"हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलतोय उगाच"..... श्रीधर अगदी रागात बोलला
"बाबा मग तुम्ही मला का अमेरिकेत पटवून दिलं इतके वर्ष का मला तुम्ही स्वतः कडून लांब ठेवलं".... समर
"समर आज काय झालं आहे तुला तू अशे प्रश्न का विचारतोय मला".....??? श्रीधर
श्रीधर रागत तिथुन उठून निघुन गेला, खरं तर त्याला समर च्या ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावस वाटत नव्हतं म्हणून तो तसा रागात तिथून निघून गेला....
श्रीधर विचार करत होता की नेमकं काय करावं... "आज नाही तर उदया समर ला त्याच्या प्रशनाचा उतार दयावे लागेल, कधी पर्यंत मी अस रागावून त्याला नकारत जाणार".... समर स्वतः सोबत बोलत होता
श्रीधर हा विचार करतच होता तेव्हाच त्याला ती मुलगी दिसली समोर, त्या मुलीला बघताच श्रीधरच्या अंगाला सहारे फुटले, त्याच्या कपाळावर घाम फुटला... ती मुलगी हळू हळू चालत श्रीधरच्या जवळ आली
"बाबा.... काय झालं, दादाला कसं सांगायचं हेच विचार करतायन".... म्हणत ती मुलगी हसायला लागली
"गायत्री बाळा जे काय झालं त्याच्या मागे चूक समरची नव्हती, माझी चूक होती तू मला मारून ताक घे माझा जीव घे,पण समर आणि त्याच्या बायकोला मुक्त कर ह्या श्राप मधून"...... श्रीधर
"का राव स्वता वर आली तर लगेच आता पाय पडायला लागले, तेव्हा ही दया माया कुठे गेली होती जेव्हा तू माझा आणि माझ्या मुलीचा जीव घेतलास"..... सुवर्णा
"सुवर्णा बघ जे काय केलं तें मी केलं.... सगळं माझं हट्ट होता, त्यात समर ची चूक नाही आहे".….. श्रीधर
"आहे चूक ह्यात चूक त्याची पण आहे.... मी तुमचा वंश पुढे जाऊ देणार नाही राव मुली वंश पुढे घेऊन जाऊन शकत नाही हेच म्हणाला होतास ना, ही विरासत तू एक मुलीचा हातात सोडू शकत नाही हेच म्हणाला होतास ना, ज्या वंश साठी तू हे सगळं केलं आहेस त्या वंशला मी पुढे वाढू देणार नाही, ह्यात तू तुझी बायको आणि तुझा मुलगा तुम्ही तिघे ह्या पाप चे भागीदार आहात, जसा तू ताडपतोय शांतता साठी तसा तुझा मुलगा पण तडपून तडपून मारणार हे मात्र लक्षात ठेव"..... सुवर्णा अगदी रागात बोलली
श्रीधरला त्याची चूक कळली होती पण आता खूप उशीर झालं होतं, गेल्या २० वर्षा पासून श्रीधर रोज पशच्याताप च्या अग्नी मध्ये जळत होता.....
सकाळ झाली, समर ऑफिसला जाण्यासाठी निघत होता तेव्हाच त्याने स्वराचा आवाज ऐकला....
समर ने जास्त काय हालचाल केली नाही आणि हळूच बाथरूमचा दार सरकवून लपून पाहू लागला.... समर ने पाहिलं की स्वरा एकटीच आरश्यात बघून बोलत होती, थोडी विचित्रच वागत होती ती...
"स्वरा"... समर जोरात ओरडला
"हा... समर बोलना काय झालं".... स्वरा
"कोणसाबत बोलते तू"..... समर
"काय कुठे, का काय झालं असं का विचारतोय, मी कुठे कोणासोबत बोलते"..... स्वरा
समरने जेव्हा स्वरा कडे लक्ष देऊन बघितलं, त्याला तिच्यात बदल जाणवलं पण तो काय बोलला नाही आणि दार लावून तो ऑफिस साठी निघून गेला.....
गाडी चालवताना सुद्धा समर च्या डोक्यात तेच सगळं फिरत होत, तेव्हाच त्याला डॉक्टर बदल आठवलं, समर ने गाडी फिरवली आणि तिथं डॉक्टर कडे गेला..... डॉक्टर विनोद गोरे, विनोद श्रीधरचा लाहापणीचा मित्र होता, समर लगेच विनोद च्या घरी गेला....
विनोद घराच्या बागेत बसला होता.... समर तिथं गेला
"काका ओळखलं का"..... ??? समर
विनोद ने समरला बघितलं पण तो त्याला ओळखु शकला नाही....
"सॉरी मी नाही ओळखलं".... विनोद
"काका मी समर, समर देशमुख'.... समर
"देशमुख अरे, श्रीधरचा मुलगा".... विनोद
"Yess बरोबर"....
"ये ये बस, उभा का आहेस".... विनोद
समर येऊन बसला विनोद सोबत....
"अरे कधी आलास अमेरिका वरून, ते सोड आधी सांग कसा आहेस".... विनोद
"काका मी मस्त एकदम मजेत".... समर
"खूप वर्षा नंतर आला, आला ते ठीक आहे पण श्रीधर ने तुला परवानगी कशी दिली यायची"... विनोद हसत हसत म्हणाला
समर पण हसायला लागला, पण मग त्याने हिंमत करून डायरेक्ट विचारलं विनोदला....
"काका थोडं महत्वाचं बोलायचं होतं".... समर
"हा बोलना.. काय बोलायचं आहे"....विनोद
"काका बाबा आणि तुम्ही लहानपणापासून एकत्र आहेत,खूप जिवलग मित्र म्हणून, काका अस काही आहे का जे बाबा माझ्या कडून लपवत आहे... किवा म्हणजे".....समर
हे ऐकताच विनोद समर कडे चक्क नजरेने पाहू लागला...
"बाळा मी समजू शकतो, तुला इथं यायची आणि हे विचारायची गरज का पडली, पण एक मित्र असून पण अस बरच काय आहे जे त्यांनी माझ्याकडून सुद्धा लपवून ठेवलं आहे"....विनोद
"ज्या दिवशी तुझ्या आईचं मृत्यू झाला होता, तेव्हा मीच आलो होतो घरी बघायला.... तुझ्या आईच मृत्यू पण एक रहस्य आहे अजूनही माझ्यासाठी".... विनोद
"काका रहस्य म्हणजे".....??? समर
"मला चांगलं आठवतं त्या दिवशी जेव्हा मी आलो होतो, वहिनीची मृत्यू फक्त कानाचे परडे फाटले त्या मुळे झाली होती पण मला टी गोस्ट काय पचन नाही झाली.... घरात एका रूम मध्ये आवाज होऊन पण असा किती मोठा आवाज होईल की एकाद्या व्यक्तीचे कानाचे परदे फाटून जातील".... विनोद
हे ऐकून समर ने जे ड्रिष्य बघितलं होत त्याला आता ते सगळं आठवायला लागलं....
"मला त्याबदल पण काय कळलं नाही, ना मला श्रीधर ने काय सांगितलं, वहिनी गेल्यानंतर पासून श्रीधर खूप शांत रहायला लागला, काय माहीत का पण स्वतःला त्याने जस वाड्यासोबत बांधून घेतलं, वाडा सोडून कधी कुठे गेला नाही तो".…... विनोद
"वाहिनी गेल्यानंतर मी श्रीधरला खूप समजवलं... की इथं राहण्यात काय अर्थ नाहीये पण श्रीधर ने ऐकलं नाही, बाळा मी एक डॉक्टर आहे, असं अंधविश्वास भरलेली वस्तू तुला सांगू की नको कळत नाहीये मला पण"..... विनोद
"पण काय काका".... समर
"लोकांचं असं म्हणणं आहे की.... वाड्यात आत्म फिरतेय, काय नाव ते हां सुवरणा, बरोबर सुवर्णा.... बाळा वाड्यात खरच काय तरी विचित्र आहे मी स्वतः ते अनुभवलं आहे कित्येक वेळा जेव्हा मी श्रीधर ला भेटायला गेलोय".... विनोद
"काका ही सुवर्णा कोण आहे".... समर
"तुला माहीत नसेल तेव्हा तू छोटा होतास खूप, सुवर्णा वाड्यात काम करायची आधी गणुकाका च्या जागेवर".... विनोद
"पण काका त्यांची आत्मा वाड्यात का फिरते"..... समर
"ते तर मला माहित नाही पण जेव्हा वहिनी पहिल्यांदा गरोदर होते तेव्हा मी सुवर्णाला पहिल्यादा पाहिलं होतं, त्या नंतर मी ६ वर्षा साठी लंडनला निघून गेलो आणि जेव्हा आलो त्याच्या बस काही दिवसा नंतर वहिनी... आणि मग हे सगळं ऐकायला भेटलं वाड्या बदल लोकांकडून"...... विनोद
"काका एक मिनटं पहिल्यांदा गरोदर म्हणजे"..... समर
"म्हणजे की त्यांचा गर्भपात झाला त्यावेळी आणि मग नंतर खूप नवस वगैरे केले तेव्हा जाऊन कुठे तुझा जन्म झाला".... विनोद
"बाबांनी कधी सांगितलं नाही मला"... समर
"खरं तर तुझासाठी तुझा बाबांनी खूप नवस मानले, किती उपवास वगैरे भरपूर काय"..... विनोद
समर विनोद सोबत बसून गप्पा मारत होता, समरला विनोद कडून खूप काय कळलं होतं आणि आता त्याच्या कडे प्रशनांची एक मोठी माळ तयार होती....
समर विनोद सोबत बोलून घरी आला, त्याचा मनात खूप काय चालू होतं, बरेच प्रश्न निर्माण झाले होते त्याचा मनात, सुवर्णा ला घेऊन, त्याच्या आईच्या पहिल्या गर्भपात ला घेऊन..... समर घरी पोचला, संध्याकाळ झाली होती
"आज लवकर आलास बाळा".... श्रीधर
"हो बाबा".....
समर येऊन बसला, गणुकाका ने त्याला पाणी आणून दिलं.....
"स्वरा कुठे आहे, दिसली नाही आलोय तेव्हापासून"..... समर
"सुनबाई आत मध्ये आहेत झोपले आहेत, त्यांना जरा बरं वाटत नाहीये सकाळपासून"..... गणुकाका
"का काय झालं".... समर पटकन बेडरूम मध्ये गेला
"स्वरा काय झालं तुला".... समर
"समर आलास तू"... स्वरा
"हो... पण तुला काय झालं, सकाळी तर ठीक होतीस" ... समर
"काय माहीत समर सकाळपासून अशक्तपणा वाटतंय"..... स्वरा
"काय नाय ठीक होऊन जाईल, चल डॉक्टर कडे जाऊया".... समर
"नको समर थोडासा अशक्तपणा आहे फक्त ठीक होऊन जाईल"..... स्वरा
रात्र झाली, सगळे झोपले होते.... समर बसून पुस्तक वाचत होता आणि वाचता वाचता तिथंच झोपला, थोड्या वेळ नंतर समरची झोप मोड झाली त्याने उठून पाहिलं तर स्वरा बेडवर नव्हती.....
समर ने बाथरूम मध्ये बघितलं स्वरा तिथं पण नव्हती,समर बाहेर आला आणि स्वराला शोधुलागला, सगळी कडे बघितलं पण स्वरा कुठेच नव्हती....
"समर काय झालं".… श्रीधर
"बाबा स्वरा कुठे गेली माहीत नाय, कधीचा शोधतोय मी तिला"....समर
"असेल बाळा इतःच कुठे तरी असेल".... श्रीधर
समर, श्रीधर आणि गणुकाका तिघे मिळून स्वराला शोधत होते पण स्वरा कुठेच भेटली नाही.... तेव्हाच वरच्या माळ्यावरून हसण्याचा आवाज आला....
हसण्याचा आवाज ऐकून तिघपण शांत झाले.... समरला भीती वाटायला लागली, तेच श्रीधरला खात्री झाली की आता काय तरी अस घटणार आहे त्याची त्याने कलपना सुद्धा केली नव्हती, श्रीधर मनातल्यामनात देवाला प्रार्थना करत होता.....
समर पटकन वरती गेला, हसण्याचा आवाज नेमकं त्याच खोलीतून येत होता जिथं मालिनी मेली होती.... हळू हळू हसण्याचा आवाज वाढत चालला होता, वाड्यात शांतता असल्या मुळे हसण्याचा आवाज गुंजत होता.....
समर त्या रूम जावल गेला पण त्याने जे बघितलं ते बघून तो शॉक झाला, दार बाहेरून बंद होता आणि टाळा लागलेला होता, नेमकं स्वरा आत गेली कशी....
आवाज आतूनच येत होता, तितक्यात वरती श्रीधर आला, श्रीधर ने टाळा खोलला आणि समर पटकन आत गेला.... आत जाऊन बगतोय तर स्वरा आतमध्ये नव्हती, पण आवाज मात्र अजूनही गुंजत होता....
समर बाहेर आला, स्वराचा काहीच पत्ता लागत नव्हता नेमकी गेली कुठे ती, समर कावरा बावरा झाला होता, सगळी कडे स्वरा स्वरा ओरडत होता.... हसण्याचा आवाज अख्या वाड्यात गुंजत होता, आता काय नीट कळत नव्हतं की नेमकं आवाज येतोय तरी कुटून.….
तेव्हाच बाहेरून गणुकाकाचा आवाज आला, श्रीधर आणि समर धावत बाहेर गेले.....
"काका काय झालं"..... समर
"बाळा ते बघ सुनबाई".... गणुकाका
स्वरा जंगलात चालत जात होती, इथं समर तिला जोरजोरात हाक मारत होता, पण ती काय थांबली नाही....
समर तिच्या मागे धावत गेला तिला थांबवण्यासाठी, रात्रीचा वेळ होता सगळी कडे गुप्त अंधार होता, आकाशात जणू चंद्र ही लपला होता, श्रीधर आणि गणू काका तिथं थांबून बघत होते, समर स्वराच्या मागे धावत गेला.... आणि बघता बघताच समर आणि स्वरा अंधारात कुठे गायब झाले श्रीधर ला काही कळलंच नाही....
------------------------------------------------------ To Be Continued ---------------------------------------------------------------------