Disclaimer-
सदर कथा पूर्णपणे स्वलिखित असून, कथेवर पूर्णपणे लेखकाचा हक्क आहे. तरी चुकूनही पुढील कथेची चोरी करण्याचा अथवा नक्कल किंवा प्रत काढून, ह्या कथेची ह्याच अँपवर किंवा दुसऱ्या कुठल्याही अँपवर प्रकाशित करू नये, जर असे आढळल्यास, आपण कारवाईस पात्र ठरेल...
पूर्ण कथा काल्पनिक असून, प्रत्येक पात्र, वस्तू, प्राणी, जागा, पूर्णपणे कल्पनिकरित्या घेतल्या गेलेले आहे. ह्या कथेतून कुणाच्याही भावना दुखविण्याचे ह्यामागचे हेतू मुळीच नाही.
कथा पूर्णपणे काल्पनिक असल्याने, कुणाला कथा आवडणार नाही, कुणाला ह्यामागचा तात्पर्य समजणार नाही किंवा कथेचा कोणता भाग समजणार नाही, जर असे असल्यास, कॅमेन्टमध्ये मला सुचवू शकता, पण पूर्ण कथा वाचून झाल्याशिवाय नाही. कुणाला माझी भाषा आवडणार नाही, कुणाला शुद्ध वाटणार नाही, तरी फक्त कथेचा मूळ विषयाकडे लक्ष द्यावे हीच विनंती, पुढे येणाऱ्या कथा, मागील कथेपेक्षा जास्त शुद्धतेत लिहिण्याचा नेहमी प्रयत्न राहील. माझी भाषा पूर्णतः शुद्ध नाहीच आहे, तरी मी प्रयत्न करणार, शुद्ध लिहिण्याचा.
पूर्ण कथा, स्वतःच्या इच्छेनुसार आणि वेळ देऊन वाचत आहात म्हणून, जरा खबरदारी घ्या, कदाचित कथा आवडणारही नाही. तेही तुम्ही कॅमेन्ट मध्ये सुचवू शकता, जर कथा काहीशी आवडली, तरी रेटिंग आणि कमेंट करून सांगू शकता. दुसऱ्या कथाही वाचू शकता...
जर पूर्ण कथा वाचून झाल्यावर, असे वाटत असेल की पूर्ण वेळ वाया गेलाय, तर मला माफ करा.., पण माझ्या पूर्ण कथा इमॅजिनेशन आणि विज्ञानावर आधारित असतात, खऱ्या आयुष्यावर किंवा पूर्णपणे प्रेमावर नाहीच. हीच खबरदारी घ्यावी,
धन्यवाद...
–---//------
ही कथा दोन भागांत विभागली गेली आहे, तरी सर्वांनी हा भाग वाचल्यानंतर दुसरा भाग नक्कीच वाचावा ही विनंती...
सुरुवात...
"एवढी दिवस झालीत, किती अजून पाठलाग करायचा ना? एवढं तिच्या मागे मागे फिरायला पन्नास-एक हजारांच पेट्रोल खर्च केलेल असावं, नक्कीच... पण खरंच त्याच दुःख नाहीच.., ना तिच्या मागे एवढा वेळ वाया घालवला ह्याच.. पण जर तिने नकार दिला तर नक्कीच आयुष्य वाया जाणार... खरंच...! एवढं का घाबरत आहे मी? ह्या आधी पण मी तिला प्रपोज केलेलं आहे, हो म्हणजे इंडिरेक्टली, पण कसं ही असो, तिला पण समजतं मला काय बोलायचं आहे ते! मी फ्रेंड विथ बेनिफिट नाही आहे तिचा... लग्न करायचं आहे तिच्याशी, तिला पण माहिती असायला हवं तिला माझ्यापेक्षा कुणीही चांगलं प्रेम करू शकत, ना तिला एवढं राणी सारख कुणी ठेऊ शकत. जाम फाटली आहे यार... एवढं सॅकरीफाईज देऊन नक्कीच फायदा होईल ना? नाही नाही, मला पोसिटीव्ह राहावं लागेल.. नक्कीच हो म्हणेल ती..."
नमन स्वतःला सावरत सावरत कोण्यातरी मुलीची वाट बघत बसला होता. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही, तर त्याची शाळेपासून ते कोलेजपर्यंतची एकमेव क्रश होती. घरी आता लग्नाची गोष्ट सुरू झाल्याने थकून हारून नमन ने ठरवलं की आता आरपार होऊनच जाऊ देत..! अस मनाला समजावून, तिच्या शाळेच्या बाहेर उभा होता, जिथे ती शिकवायला होती. तिचं नाव, 'शीतल काळे' शाळेपासूनच काय? तर जेव्हा ती कॉलेज मध्ये देखील तिने बी.एस. सी. मध्ये पदवीधर बनण्यासाठी प्रवेश घेतला, तिच्या मागे मागे त्याने पण बी.एस. सी केलेलं, एकाच क्लास मध्ये, तिने नंतर शिक्षिका बनण्याचा निर्णय घेतलेला, आणि नमनने एम. बी. ए करून बिजनेस मध्ये प्रवेश घेतला.
शाळा सुटली होती, सर्व मुलं जाऊन पंधरा मिनिटं झाली असतील, पण अजून शीतल आलेली न्हवती. कदाचित शिक्षकांना जरा जास्त वेळ थांबावं लागत असेल. ती जेवढा वेळ आत होती, आता येईल-नंतर येईल ह्या विचाराने अजून नमनची भीती वाढत चालली होती.
तो वेळ आलाच, ती बाहेर आली. तिच्यासोबत आणि एक शिक्षिका होती. पण आता वेळ न्हवती, सोबत कुणीही असो, बोलणं हे गरजेचं होती, कारण आता नाही, तर कधी नाही, हे त्याला कळून चुकलं होतं. मनात चाललेल्या भीतीची गच्ची पकडून, तो तिच्याकडे गेला. नमन आपल्या जवळ येतोय हे दिसताच, तिने नेहमीप्रमाणे त्याला इग्नोर केले. तिला वाटलं नेहमीप्रमाणे कट मारून, किंवा वेगात गाडी घेऊन जाईल, पण आश्चर्यच, त्याने चक्क स्वतःची गाडी तिच्या गाडीपुढे लागली. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसतच होते. पण तो पुढे येतोय तेही आपल्याशी बोलायला, हे बघून तर शीतल ला आता भीती वाटू लागली होती.
"नमन? काय झालं? काय हा प्रकार?' शीतल शांत आवाजात म्हणाली.
तिचा हा आवज ऐकून तो परत वितळला. त्याच्या मनात परत फुलपाखरू उडायला लागलेत. पण ह्यावेळी असं नाही होणार... स्वतःच्या मनावर तो ताबा ठेवणार आणि तिला मनातली गोष्ट सांगितल्याशिवाय नाही थांबणार...
"शीतल... मला काहीही नाही बोलायच आहे, फक्त सांगायचं आहे, तू खूप सुंदर आहेस... मला तू खूप आवडतेस, आय लव्ह यु शीतल... माझ्याशी लग्न करशील?" नमन ने मनातलं कसं बस बोलून टाकलं.
तिच्या सोबत असलेली मॅडम पण हे प्रपोजल ऐकून जराशी लाजतच शीतल कडे बघू लागली.
"नमन हे बोलायला एवढा वेळ लावलास? आणि हे होतं आजपर्यंत तुझ्या मनात? मी तर तुला माझा चांगला मित्र समजत होती. पण तू तुझ्या मनात असा माझ्याबद्दलचा असा विचार ठेवत असशील असं मला वाटलं न्हवत...!" शीतल म्हणाली.
"शिकल खरं सांगतोय, खरं खूप प्रेम करतो तुझ्यावर... तुला नाही दिसलं काय ग प्रेम माझ्या डोळ्यात?" नमन भरलेल्या डोळ्यांनी बोलत होता.
"नमन, खरंतर सॉरी! तुझं प्रेम खरं आहे माहिती आहे मला, पण मला तुझ्यावर आजपर्यंत प्रेम आलं नाही, खरं सांगते, नाहीतर एवढा वेळ तू माझ्या मागेपुढे करत होतास, आज होईल उद्या होईल, कधीतरी होईल, असंच वाटत होतं मला आणि मला छान वाटत होतं की कुणीतरी माझा पाठलाग करत होता. तू खूप चांगला आहेस नमन, पण काय करू मी, मी खोटं प्रेम पण नाही करू शकत ना? तुझ्यासोबत असं खोटपणा नाही दाखवू शकत, तुझी मला फसवेगिरी नाही करायची आहे, खरं सांगते. तू खूप चांगला आहेस, मी तुला कदाचित डीसर्व करत नाही, माझ्याहून पण चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात नक्कीच असेल, खरं सांगते... माझा पाठलाग सोड. प्लिज... " ती हात जोडून, आपली मोपिड बाजूला करून इथून निघून गेली.
हे काय होतं? स्वप्न तर नाही ना? खरंच हे घडलं? असं कसं? आणि का? हातातला गुलाब खाली पडला जमीनदोस्त बनला, खिश्यातली अंगठी जड व्हायला लागली. हे खरंच सत्य आहे? तिने सर्रास नकार दिला? वेदना काय असतात? एकतर्फी प्रेमाचं दुःख न मिळाल्यावर काय असतं? हे कळून चुकलं!
पाऊस पडत होता. केस पूर्ण कपाळाला चिकटली होती, शर्ट केव्हाच ओलं झालेल. खांदे पूर्ण खाली पडलेले. हाताच्या दोन बोटांनी अंगठी पकडलेली. ह्या क्षणी त्या वीस ग्राम अंगठीच वजन वीस किलो भासत होतं. एवढं काही केलं तिच्यासाठी... काय काय नाही केलं? एवढं कठीण असते प्रेम मिळवणं? की एवढं नशीब खराब आहे माझं प्रेमात पडणं? अंगठीच भार सहन होत न्हवतं...
एक भिक्षा मागून खाणारी महिलेच्या हाती लहानसं बाळ होत, ती पण भिजत होती पण तिच्या बाळाला पावसापासून वाचविण्याचा प्रयत्न करत होती. नमन तिच्या जवळ जाऊन शीतलसाठी आणलेली अंगठी त्या महिलेला देऊन टाकली. कदाचित त्या महिलेला कळलं असावं की ती नक्कीच सोन्याची अंगठी आहे, तिने पावसात पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला. नमन आपल्या घरी आला. त्याला पूर्ण त्याच आयुष्य विध्वंस झालेलं दिसत होतं. एवढी वर्ष तिच्या साठी झटनं आणि एका क्षणात ती अशी दूर जाणं... त्यापेक्षा ती कधी आयुष्यात भेटलीच नसती तर? पण कुठल्या तरी आयुष्यात नक्कीच ती माझी झाली असेल... किती स्वप्न रंगवले होते तिच्यासाठी... असा एक दिवस गेला नाही, जिथे तिची आठवण केली नसावी, जिथे तिचा विचार केला नसावा.. आता ह्यापुढे विचार करायचा की नाही? हाच प्रश्न पडून आहे त्याला.
काश हे आधीच तिला विचारल असतं तर एवढी दिवस व्यर्थ गेली नसती, ना मानसिक त्रास झाला नसता. पण आधी विचारलं असतं तर सहन करू शकलो असतो काय? जे आता सहन होत आहे? होत आहे सहन की मन स्तब्ध झालं आहे? काय आहे तिच्या शिवाय आयुष्यात आपल्या? तिच्या शिवाय आयुष्य तरी आहे?
नमनने जवळच असलेल्या वाइन शॉप मधून दारू आणली. बॉटलला कधी हात न लावणारा, लोकांना दारूचे नुकसान समजावून सांगणारा, चक्क आज बॉटल तोंडाला लावून घटघट आत ओतू लागला. बॉटल संपली, दुःख तसंच, भान गेले, यातना तश्याच. रात्रीचा दिवस कसा झाला? त्यालाही कळलं नाही, आता दिवस काय आणि रात्र काय? काय करायचं आहे?? रात्रीचा नशा उतरला, डोकं जड झालं, परत तिचा विचार जसा रोज येतो, पण आजचा हा पहिला दिवस ज्यात विचार नकोसा आहे. पण काय करणार? कसं विसरणार? परत वाइन शॉप मध्ये जाऊन पूर्ण बॉक्स घेऊन आला. फ्रीज मध्ये सर्व वस्तू बाजूला सारून, बॉटलला सजवून ठेवला. एक बॉटल बाहेर ठेऊन त्यात बर्फ टाकून परत प्यायला बसला. आयुष्य संथ झालं असं वाटत होतं. त्याच्या मित्रांना ही खबर मिळताच सर्व त्याला समजावून सांगू लागलेत. कुणालाही विश्वास बसत न्हवता की शीतल अशी वागेल. ह्याला नकार देण्याचे काहीही कारण न्हवते मुळात. एवढा चांगला मुलगा तिला खरंच कुठे मिळणार नाही, हेही तितकंच खरं.
नमन कुणाचही ऐकत न्हवता. जरा काय जेवण करायचा, बाकी दिवस फक्त दारू आणि झोपा काढायचा, परत उठून दारू पियायला बसायचा. त्याला आता सत्य आत्मसात करायची इच्छाच उरली न्हवती. मनाशी केलेला निश्चय आणि प्रॉमिस की, "लग्न करणार तर हिच्याशीच नाहीतर नाहीच करणार" ह्यातून पुढचा रस्ता आता न्हवताच दिसत. त्याला दारूची नशा उतरल्यावर फक्त तिचाच चेहरा, तिच्यासाठी झटलेले क्षण, तिच्यासोबत बघितलेलं स्वप्न, फक्त हेच दिसायचे. रडून रडूनही किती रडणार? मूव्ह ऑन पण कसं करणार?
वाटलं महिन्याभरात तिला विसरून जाईल. पण ते प्रेमच काय, जो विसरता येई? एकवीस दिवसात कुणाला विसरणं पुरेसं असत असं म्हणतात, पण तीन चार महिने होऊन सुद्धा, ती मनात, स्वप्नात आणि विचारांत जशीच्या तशी. तिची आठवण यायला नको म्हणून, राहायला दुसरी जागा बघितली, पण मनात तिची जागा तीच होती, ती कशी बदलणार? दुसरी मुलगी बघायला गेलं तर तिच्यासोबत खोटं प्रेम कसं करणार? तिला विसरणं काहीच सोप्प न्हवतं त्याच्यासाठी. मित्रच काय? घरच्यांनी देखील खूप प्रयत्न केला त्याला समजविण्याचा, पण समजून सर्व ठीक व्हायच असत तर, नमन एवढा समजूतदार कुणी न्हवता.
दिवस सरू लागलेत, पण दुर्दशा अशी की ती विसरू लागली न्हवती. एकटं रूम मध्ये राहिलं तर तिची आठवण येणार आणि फक्त आणि फक्त दारू पित राहणार, म्हणून तो रोंज वेगवेगळ्या मित्रांकडे जात होता. तिथे तो आनंदी न्हवता राहत, पण मनाला व्यस्त आहो हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. तेही त्यांच्या घरी स्थिर बसून, शून्यात हरवून!
रोज रोज नवीन मित्रांच्या घरी जाऊन, त्याच्या मित्रांची यादी संपली, म्हणून तो परत परत त्याच मित्रांच्या घरी जाऊ लागला. हेही त्याला कंटाळवाणं होऊन गेलेलं. रात्री डिप्रेशन येऊ नये म्हणून मित्रांसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्यासोबत राहणं, हे रोजचं झालं होतं. मित्रांकडे परत परत जाणे कित्येकदा होऊन गेल होतं. एक बरं होतं, त्याचा स्वतःचा व्यवसाय असल्याने, आणि विश्वासांच्या माणसांवर तो व्यवसाय थोपवल्याने, व्यवसायात कुठली बाधा येत न्हवती. त्याला अचानक आठवलं की, त्याचा एक लहानपणीचा मित्र आहे, जो जरा दूरच्या शहरात वास्तव्यास आहे. तो चौथा वर्गापर्यंत त्याचा जिवलग मित्र होता, पण त्याच्या वडिलांच्या बदली नंतर तो त्या नवीन शहरात शिफ्ट झाला, त्यानंतर ह्या दोघांचं जास्त बोलणं झालं नाही. त्याने त्याचा पत्ता काढला आणि त्याच्या घरी गेला. घरी गेला तर तो घरी न्हवता. त्याला एक नोकरी होती, पण जॉब झाल्यानंतर तो आपल्या अड्ड्यावर बसून राहत होता. त्याच्या घरच्यांकडून तो अड्डा माहिती करून घेतला आणि नमन त्या अड्ड्याकडे गेला.
"मयंक... ओळखलास? मी नमन...!" नमन कसाबसा स्वतःला आतुर दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
"अरे नमन, किती दिवसानंतर... ये बस...!" मयंक जरा बसून बोलला, पण नमनला बघून त्याला जास्त आनंद झाला नाही, असं त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं.
"का रे मयंक? मला भेटून आनंद नाही झाला तुला?" नमन बोलला.
"नाही रे असं, आनंद मानायला काय उरल आहे माझ्याकडे? काही नाही... !" मयंक म्हणाला.
"का रे काय झालं? आणि हा कसला तुझा अड्डा? कसली ही एवढी मशीन, कसले एवढे वायर्स, हा उबट वास, काय आहे हे सर्व? काय बनवतोय तू?" नमन सर्वत्र बघून त्याच्याशी बोलत होता.
"काय सांगू यार नमन... एवढ्या सर्वांचा काही फायदा नाही झाला..." मयंक म्हणाला.
"बापरे काय झालं असं? कसल्या मिशन वर आहेस तू? असं वाटत आहे, माझं दुःख सांगायला आलेलो मी, तुझं दुःख माझ्यापेक्षा मोठं वाटत आहे. " नमन म्हणाला.
"काय रे तुझं कसलं दुःख? आधी सांग बघू... नंतर माझ्यावर येऊ..." मयंक म्हणाला.
"काय सांगू यार? माझी एक क्रश होती रे, तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो... कदाचित सहाव्या वर्गापासून, म्हणजे बाल मनापासून तिच्यावर प्रेम करत आलोय, जेव्हा प्रेम काय असते हे देखील समजत न्हवत, तेव्हापासून. तिच्यासोबत लग्नाची स्वप्न बघू लागलो. तिचा आणि फक्त तिचा पाठलाग केला, फक्त तिच्यासाठी झटलो, तिच्यासाठी जीवाचे रान केलेत, पण प्रपोज केल्यावर कळलं की, ती माझ्यावर प्रेम करतच नाही. तिने सर्रास नाही म्हटलं. तिच्याशिवाय हे जीवन नकोसं वाटत आहे रे मला. आता माझी मैत्रीण फक्त दारू बनली आहे, हेच माझं जरा काय ते दुःख कमी करते, करते की विसरायला लावते काय ठाऊक? पण ह्याव्यतिरिक्त काहीही उरल नाही आहे आयुष्यात. म्हणून मी जरा गम कमी करायला मित्रांकडे फिरत असतो, आज तुझी पाळी..." नमन त्याला तिच्यासोबतच्या प्रत्येक गोष्टी सांगू लागला.
"अरे ठीक आहे ना, ती नाही करत प्रेम तर तू बळजबरी नाही ना करू शकत नमन? तुझं प्रेम अफाट आहे, पण तिचं नको काय असायला?" मयंक म्हणाला.
"आता तू मला लेक्चर नको देऊस.. सर्वांचा देऊन झालं आहे हे... पण एवढं सोप्प नाहीये रे माझ्यासाठी हे सर्व... खरं सांगतोय. मी नाही रे विचार करू शकत तिच्या शिवाय... काश माझं लग्न झालं असतं तिच्याशी, काश तिने होकार दिला असता.. काश...!" नमन रडत त्याला बोलत होता.
"नमन ह्या आयुष्यात ती तुझी नसेल, पण दुसऱ्या आयुष्यात नक्कीच ती तुझी असणार..." मयंक त्याला सावरत म्हणाला.
"माझा नाही रे विश्वास पुनर्जन्मावर, जे काही आहे ते इथेच आहे असं मला वाटते, पण इथेच ती नाही तर काय ज्या जन्माचा फायदा?" नमन म्हणाला.
"मी पुनर्जन्माच्या गोष्टी नाही सांगत आहे, तर मी बहुविश्वाची म्हणजेच मल्टीव्हर्सच्या दुनियेची गोष्ट करत आहे. तिथे तुझं लग्न तिच्याशी झालेलं असेल, त्यात तू सुखी असशील..." मयंक म्हणाला.
"मल्टिव्हर्स म्हणजे तेच ना? की वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून असे असंख्य ब्रह्मांड असणार, आपल्यारखे असे असंख्य वेगवेगळ्या ब्रह्मांडात वेगवेगळे पृथ्वी देखील असणार..." नमन बोलला.
"हा त्या वेगवेगळ्या पृथ्वीवर आपण घेतलेले वेगवेगळे निर्णयाचे रूपांतर सत्यात झाले असणार. इथे तुला तिने नकार दिलाय, तिथल्या ब्रह्मांडात, तिथल्या पृथ्वीत तुला होकार दिला असेल, तिथे तुझं लग्न देखील झालं असेल...." मयंक म्हणलं.
"सोड यार... हे सर्व वैज्ञानिक कथेत ऐकायला बरं वाटते, सत्यात कुठं असते?" नमन वैतागून म्हणाला.
"सत्यातच बनवायचा तर मी प्रयत्न करत होतो, जे मी त्यात असफल ठरलो.... ही जे एवढी मोठी मशीन आहे ना? ह्याद्वारे मी असा दरवाजा (वर्म होल) बनविण्याचा प्रयत्न करत होतो, ज्याद्वारे आपण 'त्या' पृथ्वीवर पोचू शकलो असतो, आपला 'तो' निर्णय बघू शकलो असतो... पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन बदलली असती, किती मोठा महान वैज्ञानिक म्हणून माझ नाव पुढे आलं असतं.. काश हे सगळं सफल झाल असतं... काश...!" असं बोलून बोलून, रागाच्या भरात हातात असलेल्या हातोडीने स्वतःच बनवलेली मशीन फोडू लागला.
"मयंक शांत हो... बस इथे... का रे असफल ठरलो म्हणतोय? पुन्हा प्रयत्न कर, मदत घे कुणाचीतरी बनवायला..." नमन त्याला सावरत म्हणला.
"सगळं करून झालं रे... सगळं... फॉर्म्युला सर्व बरोबर आहे, पण ह्या मशिणीला चालवायला खूप जास्त अफाट ऊर्जेची गरज आहे... ही मशीन बनवायला सुरुवात करून मला पंधरा वर्षे झालीत आणि आज मला कळलं की ही कधी चालूच शकणार नाही... खूप तुरट्या निघत आहेत, ह्या तुरट्या सोडवायला परत शंभरेक वर्ष जातील रे..." मयंक हताश होऊन बोलला.
"मयंक... तूच म्हणालास ना आता... ह्या आपल्या विश्वात तुझी ही मशीन असफल ठरली आहे, पण दुसऱ्या विश्वात ती नक्कीच सफल झाली असेल... त्या दुसरा विश्वातील मयंक साठी आपण थोडं का असेना आनंदी होऊयात... त्याला अपरिशिएशन करूयात..." असा बोलत नमन त्या मशिणीला बरकाईके बघू लागला.
काहीच क्षणात नमनला चक्कर आली. त्याच्या डोळ्यासमोर अंधार आलेला, पण अंधार पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा होता.
तो खाली बेशुद्ध पडला होता. त्याच्या कानावर हाक येत होती. नमन... नमन...
पाण्याचे शिदोडे मारल्यावर तो शुद्धीत आला.
"काय रे नमन? काय झालं? तुला चक्कर आलेली..."
"माहिती नाही रे मयंक.... अचानक माझे डोळे फिरले... आणि भान हरपून गेलो..." नमन म्हणाला.
"मयंक? ते सोड... नमन.. मी आज जाम आनंदी आहे.. वाह... मी जिंकलो नमन... मी जिंकलो...! आज माझ्या पंधरा वर्षाच्या मेहनतीचे मला फळ मिळाले, केलेल्या मेहनतीचे चीज झाले नमन... मी विजयी ठरलो नमन... माझी मशीन सफल ठरली आणि आता आपण कुठल्याही ब्रह्मांडात एका झटक्यात जाऊ शकतो, कोणत्याही ब्रह्मांडात आपण प्रवेश घेऊ शकतो.नम्या... " आनंदात त्याने नमनला आलिंगन दिले.
"मयंक... तू तर आताच म्हणाला होतास की तू तू असफल ठरला आहेस... मग हे काय आता?" नमन विचारात पडला.
"एक मिनिट... मला मयंक मयंक म्हणून का हाक मारतोय? आनंदाच्या भरात माझं नाव देखील विसरलास की काय? मी रवी.. रवी... आलास शुद्धीवर... आठवलं माझं नाव?" रवी म्हणाला.
"काय? रवी?? मयंक... ही काय मस्करी चालली आहे?" नमन म्हणाला.
"अरे नम्या... काय बडबडतोय? मी रवी... आपण बालपणीपासूनचे मित्र... रोज एकत्र राहतो, एकत्र वावरतो, एकच चड्डी दोघेही घालतो... बायकोच्या त्रासपायी तुझी आठवण गेली की काय? की वेड लागलंय तुला? अरे वेड तर मला लागायला पाहिजे... मी ह्या विश्वातील, सर्वात महान वैज्ञानिक बनलोय नमन... हे तुझ्यामुळे शक्य झाले आहे... तू रोज मला सहानुभूती द्यायचा रोज मला विश्वास द्यायचा की हे नक्की शक्य होईल, आणि आज झालंच... तुझं खूप मोठं श्रेय आहे नमन...! थांकू नमन, कुणीही नसताना माझ्यासोबत तू नेहमी राहिल्याबद्दल...!" पाणावलेल्या डोळ्यांनी रवी बोलत होता.
"एक मिनिट... काय? तुझं नाव रवी आहे? आणि हे काय बोलतोय? बायकोचा त्रास? माझं अजून लग्न झालं नाही आणि बायको कुठून आली? हे काय चाललंय?" नमनच आता डोकं फिरायला लागलं होत.
"अरे नमन काय झालंय तुला? असा का वेड्यासारखा वागतोय? बायकोने तुझं जगणं मुश्किल केलं आहे, तिला तरी कसा काय विसरू शकतो?" रवी म्हणाला.
"बायको?" डोक्यावर हात ठेवून नमन म्हणाला.
"तुला बरं नाही काय? घरी सोडून देऊ तुला?" रवी म्हणाला.
"घर? मला घर आहे स्वतःच?" नमन खूप जास्त कन्फ्युज होत म्हणाला.
"चल बाबा तू इथून... तुझी बायकोच तुला नीट करेल.
रवी नमनला तिथून घेऊन गेला, थेट नमनच्या घरी.
"काय आहे रवी भाऊजी? कशाला ह्या आगाऊ माणसाला माझ्यापुढे घेऊन येता?" नमनची बायको रवी कडे बघत बोलली.
नमनचे डोळे एवढे मोठे झालेले. त्याला पुढचे दृश्य बघून डोळ्यांवर विश्वासच बसत न्हवता. त्याच्यापुढे चक्क शीतल होती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्यावर सिंदूर होतं.
"वहिनी... हा जरा वेड्यासारखा वागतोय... तुम्हीच ह्याला ठीक करू शकता..." रवी म्हणाला.
"ही... ही माझी बायको? बायको आहे?" नमनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"अरे असा का वागतोय तू? अरे चंचल... चंचल काळे... तुझी बायको... काय झालंय तुला?" रवी डोक्यावर हात ठेवून म्हणाला.
"काय? चंचल? हीचं नाव शीतल आहे.. आणि काळे हिच्या माहेरच नाव असेल ना? लग्नानंतर तिला माझं नाव जुडल असेल तर शीतल पांढरे झालं असतं, कारण पांढरे माझं आडनाव आहे! मग परत शीतल काळे कसं काय? आणि शीतल ची चंचल? हा काय प्रकार?" नमन खूप जास्त कन्फ्युज झाला होता.
"अरे वेड्या... पांढरे हिच्या माहेरच आडनाव आहे, काळे तुझं आडनाव... आणि शीतल शीतल काय करतोय? चंचल नाव आहे... सोड तू, बहिणी.. तुम्हीच बघा ह्या वेड्याला.. मला वेड लावेल नाहीतर हा...!" रवी असा बोलून तिथून निघून गेला.
त्याचा हात ओढत..."तू ये आत मध्ये... तुला दाखवते.. शीतल शीतल.. तुझी ना दारूच काढते आज... " रागात रागात चंचल म्हणाली.
"शीतल... सॉरी.. चंचल.. एक मिनिट थाम्ब.. मी दारू प्यायलो नाही आहे, हा बघ वास(स्वास तिच्या चेहरयावर सोडत) चंचल... हे सर्व कन्यूजिंग होत चालला आहे... मयंक म्हणतोय तो मयंक नाही रवी आहे, तू म्हणतीये तू शीतल नाही तर चंचल आहेस.. खूप विचित्र होत चाललं आहे ग हे सगळं.. मला विश्वास बसत नाही आहे की तू मला नकार दिला आणि आज अचानक तू माझी बायको आहेस.... खरं एवढ्या दिवसानंतर तुला बघून तुझ्यावरच प्रेम ना मी विसरू शकलो, ना मी तुला विसरू शकलो. असं वाटत आहे की मी ह्या जगातला नाहीये... " नमन चंचलला मिठी मारत म्हणाला.
"आलिंगन? नमन... काय झालं ए? एवढ्या वर्षात आजपर्यंत कधी मिठी मारली नाहीस... मला आठवतंय, शेवट वेळेस मिठी केव्हा मारली आहेस ते, आपलं लग्न होणार होतं... तुला अतोनात आनंद झालेला, तू मला अशीच घट्ट मिठी मारली.. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर आज मिठी मारत आहेस नमन..." तिनेही घट्ट मिठी मारून पूर्णपणे राग शांत होऊन बोलून गेली.
"चंचल... काहीतरी नक्कीच घोळ झाला आहे अगं... मी तुझा नवरा नाही आहे अगं..." नमन म्हणाला.
"काय?" अशी म्हणत ती नमन पासून मिठी सोडून दूर जाते.
"मग हे काय होतं? कोण आहात मग तुम्ही? तुम्ही सेम नमन सारखे का दिसत आहात? मला तुम्ही इथे आल्यापासूनच जरा वेगळे भासू लागले होते, तुमचे हेअर्स उजव्या बाजूने वळलेले आहेत, पण नमन तर डाव्या बाजूने ठेवतो नेहमी, आज दारू पिऊन पण नाही आलात, असं पहिल्यांदा झालं, ड्रेसिंग सेन्स पण खूप वेगळा आहे तुमचा. जुडवा भाऊ तर नाहीत ना माझ्या नवऱ्याचे?"
"काहीतरी नक्कीच घोळ झालाय... तुम्ही मयंक... सॉरी रवी ला कॉल करून इथे बोलावता काय?" नमन म्हणाला...
_______________________________________________
"नमन... काय झालंय तुला? बेशुद्ध का पडला होतास? तब्येत चांगली नाही काय तुझी? आणि तू दारू पिऊन आहेस? मगाशी तर वाटलं न्हवतं की तू पिला असशील... असो... उठ तू..." मयंक म्हणाला.
"रवी... तुझे हार्दिक अभिनंदन भावा... शेवटी तुझी मशीन सकसेस झाली... तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं... मी तुझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त आनंदी आहे... खरं सांगतोय भावा... मला माहिती तू ह्याचं क्रेडिट मला देणार नक्कीच... पण तुझी मेहनत ही आहे, मी फक्त त्या मेहनतीला मागून पुश केलं बस्स...!" नमन म्हणाला.
"नमन हे काय बोलतोय? आणि रवी कोण? माझं नाव विसरला काय? मी मयंक... आणि का माझी मस्करी करतोय रे? मुद्दाम करतोय काय हे सर्व?? तुझी दारू बोलत आहे ना हे सर्व? माझी मशीन फेल ठरली... समजतंय तुला? मी आता हे सगळं सोडून देणार आहे... ह्यात काही नाही उरलं आता.. मी आता आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे...!" मयंक म्हणाला.
"अरे मी कितीही दारू पिऊन राहिलो तरी मी शुद्धीत असतो... काय बोलतोय रवी तू? वेडा झाला आहेस काय? तू सक्सेस झाला आहेस... आपण एवढी वर्ष ह्यावर काम करत होतो, तू त्याच चीज केला आहेस...!" नमन म्हणाला.
"अरे वेडा तर तू झाला आहेस, काय बडबड करतोय? आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा इथे आला आहेस आणि मला म्हणतोय आपण मेहनत घेतली...? कोणत्या तोंडाने?" मयंक म्हणाला.
"भाई... सोड ते सर्व... मला आता घरी नाही जायच आहे.. बस्स झाली बायकोची कटकट.. मला आता घटस्फोट हवा आहे... मदत करणार ना तू माझी?" नमन म्हणाला.
"तुला कसलं वेड लागलं आहे? तुझं लग्न झालं तरी कुठं डिव्होर्स द्यायला? शीतलच्या एकतर्फी आशिकी ने तुला वेड लावलाय नक्कीच...! स्वप्नातून बाहेर ये नमन..." मयंक म्हणाला.
"एक मिनिट काहीतरी घोळ झाला आहे... मी माझ्या बायको पासून त्रस्त झालोय आणि तू म्हणतोय की मला बायकोच नाही? काहीतरी कुठंतरी चुकतंय...!" नमन म्हणाला.
"बरं मला एक सांग, लग्न कुणासोबत झालं तुझं? नाव काय तिचं?" मयंक म्हणाला.
"चंचल... तिचं नाव चंचल काळे...!" नमन म्हणाला.
"चंचल? बरं एक मिनिट(मोबाईल मध्ये काहीतरी सर्च करून) ही कोण आहे मग?" मयंक शीतलचा फोटो दाखवत.
"अरे हीच तर चंचल... माझी बायको!" नमन म्हणाला.
"भाई.. खरंच तू पागल झाला आहेस... तुला डॉक्टर कडे दाखवायला हवं! नाहीतर दारू चढली आहे तुला खूप जास्त!" मयंक रागात म्हणाला.
"अरे रवी... खरं सांगतोय... हीच माझी बायको...! तुझं नाव रवी... माझं नाव नमन... असा का घोळ करतोय? आपण आनंद साजरा करत होतो ना तुझी मशीन सक्सेस झाली ह्याचा... मी मशिणीपुढे गेलो आणि अचानक डोळ्यांपुढे काळोख सर्वत्र काळा प्रकाश झाला... आणि मला चक्कर आली...!" नमन म्हणाला.
"एक मिनिट... माझी मशीन सक्सेस झाली? पण मी तर इथे फेल झालो म्हणून मशीन तोडायला निघालेलो...माझे नाव रवी नाही... एक मिनिट... रवी म्हणजे सूर्य... तुझ्या बायकोचं नाव चंचल.. चंचलच्या विरुद्ध शीतल, जी शांत असते... तू... दुसऱ्या...?" मयंकला धक्का बसला.
"मयंक म्हणजे चंद्र ना? फ**! म्हणजे मी ह्या विश्वातील नाही? म्हणजे इथे माझं लग्न झालेले नाही आहे माझ्या बायको सोबत? का नाही झालं पण?" नमन म्हणाला.
"मला विश्वासच बसत नाही आहे, तू ह्या विश्वातील नाही?!? इथला नमन मला सांगत होता की, इथली मशीन फेल ठरली, पण दुसऱ्या ब्रह्मांडातील मशीन नक्कीच सफल ठरली असेल, त्या सफल ब्रह्मांडातून तू थेट इथे आलास? मी स्वतःला, माझ्या ह्या कार्याला सफल ठरवू की स्वतःला लकी समजू? मला काही कळत नाही आहे..." मयंक त्याला हात लावत, त्याचे डोळे भरून आलेले.
"होय, रवी... सॉरी... मयंक...! कदाचित तुम्ही सफल ठरले... सफल ठरायला तुमच्या पैकी कुणातरी एकाला सफल ठराव लागत होतं तर कुणाला तरी विफल, नियमानुसार तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थात सफल ठरणार! जसं नाण्याचे दोन बाजू असतात, त्याला उडवल्यावर एक तर छापा पडेल किंवा काटा, पण दोन्ही नाही पडू शकत, जर ह्या पृथ्वीवर छापा पडला, तर दुसऱ्या पृथ्वीवर काटा पडायलाच हवा!" नमन म्हणाला
"वैज्ञानिक मी आहे, आणि तूच मला विज्ञान शिकवत आहेस नमन...!" मयंक म्हणाला.
"बरं इथल्या नमनचं असं काय झालेलं की, ह्यांच लग्नच झालं नाही?" नमन म्हणाला.
"ते सोड, सर्वात आधी हे सांग की, तुझं लग्न कसं जुळलं?" मयंक म्हणाला.
"मी तिच्याशी शाळा संपल्यानंतर प्रेम करायला लागलो, आधी प्रेम वगैरे न्हवतं, पण म्हटलं की होय, हीच सर्वात चांगली राहणार माझ्यासाठी... कारण दिसायला सुंदर आणि मला लोकांनी चिडवून लावलं होतं, 'ब्लॅक अँड व्हाइट' ह्या नावाने... कारण माझं आडनाव काळे आणि तिचं आडनाव पांढरे...!" नमन म्हणाला.
"काय? तिथे तुझं आडनाव काळे आहे? इथल्या नमन च आडनाव पांढरे आहे आणि शीतलच आडनाव पांढरे आहे आणि इथे ह्याला काहीतरी कलर टीव्ही म्हणून चिडवतात वाटते... असो पुढे बोल..." मयंक म्हणाला.
"मग काय? आमचं जुडायला लागलं, नवीन नवीन प्रेम, मज्जा येऊ लागली होती. तिला जास्त दिवस वाट बघू दिली नाही, मी विचार केलेला की मी तिला प्रपोज करावं, पण माझ्या आधीच तिने मला प्रपोज करून टाकलं... मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. आमचं रिलेशन जवळपास दहा वर्षे चाललं... हळूहळू आमच्यात वाद वाढायला लागलेत, पण नंतर एवढी वर्ष झाली रिलेशनला, म्हणून रस कमी झाला असावा असं वाटलं... वाद वाढत चालले होते, नातं आधीसारखं राहिलं न्हवतं, खूप भांडण पेटत होती, लहान सहान गोष्टींवरून... पण वाटलं लग्न करून सर्व भांडणं मिटतील... आणि मेन मुद्दा असा की लग्न केल्याशिवाय पर्याय पण न्हवता आमच्याकडे, कारण गावभर एवढं आमच नाव जुडलेलं होत की, तिला बघायला कुणीही येत न्हवते. मी पण कोणत्या मुलीला बघायला जाऊ शकलो नाही. दोघांनी लग्न केल्यावर जे काही वाद आहेत, सर्व मिटवणार असा निश्चय केला आणि लग्न केलं.. पण लग्नानंतर हे वाद थांबायचा ऐवजी अजून वाढू लागले होते. ती नुसतं बडबड, भांडण, वाद करत असते... मला ते आवडत नाही, मी आधीपासूनच दारू प्यायला लागलो, जेणेकरून शांत होईल डोकं... पण दारू पिलेलं तिला आवडत नाही आणि मी दारू पिल्याशिवाय राहू पण शकत नाही. ती प्रत्येक गोष्टींवरून माझ्याशी भांडू शकते, नुसती रोज रोजची किटकीट, एकदम त्रासून गेलोय मी... आरोप पण काय करते माझ्यावर की माझ्यामुळे तिचं आयुष्य उद्धवस्थ झालंय, तेच नाही तर म्हणते की मी तिला एवढ्या वर्षात बाळंतपणाच सुख देऊ शकलो नाही...बस्स झालं मला... नकोशी झाली आहे ती... एक वेळचं मी एकटं राहील... पण तिच्यासोबत.. एक क्षण पण नाही... म्हणून मी निर्णय घेतला होता की, मी घटस्फोट देणार आहे तिला!" नमन म्हणाला.
"बापरे... आणि इथला नमन, तिला मिळवायला काय काय करून गेला... तरी ती त्याची झाली नाही...!" मयंक म्हणाला.
"इथल्या नमनच लग्न झालेले नाही हआहे ना? किती सुखी असेल यार तो... मी तिकडे दुःखी आहे तर तो इथे नक्कीच सुखी असणार, उलट चालते ना सर्व?" नमन म्हणाला.
"नाही... त्यालाही तुझ्या एवढंच दुःख... किंवा तुझ्यापेक्षा ही जास्त दुःख... काय माहिती? पण आता विचार कर की परत तू तुझ्या ब्रह्मांडात कसा जाणार आहेस?" मयंक म्हणाला
"मला काय माहिती? तूच.. म्हणजे तुम्ही दोघांनी मशीन बनविली तुम्हाला माहिती... " नमनं म्हणाला
"माझी मशीन फेल ठरली आहे... मला नाही माहिती तुला कसं तिथे पाठविता येईल..? इथला नमन तिथे गेला असेलच आणि माझा तिथलं रूप नक्कीच त्याला इथे पाठवायला युक्ती करेल... तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त वाटच बघू शकतो...!" मयंक म्हणाला.
"चलो, येऊ देत त्याला आरामात, कमीतकमी तिथली किटकीट नसेल.... भोगू देत त्याला तिचा तो कर्णकर्कश आवाज... खूप प्रेम हवं होतं ना त्याला... दिसू देत प्रेम काय चीज असते ते...!" नमन जरा हसतच म्हणाला.
"गोष्टी एव्हढ्या सोप्प्या नसतात नमन... तुला सगळं सहज मिळालं, म्हणून त्याची किंमत नाही, पण त्याला एवढी मेहनत करून देखील नाही मिळालं, म्हणून तो तुझ्याहून जास्त दुःखी!" मयंक जरा रागवतच म्हणाला.
"भाई तुम्ही दोघेही ग्यान देण्यात माहिर आहेत, तो माझं रवी पण नुसतं ग्यान देत असतो मला... !" नमन म्हणाला.
"ग्यान द्यायला तू तरी नेहमी सोबत होता त्याच्या, माझ्या सोबत तर माझा नमन कधी न्हवता...!" मयंक हताश होऊन म्हणाला.
"मयंक... नको एवढं टेंशन घेऊ... ठीक आहे नाही मिळालं तुला सक्सेस... पण ते पण तुझंच रूप ना रे... एकत्र सेलिब्रेट करूयात... आणि तुझा नमन तुझ्यासोबत न्हवता, पण हा नमन आहे तुझ्या सोबत, डोन्ट व्हरी...! बरं मला सांग ह्याचं घर कुठं आहे रे? बघू तर देत ह्याच घर मला..." नमन म्हणाला.
"मला एक्साक्ट घर नाही माहिती तो कुठे राहतो, पण तो बाजूच्या शहरात कुठेतरी रूम करून असतो म्हणे, बिजनेस त्याचा, त्याची पलटण सांभाळते..." मयंक म्हणाला.
"वाह त्याचा बिजनेस आहे? अरे हा..! मी तिथे नोकरी करतो, तर तो इथे नक्कीच बिजनेस करत असणार ना... मी पण ना...! बरं निघतो शोध घेत... भेटुयात आपण, आणि हा त्याचा मोबाईल ना, मी घेऊन जातो काही लागलं तर मला ह्या मोबाईल वरच कॉल कर ओके?" नमन असा बोलून तिथून निघून गेला. मयंकने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला...!
__________________________________
चंचल, रवीला कॉल करण्याआधीच तो तिथे हजर झाला.
"नमन... तू इथला नमन नाही आहेस? तू वेगळ्या विश्वातील आहेस ना?" रवी म्हणाला.
"मगापासून तुला तेच सांगत होतो... तू ऐकायला तयार असशील तेव्हा ना?" नमन वैतागून म्हणाला.
"एक मिनिट... मला काहीही समजत नाही आहे... आत येऊन बसून बोलूयात काय?" चंचल म्हणाली. सर्व आत येऊन बसले.
"मी मशीन बनवली आहे, ज्याद्वारे आपण एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात प्रवेश करू शकतो,, म्हणजे आपल्या पृथ्वीसारख्याच असंख्य पृथ्वी असणार... तिथे आपण चुकवलेले निर्णय तिथे आत्मसात केले असतील..." रवी बोलला
"माझ्या पृथ्वीवर तू माझी झाली नाही आहेस... तू मला नकार दिला आहेस, पण इथे तू माझी पत्नी झाली आहेस... प्रत्येक निर्णयाचे वेगवेगळे परिणाम वेगवेगळ्या पृथ्वीववर दिसणार...!" नमन म्हणाला.
"म्हणजे तुम्ही माझेच पती आहात.. पण वेगळ्या रुपात, वेगळ्या परिणामात?" चंचल म्हणाली.
"होय... मी आता परत कसा जाऊ रवी? मला परत त्या मशिणीकडे जावं लागेल? कोणती बटन वगैरे आहे काय?" नमन म्हणाला .
"मला नाही माहिती अरे... मी फक्त प्रोटोटाईप बनवला, म्हणजे मी ह्या अनुषंगाने ती मशीन बनविली की, त्यात द्वार बनेल दुसऱ्या ब्रह्मांडात जायला... पण ते सुरू कसा करायचा? बंद कसा करायचा? मला ते कंट्रोल नाही करता येणार.... तरी चल बघुयात... काही करता येईल काय ते, बघुयात!" रवी आणि ते दोघे त्याच्या अड्ड्यावर आलेत...
तिथे त्यांनी खूप प्रयत्न करून बघितला, पण त्या मशीनला कसं हँडल करून तिथला द्वार कसा खोलायचा हे समजत न्हवत... असंख्य प्रयत्नानंतर ते दमून थांबले. इथून कसं बाहेर पडायचं? आणि आता नमन कुठे राहणार? हा देखील एक प्रश्न होता. कारण चंचल त्याची बायको नाहीच आहे, तर इथल्या नमन ची बायको आहे. पण नवरा कसाही दारुडा असला तरी ती कधी घरी एकटी झोपली न्हवती, म्हणून तिने रिक्वेस्ट केली की ती इथेच रवीच्या अड्ड्यावर झोपू शकणार काय? रवीने होकार देत, तिघांच्या झोपण्याचा बंदोबस्त केला.
त्या तिघांनाही झोप काही आली नाही, तिघेही एकमेकांशी बोलत बसले होते. रवी आणि चंचल ह्या पृथ्वीवरील सर्व सांगत होते, नमन आपल्या पृथ्वीवरील सर्व गोष्टी सांगत होते... एकमेकांचे दुःख एकमेकांसोबत शेअर करत होते...त्या तिघांनाही ह्याची अतोनात गरज होती...दुःख वाटण्याची.
रवी आदल्या रात्री जास्त वेळ झोपू शकला न्हवता, त्याच्या प्रयोग मुळे, म्हणून तो झोपी गेला हे दोघे रात्री बोलत बसले होते. दोघांचे विचार एक होत होते. दोघेही हसून खेळून बोलत होते, जणू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटले असावे... मंद थंडी होती... रवी ने पातळ ब्लॅंकेट दिलेला, पण थंडी ब्लॅंकेट मधून आत जाऊन शरीराला कुडकुडत होती. नमन ने हाताने इशारा केला.. ती त्याच्या कुशीत आली, दोघेही एकाच ब्लॅंकेट मध्ये बिलगून होते... दुःख केव्हाच व्यक्त होऊन गेले होता... बोलायला शब्द अपुरे पडले होते. दोघांनाही दूर जायची जराही इच्छा न्हवती. मिठीत एकमेकांच्या गरम श्वासाचा भास होत होता... मिठी घट्ट होत चालली होती. चेहऱ्याचे होणारे घर्षण दोघांनाही सुख मिळवून देत होते. दोघांनाही हवेहवेसे वाटत होते. क्षणाचाही विलंब न लावता चंचलने मागे वळून त्याला चुंबन केले, आणि तिथून दोघांचाही तोल सुटला. दोघांनाही हवे असलेले सुख त्या रात्री मिळून गेले, त्यांचे दुःख, सुखात जणू विलुप्त होऊन गेले.
"काश एवढं प्रेम माझ्या नयनने केलं असत माझ्यावर कधी... त्याच्यावर कधीचच रागावले नसते... त्याने ना धड कधी मिठी मारली मला... हे आज मला मिळालेलं सुख तो फक्त शरीर तृप्ती करून देत होता, पण मानसिक सुख कधी नाही... आज ते पहिल्यांदा मला मिळालं... आणि जराही वेगळं वाटलं नाही... कारण तू पण माझा नवराच एका दृष्टीतून... फक्त वेगळ्या रुपात...!" चंचल अशी म्हणताच... परत ते एकत्र आलेत...
________________________________________________
नमन शोधमोहीम करून आणि आधी डोक्यात काय विचार आले होते, की पैसे असले तर कुठे रूम घेणार किंवा कोणता त्याला एरिया आवडतो किंवा आवडत नाही... म्हणजे तो अश्या ठिकाणाच्या शोधात होता, ज्याचा त्याने कधीतरी विचार केला असेल, त्याच्या जीवनात... तो त्या विचारांच्या शोधत गेला आणि कसं बस त्याला इथल्या नमनची रूम सापडली.
रूम मस्त नीटनेटकी होती. फ्रीज मध्ये दारू च्या बाटली, पण बेसिक वाल्या... त्याला कळलं की हा इथला नमन आता प्यायला लागला आहे. त्याच्या अकाउंट मध्ये पैसे भरपूर होते. आणि बिजनेस चे पैसे मोबाईल वर दिसत होते. ह्याला वाटायला लागलं, काय मस्त लाईफ आहे ह्याची. दारू आणि पैसा, ना बायकोची कटकट, ना नोकरीच टेंशन. घरबसल्या फक्त आणि फक्त मज्जा करायची.
नमन, इथल्या नमनची पूर्ण लाईफ मजेशीर जगत होता. मस्त दारू वर पैशांची उधळण करत होता. जॉब पण करायची नसल्याने त्याला कसली फिकीर न्हवती, ना रविवारची वाट बघावी लागत होती, रोज त्याच्यासाठी आता रविवार होता. दिवसभर मस्त फिरायचं, मज्जा मारायची, रात्री मस्त ब्रँडेड दारू पित राहायचं. नमनची त्याची ड्रीम लाईफ सुरू झाली होती, जी कित्येक वर्षे त्याने स्वप्नात बघितली होती.
_________________________________________________
दुसऱ्या दिवशी पासून नमन चंचल कडे, म्हणजे तिथल्या नमनच्या घरी त्याच्या बायकोकडे राहायला गेला. कारण दोघांची जवळीकता वाढली होती. आणि इथल्या रवीला ती मशीन सुरू करता येत न्हवती, आणि तिथल्या मयंकला ती मशीन सफल ठरवता आली न्हवती. तर आता परतीचा मार्ग काही दिसत न्हवता. रवी च्या म्हणण्यानुसार ते द्वार अगदी काहीच मिली-सेकंदासाठी उघडलं होतं... आता परत कसं उघडायच? काहीही ठाऊक नाही, पण ह्यावर तो परत रिसर्च आणि प्रयोग करणार असं ठरवलं.
नमन, चंचल सोबत राहायला लागला होता. दिवसभर नोकरीला जायचं, सायंकाळपासून चंचल सोबत वेळ घालवायचा, रविवारचा पूर्ण दिवस तिला द्यायचा. अगदी त्याने बघितलेल्या स्वप्नासारखं सर्व मस्त चाललं होतं. ह्यामुळे चंचल देखील खूप जास्त आनंदी होती. तिची चिडचिड रागवा, रुसवा, सगळं संपुष्टात आला होता. नमनची दारू देखील सुटली, ह्या सेटल लाईफ मुळे, कारण तो एवढ्या दिवसानंतर आनंदी होता.
_______________________________________________
नमन रोज रोज, एकच-एक करून करून कंटाळला. सगळं आयतं भेटत होत, पण हेच त्याला आतून खात होत. करायला काही न्हवतं, आधी कसं दिवसभर कामात व्यस्त का असे ना, पण मन लागून राहायचं, कामाचा त्रास असेलही, पण सुट्टीची आस पण एक सुखकर वाटत होत, पण आता झालं असं की रोज सुट्टी... ह्या गोष्टींमुळेपण वेगळा कंटाळा यायला लागला. जेवण बनवायला मोलकरीण बाई होती, पण त्याची बायको, म्हणजे चंचलच्या हातच्या जेवणाची त्याला एवढी सवय लागली होती की, त्याला आता हे जेवण बाहेरचं आणि चंचलने केलेलं घरचं वाटू लागलं आणि त्याच घराची आठवण त्याला सतावत होती, इथे त्याला स्वादिष्ट व्यंजन, जे हवेत ते, जेव्हा हवं तेव्हा, कधीही उपलब्ध होऊ शकत होता, आणि चंचल दोन दिवसाला, एकच एक भाजी, तेच ते जेवण बनवत असली तरी त्याने मन भरायच, इथे फक्त पोट भरतं आहे. चंचलचे त्याच्या आयुष्यात किती मोठा योगदान आहे, हे हळूहळू कळायला लागलं. तरीही त्याने बरेच दिवस ह्या माहोल मध्ये स्वतःला जुडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला हे आयुष्य बस्स झालं होतं.
तो मयंककडे गेला, त्याच्याकडे विनवणी करू लागला, त्याला परत त्याच्या स्वतःच्या विश्वात सोडून देण्यासाठी. पण मयंकने सरळ सांगितलं की, त्याची मशीन पूर्णपणे ठप्प पडली आहे, तो ह्यात काहीही करू शकणार नाही, त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो ह्यात काहीही मदत करू शकत नाही, ह्यावर फक्त उपाय एकच, वाट बघणे... कारण जर त्या दुसऱ्या पृथ्वीवरील रवीने इथल्या नमनला इथे पाठवून तुला तिथे घेऊन गेला तरच तू लकी.. त्याचेही चान्सेस खूप कमी दिसत आहेत, कारण जर खरच इथे त्याला पाठवायचं असतं तर आतापर्यंत पाठवलं पण असत त्याला.
नमन हताश होऊन घरी परतला. त्याला त्याच्या बायकोची म्हणजेच चंचल ची खूप जास्त आठवण येऊ लागली, तिला त्याने किती सतावल, तिचं काहीही ऐकलं नाही, आता त्याला त्याचा पश्चाताप होऊ लागला. तिला परत बघायची त्याची खूप जास्त इच्छा होती. पण इथे कसं बघणार, तर त्याला आठवलं की इथे चंचलचे रूप शीतल आहे, जर ती भेटली तर कदाचित मनाला शांती मिळेल.
तो तिचा शोध घेऊ लागला. त्याला कळलं की ती शिक्षिका बनली आहे. त्याच्या बायकोला पण आधी शिक्षिका बनण्याची इच्छा होती, पण लग्नानंतर त्याने तिला तिची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. नमनने शीतलला बघितलं, शिक्षिकेच्या रुपात... किती आनंदी दिसत होती. अगदी चंचल सारखीच होती, तसेच डोळे तसाच चेहरा, अगदी तशीच, फक्त खूप जास्त आनंदी आणि आयुष्यात खूप सुखी... एवढ्या दिवसानंतर त्याच्या बायकोचा चेहरा बघितल्यावर त्याला राहवलं नाही, ती त्याला चंचलच वाटू लागली. तो तिच्याकडे पळत सुटला...
_________________________________________________
नमन कडे आता सगळं काही होतं, बायको होती, नोकरी होती, सगळं त्याच्या स्वप्नाप्रमाणे चाललं होतं. पण त्याच मन खाली खाली वाटत होतं. रोज एकच एक नोकरी करून त्रासून गेला होता. त्याच डोकं बिजनेसमन सारख्या लोकांसारखं चालत होतं, नोकरी मध्ये त्याला असं वाटत होतं की, त्याच डोकं बंदीस्त झालं आहे. फक्त हाच एक प्रश्न न्हवता, तर महत्वाचं म्हणजे त्याला असं वाटत होतं की तो कोण्यातरी दुसऱ्याचं आयुष्य चोरून जगत आहे, दुसऱ्याच्या बायको सोबत तो राहत आहे, जी त्याच्या हक्काची नाही, ना त्याच्या नशिबातली. हे फक्त चोरी केलेलं सुख वाटत होतं. त्याला त्याची सिडेंटरी लाईफ आठवत होती. मनमर्जीप्रमाणे जगणं, कुणाच्याही दबावाखाली नसणं, एवढ्या दिवसाचा एकटेपणा त्याला आता हवाहवासा वाटू लागला. सोबत बायको असून सुद्धा त्याला हा मोठा एकटेपणा वाटू लागला. हक्काचं प्रेम मिळविण्याचा नादात, तेच प्रेम पण दुसऱ्याच्या नावाचं आपण जगतोय ही भावना त्याच्यासाठी मनाला बोचून खाणारी होऊ लागली. ही चंचल असो वा शीतल, आता नकोशी होऊ लागली.
आतापर्यंत जवळ जवळ असलेला नमन का असा दूर जायचा प्रयत्न करतोय? हे जाणून घ्यायला चंचलने त्याला विचारून टाकलं...
"का हो नमन? माझ्यापासून का पळत आहात? तुमचं पण मन भरलं काय माझ्यापासून?? तुम्हालाही मी नकोशी झाली आहे काय त्यांच्यासारखी? दोघेही एकच ना... म्हणून असेल...!"
_________________________________________________
-------------------------------------------------
"नमन... काय झालं? मी तुला नकार दिला, तेव्हापासून तू मला दिसलासच नाहीस...मला किती भीती वाटली होती तू तुझं काही बरं वाईट तर केलं नसशील? पण खरंच माझं तुझ्यावर प्रेम नाही, तर मी काय करू रे ह्यात?" शीतल म्हणाली.
"शीतल... मी इथला नमन नाहीये ग... इथला नमन माझ्या पृथ्वीवर शिफ्ट झाला आहे, जिथे तू माझी बायको आहे, आणि मला माझ्या बायकोची खूप म्हणजे खूप जास्त आठवण येत आहे, जे की तू आहेस, पण दुसऱ्या रुपात...!"
"काय बोलतोयस नमन? तू दारू प्यायला आहेस काय? काय बडबड करतोयस? " शीतल कन्फ्युज होऊन म्हणाली.
नमनने घडलेला पूर्ण प्रकार तिला सांगितला...
"काय? इम्पोसीबल... काहीही काय पकवतोएस नमन? मी फिजिक्सची शिक्षिका आहे म्हणजे मलाच आता फिजिक्सच्या जाळ्यात टाकणार?" शीतलला वाटलं नमन नक्कीच काहीतरी गेम मकरत असेल हे सर्व बोलून...
"शीतल... मी माझ्या पृथ्वीवर खूप म्हणजे खूप खोटं बोलतो.. ह्याचाच अर्थ इथला नमन नक्कीच खूप खरा असणार... तो कधीच खोटं बोलत नसणार, माझ्या उलटं!" नमन म्हणाला.
"होय...! नमन तर कधी खोटं बोलणार नाही... पण हे खरं आहे? अविश्वसनीय!! मी ठेवेल तुझ्यावर विश्वास, कारण मीच जर भौतिकशास्त्रात विश्वास ठेवला नाही तर एवढं विज्ञान, विद्यार्थाना शिकवून काय उपयोग माझा? पण आता तुला काय हवं आहे? जा मयंककडे आणि म्हण काहीतरी करून त्या मशिणीला दुरुस्त करायला किंवा सुरू करायला, जेणेकरून तू आपल्या ठिकाणी जाऊ शकणार!" शीतल त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणाली.
"खूप जास्त अशक्य वाटत आहे शीतल... माहिती? माझी बायको खूप जास्त माझ्याशी भांडण करते, असं मला वाटायचं, पण त्या भांडणाचं कारण पण मीच हे कधीच समजू शकलो नाही...!" नमन म्हणाला आणि आपल्या बायकोबद्दल म्हणजेच चंचलबद्दल तिला सर्व सांगितलं, तीच वागणं, तिचे छंद, तिच्या सर्व गोष्टी.. आणि त्या सार्व गोष्टी शीतल च्या उलट होत्या...
"नमन... तुम्ही दोघांनी आम्हाला कधी ओळखलंच नाहीत रे... आम्हाला काय हवं? आमच्यासाठी काय योग्य आहे? आम्हाला कशात आनंद आहे? काहीही तुम्हाला ओळखता आलं नाही, ना तुला, ना माझ्या मागे लागलेल्या नमनला...!" शीतल म्हणाली.
"नमन... तुम्हा दोघांनाही, आमच्यावर कधी प्रेमच करता नाही आलं रे... तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ बघता आला, तुला शीतल हवी होती, म्हणून तू तिच्या मागे मागे गेलास, पण कधी हे जाणून घेतला नाहीस की, तिला काय हवं आहे, ती कशात आनंदी आहे? नक्की तुझ्यात आहे काय? ती तुझ्यावर प्रेम करत नाही, खोटं ही करत नाही... पण हे तू कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस, फक्त मागे पुढे करत होतास, मन जपायचा प्रयत्न करत होतास, पण मनात तू आहेस काय? हे कधी जाणून घेतल नाहीस..." चंचल तिकडे नमनला म्हणाली.
"तू फक्त तुझा स्वार्थ बघितलास, इथला नमन देखील काहीसा असाच वागत होता. तू जर तुझ्या बायकोला वेळ दिला असतास, जर तिला तिचा आनंद मिळवून दिला असतास, तर ती का चिडचिड केली असती? का तुला दारू प्यायची गरज भासली असती? तुलाही माहिती की तिला दारू आवडत नाही, परत तू तिच्या मानविरोधात वागत गेलास... किती रे सहन करायचं? तूच विचार कर ना?" शीतल इथे असलेल्या नमनला म्हणाली.
"माझंही आयुष्य खूप सुखकर झालं असत, ठीक आहे माझी इच्छा होती शिक्षिका बनण्याची, त्याच मन न्हवतं मला बनवायचं, मान्य केलं, पण कमीतकमी बायको म्हणून तरी ट्रीट करायला हवं होतं कधी! कधी प्रेमाने विचारलं नाही त्याने की, तू बरी आहेस काय? तू आनंदी आहेस काय? असे साधे प्रश्न फक्त करायचे होते रे, हेही त्याने झाले नाहीत... मी आता एवढी पण अपेक्षा नको ठेऊ काय नवऱ्याकडून? चिडचिड का होते हे जाणून न घेता, चिडचिड करते, ओरडते, त्रास देते असं म्हणून मला घटस्फोट द्यायला निघाला होता... आता काय बोलू ह्यावर?" चंचल म्हणाली.
"इथल्या नमनने दारू प्यायला सुरुवात केली, तेही फक्त मी नकार दिला म्हणून,, फक्त आणि फक्त माझाच विचार करणं, आयुष्याला थांबवून घेणं, आणि अप्रत्यक्षपणे ह्या सर्वांचा दोष माझ्यावर टाकणं... हेच ते प्रेम काय? प्रेम दोन्ही दिशेने झालं, तर त्याला प्रेम करणं म्हणतात, एकतर्फी प्रेम करून त्याने काही पाप केलं नाही, पण माझं पण एक मन आहे ना... माझ्या मनात तो आहे काय हे पण तेवढंच महत्वाच ना?" शीतल नमनला म्हणाली.
"स्वतःच मन जसं जपत होता... फक्त आमच्या मनाला एकदा समजून घ्यायला हवं होतं... बस्स एवढंच आम्हाला हवं होतं...!" दोघी शीतल आणि चंचलने दोन्ही नमनला म्हटलं!
दोघांचं बोललेलं ऐकून... दोघेही नमन आपापल्या ठिकाणी निशब्द झालेत. दोघांनाही त्यांची चुकी कळली, पण दोघांनीही पुढे असलेल्या चंचल/शीतलला माफी मागितली.
"मला माफी मागून फायदा नाही रे... तुझ्या शीतल/चंचलला जाऊन माग, समजून घेईल ती... " चंचल आणि शीतल दोघांनी म्हटलं.
________________________________________________
"मला परत जायच आहे, माझ्या बायको कडे, माझ्या चंचल कडे... पण इथल्या मयंकची मशीन कधी सक्सेस झाली नाही आहे.. म्हणून मी जाऊ शकत नाही आपल्या जगात... मयंक म्हणाला, हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तिथला नमन परत ह्या पृथ्वीवर यायला रेडी होईल आणि तो मशीन सुरू करेल तेव्हाच..." नमन पाणावलेल्या डोळ्यांनी शीतलला म्हणाला.
"कदाचित तुम्ही दोघेही ह्याच फेज मध्ये असाल, कदाचित दोघांनाही आपापल्या जगात परत यायचं असेल, मागच्या वेळेस दोघांची अदलाबदल तेव्हाच झाली, तेव्हा कदाचित तुम्ही दोघेही त्या मशीनच्या पुढे असाल... ह्यात हे महत्त्वाचं ठरत नाही की, इथल्या मयंकची मशीन सक्सेस झाली की नाही ते, तिथल्या रवीची मशीन सक्सेस आहे आणि दोन्ही नमन त्या ठिकाणी असेल, तर कदाचित हे परत एकदा शक्य होऊ शकते, परत तुम्ही आपल्या ठिकाणी जाऊ शकाल!" शीतल नमनला म्हणाली.
"होय? हे शक्य आहे? जर असं असेल तर चल मग मयंक कडे..." नमन असा बोलून दोघेही मयंकच्या अड्ड्यावर गेलेत.
______________________________________________
"मला माझ्या ठिकाणी परत जायच आहे चंचल... मी ह्या लाईफला नाही जगू शकणार... पण रवीला त्याची मशीन चालवता येत नाहीये... काय करू मी? कसं जाऊ परत आपल्या ठिकाणी?" नमन चंचलला म्हणाला.
"कसं जाता येणार, हे मलाही नाही माहिती नमन... पण एकदा जाऊन बघायला हवं रवी कडे... काहीतरी तोडगा निघेल..." असं बोलून चंचल आणि नमन दोघेही रवीच्या अड्ड्यावर पोचले.
"मला समजलं ही मशीन कशी सुरू होणार ते... ह्याला मानवी शक्ती सुरू करू शकत नाही... तर निसर्गच ठरवतो कधी आणि कशी सुरू करायची ही मशीन... हे बघ... तू आणि इथल्या नमनने एकत्र ह्या मशिणीकडे गेलात, तुम्हा दोघांची आभा(aura) जुळली, आणि इथे वर्म होल म्हणेज असा मार्ग ज्याने एकमेकांना ट्रान्सफर करण्याची शक्ती जुळली आणि दोघेही अदलाबदल झालेत. जर तुझ्या पृथ्वीवर असलेला नमन पण आता ह्या क्षणी तिथल्या मशिणीपुढे असेल, तर ती आभा परत मिळेल आणि तुम्ही परत आपापल्या ठिकाणी जाल... हे शक्य आहे नमन..." रवी आशेची किरण दाखवून म्हणाला.
नमनं मशिणीकडे जाऊ लागला...
"जर तू आपल्या पृथ्वीवर गेलास, तर तिथल्या माझ्या रुपाला सांग, की तू फेल झाला नाहीस... फक्त तू सिलेक्ट झाला नाहीस, हे सांग... आणि हे घे रिसर्च पेपर्स... त्याला देऊन टाक" त्याच्या हातात काही कागद देत रवी म्हणाला.
________________________________________________
"तुझं अगदी बरोबर आहे शीतल... त्या पृथ्वीवरील सर्वांचे नाव उलट आहेत, माझं-तुझं, एवढंच काय नमनच आडनाव पण उलट आहे, राहिली गोष्ट नमनची, इथल्या नमनच नाव, तिथे त्याच्या विरुद्धार्थी नाव असायला हवं, जसं की अहंकार, अभिमान... पण असं नाही आहे... कारण नमन नावच स्पेशल आहे.. कारण नमनला उलट केलं तर परत न'म'न' च होते!
हे एक शक्य आहे, जर तिकडे नमन ह्या मशिणीपुढे असेल तर तुम्ही दोघे अदलाबदल होऊ शकता... जर असे झालात, तर तुझ्या रवीला म्हणजे माझ्या दुसऱ्या रुपाला अभिनंदन दे... त्याने एवढी मानवाच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या मशिणीचा आविष्कार आणि निर्माण केला आणि सफल झाला." मयंक म्हणाला.
इथला नमन पण त्या मशिणीकडे जाऊ लागला, दोन्ही नमनने एकत्र हात पुढे केले... दोघांनाही परत चक्कर आली आणि दोघेही खाली कोसळले.
________________________________________________
दोन्ही नमन आपापल्या ठिकाणी आलेत. दोघांनी आपापल्या प्रेमीकाची माफी मागितली. दोघांनाही आपापल्या जगात परत आल्याचा अत्यानंद झाला.
दुसऱ्या पृथ्वीवरचा नमन, त्याच्या बायको सोबत म्हणजेच चंचलची माफी मागितली, आणि ती किती महत्वाची आहे त्याच्यासाठी हे तिला पटवून दिले आणि त्याने केलेल्या चुकीचा पश्चाताप दर्शवला. तिला घटस्फोट देण्याचा निर्णय त्याने मागे घेतला, तो चंचलला संतानप्राप्तीचे सुख देऊ शकत नसला तरी, ती दुसऱ्या नमनसोबत गरोदर राहिली, ह्या नमनने ते बाळ मान्य केलं, जरी त्याच नसलं तरी त्याच्याच रुपाचं होतं, म्हणजेच त्याचाच... आता बाप होणार ह्या आनंदाने त्याने दारू पूर्णपणे सोडली आणि नोकरी वर आणि पैसे बचतीवर लक्ष केंद्रित केले.
सगळं सुरळीत झालं म्हणून चंचलने आपल्या रागावर नियंत्रण आणलं, त्याच्यासोबत वेळ जास्तीत जास्त कसा घालवता येईल ह्यावर ती जास्त जोर देत होती. दोघांची म्हणजे आता तिघांचे आयुष्य सुखकर झालं.
रवीने निर्माण केलेल्या मशिणीमुळे त्याला सरकारमान्य पुरस्कार तसेच, जगजाहीर पुरस्कार देऊन सन्मान देण्यात आला. त्याने स्वतःची युनिव्हर्सिटी निर्माण केली.
________________________________________________
इथल्या नमनने शीतलची माफी मागितली, शीतलने पण त्याला सॉरी म्हटलं, दोघेही एकमेकांचे चांगले मित्र म्हणून वावरू लागलेत. नमन आता स्वतःच्या बिजनेस वर फोकस करू लागला होता. शीतल बेस्ट फ्रेंड बनल्याने तो तिच्या घरी ये जा करत होता, तिची बहीण नम्रता सोबत चांगली ओळख झाली. ती पण नमनच्या बिजनेस मध्ये स्वतःच योगदान देण्यात रुची दाखवू लागली. हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे जाऊन नमन आणि नम्रताने एकमेकांशी लग्न केलं. दोघेही आनंदी आयुष्य जगू लागले.
मयंकला, रवीने दिलेले रिसर्च पेपर्स मिळालेत, त्यात त्या मशिणीला जरा मोडीफाय करून, टेलिपोर्ट म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा लोकांना, सेकंदाच्या आत कसं वाहून नेता येईल हे लिहिलं होतं. त्याच्या आधारे त्याने ती मशीन बनविली आणि तो सक्सेस झाला. त्याला कळलं होतं की, जर तिकडे रवीने हे मशीन बनविण्याचा प्रयत्न केला असता तर तो तिकडे असफल झाला असता किंवा झाला असेल... पण इथे मात्र हा मयंक सफल ठरला, त्यालाही ह्या अविष्कारासाठी खूप पुरस्कार मिळाले. त्याने ट्रान्सपोर्टची एक कम्पनी सुरू केली.
मयंक आणि नमन परत बेस्ट फ्रेंड बनलेत!
समाप्त!
-उत्कर्ष दुर्योधन लिखित...