Village Hunting in Marathi Adventure Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | गावपारध

Featured Books
  • उजाले की ओर –संस्मरण

    मनुष्य का स्वभाव है कि वह सोचता बहुत है। सोचना गलत नहीं है ल...

  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

Categories
Share

गावपारध

              गाव पारध

       

      

कोकणातल्या  काही गावांमध्ये सराई सुरू झाल्यानंतर दसरा ते थोरलीदिवाळी  या सम्याला गावदेवाचा कौल प्रसाद घेवूनसगळ्या वाड्यांमधून घरटी एक माणूस भाले, हात कुऱ्हाडी , दांडे नी ज्याच्याकडे बंदूकअसेल तो बंदूक घेवून सामुहिकपणे शिकारीला बाहेर पडतात. मंडळी एकाबाजूने रान काढीत अख्खासडा पिंजून काढतात.शिकारीत  मिळालेले ससे,जवादे, भेकर, साळिंदर,डुक्कर देवाला मानवून झाल्यावर त्याच्या वाटण्याकरून घेतात. यालागाव पारध म्हणतात. पावसापूर्वी शेतजमिनींचीभाजावळ करतात. त्यासाठी सड्यामाळावरची गवतं कापतात नी कवळं तोडून  म्हणजे - झाळी तोडून पाल्यासकट डहाळ्यांचे भारेबांधून  ते शेत जमिनी भाजण्यासाठी नेतात. याकामांचा आरंभ करण्यापूर्वी रान काढून गाव पारध करतात. एकदा रान काढलं की जंगली श्वापदं,सरपटणारी जनावरं स्थलांतर करतात नी सड्यामाळावर एकट्या दुकट्याने वावरायला तो भाग निर्धोक होतो. गावात मुख्य देवस्थान असेल  त्याला कौल लावून देवाची परवानग़ी घेतल्या नंतरचगाव पारध करतात. त्यामुळे  पारधीत  काहीना काही शिकार  हुकमी  मिळतेच.

     प्रत्येक वेळच्या गाव पारधीचा अनुभव  नी थरार वेगळा असतो. गावपारधींचे असे काही शेलकेकिस्से गावा गावानी आख्यायिका बनून राहिलेले आहेत. तुरंबव ची गावपारध थोरल्या दिवाळीनंतर व्हायची. त्यावर्षी गावपारधीचा मोका साधून जीवा मालुसऱ्याच्या पोराचा-सदाचा काटाकाढायचा बेत झिमणवाडकरानी योजलेला होता. त्याचं कारणही तसंच होतं. सदा मालुसऱ्यानेबाबा झिमणाची  पोरगी वासंती काढून नेवून तिच्याशीलग्न करून झिमणवाडकरांचं  नाक कापलं होतं.  पण पोरगा तालुक्याला शाळेत मास्तर म्हणून नोकरीतअसल्यामुळे झिमणाना राजरोसपणे काही करता आलं नव्हतं. ते स्वत:ला मराठे म्हणवीत. त्यांचीपोर धनगराने राजरोसपणे काढून नेली हे मोठं शल्यखुपत राहिलेलं होतं. सदाची बंदूक होती त्यामुळे तो  हटकून गावपारधीत  यायचा हे नक्की होतं. गावतले चार- पाच बर्कनदाररानकाढ्यांच्या वेगवेगळ्या जथ्यांबरोबर विभागून देत असत. यावेळी सदा झिमणवाडकरांच्याजथ्यासोबत येईल  अशी मोर्चे बांधणी केलेली होती.

     पारधीचा दिवस उजाडला. सकाळीच माणसं चावडीवर

जमाझाली. पाच जथ्याना एक - दोन बर्कनदार देवून त्यांचा रान काढायचा मार्ग जुन्या जाणत्यानीसालाबाद प्रमाणे  मुक्रर करून दिला. जथे आपापल्याभागाकडे मार्गस्थ झाले. झिमणवाडकरी सवतकड्याच्या बाजूने रान काढीत चिंचाडीचा टापू वेंघूनमग नमसवाडकरांच्या जथ्याला मिळायचे होते. सदा मालुसऱ्याला जथ्याच्या मध्यभागी ठेवूनत्याच्या भोवारी बाकीचे रानकाढे वाटेत  येणाऱ्याझाळी-बेटात दगड धोंडे मारून रान काढीत चाललेले होते. दुपारी अकराच्या दरम्याने जथासवत कड्याजवळ पोचला. कड्याच्या मावळतीला  माडभरउंच घळण होती. कोळीसऱ्यातल्या दर्याच्या वेळेकडून घळणीकडे जायचा मार्ग होता . पण  घळणीखालीबोरीची गच्च  जाळी होती.त्या भागाकडे जाण्याची  फारशी वहिवाट नव्हती. म्हणून झिमणानी तो भाग योजलेलाहोता. सवत कड्याच्या माथ्याशी पोचल्यावर सग़ळ्या बापयानी  मालुसऱ्याला नी त्याच्या सोबत्याला  कणसं झोडतात तसा बेदम  मार देवून ते थंड झाल्यावरत्यांची मढी बंदूकीसह घळणीत भिरकावून दिली. मग मागच्या बाजुला असलेल्या उभ्या दरडीला ढोलीत  साळिंदराची बसल होती होती तिथे  सगळे जमले. दगडू झिमण हातात पेटता पलिता घेवून ढोलीत शिरला. तो पलिता पुढे करून पुढे पुढेसरकायला लागला. दहा मिनिटानी वरच्या अंगाला असलेल्या बिळातून दोन मोठी साळिंदरं बाहेरपडली.  ती समोरच्या झाळीत शिरण्याआधी चपळाईकरून पाळतीवर असणारी माणसं भाले, दांडे सरसावीततूटून पडली. साळिंदरं मारल्यावर सगळ्यानी भाकरी खाल्ली नी पूर्व नियोजीत ठिकाणी न जाता  संध्याकाळी सूर्य मावळायच्या टायमाला तीन टोळ्यातीन वेगवेगळ्या वाटानी गावाकडे निघाल्या. सगळ्यात प्रथम पोचलेल्या लोकानी  बाकीचे साथीदार दिसले का? अशीजमलेल्या लोकांकडे चौकशी सुरु  केली.  रानकाढ्यांच्याइतर दोन जथ्यांमध्येही अशी चुकामुक झालेली होती. चुकलेली माणसं हळू हळू  जमायला लागली . थोड्या वेळाने झिमणांच्या दुसऱ्याटोळीतले बापये आले तेंव्हा चांगलं काळवं पडलेलं होतं.

   न आलेल्या माणसाना शोधायलालोक बत्त्या घेवून बाहेर पडले. त्यांच्या सोबत झिमणवाडीतले चौघेजण होते. त्यानी पूर्वीठरलेल्या ठिकाणाच्या रोख़ाने जायला सुरुवात केली. तासाभरात कुकारे ऐकायला आले. शोधकरीत्या दिशेने पुढे गेल्यावर माणसं उमगली पण मालुसऱ्यांचा सदा नी त्याचा सोबती नव्हता.तीन दिशानी पांगलेल्या टोळ्यांमधल्या कोणालाच काय सांगता येईना. मग जाणत्यानी ते मागून पुढून येतील, कदाचित चुकामुक झाल्यामुळेते परस्पर धनगर वाड्यात गेले असतील असे म्हणत शिकारीचे वाटे घातले. माणसं वाटे घेवूनघरोघर गेली. दुसरे दिवशी सकाळीच धनगरांचे बापये चावडीशी जमले. पोलिसपाटलाने वाडीवारवर्दी देवून गाव जमवला.धनगरानी झिमणांवर वहीम असल्याची भाषा सुरू करताच लोकं हाणामारीलाउठली. जाणत्यानी मध्यस्ती करीत धनगराना गप्प केले. त्यानी अशी तक्रार केली तर सगळागाव अडचणीत येईल म्हणून दमदाटी करीत धनगर वाडा पेटवायची उघड उघड धमकी देवून गावाशीवैर घेण्याआधी विचार करा, तसेच  सदाने शिकारीलानेलेली बंदूक बिगर परवाना होती,  ही गोष्ट  फोडावी लागेल असे बजावल्यावर मात्र जाणते धनगर हाती पायी पडायला लागले.त्यानी पडीची भाषालावली. मग देवाचा कौल घ्यायचा विचार पुढे आला.

     झिलू गुरवाने कौल लावला. पोर वाट चुकून रानभेरीझालेले आहेत ते संध्याकाळ पर्यंत येतील असे सांगितले. या बाबतीत धनगरानी पोलिसात तक्रारकरणे सोडाच पण दोन दिवस वर्दीही  द्यायची नाही,असा गावाचा निर्णय झाला. सदाकडे असलेली बंदूक चोरटी- बिगर परवाना  होती. तो नोकरीला  लागला म्हणून बाकीचे धनगर खार खावूनच होते. त्यानीसदाच्या माणसाना गावाविरुद्ध गेलात तर आम्हीही वाळीत टाकू, बिगर परवाना हत्याराची माहितीफोडू अशी धमकी दिल्यावर त्याना गप्प राहणे भाग पडले. दोन दिवसानी पोलिस पाटलाने तालुक्यालावर्दी दिली. पोलिस आले. गावाने संगनमत करून मालुसऱ्यांचे पोरगे गावाच्या जथ्यातून पारधीलागेल्याचा तपशिल बदलला. उलटसुलट  दिलेल्याजबान्यांमधून नेमकी माहिती मिळाली नाही, पोलिसही चक्रावले.  कोणाची काहीच तक्रार नसल्यामुळे प्रकरणाचा बभ्रान करता  पोलिसानी केस फाईल केली. चार दिवसानी  सवतकड्याच्या परिसरात गिधाडं  घिरट्या घालताना दिसल्यावर घरच्या लोकानी त्या भागातशोध घेतला.कोळिसऱ्याच्या वेळे कडून घळणीकडे जायच्या मार्गातबोरीची अशी गच्च जाळी होती की  पुढे जाणं दुस्तर होतं. त्याना जमातीकडूनहीसहाय्य न मिळाल्याने शोध घ्यायला मनुष्यळकमी पडलं नी सत्य कधीचउघडकीला आलं नाही.  

  आंगल्यात वर्षातून दोनदा थोरल्या दिवाळीपूर्वी आणिमाघात गाव देवाची जत्रा होण्या आधी गाव पारधीची प्रथा होती. पहिल्या पारधीचा कौल प्रसादझाला. नेमक्या पारधीच्या दिवशी बाबा कोतेकराचा सागवानाच्या सिलिपाटाचा  ट्रक भरायचीवर्दी आली. त्याचा चिव्याच्या काठ्या, खुटवळ आणि सिलिपाटाचा मोठा धंदा होता.  त्याचे तोडकाम आणि ट्रक भरून द्यायच्या कामाची कायमची जबाबदारी गुरव वाडकरांवर असायची.विशेषत: सागवान भरायचा असेल त्यावेळी तर  फॉरेस्टवाल्यांचेचेकिंग चुकवून ट्रक काढायचा असल्यामुळे  वर्दी  आल्यावर हयगय करून जमत नसे. गुरवाना पारधीला  मुकायला लागणार हे स्पष्ट होते.  कौल प्रसाद लावणारा  धाकु  गुरवअगदी रंजीस आला. तो नुसता चुटपुटत होता. देवाचे कौल प्रसाद घेताना  तो राजरोसपणे खंत व्यक्त करी. “वर्षासून येकदा सागवतीचो घास मिळणार...... देवान आमच्या तोंडातलो घास काडून घितलान.....” पारधीचा दिवसउजाडला. सकाळीच  देवाला नारळ मानवतानाही गाऱ्हाणं  घातल्यावर धाकूने  गुरवांच्या तोंडचा घास  देवाने काढून घेतला अशी हळहळ  व्यक्त केली. गाववाले पारधीला  गेले  नी  गुरववाडकरी  बापये  गावठणात कोतेकराच्या पडणात सिलिपाट भरायला रवानाझाले.

 कोतेकराचे पडण घाटीच्या पायथ्याशी एकवशी  होते.  ट्रकभरायला मदतीला गावठणातले नर नी लाख़णांचेचार बापये   बोलावलेले होते. ट्रक  निम्मा भरून झाला नी धाकुला झाड्याला लागली. मांगराबाहेरचेटमरेल घेवून तो जरा  लांब अंतरावर जावून  झाड्याला बसला. त्याचा पायरव लागल्यावर तो बसलाहोता तिथून जवळच असलेल्या  बावखोलातून डुकराच्याकेकाटण्याचा आवाज आला. विधी उरकल्यावर  धाकू उठला नी बावखोलाच्या काठावर जावून  निरखून बघायला लागला.  बावखोलात चार ओझ्याची डुकराची मादी नी  पाच   कुत्र्याएवढीपिल्लं  पडलेली  होती. बहुतेक तीन चार दिवस उलटून गेलेले असावेतकारण डुकरीणीने बावखोलाचा पुरा तळ खणती घातल्यासारखा उकरून ठेवलेला होता. गाव पारधीतलावाटा हुकला तरी देवानेअख्ख्या वाडीला  मजबूत सागोती  मिळेल अशी सोय केलेली होती.

  ट्रक भरणे सुरू होते तिथे गेल्यावर धाकु पाय धूवूनआला . कामगार चहा प्यायला थांबलेले होते. धाकूने बरोबरच्या चौघाना  बाजूला काढून बावखोलातमोठी डुकराची मादी नी पाच पिल्ले असल्याची वर्दी दिली. त्यांच्या सोबत असलेले  नर नीलाखणाचे बापये चुकून माकून बावखोलाकडे फिरकले असते नी त्याना डुकरांची मागाडी लागलीअसती तर  नर नी लाखण दोन वाड्यांमधले लोक जमातकरून आले असते नी त्यानी  शिकार बळकावली असती.कदाचित मेहेरबानी खातर  गुरवाना चार चार फोडीचे  वाटे देवून  भायरे केलेनी असते. म्हणून धाकुने  तिथून लांब असलेल्या थपांकडे ट्रक नेवून तिथला  सागवान भरायचा निर्णय सोबत्याना सांगितला. चहा पिताना,“बाकीचा भरवाण  मावळतच्या  डेपोहारी जावन्  करुया. जमात कमी आसता तवा हयचे जवळचे नग भरुक मिळती.”अशी मखलाशी करून त्या जागेपासून लांब जावून पुढची भरताड तिकडे केली. काम सुरु असताना  गुरवांच्या पोरानी टोळक्यातल्या सगळ्याना कानोकान खबर दिली.  दुपारी पटापट भाकरी खावून वेळ न काढता गुरव मंडळीकामाला वाकली. तेंव्हा नाऱ्या नर म्हणाला, “इतकी पिळवटासर गडबड कशाक  करताहास?” त्यावर  आंगलेवाडकरी पारध करून येतील तेव्हा सागवतीची  वाटणी करायची जोखीम गुरववाडकरांवर असते म्हणून लौकरट्रक भरून परत जायला हवे असे  पटणारे कारण सांगूनगुरवानी वेळ मारून नेली.

   चपळाई करून वेळेवारी  सागवान भरून गुरव मंडळी ट्रकात बसून निघून गेली.जरासे अंतर  काटल्यावर  ट्रक थांबवून गडी खाली उतरले नी कोतेकराच्या पडणाकडे निघाले. कोयते ,कुऱ्हाडी घेवून  दांडगे गडी बावखोलात उतरले. डुकरीण  नी  पाचहीपिल्ले मारून ती बाहेर काढून गुरवानी तिन्ही सांजे आधी  गाव गाठला.धाकू  सोबत दोन बापये घेवून देवळाकडे पारधीचे वाटे घालायलागेला. नी बाकीची मंडळी डुकरांची  शिकार घेवूनआडवाटेने वाडीत गेली. गाव पारधीत  दोन डुकरनी ससे मिळालेले होते. पारधीचे वाटे घालून फक्त मानाचा म्हणून एक वाटा म्हणून चार फोडीचावाटा  गुरवानी उचलला.  दुसऱ्याच दिवशी गुरवाना कोतेकराच्या पडणात डुकरांचीपारध मिळल्याची बातमी प्रसृत झाली. पारधीला न जाताही देवाने गुरवांच्या तोंडात सागवतीचाआयता घास  पाडला होता. कोतापुरच्या  आठवडी बाजारात धाकुला नाऱ्या नर भेटला. धाकुला बघताच पुढे येवून  तो  जळजळाटकरीत बोलला,“ तुमी गुरव मातं  खरे कपटी......दिवसाडी  वांगडान  काम करून तुमी आमका टाप  लावलास....... आमच्या गावात येवन्  आमका पत्त्या न लावता आमच्या तोंडातलो घास अल्लदकाडून न्हिलास..... तुमी  द्येवाचे  मानकरी गुरव, तुमका तरी ह्या सोबला नाय...... आमकानी लाखणांक याक याक पिल तरी द्येवचा हुतास.....” नाऱ्याचा चडफडाट आयकल्यावर धाकू  हसत म्हणाला,“आमका गाव पारध चुकली म्हनान द्येवानआमच्या तोंडात आयतो  सागवतीचो  घास घतलो....... तां आमचा नशिब...... तुमी मेल्यानोपापी......”

  मांगेलीतला नारायण गवसालातलाठी म्हणून  गावातबदली होऊन आला तेव्हाबेदखल कूळ नोदीचं काम जोराला आलेलं  होतं.  गवसाला पुऱ्या गावाची अंडी पिल्ली माहिती. त्यानेपैसे  खावून  गावातल्या मोठ्या जमिनदारांच्या मागे शुक्लकाष्टलावून दिले. दिगू बामण , भाऊ मराठे, दादा खोत हे गावतले वतनी जमिनदार  पुरते जेरीलाआले. त्यातही  दिगू बामणाचा  मळ्यात चार आणे हिस्सा. त्याला नारायण तलाठ्याचा  हिसका चांगलाच भोवला.  पहिली दोन प्रकरणे झाल्यावर त्याने नारायणाला  भेटून  लालूचदाखवली पण नारायणाचा 'आ' भलताच मोठा  होता.  बामण डूक धरून संधीची  वाट बघीत होता. त्याला दादा खोतही आतून सामिल होता.सहज बोलण्याच्या ओघात  तलाठ्याचा काटा काढायचीनामी युक्ती  दादा खोताने सुचवली. दिगूला तीशंभर टक्के पटली नी तो कामाला लागला.  मांगेलीतलल्या पळसमकर  वाडीतले जगू नीमोतीराम हे दोन गुंड मुंबईत सात रस्ता,लालबाग, शिवडी,परळ भागात सुपाऱ्या घेवून गुंडगिरीची  कामे करीत. त्यांच्याहाताखाली वाडीतले तीस चाळीस  लोक काम करीत.कोकणातून ‌- आडगावातून आलेली जानपद संस्कारातवाढलेली पोरं दारु, बाया यांचा फंद न करणारी, जगूवर पूर्ण भरवसा ठेवून नेकीने काम करीत.त्यावेळी  पळसमकर वाडीतले बहुसंख्य पोरगे कमाईलालागले. क्वचित काही प्रकरणात जगूच्या टोळीतले पोरगे अडकून तडीपार व्हायचे ते मांगेलीतपरत येत नी आपल्या घरातला एखादा पोरगा मुंबईत धाडीत.

    पळसमकर वाडीची गावात वट होती. वाडीतले तडीपार होवून आलेले बापये  मोठ्या फुशारकीने आपण मुंबई गाजवून आल्याचे सांगत.नारायण तलाठ्याने उकसावून घातलेली कुळं जमिनी बळकावायला लागल्यावर दादा खोत, दिगू बामणह्यानी पळसमकर वाडीतल्या  तडीपार होवून आलेल्याबापयाना हाताशी धरून थोडीफार दहशत बसवली. पण गावात  मुंबई सारखे  टोकाला जावून दहशत बसवणे  शक्य होत नसे. चार-दोनगरीब, घाबरट कुळवाडी पळसमकरांच्या धाकदपटशाला घाबरून बाजुला होत. काही वाड्यांमध्येभावकीचे साह्य मिळे ते लोक  मात्र दबत नसत.या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या तलाठ्याला कायमचा बाजूला करण्यासाठी दादाखोत नी  बामणाने गाव पारधीचा मोका साधायचा बेत योजला. गावाच्याकडेला साटेली, माईण पर्यंत जाणारी खाडी होती. पलिकडे  नवेदरा ला जाणारी  कायम  तरीची  होडी होती. सुकतीच्या वेळी जेमेतेम ढोपरभर पाणीअसले की चालत पलिकडे  जाता येई. पण माहितगारमाणसाशिवाय  उतरणाच्या  वाटेने जाणे बहुसंख्य लोक टाळीत. कारण त्या मार्गाततीन मोठ्या रुपणी होत्या. कोणी गैर माहितगार चुकून रुपणीत गेलाच तर बोल बोल म्हणताना  चिखलाच्या रांजणात  गडप होत असे नी मागाहून त्याचे प्रेतसुद्धा हाती लागत नसे.

गाव  पारधीच्या दिवशी दुपारी अकराच्या दरम्याने  तलाठ्याला गाठून भग्या पळसमकराने “तरीवर  बाऊ मुसलमान कुर्ल्यो घेवन्  इलोहा..... मी तकडेच जातय ” असे सांगितल्यावर नारायणतलाठीही  त्याच्यासोबत निघाला. गावातले  झाडून सग़ळे लोक  पारधीला गेल्यामुळे वाटेत कोणी  माणूस आढळले नाही. दुपारी जोरगतीची सुकती असल्यामुळेतरीवरही शुकशुकाट  होता.  भग्याचे साताठ साथीदार   बांधावर थांबलेले होते.  त्यातला एक जण लुंगी  गुठाळून  पाठमोरा बसलेला होता.  तलाठी  भग्याबरोबर बांधाजवळ  पोचला  नी  कायहोत आहे हे कळण्या आधीच  भग्याचे साथीदार पुढेआले नी  त्यानी तलाठ्याला आडवा पाडून त्याच्यातोंडात  कापडाचा बोळा कोंबला. त्याचे  हातपाय करचून बांधून  त्याची गठळी बांधून  त्याला रुपणीत भिरकावून दिला.  तलाठी   रुपणीतल्या चिखलात पडल्यावर पुढचे काम बिनबोभाट झाले.  दहा पंधरा मिनिटात   चिखलाच्या रांजणात रुपून  तलाठी नाबूत झाला. काम एवढे बेमालूम झाले की, संध्याकाळी  तलाठ्याच्या घरातली मंडळी शोध घ्यायला लागल्यावरतलाठी बेपत्ता झाल्याची  बातमी फुटली. पळसमकरानाया कामासाठीची मागितलेली   पाचशे रुपयाची  जबर  सुपारीबामण आणि  दादा खोत दोघानी मिळून दिली . गावोगावच्या  पारधीच्या भोवती अशा असंख्य लोक वदंता  जनलोकात रूढ झालेल्या आहेत. जुनी जाणती माणसं आधीझालेल्या पारधींचे किस्से रंगवून रंगवून सांगतात.

            

                      ※※※※※※※※