड्रेक्युला बोलत होता- त्याचा खर्जातला - घोगरा आवाज सूजयच्या कानांवर आदळत होता.
त्याचे किशोरवयीन मन त्या सर्वगोष्टी ऐकून त्या ड्रेक्युलाच्या बोलण्यात गुंतत चाळल होत.
सुजय लोभाळा बळी पडत होता.
त्या सैतानाने ते ओळखल त्याच्या लालसर ओठांवर आसुरी हास्य पसरल.
" ये सुजय-माझ्यात ये! इकडे ये.. तुझ्या रक्ताचा एक घोट दे मला -बस्स मग झालंच , तुला माझी शक्ति मिळेल..ये..ये..माझ्या भक्ता ये..मला तुझ भोग घेऊ दे ..ए..! तुझ रक्त मला चाखू दे..ये."
सुजयच डोक ताळ्यावर राहिल नव्हत -तो संमोहिंत झाला होता -पन भाविक? त्याच्या बाळमनावर ते लोभाचे पाष पसरले नव्हते. त्याच चित्त ताळ्यावर होत.
" मामा...मामा...थांब !"
भाविकने सुजयच हात धरल.
" ए कार्ट्या , हरामखोर ! सोड त्याला सोड..नाहीतर नरडी फाडून घास घेईल तुझ्या रक्ताचा." तो सैतान खेकसला..
तावातावात पाय आपटत तो हह दोघांच्या दिशेने येऊ लागला .
उभ्या साडेपाच फुट उंचीच्या त्या सैतानाला आपल्याकडे येताना पाहून भाविकची भीतिने गाळण उडाली..तोच त्याला काहीतरी आठवल -लसूण "
" लसूण ?" त्याने सुजयकडे पाहिल. पुतळ्यासारख्या उभ्या सुजयची हालचाल तर होत नव्हती- पन त्याच्या हातात लसुण पकडलेला होता.
छोठ्या भाविकने त्याच्या हातातून तो लसुण हिसकाऊन घेतला.
तो लसूणपाहून त्या सैतानाची पाचावर धारण बसली..भीतीने तो दोन पावळे मागे सरला..
" ए ते लसूण फेक , फेक ते !"
ते लालसर लेझरचे डोळे मोठे करून तो सैतान म्हंणाला.
" माझ्या नरडीचा घोट घेतो ना ? ये घे.. ना..ये..!
भाविक आपला गळा त्याला दाखवत होता
" अर्घ..रघ..र्घ्ह..घर्र..ग्र्गे..": त्याच्या घशातून
वेगवेगळे आवाज बाहेर येत होते. ते टोस्कूले दात दाखवत तो त्याच्या अंगावर जाऊ पाहत होता - पन मध्येच येणारा तो लसणाचा हात त्या सैतानाला थांबवत होता.
" तू फक्त लालसा दाखवू शकतोस- स्केमर लxxयाच्या! ते पुर्ण नाही करु शकत - तूला फक्त गुलाम हवे आहेत अंश नाही -मर स्वतच्या कर्माने !"
भाविकने हातात असलेला लसूण वेगाने त्या सैतानाच्या अंगावर फेकला -
त्या साधारणश्या लसणाच्या पाकळ्या जस त्या सैतानाच्या शरीराजवळ पोहचल्या- तस त्या गोल लसणाच्या बाराला एका तप्त ज्वालामुखीच्या -लहानसर गोल्यासारख रुप आल- अंधारात तो लसूण विस्तवासारखा लालभडक ,प्रकाश फेकत चकाकला- सृष्टीच्या विधात्याचा जणू तो शस्त्र होता !
प्लास्टीकच्या पिशवीतून विस्तव आरपार व्हाव तसा तो लसूण त्या सैतानाच्या छाताडातून आरपार झाला..
त्या सैतानाच्या छातीवर एक गोलसर भगदाड पडल -
त्याचे लालसर डोळे आता काळ्या रंगात बदलू लागले- नाक , कान ,तोंड ह्या भागांतून पांढरट करपट धुराची घाणेरडी वाफ बाहेर पडू लागली- हाता पायाची बोट वितळू लागली- देहातून - घाणेरडा आम्ळी- ओकारीयुक्त वास बाहेर पडू लागला - नाका - तोंडातून पू बाहेर येऊ लागल..
" आह्ह्ह्ह्ह्ह्ह नाही...घर्र..घर..र्ग्गेह्ह्र." विचीत्र गडगडाटी आवाजात ते विव्हळल होत.
सर्वशरीरावरची कातडी एसीड टाकल्यासारखी
देहावरून वितळून खाली पडली जात होती- आतली पांढरट हाड़ दिसू लागली होती.- त्यांचीही क्षणार्धात राख झाली- आता त्या सैतानाच्या जागी फक्त काळ्या राखेचा ढिग पसरला होता.
त्या सैतानाचा भयाण अंत झाला होता.
सैतानाचा अंत होताच - सुजय पुन्हा पहिल्यासारखा झाला..
दोघेही आनंदाने गाडीवर बसले -पहिल्याखेपेसच गाडी सुरु झाली होती..
दोघेही अनारस्यांच पीठ घेऊन घरी आले होते.
हा घडलेला थरार दोघांनिही कोणालाही सांगितल नव्हत...
कारण हे सर्व तर काल्पनिक असत ना ?
विश्वास कोण ठेवेल? ..😈
परंतु अंधाराच्या एका काळ्या डार्कवेब मध्ये हे असे ..
भयान सैतानी छाया असलेली आसुरी ध्यान लपलेले आहेत.
आपल्या मधल्याच कोणाचीतरी भेट घेण्याची वाट पाहत आहेत.
मग येताय ना ?..
समाप्त:
..😈
भेटूयात पुढील भागात..☺🙏