Niyati - 33 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 33

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 33













भाग 33


इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे पुसत उजव्या हाताने कुर्ता खेचत होती.... आणि शेरू.... रूमच्या आतल्या दिशेने... शेपूट हलवत गुरगुर करत खेचत होता....



तो काही मायराचा कुर्ता सोडायला तयार नव्हता...
आता रडता रडता किंचित चिडून मायरा पूर्वीपेक्षा जोर लावून कूर्ता खेचू लागली....

तेवढ्यात मायराला लीला यांचा आवाज ऐकू आला....
"राहु दे शेरू सोड तीचा कुर्ता... बाबाराव यांची मुलगी आहे ती... अक्कड भारी आहे अंगात.... ती कशी येईन बाबा आपल्या आईकडे...???"




असे बोलून त्या तयारी करू लागल्या पुन्हा.. तेव्हा मायराच्या लक्षात आले लीला काय म्हणाल्या...???




तसे न राहून मग मायरा खोलीत आतल्या दिशेने जाऊ लागली तर शेरुनी आपोआपच तोंडातला तिचा कुर्ता सोडला.




मायरा रडत रडत लीला यांना बिलगली...
लीला यांनी सुद्धा तिला जवळ घेऊन पाठीवरून कुरवाळले.
कितीही म्हटलं तरी रक्ताचं नातं होतं दोघींचं ...
जीव झुरत होता एकमेकींचा एकमेकींसाठी....
.......



मायलेकी दोघी पण बैठकीकडे गेल्या.....
स्त्रियांसाठी निवडणुकीनंतर कोणते कार्यक्रम राबविणार आहेत...?? त्यात त्यांचा कोणता रोल असणार आहे... यासंबंधी सर्व चर्चा करण्यात आल्या.... पूर्ण चर्चा होत असताना... लीला मात्र चेहऱ्यावर तटस्थ भाव ठेवून बसलेल्या होत्या पण त्यांना आतून धडकी भरलेली होती. की कूणी मायरा बद्दल तर विचारणार नाही...???





पण बाबारावांचा धाक एवढा होता गावात.... की कोणीच त्यांच्या परिवाराबद्दल.... कोणतेही प्रश्न उठवत नव्हते... कारण सर्वांना माहीत होतं.... जो प्रश्न उठतो त्यांची काय गत होते....???





आत्ताच इतक्यात गावात सुंदर बद्दलही कुजबुज सुरू होती..... सर्वांना माहिती होते की सुंदर ने काय आव्हान केले होते बाबाराव यांना...??? आणि नंतर लगेच दोन-चार दिवसांनी सुंदर गायब झालेला आहे हेही त्यांना समजलं होतं... जरी कुणी उघड उघड बोलत नसेल तरी सर्वांना कल्पना होती.... त्यामुळे सर्व त्या गावाला जातच नव्हते.... आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड कोण मारून घेईल...????





आज मायराला कोणत्याही हालत मध्ये बाबाराव यांना लग्नाबद्दल काय करायचे विचारायचे होते...???
कारण दुपारी कूणी नव्हते तेव्हा...
मोहितचा कॉल आलेला तेव्हा त्याने सविस्तर सांगितले की त्याने त्याच्या आई आणि वडिलांशी चर्चा केलेली आहे.
आणि त्यांच्या मताबद्दलही मोहितने तिला कळवले होते.




संध्याकाळ झाली. मायरा बंगल्याच्या  बाल्कनीत उभी होती ..... तिला आज फार उदास वाटत होते.

का कुणास ठाऊक 
आज उदास उदास वाटतंय....
काहीतरी राहून 
निसटून गेल्यागंत वाटतंय.....
आज पुन्हा आठवणी मध्ये जाऊन
तुला भेटावसं भेटावसं वाटतंय....


मनात अशा कवितेच्या ओळी येत होत्या.
तांबूस गोळा जाऊन आता चंद्र वर येऊ लागला होता....
रात्रीचा अंधार आता वर चढू लागला होता...
वातावरणात मंद थंड थंड कूंद वारा वाहू लागला....
तेवढ्यात.... एका गडी माणसाने मेणबत्ती आणून दिली....

तिने ती पेटवली आणि लटकत्या स्टॅन्ड मध्ये ठेवली.

                



मेणबत्ती लावल्याबरोबर कुठून तरी दहा ते बारा काजवे इकडून तिकडे उडू लागले.... आणि तिच्या उदासल्या मनाला पुन्हा नवी उभारी मिळाली....




आनंदी होऊन तिने एक काजवा हळूच आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीला पॅक करून पकडला...
आणि त्याला जवळ घेऊन हळूच खोलून बघू लागली..

तशीच तिथे मागे सरकत एका बाजूला हळूच भिंतीला टेकली....
दोन्ही हात समोर घेऊन हळूच पॅक ओंजळी दोन्ही हाताची पून्हा खोलली.






जिथे भिंतीजवळ उभी होती तिथे थोडा आडोसा असल्यामुळे अंधार होता... ओंजळीतला काजवा हळूहळू इकडे तिकडे घडू लागला.... तसे तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले....,

तशीच तिथे सिमेंटचे बसण्यायोग्य बांधलेले कठळे होते त्यावर तेथेच भिंतीला टेकून बसून थांबून राहिली.......
तसाच तिथे डोळा लागला....




तिला आपल्या माथ्यावर ओठ टेकवल्याचा आभास झाला..... मी आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत तू चिंता करू नकोस... जणू तो आभास सांगू लागला..... तिला ते स्वप्न गोड वाटू लागले... अशीच तिथे ती कितीतरी वेळ बसून झोपलेली होती....

रात्री जवळपास दहा-साडेदहाच्या दरम्यान बाबाराव यांची कार बंगल्यात परतली.

खूप उशीर झाल्यामुळे मग मायराने तो विषय न घेता शांत झोपणे योग्य समजले....
ती झोपलेली पण तिला हृदयात एक हुरहुर दाटून घेत होती....

........




सकाळ झाली...
बाबाराव यांना लीला म्हणाल्या....
"अहो ...तुम्ही प्रयत्न करून बघा ना...!!.. मायराला परावृत्त करा त्या गोष्टीपासून....!!"


बाबाराव.....
"लीला सांगितलं ना...!!! नशिबाचे भोग आहेत...!!!
जे आपल्या प्राक्तनांत लिहिलेले आहे... त्यातून आपल्याला जावेच लागते...
तूही प्रयत्न केला ...मीही प्रयत्न केला.... झालंय का काही...???"




लीला....
"आहो....पण....."





बाबाराव....
"एकदा सांगितलं ना...!!! आता पुन्हा पुन्हा तोच विषय नको...!!"






त्यांनी असं म्हटल्यानंतर त्या तिथून तोऱ्यात उठून बाहेर गेल्या.....
त्यांच्याकडे बघून बाबाराव यांनी सूस्कारा सोडला.
आधीच त्यांना सुंदर अटकेतून सुटला आहे हे कळले होते. त्यासाठीच काल ते बाहेर गेले होते...





आता दोन दिवसांवर निवडणुका आल्या होत्या....
त्यात पुन्हा दोन दिवसांनी रिझल्ट लागेल त्यावेळी आपली मायरा आपल्याजवळ राहणार नाही ...तिथे दिल्लीला जाईल.... म्हणून त्यांचा जीव आतून कातर झाला होता.


त्यांना हेही माहीत होते की मायरा त्यांचीच मुलगी आहे स्वभाव तिचा तंतोतंत त्यांच्यासारखाच आहे. जिद्दी आहे. जे म्हणते ती शेवटपर्यंत त्यावर टिकून राहते... आता तिने जिद्दच केलेली आहे जणू की मोहित तिला आयुष्यात हवा आणि त्याच्यासाठी ते कष्ट सुद्धा करेल... तर हे होणारच हे काळा दगडावरची रेष होती.
त्यांनाही एक मानव म्हणून मोहित आवडत होता.... पण एक जावई म्हणून त्याला संबोधण्यासाठी त्यांचं मन धजावत नव्हतं..
शिक्षण ...स्वभाव ....त्याचे देखणेपण सर्व सर्व आवडत होतं...




नियतीच म्हणावं लागेल.... मायराच्या नशिबाची चक्र
मोहित जवळ येऊनच थांबत होते..

........




इकडे नानाजी शेलार यांच्या वाड्याच्या आसपास एरियात राजकारण शिजत असले तरी त्या वाड्यात थंड ...शांत वातावरण होते... उत्साहच नव्हता जणू निवडणुकीचा.... पण एक मात्र खरं ...काहीतरी वाड्यात खदखदंत होते.





नानाजींचे मन पेटून उठले होते. वाड्यामध्ये सर्वांना चांगलाच धक्का बसला होता.. एक धक्का सुंदर न परत येण्याचा आणि दुसरा धक्का त्याची सोयरीक तुटल्याचा.

एक वेळ बाबाराव यांची पोरगी मिळाली नाही तरी काही बिघडलं नसतं.. पण हा अपमान...??
हा अपमान सहन करणे नानाजींना सहज जमण्यासारखे नव्हते.
कारण गावातली चर्चा .....गावातली कुजबूज.... त्यांच्यापर्यंत पोहोचली होती.... मोहित सोबत  मायराचे लग्न... यासाठी बाबाराव यांनी संमती दिली आहे... एकाच गावात त्यांचं स्थळ नाकारून एका गरीब घरी आपल्या पोरीला देत आहेत नाकावर टिच्चून.....
म्हणजे सुंदरच्या पापाची जाणीव करून देता येत का आम्हाला...???..
एवढी आग भडकली होती नानाजींच्या मनात की आता ती काहीतरी केल्याशिवाय शांत होऊ शकणार नव्हती.





.......





आजच निवडणूक झाली... मायराला शांतही वाटत होते आणि हुरहूर ही वाटत होती... जसा जसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागला तशी तशी तिची रात्रीची झोप ऊडू लागली होती...

खरं पाहता बंगल्यामध्ये फक्त तिलाच तसे वाटत नव्हते तर बाबाराव आणि लीला यांची सुद्धा हीच अवस्था होती.





तिकडे मोहित कडे पण काही वेगळे नव्हते...
तेथे तर मोहित झोपल्यानंतरही कवडू आणि पार्वती दोघेही त्याच्या उशाशी बसून कधी त्याला कुरवाळत होते तर कधी एकटक पाहत होते पण झोप म्हणजे डोळ्याला येत नव्हती....


कालच बाबाराव यांनी रामच्या हाताने मोहितला बोलवून घेतले होते आणि मायरासमोरंच त्याला सांगितले...





बाबाराव....
"तसं बघता ..कन्यादान आम्ही सालंकृत केले असते.... पण आता तशी माझी इच्छा नाही. लग्नखर्च जर तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ पण लग्नाला मी आणि लीला दोघेही येणार नाही... कन्यादानचा तर मग प्रश्नच येत नाही..."





बाबाराव बोलता बोलता दोन मिनिट थांबले... कारण त्यांना बोलणे जड झाले होते.. त्यांची जीभ उचलत नव्हती पुढचे शब्द बोलण्यासाठी... आवाज त्यांचा कातर झाला असता आणि तो मायराला समजला असता....
तसं त्यांना होऊ द्यायचं नव्हतं...





दोन मिनिट थांबल्यानंतर त्यांनी मायराला स्वतःजवळ बोलावले.... तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या तळहातावर आपली मूठ खोलली... तर एक मंगळसूत्र होते..
मंगळसूत्र ठेवून त्यांनी  तिची मूठ आपल्या हातांनीच बंद केली.




बाबाराव.....
"हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीपासून इच्छा होती.... आणि तिची इच्छा मी पूर्ण करू इच्छितो... जेव्हा तुम्ही लग्न तिकडे कराल तेव्हा कोणत्याही पद्धतीने करा पण हे मंगळसूत्र मोहितच्या हाताने घाल. तिच्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील."


असे म्हणून ते मायराच्या डोक्यावरून केसांवरून कुरवाळंत उठले आणि बेडरूम मध्ये निघून गेले..

मायराच्या तोंडून एकही शब्द निघाले नाही. निव्वळ डोळ्यांतून टप टप अश्रू पडत राहिले.

.... तसे मग मोहित... त्यालाही....


🌹🌹🌹🌹🌹