Long distance love in Marathi Love Stories by Monika Suryavanshi books and stories PDF | लांब असलेल प्रेम

Featured Books
  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

  • आई कैन सी यू - 51

    कहानी में अब तक हम ने देखा के रोवन लूसी को अस्पताल ले गया था...

Categories
Share

लांब असलेल प्रेम

चंद्र आणि चंद्रासारखा तो ,

जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....

चंद्र आणि चंद्रासारखा तो ,

रोज तर त्यानाच पाहते पण त्याना माहित नसल्यासारखे‌ .....

चंद्र आणि चंद्रासारखा तो ,

कधी पोर्णिमा सारखा शितल तर कधी कठोर अमावस्येसारखा. ....

चंद्र आणि चंद्रासारखा तो ,

माझे असुन माझे नसल्यासारखे. ...

चंद्र आणि चंद्रासारखा तो ,

एकमेकांत गुतलेले,एकमेकांत अडकलेले..

दोघे ही एकटेच

अगदी माझ्यासारखे .....!

 

 

 चंद्र कती छान दिसतो ना पण लांब असतो तस प्रेम छान असत पण ज्याच्यावर करतो तो लांब असतो.आणि दुर असणारे जसे सुंदर दिसतात तसे असतातच अस नाहि.

 

 मनात प्रश्न असतात पण विश्वास सुध्दा असतो.रोज आठवण येते पण भेटण होत नाही.लांब अतरावर राहुण पण प्रेम करण सोप नाही.

 

 

 लांब राहुण प्रेम करतात त्यानाच किंमत असते .काळजी ,भिती , भेटण्याच्या ओढ त्यानाच माहित.प्रेमात माणुस खुप काही शिकतो.आणि जरी वाइट असला आपला माणुस तरी आपण सुधरवतो.पण त्याच्यापासुन लाब नाही जात .कारण खुप असली सोडुन द्याची तरी प्रेमासाठी सोबत राहतो.

 

 

 पण जर ते प्रेम आपल झालच नाही तर .... प्रेमात माणसाला होणारा त्रास त्यालाच माहित असतो. दुसरे म्हणतील विसर पण ते खुप अवघड असत. आठवणी,घालवलेले क्षण सगळ काही विसरण अवघड असत.

 

 

 लांब राहुण प्रेम करायच आणि ते भेटत पण नाही हा विचारच किती खतरणाक आहे.आपल्या आवढत्या व्यक्ती ला लांब राहुण बघण एवढच नशीबात राहत.

 

ज्यावेळी काय कराव समजत नाही त्यावेळी देवावर सोडुन द्या.तो करेल ते चागलच असेल अस मनाला सांगतो.पण खरच मन एकत का? 

 

आपल्या चंद्राला किती चांदण्या बघत असतील हा विचार करत असतो.किती ही जपल तरी ती व्यक्ती दुर होतेच.आपण वाट बघतो चंद्र कधी दिसेल‌ तसच आपली व्यक्ती ची पण आपण वाट बघत असतो.वाट बघण चुकिच नाही पण योग्य व्यक्ती ची बघा...

 

एक व्यक्ती येते आपल्याला जगण शिकवते पण त्याच्या शिवाय कस जगाव हे नाही शिकवत.खरच प्रेम खुप सुंदर आहे पण ज्याला भेटत नाही त्याला होणारा त्रास.... 

 

खरच प्रेम भेटल्यावर माणुस आंनदी असतो का ?जेवढ आपण प्रयत्न करतो प्रेम भेटण्यासाठी नंतर वाटु नये उगच लग्न केल. हे ही महत्तावच आहे ना‌‌ ...

 

हे काहीचे विचार झाले पण प्रेमात माणुस यशस्वी पण होतो. काहीणा भेटत प्रेम सहज पण काहीणा खुप प्रयत्न करावे लागतात. आणि कोणाला भेटतच नाही.

 

पण आपण सुध्दा एकाच का व्यक्तीत अढकतो.पुढे चला स्वप्न‌ पुर्ण करा. तुम्ही सुध्दा नवीन आयुष्यवाट त.एकाच गोष्ठीत अडकुण राहु नका.काही गोष्ठी नशिबाच्या पण असतात.

 

जरी चंद्र आपल्याला रात्रिचा दिसत असला तरी सकाळचा दिसत नाही.आपण सुध्दा एका व्यक्ती वर तो पर्यत प्रेम करा जोपर्यत ती व्यक्ती आपली आहे हे दिसत असेल.दुसर्याची होणार असेल तर आपण सुध्दा प्रेम करण थांबवल पाहिजे.

 

आपल्यासाठी दुसरा चंद्र असेल अमावस्ये‌ नंतर येणारा चंद्र आपला असेल हा विचार करूण थाबाल पाहिजे. जस चंद्र आपल्या कला बदलतो तसा माणुस सुध्दा असतो.पहिल्यादा पोर्णिमा सारखा खुप प्रेम करेल आणि नंतर हळु हळु कमी होइल आणि नंतर पुर्ण च ती व्यक्ती आयुष्यातून झाइल. 

 

कोणावर एवढ ही प्रेम करु नका कि ती व्यक्ती गेल्यावर आयुष्य सपल अस वाटेल.आपल्या बाजुचे बदलणारे वातावरण काही गोष्ठी आपल्याला खुप काही शिकवत असतात पण आपण लक्ष देत नाही.

 

प्रेम जरी चांगल वाटत असेल ना तरी बघा त्याच पहिल अक्षर हे अपुर्ण च आहे.अशा खुप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकवतात पण आपल्याला समजत नाही 

 

आणि नंतर फक्त विचार करत बसतो...

 

किती जवळ असतो चंद्र चांदणीच्या .....पण चांदणी नशिबी असेल का चंद्राच्या...