Bulletproof in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | गोळ्याचे सांबार

Featured Books
Categories
Share

गोळ्याचे सांबार

🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिचा हातखंडा असेकितीही गडबड असली आणि कोणतेही प्रमाण नसले तरी तिचा पदार्थ उत्तमच होत असे.गोळ्याचे सांबार ही आईची अगदी हातखंडा पाककृती होती🥰महिन्यातून एकदा रविवारी हा प्रकार घरी असेकधी भाजी नसली आणि इतर वारी आईने हा प्रकार केला आणि शाळेत मी डब्यातून नेला तर मैत्रीणी खुष होत असत पण डब्यात नेलेले हे सांबार दोघी तिघींसाठी अगदीच थोडे असे.. पुरत नसेत्यांची जीभ आणखी खवळत असे😋मग त्या म्हणत..एकदा घरी बोलाव ना तुझ्याकडे हे खायला..तशा आम्ही कॉलेज सुटल्यावर अचानक सुध्दा एकमेकींकडे जात असू पण माझ्याकडे माझी आई शिक्षिका असल्याने इतर दिवशी ती घरात नसे त्यामुळें त्यांना जेवायला बोलावणे जमत नसे रविवारी आईला निवडण टिपण दळण आणणे अशी अनेक जादा कामे असत...तरीही आईला मैत्रीणी काय म्हणतात हे सांगितल्यावर आई त्यासाठी प्लान करीत असे (असेही बरेच वेळ रविवारी मुद्दाम ती वेगळे वेगळे प्रकार करून माझ्या मैत्रीणी ना बोलावत असे )पण त्यात हा जेवणातला प्रकार गरम गरम खाण्यातच मजा असे.. म्हणुन अगदी लक्षात ठेवून ती मला सांगत असे पुढच्या रविवारी तुला जादा तासासाठी शाळेत बोलावले आहे ना.. तेव्हा तुझ्या मैत्रीणीना घरी बोलाव गोळ्याचे सांबार खायला मग मी लगेच पुढल्या आठवड्याचा बेत मैत्रीणी भेटल्यावर सांगून टाकत असेमग आमचे सगळ्यांचे लक्ष रविवार कडे लागत असेत्या रविवारी जादा तास संपायला नेमका उशीर होत असे...😀सकाळी नऊ वाजता पोहे अथवा शिरा खाऊन आलेल्या आम्हाला जाम भुक लागलेली असेअखेर एकदाचा तास संपून आम्ही तिघी बाहेर पडत असू...🙂घरी पोचल्यावर आमचा किलबिलाट बाहेरच्या खोलीतच आईच्या कानावर पडेतिची हाक येई...या ग आत... हात पाय धुवून जेवायला बसा..घरात शिरताच उकळत असलेल्या गोळ्याच्या सांबाराचा घमघमाट सुटलेला असे..त्यात इतरही काही वास असत ते कसले हे चटकन समजत नसे..😀कधी एकदा जेवतो असे झालेले असायचेआतल्या खोलीत जेवणाची जय्यत तयारी आईने केलेली असायचीपाट ,ताट ,भांडी ,वाटया..ताटात मीठ ,कोशिंबीर, लोणचे, तळलेला पापड असे😋आम्ही तिघीजणी आणि माझा धाकटा भाऊ चौघे हात पाय धुवून जेवायला बसत असुगॅस वर एकीकडे गोळ्याचे सांबार उकळत असायचे(तेंव्हा हे सांबाराच्या गोळ्यांचे वाटण आई पाट्यावर वाटत असे )कुकर मध्ये भात तयार असायचावाटीतल्या त्या चविष्ट गरम सांबारा सोबत आम्ही पहिला भात  खाऊ पर्यन्त आई गरम पोळ्या करून आम्हाला वाढायला लागलेली असायचीगोळे चमच्याने बाहेर काढून ठेवा ग वाटीतूनगरम आहेत...तोंड पोळेल बर....आम्ही जेवणात तल्लीन झालेलो असायचो गरम टमटमीत फुगलेली मऊसूत .. आणि तूप घातलेली पोळी कुस्करलेल्या गोळ्यासोबत आणि गरम सांबारा सोबत हा हू करीत खाणे हा दिव्य अनुभव असायचा...😀सोबत पापड, लोणचे...हाता तोंडाची गाठ पडलेली असायचीतोपर्यन्त आई आणखी एक वेगळी वाटी आमच्या पानात सरकवत असेकधीं त्या वाटीत गुलाबजाम असे... तर कधी शिरा.. कधी दुधी हलवा... तर कधी खीरमैत्रीणी येणार म्हणून काहीतरी गोड पदार्थ ती आवर्जून करीत असे.  .❤️घरी आल्यावर गोळ्याच्या सांबारा सोबत आणखी कसला वास येत होता होता ते तेव्हा समजायचे 🙂🙂आधीचा भात, एक दीड पोळी एक वाटी सांबार त्यातले तीन चार गोळे , वाटीत दिलेला गोड पदार्थ..ईतके खाल्ल्यावर आमची पोटे गच्च भरतआईचा आग्रह अजुन असे मैत्रीणी मग... म्हणत...काकु पुरे पोट भरले.... मस्त झाले होते सांबारतुम्ही सगळेच छान करता❤️आई हसून आमच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत असे🙂मग आम्ही बाहेर अंगणात खेळायला जात असूआई आणि वडील जेवायला बसतत्यांचे जेवण झाल्यावर मैत्रीणी घरी जायला निघत..गोळ्याचे सांबार पुन्हा खावेसे वाटले की निरोप द्या बरे मलाअसे म्हणून प्रत्येकीला एका कापडी पिशवीत आई दोन कप्पी डबा घालून त्या दोघींच्या हातात देत असे..काकु हे काय.... ?असे विचारताच..अग तुम्ही तिकडे काय खाल्ले असे तुमच्या घरची विचारणार ना....त्यांना दिलाय थोडा नमुना... असे म्हणेत्या डब्यात एका कप्प्यात सांबार आणि दुसऱ्यात त्या दिवशी केलेला गोड पदार्थ असे...मैत्रीणी खुशी खुशी निघून जात...अशा या गोळ्याच्या सांबाराच्या आठवणी...❤️🟡गोळ्याचे सांबार 🟡🟡साहित्य एक वाटी हरभरा डाळ  अर्धी वाटी उडीद डाळ व पाव वाटी मसूर डाळ तिखट ,मीठ ,गरम मसाला ,हळद,कोथिंबीर,थोड़ी बडीशेपजीरे , कढीलिंब व मिरची आमसुलंओले खोबरे 🟡कृती 🟡सर्व डाळी रात्री भिजत घालणे. सकाळी अत्यंत कमी पाण्यात या डाळी थोड़े जीरे ,कढीलिंब व मिरची घालून वाटुन घेणे 🟡आता या मिश्रणात आपल्या आवडी प्रमाणे तिखट ,मीठ ,गरम मसाला ,हळद,कोथिंबीर ,थोड़ी बडीशेप घालुन चांगले एकत्र करावे .🟡आता फोडणी साठी कढ़ई ठेवणे .त्यात हिंग मोहरी हळद घालुन फोडणी झाल्यावर त्यात चार ते पाच भांडी पाणी घालावे .या पाण्यात थोड़ी हळद,तिखट ,मीठ, व आमसूल  घालावे पाणी चांगले उकळले की गॅस बारीक करावा .🟡आता डाळीच्या मिश्रणाचे हातावर घेवुन छोटे छोटे  गोळे करून त्या या पाण्यात हलकेच सोडत राहावे गोळे शिजले कि आपोआप वर येतात व हळू हळू रस्सा पण घट्ट होऊ लागतो  .🟡सर्व गोळे वर आले की पाच मिनिटे झाकून ठेवावे नंतर कोथिंबीर व खोबरे घालून सजवावे .🟡भाकरी पोळी अथवा भात कशा बरोबर ही हे सांबार मस्त लागते .नुसते गोळे पण खूपच चविष्ट लागतात .कधी भाजी नसेल तर हा पर्याय उत्तम आहे .🟡टीप काही वेळाने सदर सांबार घट्ट होते त्यामुळे प्रथमच आपल्या आवडी नुसार एक दोन वाट्या जास्त पाणी घातले तरी चालते.तसेच हे मिश्रण वाटताना जास्त पाणी घातले तर गोळे फुटतील त्यामुळे कमी पाण्यात  घट्ट वाटण करणे जरुरी आहे .