समर ने स्वराला बेडवर नेऊन झोपवलं आणि पटकन विनोदला फोन करून बोलवून घेतलं....
श्रीधर समर सोबत सारखा बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण समर श्रीधरला टाळत होता, त्याच्या मनात श्रीधरला घेऊन खूप प्रश्न होते त्याला त्याच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नव्हती, समरला माहीत होतं काही झालं तरी त्याचे बाबा त्याला काही सांगणार नाही म्हणून तो शांत झाला होता.....
"समर, स्वराला दवाखान्यात भरती करशील तर बरं होईल, तसही आता डिलिव्हरी पण जवळ अली आहे आणि सध्या तिची हालत ठीक नाहीये, so better होईल की तिला भरती कर".... विनोद
"ठीक आहे काका"...... समर
समर स्वराला दवाखान्यात घेऊन गेला, तिथं तिला भरती केलं, पूर्ण दिवस समर तिथच बसून होता, श्रीधर दवाखान्यात आला पण समर तिथं ही त्याच्यासोबत बोलला नाही....
समर च्या मनात फक्त एकच चालू होतं, की त्या मुलीने त्याला दादा म्हणून का हाक मारली, कोण आहे ती.... आईला मारण्याच्या मागे तिचा काय उद्देश्य होता, त्यात सुवरणा कोण आहे.... ती का असं करतेय तिचा माझ्या किंवा वाड्यावसोबत काय संबंध आहे....
समरच डोकं चालत नव्हतं, त्याला काहीच सुचत नव्हतं... विचार करत करत तो झोपी गेला, तसाही खूप थकला होता तो, समरला तेव्हाच एक स्वप्नं पडलं, स्वपण्यात त्यानी आईला बघितलं, आई त्याला काय तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण समरला काहीच ऐकायला येत नव्हतं, तेव्हा समर ने स्वपण्यात पाहिलं की एका पाळण्यात एक छोटं बाळ होतं आणि श्रीधर ने त्या बाळाचा तोंडावर उशी दाबून त्याला मारून टाकलं.....
"समर".... विनोद ने समरला हाक मारली
"हा"..... समर दचकून उठला
"Relax relax.... मी आहे, बाळा तू घरी जा थोडा आराम कर".... विनोद
"नको काक मी ठीक आहे, थांबतो मी स्वरा सोबत ".... समर
"बाळा काळजी करू नकोस, इथं मी आहे एवढं स्टाफ आहे, थोडा वेळ घरी जा मग ये"..... विनोद
समर ऐकत नव्हता, पण शेवटी विनोद ने खूप आग्रह केल्यामुळे तो एकदा स्वराला बघून तिथून निघाला, स्वरा झोपली होती म्हणून त्याने स्वराला उठवलं नाही आणि निघाला दवाखान्यातून....
समर बाजारात पोचला, त्याला तो गजरेवाला दिसला, समरला आठवलं की त्या दिवशी तो सुवरणा बदल सांगत होता, समर पटकन गाडीतून उतरला आणि त्याच्याकडे गेला...
"या.... बोला किती चे देऊ गजरे"....
"गजरे नको, मला काही तरी विचारायचं आहे".... समर
"विचारा.... काय विचारायचं आहे, तुम्हाला"....
"त्या दिवशी तू... सुवर्णा बदल सांगत होता, कोण आहे ती"....??? समर
"साहेब... बघा मला जेवढं माहीत आहे तेवढ मी सांगतो, ह्यात खरं किती आणि खोटं किती त्यात मला काही माहिती नाही.... पण हे सगळं फक्त ऐकलं आहे लोकांकडून".....
"काय ऐकलं आहेस मला पण सांग"..... समर
"साहेब गावात बऱ्याच लोकांना अस वाटतं की सुवरणा आणि त्याची मुलगी गायत्रीला राव ने मारलं आहे, म्हणून त्यांची आत्मा तुमच्या वाड्यात फिरते"....
"काय बोलतोय तू.... कोणाबदल बोलतोय हे विचार करून बोल"... समर रागात बोलला
"साहेब मी आधीच बोललो होतो की मी पण हे ऐकलं आहे".... तुम्हाला राग आला असेल तर माफ करा.....
समर काय बोलला नाही आणि गप तिथून निघाला.... घरी जाताना तो मधी मंदिरात जाण्यासाठी थांबला, मंदिरात त्यांनी स्वरा साठी प्रार्थना केली आणि मग जेव्हा तो मंदिरातून बाहेर आला त्याला तिथं एक माणूस बसलेला दिसला, खूप विचित्र असा दिसत होता तो, हातात काय चिलम घेऊन फुकत बसलेला... अगदी नशेत होता तो, त्याने समारला हाक मारली
"ओ.... साहेब, काही प्रश्नाचे उत्तर असं प्रार्थना करून भेटत नाही, त्यासाठी काय गाठी सोडवावीलागतात, ती गाठ सोडवा मगच रस्ता भेटेल".... तो माणूस बोलत रहायलं पण समर ने त्याच्या कडे लक्ष दिला नाही आणि तो गाडीत बसून घरी पोचला...
"साहेब राख झालं आहे सगळं, हवं तर जाऊन बघा"..... तो माणूस बोलत होता, पण ते पर्यत समर तिथून निघून गेला.....
घरी पोचताच श्रीधर ने समरला विचारलं.... "कशी आहे आता स्वरा, ठीक आहे ना".... श्रीधर
पण समर ने काय उत्तर दिलं नाही आणि तो जाऊ लागला तिथून, तेव्हाच श्रीधर त्याला ओरडला... "समर हे काय लावलं आहेस तू, कसला राग काढतोय माझ्यावर, हे कसं वागतोय तू माझ्यासोबत"....
"राग... राग, बाबा राग तर तुम्ही काढताय, बाबा एकदा एकदा मला सांगा तुम्हाला असा एक दिवस आठवतं का की तुम्ही माझ्यासबत बसून प्रेमाने बोलले, बोलणं काय बाबा तुम्ही तर माझ्या लग्नाला सुद्धा आले नाही, का तर तुमचा वाडा सुटत नव्हता ना, बाबा किती तरी वस्तू तुम्ही माझ्याकडून लपवून ठेवलं आहे, अस काय आहे जे तुम्ही लपवताय, तुम्हाला माहीत आहे का गावात लोक काय बोलतायेत.... लोक गावात बोलतात की तुम्ही, श्रीधरराव देशमुख ने एक बाई आणि एक मुलीची हत्या केली आहे.... हत्या"..... श्रीधर
हत्या हा शब्द ऐकताच श्रीधर शांत झाला, त्याच्या कडे बोलायला आता काहीच नव्हतं, श्रीधर अगदी लाचार झाला होता.....
"काय झालं बाबा.... आता बोला,नाही केली तुम्ही हत्या, मग कोण आहे सुवर्ण, वाड्यात का तिची आत्मा फिरते, का तुम्ही रात्र रात्रभर बागेत बसून रहातात, का बाबा का....???? कोण आहे ती मुलगी माझी बहिण जीची तुम्ही हत्या केली, ती बाई कोण आहे माझी दुसरी आई".....
हे ऐकताच श्रीधर ने समरला जोरात चापट मारली.....
समर.... शांत झाला, पुढे काहीच बोलला नाही, श्रीधर पण शांत होऊन झोक्यावर बसला... समर बाहेर निघून गेला, बागेत बाकड्यावर जाऊन बसला....
संध्याकाळ झाली पण समर घरात गेला नाही, तेव्हाच समरला समोर गायत्री दिसली, समोर उठून गायत्रीच्या जवळ आला पण जसाच तो जवळ गेला गायत्री तिथून पळत सुटले, समर तिच्या मागे मागे धावत गेला..... गायत्री थेट गावाच्या बाहेर एका झोपडीच्या इथं येऊन थांबली.... समर पण तिथं येऊन थांबला आणि अचानक गायत्री गायब झाली
समोर एक तुटकी फुटकी झोपडी होती जळालेली, समर त्या झोपडीत गेला.... आत मध्ये काहीच नव्हतं सगळं जळून राख झालं होतं.... तेव्हाच समर ने हसण्याचा आवाज ऐकला, आवाज झोपडियाच्या मागून येत होता, समर पटकन तिथं गेला......
मागे जाऊन बघितलं तर तिथं तो माणूस होता, जो समरला मंदिराचा इथं भेटला होता, तो इथं पण बसून चिलम पीत होता, समर ने त्याला बघून पण त्यावर दुर्लक्ष केलं....
"मीच आणलं तुला इथं, राख झाला आहे सगळं राख मध्ये काय शोधतोय..... काहीच भेटणार नाही तुला इथं".....
मग आणलं का मला इथं......
"कारण की प्रत्येक वस्तूचा अंत असतो, ह्या श्रापचा अंत तुझ्या हथो होणार आणि जर अस नाही झालं तर तुझी बायको तू तुझा होणारं बाळ कोणाचं वाचणार नाही, तुमच्या वंशचं नामोनिशान रहाणार नाही"....
"जर मी तुझ्यावर विश्वास केला तरी तुझा काय संबंध आहे ह्या श्राप सोबत"..... समर
"आपण सगळे कूट न कूट एका उद्देश्य साठी जन्मतो, माझं उद्देश्य हेच आहे की त्या अत्रुप्त आत्माला मुक्ती मिळावी"....
"अच्छा.... अस चिलम पिऊन तू मुक्ती देणार आहेस आत्माला, का तू देव आहेस"..... समर
"देव नाही पण त्याच्या भक्त"....
"अस भक्त जो नशेत काहीही बडबडतोय"….. समर
समरला वाटला की तो एक नशेडी आहे जो नशेत काहीही बडबड करतोय आणि तो तिथून निघाला, तेव्हाच मागून तो माणूस बोलला.....
"जातोय तर लवकर जा, नाहीतर रावसाहेब".….???
पण समर ने काय ऐकलं नाही आणि समर परत घरी आला... समर घराच्या जवळ आला तेव्हाच त्याला गोळीबाराचा आवाज आला, समर धावत वाड्यात गेला....
बघतोय तर श्रीधर झोक्यावर पडला होता, गणुकाका एकाबाजूला थांबले होते आणि झोक्यावरून थेंब थेंब करून रक्त खाली जमिनीवर पडत होतं, समर हे ड्रिष्य बघताच खाली बसला... श्रीधर ने गोळी मारून स्वतःचाच जीव घेतला....
हवेच्या जोरात झोका मात्र अजूनही हलत होता......
------------------------------------------------------------ To Be Continued --------------------------------------------------------------