Aarya - 5 in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या... ( भाग ५ )

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

आर्या... ( भाग ५ )

     श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोपेत असतात . ती थोड ही आवाज न करता तिची काम आवरून घेते. आता अनुराग चे आई वडील ही नव्हते . ते काही दिवसांपूर्वीच महत्वाच्या कामासाठी गावी गेले होते आणि खर तर या एकांतामुळेच श्वेता च्या मनात अनेक प्रश्न येत असत आणि आज त्यांची उत्तरे तिला भेटणार होती . एक दीड तासात ती काम आवरून हळूच अनुरागला आवाज देते आणि पुढे म्हणते , " चल पटकन आवरून घे तुझं ! त्याचा हात पकडत पुढे म्हणते अरे , हळू ! आर्याला हात लागेल ! तिला झोपू दे ! पहाटेच गाढ झोपते ! "    हे ऐकल्यानंतर तो अगदीच हळू हळू उठतो आणि बेडवरून खाली पाय ठेवतो ! श्वेताला समोर उभी पाहून म्हणतो , ' हे काय ? तू तर तयार ही झालीस !' ती हसून म्हणाली , हो ! आर्या उठण्याआधी सगळ आवरलं की बर वाटत मला !' चेहऱ्यावर थोडीशी स्माइल देऊन अनुराग ब्रश करण्यासाठी जातो . तो त्याच आवरू लागतो आणि श्वेता मात्र एकटक आर्याला बघत असते . तिच्या हाताची , पायाची , नाकाची गोड गोड पापा घेत असते . आता या क्षणी आर्या ही श्वेताच्या जीवनाचा महत्वाचं भाग बनली होती !

     श्वेता च्या स्पर्शाने आर्या हळूच झोपेत हसत होती . तिला पाहून ही सुद्धा हसत होती . तितक्यात आर्याला जाग येते . अर्धवट डोळे उघडुन मम्मी कडे बघून हळुवार हसत होती . श्वेता तिला उचलून घेते आणि तिच्या सोबत गप्पा करत असते तितक्यात अनुराग त्याच  सगळ आवरून येतो ! श्वेताला म्हणतो , ' चला ! आता दोघींच्या गप्पा झाल्या असतील तर पटकन नाश्ता द्या मला ! भुक लागली आहे !' श्वेता त्याच्याकडे आर्याला देते आणि किचन मध्ये निघून जाते . तो ही आर्या सोबत गप्पा करत बसतो . "गप्पा करणे म्हणजे आर्या सोबत बोलत बसणे आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यांची हालचाल आणि ते चेहऱ्यावरील हळुवार हास्य पाहून आनंद घेणे ! आणि हा आनंद बाकी सर्व आनंदापेक्षा वेगळा आनंद असतो , तो कोणालाही पैसे देऊन विकत घेता येत नाही !"    

  तितक्यात श्वेता अनुराग साठी नाश्ता घेऊन येते . तो नाश्ता करत बसतो , इकडे श्वेता आर्या ला दूध देऊन तिचं पोट भरते . नंतर तिला सुद्धा फ्रेश करते. छान छान कपडे घालून तिला छान तयार करते. त्या दोघींचं सर्व आवरेपर्यंत अनुराग ही त्याच सगळ आवरून तयार होतो आणि तिघे ही डॉक्टर कडे जाण्यासाठी निघतात . ते गाडी मध्ये बसणार तितक्यात श्वेता च्या आई चा फोन येतो , त्यांना हे डॉक्टर कडे जाणार असल्याची कल्पना ही नव्हती . श्वेताने ही उडवाउडवीची उत्तरं देऊन , कामात आहे सांगुन फोन ठेवून दिला . तिला कदाचित आईला डॉक्टर ला भेटल्यानंतर फोन करायचं असेल म्हणजे ती ही कुठल्याही विचारांमध्ये अडकून राहणार नाही.

    काही वेळातच हे हॉस्पिटल मध्ये पोहचतात. अपॉइंटमेंट आधीच घेतली होती म्हणून कोणत्याही प्रकारचं विलंब न करता आर्याला सर्वात प्रथम चेक करण्यासाठी घेतल होत . अनुराग आणि श्वेता दोघे ही थोडे काळजी मध्येच होते . आता डॉक्टर काही तर सांगणार याची आपल्याला तयारी ठेवायची आहे असं स्वतःला समजावत होते . तशी आर्या एकदम शांत होती , डॉक्टर चेक करत असताना ही तिचा काही रडण्याचा आवाज नव्हता .  थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात , ' आता तरी काळजी करण्यासारखं काही नाही ...पण तुमचे तिच्या जन्माच्या आधी चे रिपोर्ट पाहून माझ्या मनात काही शंका आहेत  आणि त्या दूर करण्यासाठी आपण तिच्या काही टेस्ट करूया ! आणि जितकं लवकर शक्य होईल तितकं ते करून घ्या ! ' अनुराग आणि श्वेता ला यावर काय बोलावं कळत नव्हत ! दोघेही शांत होते फक्त मान हलवून त्यांनी डॉक्टरांच्या बोलण्याला होकार दिला .

   ज्या टेस्ट करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या आपल्या साधारण टेस्ट नव्हत्या. आणि त्यांच्या शहरामध्ये ही उपलब्ध नव्हत्या . दुसऱ्याच दिवशी त्या दोघांनाही त्यांच्या आई वडिलांना हे सांगितलं . श्वेता चे आई वडील तर दुसऱ्याच दिवशी तिथे आले . खरं तर ते त्यांना एक मानसिक आधार देण्यासाठी तिथे आले होत . अनुराग च्या वडिलांचे वय तसे ६५ होते पण त्यांना असणाऱ्या रक्तदाबाच्या आजाराने त्यांना जास्त धावपळ करणे शक्य नव्हते , म्हणजे अनुराग त्यांना जास्त धावपळ करून देत नसे . त्याने त्यांना ' इतकं काही काळजीसारख नाही , काही वाटल तर स्वतःहून बोलावू असं सांगून दिलासा दिला !'

 डॉक्टर ने सांगितल्या प्रमाणे अनुराग ने त्यांच्या पासून काही अंतरावर असलेल्या शहरातील एक नामांकित हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट घेतली होती .  श्वेता आणि अनुराग आणि तिचे आई वडील आणि आर्या तिच्या टेस्ट साठी त्या हॉस्पिटल मध्ये पोहचले . काही वेळात च आर्या ला टेस्ट साठी आतमध्ये घेऊन गेले , ती आज रडत होती म्हणून श्वेता ही आतमध्ये गेली . पण थोड्यावेळाने तिला ही बाहेर पाठवण्यात आले . सगळेच चिंतेत होते . 

 आणि पूर्ण दीड तासाने आर्या ला श्वेताकडे बाहेर आणून दिले . 

तिचे रिपोर्ट उद्या सकाळी अनुराग ला मेल वर येणार होते ...



continue  .....