श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! श्वेता आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना यातून बाहेर काढले .
श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! श्वेता आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना या प्रसंगाला सकारात्मक दृष्टीने पाहत त्याला समोर जाण्यासाठी तयार केले . त्यांच्या समजवण्याची पद्धत खरचं खुप चांगली होती . त्यांच्या म्हणण्यानुसार , आज बरेचसे जोडपे आई बाबा होण्यासाठी कोण कोणत्या थराला जातात याची कल्पना ही श्वेता अनुराग ला नाही ! आताच्या काळात मुलींना खूप नवीन नवीन आजार आणि मुलांना ही बरेचसे आजार उद्भवतात जे लग्नानंतर समजू लागतात आणि त्याच्या मुळेच त्यांना आई वडील होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात ! आणि खर तर हे दोघे स्वतःला भाग्यवान समजून ही गोष्ट जितक्या लवकरात लवकर स्वीकारणार तितकं च त्यांना त्यांच्या समोर असलेल्या नवीन मार्गावर यशस्वीरीत्या चालता येणार होत ! आणि त्यांच्या या म्हण्यानुसार श्वेता आणि अनुराग ही पूर्णपणे बदलून गेले होत ! त्यांनी स्वतःला पूर्णपणे सकारात्मक गोष्टींनी प्रोत्साहित केले होते .. ते दोघे ही आता एक आई बाबा बनून पुन्हा नवीन स्वप्न रंगवू लागले . इतकं च नाहीतर श्वेता च्या आईने तीच डोहाळ जेवण ही खुप आनंदाने आणि जोशाने साजरा केला . तिच्या आईचं अनुरागच्या आई वडिलांना खूप कौतुक वाटत असे ! त्यांना बघितल्यानंतर प्रत्येक आई अशी असावी अस त्यांना वाटायचं !
आणि खरंच त्यांनी श्वेता ला प्रत्येक गोष्टी मध्ये सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवलं होत ! तिला तिच्या डोहाळ जेवणानंतर माहेरी ही घेऊन आल्या होत्या . तिचे सगळे डोहाळे त्यांनी खूप उत्साहाने पुरवले ! तिला प्रत्येक वेळी काय हवय ? काय खावसं वाटतं? याची उत्साहाने काळजी घेतली . अनुराग ची आई ही कधीतरी तिला फोन करून काय खायचं असेल तर हक्काने सांगत जा असं ऐकवत असे ! श्वेता ही स्वतःला या सर्व प्रसंगातून आपण भाग्यवान असल्याचा समजावत असत! अशा प्रकारे तिचे नऊ महिने खूप उत्तम गेले . एकदा सकाळीच तिला अवस्थ वाटू लागले. आईला थोडी शंका आली कारण श्वेता चा आवाज घरामध्ये कुठेच ऐकू येत नव्हता . श्वेता चे वडिल ही विचारू लागले , "आज स्वारी कुठे गेली आहे ? काही आवाज नाही !" तितक्यात तिची आई ही म्हणाली , हो ! अहो ! मी सुद्धा , त्याचाच विचार करते ! ही तर उठून बसली होती, जेव्हा मी तिच्या बेडरूम मध्ये डोकावून बघितलं तेव्हा ! ' ( श्वेता च्या बेडरूम च्या दिशेने जात तिची आई बोलत होती ) श्वेता अंगावर घेऊन शांत पडली होती , तिची आई तिच्या जवळ जाऊन विचारू लागली ," काय होतय ? अशी झोपली का आहेस !" श्वेता हळू आवाजात म्हणाली ( ती थोडी कण्हत ही होती ) , ' काही नाही ! थोड अस्वस्थ वाटतंय! थोड घाबरल्यासारखं वाटतंय !"
तितक्यात तिची आई म्हणाली , चल उठ ! मी अनुराग ला बोलवते ! आपण डॉक्टर कडे जाऊया ! अनुराग ला तर परस्पर हॉस्पिटल मध्ये भेटण्यासाठी सांगितलं होत ! तिचे आई वडील ही तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले ! तिला थोड पोटामध्ये दुखल्यासारख जाणवू लागला होत! डॉक्टरांनी ही स्पेशल केस असल्यामुळे सर्वात प्रथम श्वेता ला चेकिंग साठी घेतल होत . चेकिंग झाल्यानंतर डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं , 'आपल्याला आताच तिची डिलेव्हरी करावं लागणार आहे आणि काही घाबरण्यासारख नाही कोणी ही काळजी करू नका ! बाळाचं डोकं खाली आलेलं आहे ! आणि वजन जास्त असल्यामुळे आपण तिचं सीझर च करणार आहोत !' हे सगळ ऐकल्यानंतर अनुराग समोर असलेल्या बाकड्यावर बसला ! श्वेता ची आई त्याला समजावत होती काही होणार नाही , ती आणि बाळ सुखरूप असणार ! अनुराग ने त्यांचा हात खूप घट्ट पकडला होता आणि त्याच्या डोळ्यातील काळजीचे अश्रू त्यांच्या हातावर पडत होते ! त्याचे आई वडील ही काही वेळातच तिथे पोहचले . दोन तास श्वेता आतमध्ये होती आणि सगळे बाहेर हात जोडून तर कोणी डोक्याला हात लावून तर कोणी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होते ! तितक्यात डॉक्टर बाहेर आले आणि आनंदाने म्हणाले ," अभिनंदन !!! मुलगी झाली ! आई आणि बाळ दोघे सुखरूप आहेत !!!"
हे ऐकून सर्व आनंदी झाले आणि एकमेकांची गळाभेट घेऊ लागले !!!
( आणि असा आर्याचा जन्म झाला ....)
continue...,,